Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through November 21, 2006

Hitguj » Views and Comments » मायबोली-हितगुज » Multiple IDs » Archive through November 21, 2006 « Previous Next »

Zakki
Monday, November 20, 2006 - 12:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

च्याऽयला! (म्हणजे तो लिहिणारा नव्हे, पुण्यातील एक मवाळ शिवी!)
फरक काय पडतो ID एकच आहे की डुप्लिकेट आहे, की खरी आहे, की 'गणेश' नाव घेऊन कुणि मुसलमान लिहितो आहे! काय लिहीले आहे ते वाचा नि वाटल्यास त्याला 'अनुल्लेखाने मारा' किंवा शक्य असल्यास तुमच्या उच्च 'अक्कलहुषारीने, नि सभ्यतेने', किंवा 'भारीच बाई विनोदी' असे उत्तर देता आले तर द्या. लिंबूटिंबू म्हणतात त्याप्रमाणे ते खरे कोण आहेत ते फारच थोड्या लोकांना माहीत आहे, तरी ते जे लिहीतात, चित्रे काढतात त्याला उत्तम प्रतिसाद मिळतो, त्यांच्याशी संवाद साधण्यात मजा येते, हेच महत्वाचे नाही का इथे? या मायबोलीवर येऊन कुणाची लग्ने जमली असली तरी हा त्या मायबोलीचा मुख्य उद्देश नाही. फक्त चर्चा, लेखनविलास, माहिती, मनोरंजन, जगभरातील सर्वांशी संवाद साधणे या साठी इथे यायचे, नाहीतर मी कसे जुन्नर किंवा वेंगुर्ले (ही गावांची नावे तरी खरी आहेत का fake ID आहेत, कुणास ठाउक) इथल्या लोकांशी संवाद साधले असते?


Ajjuka
Monday, November 20, 2006 - 3:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझं नाव घेऊन लालभाई सरळ सरळ जो आरोप करू पहाताहेत तो कुठल्या बळावर? आणि आॅडमिन ने सांगूनही तुमचा संशय दूर होत नाही. जर तो आयडी कोण आहे हे आम्हाला खात्रीशीररीत्या(गोपनीय माहिती मिळवून) समजलेय हा तुमचा आरोप असेल तर ही गोपनीय माहिती आम्हाला मिळाली आहे हे तुम्ही कुठल्या गोपनीय पुराव्यावरून ठरवलेत? हा आमच्या privacy चा भंग नाही का?

हो माझे म्हणणे आहे की हे सगळे आयडी एका 'क्ष' व्यक्तीचे आहेत. पण हे म्हणल्याने मी कुठेतरी मायबोलीवरच्या गोपनीय सुत्रांमधून मी ही माहिती काढली असा अर्थ कसा काय होतो? आणि असा आरोप धडधडईतपणे करताना मग तुम्हीही ही माहिती कुठून काढलीत हे मी विचारू का?

Intuition (स्पे.. चू.. भू) नावाची गोष्ट असते ती तुम्हाला मान्य नाही का? तुम्हाला नाही समजल म्हणजे आपल्याकडे गोष्टी नसल्या तर अस्तित्वातच नाहीत अस म्हणणं आहे का तुमचं?

आज मायबोलीवर मी ७ वर्षे तरी सभासद आहे. ज्या व्यक्तीवर संशय आहे ती व्यक्ती इथे या नावाने ३ ४ व आधीच्या नावाने २ वर्षे तरी होती. एवढ्या अवधीत कोणाच्या बोलण्याचा pattern काय असेल हे कुणालाही समजेल.. अगदी बिन्डोक माणसाला सुद्धा. त्यातून ती व्यक्ती irritating आणि खोटा आव आणणारी असेल तर नक्कीच. एवढ आक्षेपार्ह काय वाटत तुम्हाला यात? मार्क्स ने sixth sense आणि मानसशास्त्रावर बंदी घातलीये का?

ज्या BB वरच्या पोस्टबद्दल तुम्ही एवढ्या पोटतिडीकीने बोलताय त्याच BB वरचे त्याच व्यक्तीचे पहिले पोस्ट वाचण्याची तसदी घेतलीत का? आता मी असेच वागणार तसेच वागणार इत्यादी...?

असो..


Admin
Monday, November 20, 2006 - 4:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नेमस्तक, तुम्हाला वेळ झाला की कृपया इथला मजकूर v&C वर duplicate id च्या BB वर हलवून टाका.

Ajjuka
Monday, November 20, 2006 - 4:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

|तो केवळ अक्कलहुशारीच्या जोरावर आहे का, याची जरा शंकाच येते.|

स्वतःवरून दुसर्‍याच्या अकलेच्या आवाक्याची कल्पना करू नये. अक्कलहुशारी इत्यादी गोष्टी बोलून तुम्हीच वैयक्तिक पातळीवर उतरलात म्हणून हे उत्तर. यावर दिवे मुळीच नाहीत.


Dineshvs
Monday, November 20, 2006 - 5:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रिय मित्रा,
हो अजुन तुला मित्रच म्हणावेसे वाटतेय. कसा आहेस ?
खरे तर तुझा राग यायला हवाय. आलाहि होता, पण तरिहि
कुठलेतरी ॠणानुबंध अजुन शाबुत आहेत, म्हणुन तुला आवाहन करतोय.
तुझे खरे नाव मला माहित आहे, पण सध्या तुला काय म्हणु, याचाच प्रश्ण पडलाय. पण मला वाटतेय, ईतका ईशारा तुझ्यासाठी पुरेसा आहे.
मी म्हणालो ना कि तुझा राग आला होता, पण त्याची जागा आता अनुकंपेने घेतलीय.
मला वाटतेय, ईथल्या काहि घटनानी तुला वैफल्य आलेय, आणि त्यातुन तु अनेक बुरखे घेतलेस. पण तुझे म्हणणे न मांडता येण्याईतका भ्याड आहेस तु ?
कुठल्याहि सार्वजनिक व्यासपीठावर सगळे तुझ्याच मताप्रमाणे घडेल हे अशक्यच आहे, नाही का ? त्यामुळे तुला न आवडलेल्या गोष्टींकडे तु सहज काणाडोळा करु शकला असतास.
आणि समजा तुला काहि गोष्टी पटल्या नसतील, तर तु चर्चा करु शकला असतास. आपले मुद्दे जर योग्य असतील, तर ते योग्य रितीने मांडताहि आले पाहिजेत. आणि विरोधकांचे मुद्दे, पुर्णपणे तर्काधिष्टीत प्रतिवादाने खंडीतहि करता आले पाहिजेत. वेळप्रसंगी जर विरोधकानी एखादा मुद्दा अगदी निर्विवादपणे सिद्ध केला तर तो खिलाडुपणे मान्यहि करता आला पाहिजे.
पण निषेधाचा तु स्वीकारलेला मार्ग अगदी चुकीचा आहे. तु जितका आव आणतोस तितका निरागस तु नक्कीच नाहीस आणि जितका समजतोस तितका बनेलहि नाहीस. तुझे बुरखे अगदी पहिल्या क्षणापासुनच फाडले गेले होते. अरे मांजरीने डोळे मिटले म्हणुन काय झाले, जगाने तर मिटलेले नसतात ना ?
ईथल्या सभासदातली या क्षेत्रातल्या शिक्षणाची आणि अनुभवाची सरासरी उच्च आहे, हे तरी लक्षात घ्यायला हवे होतेस. म्हणुन तुझे प्रयत्न अगदीच केविलवाणे ठरले.
मला आणखी एक शक्यता वाटतेय कि तु मानसिकदृष्ट्या खचला असावास, त्यासाठी काहि वैयक्तिक आयुष्यातले अनुभव कारणीभुत असतील. ते तुला माहित असतील किंवा नसतीलहि. कदाचित तुझा एकटेपणा तुला त्रासदायक ठरला असेल.
अरे मग त्यासाठी तुला ईथे मुक्त व्यासपिठ आहेच कि. अगदी मनापासुन, कुठलाहि आडपडदा न ठेवता तुझे मन मोकळे केलेस तर तुला आमच्याकडुन अपेक्षित असलेली सहानुभुति ( सहानुभुति म्हणजे अनुकंपा नव्हे, तर सह अधिक अनुभुति ) नक्कीच मिळेल. तुझ्या वर्तनाने दुखावलेल्या ईतरांबद्दल मी ग्वाहि देऊ शकणार नाही, पण मी तरी तुला नक्कीच मदत करेन.
माझा सल्ला परिपुर्ण वा व्यावसायिक नसेलहि, पण तो प्रामाणिक असेल. अरे मायबोलिच्या कर्जातुन अंशतः मुक्त व्हायची अशी कुठलीच संधी मी सोडत नाही.
ईथे मी अजिबात आत्मप्रौढी करत नाही. कारण मला माहित आहे, कि आपल्या समस्येवरचे मार्ग आपल्यालाच शोधायचे असतात. पण एखादा हात, निदान दिशा तरी दाखवु शकतोच ना ?
मी तुला उघड आवाहन करतोय. मानसिक विकृतिच्या दिशेने तुझी होणारी वाटचाल तुच थांबवु शकतोस.
मला तुझ्या खर्‍या नावाने प्रतिसाद दे.

आपलाच,

दिनेश



Laalbhai
Tuesday, November 21, 2006 - 2:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Well Ajjuka.
आरोप करणे आणि शंका विचारणे ह्यातला फरक आपणास माहिती नसावा. आणि माझ्या ह्या विषयावरच्या लिखाणात कुठेही "पोटतिडीक" नाही. मी आणि admin शांतपणे काही चर्चा करत होतो. तुमच्या डोक्यातली माझ्याबद्दलची तिडीक मात्र पोटातून आलेली आहे, असे जाणवते! :-)

माझे सगळे म्हणणे, त्यावरचे लिंबूटिंबू यांचे उत्तर आणि त्याला admin चे उत्तर, हे सगळे तुम्ही शांतपणे वाचले असते तर तुम्ही इतक्या करमणूकप्रधान (म्हणजे विदुषकी!) झाला नसतात.

असो. माझ्याकडून मी हा विनाकारणचा वाद संपवत आहे. तुम्हाला लोकांची करमणूक करण्याचा अधिकार आहे.


Shrashreecool
Tuesday, November 21, 2006 - 5:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

(म्हणजे विदुषकी!) >>

लालभाई तुम्हाला 'विदुषी' म्हणायचे असेल बहुतेक.

Lopamudraa
Tuesday, November 21, 2006 - 9:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुंदर दिनेशदा.. माझेही तुमच्या सारखेच आवाहन आहे.. खरच विकृतीच्या दिशेने होणारी वाटाचाल वेळीच थांबायला हवी..
मीही मागचे सगळे विसरुन पुर्ण सहकार्य करीन..!!!
माझाही एक मोठ्या बहिणीचा हात परीपुर्ण नाही तरी मदतीचा नक्किच..


Ajjuka
Tuesday, November 21, 2006 - 10:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पितळ उघड पडल्यावर मी असे म्हणालोच नव्हतो!!
शंका असेल तर ऍडमिन ला मेल करून विचारता आली असती. उघडपणे बडबडायची गरज नाही. तसेच तुम्ही शंकाच फक्त घेतली असतीत तर तुम्हाला सांगितल्यावर तरी खात्री पटायला हवी होती ती पटली नाही. तसेच जर तुम्हाला फक्त शंका होती तर मग हे कसे काय समजते इथपर्यंत बोलून थांबला असतात. privacy चा भंग इत्यादी गोष्टी बोलला नसतात. तेव्हा उगाच शंका, आरोप यातला फरक इत्यादी बोलून I am oh so right! असा देखावा निर्माण करू नका.

आणि विनाकारण वाद तुम्ही सुरू केलात, खोटेनाटे आरोप तुम्ही केलेत आणि अंगावर शेकलं तर वाद थांबवतो म्हणे.

दुसर्‍याच्या अक्कलहुशारी काढून तोंड उघडून खोटे नाटे आरोप करण्याला शांतपणे चर्चा म्हणत नाहीत तेव्हा 'मी चर्चा करत होतो.. इत्यादी वल्गना करू नका..'

करमणूक... ह्म्म! म्हणजे तुम्ही लोकांना काहीही बोलत सुटाल. तेही जाहीरपणे आणि मग त्या व्यक्तीने त्यावर प्रतिक्रिया दिली तर मग लगेच तुम्ही लोकांची करमणूक करताय? दुसर्‍याला विनाकारण त्रास देणं आणि मग आपण मजा बघत बसणं या तुमच्या वृत्तीचं तुम्हाला कौतुक आहे तर..


Shrashreecool
Tuesday, November 21, 2006 - 12:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश, मला खरचं issue वगैरे निर्माण करायचा नाही आहे. फ़क्त एक उदाहरण द्यावेसे वाटते. आमच्या हिंदी मराठी चित्रपटात नायिकेचा पाशवी बलात्कार होतो आणि तो होत असताना भरपुर बघे तिच्या समोर उभे असतात ज्यांचे छान मनोरंजन होत असते. कोर्टात तिला प्रश्न विचारतात बलाक्तार झाला तेंव्हा त्या इसमाचे हात कुठे होते, पाय कुठे होते आणिक बरेच. ती परित्यक्त स्त्रि बोलुच शकत नाही. पण हळुहळु ती समर्थ जीवन जगायला खंबीर होते. क्षणभर का होईना मला वाटलं माझा इथे 'शाब्दीक बलाक्तार झाला आहे'. duplicate ID घेऊन ज्यानी हा अन्याय केला ती व्यक्ती मजेत आहे. तिच्या असण्यानसण्याबद्दल इथे कुणालाच काही वाटतं नाही. शेवटी आरोपी कोण तर जिची अब्रु गेली ती. शासन आणि नियम दोन्हीची हार. असो हे एक फ़क्त उदाहरण आहे. इथले जीवन virtual आहे म्हणून मी सर्वकाही neglect करते. ते गंभीरपणे घेतले तर खरच विकृती निर्माण होईल आयुष्यात. आमच्या इथल्या communication मधे काहीच अर्थ नाही. इथे भरपूर शिकलेले, अनुभवाची श्रीमंती असलेले, चांगल्या घरातून आलेले सभासद असतील. मला भेटलेला समुदाय मात्र कमालीचा दांभिक होता. तुम्हाला इथे प्रेम मिळाले त्याची उन्नती होवो.

Maitreyee
Tuesday, November 21, 2006 - 1:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काहीही काय!! शाब्दिक बलात्कार कसला आलाय! अर्थ कळतोय का तू काय बोलत आहेस त्याचा?? तुझ्याच शब्दात सांगायचे तर तूच कपडे 'परित्यक्त'(!) करून हिंडलास आणि लोक तुला हसले तर त्यांना दोष देतोस??
तू सगळ्याच्या पलिकडे गेला आहेस तरी पण जरा विचार कर.. स्वत च स्वत ला विचार.. इथे खोडसाळ आयडी कमी नाहियेत हे खरे, पण कधीही कुणाशी वाकड्यात न शिरलेले आयडीही तुझ्यावरच का वैतागतात? इतक्या सगळ्यांचा जर तुझ्याशीच वाद वारंवार होतोय तर यात तुझी चूक असण्याची काहीच शक्यता नाही? तुला तुझे जे चौकस प्रश्न वाटतात ते इतरांना irritating वाटतात.. काही वेळा तर मुद्दाम करत आहेस असे वाटते! नाविन्यता या शब्दाअवरून लोकांनी चूक दुरुस्त केली त्यानन्तर लगेच तसेच अजून ४ चुकीचे शब्द कसे आले? black money म्हणजे काय हे तुला खरोखर माहित नव्हते?.. असे कितीतरी issues आहेत.. दिवाळी अंकावरून तू केलेलं आकाद तांडव तर पहिलीतला मुलगा पण करणार नाही असं होतं!
जेव्हा इतके सर्व जण तुला चूक म्हणत आहेत तेव्हा एकदा तरी विचार करायला हवा होतास खरेच माझे चूक असण्याची शक्यता आहे का!! पण ते तू एकदाही मान्य केले नाहीस स्वत शी सुद्धा.. अवघड आहेस खरच..
असो.. बस्स झाले..



Shyamli
Tuesday, November 21, 2006 - 1:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुझ्याच शब्दात सांगायचे तर तूच कपडे 'परित्यक्त'(!) करून हिंडलास आणि लोक तुला हसले तर त्यांना दोष देतोस??>>>>
जर तुझ्याशीच वाद वारंवार होतोय तर यात तुझी चूक असण्याची काहीच शक्यता नाही? तुला तुझे जे चौकस प्रश्न वाटतात ते इतरांना irritating>>>

well said Mt....
आणि वर नैतीकतेच्या गप्पा मरतोय,
नैतीकता कशाशी खातात ते माहिती आहे का


Robeenhood
Tuesday, November 21, 2006 - 1:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

If you get irritated, that means you are playing his game maitreyee. he wants that...


Lopamudraa
Tuesday, November 21, 2006 - 2:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रोबिन्हूड is right ...
मला.. अजुन कुठे कुठे post टाकणे चालु आहे.. जे कधी थांबेल अस वाटत नाही. असो.. जित्याची खोड.. दुसर काय..!!!
माझ्या नावाचा शब्दार्थांच्या bb वर अतीशय घाणेरडा वापर केला.. ही नैतीकता.. श्यामली.. ह्म्म.. पटल तुझं...!!!


Sandu
Tuesday, November 21, 2006 - 2:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्लिझ, थांबवारे हे सगळे. कामातुन थोडी उसंत काढून आम्ही येथे शुध्द करमणुक व्हावी ह्या हेतूने येतो. भांडणे पाहुन खरच खुप वाईट वाटते. please थांबवा...

Zakki
Tuesday, November 21, 2006 - 2:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझा ID 'झक्की'. हे माझे खरे नाव नाही, पण माझा कुठलाहि डुप्लिकेट ID नाही. मी पण गेले पाच सहा वर्षे नियमितपणे मायबोलीवर येत आहे, मला मजा वाटते म्हणून.
शिवाय काही लोक माझे पुष्कळदा 'उथळ नि पांचट' असलेले लिखाणसुद्धा वाचून अत्यंत बुद्धिमान असल्याने, कुठेतरी कशाची तरी तुलना करून ठरवतील की मीच दुसर्‍या ID ने काहीतरी लिहीले. हे शक्य आहे, कारण तसे पुष्कळदा लोक मी काय लिहिले तेच मुद्दे परत मांडतात, किंवा मी कधी कधी आज एक तर उद्या दुसरे असे लिहीतो. कारण माझे मन अत्यंत द्विधा आहे, त्यासाठी मानसोपचार तज्ञाकडे जावे की काय असे वाटण्याइतके.

चर्चा हळू हळू वैयक्तिकतेच्या पातळीवर उतरेल(च). कुणाला शंका नको म्हणून हे सर्व मी आधीच सांगीतले आहे.




Sayonara
Tuesday, November 21, 2006 - 2:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

BTW , मैत्रेयी आणि इतर, shrashreecool हा आयडी 'तो' नसून 'ति'चा आहे.

Paul
Tuesday, November 21, 2006 - 2:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ही मायबोली आहे का मयसभा आहे :-(
ईथे कोण खरा नि कोण खोटा.


Zakki
Tuesday, November 21, 2006 - 4:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बाबारे, ब्रम्ह सत्यं, जगन्मिथ्या!
ज़िंदगी ख्वाब है, ख्वाब मे, झूठ क्या, और भला सचहि क्या!

तर म्हणून, आपले कुटुंब, चरितार्थ, आपले मित्र, नातेवाईक, डॉक्टर, वकील, यांच्या खेरीज बाकी सगळ्या बाबतीत कुठल्याहि गोष्टी मनाला लावून घेऊ नयेत. तो एक मोठ्ठा, सतत चालणारा, जगाचा विनोद आहे असे समजून वागावे. म्हणजे फुकाची भांडणे, वादावादी, मन:स्ताप होत नाही. झाली तर करमणूकच होते, नि त्याच दृष्टीने त्याच्याकडे पहावे!


Dineshvs
Tuesday, November 21, 2006 - 5:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तु मला जेवढं उद्देशुन लिहिलेस त्याला उत्तर देतोय.
बलात्कार झाला ना ? मग ते सिद्ध कर कि. परत परत कपडे बदलुन ईतराना बलात्कार करायला उद्युक्त का करतोस ? बलात्कार झाल्यावर त्या व्यक्तीने स्वतःलाच कमी लेखले, तर समाजहि तसेच करणार. शेणात पाय पडला, कि आपण पाय स्वच्छ धुतो आणि पुढे जातो. परत शेणात पाय पडणार नाही, याची काळजी घेतो. बलात्काराबद्दलहि मला असेच वाटते.
का तुलाहि ईतर कुणावर तरी बलात्कार करायचा आहे ?
असो, तुझ्यात अजुनहि मला प्रांजळपणा दिसत नाही.


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators