Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through November 21, 2006

Hitguj » Views and Comments » Current Affairs » ईस्लामी दहशतवादावर ऊतारा » Archive through November 21, 2006 « Previous Next »

Chyayla
Monday, November 20, 2006 - 4:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लालभाई तुम्ही माझ्याशी चर्चा करणार नाही म्हणाले होतात. जाउ द्या मी काही अबोला धरलेला नाही. माझ्यावरच्या सन्स्कारान्मुळे तुम्ही किन्वा ईतर कोणी मला किन्वा माझ्या विचारसरणीला विरोध करतात ते माझे विरोधकच आहेत, शत्रु नव्हे. पण ज्या भाषेत तुम्ही किन्वा इतरान्नी लिहिले त्याच भाषेत उत्तरे दिलीत हे लक्षात घ्यावे. तुमच्या प्रामाणिक, पुर्वग्रहदुशीत मते मनात न धरता मुद्दे मान्डाल तर मी समर्थनच देइन.

तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे तर्कसन्गत, पुराव्यासहीत माझ्याकडे उत्तर आहे, व आधिपण दिले आहे, आतापण जे काही लिहिले ते त्याच विचारसरणीतुन. मी माझाकडुन सन्घाची उपयोगीता, त्याचे हिन्दुत्व याबद्दल आधीच लिहिले आहे व त्यामुळे दहशतवाद कसा सम्पु शकतो ते सुधा. परत उजळणी नको.

पण मला प्रामाणिकपणे सान्गा, आज जे काही कम्युनिस्ट, किन्वा कॉन्ग्रेस करत आहे त्याने कसा दहशतवाद तात्पुरता व कायमचा सम्पु शकतो याचे उत्तर तुम्ही आधी द्यावे ही माझी ईछा. नन्तरच मी उत्तरे दिल.

काश्मिर बद्दल थोडी माहिती व माझे मुद्दे ईथे मान्डत आहे.

१)काश्मिर मधे मी स्वता: परिस्थिती बघुन आलो आहे, रोजगार म्हणाल तर पर्यटनामुळे चान्गला रोजगार मिळतो, शिकारे, बोटहाउस, हॉटेल्स, गाईड, टुरिस्ट कम्पन्या, लाकडी सामान, केशर, व सरसोची मुबलक शेती यामुळे ती चिन्ता नव्हती, आणी सध्या पण नाही.

२)परन्तु जेन्व्हा पासुन दहशतवादाने हिन्दुन्ना हाकलुन वर डोके काढले तेन्व्हा पासुन हा रोजगार बन्द झाला. सामान्य मुस्लिमाना "गवत खाउ पण जिहाद करु" असली शिकवण दिल्या जातेय शिवाय उत्कट धर्म भावना व जिहादीन्कडुन पैसा याचे प्रलोभन यामुळे काही तरुण दहशतवादाकडे ओढल्या गेले तर काहीन्ना कौम की खातीर जबरदस्तिने दहशतवादी बनवण्यात आले.

३)याशिवाय ३७० व्या कलमामुळे व एकाच देषात दोन सन्विधान यामुळे त्यान्च्यात फ़ुटिरतेची भावना व नेहरुन्च्या महाचुकीमुळे झालेला घोळ अजुनही कायम आहे.

४) ज्या राजकिय पक्षान्ना काश्मिरातला दहशतवाद थाम्बवण्याची ईछा नाही असल्यानाच विरोध करणे आवश्यक आहे म्हणुनच माझा त्यान्ना विरोध आहे, यासाठीच मी राजकिय ईछाशक्तिबद्दल बोललो आहे.
गिल प्रमाणेच जगमोहन यान्नी लष्कराच्या मदतीने दहशतवाद सुरुवातीच्या काळातच आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला होता. परिणाम त्यान्ना तिथुन काढण्यात आले. त्यामुळे कोणत्या राजकिय पक्शाची ईछाशक्ती नाही हे दिसुन पडते.

५)आज लष्करामुळेच जे काही भारताचे अस्तित्व आहे ते आहे नाहीतर तो पाकिस्तानच, एका सेक्युलर राष्ट्रात धर्माच्या नावावर काष्मिर पाकिस्तानला देउन टाकणे कितपत तर्कसन्गत आहे. मुस्लिम काय या देशाचे नागरिक राहु शकत नाही का?

६) दहशतवादावर लश्करी कार्यवाही हाच तात्पुरता उपाय आहे, जो पर्यन्त त्यान्ना जरब बसत नाही, तोपर्यन्त जो सामान्य नागरिक आहे ज्याला या वादामधे न अडकता रोजी रोटी मिळवायची आहे त्यात एक विश्वास निर्माण होइल. मग तो पण तुम्हाला पाठिम्बा नक्किच देइल. नन्तर कायम्स्वरुपी उपायामुळे तो आटोक्यात आणता येइल तेन्व्हा गोळी नका वापरु मान्य. परिस्थिती गम्भीर असते तेन्व्हा शस्त्रक्रिया करावीच लागते, मग त्यावर मलमपट्टी केल्या जाते त्यामागे रोग बरा होणे हीच चान्गली भावना असते.

७)सध्या गोळीला गोळी हेच उत्तर, जहाल जिहादीसमोर, किन्वा शस्त्र धारण करुन आपलाच जीव घेण्यासाठी आलेल्या शत्रुसमोर गान्धीगिरी करणे म्हणजे आत्महत्या व मुर्खपणाच.
आपली ३ प्रत्यक्ष युद्धे झालीत आणी हे एक अप्रत्यक्ष युद्धच लादले गेले आहे. आपण तेन्व्हा पण फ़ुले घेउन गेलो नव्हतो मग आता काय वेगळी परिस्थिती आहे की गोळ्या चालवु नये, उलट गोळ्या न चालवण्यामागे पण तीच ईछा दिसुन येते की हा दहशतवाद थाम्बु नये.

८)शिवाय दुर्गम भागात लश्करच सामान्य नागरिकान्साठी शाळा, इस्प्तितळे व ईतर सुविधा पुरवते, त्यामुळे केवळ दहशतवाद्यान्ना कन्ठस्नान घालणे एवढेच न करता नागरी कर्तव्य पण करत आहेत हे लक्षात घ्यावे.

काय मित्रान्नो तुम्हाला काय वाटत?, ईतरान्कडुनही मुद्दे येवु द्यात, उगीच काही निवडकच मायबोलिकर ईथे लिहितात असे वाटु नये.


Laalbhai
Monday, November 20, 2006 - 5:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो तेंव्हा तुम्ही "असे काही" लिहू शकाल असे वाटले नव्हते. :-)
जे पटले ते मोकळेपणाने स्वीकारले.

दहशतवाद संपवायला कोणत्याही राजकीय पक्षाकडे काही निश्चित उपाय आहेत, असे मी म्हटलेले नाही. मी फक्त तुमच्या RSS treatment ला ठाम विरोध केला!

Now about Kashmir

१. पर्यटन कोसळल्यावर बेरोजगार झाले त्यांचे काय? आणि पर्यटनही शहरांपुरतेच मर्यादित होते. खोलवरच्या खेड्यापड्यांपर्यंत रस्ते, पाणी, वीज या सोयी अजुनही पोचलेल्या नाहीत, याची आपणास कल्पना असेलच.

२. "कोणत्याही" राजकीय पक्षाला कसलीच इच्छा नाही. तुमच्या उपायाने ५ वर्षात हा प्रश्न सुटायला हवा होता. BJP ५ वर्षे सत्तेवर होते. काय झाले? RSS विरोध करत असलेले ३७० कलम तरी रद्द केले का?

३. पाकिस्तानला काश्मिर द्या, असे कोण म्हणते?

४. गेले २ दशकं लश्कर काश्मिरात ठाण मांडून आहे. प्रत्येक माणसागणिक एक जवान असे समिकरण आहे. मग का नाही थांबला दहशतवाद? (जागतिक अहवालानुसार पाणीप्रश्नापेक्षाही अनेकपटीने जास्त रक्कम आपण लष्करावर खर्च करतो.) लक्षात घ्या "बंदुकीने दहशतवाद थांबत नाही" म्हणजे अहिंसात्मक सत्याग्रह करा, असा अर्थ होत नाही. उलट पंजाबात दहशतवादाला प्रत्युत्तर देण्यासाठी आततायीपणाने लष्करी कारवाई झाली, त्याने अनेक शीख संसार उध्वस्त ज़ाले. अमेरिकेच्या ताकदवान इराक आणि अफगाणिस्तान कारवाईनंतर काय फरक पडला?
तेंव्हा, बंदुका सोडून कबुतरं हातात घ्या असा टोकाचा अर्थ तुम्ही काढू नका. कडक धोरण आणि दोषींना शिक्षा हवीच. पण सामान्य जनतेच्या पाठिंब्याशिवाय दहशतवादविरोधी लढा जिंकता येणार नाही, आणि सामान्य जनतेचा पाठिंबा बंदूकीच्या जोरावर मिळवता येत नाही. किमान एवढे लक्षात घेतले तरी तुमचेच बरेचसे विचार तुम्हाला बदलावेसे वाटतील.


Laalbhai
Monday, November 20, 2006 - 5:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उलट गोळ्या न चालवण्यामागे पण तीच ईछा दिसुन येते की हा दहशतवाद थाम्बु नये.

>>>>

It's typical RSS mentality! ह्याच्यामुळेच ह्यांच्याशी कोणत्याही प्रकारचा सुसंवाद साधण्याचा प्रत्येक प्रयत्न फ़ोल जातो!

ह्यांना केलेला प्रत्येक विरोध म्हणजे राष्ट्रकार्यला विरोध आहे, आणि तो विरोध म्हणजे राष्ट्रद्रोह आहे, असा यांचा समज कशाच्या जोरावर होतो कोण जाणे? असो. अहंगड म्हणतात तो हाच.


Chyayla
Monday, November 20, 2006 - 6:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुम्ही माझी पोस्ट नीट वाचली नाही, सगळीकडे गोळ्या घाला असे मी पण म्हणालो नाही... शिवाय माझ्या प्रश्नाचे उत्तर पण नाही दिले अजुन. तुमचे RSS/BJP बद्दल उत्तर नन्तरच देईन.

Laalbhai
Monday, November 20, 2006 - 6:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोणता प्रश्न?

मी स्पष्ट म्हणालोय की कोणत्याही राजकिय पक्षात दहशतवाद थांबवण्याची इच्छा नाही. ह्यात कॉंग्रेस आणि कम्युनिस्ट राजकिय पक्ष अंतर्भूत आहेत.

अजुन काही वेगळे विचारायचे असेल तर विचारा.

आणि तुम्ही RSS/BJP बद्दल उत्तर द्यावे अशी परिस्थिती नाहीये. आणखी वेगळे तुम्ही काय बोलणार? त्यांच्या विचारांचे जू तुम्ही मानेवरून उतरवलेत तर तुम्ही बर्‍यापैकी "माणूस" म्हणून उरता, हे तुमच्या काही उत्तरांवरून दिसतेच आहे.


Deshi
Monday, November 20, 2006 - 3:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


लालभाई, कोणी कोणाचे जु चढवावे हे ठरवनारे तुम्ही कोण? तुमच्या विचारावर साम्यवादाचे जु आहेच.तुमचे म्हणने आहे की साम्यवादाने प्रस्श्न सुटतील, च्यायलाचे म्हणने आहे की संघाने प्र्श्न सुटावयास मदत होईल. पण त्यांनी नाही सांगीतले की तुम्ही साम्यवादाचे जु सोडा म्हणुन.

प्रत्येक व्यक्तीवर कुठलेना कुठले जु असतेच. पण याचा अर्थ तो त्या विचाराचाच आहे असा होत नाही. त्या व्यक्तीचे स्वत्:अचे काही विचार असताताच.

मला तरी सर्व पोस्ट मध्ये ओढुन ताणुन केलेला संघ द्वेषच दिसत आहे. आधी ठरले होते की परत संघावर चर्चा नको म्हणुन मग त्या च्रचेला वेगळे वळन लावन्याचा का प्रयत्न चालु आहे.
मागे कम्युनिस्टांवर जसा बीबी होता तसे तुम्ही संघ परिवारवर एक बीबी काढा व त्यात लिहा.

तुम्ही काश्मीर, दहशतवाद ह्या वर लिहा पण आता तरी हिंदुत्ववाद, संघ कसे घातक आहेत हे(च) लिहु नका. आपल्या सारख्या विचारी माणसाकडुन आम्हा सारख्या वाचकांच्या चांगले मुद्दे मांडन्याचा अपेक्षा आहेत.


Chyayla
Monday, November 20, 2006 - 4:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लालभाई, दहशतवाद उतरवण्याची ताकद नाही म्हणता मग काय त्याना शरण जाउन सरळ लोटान्गण घालुन वाढवण्यासाठी मदत करायची काय, जणु काही तो त्यान्चा अधिकारच आहे, आणी त्यान्च्या अधिकाराला जागणे तुमचे कर्तव्य आहे.

कम्युनिस्टानमधे, आणी कॉन्ग्रेस मधे ती ताकद तर मुळीच नाही हे मागेच सिद्ध केले होते. पण निदान सन्घ त्याला खतपाणी तर घालत नाही.

आणी ताकद नाही म्हणता हे सपशेल खोटे आहे वेळ निश्चित लागेल, हा माझा आशावाद नाही, तर खात्री आहे म्हणुनच अजुनही सातत्य ठेवुन आहे, अजुन तुमच्या सारखे जाग्रुत होणे बाकी आहे. तुमच्या मधे ती निराशा आली असेल म्हणुन तुम्ही ईतरान्ना पण तसे समजता, ह्या बद्दल ही मानसाशास्त्रात लिहिले असेलच.

आणी तुम्हाला येउन जाउन राष्ट्र, हिन्दुत्व असे म्हटले की अन्गावर पाल पडल्यासारखे का दचकता? तुमचा येउन जाउन प्रखर राष्ट्रवाद म्हणजे काही तरी भयन्कर गुन्हा आहे असला काही तरी समज केल्या सारखा दिसत आहे. आणी मला हे समाजहितकारी म्हणजेच राष्ट्रहितकारी शब्दान्ची उजळणी करायला कधीच लाज वाटणार नाही.

तुम्हाला जर सन्घा बद्दल एवढी खुमखुमी असेल तर देशी म्हणता त्याप्रमाणे एक BB काढा, तुमचे सगळे गैर्समज काढुन टाकु, हा माझा गर्व नव्हे दावा आहे, अट एकच पुर्वग्रहदुषितपणाचा त्याग.
आणी ईकडे चर्चा चालु ठेवावि.

तुम्ही जे माणसात असल्यासारखे लिहु शकता म्हणाले... हो सन्घ सन्स्कारामुळे मी खरी माणुसकी शिकलो आणी त्यामुळेच ईकडे असे लिहु शकतो, तुम्ही त्याला नेहमीच्या पुर्वग्रहदुशीत नजरेनी, व द्वेशानी पहात नाही म्हणुन तुम्हाला ते तसे वाटते. तुम्हाला वरुन सन्घ कितिही कठीण वाटत असला तरी आत हिन्दुत्वाचा गोड गाभा भरला आहे. जे त्याचे सरन्क्षण करण्यासाठी तितकेच आवश्यक आहे.

काश्मिर मधे दुर्गम ठिकाणी असा काही बर्फ़ आणी वादळे येतात कि तिकडे रहाणे कठीण आहे, ईलेक्त्रिक चे पोल उभारले तरी पुढच्या वादळात ते पडतातच त्यामुळे कडक हिवाळ्यात तिथे वस्ति नसते. त्यामुळे तिकडे सुविधा तश्या पण निर्माण करता येत नाहीत.

BJP सत्तेवर असतान्ना पुर्णपणे स्वबहुमतात नव्हती त्याला बर्याच मर्यादा होत्या त्यामुळे ३७० कलम व ईतर बाबि करणे शक्य नव्हते. अजुन बाकिचे ईतर पक्ष एवढे प्रगल्भ नव्हते झाले की ते त्याला समर्थन देतील. राजिव गान्धी (शहाबानो) प्रमाणे जबरदस्तिने कायदा नव्हता बदलवला.


अमेरिका स्वता:च दहशतवादी आहे, त्यान्नीच जिहादी दहशतवाद पोसला आज तो त्यान्चावरच उलटतोय, आपण मात्र ईतक्या शतकान्पासुन हा जिहादी वेडेपणा पचवला आहे.

आणी आता त्याला मुख्य कारण कॉन्ग्रेस व कम्युनिस्ट यान्नी मुस्लिमान्ना राष्ट्रिय प्रवाहात कधी येउ दिले नाही, मतान्साठी नेहमीच त्यान्च्यात अनावश्यक भिती निर्माण केली, सन्घ तर सत्तेवर नव्हता कि ज्याची त्याला भिती असावी तुम्ही एवढे घाबरता आणी घाबरवता म्हणजे कुछ तो बात है सन्घामधे.

स्वता:च्या स्वार्थासाठी तुम्हाला एक भीती दाखवणे आवश्यक होते मग कोण उरतो सन्घ... मग दाखवा त्याची भीती व बनवा व्होटब्यान्क. आजही त्यान्ना वेगळे आरक्षण देउन तुम्ही वेगळे आहात हे सान्गितल्या जात आहे.

तुम्ही गोळी बद्दल माझेच विचार शब्द बदलवुन सान्गत आहात, म्हणजे कुठे तरी गोळी ही वापरावीच लागेल ना? मीही म्हणतोय की दहशतवाद सम्पुर्णपणे गोळीनी सुटणार नाही त्यासाठी काय करावे ते सुद्धा मुद्दे मान्डली आहेत त्याबद्दल तुम्ही काही बोलला नाहीत.

पन्जाब मधे जनतेकडुन समर्थन मिळाले म्हणुन तो लवकर आटोक्यात आला, मग तुम्ही दहशतवादाविरुद्ध जनसमर्थन का नाही निर्माण करत उलट आधी सान्गितल्या प्रमाणे केवळ मतान्साठी त्याला पोसता आहात. लक्षात ठेवा उद्या तुमची पण अमेरिकेचे ट्वीन टोवर्स व्हायला वेळ लागणार नाही त्यामुळे याला खरे जबाबदार तुम्ही आहात.


Vijaykulkarni
Monday, November 20, 2006 - 5:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कम्युनिस्टानमधे, आणी कॉन्ग्रेस मधे ती ताकद तर मुळीच नाही हे मागेच सिद्ध केले होते.

आणी भाजप मध्ये ही नाही हे जसवन्तसिन्गानी सिद्ध केले होते.


Kedarjoshi
Monday, November 20, 2006 - 5:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जसवंतसिगांनी जे केले ते एकट्याने नाही केले त्या व्यक्तीचा दोष नसावा. ( मला ही ते व्यक्तीश्: आवडले नाही व कधीच आवडनार ही नाही).

पण त्या वेळी सर्वपक्षीय गोपनीय बैठक झाली व त्यात हे ठरल्या गेले. त्यांनी फक्त प्रोजेक्ट एक्झुकुट केला. त्यामुळे त्यांचा माथी दोष मारने म्हनजे मुळ मुद्दा सोडुन दुसर्यालाच पकडने.

ती गोष्ट भारता सारख्या देशाला शरम आणनारी आहे. १५० लोक मेले जरी असते तरी चालले असते.

च्यायला ने एक मुख्य व जोरदार मुद्दा मांडला आहे. कम्युनिस्टांनी व कॉग्रेस ने मुसलमानांना कधीच मुख्य प्रवाहात येऊ दिले नाही. मी यापुढे जाउन असे म्हणतो की जातीय ( हो जातीय) राजकारण करने ही कॉंग्रेस ची कला आहे. त्यावरच ते ईतके दिवस टिकुन होते. वर उलट भाजपा ला जातीयवादी म्हणले की झाले.

तसे नसते तर भारताची सर्वांगीन प्रगती आधीच झाली असती. दलीत वर्ग हा पन मुख्य प्रवाहात सामील झाला असता व आरक्षण प्रकरणावरुन दरी निर्मान झाली नसती.

अतिशय शरमेची बाब की मुस्लीम नेते कींवा रामदास आठवले सारखे दलीते नेते मंताचा राजकारणात आडकतात व आपले वेगळे अस्तीत्व जोपासायचा प्रयत्न करतात.

भाजपा ही व्हलु बेस पार्‍टी होती पण सत्तेची लागण झालीच. सत्तेवर आल्यावर त्यांनी ही अनुकरण्च केले पण एक बाब लक्षा घ्येन्यासारखी आही की भाजपाच्या हातात संपुर्ण सत्ता कधीच न्हवती. त्यामुळे त्यानंनी जे ६ वर्शात केले ते सत्ता राखण्यासाठी केले. जर खरच शत प्रतिशक्त भाजपा राहीली असती तर चित्र कदाचीत वेगळे दिसले असते.


Chyayla
Monday, November 20, 2006 - 5:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केदार, ज्याना फ़क्त द्वेश करायचा आहे ते दोन्हिकडुन बोलतात, जर १५० लोकान्ना मरु दिले असते तर हेच म्हणाले असते, राष्ट्रापायी यान्नी निरपराधाना मरु दिले. मानवता वैगेरेच्या नावाने किन्काळ्या फ़ोडल्या असत्या राष्ट्र त्याचा स्वाभिमान गेला चुलित. ते एक धर्म सन्कटच होते कोणताही निर्णय घेतला असता तर त्या अनुशन्गानी तो योग्यच होता.

मी तर म्हणतो त्या अतिरेक्यान्ना आधीच गोळीने उडवायला पाहिजे होते, आपल्या किचकट न्यायप्रक्रियेत अडकवण्या पेक्षा. आज तोच दहशतवादी जैश्-ए-महम्मद काढुन किती निरपराधान्चे प्राण घेत आहे.


Laalbhai
Tuesday, November 21, 2006 - 2:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

It is well-known fact that the terrorism in India is actively supported by ISI and Pakistan. The fact is known, I guess, from start of the terrorism itself.
तरीही १९९६ मधे भाजपाच्या वाजपेयी सरकारने पाकिस्तानशी मैत्री करण्याचे आटोकाट प्रयत्न केले. अतिशय अपमानास्पद रीतीने मुशर्रफ अर्ध्यावर निघून गेला तरीही काही महिन्यांनी शांतता प्रक्रिया पुढे चालू राहिली.

आता मनमोहन सिंग सरकार पाकिस्तान बरोबर दहशतवादाविरुद्ध लढा देण्याचा प्रयत्न करत आहे तर BJP त्याविरुद्ध टिका करत आहे.

सत्तेवर असताना व्यापक आंतरराष्ट्र्य राजकारणाचा विचार करावा लागत असेल, तसा भाजपा आणि कॉंग्रेस करत असतील. सत्तेवर नसताना एकमेकाला शिव्या देणे हेच त्यांचे काम. कोणीही फारसे वेगळे नाही.

मला गंमत वाटते की इतरांपासून भाजपाला (पर्यायाने संघाला!) कोणत्याबाबतीत, कसे वेगळे काढले जाऊ शकते? कॉंग्रेसने आणि कम्युनिस्टांनी मुस्लिमांसाठी काही केले नाही, हे उघडच आहे, पण पाच वर्षात भाजपाने करण्यासारखे असूनही काय केले?

संपूर्ण सत्ता नव्हती वगैरे कांगावे खोटे आहेत. आता कॉंग्रेसकडे कुठे पूर्ण सत्ता आहे? पण डावे, भाजपा यांचा विरोध असूनही त्यांनी अमेरिकेबरोबर अणूकरार केला, SEZ कार्यान्वित केले, समाजातून मोठा विरोध असूनही व्यापक आरक्षणे लागू केली. शिवाय हे सगळे मनमोहन सिंगांनी कोणतीही अलंकारिक (कृतीहीन) भाषणे न देता, अतिशय सौम्यपणे पण ठामपणे केले. सांगायचे असे, की करायचे असेल तर कितीही विरोध असेल तरी काम करता येतेच. पण आमच्याकडे पूर्ण सत्ता नाही, म्हणून आम्हाला काही करता येत नाही, हा कांगावा करू नये. भाजपाने दलित, मुसलमान यांच्यासाठी काही केले असते तर त्याला सर्वच पक्षांकडून पाठिंबा मिळाला असता. असो. (याउलट डाव्यांचा दबाव असूनही चीनशी अतिशय काळजीपूर्वक संबंध जोडले जात आहेत. सहकारी पक्षांचा दबाव असतानाही स्वतःला हवे ते काम कसे करायचे याचाच वस्तुपाठ मनमोहन सिंग घालून देत आहेत. आणि ह्या सगळ्याचे चांगले परिणाम दिसतातच म्हणून डाव्यांनाही कोणतेही अनुचित पाऊल उचलता येत नाहीये.)

देशी,

मी कुणाचेही कधीही समर्थन केलेले नाही. मी कम्युनिस्ट आहे, इतकेच मी आतापर्यंत म्हणालो आहे. देशातल्या सगळ्या समस्यांवर "कम्युनिझम" हा एकमेव उपाय आहे, असा माझा आग्रह कधीच नव्हता. मी असे कधीही म्हटलेले नाही. किंवा संघवाले संघाच्या प्रचारासाठी मायबोली वापरतात तसे मी कम्युनिझमच्या प्रचारासाठी मायबोली कधीही वापरएली नही! आता ही गोष्ट वेगळी, की काही गटाच्या लोकांना कम्युनिझमचीच कावीळ आहे त्यामुळी कम्युनिस्ट दिसला की शत्रू शत्रू म्हणून बोंबलायची सवय झालेली आहे.

संघावर वारंवार टिका करण्याचे कारण मी नेहमीच बोलून दाखवलेले आहे. तुम्हाला कळले नसेल तर पुन्हा सांगतो की ह्यांचा अहंगंड तापदायक आहे. देशातल्या प्रत्येक समस्येवर संघ हा एकच उपाय आहे, हा मूर्ख प्रचार हस्यास्पद आहे. शिवाय विषय काहीही असो, हिंदू संघटन, मुस्लिम राष्ट्रद्रोही, ख्रिश्चन राष्ट्रद्रोही असे बिनबुडाचे मुद्दे संघाचे असतातच. दुर्दैवाने इतर काही नसून फक्त हेच मुद्दे असतात. वर कुणीतरी म्हणाले होते तसे, यांच्या कोणत्याही आंदोलनाचा संबंध सामान्यांच्या प्रश्नाशी नसतोच. तसे तर आहेच पण उगाच "राष्ट्रासाठी त्याग", "सुवर्णमयी भूतकाळ", "हिंदूशक्ती" असले शब्दप्रयोग वापरून स्वतःच्या एककल्ली कल्पनांना कायम glorify करत असतात ही लोकं.

संघावर आणि संघिष्टांवर टिका त्यामुळे. लोकशाही असलेल्या भारताचा नागरिक म्हणून मला संघावर टिका करण्याचा पूर्ण हक्क आहे. आणि ओढून ताणून हे तुमचे मत असेल, ह्या BB वर संघाला कुणी आणले, हे तुम्ही चर्चा सुरवातीपासून वाचली तर कळेलच. :-)


Laalbhai
Tuesday, November 21, 2006 - 2:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी तर म्हणतो त्या अतिरेक्यान्ना आधीच गोळीने उडवायला पाहिजे होते,

>>>>

ह्याला पाठिंबा आहेच हो. ह्या BB च्या सुरवातेचे चौथे की पाचवे पोस्ट वाचलेत तर मीही हेच म्हणालो होतो.

पण कळीचा प्रश्न असा आहे की "अतिरेकी" आणि सामान्य, अनभिज्ञ नागरिक ह्यांच्यात फरक करणे इतके सोपे आहे का? अतिरेकी छातीवर पाटी घेऊन हिंडतात का, की मी अतिरेकी आहे?

अर्थात, "संपूर्ण समाज" राष्ट्रद्रोही असा समज असेल तर बोलणे खुंटले.


Laalbhai
Tuesday, November 21, 2006 - 3:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अट एकच पुर्वग्रहदुषितपणाचा त्याग.

ही सबगोलंकार अट आहे. चीत मै जीता पट तू हारा!



मी संघावर "काहीही" टिका केली तरी ती पूर्वग्रहदुषितच असणार आहे, तुमच्या दृष्टीने. :-)

मला कोणत्याही शब्दाचे त्याच्या मूळ स्वरूपात वावडे नाही! तो शब्द कोणता आविर्भाव घेऊन येतो, त्यावरून त्या शब्दाविषयी माझ्या मनात प्रतिक्रीया उमटतात. राष्ट्र आणि हिंदुत्व हे शब्दही असेच आहेत.

मला संघाची कावीळ नाही. I enjoy critisizing them! देशात फार काही उत्पात माजवण्याची ताकदच मुळात त्यांच्यात नाही. फार तर फार डेंग्यू किंवा चिकनगुनिया! योग्य उपचारांनी हे रोग बरे होतात. दुर्लक्ष केले तर माणूस मरतो.

मुळात मला त्यांच्याविषयी पराकोटीचा संताप वगैरे नाही त्यामुळे "कम्युनिस्ट दहशतवाद" असले संघासाठीचे BB काढण्याची माझी इच्छा नाही. पण जिथे जिथे संघाचे फ़ुकाचे समर्थन करत तुम्ही हिंदूत्वचा अजेंडा पुढे चालवाल तिथे तिथे मी तुम्हाला विरोध करीन, हेही ध्यानात असू द्या.


Laalbhai
Tuesday, November 21, 2006 - 3:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काश्मिर मधे दुर्गम ठिकाणी असा काही बर्फ़ आणी वादळे येतात कि तिकडे रहाणे कठीण आहे, ईलेक्त्रिक चे पोल उभारले तरी पुढच्या वादळात ते पडतातच त्यामुळे कडक हिवाळ्यात तिथे वस्ति नसते. त्यामुळे तिकडे सुविधा तश्या पण निर्माण करता येत नाहीत.

>>>

युरोप अमेरिकेत काही ठिकाणी यापेक्षाही भीषण परिस्थिती आहे. चीनला तिबेट हवे होते. तिथल्या भागावर त्यांना कायमस्वरूपी सत्ता प्रस्थापित करायची होती त्यासाठी त्यांनी तो भाग आधी जिंकून तर घेतलाच पण नंतर अतिशय दुर्गम भागात सोयी सुविधा केल्या आहेत. अतिशय उंचावरची जगातली पहिली रैल्वे तिबेटमधे चीनने केली आहे.

सियाचीन मधे अतिशय प्रतिकूल परिस्थितीत जवान लढतात.

तुम्ही नैसर्गिक परिस्थितीची कसली कारणे देता? मुळात कोणत्याही राजकिय पक्षाकडे काश्मिर साठी काही करण्याची इच्छा नाही. पाकिस्तानप्रमाणेच भारतातही तो जनमत आपल्या बाजुने ठेवण्याचा मुद्दा झाला आहे.


मग तुम्ही दहशतवादाविरुद्ध जनसमर्थन का नाही निर्माण करत

>>>>>>

I do not look at any political party to create people mind set against terrorism. They can not do much about it.

It is we - common people - have to stand against any descrimination and work for unity.

Instead, I see that people are happy in blaming entire socity.

व्यक्तीगत मी काय करतो तर ह्या specific प्रश्नासाठी फारसे काही करणे जमण्याइतपत वेळ नाही. हातात घेतलेली बरीच कामे पूर्ण करायची आहेत. पण त्याविषयी खंत असली तरी मी कोणत्याही राजकिय पक्षाकडे पहाणार नाही. निवडून येण्याची गणिते प्रत्येक पक्षाला जपावी लागतात. अगदी BJP ही ह्यापेक्षा वेगळे काही करत नाहीये!

पण एक सामान्य माणूस म्हणून मी इतके करू शकतो की धर्माच्या, जातीच्या नावावर भेद पसरवणे मी टाळू शकतो. जिथे जिथे संधी मिळेल त्याचा वापर भेदासाठी करण्याऐवजी जोडण्यासाठी करतो. आणि मुख्य म्हणजे भेदमूलक विचारांचा, सर्व प्रकारची टिका सोसूनही, विरोध करतो. सध्या मी माझ्या पातळीवर इतकेच करू शकतो. बाकी ज्या समाजात मी काम करतो तिथे "२ वेळची भूक" यापेक्षा बाकी काहीही प्रलोभने नाहीत. तेंव्हा तिथे हे प्रश्नच गैरलागू आहेत.


Chyayla
Tuesday, November 21, 2006 - 1:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

१)लालभाई, तुम्ही आता वाद वाढवता आहात, तुमची गाडी आता सन्घावरुन घसरुन आता भाजपा कडे चालली आहे, मला एका राजकिय पक्षाबद्दल काही जास्त बोलायचे नाही. पण तुम्ही जो एकान्गीपणे एकाचे दोष दाखवण्याचा प्रयत्न केला त्याला उत्तर मिळणारच.

२)ह्या BB वर सन्घ मी प्रथम काढला नाही, सामुवै आणी माझी पण एक पोस्ट आहे ज्यामधे जेन्व्हा मुद्दे सम्पले तेन्व्हा सन्घ द्वेशाचे फ़ुत्कार बाहेर पडतात ही टिप्पणी केली आहे, म्हणजे आधी कोणी ईथे स्वता:चा द्वेषाचा कावीळचा रोग दाखवला हे स्पष्ट आहे, तो रोग उतरावायला मलापण सन्घाबद्दल बोलणे क्रमप्राप्त होते, तेन्व्हा विरोधकान्ना गप्प बसावे लागले त्यानन्तर किती वेळाने तुम्ही या BB वर येउन वाद घालता आहात. व सहन न होउन सन्घाचा प्रचार करतोय असे तुम्ही म्हणालात त्यावरही मी हेच म्हणालो सन्घाच्या प्रचारापेक्षा मी सन्घाविरुद्धच्या अपप्रचाराला उत्तरे दिलीत. या BB वर पुन्हा एकदा तुम्हीच विशय भरकटवता आहात.

३) तुमच्याच शब्दात कॉन्ग्रेस आणी डावे यान्च्या सत्तेला बरेच पातळ पाणी चढवले. ह्या दोघान्ची नौटन्की म्हणजे एक महान करमणुकच आहे, कॉन्ग्रेसला पण जनसमर्थन नाही मग करता काय... अडला हरी म्हणुन गाढवाचे पाय धरी. डाव्याची स्थिती तर फ़ारच केविलवाणी आहे तोन्ड दाबुन बुक्क्यान्चा मार सहन करावा लागतोय बिचार्यान्ना, आम आदमीच्या पक्षाने आम आदमीला महागाई चा नजराणा दिला, डाव्यान्च्या नावावर टिच्चुन, खाजगीकरण, अमेरिका करार सगळे प्रकार करताहेत. बिचार्यान्ची फ़रफ़ट हा देश पहात आहे, मग करायचे काय मी मारल्यासारखे करतो तु रडल्या सारखे कर ही नौटन्की म्हणजे देशवासियान्ना बेवकुफ़ बनवण्याचा प्रयत्न. त्यासाठी सम्प, काय, समन्वय बैठकीवर बहिष्कार काय सगळे करुन झाले. पण फ़र्फ़ट काही थाम्बली नाही कारण स्पष्ट आहे, भीतीचे राजकारण पाठिम्बा काढला तर मग भा.ज.पा. चे राज्य येणार मग झक मारुन पाठिम्बा द्यावाच लागेल. कॉन्ग्रेसला पण हे कळाले की डावे म्हणजे फ़क्त भुन्कणारे कुत्रे आहे.

४)तुमच्या त्या लोकशाही हक्कामुळेच मी पण एक नागरिक म्हणुन डाव्यान्वर टिका करु शकतो तुम्हाला एकट्याला तो हक्क नाही. तुमच्या सगळ्या तत्सम आरोपाचा आधीच समाचार घेतला आहे. मला या BB वर परत तेच उगाळायचे नाही. आणी माझी आधीची एक पोस्ट जरुर वाचा त्यात मी स्पष्ट केले आहे तुम्ही माझे विरोधक आहात शत्रु नव्हे, शत्रुची आवश्यकता तुम्हाला आही. कम्युनिस्टान्ना सन्घर्ष करायला शत्रुतर पाहिजे ना.

५) मला संघाची कावीळ नाही.( I enjoy critisizing them! ) देशात फार काही उत्पात माजवण्याची ताकदच मुळात त्यांच्यात नाही. फार तर फार डेंग्यू किंवा चिकनगुनिया! योग्य उपचारांनी हे रोग बरे होतात. दुर्लक्ष केले तर माणूस मरतो.

मग करा ना दुर्लक्ष कशाला काढता प्रत्येक वेळी सन्घद्वेशाचे फ़ुत्कार. ते आपले कार्य निमुटपणे करताहेत तुम्ही ही करा एवढे घाबरता कशाला?, ताकद नाही तर.

६) सामान्य नागरिकाबद्दल मी बोललो नाही, फ़क्त अतिरेक्यान्बद्दल बोललो, जे अतिरेकी आहेत म्हणुन स्पष्ट आहे त्याना उडवायला म्हटले होते, तुम्हाला मुळात अतिरेक्यानाच सहानुभुती सामान्य माणुस तो काय हिन्दु त्याच्या रक्ताची काय किम्मत हो तुम्हाला, हजारो लोक मरोत पण एकही अतिरेकी मरु नये म्हणुन तुमचा टाहो. कारण स्पष्ट आहे तुम्ही अतिरेक्यान्ना पण धर्म आहे असे मानता (धर्म ही अफ़ुची गोळी ना हे तुमचेच तत्व) आणी तुमच्या दुर्दैवाने प्रत्येक अतिरेकी मुस्लिम निघतो, म्हणुन पोटा ला सुद्धा विरोध.

७)निवडुन येण्याच्या प्रत्येक पक्षाच्या गणिताबद्दल तुम्ही बोलले ते मला मान्य आहे. म्हणुनच मला या वादात पडायचे नव्हते.

I do not look at any political party to create people mind set against terrorism. They can not do much about it. . हा तुमचा निराशावाद बाकी राजकारणातुन समाजकारण करायचे तुमच्या कम्युनिस्टान्चेच तत्व ते अगदीच फ़ोल ठरत आहे म्हणुन तुम्हाला निराशा येणे क्रमप्राप्त आहे.
करायला बरेच करु शकतो, सामन्य नागरिक म्हणुन काय करता येइल त्याचाच विचार ईथे सुरु आहे, करणारे करतही आहेत, तुम्ही फ़क्त Constructive कामाला विरोध करण्याचे कार्य तेवढे अखन्डपणे चालु ठेवा तेवढच तुम्ही करु शकता.
एक निराश व्यक्ति आणी पराभुत विचारसरणीतुन अजुन काय निघणार?

८) पण एक सामान्य माणूस म्हणून मी इतके करू शकतो की धर्माच्या, जातीच्या नावावर भेद पसरवणे मी टाळू शकतो...

पण ह्या देशात जे खरोखर जाती आणी धर्माच्या नावावर भेद पसरवत आहेत त्यानीच असे म्हणणे म्हणजे ही सगळ्यात मोठी थट्टा पाहिली मी या BB वर, असली झापडे लावुन तुम्ही फ़िराल तर आम्ही त्याला काही करु शकत नाही, तुमच्या आधीच माझी आणी केदार यान्ची पोस्ट वाचण्याची तसदी घ्यावी.

९) याउपरही तुम्हाला वाद वाढवायची खुम खुमी असेल तर त्यापुर्वी मायबोलिकरान्च्या अपेक्षा लक्षात घ्याव्या, तुमचे विचार म्हणजे धुतल्या तान्दळासारखे स्वछ नाहीत प्रत्येक ठिकाणी घाण दिसतेच त्यामुळे उत्तरे मिळणारच. प्रत्येक वेळेस कागाळी तुम्ही केली आहे त्यावर उत्तरे मिळाली म्हणुन तुमचा जळफ़ळाट समजु शकतो.



Vijaykulkarni
Tuesday, November 21, 2006 - 5:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ज्या समाजात मी काम करतो तिथे "२ वेळची भूक" यापेक्षा बाकी काहीही प्रलोभने नाहीत. तेंव्हा तिथे हे प्रश्नच गैरलागू आहेत

अगदी खरे.

मागे अरुन्धती रॉय म्हणाल्या होत्या की काश्मीर ही समस्या नाहीच मुळी.
ते तर उत्तर आहे दोन्ही देशान्च्या सरकारानी आपापल्या नागरीकान्ना पेटविण्यासाठी शोधलेले.
काश्मीर चा बागुलबुवा दाखवीला की लोक भाकरी विशयी अडचणीचे प्रश्न विचारत नाहीत.




Kedarjoshi
Tuesday, November 21, 2006 - 7:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ज्या समाजात मी काम करतो तिथे "२ वेळची भूक" यापेक्षा बाकी काहीही प्रलोभने नाहीत. तेंव्हा तिथे हे प्रश्नच गैरलागू आहेत >>

आणी तेच खरे मुळ पण आहे लालभाई. ईथेच धर्माची गोळी लागु पडते. मग ती मुस्लीम असो हिंदु.

मागे अरुन्धती रॉय म्हणाल्या होत्या की काश्मीर ही समस्या नाहीच मुळी.
ते तर उत्तर आहे दोन्ही देशान्च्या सरकारानी आपापल्या नागरीकान्ना पेटविण्यासाठी शोधलेले.

बहुतेक अरुंधती रॉय ला त्या प्रश्नाचे गांभीर्य कळले नाही. हा प्रश्न भारताने निर्मान केलेला नाही तर तो भारतावर लादला गेला आहे.


काश्मीर चा बागुलबुवा दाखवीला की लोक भाकरी विशयी अडचणीचे प्रश्न विचारत नाहीत

कुलकर्णी काश्मीर प्रश्नाचा बागुलबुवा भारताच्या ईतर कुठल्याही राज्यात दाखविला जात नाही. तरीही तिथे प्रॉब्लेमस आहेतच. भारत सरकार कधीही असा प्रचार करत नाही की काश्मीर मध्ये सैन्य न्यायचे म्हणुन हरियानात पैसे दिले जानार नाहीत.

गरिबी, भुक आणी काश्मीर यांचा काहीही संबध नाही. ( फक्त काश्मीर राज्यतच तो संबध आहे)गरीबीचा संबध फक्त आपल्या सरकार, आपले लोक नी आपल्या माणसिकतेशी आहे.


Peshawa
Tuesday, November 21, 2006 - 9:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

kedar ,

अरुन्धती रॉय म्हणाल्या मग अता पुधे काय बोलयचे नस्ते रे! अरुंधति रोय, मार्क्स, सरसंघचालक, ठाकरे, झालेच तर बाब महराज, चोम्स्की, सोनिया, मेधा पाटकर... मेंढर हाकायला ह्यांच्याकडून शिकाव आणि मेण्ढर व्हायला ह्म्म्म!

लालभाइ::: तुमची दसरा दिवळि असेल सध्या! तुमचा "चपटा राम" भेट देतोय घरी कोयते वैगेरे लावलेत की नाही. एक तोंडी लावायला निदर्शन नाही... "चपट्या रामाच्या" सन्मानार्थ साधा एक बंद नाही? कसली धमकी नाही! काय हे? शो. ना. हो.! sadhya best behaviour वर का सगळे लाले किति खोके खोके मिळणार पार्टिला?




Laalbhai
Wednesday, November 22, 2006 - 2:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

च्यायला.

१. भाजपा आणि संघ वेगळे आहेत. त्यांचे अजेंडे वेगळे आहेत. हे दावे फोल आहेत हो. जाऊ द्या.

२. संघाचा विषय या BB वर मी ही प्रथम काढला नव्हता. इस्लामी दहशतवादावर "संघप्रणित राष्ट्रवाद" हा एकमेव उतारा आहे, अशा अर्थाचे लेखन तुम्ही आणि इतरांनी अनेकवेळा केलेले आहे.

३. .....

४. तुम्ही कुणावरही टिका करा. माझा आक्षेप कधीच नाही. नव्हता.

५. दुर्लक्ष केले तर माणूस मरतो, त्यामुळे लक्ष द्यावेच लागते.

६. ...

७. well माझे विचार वेगळे आहेत. सुधारणेची प्रक्रिया "आधी पाया मग कळस" अशी असावी अशी वाटते. त्यामुळे राजकारणाची पातळी सुधारायची असेल तर आधी समाजात काही मूलभूत बदल घडवले पाहिजेत. जोवर समाज सुजाण होत नाही तोवर संधीसाधू राजकारणी त्याचा गैरफायदा घेणारच. त्यामुळी समाज सुधारण्याची प्रक्रिया जास्त महत्वची आहे, असे मला वाटते. पाया कच्चा असताना कळसाची डागडुजी करण्यत अर्थ नाही.

अर्थात, पुन्हा मग मी काय करतो हा तुमचा प्रश्न असेलच. तर महत्वचे म्हणजे समाजात दुही माजवणार्‍या लोकांचा शक्य त्या सर्व मार्गाने विरोध करतो. दुसरे कमी महत्वचे म्हणजे काही गावांची पूर्ण जबाबदारी घेऊन तिथले local प्रश्न सोडवणे आणि तिथल्या मुलांना शाळा शिकवणे, शिक्षणाची गोडी लावणे असे रिकामटेकडे उद्योग करतो. सुदैवाने, मनासारखी नोकरी असल्यान कामात पाहिजे तशी adjustment करता येते. आणि सगळ्यात महत्वचे म्हणजे मशिदी पाडण्याचा constructive कामाला मी विरोध करतो. त्यातही आजकाल बराच वेळ जातो. :-)

८. ...

बाकी काही म्हणणे नाही, पण संघाच्या चौकटीत काम करूनही संवेदनशीलता जपणारे आणि बुद्धीची कवाडे उघडे ठेवणारे केदार हे एक सद्गृहस्थ आहेत. (ह्या त्यांच्या कर्तृत्वबद्दल संघातून त्यांची हकालपट्टी कशी झाली नाही, याचे मात्र मला आश्चर्य वाटते. :-) केदार -- फक्त तुम्ही दिवे घ्या हो. :-))

९. ...


Laalbhai
Wednesday, November 22, 2006 - 3:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ईथेच धर्माची गोळी लागु पडते.

>>>
Exactly!
दहशतवादाचा मोठ्या पटलावर विचार केला तर जगातली हिंसा सर्वतोपरी थांबवणे, जगातली तिरस्काराची भावना संपवणे next to impossible आहे. म्हणजे हे सत्य स्विकारायलाच हवे की कुठे ना कुठे तरी "खदखदता असंतोष" "द्वेश" असणारच आणि त्याचे पर्यावसन हिंसेत होणारच.

मग आपण काय करू शकतो?

तर ह्या प्रवृत्ती कडे ओढले जाण्याचे सामान्यांचे मार्ग विधायक रितीने बंद करण्याचा प्रयत्न करू शकतो.

आता हा विषय "इस्लामी दहशतवाद". ह्या संदर्भात जागतिक परिस्थिती विचारात घेण्यापेक्षा देशातली परिस्थिती विचारात घेणे महत्वचे आहे. जागतिक इस्लामी दहशतवाद आणि भारतीय इस्लामी अतिरेकी यांच्या काही फरक आहेत. त्यांच्यात नाते असले तरी भारतीय मुस्लिमांच्या isolated black box चे बाकीच्यांकडून exploitation होते आहे, असे वाटते.

भारतीय मुस्लिम समाजाची परिस्थिती समजावून घेतली पाहिजे.

१. एक फार मोठा फरक हिंदू / ख्रिश्चन आणि मुस्लिम समाजात ( to be specific कुटुंबात) असतो की मुस्लिम समाजात स्त्रीयांना कसलेही स्वातंत्र्य नसते. एका पेक्षा जास्त लग्न, घरातूनच होणारे लैंगिक शोषण, अशिक्षितता, धर्मगुरुंचा पगडा ह्या सगळ्यामुळे स्त्रिया अधिक अधिक गांजत जातात आणि घराला वळण, शिस्त लावण्याची त्यांची सगळी ताकद संपुष्टात येते.

बरे, आपण मागासलेले आहोत ही परिस्थिती समजण्या इतपत बाहेरच्या समाजाशी त्यांचा संबंधही नसतो कारण शिक्षण नाही, नोकरी नाही त्यामुळे समाजात वावरण्याचे स्वातंत्र्य नाही. त्यामुळे confidence नाही.

(अर्थात, इतर समाजात स्त्रियांची परिस्थिती समाधानकारक आहे, असे नाही. पण तुलनाच करायची तर मुस्लिम स्त्रिया जास्त मागासलेल्या आहेत.)

म्हणून मुस्लिम स्त्रियांच्या विकासासाठी जास्तीत जास्त energy वपरली पाहिजे. पण तिथेही पुरुषप्रधानतेची एक मोठी भींत आहे. मला वाटते महिला विधेयक तातडीने पास केले पाहिजे. मुस्लिम महिलांना दुष्टचक्रातून बाहेर काढणे, हे मोठेच challenge आहे.

२. एकंदरितच शिक्षणाची पातळी मुस्लिम समाजात वाढवणे आवश्यक आहे.
हे शिक्षण कटाक्षाने सार्वजनिक शाळांमधून द्यायला हवे. मदरशातले शिक्षण बंद केले पाहिजे. मदरशांचे समर्थन करताना मुस्लिम धर्मगुरु म्हणतात की गरिबांना शिक्षण देण्याची मदत मदरसे करतात. तर तसे काही प्रमाणात असेलही. पण मग प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण स्वस्त आणि सहज उपलब्ध करुन देणे हे समाजाचे प्रमुख कर्तव्य आहे. (अर्थात, हे पर्याय सहज उपलब्ध असतानाही मदरसे चालतात ही वस्तुस्थिती आहे. )

३. मुस्लिम धर्मगुरुंचा पगडा मुस्लिम समाजावरून कमी केला पाहिजे. फतवे काढणे वगैरे आचरट चाळे बंद केले पाहिजेत. त्यासाठी मुस्लिम personal law ची व्याप्ती कमी करून सार्वजनिक न्यायालयाशी त्यांची ओलख वाढवली पाहिजे. (इथे पुन्हा समान नागरी कायद्याचे समर्थन काही जण करतील पण तो मुख्य विषय नाही. समान नागरी कायद्याचा basic आराखडाही अजुन तयार नाही. "सर्व नागरिक सारख्या पातळीवर" हे एक वाक्य म्हणजे कायदा असू शकत नाही. त्यामुळे तो मुद्दा येथे लागू होऊ शकत नाही.)

मुस्लिमांना main stream मधे आणणे हे मोठे challenge आहे. पण आंदोलने करून, निषेध करून किंवा आदेश देऊन कुणी main stream मधे येत नाही. ही एक प्रक्रिया आहे. मुस्लिम मोहल्ले, मुस्लिम मदरसे, मुसिल कुटुंबव्यवस्था ह्या सगळ्यामुळेच मुस्लिम समाज isolated black box मधे जाऊन बसलेला आहे. धक्का तंत्राने हा black box उघडण्याऐवजी मोडण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे वरील काही उपायांनी बहुतांश मुस्लिम समाज कालांतराने main stream मधे येऊ शकतो.

हे उपाय योजणेही खुप अवघड आहे. पण मुस्लिमांमधे काही क्षीण सुधारणावादी प्रवाह आहेत, त्यांना जोपासण्याची गरज आहे. वारंवार संपूर्ण समाजाला राष्ट्रद्रोही, देशाचे शत्रू म्हणून हिणवणार्‍यांना तत्काळ गजाआड केले पाहिजे.

ही सगळी प्रक्रिया वेळखाऊ आहे. पण सुरु झाली पाहिजे. तोवर कडक धोरण आणि दोशींना ताबडतोब शिक्षा हे चालूच ठेवले पाहिजे. १९९३ च्या मुंबई बॉंबस्फोटातल्या आरोपींना शिक्षा व्यायला १३ / १४ वर्षे लागावीत, हे वाईट असले तरी शिक्षा होणार हेही नसे थोडके.

मुख्यतः सुशिक्षित समाजाने संयम ठेवणे फार महत्वचे आहे. कुणीही मुर्ख सुदर्शन सार्वजनिक व्यासपीठावरून काहीही म्हणाला तरी समाजाने त्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे. मायबोलीच्या भाषेत, असल्या माकडांना अनुल्लेखाने मारले पाहिजे. :-)

कोणत्याही सामाजिक बदलाची प्रक्रिया ही संथ असते. मुस्लिमांना मुख्य प्रवाहात आणणे हेही एक वेळखाऊ काम आहे. पण इतकी वर्षे दुर्लक्ष केले किमान आता तरी काही तरी केले पाहिजे, असे वाटते. किमान आपण काही करू शकत नसू तर स्वतःची विद्वेशकारी भाषणे आणि विचार ह्यांनातरी आळा घातला पाहिजे.


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators