|
Swa_26
| |
| Thursday, November 30, 2006 - 9:40 am: |
| 
|
पुन्हा एकदा महाराष्ट्र पेटला…. पुन्हा एकदा पुतळ्यांचे राजकारण... महाराष्ट्र सरकार आता तरी यावर काही ठोस पावले घेणार आहे का? खरोखरच फक्त पुतळे उभारुन आपल्या समाजसेवकांबद्दल आदर व्यक्त होतो का? खरोखरच उद्या हे पुतळे बोलू लागले तर काय बोलतील ते? त्यांना काय वाटत असेल आजची ही परिस्थिती पाहून? खूप सारे प्रश्न आहेत मनात.... आजच्या आपल्या भ्रष्टाचारी आणि स्वार्थी राजकारणी यांचे तर "पुतळा विटंबना" हे एक हुकुमी हत्यारच झाले आहे. कारण कोणतेही प्रकरण आपल्यावर शेकायला लागले किंवा डोईजड झाले कि एखाद्या पुतळ्याची विटंबना घडवून आणायची आणी जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवायचे. खरे तर य सगळ्या महान लोकंच्या पायाजवळही उभे राहण्याची ज्यान्चि लायकी नाही, असे लोक त्यांचे पुतळे उभारतात आणि मग त्याचा स्वतहाच्या स्वार्थासाठी असा उपयोग करून घेतात. ज़्यान्ची तत्वे, विचारसरणी, यांची आज क्षणोक्षणी आणि पदोपदी पायमल्ली होत असताना फक्त त्यांचे पुतळे उभारायचे आणि आपल्याला त्यांच्याबद्दल किती आदर, प्रेम आहे हे दाखवायचे…. कुठेतरी हे थांबायलाच हवे…. पण कसे??
|
अगदी मनातले बोललिस स्वा......................................... पुतळे उभारुन आपले कर्तव्य आपण पार पाडले अशी या राजकारण्यांचि मानसिकता असते.पण ज्यांचे पुतळे उभारतात त्यांचे विचार ही लोक किती व्यवहारात आणतात तो एक परिसंवादाचा विषय आहे? सध्या भारतात "आरक्षण"या विषयावरुन वादंग उठ्लाय आणि त्यात आता या "पुतळ्याच्या" विटंबनेचे प्रकरण. जातिय सलोखा वाढविण्या ऐवजि तेढ वाढविण्यात या दरिद्रि राजकारण्यांचा हातखंडा असतो. भारताला पुढिल वर्षि स्वातंत्र्य मिळुन ६० वर्षे होतिल.या ६० वर्षात आपण काय मिळवले? ह्या बद्दल ख़रोखरच चिंतन करणे आता जरुरि आहे. फ़क्त तंत्रद्यानात प्रगति केली म्हणजे देश पुढे गेलाय असे म्हणणे पुर्णपणे चुकिचे आहे. अजुनहि मानवाच्या मुलभुत गरजां पासून बहुतांश लोकसंख्या वंचित आहे. आणि त्यात अश्या प्रकारे जातियतेला खतपाणि घालुन आपण काय साध्य करतोय? हे आता कुठे तरी थांबायलाच हवे. पण कसे?
|
Disha013
| |
| Thursday, November 30, 2006 - 4:48 pm: |
| 
|
पुतळे उभारण्यावर काय्द्याने बन्दी आणाय्लाच हवी हे सगळे थांबायला हवे असेल तर... दंगली घडवु शकणारे हे एक तरी कारण दूर करायला हवे....
|
Deshi
| |
| Thursday, November 30, 2006 - 4:54 pm: |
| 
|
Well said.Couldn't agree more.
|
Zakki
| |
| Thursday, November 30, 2006 - 5:08 pm: |
| 
|
फ़क्त तंत्रद्यानात प्रगति केली म्हणजे देश पुढे गेलाय असे म्हणणे पुर्णपणे चुकिचे आहे. अगदी बरोबर. या देशात बहुतेकांच्या मूलभूत शारीरिक गरजा (अन्न, वस्त्र, निवारा) पूर्ण झाल्या असूनहि, मने मात्र फरच अविकसित राहीलि आहेत. पहा ना, जिथे तिथे सैन्य पाठवून मारामारी नि त्या देशांचे वाट्टोळे करणे असले जंगली विचारच त्यांना सुचतात. आज भारतातहि काय, वाट्टेल त्या कारणावरून दंगल घडवून आणायची. पुतळे नसले तर इतर काहीतरी मोडतील, जाळतील! त्या गांधीगिरीचे काय झाले?
|
Priyab
| |
| Thursday, November 30, 2006 - 6:05 pm: |
| 
|
अगदि बरोबर बोललिस disha मुळ कारणच नष्ट केले पाहिजे.. पुतळे उभारायलाच बंदि केलि पाहिजे.... आणि अगदिच पुतळे हवेच असतिल तर एखादे madame tussaud सारखे museum काढावे आणि तिथे सग़ळे पुतळे ठेवावे... नाहितर जे कोणि पुतळे उभारतिल त्यांना ते सांभाळायसाठि जबाबदार ठेवले पहिजे...म्हणजे ते पुतळे उभारायच्या आधि १० दा विचार करतिल
|
Malavika
| |
| Thursday, November 30, 2006 - 6:56 pm: |
| 
|
पुतळे नाहिसे झाले तर ह प्रश्न संपणार आहे का? लोकांची मानसिकता बदलत नाही तोवर काही होणार नाही. गांधीगिरी सिनेमा चालवण्यापुरती वापरायची असते.
|
Disha013
| |
| Thursday, November 30, 2006 - 7:09 pm: |
| 
|
तुम्हाला नाही वाटत हे सगळे सहन करन्यापलिकडे गेलेय असे? कोण मानसिकता बदल्णार आणि कोणाकोणाची? १०० कोटी (की जास्त?) आहोत आपण. चर्चा,आव्हाने यांचा अशा दंगेखोरांवर परिणाम होणार आहे का? मान्य आहे फ़क्त पुतळे नाही जबाब्दार दंगलींना.... पण अनेक निमितांपैकी एक निमित्त तर आहेत ना?नाहितरी ते ठेवुन तरी काय साध्य होतय? फ़क्त विटंबनेसाठीच वापरले जातात हे पुतळे. फ़ार वाईट वाटते असे काही घडले की.... दर महिन्याला दंगलीची लाट आलिच पाहिजे मूळ कारणच नष्ट केले तर काय बिघड्ते? प्रिया सान्गते तसे म्युझियम मधे ठेवता येतात की पुतळे. कायदाच कडक व्हायला हवाय...
|
Priyab
| |
| Thursday, November 30, 2006 - 7:27 pm: |
| 
|
Malvika लोकांचि मानसिकता बदलणे मुश्किल आहे....त्यात आपलि एवढि लोकसंख्या..कोणकोणा चि आणि कुठ्ल्या कुठल्या गोष्टिसाठि मानसिकता बदलत बसणार त्यापेक्शा लोकांचि मानसिकता बिघडवणारे एक्-एक reason जरि आपण कमि करु शकलो तरि ह्या अशा गोष्टि आपण थोड्या तरि टाळु शकतो
|
Yogibear
| |
| Thursday, November 30, 2006 - 8:29 pm: |
| 
|
नशिब म्हणायच त्या डेक्कन क़्वीन मधल्या प्रवाश्यांचे.... गाडीला आग लावण्या पुर्वी त्यांना उतरू दिले...
|
योगि डेक्कनमधुन प्रवाश्यांना उतरवले आणि मग पेटवली कारण दुसरे गोध्रा किंवा गुजरात होणे परवडणारे नाहि. अरे जाळपोळ करायचि एव्हढि खुमखुमि आहे तर जाउन त्या मंत्र्याच्या गाड्या जाळायच्या ना? सार्वजनिक मालमत्तेचि नासधुस करुन काय साध्य करतायत हे लोक समजत नाहि? आत्ताच आलेल्या बातमि नुसार कानपुरमधे पुतळ्याचे विटंबन करणारा दलित समुदाय पैकीच आहे आत्ता बोला?? बाबासाहेब देखिल अश्रु ढाळत असतिल हे बघुन. .
|
Yogibear
| |
| Thursday, November 30, 2006 - 9:31 pm: |
| 
|
Jay: तेच म्हणतोय की त्या प्रावाश्यांना उतरू दिले हे त्यांचे नशिब नाहीतर पुन्हा गोध्रा व्हायला वेळ लागणार नाही... 
|
Priyab
| |
| Thursday, November 30, 2006 - 10:09 pm: |
| 
|
Jaymaharashtra कुठ्ल्या newspaper मधे वाचलि हि बातमी आपण..कि कानपुर मधे पुतळ्याचे विटंबन करणारा दलित समुदया पैकिच आहे इथे link देत का please त्या news ची
|
Zakki
| |
| Thursday, November 30, 2006 - 10:20 pm: |
| 
|
काहो, पण गोध्र्याला जे झाले तो अपघात होता असे खुद्द रेल्वे मंत्र्यानी नेमेलेल्या न्यायाधिशाने पुरावा देऊन सिद्ध केले होते ना? इथे पण कदाचित् प्रवाशांना उतरवल्यावर आतमधे एखादी जळती सिगरेट होती म्हणून आग लागली असे दुसर कुठला तरी न्यायाधीश सिद्ध करेल. भारतातले लोक फारच हुषार, पैसे दिले की न्यायाधीश काय वाट्टेल तो हवा तसा निर्णय देऊ शकतात. नुकतिच बातमी वाचली की देशातील ३० टक्के न्यायालयात लाचलुचपत चालते. त्यांचे प्रमाण वाढवायला हवे! १०० कोटी लोक नाही, जनावरे म्हणा !
|
Zakki
| |
| Friday, December 01, 2006 - 12:55 am: |
| 
|
जे काही कॉर्पोरेशन करायचे ठरवते, त्याची संपूर्ण माहिति जनतेला देणे हे त्यांचे कायदेशीर कर्तव्य आहे. तुम्ही ते त्यांना मागत का नाही? की अमुक निर्णय का घेतला? उगीच आपली दगडफेक नि पुतळे तोडणे यापेक्षा, सुशिक्षित लोक हे का करत नाहीत?
|
Mukund
| |
| Friday, December 01, 2006 - 2:13 am: |
| 
|
मालविका आणी प्रिया तुमचे दोघांचेही बरोबर आहे.... पण मानसीक व्रुत्तीचा बदल घडवुन आणणे ही प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे. पुतळ्याची विटंबना झालेली चालत नाही पण झक्की म्हणतात त्याप्रमाणे न्यायालयातील लाचलुचपत वगैरे समाजातील रोजच्या व्यवहारातील माणुसकीच्या प्रिंसीपलांची विटंबना जी राजरोस होत आहे त्याचा कोणालाच राग येत नाही ही दुर्दैवाची बाब आहे. ही सामाजीक मरगळ दुर होणे ही खरच नितांत जरुरीचे आहे. आजचे बहुतेक नेते हे नेते म्हणवुन घ्यायच्या लायकीचे नाहीत. सावरकर.गांधी,टिळक अशी इतिहासातीलच नावे आपण नेते म्हणुन घेत राहायचे.
|
काल मी माझ्या सिनियर मित्राशी या विषयावर बोलत होतो बोलता बोलता त्याने एक वाक्य उच्चारले आणि तो गप्प बसला तो म्हणाला की आपण एका ठिकाणि हरलो आहोत! कुथे रे? नेपाळमध्ये! आणि तो पुढे बोलायचा थाम्बला! कारण माझ्या पुरते त्याने अधिक काही स्पष्टीकरण देण्याची गरजच नव्हती! आता तुम्ही म्हणाल की काल परवा आणि त्याच्या आधि महाराष्ट्रात जी पेटवा पेटवी चालली हे तिचा अन नेपाळचा काय सम्बन्ध? तर तो आहे! ज्या पद्धतीने नेपाळमध्ये माओ वाद्यान्नी सर्वदूर दन्गे धोपे घडवुन आणित सार्वजनिक जिवन अस्ताव्यस्त करुन टाकीत तेथिल हिन्दु राजवटीचा अन्त केला अगदी अगदी त्याच पद्धतीने महाराष्ट्रात सद्ध्या चालले आहे! दुर्दैवाने दोन्ही कॉन्ग्रेसची नेतृत्वे आगामी इलेक्षन डोळ्यासमोर ठेवुन डोळ्यावर झापडे लावुन बसली हेत असे म्हणावे लागेल किन्वा कदाचित आतुन यान्च्यापैकीच कुणाची तरी फुस सुधा, या दन्गेधोप्यान्ना हे असे मानावे लागेल. अराजक माजवुन सत्ता काबिज करण्याची कम्युनिस्टान्ची सवय सर्वदुर जगजाहीर हे! नक्षलाईट्स हे एक अन्ग, आणि हे आम्बेडकरान्च्या नावाखाली घालत असलेला धुमाकुळ हे दुसरे अन्ग! पण केन्द्रात हातमिळवणि केल्यामुळे आणि कॉन्ग्रेसच्या केन्द्रिय नेतृत्वाला खरोखरच या देशाशी काही देणेघेणे आहे की नाही याची शन्का यावी असे वास्तव असताना या सगळ्यातुन काय निष्पन्न होणार? सान्गतो, पिम्परी व भोसरीतल्या काही भागात जेव्हा नागरिकच स्वसर्क्षणासाठी रस्त्यावर उतरले तेव्हा पिम्परीच्या महापौर त्यान्ना शान्ततेचे आवाहन करीत दुचाकीवरुन फिरल्या! सुज्ञ याचा काय तो अर्थ लावतीलच! अर्थात त्या महापौरान्चे अभिनन्दनच केले पाहिजे, त्यामुळे पुढील अनर्थ टळला! पण हे जास्त काळ असेच चालत रहाणार नाही, आणि मग जे काही होऊ शकेल ते होणे हेच कम्युनिस्टान्चे उद्दिष्ट असते, किम्बहुना ज्या ज्या देशात कम्युनिस्ट राजवटी आल्या त्या त्या अशा प्रकारचे दन्गेधोपे घडवतच आल्या हेत! मुम्बईत शम्भर शम्भरच्या सन्ख्येने चारचाकीन्ची नुकसानी करुन, डेक्कन क्वीन जाळुन त्यान्ना काय मिळाले हा प्रश्णच हे! लुटालुट मात्र भरपुर झाली, अगदी मिठाईच्या दुकानातील ट्रे पळवुन देखिल झाली. हा दन्गा पुर्वनियोजित होता हे मानण्यास एक सबळ कारण असे की येवढ्या सगळ्या प्रकारात एकाही सामान्य नागरिकास मारहाण झाली नाही व केवळ दहशत पसरविण्याचा प्रयत्न झाला मात्र, झोपडपट्ट्यातील जे लोक यान्च्यात सहभागी न होता कामावर जाऊ इच्छित होते त्यान्ना जबरी मारहाण झाल्याची उदाहरणे हेत! इथुन पुढे बघुयात, आर आर पाटलान्ची काय भुमिका असेल? की विलासराव मात देतात? सहा डिसेम्बर जवळ येतो हे! प्रवास टाळा! हे ग्रहगणितान्वरचे "अन्धश्रद्धतेने माखलेले" भविष्य नाही, वास्तवाला अनुसरुन केलेली सुचना हे! हे असेच चालत राहिले तर या सगळ्यान्चे दूरगामी परिणाम महाराष्ट्रातील उद्योगधन्द्यावर होऊ शकतो!
|
Laalbhai
| |
| Friday, December 01, 2006 - 5:52 am: |
| 
|
Bhramar_vihar I am back. दोन दिवस व्यस्त होतो. (पुढचे सगळ्यांसाठी... ) झाला प्रकार त्रासदायक आहे. मूर्खपणा आहे. ज्यांनी कुणी हे केले त्यांना ताबडतोब शिक्षा व्यायला हवी. -------------------------------------------------------------------------------------- लिंबूटिंबू यांनी काही चर्चांचा इथे उल्लेख केला. तुमच्यापैकी कितीजण महाराष्ट्रात आहेत आणि अशा गोष्टींशी जवळून संबंधित आहेत, याची मला कल्पना नाही, पण इकडे एक वेगळाच uunder-current तो इथे सांगू इच्छितो. महाराष्ट्रात गेल्या विधानसभा निवडणूकात कॉंग्रेस पडणार, हे अगदी निश्चित असूनही काही कारणाने कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी निवडून आले. तेंव्हापासून विरोधकांची झोप उडालेली आहे. त्यामुळे प्रत्येक असल्या नसल्या गोष्टींचा राजकारणासाठी उपयोग करून, कॉंग्रेस सरकार पाडण्याचे प्रयत्न चालले आहेत. त्या प्रयत्नांना आलेले भरघोस अपयश नगरपालिकांच्या निवडणूकात दिसलेच. (३५०० जागांपैकी २००० जागा कॉंग्रेस / राष्ट्रवादीने जिंकल्या आहेत.) शेतकर्यांच्या आत्महत्या, अपुरी वीज, अशा गोष्टींमुळीही कॉंग्रेसची सत्ता जाण्याचे राहूच द्या पण कल कॉंग्रेसकडे वाढतोय ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे राजकिय विरोधक भांबावलेले आहेत. आलेल्या प्रत्येक संधीचा (गैर)फायदा घेण्याच्या प्रयत्नात आहेत. आणि भारतात स्वातंत्र्यापासून जे विरोधक आहेत, त्यांनी पायंडाच असा पाडलाय की विरोध करायचा म्हणजे लोकांच्या भावना भडकवायच्या! त्याच पायंद्याची ही फळे आहेत! महाराष्ट्रात कुठेही कम्युनिस्ट नाहीत, त्यांचे पक्षही नाहीत. तरीही लिंबूटिंबू म्हणतात तसे बंगाल, केरळातून येऊन कम्युनिस्टांनी हे केले असू शकते. कारण त्यांच्या त्यांच्या राज्यांपेक्षा किंवा देशातल्या इतर कोणत्याही महत्वच्या राज्यांपेक्षा ह्या घटनेचा फायदा घेऊन महाराष्ट्रात दंगली घडवणे त्यांना आवश्यक वाटले असावे! कुणी सांगावे? अर्थात खरे आपल्याला कधीही कळणार नाही. सौ. मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना कुणी केली, ह्याची पूर्ण माहिती असूनही जनतेसमोर ती कधीही आली नाही, (आणि संबंधित पक्षांनीही आर. आर. यांच्या धमकीनंतर त्याचा अधिक issue करणे थांबवले.) तसेच "हे कुणी केले" ह्या मागचे सत्य आपल्याला कधीही कळणार नाही. ह्याचा फायदा घेऊन आपण विरोधकांना (आणखी) बदनाम करण्याचा प्रयत्न आणि आमच्याशिवाय सर्व लोक राष्ट्रद्रोही असल्याचा प्रचार करण्याचा जोरदार प्रयत्न करूयात. हे एक बरे की undercurrent हा शेवटपर्यंत undercurrent च रहातो. सत्य कधीच बाहेर येत नसते. आता दूर कानपूरमधल्या घटनेची प्रतिक्रीया, देशात अन्यत्र कुठेही न येता, फक्त महाराष्ट्रातच इतक्या तीव्रतेने यावी, आणि तीही घटना घडल्यानंतर १२ - १८ तासांनी, याचे गणित आपणासारख्या सामान्यांना काय कळायचे? नाही का?
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|