|
Madya
| |
| Thursday, November 30, 2006 - 9:27 am: |
| 
|
बायकोला खुश करण्यासाठी, अचानक तिला cake or ice cream जे आवडत असेल ते घेवुन जाणे, घरी लवकर गेलो तर भाजी आमटी करणे, उशिरा गेलो तर भांडी घासणे अशी मदत करावी. दोघांनी एकमेकाला मदत करत घरातील कामे करावीत. (माझ्या लग्नाला ३ yrs झाली आहेत, हे सर्व स्वानुभव.) पण माझ्याबाबतीत असे होते की, तीला जेव्हा cake वगैरे हवा असतो, नेमके त्यावेळी मी घेवुन जायला विसरतो. होते असे कधी कधी.
|
Milindaa
| |
| Thursday, November 30, 2006 - 10:30 am: |
| 
|
अचानक तिला cake or ice cream जे आवडत असेल ते घेवुन जाण नेमके त्यावेळी मी घेवुन जायला विसरतो.<<< आणि केक नेला तर तिला नेमके काहीतरी तिखटच खायचे असू शकते... ही शक्यता पण आहेच ना?
|
Supermom
| |
| Thursday, November 30, 2006 - 1:44 pm: |
| 
|
हा बी बी वाचून भरपूर करमणूक झाली. माझ्या लग्नाला आता बारा वर्षे होतील. नवरा अतिशय व्यवस्थित तर मी अगदी उलटा प्रकार. त्याच्या वस्तू अगदी रात्री बारा वाजता घरी आला तरी जिथल्या तिथे ठेवणार याउलट मला घर स्वच्छ ठेवायची खूप आवड पण वस्तूंच्या बाबतीत जाम विसरभोळेपणा. किल्ल्या,कागद,सारे कुठेतरी भलतीकडे ठेवणार नी मग त्या शोधाशोधीत चित्रासारखे लावलेले घर विस्कटले की जाम चिडचिड. आमचे लग्न झाल्यावरचा किस्सा तर मजेदारच. लग्नानंतर काही दिवसांनी गोव्याला जायला निघालो.कुठेही जायचे तर नवरा अगदी व्यवस्थित यादी करतो वस्तूंची. मग त्याप्रमाणे वस्तू सूटकेसमधे लावणार. परत येतानाही यादीप्रमाणे वस्तू शोधून भरणार.बारा वर्षात इतक्या प्रवासांमधे,त्याने रूमाल सुद्धा हरवलेला नाही. मी त्याच्या सवयीने खूपच impressed झालेली. तसेही ते दिवस impress करायचे नि impress व्हायचेच असतात म्हणा. तर मी पण एक छान यादी केली. अगदी लिपस्टिक पासून तर ड्रेसेस पर्यंत. गोव्याला हॉटेल वर पोचल्यावर लक्षात आले की मी यादीच विसरले होते घरी. नवरा अजूनही चिडवतो त्यावरून.
|
वा मज्जा आली हे वाचताना....धम्माल..परी तुझ्याशी पुर्ण सहमत की तिथे कमीत कमी आई कडे तरी जाऊ शकतो नाहीतर नुसती जाईन अशी धमकी तरी देऊ शकतो पण इथे तेही नाही करता येत...
|
Sandu
| |
| Thursday, November 30, 2006 - 4:04 pm: |
| 
|
एकदा एका नवरा आणि बायकोचे जोरदार भांडण होते आणि ते एकमेकांशी अबोला धरतात. नवरा झोपायच्या आधी बायकोच्या उशिवर चिठ्ठि ठेवतो," मला सकाळी ६:०० ल उठव". दुसर्या दिवशि सकाळि नवर उठतो आणि पहातो तर सकाळचे ८:०० वाजलेत!! तो बायकोला काहि बोलणार तेव्हड्यात त्याला त्याच्या उशिवर चिठ्ठि दिसते. त्यावर लिहिलेले असते, " ६:०० वाजलेत, उठा"!!!
|
Chyayla
| |
| Thursday, November 30, 2006 - 10:29 pm: |
| 
|
तुम्ही सगळे व्याव्हरिक चर्चेत गुन्तले आहात व विचार करता आहात की नवरे किन्वा बायका अश्या का? आणी आपण त्यान्चासोबत कसे वागावे. आता या चर्चेला थोडेसे वळण देत आहे. आपण याचे उत्तर मानसशास्त्रात, जीवशास्त्रात आहे का पाहु. कारण या दोघानमधला फ़रक हा मुलता: स्त्री आणी पुरुष यान्च्यातला फ़रक म्हणता येइल. केवळ मानवच नव्हे तर सर्व प्राणीमात्रान्मधे हा फ़रक आढळुन येतो. माझ्या वाचनात फ़ार पुर्वी नागपुरच्या तरुण भारत मधे एक छान लेख आला होता, लेखक कोण होते मला काही आठवत नाही. पुरुष तुम्हाला घरच्या पेक्षा बाहेरच्या जगात जास्त रममाण होताना दिसेल, राजकारण, युद्धे, नवीन शोध, कार्यालये असल्या बर्याच ठिकाणी त्याला जास्त रस आहे. आणी स्त्रियाना घरकाम, मुलाना साम्भाळणे, नातेवाईक, भावनाप्रधानता, कपडे, नटणे, मुरडणे वैगेरे यात त्या चोख असतात का? १)स्त्रि ही आई होण्याची, एका जीवाला जन्म देण्याची नैसर्गिक योग्यता ठेवते, म्हणुच आई हे स्त्रिचे आदर्ष रुप मानले आहे. एका जिवाला जन्म दिल्यामुळे किन्वा या योग्यतेमुळे तीच्या जवळ स्रुजनाच, निर्मितीच एक समाधान असत तीला हे समाधान व यातला आनन्द शोधायला बाहेरच्या जगात पहाव लागत नाही याउलट पुरुष हा कायम अस्वस्थ, भ्रमारापणे आज याच्या नाही तर उद्या त्या नवीन गोष्टीच्या मागे जातो. (ईथे तिच्यामागेपण म्हणता येईल ) कारण त्याच्याजवळ स्त्रि प्रमाणे समाधान मिळवण्याची नैसर्गिक योग्यता नाही. मग तो घरदार सोडुन काही तरी शोधत रहातो, कदाचित स्त्रिया नसत्या तर मानवाने कधी घरच केले नसते (अजुन बरेच काही केले नसते) म्हणुन तो वर दिलेल्या उद्योगात कायम लागलेला असतो. २)दुसरे जैवशास्त्रीय कारण स्त्रियान्मधे पुर्ण २६ गुणसुत्रे असतात तर पुरुषामधे २५ पुर्ण व २६ वा अर्धवट गुणसुत्र असतो त्यामुळे ह्या अर्ध्या गुणसुत्रामुळे त्याला पुर्णता नाही व तो अस्वस्थ असतो ही अस्वस्थता पुरुषान्च्या पर्यायानी तुमच्या नवर्याच्या वर्तनाला कारणीभुत असते. जगरहाटीसाठी दोन्ही बाजु आवश्यक आहे, म्हणुनच भारतिय शास्त्रामधे स्त्रिला अर्धान्गिनी म्हटले आहे एकाशिवाय दुसरा अपुरा आहे. एक आदर्श व्यक्ति जर ती स्त्री असेल तर स्त्रियान्चे मुख्य गुण असणे चान्गले जसे भावना, लज्जा, प्रेम, वात्सल्य, नाजुकपणा, सौन्दर्य ई. त्याशिवाय काही पुरुषी गुण ही आवश्यक आहेत पण ते दुय्यम असले तरी चालतात तर हाच प्रकार जसे कठोरता, जिज्ञासा, बळकटपणा, व्यव्हार जे बाहेरच्या जागात आवश्यक गुण हे प्रामुख्यानी तर स्त्रियान्चे गुण हे दुय्यमपणे पुरुषानमधे असेल तर ती पण एक पुर्ण पुरुष व्यक्ति होउ शकेल. व दोघानमधे पण एक सहजभाव निर्माण होउन सामन्जस्य निर्माण होउ शकेल. तर समस्त बायका मन्डळीनो आता तुमचे नवरे असे का वागतात असे कुणी विचारले तर निर्मितीच्या आनन्दाचे असमाधान व अर्धा गुणसुत्र याला कारणीभुत आहे हे समजावुन सान्गा. आणी त्या पुनमला पण सान्गा जीनी "तुझ लक्ष कुठे होते? "म्हणुन बिचार्या नवर्याचा छळवाद मान्डला आहे. .. असेच बोलुन नवर्याकडुन छान दीवा घेशील बर. च्यायला त्या छोट्याश्या विक्सच्या बाटलीनी किती घोटाळा केला आणी हा BB जन्माला आला... तर परिणितावाईफ़ आता कळाले का तुझ्या नवर्याने ग्लिसरीन का घेतले होते ते? BTW ... मला हे म्हणायचे नाही की तो भ्रमाराप्रमाणे कुणाच्या मागे फ़िरत होता... हो नाहीतर माझ्यामुळे तुला शन्का यायची आणी उगाच घरातली पाकशस्त्रे (स्वयम्पाक घरातील शस्त्रे) बिचार्या नवर्यावर टार्गेट व्हायची... आणी घरात भान्डणे लावायचा सगळा दोष मला... मोठा दीवा घेशील ह.
|
Chyayla
| |
| Friday, December 01, 2006 - 10:29 am: |
| 
|
नन्दिनी, मी एवढे रामायण ऐकवले तरी तु असा सिद्धान्त मान्डतेस... तुला काय अर्धवट रहायचे काय? शादी वो लड्डु है, खावो तो पछतावो... ना खावो तो भी पछतावो. आता तुम्हाला कस पछतावायच ते ठरवा. जास्तित जास्त लोक खाउन पछतावयाला पसन्ती देतात.
|
Ajjuka
| |
| Saturday, December 02, 2006 - 2:23 pm: |
| 
|
६ ७ दिवस नव्हते तर हा धम्मल बीबी एव्हढा सुटलेला दिसतोय... हसून हसून मरायची वेळ आली (यापुढे हहमवेआ). कानपूर लाईन चा घोळ हे पटले. पण तो फक्त नवर्यांचाच असतो असे नाही. या विषयात आम्ही दोघेही एकमेकांना सतत मागे टाकत असतो. मला काय वाटतं.. की जगातल्या कुठल्याही संस्कृतीमधे सुरूवातीपासून नवर्यांवर पैसे कमवून आणणारा घराचा राजा ही भूमिका आली होती तर बायकांवर घर सांभाळणारी नाजूक नार ही. त्यामुळे घरच्या बाबतीत alert किंवा एकुणातच सतत alert रहाण्याचे गुणधर्म बायकांच्यात विकसित झाले आणि पुरूष्यांच्यात जबाबदारी पार पाडली की भूमिका संपली आता आपला काही संबंध नाही असे... त्यामुळे बायकांना डोक्याला उसंत देता येत नसेल (मिळत नसेल हे साधारणतः खोटे आहे). तर पुरूष ते करू शकत असेल. म्हणूनच बायका multitasking पुरूषांच्या पेक्षा बरे करू शकतात म्हणे. आमच्याकडे जबाबदार्यांचे वाटप हे दोघांच्या सोयीने असते आणि ते रोज बदलत असते. घोळ घालणे, गडबड करणे.. यात दोघेही आघाडीवर असतो. कधी तो जास्त तर कधी मी. बाकी घोळदार वागणे विरूद्ध उरका पाडणे असा सामना असतो आणि तो घोळदार पार्टीत तर मी उरका पार्टीत अशी विभागणी असते (काय करू शेवटी सपे कोकी ना मी).. पण घातलेल्या घोळावर (कोणीही असो..) दोघांनी मिळून हसायला जाम मजा येते. परी, instead of nagging and panicking.. try to teach him like one wud teach an innocent kid.. आता तुझ्या सासूने नसेल व्यवस्थितपणा शिकवला त्याला तर तो काय आभाळातून येणारे! आणि फरक हा पडणारच लग्नाच्या आधी आणि नंतर मधे. its definitely not fair कि हा फरक बायकांच्यासाठी मोठा असतो पण life is never fair either . शेवटी कितीही प्रेम इत्यादी असल तरी २४ तास तुम्ही एकत्र रहाता, bathroom to bed सगळे काही share करता तेव्हा सुरूवातीचे काही दिवस वेळ द्यावाच लागतो सगळं ताळ्यावर यायला. एक दोन वर्षाने लागते गाडे मार्गी. आणि सुदैवाने तुम्ही दोघंच आहात. ILs चा लिप्ताळा नाहीये परिस्थिती बिघडवायला. अग ह्या भांदणातही मजा असते ग.. आणि बायको चिडली की नवरा जे काय लाड करत सुटतो, बिचारा बिचारा वागतो.. ते पण मस्त अस्त की.. enjoy that .. :P
|
मी रागविले असता नवरा बिचारा बिचारा वागतो खर पण त्याला मी रागविले असता मला मनवण, हसवण मात्र जमत नाहि, येतच नाहि. मी त्याला बरेचदा सांगितल अरे मी कितिहि रगवले असले तरि मला हसविण्याच काम तुझ नाही का पण तो ट्राय हि करत नाहि मला मनविण्याच. नवार्याने आपल्याला मनवाव, लाडी लाडी ध्याव हे प्रत्येक बायकोला वाटत कदचित. केक बाबतिताहि मी अनेकदा सांगितल त्याला 'अरे कधितरि मला आवडतो म्हणुन येतांना केक आण न माझ्या साठि' पण नाही; तरिहि तो कधितरी स्वताहुन माझ्यासाठी माझ्या आवडिच सरप्राईजिंगली आणेल ही आशा माझ्या मनातुन गेलेलि नाही. बायकांच हे अस का असत कुणास ठाउक उगाच आशा बाळ्गुन असतात नवर्या कडुन. असो सार्यांचे किस्से वाचुन धम्माल आली.
|
मी college ला असताना एका एकांकीकेतला किस्सा आहे... एका घरात नवरा म्हणजे अगदी मेषपात्र असते. आणि बायको अत्यन्त कजाग. ती त्याला झाप झाप झापायची. तिची bumbardment एकदा सुरू झाली की की तो काही न बोलता निमूटपणे मान खाली घालून सर्व ऐकून घेई आणि शेवटी' बरं बाई तुझंच खरं!' असे हताश उद्गार काढी व मग या भरतवाक्यानन्तर ते झापण्याचे सत्र सम्पे... हा अगदी ठरलेला इपिसोड... एकदा त्याला बॉसने कशावरून तरी झाप झाप झापायला सुरुवात केली. बराच वेळ हा प्रकार चालल्यावर बॉस थकून थाम्बला. त्यावर ते सदगृहस्थ नेहमीच्या सवयीने उद्गारले..'बरं बाई तुझंच खरं!!!!!!'
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|