Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through November 24, 2006

Hitguj » Views and Comments » मायबोली-हितगुज » Multiple IDs » Archive through November 24, 2006 « Previous Next »

Shrashreecool
Wednesday, November 22, 2006 - 10:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Milinda, though I deleted my earlier posts I thank for your reply on that particular post. Since I do not want to stretch all this matter I deleted all my comments.

Peshawa
Wednesday, November 22, 2006 - 6:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


Admin तुस्सी great हो!

मिलिंदा मान्य आहे. तु जे म्हणतोयस ते. सगळे हसले सगळ्यानी मजा लुटली. आपण काय करतोय ह्याची जाणिव पटकन झाली नाही मान्य. पण प्रत्येक मायबोलिकर aware असण शक्य नाही (अता असायला हव) पण काही बाबतीत Mods ने aware असण आवश्यक आहे. मागे एकदा Mod-x म्हणला / ली होती. we moderate content मला वाटते तुम्ही verbal abuse बद्दल जास्त जाणुन घेण aware असण (अता) गरजेच झाल आहे...

आज्जुका तुझ म्हणण्यात तथ्य आहे आणी कोणिःइ दोषी नाही. पण चेष्टेची मस्करी झाली आणि एक विनोद हाताबाहेर गेला इतकेच मला वाटले...

प्रत्येक दोन वर्षानी नविन मायबोलिकरांबरोबर हाच प्रसंग पुन्हा पुन्हा होत राहील. तेंव्हा बी अता(तरी) आत्मसंशोधन करावेस असे वाटते.

admin एक suggestion आहे. could we make every new maaybolikar aware of what verbal abuse means when s/he joins maayboli by providing a good informative link and requesting him/her to read the info



Zakki
Wednesday, November 22, 2006 - 8:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दोष ना कुणाचा. पराऽधिन आहे जगतीऽ पुत्र मानवाचा!


Ajjuka
Thursday, November 23, 2006 - 5:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिव्या,
कुणीही काहीही मूर्खासारखे बोलत असेल तर त्याची टिंगल होणारच. जसे मिलिंदा म्हणाला तसे सगळे मजा घेत होतेच. हो मी ही. कारण मलाही अनेकदा तो मूर्खपणा सहन करावा लागला होता. तुझा अनुभव वेगळा असेल तर त्याने आमचे अनुभव खोटे ठरत नाही.
मस्करी अति झाली इतपत म्हणलं गेलं तर ठीक आहे. चूक मान्य आहे. पण मस्करी करणे अयोग्य हा stand पटत नाही. इथे एकटा बी नाहीये की ज्याची मस्करी झालीये. हह च्या साप्ताहिक कुजबुज मधे दर वेळेला कुणाचा न कुणाचा तरी समाचार घेतलेला असाय्चा. चंदोबा मधे बी चं नाव पण नव्हतं घेतलं तिथे तर सगळ्यांची नावं असायची. मी, पेशवा आणि त्याच्या कविता, बेटी, झक्की, स्टोर्वी असे सगळे... सगळ्यांची मस्करी असायची. त्यावरून्न कधी भांडण झाल्याचे मला आठवत नाही. सगळे जण ते खेळीमेळीने घेत होते. इथे नीट पाह्यलस तर लिंब्याचीही काय कमी टिंगल होत नाही. पण ते तो मजेत घेतो. चंदोबावरच या बी नेच माझ्याबद्दल नाव घेऊन तेच चावून चावून चोथा झालेले कपडे फाडण्याचे विनोद केलेच होते ना. आता तर त्यचं हसू येणं पण बंद झालंय इतके घासले गेलेत ते विनोद. असो.. तर टिंगल करणे चूक मुळीच नाही ते अति झाले हे चूक पण त्यालाही कारण आहे.

आणि अनुल्लेख हे पण योग्य नाही? बडी जबरदस्ती है!... एखाद्या व्यक्तीचे वागणे आवडत नसेल तर होता होइतो दुर्लक्ष करावे म्हणजे आप्ल्याला त्रास होत नाही आणि वातावरण हि गढूळत नाही. या न्यायाने आम्ही चालत होतो आजवर. तेही चूक. म्हणजे कोणी काहीही म्हणा कसेही बोला, प्रत्येकाने प्रतिक्रिया दिलीच पाहिजे? आणि तीही positive ? काहीही...


Limbutimbu
Thursday, November 23, 2006 - 6:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिव्व्या, तुझी पोस्ट आवडली! :-)

>>>>>इथे नीट पाह्यलस तर लिंब्याचीही काय कमी टिंगल होत नाही. पण ते तो मजेत घेतो.
छे छे छे, काहीतरीच काय अज्जुका! अग माझी "टिन्गल" देखिल "अनुल्लेखामधे" हरवलेली हे!
म्हणुनच मला दिव्व्याची पोस्ट पटली आणि आवडलीही! अन लगेच "मायबोलीवरचे अनुभव" मधे "अनुल्लेखावर" एक भाषण स्वगत ठोकून आलो!
:-)

Laalbhai
Thursday, November 23, 2006 - 6:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Admin,
या वादात मला पडायचे नाही. आणि कशाचीही कारणमिमांसाही करायची नाही. पण मोकळेपणाने स्वतःवर जबाबदारी घेऊन चूक कबुल करण्याचा तुमचा स्वभाव फारच लोभस आहे. (तुमची अथवा तुमच्या मंडळाची चूक होती की नव्हती, या वादात मी पडत नाही.)

उलट इथल्या काही लोकांची प्रवृत्ती "आम्ही चुकलो असू, पण आमच्या चुकीला इतर जबाबदार आहेत" असा आविर्भाव दिसला. त्याचे वाईट वाटले.

शेवटी स्वतःची चूक मोकळेपणाने कबुल करणारेच टिकतात. उर्मटपणे, स्वतःच्या चुका कळत असूनही, जबाबदारी दुसर्‍यावर ढकलतात, ते वाहून जातात. असो.

मीपण ज्यांचे पक्व फळापरी गळले हो
जीवन त्यांना कळले हो :-)


Laalbhai
Thursday, November 23, 2006 - 7:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिलिंदा, रहावत नाहीये म्हणून लिहितोय. पटले नाही तर सोडून द्या.

तुमची म्हणताय की तुमच्यासारखेच इतर मायबोलीकरही होणारा प्रकार "पहात बसले" आणि कोणीही "हे थांबवा" म्हणून तक्रार केली नाही.

दुर्दैवाने वादासाठीही हा मुद्दा मान्य करता येत नाही हो. "इतर सर्व मायबोलीकर" आणि "तुम्ही" ह्यात फरक असा आहे, की तुम्हाला कारवाई करण्याचा "अधिकार" आहे.

सर्व काही दिसत असूनही, कळत असूनही, केवळ कुणाची तक्रार नाही म्हणून तुम्ही सर्व नेमस्तक लोक हातावर हात धरून बसलात, असे समजायचे का?

माझ्या पहाण्यात मायबोलीवर सगळ्यांचेच तुम्हाला सहकार्य असते. अगदी तावातावाने भांडतानाही admin/mods ने दिलेल्या सुचना आम्ही सर्व (माझे विरोधकही!) कटाक्षाने पाळण्याचा प्रयत्न करतो. मग आणखी कसल्या सहकार्‍याची अपेक्षा आहे?

म्हणजे सभासदांनी काही गोष्टी खटकल्या की लगेच feedback वर येऊन तक्रार नोंदवायची, असे का? मग माझ्यामते, जर शिस्त सांभाळण्याची जबाबदारी सभासदांच्या तत्परतेवर आणि सदसदविवेकावर टाकून तुम्ही मोकळे होत असाल, तर admin हे एकटेच सगळा कारभार पाहू शकतील ना? हवंय कशाला नेमस्तक मंडळाचे झंझट?

अर्थात, प्रस्तुत प्रकरणात कोण चूक कोण बरोबर हे मला माहिती नाही. पण तुमचा एखाद्या post बद्दलचा सापेक्षतेचा मुद्दा मानला तरी सर्वसाधारणपणे offensive गोष्टी लगेच कळतात. किंवा साधारणपणे ज्यांना त्या कळतात त्यांनीच नेमस्तक होऊन admin ला मदत करणे इष्ट नाही का?

मला तुमच्या कामाची थोडीफार कल्पना आहे. आपले सगळे व्यापताप सांभाळून तुम्ही नेमस्तक मंडळ जे काही करत आहात, ते महानच आहे. पण असे असते की, कोणतीही जबाबदारी - पगारी अथवा बिनपगारी - एकदा स्वीकारली की ती पूर्ण निष्ठेने पार पाडता यायला हवी. त्यात काही चुकले की admin सारखा प्रांजळपणा दाखवता यायला हवा. विषय, टिका तिथेच संपते. उलट या प्रकरणात तुम्ही "मायबोलीकरांवर" झाल्या प्रकाराची जबाबदारी equally ढकलू पहात आहात, हे काही पटले नाही.

सुज्ञास अधिक सांगणे न लगे. पण मायबोलीवरच्या सगळ्यांचे सहकार्य तुम्हाला अपेक्षित आहे, हे वाचून काही मनातल्या गोष्टी लिहाव्याशा वाटल्या. कळावे लोभ असावा. :-)


Laalbhai
Thursday, November 23, 2006 - 8:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणि तुम्हाला वस्तुनिष्ठ उदाहरणच द्यायचे तर "राखीव जागांच्या" वादात पेशवा / योग यांनी लिहिलेली अनेक posts कुणाचीही तक्रार नसताना delete केली गेली. ती का? तिथे का नाही "कुणाची तक्रार नाही" हे कारण दाखवले? म्हणजे offensive काय, हे नक्कीच कळते, पण कारवाई करायची की नाही, याबाबत ढिसाळपणा होतो, हे खरे नाही का? (आता हा ढिसाळपणा जाणूनबुजून की इतर काही कारणाने, हे तुम्ही स्वतःशीच ठरवा. इतरांना सांगूही नका.)

well आता जुने उकरून काढायचे नाहीये. पण तुमच्या दाव्यातए काहीच तथ्य नाहीये. उलट admin सारखा प्रांजळपणा दुर्मिळ आहे, हे पाहून वाईट वाटले, इतके तुमच्यापर्यंत आवर्जून पोहोचवायचे होते.

धन्यवाद.


Lopamudraa
Thursday, November 23, 2006 - 8:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लाल्भाई होणारा प्रकार.. सगळे.पाहत बसले... आणि admin, moderator यांनी सुध्दा कारवाई केली नाही यावरुन तुम्हाला.. अस नाही वाटत का.. ज्या व्यक्तीवरुन हा प्रकार घडला.. त्यामुळे.इतरांना किती त्रास.. घडला., आणि वैतागुन शेवटी होउन जाउदे जे होइल ते.. म्हणुन सगळ्यांनी समुहाचे बळ दाखवुन दिले..., या आधी मला वाटत खुपदा..सगळ्यांनी खुप समंजस्याने घेतलेले आहे.
आधी एकएकटे तर किती मरले गेले.. त्याची तर मोजदादच नाही आता तर माझ्या एका वाक्यावरुन लक्षात येते.. समोरचा... duplicate id. आहे.. मागच्या महिन्यातल्या सगळ्या bb वरच्या.. त्या व्यक्तीच्या स्गळ्या.. post बघा.. (त्याच्या असलेल्या.. शेकडो id च्या..) मग तुमच्या लक्षात येइल... नाहितर मी तुम्हाला mail करुन सगळ्या id ची यादी देते..!!!


Laalbhai
Thursday, November 23, 2006 - 8:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Lopamudraa
प्रस्तुत प्रकरणाबद्दल मला काही बोलायचे नाही. I remember Akira Kurosawa's film Rashoman here. Everyone can have different views about the situation.

मी माझे मत फक्त अधिकार असलेल्या लोकांच्या वागणुकीबद्दल नोंदवलेले आहे. त्यात मला जी विषमता दिसली, ती दाखवून द्यावीशी वाटली.

तुम्ही म्हणता ते कदाचित खरेही असू शकते. माझा मुद्दा तो नाहीये. :-)


Deepanjali
Thursday, November 23, 2006 - 7:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आय सेकण्ड पेशवा! परफेक्ट मुल्यमापन!

त्याच्या बिच्चार्‍याच्या काय नादी लागताय?
<<<<<लिंबुटिंबु ,
तू काय इतका सभ्य बनतोस SNH :-)
तू अत्ता recetly टाकलेल्या व्यंगचित्राची link देउ का इथे ??

हे पहा Oct 29 th 1.03 am ची तुझी post!

Limbutimbu
Friday, November 24, 2006 - 4:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>> तू काय इतका सभ्य बनतोस
बनायची काय गरज? मी आहेच सभ्य! :-)
SNH म्हन्जे काय?
एनीवे, तुला माहीत नसेलच, की दिवाळी अन्का साठी काढलेल हे चित्र, ज्याच काढल त्याला स्पष्ट पणे आधी विचारल की तुला राग नाही ना येणार, कुठल्या तरी वाहत्या बीबी वर बी ने मला उत्तरही दिले की अजिबात राग येणार नाही, त्यानन्तरच मी ते दिवाळी अन्कात दिल ते अन्कात प्रसिद्ध झाल नाही तो भाग वेगळा. या चित्राची कल्पना मला बी वरुनच सुचली
आणि तरीही हे केवळ बी च चित्र नसुन परदेशात एकेकट्याने रहाण्यार्‍या पुरुषान्चे (मला समजलेल वा उमगलेल) प्रातिनिधिक चित्र हे!
शिवाय त्यात केवळ "एक व्यक्ती" अस चित्रण नसुन स्वयम्पाक घरातील जमल्या तेवढ्या उन्दीर झुरळान्सहीत सगळ्या बाबीन्च चित्रण हे, अस्ताव्यस्त पसार्‍याच चित्रण हे!
फरक फक्त इतकाच की या चित्रातला पुरुष बदलत्या काळानुरुप हातात पुस्तक घेवुन स्वयन्पाकाचे प्रयोग न करता कॉम्प्युटरचा वापर करतो हे! हातात पुस्तक घेवुन स्वयम्पाक घरात नानाविध प्रयोग करणार्‍या स्त्रीयान्ची व्यन्गचित्रे आजवर अनेक दिवाळी अन्कातून छापली गेली हेत!
आणि म्हणुनच, वरील चित्रातली व्यक्ती "हो, मी हा "बी" लाच काढला हे" अस म्हणल तरी खुद्द बी ला देखिल ते आक्षेपार्ह वाटु नये याची मी पुरेपुर खबरदारी या चित्रात घेतली हे!
तस वाटत नसेल तर घ्यायच का हे चित्र V&C वर?
DDD
आणि लिन्क अशी देत जा, नेमक्या पोस्ट ची

Deepanjali
Friday, November 24, 2006 - 4:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणि तरीही हे केवळ बी च चित्र नसुन परदेशात एकेकट्याने रहाण्यार्‍या पुरुषान्चे (मला समजलेल वा उमगलेल) प्रातिनिधिक चित्र हे!
शिवाय त्यात केवळ "एक व्यक्ती" अस चित्रण नसुन स्वयम्पाक घरातील जमल्या तेवढ्या उन्दीर झुरळान्सहीत सगळ्या बाबीन्च चित्रण हे, अस्ताव्यस्त पसार्‍याच चित्रण हे!
<<<<<<तसे काय रे तिथे तरी कुठे लिहिले होते कि ती कथा ' बी ' ची होती म्हणून :-)
ती तर चांदोबातल्या चक्रमादित्त्याची कथा होती ना ! :-)
असो , मला तर तुझे चित्र किंवा चांदोबा काहीच आक्षेपार्ह वाटले नाही , पण तू म्हणलास या बिचार्‍याच्या नादी का लागता म्हणून तुला आठवण केली त्या व्यंगचित्राची .
( घेतली असशील परवानगी पण चेष्टा करावीशी वाटलीच ना ?)


Limbutimbu
Friday, November 24, 2006 - 4:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>> घेतली असशील परवानगी पण चेष्टा करावीशी वाटलीच ना ?)
अगदी बरोबर, पण एकसुरी ऍटॅकिन्ग चक्रमादित्याची गोष्ट आणि मी काढलेल सर्वसमावेशक चित्र यान्ची तुलना होऊच शकत नाही
माज्या त्या पोस्ट मधे देखिल एक वाक्य हे, चार लोक हसली, आनन्दीत झाली, खुलली, तर बरे अशा अर्थाच! मी काढलेल्या चित्रामुळे कुणि दुखावले जाण्याची सुतराम शक्यता नसेल याची काळजी मी घेत असतो
विशेष म्हणजे त्या चित्राबद्दल एकही कॉमेण्ट आलेली नाही हे कशाचे द्योतक काय की! चित्र कुणाला चान्गल की वाईट वाटले ते काहीच कळले नाही! असो.
इतक्या दिवसानन्तर तुला माझ ते चित्र कसल्या का होईना, सन्दर्भा साठी आठवल आणि तू ते माण्डलस या बद्दल खर तर तुझेच आभार! मी ते चित्र विसरुनच गेलो होतो! :-)


Deepanjali
Friday, November 24, 2006 - 5:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी ते चित्र विसरुनच गेलो होतो
<<<<हो , विसरलाच होतास असं दिसतय , ते चित्रं चांगलं काढलं होतस आणि मी पण enjoy केले पण माझा मुद्दा एवढाच कि इथे V&C वर जेंव्हा तू लोकांना ' बी ' वर टिका करू नका किंवा त्याला बिचार्‍याच्या नादी लागू नकोस असे म्हणत आहेस ते तुला म्हणायचा तरी काय अधिकार आहे मग :-)
माज्या त्या पोस्ट मधे देखिल एक वाक्य हे, चार लोक हसली, आनन्दीत झाली, खुलली, तर बरे अशा अर्थाच!
<<<<मग त्या चांदोबातल्या गोष्टीला निदान चाळीस लोक तरी हसली , आनंदितही झाली असतील नाही का ?
त्या लेखाकाला तरी कोणाला दुखवायचे होते हे कशावरून ?

तळटिप : हे वरील post फ़क्त झालेल्या प्रकाराबद्दल माझे मत , श्रीकूल आणि माझा काहीही संबंध नाही हे सांगायला नको !!
इतके कुठे जमायला मला:-)


Limbutimbu
Friday, November 24, 2006 - 5:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>> माझा मुद्दा एवढाच कि इथे V&C वर जेंव्हा तू लोकांना ' बी ' वर टिका करू नका किंवा त्याला बिचार्‍याच्या नादी लागू नकोस असे म्हणत आहेस ते तुला म्हणायचा तरी काय अधिकार आहे मग
एक्सॅटली, इथेच घोळ होतो हे, माझ चित्र ही बी वरची टीका नव्हती की त्याचे कसले दोष वा वैगुण्या दाखवणारे ते चित्र नाही, तसच ते चित्र मी बी ची पुर्वपरवानगी घेवुन काढल, चित्र जरी बी वरुन सुचल तरी ते प्रातिनिधिक हे, चित्रातल्या व्यक्तीच्या जागी कोणीही परदेशवासीच नव्हे तर देशातला एकटा दुकटा स्वतःला कल्पु शकतो, मुळात ते चित्र बी ची खिल्ली उडविण्याच्या हेतुने काढले नाही व तसा हेतू त्यात दिसतही नाही, दिसलेच तर केवळ एकाकी पुरुषाचे स्वयम्पाक घरातिल केवेलवाणे प्रयोग, आणि श्रेष्ठ विनोद तोच असु शकतो की जो सुरवातीला हसवुन क्षणात विचार करायला लावुन अन्तर्मुख करु शकतो, या तोडीचे ते चित्र नसेलही पण ते चित्र आकस, चीड, द्वेष, खिल्ली उडवणे या उद्देशान्च प्रतिनिधित्व करीत नाही, नाही या गोष्टी त्यात दृगोच्चर होताहेत!
आणि म्हणुन मला अधिकार हे!

>>>>> मग त्या चांदोबातल्या गोष्टीला निदान चाळीस लोक तरी हसली , आनंदितही झाली असतील नाही का ?
त्या लेखाकाला तरी कोणाला दुखवायचे होते हे कशावरून ?
त्या लेखकाला कुणाला दुखवायचे की नाही हा प्रश्ण नसतो, तर त्या लेखामुळे कोण एकजण जरी दुखावला जाणार असेल तर ते वाईटच नाही का? याउलट माझ्या चित्राने कोण दुखावले गेले किन्वा कोण दुखावले जावे अशा अर्थाने ते काढले असे कुठे जाणवते?
एक मान्य, की मी काही सर्वगुणसम्पन्न, षडरिपुन्चा त्याग केलेला सन्त माणुस नाही, मलाही राग, चीड, सन्ताप, जळफळात वगैरे सर्व बाबि चिकटलेल्या हेत, पण त्यान्च सार्वजनिक जाहिर प्रसारण कुठे कसे काय कारणाने कुणाबद्दल करावे याची माझी ठाम तत्वे आहेत! त्यानुसार मी वागत असतो, आणि वरील चित्र त्या वागण्यातल नसुन, निखळ आनन्दाकरता काढल हे!



Deepanjali
Friday, November 24, 2006 - 6:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तर त्या लेखामुळे कोण एकजण जरी दुखावला जाणार असेल तर ते वाईटच नाही का? याउलट माझ्या चित्राने कोण दुखावले गेले किन्वा कोण दुखावले जावे अशा अर्थाने ते काढले असे कुठे जाणवते?
<<<लिंब्या ,
अता उगीच तुझे चित्रं म्हणून सारवा सारव करु नकोस !
तू स्वत : ज्या व्यतीची मस्करी केलीस त्याच व्यतीची मस्करी दुसर्‍यानी केल्यावर मात्र तू V&C वर येउन बोलतोस ह एक मोठ्ठा joke आहे !
Again, तुझे चित्रं किंवा श्रीकूलच्या लेखा विषयी मला वाद घालायचा नाही पण मला एवढेच म्हणायचे आए कि जे तू केलेस तेच त्यानी केले !
तू व्यंगचित्राचे माध्यम वापरलेस तर त्यानी विनोदी article लिहिले !
उलट तू तर ' बी ' वरून विषय सुचल्याचे जाहिर केलेस .. त्यानी तर बी चे कुठे जाहिर नावही घेतले नाहीये
जर तु त्या चित्राला अमुक एका गोष्टीचे प्रतीक मानतोस तर उद्या तोही तेच म्हणेल !
तुला जर निखळ आनंद मिळतो तर कित्येकांना त्या Article मधूनही मिळाला असेल !
आणि त्या निखळ आनंदाची व्याख्या तरी तू एकटा कसा ठरवणार एखाद्या public forum वर ??
तेंव्हा तू येउन श्रीकूलच्या article ला विरोध दर्शवणे याला काहीच अर्थ नाही !
फ़िल्मी भाषेत बोलाय्चे तर " खुद शीशे के घरमे रहने वाले दुसरोंके घरोपे पत्थर नही फ़ेका करते "!


Limbutimbu
Friday, November 24, 2006 - 8:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे बघ, हे तुझ मत हे! माझी भुमिका (सारवासारव नव्हे, तो जमाना गेला, हल्ली कोण शेणात हात घालणार?) मी मान्डली हे!
आता बाकी मायबोलीकरान्करीता विषय शिल्लक ठेवुयात का? :-)


Bee
Friday, January 12, 2007 - 5:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Admin & All Moderators- इथे एखाद्या व्यक्तीचे duplicate IDs नसतानाही जर त्याच्यावर तसा आळ घेतला जात असेल तर त्याच्यावर हा एक मोठा अन्याय आहे. तुमच्याकडे ह्यावर काही उपाय असण्याची शक्यता खूप कमी आहे. पण सर्व नेमस्तक वर्गाकडून आणि Admin ह्यांच्याकडून अपेक्षा आहे की दिवसेंदिवस हा जो विषय इथे गहन होत चालला आहे त्यावर तुम्ही काहीतरी उपाय काढाल. हा सर्व प्रकार निर्माण करणारी व्यक्ती कुणीतरी दुसरीच असते आणि तिचा उद्देश हाच असतो की तिसर्‍या कुणाला तरी जाळ्यात अडकवायचे. म्हणजे त्या व्यक्तीचा उद्देश परिपुर्णपणे सफ़ल होतो आणि ह्याचा त्रास मात्र काहीही सहभाग नसलेल्या तिसर्‍या व्यक्तीला होतो.

Admin
Friday, January 12, 2007 - 5:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी तुमच्यावर कुणीही इथे आळ घेतलेला नाही. पण तुमचे बरोबर आहे. मुद्दामहून तिसर्‍या व्यक्तिच्या शैलीत लिहून त्याच्यावर आळ आणण्याचे प्रयत्न पूर्वीही झाले आहेत आणि अजूनही होत आहेत. या विषयावर काहीही उपाय नाही.

Laalbhai
Friday, January 12, 2007 - 12:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार administrator ,

कशी झाली पुण्याची ट्रिप? माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले नाहीत? :-)


या विषयावर काहीही उपाय नाही.

>>

वारंवार हा विषय चघळला जातो. आणि ज्यांच्या चांगुलपणाबद्दल खात्री वाटावे असे ज्यांचे वर्तन असते, ते ह्याबद्दल नेहमी बोलत असतात. त्यामुळे काही बोलावेसे / सुचवावेसे वाटते. पहा कितपत सोयीचे आहे.

Internet च्या युगात सगळ्यांचीच website असते. तशी आमचीही एक website उभारण्याचे काम सुरु आहे. त्यानिमित्त काही तंत्रज्ञांशी बोलताना बरीचशी माहिती कळली. त्यावरुन माझे विचार आहेत. त्यामुळे ह्यात काही शास्त्रीय नसू शकते.

माझ्या माहितीप्रमाणे Internet वर दाखल होणार्‍या प्रत्येक संगणकाला एक "ओळख क्रमांक" प्रदान केला जातो. त्यावरून एक व्यक्ती /id कोणत्या "ओळख क्रमांकावरून" मायबोली वापरते आहे, हे निश्चित कळते.

मग माझ्या profile मधे माझा ओळख क्रमांक दिसेल अशी व्यवस्था करण्यास काही अडचण असेल का?

म्हणजे "लालभाई" हा id जर एकूण ५ वेगवेगळ्या संगणकावरून मायबोलीवर लिहित असेल तर ते पाचही ओळख क्रमांक लालभाईच्या profile मधे लिहिले जातील!

आणि लालभाई ह्या व्यक्तीने आणखी एक नवीन id नोंद करून त्याने काही वाह्यातपणा केला की त्याच्या नव्या id वरही त्याच ओळख क्रमांकाची नोंद होईल.

(म्हणजे एकाच ओळख क्रमांकावरून दोन दोन id ने लिहिले जाते, म्हणजे ते दोन्ही id एकाच व्यक्तीचे असावेत ह्या शंकेस वाव मिळेल. अर्थात, दोन खरोखरीच्या व्यक्ती एकाच संगणकावरून त्यांचे त्यांचे ids वापरत असतील, अशीही शक्यता असू शकते. पण त्या व्यक्ती मुख्यतः एकाच घरातल्या असतील. म्हणजे नवरा - बायको, भाऊ - बहीण. पण एकाच internet केंद्रात दोन अनोळखी खर्‍याखुर्‍या व्यक्ती जाऊन मायबोली वापरतील, अशी शक्यता statistically कमी असू शकते. असा माझा अंदाज!)

ज्यांना वेळ आणि इच्छा असते ते असे तथाकथित duplicate ids शोधत बसतील. आणि administrator काहीच करत नाहीत, ही तक्रारही कमी होईल.

मी इथे चौकशी केली त्या तंद्रज्ञांच्या मतानुसार असे software लिहिणे फारसे कठिण नाही. पण प्रत्येक system प्रमाणे हे software लिहिण्याची कठिणता बदलते, असेही ते म्हणाले.

तुम्ही काय करताय, हे सध्या कुणालाच कळू शकत नाही म्हणून वाह्यातपणाचे प्रकार होऊ शकत असतील. पण तुम्ही करताय ते सगळ्यांना कळण्याची शक्यता आहे, असा अंदाज एकदा आला की बरेचसे प्रकार थांबतील.


My two sents....




मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators