|
Ajjuka
| |
| Tuesday, November 21, 2006 - 5:41 pm: |
| 
|
सायो, बाईगं... profile वर 'ति' आहे पण मुक्ताफळं बघितलीस का ति / त्याची? ज्या क्षणी चांदोबा प्रसिद्ध झाला त्याक्षणी जादू झाल्यासारखा एकाक्षरी प्रश्नासूर लुप्त झाला आणि ह्या इतर बाया उगवल्या. बर यांची भाषा, आरोप, वागणं सगळं नीट पहा.. एकाक्षरी प्रश्नासुराचेच हे अवतार आहेत याची तुलाही खात्री पटेल गं.
|
Disha013
| |
| Tuesday, November 21, 2006 - 6:15 pm: |
| 
|
अरे भांडु नका रे! हा(ही) कळीचा नारद (नारदी? ) आहे....सगळीकडे भांडणांचे bb उघडुन ठेवलेत. ही व्यक्ती जाणुन्बुजुन करतेय सगळे तिच्या (त्याआच्या) कुठल्याही post ला प्रतिसाद देवु नका... नाहीतर हे लांबतच जाईल मारुतिच्या शेपटासारखे.
|
Asmaani
| |
| Tuesday, November 21, 2006 - 7:35 pm: |
| 
|
you are right disha ! दुर्लक्ष करणे हाच सर्वात उत्तम उपाय आहे. दिनेशदा, प्लीज, तुम्ही तरी सोडून द्या ना. तुम्ही इतक्या छान शब्दांत, इतक्या कळकळीने आवाहन केले पण काही उपयोग झाला का? उलट काहीतरी गलिच्छ आणि संदर्भहीन उदाहरणे दिली गेली. just imagine की मायबोलीचे सभासद नसलेलेही अनेक लोक ही साईट बघत वाचत असणार. त्यांचे काय मत होईल हे सगळं वाचून? so just leave it! जे प्रश्न मूर्खासारखे असतील, मुद्दाम वातावरण बिघडवण्यासाठी विचारलेले असतील, त्यांना कुणी उत्तरं देऊ नका ना! हे सगळं रामायण ज्या व्यक्तीमुळे घडलंय ती व्यक्ती तर दोषी आहेच, पण मला असं वाटतंय की, all of us r making it too serious! taking it too personally! अशानी आपण त्रासदायक व्यक्तींचं महत्त्व वाढवतो आहोत आणि त्या व्यक्तीचा उद्देश सफल करत आहोत.
|
Peshawa
| |
| Tuesday, November 21, 2006 - 11:05 pm: |
| 
|
मला एक समजत नाही बी ह्या व्यक्तीची (त्या ID ची) विनोद समजण्याची कुवत कमी आहे (खरतर नाहीच) हे इथे सगळ्यांना महीती आहे. असे असताना त्याचीच तिंगल का केली जाते? टिंगल त्याची करावी जो ती झेलु शकतो तुम्हाला तसेच प्रतिउत्तर देउ शकतो तुम्हाला तुमच्याच दातावर पाडु शकतो! त्याला न आवडणारि टिंगल हा abuse चाच प्रकार आहे. त्याच्या वरच्या post मधे त्याने ते त्याला कुठल्या प्रकारचे वाटले हे पण लिहीले आहे... मला मान्य आहे त्याला सम्जावूनहि त्याचि प्रश्ण विचारण्याची (बाळबोध असतील) खुमखुमी जात नाही पण त्याने तुम्ही मला उत्तरे द्याच नाहीतर घरी येउन प्रष्ण विचारेन असे तर म्हटले नाहीना? (त्याच्या ह्या वागण्याने त्याला अनेकांची sympathy मिळने अशक्य आहे. हे मान्य) पण म्हणुन त्याला सार्वजनीक टिंगलीचा विशय बनवणे पटत नाही rather ते चुकिचे आहे... दिनेश म्हणतात तसे बी ने दिलेले उत्तर शोधलेला मार्ग बरोबर नाही. बी ला हे समजायला हवे. नवीन येणार्यांना त्याच्या ह्या अविनोदिय (?) अंगाची महीति नसते. अशावेळि ते टिंगल करतील ती सोसायलाच हवी.... पुर्वीचे अनेक लोक स्वत्: त्याची टिंगल करणार नाहीत आणि माझ्य पहाण्यात तरी समजावूनच घ्यायचा प्रयत्न करतात... टिंगली वर हसणे त्यात भर घालणे अनहुत पणे होते पण ते जे करतात त्यानी हे लक्शात घ्यायला हवे तींगल ज्याची होते त्याला जर तीम्गल पसंत नसेल तर तुम्ही त्याला abuse करत असता! आणी ते योग्य नाही (मि स्वत्: ह्या गुन्यांचा अपराधी आहे. It is hard in our culture to not खिचो पाय पण infact most of us have grown up in such kind of environment where खेच खेची is रोजची बात non the less it is not correct if the person who is involved is feeling VIOLATED! verbal scars go deep and can destroy a person completely. I don't think anybody here wants to do emotional damage to B just because he is irritatingly quationy... I think take a step back and think search some verbal abuse sites and decide for yourselves
|
Peshawa, couldn't agree with you more!
|
मी सुरवातीलाच इथे लिहिले आहे की मला issue निर्माण करायचा नाही आहे. मला इथे कुणाचीच दया माया मैत्री किंवा प्रेम अपेक्षित नाही आहे. त्यासाठी मी पात्र आहे असेही मला वाटतं नाही आहे. मी इथे ही ID घेतल्यापासून एकही प्रश्न विचारलेला नाही आहे. ज्या ID ने माझ्यावर शाब्दीक बलाक्तार केला आहे त्या व्यक्तीचा शोध घेण्याचा जोवर इथे प्रयास होत नाही तोवर इथल्या सभासदांचे माझ्याबद्दलचे मत व्यक्त करणे मला व्यर्थ वाटते. मी ह्या बीबीवरून रजा घेते. बाकी इतर इथे लिहू बोलू शकता. ह्या ना त्या बीबीवर मी कोण आहे ह्याची चर्चा रंगत आहे. तेंव्हा इथेच लिहिते की हो मी इथलीच एक एकाक्षरी एकसुरी व्यक्ती 'बी' आहे. मायबोलिच्या गंगेत मी माझा विटाळलेला देह अर्पण केला आहे.
|
Limbutimbu
| |
| Wednesday, November 22, 2006 - 3:23 am: |
| 
|
>>>> हे इथे सगळ्यांना महीती आहे. असे असताना त्याचीच तिंगल का केली जाते? टिंगल त्याची करावी जो ती झेलु शकतो तुम्हाला तसेच प्रतिउत्तर देउ शकतो तुम्हाला तुमच्याच दातावर पाडु शकतो! आय सेकण्ड पेशवा! परफेक्ट मुल्यमापन! त्याच्या बिच्चार्याच्या काय नादी लागताय? मी हे ना अजुन जित्ता! DDD
|
Laalbhai
| |
| Wednesday, November 22, 2006 - 3:37 am: |
| 
|
मी हे ना अजुन जित्ता! >>> काय लिंबुटिंबु? सेंट्रल कोर्टावर दिसत नाही मग आजकाल? मला वाटले तुम्हीही "देहपरिवर्तन" केलेत की काय? ~D
|
Limbutimbu
| |
| Wednesday, November 22, 2006 - 3:41 am: |
| 
|
>>>> मायबोलिच्या गंगेत मी माझा विटाळलेला देह अर्पण केला आहे. एअऽऽ एऽऽऽ एऽऽऽ गप्पेऽऽ! सटकलाहेस आता तु! तिकड कोपर्यात जावुन अन्गठे (पायाचे) धरुन उभा रहा! अन कुणाच्या पायाचे अस विचारु नकोस! तुझ्याच पायाचे तुझ्याच हातानी धर! DDD य सगळ्यात चक्रमादित्याच्या गोष्टीचा सम्बन्ध हे ना? मी पहिल्यान्दा वाचली तेव्हा खरच खुप हसलो, पण नन्तर लक्षात आल की हा पाठीवरचा वार हे! अशा प्रकारे जाहीर हसुन घेण ही विकृती हे! तो जसा हे तसा हे, तो इथे येतो, वावरतो, सन्वादा साठी चार खरे खोटे प्रश्ण विचारतो, ज्यान्ना लक्ष द्यायचे त्यान्नी द्यावे नाही त्यान्नी यसजीरोडच्या कम्पुत शामिल व्हावे असे आपले माझे मत! हा, पेशवा म्हणला तस माझ्यावर आडुन पाडुम मागुन पुढुन, खर्या वा खोट्या आयडीने कितीक का वैखरी पाजळाना, मी बघुन घेईन! पुर्वी पण बर्याचदा समाचार घेतला हे! एकन्दरी, एकेकाला कसल्याही फुटकळ (किन्वा लई भारीच्या) कारणान्नी एकटे पाडून समुहाची ताकद दाखविणे हा काही नविन प्रकार नाही, गृपिझम व सामुहीक एकात्मततेचा अविष्कार दरवेळेस रास्त कारणान्साठीच असतो असेही नाही! (खैरलान्जी प्रकरण हे त्याचे दोन्ही बाजुन्चे धडधडीत उदाहरण हे! पण तो विषय सद्ध्या माझ्या अजेण्ड्यावर नाही) एनीवे, तुमच चालुद्या, सद्ध्या मलाच वेळ नाही! बायदीवे, झक्कीबोवा, ही "बी" ही आयडी तुमचेच अपत्य तर नाही ना? (दिवा घ्या हो बोवाजी) (इफ़ यु काण्ट कन्विन्स देम, जस्ट कन्फ्युज देम याचा आधार घेवुन बोवाजी हा प्रश्ण तुम्हाला विचारला हे! तुम्ही सुज्ञ हात (असे माझे मत, बाकिच्यान्च ठावुक नाही) समजुन घ्याल!)
|
Limbutimbu
| |
| Wednesday, November 22, 2006 - 3:52 am: |
| 
|
>>>> मला वाटले तुम्हीही "देहपरिवर्तन" केलेत की काय? लालभाई, तुम्ही लालभाई नस्तात तर माझ्या "देहपरिवर्तना" ऐवजी "मनःपरिवर्तनाची" अपेक्षा बाळगली अस्तीत! होक्की नाही? DDD
|
Laalbhai
| |
| Wednesday, November 22, 2006 - 3:55 am: |
| 
|
LOL .. good one. 
|
Ashwini
| |
| Wednesday, November 22, 2006 - 4:01 am: |
| 
|
पेशवा, शंभर टक्के अनुमोदन. गुन्ह्याच्या तुलनेत शिक्षा फार तीव्र होते आहे. बाळबोध प्रश्न सातत्याने विचारणे हा अक्षम्य अपराध नाही आणि पेशवा म्हणतो तसं उत्तर द्यायला खरच कुणी बांधिल नाहीये. दुर्लक्ष्य करणे तर आपल्याच हातात आहे. बीच्या वागण्यात हटवादीपणा, अविचारीपणा असतो. कधी कधी तर टोकाचा हेकेखोरपणा पण दिसतो. पण मला प्रामाणिकपणे वाटतं की तो हे कुणालाही मुद्दाम त्रास देण्याच्या उद्देशाने करत नसावा. ती त्याच्या वागण्याची पद्धत बनून गेली आहे. त्याने आपण असंख्य शत्रू निर्माण करतो आहोत हे त्याचं त्यालाही समजत नाहीये. परंतु आपण सगळे तर विचारी आहोत. आपल्या शब्दांचे परीणाम आपण जाणतो. एका भावनाप्रधान व्यक्तीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. फार उशीर होण्याच्या आत थांबावं हे बरं.
|
Shyamli
| |
| Wednesday, November 22, 2006 - 4:18 am: |
| 
|
बाळबोध प्रश्न सातत्याने विचारणे हा अक्षम्य अपराध नाही>>> अगदी बरोबर आहे... त्याच्या प्रश्ण विचारण्यावर मला काहिच म्हणायचा नाहिये...त्यानि प्रष्न विचारण व कोणिउत्तर देण हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे....... पण.......... स्वत्: डुप्लिकेट आयडि घेऊन वर इतर लोकांना तु तोच असशिल तुझ हेच काम आहे ई. सारखी विधाने कोणत्या जोरावर करतो हा....?????? आणि जेंव्हा चिखलात दगड टाकतो तेंव्हा आपल्यावरही चार दोन थेंब उडतील,( ation -- reaction हा साधा नियम माहिती असावा बस... ईथे काहि कोणाचही वयैक्तिक वैमनस्य नहिये त्याच्याशि....
|
Limbutimbu
| |
| Wednesday, November 22, 2006 - 4:48 am: |
| 
|
आय सेकण्ड अश्विनी! आणि खर तर शिक्षा वगैरे काही नाही, आपण कोण कुणाला करणार शिक्षा? काय अधिकार? आपण फक्त सन्धि मिळाली की टिन्गल टवाळी अनुल्लेख वगैरे क्रिएटिव्ह बाबी करणार! एनीवे! काही लोक्स माझ्यावर बर्याचदा घसरले तर ते मी समजु शकलो (आहेच मी तसा, काय म्हणण हे? ) DDD , पण या "बी" वर अशी पाळी का अली हे मला जराही उकलले नाही! पटले तर अजिबात नाही, हां, आता कशातही "उपद्रवमूल्य शोधायची" अन त्याची "चिरफाड" करण्याची फॅशन आली हे का? की आपण सर्वजण येवढ्या तकलादू मनोवृत्तीचे होत की जरा कशान आमचे मानाभिमान आणि कोवळ्या कोवळ्या मनोभावना दुखावल्या जावुन सामुहीक रित्या त्याच्या निषेधाचे जाहीर प्रदर्शन व्हावे? मी हे समजु शकत नाही, आॅक्सेप्ट तर अजिबात करु शकत नाही, आणि "बी" विरुद्धच्या निषेध मोहिमेत जराही शामिल होवु शकत नाही, उलट अशा मोहिमेला मी खणखणीत विरोध करेन, कारण असल्या बाबीन्मुळे मायबोलीवरच वातावरण गढुळ होण्यापलिकडे काहीही होत नाही व बी च्या पोस्ट नी केले नसेल त्याच्या दसपटीने नुकसान अशा मोहिमान्मधुन होत हे! मी कलटी नन्तर यीन
|
Admin
| |
| Wednesday, November 22, 2006 - 6:33 am: |
| 
|
माझ्या मते मायबोली व्यवस्थापन इथे चांगलेच कमी पडले आणि कुठेतरी या प्रकाराची जबाबदारी माझ्यापर्यंतही पोहोचते. मी त्याबद्दल बी ची जाहीर माफी मागतोय. जे झाले ते चांगले झाले नाही. म्हणजे बी चे कुठेच चुकले नाही असे नाही. त्याच्या विधानांमुळे / हेकेखोर वागण्यामूळे हळुहळु त्याने बरेच शत्रू तयार केले. त्या शत्रुत्वाचे असे कधीतरी होणार हे उघड होते. पण एखाद्या गावात पोलिसांना गुन्हेगार कसेही वागले तरी कायदा सोडून वागता येत नाही. किंबहूना अगदी अवघड प्रसंगी मी आता वर्दी उतरवतो आणि सामान्य नागरिक म्हणून इतरांच्या सामील होतो असे करता येत नाही. चोर जरी रंगे हात पकडला गेला असेल तरी, जर जमाव त्या चोराच्या जीवावर उठला असेल तर त्या चोराचा जीव वाचवायची जबाबदारीही त्या पोलिसावरच असते. It is not fair to police but thats the way it is ! आम्ही कमी पडलो जेंव्हा, सगळे मिळून एका व्यक्तिवर तुटून पडले तेंव्हा आम्ही ते थांबवले नाही उलट त्यात सामील झालो. Shame on us ! B I am really sorry for what happened to you !
|
Ajjuka
| |
| Wednesday, November 22, 2006 - 8:13 am: |
| 
|
वरचं सगळंच वाचलं.. जया, अगदी मान्य की टिंगल करणे चूक. पण हे केव्हा घडले अति झाले तेव्हा. तूच म्हणतोस की ज्यांना माहितीये ते सहन करत होतेच. आणि नवीन ज्यांना महित नाही ते टिंगल करणारच. पण येता जाता प्रत्येक ठिकाणी हे झाले तेव्हा चांदोबा लिहिला गेला (तो कोणी लिहिला माहित नाही). आणि पहिल्यापासून सगळे patiently सहन करणार्यांना outlet मिळाला. प्रत्येक जण पोट धरधरून हसला असणार तेव्हा. मला तरी यात काही चूक वाटत नाही. हे प्रतिक्रियात्मक होते. तेव्हा मूळ क्रियेचा दोष मोठा नाही का? आजपर्यंत बी च्या किती प्रश्नांना शांतपणे उत्तरे दिलित मी! इथे आणि वैयक्तिक इमेल वर सुद्धा. त्यालाच विचार. मग तरी मी हा stand का घेतला? अति झालं म्हणूनच ना. प्रत्येकाच्या सहनशक्तीचा अंत बघणं ह्याला काय अर्थ आहे? लोक शांतपणे उत्तर देतात तेव्हा काय विचार करतात 'समजेल ह्याला... कधीतरी सुधारेल..' पण नाहीच. परत अडाणीपणाचे हे भले मोठे प्रदर्शन पण त्याच वेळेला काही ठिकाणची इतर पोस्टस् पाह्यली तर हा अडाणीपणा केवळ image आहे. आणि this person is laughing at our expense असा feel आल्याशिवाय रहात नाही. फसवल्याची चीड इथून सुरू होते. आणि ऍडमिन, तुम्ही जबाबदारी पार नाही पाडलीत असा दोष का घेताय स्वतःकडे? मला खरंच असं वाटत नाही की तुम्ही बी ची specially माफी मागायला हवी. कारण जे झालं त्यात आमची जेवढी चूक होती तेवढीच त्याचीही होती. अनेक गोष्टीतून अनर्थ होऊ नये म्हणून तुम्ही वेळेवर सावरल्यात त्यामुळे तुम्ही माफी मागणे हे योग्य नाही. तुमचे काहीही चुकलेले नाही. आणि बी, माझे तुझ्यासाठी शेवटचे पोस्ट... एक शब्दार्थ.. बलात्कार या शब्दाच्या अर्थात ज्याच्यावर तो होतो ती व्यक्ती १००% निर्दोष असणे अपेक्षित आहे. पण तुझं वागणं तसं आहे याची खात्री तू सोडून कुणालाच नाही तेव्हा असले गंभीर आरोप करताना निदान आत्तापर्यंत तुला अनेकदा सांभाळून घेतले गेलेय याची थोडीशी तरी जाणीव ठेव आणि शक्य असेल तर विचार कर आपले काय चुकले याचा.
|
Dineshvs
| |
| Wednesday, November 22, 2006 - 8:14 am: |
| 
|
Admin तुमचा काहिहि दोष नाही. सार्वजनिक सहनशक्तीचा अंत झाला. दुसरे काहि नाही. लोकशाहि मार्ग उपलब्ध असताना, जर कुणी हेतुपुरस्सर उपद्रव देणार असेल, तर दुसरे काय होणार ? मीच नाही, तर सर्वानीच ईथे योग्य तो संयम दाखवला होता. असो. एक उदाहरण म्हणुन हे आपण सगळ्यानीच लक्षात ठेवु या.
|
Pinaz
| |
| Wednesday, November 22, 2006 - 8:28 am: |
| 
|
Hello All self-proclaimed judges, Admin नी विषय संपवण्याचा प्रयत्न केलाय आणि त्यांना काही जाणवले असेल म्हणूनच त्यांनी तशी माफी मागितली असेल किंवा कुटुंबातल्या मोठ्या भावाची भुमिका घेऊन पडते घेतले असेल ना? त्यांनी माफी मागणे योग्य होते का नव्हते याची चीरफाद क्रुपया करु नका. admin ने विषय संपवला आहे. तुम्ही admin ना साथ द्या. आता बंद करुयात का हे आणि काही योग्य गप्पा मारुयात का?
|
Milindaa
| |
| Wednesday, November 22, 2006 - 10:49 am: |
| 
|
मी अजून एक गोष्ट सांगू इच्छितो. ही गोष्ट लिहील्यापासून ४ दिवस तेथे धुमाकूळ चालू होता, त्या काळात, कोणीही 'हे चूक आहे' या अर्थी निषेधाचे एकतरी पोस्ट टाकले का? त्या बीबी वर नाही, तर Feedback to admin बीबी वर? नाही!! कारण जेव्हा मजा येत होती तेव्हा सर्वच जण मजा घेत होते. पण आता ते उलटल्यावर कसं काय सर्वांना अचानक हे चूक आहे हे दिसले? बाकीच्यांचं जाऊदेत.. खुद्द बी ने एकतरी पोस्ट टाकले का admin साठी? की हे थांबवा म्हणून? शाब्दिक का होईना, बलात्कार झाला ना? मग तो होताना 'थांबा' असं ओरडता येत नाही? कमाल आहे.. मी आणि मैत्रेयी, आम्ही नेमस्तकांच्या भुमिका पार पाडत नाही? (हे वाक्य असलेले पोस्ट उडवले गेले आहे असे दिसते.) मुळात नेमस्तकांकडे मदत मागितली होती का? एकच पोस्ट एखाद्याला विनोद वाटू शकते, ती दुसर्याला अपमानास्पद, हे मान्य आहे, मग त्या दुसर्याने आपले म्हणणे मांडायला नको? ते झाले होते का? थोडा विचार करा सर्वांनी.. झालं ते व्हायला नको होतं यात वादच नाही, पण यात मायबोलीवरच्या सगळ्यांच सहकार्य अपेक्षित आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे..
|
Meenu
| |
| Wednesday, November 22, 2006 - 10:55 am: |
| 
|
ती व्यक्ती कुठे आहे? ते जाणुन तु काय करणार आता ..? admin नी तुझी जाहीर माफी मागीतली आहे ना आता ...? तिचे नाव काय आहे? मला वाटतं admin नी आधीच सांगीतलय की ते आपल्याला शोधता येणार नाही ती विकृत आहे असे वाटतं नाही इथे कुणाला? त्या व्यक्तीच्या हातुन एक चुक घडली म्हणुन ती विकृत कशी ठरेल लगेच ..? एखादी चुक सांभाळुन घ्यायला काय हरकत आहे. अनेक लोकांनी ईथे तुला कीतीतरी वेळा सांभाळुन घेतलच आहे की .. तिनी जे काही केले ते उचित आहे का? नाही जे केलं ते उचित नाही. त्यामुळेच तर admin नी माफी मागीतली ना ..? असे जर असेल तर इथे पुढेमागे प्रत्येक जण ह्याच मार्गाचा अवलंब करतील. आज एक घटना घडली उद्या १० अशा घटना घडली.असं काही होणार नाहीये. admin च्या post वरुन हे नक्कीच स्पष्ट झालय की ते पुन्हा असं काही होऊ नये म्हणुन काळजी घेतील माफ़ी नको न्याय हवा मला वाटतं तुला तो मिळाला आहे आणि तु आता अति ताणु नयेस हे ईष्ट तुला याचा फार त्रास झाला असेल पण मग अजुन त्रास करुन घेण्यात कोणता शहाणपणा आहे. तु काही दिवस मायबोलीपासुन लांब जाऊन का पहात नाही. मायबोली म्हणजे काही सर्वस्व नाहीये मला वाटतं
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|