|
Swa_26
| |
| Friday, December 01, 2006 - 6:04 am: |
| 
|
संतु.... या चर्चेला जातीय वळण मिळतेय आणि ते बरोबर नाही. सामान्य जनतेला खरोखरच या सर्वात काहीही रस नसतो, पण जनतेचे सेवक म्हणवून घेणार्या राजकारण्यांचा यात हात असतो. पोटासाठी व पैशासाठी काहीही करायला तयार होणार्या आणि मुबलक उपलब्ध असणार्या लोकाना हाताशी धरुन हे आपले नेते या सर्व गोष्टी घडवून आणतात आणि त्यात सामान्य जनतेला वेठीस धरतात.
|
Swa_26
| |
| Friday, December 01, 2006 - 6:08 am: |
| 
|
i fully agree with you, Laalbhai.
|
>>>> I am back. दोन दिवस व्यस्त होतो. लालभाईऽऽऽ, आम्ही ते समजु शकतो हो!  DDD दिवा घ्या हो भाई! बाकी तुमची पोस्ट आणि आजच्या तमाम दैनिकातले गोलमाल भाषेतले अग्रलेख यान्च्यात बरच साम्य हे! माझी पोस्ट सुर्यप्रकाशा इतकी स्वच्छ हे! मी एक कम्युनिस्टान्कडे रोख केलेला हे पण त्याच बरोबर कॉन्ग्रेस आणि राष्टअवादी कॉन्ग्रेस या दोन कॉन्ग्रेसमधिल साठमारीकडे देखिल लक्ष वेधल हे! बाकी इलेक्शनच्या रिझल्ट्स्च्या तुमच्या उल्लेखावर मला काहीच भाष्य करायच नाही! सन्तु, गुन्डान्ना जात नसते! आणि बामण सोडुन अन्य जातवार भाष्य करण्यायेवढी माझी योग्यता नाही, अभ्यास नाही, व मला तशी गरजही वाटत नाही! एनिवे, बाकी चालुद्या तुमच! मी कलटी!
|
Laalbhai
| |
| Friday, December 01, 2006 - 6:34 am: |
| 
|
आम्ही ते समजु शकतो हो! >>> LOL ..मस्तच योगायोग दाखवलात! भाषा गोलमाल वापरावी लागते कारण कोणतेही स्वच्छ पुरावे जाहिर झालेले नसताना सार्वजनिक व्यासपीठावर बोट ठेवून आरोप करण्याची आमची संस्कृती नाही. किंबहुना, कोणताच सभ्य आणि विचारी माणूस तसे करण्याची शक्यता नाही. आपल्या देशात काही होत नाही आणि नेपाळसारख्या राष्ट्रातही वैचारिक विरोधकांची सरशी होते, ह्याचे तुमचे frustration मी समजू शकतोच. त्यामुळे तुमच्या post चे मला जराही आश्चर्य वाटले नाही. फक्त undercurrent काय आहे, ते मी तुम्हाला सांगितले. त्यामुळे तुम्ही कम्युनिस्टांकडे रोख करा नाहीतर कुणाकडेही. शरद पवार काही बाळासाहेब ठाकर्यांशी गाठ मारणार नाहीत. आणि कितीही भांडणे झाली तरी शेवटी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस एकमेकाची संगत काही सोडत नाहीत, हे काय मी तुम्हाला सांगायला हवे का? उद्या शरद पवारांचा पक्ष कॉंग्रेसमधे विलीन झाला तर नवल वाटायला नको. असे बंड त्यांनी अनेकवेळा केलेले आहे. असो. हे बाकी विषयांतर.
|
Laalbhai
| |
| Friday, December 01, 2006 - 6:37 am: |
| 
|
गुन्डान्ना जात नसते! >>> खरंय तुमचे. गुंडांना जात (आणि धर्म) काहीही नसते.
|
प्रियबि आपण फ़क्त वर्तमानपत्रच वाचता कि टि व्हि पन बघता?मी दिलेल्या बातमिचि लिन्क इथे देउ शकत नाहि पण शक्य असेल तर आपण इंडिया टी व्हि हे चॅनल बघु शकता.त्या व्यक्तिचे आडनाव अरुण वाल्मिकि" असे आहे आणि त्याने ते कृत्य केले तेंव्हा अतिमद्यपान केले होते. आता पुन्हा हे आम्हि केलेच नाहि आम्हाला मुद्दाम गोवले जातेय असे म्हणायला देखिल ते मागे पुढे बघणार नाहित आणि रामदास आठवले सारखे सत्तालोलुप दलित नेत्यांचि कमतरता नाहि आपल्या देशात. दलित समाजाने आत्मपरिक्षण करणे गरजेचे आहे. असे नेते असलेल्या समाजाचे कल्याण होणे अशक्य आहे. ज्या व्यक्तिला हे देव मानतात त्याच्या पुतळ्याचि विटंबना स्वहस्तेच करतात. भक्तिचा अजब नमुना आहे हा? लालभाइ आहेतच साथ द्यायला.लगे रहो.............................. जय हिंन्द! जय महाराष्ट्र!
|
मला काही प्रश्ण पडलेत १. आधीच पुण्यातल्या खड्डाभर रस्त्यान्नी वैतागलेल्या दुचाकीस्वारान्ना सिग्नल समोर उभे राहुन फुले वाटत वर्तमानपत्रातल्या पहिल्या पानावरच्या फोटोसाठी गान्धीगिरी करणारे ते तमाम उपटसुम्भ या दन्गलीच्या वेळेस कुठेच कसली गान्धीगिरी करताना कसे काय दिसले नाहीत? २. शिवसेनेने बन्द पाळला म्हणुन होत असलेल्या नुकसानी बद्दल गळे काढणारे व नन्तर न्यायालयात जावुन त्यान्ना वीस पन्चवीस लाखान्चा दन्ड ठोठावण्यास कारणीभूत नरपुन्गव सद्ध्या कुठ काय करताहेत? पावणे दोनशेच्या वर एसटीबसेस, शेकडो खाजगी चारचाकी तसेच दुचाक्या, शेकडो टपर्या, झालच तर डेक्कन क्वीन व लोकल्स यान्ची तोडफोड व जाळपोळ केल्यामुळे झालेले नुकसात, अनेक व्यावसायिक व निवासी इमारतीन्च्या वर दगडफेक करुन काचान्चा चक्काचूर करुन केलेले नुकसान हे यावेळेस कोणाच्याच नजरेत खुपत नाही का? आख्ख्या महाराष्ट्रात हैदोस घालुन व्यवसाय उद्योगधन्दे, वाहतुक, सप्ल्याय वगैरे बाबी दहशतीच्या जोरावर एकतर्फी बन्द पाडुन या प्रगतीशील राज्याची प्रतिमा धुसर होत नाही का? ३. खैरलान्जी प्रकरणात दलितान्ची हत्या ओबीसीन्नी केली तर यात सवर्ण कुठुन आले? आणि या बाबीला कोणत्याच माध्यमाने जास्त प्रसिद्धी का दिली नाही? सवर्णेतरातल आपापसातल लफड असा रोख प्रदर्शित होवु लागल्याने त्या प्रकरणाबाबतचे निषेध मोर्चे फिके पडु लागले म्हणुन कानपुरचे निमित्त उचलुन धरल का? ४. कानपुर मधिल घटना ही देखिल दलितान्च्याच हातुन दारुच्या नशेत झाली असल्याचे वृत्त कळते आहे, त्याच्या खर्याखोटेपणाची शहानिशा येत्या एकदोन दिवसात होइलच, कुणाकडे तशा वृत्ताचि लिन्क असल्यास द्यावित! पण जे काही झाले ते कानपुरात, त्याच्या प्रतिक्रिया येवढ्या तीव्र स्वरुपात सम्पुर्ण महाराष्ट्रात एकसमयावाच्छेदेकरुन कशा काय उठल्या? ५. एकुणच कमी सन्ख्येचे कारण पुढे करीत पोलिसान्च्या करुच न शकलेल्या कार्यवाहीच्या मागे खर काय कारण हे? सन्ख्या बळ? की वरुन आदेशच नव्हते? अन्यथा सर्व्हिस रिव्हॉलव्हर असलेया पिएस आयला आपली मोटरसायकल गुन्डान्च्या हातुन जळु देण्याची वेळ आली नसती. ६. आम्ही या जाळपोळ, तोडफोड व लुटालुटीचा निषेध करतो असे म्हणणारी एकही ओळ एकाही राजकीय पक्षाच्या पुढार्याच्या तोन्डुन कशी काय येत नाही? येवुन जावुन आरार बोलले होते पण त्यान्ची मुस्कटदाबी केली गेली ७. खैरलान्जीत तुमच्या भावना दुखावल्या, (जरी ते कृत्य ओबीसिन्नी केल होत), कानपुर मधे पुतळ्याच काहीतरी झाल (जे देखिल झिन्गलेल्या दलितान्नी केल असा प्रवाद सद्ध्या तरी हे) त्यामुळेही तुमच्या भावना येवढ्या दुखावल्या गेल्या की आख्खा महाराष्त्रभर जाळपोळ लुटालुट तोडफोड सुरु केलीत, पण जेव्हा मालेगाव मधे दोन दलित पोलीस कृरपणे मारले गेले तेव्हा काहो नाही तुमच्या भावनान्ना ठेचा पोचल्या? का नाही एका तरी दलित पुढार्याने त्या घटनेचा निषेध नोन्दवला? असे बरेच प्रश्ण हेत, सद्ध्यापुरते येवढेच
|
लिंबु आपल्या गुरुवार दि ३० नोव्हे-११.१८ च्या पोस्टला माझे पुर्ण अनुमोदन.विचार करण्यासारखि गोष्ट आहे कि डेक्कन क़्विन पेटवण्यास आलेला जमाव हा ५ ते ६ हजारांचा होता. अबब!अचानक एव्हढा जमाव आला कुठुन? वावटळी सारखे आले आणि डेक्कन पेटवुन गेले आणि हे सगळे घडत असताना आपले कार्यक्षम पोलिस खाते काय अफु खावुन झोपा काढत होते का? आणि मुख्य म्हणजे या सगळ्या निदर्शनां मागे कुठेहि दलित संघटनाचा पाठिंबा नव्हता. (खरे खोटे त्या धन्य नेत्यानाच माहित?) खैरलांजि झाले तेंव्हा कानपुर पेटले नाही? पण कानपुर मधे पुतळ्याचि(तथाकथित?) विटंबना होते आणि त्याचे लोण फ़क्त महाराष्ट्रातच पोहोचते जरा अनाकलनिय नाहि वाटत का हे? काय संवेदनक्षमतेचा नमुना आहे नाहि का?कानपुर चा परिणाम म्हणुन फ़क्त महाराष्ट्रातिल दलितांचि मनगटे पेटतात पण देशातील इतर भागातिल दलिताना या गोष्टिचे साधे दुखः देखिल होत नाहि. किंवा त्याचा साधा निषेध देखिल कुणि करत नाहि. विनोदच आहे मोठा? आता सुरु करा लालभाई.........................................? सामनामधिल आजचा अग्रलेख जरुर वाचावा! जय हिंद! जय महाराष्ट्र!
|
Laalbhai
| |
| Friday, December 01, 2006 - 9:48 am: |
| 
|
३. खैरलान्जी प्रकरणात दलितान्ची हत्या ओबीसीन्नी केली तर यात सवर्ण कुठुन आले? आणि या बाबीला कोणत्याच माध्यमाने जास्त प्रसिद्धी का दिली नाही? सवर्णेतरातल आपापसातल लफड असा रोख प्रदर्शित होवु लागल्याने त्या प्रकरणाबाबतचे निषेध मोर्चे फिके पडु लागले म्हणुन कानपुरचे निमित्त उचलुन धरल का? >>> लिंबूटिंबू, तुमच्या post ला आता वेगळाच वास येतो आहे. पण ते राहू दे. १. खैरलांजी प्रकरणाचे सत्य सर्व पेपर आणि प्रसारमाध्यमांनी अतिशय सविस्तर छापले आहे. २. निषेधाचे कोणतेही प्रकार "सवर्णेतरांचे आपापसातले लफडे" म्हणून बंद झालेले नाहीत. तर अजुनही तिथे NGOs काम करत आहेत. (एकही संघाचा माणूस तिथे दिसला नाही. हिंदू धर्मियांचाच problem होता ना?) ३. "सर्वणेतरांचे आपापसातले लफडे" असले तरी तो अस्पृष्यांवर स्पृष्यांनी केलेला अत्याचार होता. एक दलित महिला गावात येऊन स्वतःच्या पयावर उभी राहून कुटुंब चालवते, हे गावाला सहन झाले नाही. त्यामागे पिढ्या नि पिढ्या रुजलेला (आणि हेतुपुरस्सर जपलेला!) जातीयवादच होता! सवर्णाची तुमची व्याख्या "फक्त ब्राह्मण" अशी दिसते आहे. (इथेही संकुचित व्याख्या का?) समाजात फक्त ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर असा वाद नाहीये तर अनेक पातळींवर जातीभेद विभागला गेलेला आहे. तो माहिती करून घ्या आणि मगच अशी एका जातीची बाजू घेणारे लेखन करा!
|
Laalbhai
| |
| Friday, December 01, 2006 - 9:56 am: |
| 
|
जे काही झाले ते कानपुरात, त्याच्या प्रतिक्रिया येवढ्या तीव्र स्वरुपात सम्पुर्ण महाराष्ट्रात एकसमयावाच्छेदेकरुन कशा काय उठल्या? >>>> हाच प्रश्न वेगळ्या भाषेत मी विचारला होता! आणि गोलमाल भाषेत त्याचे उत्तरही दिले होते. असे म्हणणारी एकही ओळ एकाही राजकीय पक्षाच्या पुढार्याच्या तोन्डुन कशी काय येत नाही? >>>> well, you said it yourself! मी कधीच कोणत्याही राजकिय पक्षाचे समर्थन करण्याच्या भानगडीत पडलेलो नाही. मतांचे गणित त्यांना महत्वाचे असते. (अगदी तुमच्या भाजपा आणि शिवसेनेलाही!) ७. खैरलान्जीत तुमच्या भावना दुखावल्या, (जरी ते कृत्य ओबीसिन्नी केल होत), कानपुर मधे पुतळ्याच काहीतरी झाल (जे देखिल झिन्गलेल्या दलितान्नी केल असा प्रवाद सद्ध्या तरी हे) त्यामुळेही तुमच्या भावना येवढ्या दुखावल्या गेल्या की आख्खा महाराष्त्रभर जाळपोळ लुटालुट तोडफोड सुरु केलीत, पण जेव्हा मालेगाव मधे दोन दलित पोलीस कृरपणे मारले गेले तेव्हा काहो नाही तुमच्या भावनान्ना ठेचा पोचल्या? >>> नक्की काय म्हणायचे आहे? स्पष्ट म्हणा. झालेल्या प्रकारातून संपूर्न समाजाचे, देशाचे नुकसान होते आहे, असा सूर का दिसला नाही बरे तुमच्या पोस्टमधे? एका विशिष्ठ समाजाविषयी सहानुभूती आणि इतरांविषयी द्वेष, अविश्वास हे इतक्या ठळकपणे तुमच्या पोस्टमधे का दिसते? किंवा जाणीवपूर्वक तसे दिसावे म्हणून तुम्ही प्रयत्न करता का?
|
अहो किति रागावता लालभाई! जास्त राग प्रकृतिस योग्य नाहि हे मी आपणास सांगायला नकोच कारण आपण तर विद्वान आहात हे वेगळे सांगायचि गरज नाहि बरोबर ना? माझि विचार सरणि बदलेल अथवा नाहि हे मला देखिल सांगता येणार नाहि बहुतेक ते बरोबर घेउनच मला हि इहलोकाचि यात्रा संपवावि लागणार असे दिसतय.पण इतराचे विचार जाणुन घेणे गैर नक्किच नाहि आत्त हेच बघा ना २८ राज्य असलेल्या देशात आपलि(कॉम्रेड्स) सत्ता फ़क्त २ राज्यात केरळ आणि बंगाल,आता याला काय म्हणायचे?मी आपल्या म्हणण्याप्रमाणे पुर्वग्रहदुषित लिखाण करित असेनहि आणि आपल्या योग्यतेस येण्याचि माझि पात्रत नसेलहि पण म्हणुन माझे वैचारिक स्वातंत्र्य तुम्हि हिरावुन घेणार का? विचारसरणी म्हणजे विचारप्रक्रियेतून निर्माण झालेली काही एक निश्चित भूमिका. पटले पण माझी विचारसरणी अश्या कोणत्याहि प्रक्रियेतून निर्माण झालेलि नाहि याचा साक्षातकार तुम्हाला केंव्हा झाला?ते तरि सांगाल का?कि काहि मुद्दा नाहि म्हणुन हि व्यक्तिगत चिखलफेक आपण सुरु केलित?असो चलु द्या तुमचे. म्हणुनच लगे रहो...........................................लालभाई जय हिंद! जय महाराष्ट्र!
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|