|
Sanchu
| |
| Tuesday, December 05, 2006 - 5:53 pm: |
| 
|
मस्त आहे सगयांचे किस्से! हा BB विनोदीच म्हणायला हवा. अग,परी, नवरा वस्तु जागेवर नाही ठेवत. फ़ार किरकोळ गोष्ट आहे.....मुले झाली की बघ घराची हालत. माझा नवरा म्हणतो,घरात आले की वाटते, कालच रहायला आलोय जणु. बरं,आवरुन आवरुन किती वेळा आवरणार? तसा तो टापटीप आहे मझ्यापेक्षा पण एक दुग्रुन आळशीपणा! काही वर्षे गेली की या गोष्टी फ़ार दुय्यम वाटायला लागतात आनि आपण क्षुल्लक गोष्टींआ किती महत्त्व देतो ते जाणवते.
|
Manuswini
| |
| Tuesday, December 05, 2006 - 7:55 pm: |
| 
|
पण generally मला वाटते नवरे,पुरुष,मुलं लोक कमिच sensitive असतात. मुलिंना थोड्याश्य्या गोस्श्टीचे पण कौतुक केलेले आवडते. ज्यास्त काही requirements नसतात त्या. खरे तर साध्याच अपेक्षा असतात. प्रेमाने बोलणे, आवडीने एखादी गोष्ट स्वःताहुन करणे.. बाकी गोष्टी मुलांना बरे लक्षात येतात नी कळतात मग ह्या simple गोष्टी कश्या कळत नाहीत? प्रत्येक वेळेला काय सांगत बसायचे?? माझी एक नुकतीच लग्न झालेली मैत्रिण हेच सांगत होती, त्यांची भांडणं होतात का? तर नवर्याला कुठल्याच गोष्टीचे अप्रुप नसते. कधी एका साध्या शब्दाने म्हणत सुद्धा नाही की छान जेवण केले छान दिसतेस... (हेच म्हणे लग्नाअधी म्हणायचा कधीतरी आता तर अजिबात नाही). मैत्रिण सांगत होती की एरवी मी बरेच काही करते त्याच्यासाठी, surprize द्यायला ती travel करते.(ते दोघा वेगळ्य city त आहेत) तेव्हा ती स्वःताहुन न सांगता travel करेल तर ह्याच्या कडे दोन शब्द सुद्धा नाहीत की अग कीती करतेस तु? किंवा मला आवडले. all she wants that he acknowledges by two sweet words that I liked it, i felt good that you came all the way for him.. or i love you etc
|
Me_sakhi
| |
| Tuesday, December 05, 2006 - 8:46 pm: |
| 
|
मैत्रिणिनो एक किस्सा सांगतेय हसु नका हं! माझ्या पहिल्या बाळंतपणाच्या वेळि मी आईकडे होते प्रथे प्रमाणे!(हि जबाबदारि माझ्या सासरकडच्यांनि कधिच घेतलि नाहि)कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असताना लग्न ठरले.(मी स्वतःच ठरवले होते पण आजी अचानक गेल्यामुळे वर्षाच्या आत करायचे असा बाबांचा आग्रह ). आईने माझ्या कडुन शिक्षण पुर्ण करायचे असे वचन घेतले लग्न ठरवताना.म्हणुन शेवट्च्या वर्षासाठि परिक्षा द्यायचि होति मला आणि ७वा महिना चालु होता. "अहो" नोकरी मुळे कोकणात होते आणि मी आईकडे ठाण्याला. जेंव्हा जमेल तेंव्हा त्यांचि चक्कर असायचि. ४ जुलै ला सकाळी कळा सुरु झाल्या म्हणून हॉस्पिटलला गेले जाण्यापुर्वि यांना फोन केला आणि निघुन येण्यास सांगितले. येतो म्हणाले.सकाळचि संध्याकाळ झाली तरि यांचा पत्ता नव्हता.पाउसाने जोर धरला होता.मुसळधार पाउस आणि इथे माझि अवस्था दिवसभर कळा देउन वाईट झाली होति. रात्रि ७ नंतर डॉक्टरानी बाळाच्या ह्रुदयाचे ठोके मिळत नाहित तेंव्हा तातडिने ऑपरेशन करावे लागेल असे सांग़ीतले.ते ऐकुन आईबाबांना काय करावे ते सुचेना?अजुन ह्यांचा पत्ताच नव्हता. डॉ च्या मते जास्त थांबुन वाट बघणे शक्य नव्हते.इथे माझा सतत यांच्या नावाचाच जप चालला होता. शेवटी बाबांनी डॉ ना ऑपरेशनची तयारि करायला सांगितलि पण फ़ॉर्मवर सहि कोण करणार हा प्रश्न होताच? डॉ म्हणाले कि आम्हि हिला आत घेतो तो पर्यंत हिचे मिस्टर येतात का ते बघु?मी तर रडायला सुरुवात केली कारण ओ टि मधे जाण्याआधि यांना डोळेभरुन बघायचे होते. इथे बाळाच्या आणि त्याच्या बाबांच्या काळाजीने प्राण कंठाशी आले होते माझे. शेवटी देवाचे नाव घेतले आणि मनाची तयारी केली. आणि रात्री १० वा माझा "वरद" जन्माला आला सुखरुप पणे.बाहेर आले तेंव्हा भुल दिलेलि असल्यामुळे अर्धवट ज़ाग होति आणि त्या अवस्थेत पण माझी नजर यांनाच शोधत होति. ग्लानिमधे पण यांचेच नाव ओठावर होते(इति डॉ आणि नर्सेस). आणि अचानक माझ्या गालावर कुणितरि प्रेमाने स्पर्श केला आणि मी त्याहि अवस्थेत लाजुन चुर झाले.(इति आईबाबा)
|
हं एकंदर सार्या मैत्रिणिंनिच स्वताला बदल तर, राग करुन काय फायदा हा विचार करुन.किति हट्टि असतात हे नवरे. नंदिनि u r right खरच अस झालय मी फक्त बायको झालेय आणि तु जे लिहल आहेस ना सार तसच झालय. पण दिवाळी, वाढदिवस, निदान लग्नाचा वाढदिवस याला नवर्याने गिफ्ट द्याव हि आशा फिल्मी नाहि ग, सहाजिक आहे. Manu आमच लग्न Arrange आहे. माझ्या बाबांना हे आवडले म्हणून मी "हो" म्हणाले; नाहितर माझी "ना" होती. मी शहरात वाढलेलि हे गावातले. ह्यांच्या गावि पोहोचता पोहोचता जे हाल झाले तिथुनच तस माझ नाहि सुरु झाल (मनात). तस मी गावत राहिलेलि हि नाहि कधि.ह्यांच गाव खुप Backward आहे. असो. आमचे हे नाकि डोळि तसे माझ्याहुन सुंदर आहेत पण 'बारिक', ह्यांना पाहिल आणि माझा 'नाहि' जरा strong झाला आणि नंतर ह्यांच घर, त्यातल सामान, ठेवण (गबाळी) पाहुन नाहि वाढत गेला व ह्यांच्या आईला भेट्ल्यावर तर "नाहीच" झाल माझ.(Before meeting him we had chat few times after exchanging Bio-Data's but chatting n meeting f2f gives diffrent impressions abt person) आपल काहि ह्या मुलाच्या आईशि जमणार नाहि हे मला जाणवल व मी नाहि ठरवल. पण आई बाबांच बोलण कानावर पड्ल, बाबांना निर्व्यसनि, शिकलेला, नोकरि करणारा, शांत स्वभावाचा हा मुलगा आवडलाय हे मल समजल व मी 'हो' म्हणाले. ७ दिवसात लग्न झालहि.घाई घाईत सार. मला माझ लग्न अनुभवताच नाहि आल.I had my few plans for my marriage but I got NO chance to do anything. गंमत म्हणजे लग्नाच्या दिवशिच मी उपाशि. जेवण खुप छान झालेल पण घाईच्या आमंत्रणालाहि इतके पाहुणे की उरलच नाही. नी ह्यांच्या नातलगांनाहि आमचि आठवण नाही. ह्यांच्या गावत साध रेस्टोरंट नाहि.हि अशि आमचि सुरुवात. In 20th Cen.;there is no Garden even in his place, girls n females do not go out they sit in house only. After marriage, only I know how I spent my days there it was like JAIL n PUNISHMENT. I had thought abt it but in reality it was too hard n difficult for me. हे गावातले पण शिक्षण, नोकरि,साठी शहरात आलेले व ३ वर्षां पासुन अमेरिकेत; but शहर व गाव यात खुप खूप फरक व दरि आहे. रहाणिमान, बोलण, चालण...even Friends n Relatives प्रत्येक बाबतित.मी खुप फ्रिलि वागते यांच्यशि पण तेच थोडे संकोचित असतात. आमच्यात मी धिट, Strong, Agressive आहे, हे नाहित. I m trying my best to improve him but it's stressful. He is very Sharp in Programming n S/W but not in personal life.
|
Thanks to all for suggestion n for support it has increased my courage. I do not mean my husband is Bad or Wrong but I m just sharing my pain n fun with all u . Pari
|
Asmaani
| |
| Tuesday, December 05, 2006 - 10:58 pm: |
| 
|
परिणिता, माय्बबोलीवर कार्तिक महिन्यात psg ची "क्लिक" नावाची कथा प्रसिद्ध झालिये. वाचलीस का? त्यात एक वाक्य असं आहे," असे बेसिकमधेच राडे असतील तर कसले संसार करणार?". माझ्यामते तुझं तसच झालंय! जो मुलगा तुला मुळात आवडलाच नव्हता त्याच्याशी लग्न करण्याची फार मोठी चूक स्वत्: केल्यावर आता तुला त्याच्या लहान सहान चुकांकडे दुर्लक्ष करायलाच हवं. असो. झालंते झालं. मी सुद्धा एक बाईच असल्याने स्वच्छता, नीटनेटकेपणा बद्दल मलाही प्रेम आहेच.पण तरीही मला सगळ्यांनाच हे सांगावसं वाटतंकी आपलं मन:स्वास्थ्य आणि घरातली शांतता ह्याइतकं मोलाचं दुसरं काहीही नाही.
|
Main thing we r in 21st Cen. not in 20th. By mistake I wrote 20th Cen. Sorry abt it.
|
Manuswini
| |
| Tuesday, December 05, 2006 - 11:13 pm: |
| 
|
hmmm...... परिणीता मी फक्त एक तिर्हाईताच्या नजरेतुन सांगते आहे. तेव्हा तु वाईट अर्थ काढु नकोस. एका चांगल्या भावनेने सांगते आहे. माझे लग्न नाही झाले पण एवढेच कळते की जे झाले ते झाले. लग्न करताना म्हणुनच ह्या बेसिक गोष्टीचा विचार करायचा असतो. त्यावेळी तु ठामपणे आई वडीलांना सांगायचे की तु कशी unhappy आहेस. तुम्हा दोघांच्या विचारत, राहणीत कीती फरक आहे. anyways पण तु खुष राहु शकतेस की तुझा नवरा एक चांगला human being आहे, he does not have bad habits . माझी अतिशय जवळची मैत्रिण पण अशीच अवस्थेतुन गेली. ती शहरात वाढलेली, Msc झालेली, तो गावतला, घरात सासुला सासुबाईच म्हणायचे वगैरे वगैरे पण over the time i guess one adjusts it, I am not goign through so it might be different but seieng this girlfriend of mine I felt people change atleast for themselves so may be you can try doing that. you dont feel upset of whatever has already happened but make plans, include him. I guess he might be having some insecurity, complex that one city girl married him. TALK TO HIM. only option. ask him why did he marry you? what is that he liked in you? or in his case also he married in pressure?. i personally feel scared too , though I am preaching you but I really wonder how people marry in 7 days ?? but there are my friends who have done it and so much happy with each other. Yeah but one thign I agree that there were not so many vital diffeences. but anyways, you can make it if you want to change yourself if not he.
|
Disha013
| |
| Wednesday, December 06, 2006 - 12:06 am: |
| 
|
परी, मनात नसताना होकार दिला आइबाबांसठी. मग आता त्यांच्यासाठीच जमवुनच घ्यायला हवे ना? जे झाले ते झाले. आता जे आहे, त्याच्यातुन चांगले काही मिळवाय्चा प्रयत्न कर. नव्र्याचे + व गुण बघ. मान्य आहे,शहरात वाढल्यावर गावाकडे वळने फ़ार फ़ार अवघड असते. जसेसासरचे राहतात ना,तेच तसेच सगळे जग राहाते असा या मन्डळींचा गोड गैरसमज अस्तो. पण एक जमेची बाजु बघ. तुला तिथे राहावे लागत नाहिये. नोकरी निमित्ताने का होइएना लाम्ब आहेस ना. मग तु तुझे जग तुला हवे तसे कर की. तुझ्याकडे जे आहे त्याचा विचार कर. एका वर्षातच नवरा बदलेल असे समजु नकोस. सुरुवातीला तरी त्याचे ऐकाय्चे, मग आपोआपच तो तुझे ऐकेल
|
परी... आता तुझा problem कळायला लागला आहे.. हे नवरा बायको प्रकरण सोडून दे.. पण तू त्याचा एक माणूस म्हणून विचार कर.. कारण मला स्वत्:ला रत्नागिरीतून मुम्बईत जम बसवताना काय कष्ट पडले ते ठाऊक आहे. हा inferirity complex खूप छळतो. त्यात शहरातली मुलगी केलेली.. हे लग्न तिच्या मनाविरुद्द्घ आहे हे त्याला ही कळले असेलच ना? पुरुषाना मोकळेपणाने बोलता येत नाही... कधी कधी आपली समाजव्यवस्थाच त्याला तसे करू देत नाही.. आठवा पाहू किती आया आपल्या मुलाना सागतात "बायकासारखा रडू नको". त्यातून खेड्यातले जीवन... ते तर तू अनुभवतच असशील.. आता तूच म्हणाली की तिथे एकही garden नाही.. पण तिथे फ़िरण्यासाठी काहीतरी ठिकाण असेलचना. ते शोधायचा प्रयत्न कर. तिथे जात जा.. लोकाची मानसिकता एका दिवसात नाही बदलता येत.. पण तरीही तू तुझ्यासाठी म्हणून काही छद जोपास.. स्वत:ला शोधायचा प्रयत्न कर.. साने गुरूजीचे एक वाक्य आहे..लग्न म्हणजे दया शान्ती प्रेम अशा स्त्री गुणाशी धाडस, शक्ती अशा पुरुष गुणाशी मिलन.... त्यामुळे दोघामध्ये काय नाही त्याचा उहापोह नको.. काय आहेत याचा विचार कर.. आयुष्य खूप लाम्ब आहे कोणास ठाऊक आजपासून पन्चवीस वर्षानी कोणीतरी म्हणेल.. काकू..माझा नवरा बघ ना कसा वागतो.. आणि तू सल्ला देशील..
|
Jhuluuk
| |
| Wednesday, December 06, 2006 - 6:05 am: |
| 
|
Hi परी, आत्तापर्यंत मी तुझे problems आणि मायबोलीच्या मित्र-मैत्रिणींनी दिलेले सल्ले वाचत होते. फक्त वाचत होते कारण मला स्वत:ला अनुभव नाही. पण आता वाटले की मी जे काही पाहिले आहे ते तुला सांगावे. माझ्या मावशीला सण, वाढदिवस वगैरे साजरे करायची खुप हौस. ती काय करते, १ महिना आधीपासुनच टुमणे लावुन ठेवते, "माझ्यासाठी काय आणशील?" मग काका काही वस्तु किंवा साडी अगदि जरुर आणतात. ती ही त्यांच्या वाढदिवसाला, छोट्या-मोठ्या यशाबद्दल काही ना काही देते. मला वाटते, प्रेमाने विचारलेस, तर जरुर काही ना काही सुधारणा होइल. अजुन एक गोष्ट, तुला फक्त सावध करण्यासाठी... तु नवरा गावाकडचा म्हणुन त्रागा तर करत नाहीस ना गं? कारण तो जो कोणी आहे, त्यास तुम्ही रितसर पाहुन पसंत केलेय. मग आताच हिला काय problem झालाय, असा विचार करुन त्याने तुझाबद्दल negative विचार नाही करायला पाहिजे. तसच तुझाविषयी त्याला कुठलाही complex यायला नको. मी लिहिलेल्या कुठल्या गोष्टी बाबत राग येत असेल तर क्षमस्व तुमच्या दोघांचे छान पटावे, या शुभेच्छा !!
|
Ajjuka
| |
| Wednesday, December 06, 2006 - 8:03 am: |
| 
|
परी, आता तू गावात आहेस की अमेरिकेत? गावात असशील तर my best wishes r with you! अमेरिकेत असशील आणि ILs दूर असतील तर तुझ्यासाठी अर्धे काम झालेले आहे. एखादा माणूस असतो introvert आणि तसं असणं हाच त्याचा ऊर्जास्त्रोत असतो. त्याचा राग करू नकोस. माझ्या अनुभवावरून सांगतेय. अर्थात माझं बघून ठरवून केलेलं लग्न नाहीये. भेटल्यानंतर पहिल्याच महिन्यात मी धाडकन् प्रेमात पडले होते. तोही पण तरीही प्रेम एका बाजूला नी संसार एकत्र आयुष्य एका बाजूला म्हणून आम्ही हे झेपेल ना आयुष्यभर असा विचार करून मग लग्नाचा निर्णय घेतला होता. नंतर सगळ्यांचा विरोध असतानाही (आईवडीलांपेक्षा मित्रमैत्रिणींचा) असो. माझा नवरा अतिशय शांत, कमी बोलणारा पण एखादंच वाक्य असं काही बोलतो ना की सगळ्यांनाच अंतर्मुख व्हायला होतं. म्हणूनच तर तो आज जिथे आहे तिथे पोचू शकलाय आणि मी nobody च आहे. आम्ही दोघंच असलो की आमच्या गप्पा रंगतात, अगदी भांडणही पण एखादी वेळ असते की कुणीच बोलू नये. ती space तुम्ही एकमेकांना द्यायला हवी. त्याच्या मनात उतरायचा प्रयत्न कर. प्रामाणिक प्रयत्न असेल तर त्यालाही ते जाणवल्याशिवाय रहाणार नाही. things will get better.. नातं जोडलं म्हणून जुळत नाही. ते nourish, nurture करावंच लागतं बयो..
|
Abhishruti
| |
| Wednesday, December 06, 2006 - 12:45 pm: |
| 
|
अज्जुकाचा शेवटच्या ओळी फ़ारच महत्वाच्या आहेत. आणि हे बघ एकाच घरात वाढलेली भावंड देखिल विरुद्ध स्वभावाची, विचाराची असू शकतात. नवरा बायको तर दोन totally different background मधुन येतात. त्यामुळे या नात्याला वेळ हा द्यायलाच लागतो मग तो प्रेमविवाह असू दे नाहीतर अरेंज it dosen't matter एकमेकांच्या कित्येक गोष्टी, आवडीनिवडी समजायला वर्षं जावी लागतात. माझ्या नवर्याला भेंडीची भाजी आवडत नाही हे मला लग्नानंतर दहा वर्षानी कळलं, मी विचारल त्याला अरे आधी का सांगितल नाहीस तर म्हणाला तुला आवडते ना म्हणुन! आणि पुरुषाना खरचं भावना व्यक्त करता येत नाहीत. माझ्या नवर्याला तर मी रडायला लागले की काही सुचतच नाही, तो खुप अस्वस्थ होतो आणि दूर उभा राहतो. आता सुरुवातीला मला वाटायच की याने जवळ घ्याव, थोपटाव काहीतरी बोलाव पण नंतर माझ्या लक्षात आलं अशा काही काही बारिकसारिक गोष्टीतुन कुठलाच निष्कर्ष तातडीने काढू नये. कालांतराने आपल्याला सर्व गोष्टी उमजतात. तेंव्हा 'कालाय तस्मै नमः' TRUE LOVE is neither Physical, nor Romantic. TRUE LOVE is an Acceptance of all That is, Has been, Will be, and Will Not be.
|
Supermom
| |
| Wednesday, December 06, 2006 - 2:23 pm: |
| 
|
परिणिता, वर सगळ्यांनी खरेच विचार करण्यासारखे लिहिले आहे. आणि तसे पाहिले तर मतभिन्नता प्रत्येक नात्यात असते. अगदी आईबाबांशी सुद्धा आपले कधीतरी वाद होतातच ग. अन बायको बडबडी अन नवरा शांत याच्या उलट असणारे एकही घर नसेल, मला वाटते. मुळात कमी बोलणे हा बायकांचा स्वभाव नाही अन बडबड करणे सहसा पुरुषाला जमत नाही. तू men are from mars, women are from venus हे पुस्तक जरूर वाच. आमच्या लग्नानंतर लगेच झालेली एक गंमत सांगते. अम्ही मुंबईत होतो तेव्हा.एकदा बोरिवलीतून दादरला खरेदीला गेलो होतो. भरपूर खरेदी झाल्यावर मी खूप थकले.तशीही मी मूळची विदर्भातली असल्याने लोकल वगैरेची सवय नव्हतीच. मला घरी जाऊन स्वैपाक करण्याचा कंटाळा आला होता. मी सारखी म्हणत होते की मी खूप थकलेय,खूप थकलेय. बिचारा नवरा म्हणाला की बरं मग लोकल जाऊ दे, taxi ने घरी जाऊ. आम्ही taxi घेऊन घरी आलो. नवरा काही बाहेरच जेवू म्हणेना. मी रस्ताभर चरफ़डत होते.घरी येताच धुसफ़ूस करत स्वैपाक केला. नवर्याला कळत नव्हते की मी का चिडलेय. कारण कळल्यावर तो हतबुद्धच झाला.म्हणाला की अग, मग तू बोलली का नाहीस? तिथेच जेवलो असतो ना.तुला त्रास होऊ नये म्हणून मी taxi ने आणले. बारा वर्षात एक शिकलोय दोघे, जे मनात असेल ते स्पष्टपणे सांगून मोकळे व्हायचे. शेवटी, नवरा काय की बायको काय, दोघांजवळही काही जादूची कांडी नसते मनातले समजायला.
|
Mrinmayee
| |
| Wednesday, December 06, 2006 - 3:04 pm: |
| 
|
अज्जुका, अभिश्रुती, सुपरमॉम खूप छान लिहिलंत तुम्ही! माझी आधीची पोस्टस मी अगदी गमतीत लिहिली होती. विक्स प्रकरण खोलवर इतकं सिरियस असेल हे जाणवलं नाही. आजीचं एक सांगणं आठवलं. आत्या धुसफुसायला लागली नवर्याबद्दल की आजी म्हणायची, "संसारात कात्री नाही गं बाई सुईदोरा असावा लागतो हातात." तेव्हा न कळलेले बोल आता उमगतात. आज्जुका स्वत:ला 'नोबडी' नको समजूस!! तुझी साइट बघीतली. खूप हुशार आहेस तु!
|
Chyayla
| |
| Wednesday, December 06, 2006 - 7:23 pm: |
| 
|
मस्त गप्पा रन्गल्या आहेत तुमच्या, सगळे विचार वाचले, अज्जुका, अभिश्रुती, आणी सुपर्मॉम तुम्ही नात्यातली मतभिन्नता हा जो मुद्दा काढला तो पण पटला. मला अजुन एक सान्गावस वाटत कितपट सगळ्याना पटेल सान्गता नाही येत. माझ एक निरिक्षण आहे ज्या मुली किन्वा मुल त्यान्च्या पालकाना एकुलते एक असतात त्यान्ची मानसिकता थोडी वेगळीच असते. एकच मुलगा किन्वा एकच मुलगी असेल आणी सोबतीला कोणी रक्तातल्या नात्याच भावन्ड नसेल तर त्याना हे कळत नाही की आपण पुरुषाबरोबर किन्वा स्त्रि बरोबर कसे वागावे पर्यायानी लग्नानन्तर नवरा, बायकोबरोबर. ज्यान्च्या कडे मोठी बहीण असेल तीला कळत की तिच्या लहान भावाला कस साम्भाळायच तसच मोठ्या भावाला पण कळत की लहान बहीणीला कस साम्भाळायच दोघेही एकामेकाच्या भावना समजु शकतात, भलेही ते भान्डतात पण त्या लुटुपूटुच्या भान्डणातुनच एक प्रेम आणी एक सन्स्कार नकळत घडत असतो, त्याचा लग्नानन्तर पण बराच फ़रक पडतो. मी तर म्हणेल की बहीण भाउ ह्या नात्यातुन आलेला सहचर थोडा या बाबतीत तरी सुसन्स्क्रुत असतो. आजकालाच्या एकच मुल या सन्कल्पनेमुळे अश्या गोष्टी सन्सारात जास्तच होत असतील तर काय नवल.
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|