|
Laalbhai
| |
| Thursday, June 22, 2006 - 5:26 am: |
| 
|
मला माफ करा मी चुकिचे लिहित असेन तर. केले माफ.. आणखी काय बोलणार? बाकीचे तुम्ही माझा संबंध ज्यांच्याशी जोडला आहेत ते पाहून घेतील. मी केवळ आरक्षणाच्या बाजूची भुमिका घेतली म्हणून तथाकथित आरक्षणविरोधींचा इतका संताप व्हावा, आणि आधी मूडी आणि इतर झाले आता "मुद्दाम" झाले, त्यांना इतरा राग यावा, हे साहजिकच आहे. पण तुमचा राग तुम्ही फक्त माझ्यावरच काढलात तर बरे होईल. उगाच ज्यांचा काडीमात्र संबंध नाही त्यांना का ओढता या वादात? तुम्ही कोण आहात हे विचारण्याची माझी इच्छा नाही. पण कोण त्या विनोद कांबळे कडून तुम्ही दुखावले गेले असल्यास त्याला मी जबाबदार नाही. तेंव्हा आरोप आणि विरोध करा, पण थोडे तारतम्य बाळगले तर आपल्या सगळ्यांच्या प्रिय अशा मायबोलीचा फायदाच होईल. नाही, काल मूडींनी उल्लेख केला की सावनींचे नाव घेऊन, आज तुम्ही विनोद कांबळेंचे नाव घेताय. गंमत आहे. आरक्षणाबद्दल इतकी चीड तुम्हा लोकांच्या मनात भरली असेल असे वाटले नव्हते. कळले, हे बरे झाले... आमचा लढा आता अधिकच तीव्र करायला हवा!!
|
Giriraj
| |
| Thursday, June 22, 2006 - 11:10 am: |
| 
|
ओहो! म्हणजे सुरवात आरक्षणावरून झाली का? इअतका वेळ काही कळायला मार्गच नव्हता! सगळे अशक्या आहात!अजून येऊ द्या!
|
Bee
| |
| Thursday, June 22, 2006 - 11:12 am: |
| 
|
मलाही हे कळले नाही की एका संशयित duplicate ID ला उत्तर देण्याकरिता इथे इतक्या छान पोष्ट लिहिणार्या 'मुद्दाम' नावाच्या ID ने आपला खरा ID न घेता ह्या duplicate ID ने घेऊन का लिहावे? मग खर्या ID नी duplicate ID ला शिव्या घालण्यात किंवा त्यांना विरोध करण्यात काहीच अर्थ नाही. मुद्दाम हेच जर तुम्ही आपला खरा ID घेऊन लिहिले असते तर शाबासकी दिली असती. पण आता हा भेकडपणा झाला. मुद्दाम, तुम्ही हे मुद्दाम केले का? लालभाई आणि विनोद कांबळीची शैली सारखी वाटत नाही पण दोघेही जण खूप छान लिहितात आणि मुद्दे मांडतात. लालभाई, तुम्ही लाल रंग का घेतला? आधी रंग कुठला घ्यावा मग ID चे नाव ठरविले का?
|
Mumbhai
| |
| Thursday, June 22, 2006 - 1:33 pm: |
| 
|
काय शिंचि कटकट आहे मुद्दे संपले की लगेच गुद्यावर उतरले :D - निळूभाऊ
|
हे आतापर्यन्त खूप वेळा बोलले गेलेय इथे. पुन्हा तेच का उकरून काढतायत लोक! बरेच लोक इथे विरोधी किन्वा न पटणार्या मताचा विरोध करण्या ऐवजी ती मते मांडणार्या आयडीचा विरोध करण्याची गल्लत करतात!! जी काय आपली मते असतील ती प्रभावीपणे मांडून विरुद्ध मते खोडून काढता येतात की! समोरचा जोवर आपल्याला व्यक्तिश : काही बोलत नाही किन्वा शिवराळ असभ्य लिहित नाही, किन्वा तत्सम कोणताही अनुचित प्रकार करत नाही तोवर समोरचा आयडी त्या व्यक्तीचा दुसरा आयडी असेल नाहीतर तिसरा, विनोद असू दे, सचिन असू देत नाहीतर आणखी कोणी! आपल्याला त्याच्याशी काही देणे घेणे असू नये ना!
|
Bee
| |
| Friday, June 23, 2006 - 7:04 am: |
| 
|
समोरचा जोवर आपल्याला व्यक्तिश : काही बोलत नाही किन्वा शिवराळ असभ्य लिहित नाही, किन्वा तत्सम कोणताही अनुचित प्रकार करत नाही तोवर समोरचा आयडी त्या व्यक्तीचा दुसरा आयडी असेल नाहीतर तिसरा, विनोद असू दे, सचिन असू देत नाहीतर आणखी कोणी! आपल्याला त्याच्याशी काही देणे घेणे असू नये ना! मैत्रेयी, असे होत नाही ना पण.. असे अनेक ID आहेत इथे जे खोटा ID एक शस्त्र घेऊनच वापरात. मग त्या शस्त्राला बळी पडलेली व्यक्ती निष्पाप का असेना ही लोकं बेधडक हे शस्त्र वापरतात. त्याचा खूप त्रास होतो. तू चांगल्या आचार विचारांची आहेस्; तुला इथे चांगली वागणूक मिळते म्हणून तुझा +ve दृष्टीकोन मी समजू शकतो पण माझा बराचसा अनुभव अगदी विरोधात जातो म्हणून duplicate ID ना विरोध केला आहे मी.
|
मैत्रेयी, अगदी लाखातल एक बोललीस! अनुमोदन!
|
Laalbhai
| |
| Friday, June 23, 2006 - 9:08 am: |
| 
|
मैत्रेयीताई, हे आपण moderator या भुमिकेतून बोलत आहात का? तसे बोलल्यास अधिक परिणामकारक होईल, असे वाटते. बी दादा... कम्युनिस्त आणि लाल रंग यांचा काय संबंध आहे शोधा की जरा. आणि काही लोकांना संताजी धनाजी सारखा तो कांबळे सगळीकडे दिसत असावा झाले. तसे अनेकांना अनेक लोक स्वप्नातही दिसत आहेत, हे स्पष्ट झालेच आहे.
|
Lalu
| |
| Wednesday, July 05, 2006 - 6:02 pm: |
| 
|
या बीबी वर मूडी चे २१ जून चे एक पोस्ट आहे. त्या संदर्भात मी हे लिहीते आहे. याचा multiple id शी काही संबंध नाही. तसा त्या पोस्ट मधल्या बर्याच गोंष्टींचाही या बीबी च्या विषयाशी काही संबंध नाही. पण ते पोस्ट अजून आहे तेव्हा हे असायला हरकत नाही. जेव्हा साफसफाई होईल तेव्हा उडवा. -- मी जिथे जिथे ज्या बीबी वर लिहीत गेले त्याचा संदर्भ घेऊनच माझी बरीच टिंगल केली गेली. कशा साठी? तर मूडी, इथे सगळ्यांचीच टिंगल होते. तशीच तुझीही होते. 'फक्त तुझीच' होत नाही. बाकीचे लोक चेष्टा समजून सोडून देतात. त्याचं रडगाणं गात बसत नाहीत. -- मी तर अशा लोकांविरुद्ध कधी लिहीले नाही, त्यांची टिंगल कुचेष्टा केली नाही, मग कशा साठी मला मानसीक त्रास दिला गेला? तू कुचेष्टा केली नाहीस हे खरे नाही. तू करतच असतेस, ते बरेच दिवस चालूच आहे. आणि तू जे लिहितेस ती चेष्टा नसते. तुझ्या मतांना केलेला विरोध, चेष्टा या सगळ्याचा तुझ्या डोक्यात जो राग भरलेला असतो त्यातून केलेले कडवट भाष्य असते. मानसिक त्रास करुन घ्यायचा का नाही हा ज्याचा त्याचा प्रश्ण आहे. इथली टिंगल मनावर घेऊ नये हे पूर्वीही तुला सांगितलेले आहे. तो हर्षलचा मुद्दा आहेच पुढे - -- ज्योतिष्य शास्त्र मला आवडते, मी तिथे लिहीते, तिथला संदर्भ घेऊनही काही बीबींवर हर्षल वगैरे असा उल्लेख करुन टिंगल केली गेली, का? आता हे पुन्हा कुठून उपटले? मागे तू feedback बीबीवर तुझ्या सगळ्या हर्षल बद्दलच्या posts काढून टाकण्याबद्दल लिहिले होतेस तेव्हा मीच तुला विचारले हे तू त्या चेष्टेमुळे म्हणत आहेस का. यावर तू " नाही, तसे नाही. मी दिलेली माहिती बरोबर नसेल म्हणून मी म्हणते आहे " अशा अर्थाचे काहीतरी post केले होतेस. म्हणजे चेष्टेचे जर कारण नव्हते तर मग पुन्हा हा हर्षल चा मुद्दा इथे कुठून आला? तुला चेष्टा, मतांना केलेला विरोध कळत नाही आणि तू त्या लोकांवरच दात ठेवतेस हे यातून स्पष्त होतं. तसं करु नका हे हज्जार वेळा सांगितलं गेलं आहे. वरचे मैत्रेयीचे पोस्ट बघ. त्यातही आहेच! -- जे माझी टिंगल करतात त्यांच्या आवडी निवडींवर मी कधी टीका केलीय? कधी दिवे घ्या असे लिहुन टिंगल केलीय? टीका, कुचेष्टा केली आहे की नाही याचे उदाहरण ताजेच आहे. " दिवे घ्या " असे लिहिले नाही हाच तर खरा problem आहे! तू जे करते आहेस ते वाईट आहे. इथे पोस्ट करताना तुला किती गोष्टींचा विचार करवा लागतो हे जरा तपासून पहा. असल्या वागण्याचा बाकीच्याना तर त्रास होतोच पण तुला स्वतःला किती होतो एवढं पण कळू नये का तुला? असले विचार डोक्यात ठेवून वेळ घालवण्यापेक्षा तुझ्याकडे जी योग्य माहिती आहे ती लिहीत जा, बाकी वेळ दुसर्या चांगल्या कारणासाठी वापर. एवढ्या स्पष्ट शब्दात सांगूनसुद्धा पुन्हा तुला तेच करत रहायचे असेल तर इलाज नाही. पण मग चेष्टा झाली तर पुन्हा फुकट आरडाओरडा नको!
|
एकवीस जून ते पाच जुलै..... चान्गलीच पेशन्स हेत तुझी लालू! बाकी चालू द्या!
|
Moodi
| |
| Thursday, July 06, 2006 - 9:03 pm: |
| 
|
मा. नेमस्तक आपण तो multiple Ids चा बीबी बंद केल्याने मी लालुच्या प्रश्नांना इथेच उत्तर देतेय. आपण हे त्या बीबीवर हलवावे ही नम्र विनंती. लालु तुझ्या आरोपांना माझे हे पहिले अन शेवटचे पोस्ट. यानंतरच्या प्रश्नांना मी उत्तर देणार नाही कारण कुठलाच नवीन वाद मला यातुन वाढवायचा नाही. हर्षल च्या बाबतीत मी त्या वेळी झालेल्या टिकेवर गप्प बसले ते वाद नकोच म्हणून. तुच फीड बॅक वर म्हटली होतीस की हिला टिका आवडत नाही. तर लालु टिका अन टिंगल यात मोठा फरक आहे. ज्या विषयात आपल्याला माहिती असते तिथे जर काही बोलले किंवा प्रश्न विचारले किंवा त्या लेखावर पुरावा मागितला तर ती टिका किंवा समिक्षा होते, पण त्या लेखावर जी झाली ती टिंगल होती, टिका नाही. जेव्हा आपण कुठल्या लेखावर टिका करतो ती त्याच बीबीवर प्रश्न विचारुन केली तर ती टिका / समिक्षा असते, जिथे आपण गप्पा मारतो तिथे त्यावर उपहासत्मक बोलुन फायदा नसतो, ती टवाळीच असते. मी एक उपहासात्मक पोस्ट टाकली तर तू सूड घेण्या इतपत भाषा बोलु लागली, तर तू माझी जी आधी टिंगल करत होतीस त्याचे काय? २ उदाहरणे देते, तू नाकारुच शकत नाहीस, अगदी ताजी. मी उदरभरण नोहे या बीबी वर लोकसत्ताची एक लिंक टाकुन ती नीट न दिसल्याने user defined select करा असे लिहीले तर तू तुझे रंगीबेरेंगी मध्ये मी फोटो टाकतेय, दिसत नसेल तर user defined select करा हे त्याच दिवशी म्हटलीस. दिवे देऊन. मी मॉडना काही लोकांची तक्रार करुन विचारले की सतत चेष्टा होते हाच मानवी स्वभाव का काही मायबोलीकरांचा, तर तू पार्ले बीबी वर विचारलेस " करतेस, हाच मानवी स्वभाव का तुझा " लालु दिवे दिले म्हणजे सगळी चेष्टा, टिंगल दुर्लक्षीत होते असे नाही, अन प्रत्येक वेळा तुझे दिवे घेतले जातीलच असा गैरसमज नको, कारण प्रत्येक जण तुमच्या सारख्या परिस्थितीतुन आलेला नसतो, काही वेळा निराशा अन वेदना विसरण्या साठी मायबोलीवर यायची इच्छा होते, कारण चार लोकांत आपल्या वेदना बोलुन मन मोकळे होऊ शकते. पण जर त्याच वेळी अशी चेष्टा बघितली तर राग येणारच, कारण प्रत्येक जण चेष्टेच्या मनस्थितीत असेलच असे नाही. लालु तू एक matured स्त्री अन सिनीयर मायबोलीकर आहेस, पण ज्या पद्धतीने तू सहकार नगर बीबीवर मला उद्देशुन जी धमकीवजा भाषा वापरलीस ती नक्कीच योग्य नव्हती. मी जेव्हा ती पोस्ट टाकली, तेव्हा तुझे नावही घेतले नव्हते, पण ते तुला बरोबर लागले, का? हो मी तशी पोस्ट अजीबात टाकणार नव्हते पण जेव्हा चेष्टेचा अतीरेक झाला तेव्हा नाही राहवले. स. नगरवरील मुली माझी मैत्री accept करतील किंवा नाही, तो त्यांचा प्रश्न. जर अयोग्य वाटले तर त्या निर्णय घेतीलच. यापुढे तुला तुझी पोस्ट दुर्लक्षीत होऊ नये असे वाटत असेल तर निदान मायबोलीवर चार लोकात नीट दिसेल अशी भाषा वापर. सुडाची / धमकीची भाषा बोलु नकोस, त्याने काहीच साध्य होणार नाही.
|
Lalu
| |
| Monday, July 10, 2006 - 3:55 am: |
| 
|
पालथ्या घड्यावर पाणी! मी तुझी टिंगल केल्याची २ च उदाहरणे काय देतेस, मी अजून १० देईन! चेष्टा बघून राग येतो तर मुद्दाम कडवटपणे लिहिलेले वाचून राग येणार नाही? इतके दिवस ते चालूच होते, त्याचाच अतिरेक झाला म्हणून मी लिहिले ना त्यादिवशी? कोणी आधी काय केले याची आठवण करुन द्यायला लावू नका! -- मी तशी पोस्ट अजीबात टाकणार नव्हते पण जेव्हा चेष्टेचा अतीरेक झाला तेव्हा नाही राहवले. हे म्हणजे चोराच्या उलट्या झालं. निनावे, मी तिला " आता जिथं तू तिथं मी " असं म्हटलं होतं गं.
|
आय रिक्वेस्ट.... लालू आणि मुडी, प्लीज हे थाम्बवा, चान्गल वाटत नाही वाचायला! अन उलट मलाच विचारु नका की काय थाम्बवा! प्लीऽऽऽऽज! मी सहसा नावानिशी असे कधीच सान्गितले नाही हे! कृपया समजुन घ्या! तुम्ही जे करता, २ काय दहा उदाहरणे वगैरे.... मी माझ्याकडुन दिवसागणिक अशी दहा उदाहरणे देवु शकलो असतो, निर्माण करु शकलो असतो! त्यातुन काहीच साध्य होत नाही! आणि तसे करायचेच तर जरुर करा, पण त्या साठी तुम्ही खरोखरच आगदी आतुन मुळापासून दुखावले गेलेले असायला हवेत! तरच जर ते प्रतिक्षिप्त क्रियेप्रमाणे लिहिण्यात आले तरच... आणि तरीही ते मी ही समर्थनिय मानणार नाही! मला मान्य हे की मी ही काहि विशिष्ट शब्दयोजना अनेकरन्गाने अनेक ढन्गाने पुन्हा पुन्हा उध्रुत करतो... चक्क आडुन आडुन घालुन पाडुन टोमणे मारणे या सदरातील ती असतात! ज्यान्च्या करता असतात, त्यान्ना कळतात! पण माझ्या जेव्हा असे लक्षात आले की त्यामुळे ते चिडतात, तर मी ते थाम्बवायचाच प्रयत्न करतो हे! हे असे सान्गण्याचे कारण की, कदाचित तुम्ही म्हणाल की लिम्ब्या, तुला मधे बोलायचा अन सुचना किन्वा विनन्त्या करण्याचा काय अधिकार? तर लक्षात घ्या... अमेरिकेला सर्व जगाला अणुबाँम्ब वापरु नका (दोन ठिकाणी अणुबाँम्ब वापरल्यानन्तर) हे सान्गण्याचा नैतिक वा अनैतिक अधिकार जसा प्राप्त झाला, अगदी अगदी त्याच धर्तीवर मी तुम्हाला सान्गु इच्छितो, विनन्ती करु इच्छीतो, की गम्मत होती तोवर ठीक हे, आता बास! कोण चान्गल कोण वाईट हे सापेक्ष असते, त्यामुळे मी त्यात पडणार नाही, मला लालु देखील चान्गली, मुडी देखील! आणि या नेटवर आपण सगळेच स्नेही म्हणुन वावरुया! मॉड्स, माझी पोस्ट अयोग्य वाटल्यास कृपया डिलीट करावी तसेच या पोस्टचा किन्वा यातील निवडक मजकुराचा अन्य कुठे अन्य कुणी सन्दर्भाकरीता वापर करु नये किन्वा केल्यास यातील मजकुरात व आशयात फेरबदल करण्याचे माझे अधिकार मी राखुन ठेवत हे! p.s. या आख्ख्या पोस्ट मधे मला दात विचकायला सन्धी मिळाली नाही! तर हे घ्या...... एडिटमधे विचकुन घेतो हे! (मागुन बरेचसे आवाज "बघा बघा कशी थुन्की फिरवतो हे... अहो याला म्हणतात, सौ चुहे खाके बिल्ली हाजको चली") स्वगतः लिम्ब्या, आता तुझ काही खर नाही बघ! 
|
Laalbhai
| |
| Monday, November 20, 2006 - 2:53 am: |
| 
|
/hitguj/messages/46/119505.html?1163955608 माननीय admin , वरील वादासंदर्भात मला काही प्रश्न आहेत. duplicate id असावेत की नसावेत, हा नाही. तो तुमच्या अखत्यारितला भाग आहे. पण कोण कोणता ID घेऊन येतो आहे, हे इतरांना कसे कळू शकते? उदारहणार्थ वरील वादात shashreecool ही व्यक्ती कोण हे मला तरी कळलेले नाही. पण ajjukaa & chafa ह्या दोन व्यक्तींना shrashreecool कोण हे कळले आहे, हे स्पष्ट होते आहे. मागे एका वादात तुम्ही इथे लिहिणार्यांची integrity महत्वची आहे, आणि त्यांची privacy जपण्याची admin ची जबाबदारी आहे, असे काहीसे म्हणाला होतात, त्याची आठवण झाली म्हणून शंका वाटली. तुमच्या कामाबद्दल robinhood म्हणतात तसा आदर आहेच. पण एक शंका आली म्हणून विचारले. उत्तर देण्यासाठी काही वेळ द्याल ही अपेक्षा.
|
>>> पण कोण कोणता ID घेऊन येतो आहे, हे इतरांना कसे कळू शकते? अक्कल हुषारी आणि तर्काने ते सहज कळते! त्यासाठी अभ्यासही करावा लागतो लालभाई! DDD ते तसे कळुन कुणी काही एक उल्लेख केला तर त्याची जबाबदारी आॅडमीन वर नसुन आपले मूळ स्वरुप लोकान्ना कळू देणार्या युजर वर हे! उदाहरणार्थ, मी कोण हे बर्याच जणान्ना माहित हे! पण माझी खरी ओळख कुणिच उल्लेखित नाहीत, अगदी माझा "शत्रुपक्ष" देखिल! त्याबद्दल मी त्यान्चा नेहेमीच आभारी हे! मात्र काही जणान्चे "जगावेगळे" अशक्य वागणे असह्य झाले तर काही मायबोलीकर त्यान्ना काय कळले ते अस्पष्ट शब्दात स्पष्ट करतात! तस करतानाही ते एक मर्यादा पाळतात. वरच्या "त्या" पोस्ट मधे देखिल पाळली हे! या सर्व बाबीत, या साईटच्या चालकान्चा अर्था अर्थी काहीही सम्बन्ध वा जबाबदारी नाही, आणि जी जबाबदारी हे ती ते परिपुर्ण पणे अम्मलात आणतातच! तेव्हा त्या दोन आयडीना त्या तिसर्या आयडीची ओळख कशी काय कळली व त्यातुन प्रायव्हसी वगैरे चा भन्ग तर होत नाही ना म्हणुन ऍडमिन ला मधे ओढण्याची काहीच गरज नाही! केवळ याच साठी मी माझे उदाहरण दिले की माझ्या आयडीची खरी ओळख मला लपवायची हे तर माझा येथिल "शत्रुपक्ष" देखिल ति तशि लपवुन ठेवतो व तेवढे तारतम्य तो बाळगतो, काहिन्च्याच बाबतीत जेव्हा असे घडते तेव्हा पाणी बरेच मुरलेले असते असे समजायला हरकत नाही! एनीवे, थोडावेळ आलो होतो, आता परत शीतनिद्रेत जातो! ऍडमिन, मॉड्स, माझ्या या पोस्ट मधे काही गैर आढळल्यास योग्य ती तजवीज करावी ही विनन्ती!
|
Laalbhai
| |
| Monday, November 20, 2006 - 4:34 am: |
| 
|
Well, केवळ अक्कलहुशारीने आणि तर्काने ह्या गोष्टी कळत असतील तर ठिक आहे. पण तेंव्हा लिहिण्याबोलण्यात ठामपणा नसतो (किंवा नसावा ही अपेक्षा!). वर जे उदाहरण दिले त्यात फारच ठामपणा आहे. तो केवळ अक्कलहुशारीच्या जोरावर आहे का, याची जरा शंकाच येते. असो. तुम्ही म्हणता ते खरेही असू शकते. जरा admin चे विचारही समजले तर उत्तम होईल.
|
Admin/Moderator- मी काल एक बीबी उघडला होता तो बंद करण्यात आला. चाफ़्याच्या पोष्टला उत्तर लिहायचे आहे.
|
Admin
| |
| Monday, November 20, 2006 - 5:45 am: |
| 
|
>मागे एका वादात तुम्ही इथे लिहिणार्यांची integrity महत्वची आहे, आणि त्यांची privacy जपण्याची admin ची जबाबदारी आहे, असे काहीसे म्हणाला होतात, त्याची आठवण झाली म्हणून शंका वाटली. अगदी बरोबर. ती privacy जपणे हे आमचे कर्तव्य आहे. आम्ही आमच्या कडून ती माहिती कधी कुणाला सांगितली नाही. हितगुजवर कुणाचा ID कुठला हे तांत्रिक दृष्ट्या सांगणे पूर्ण अशक्य आहे. त्यामुळेच Duplicate ID हा प्रकार कधीच थांबवता येणार नाही (एकच उपाय आहे की प्रत्येकाने त्यांचा बॅंक अकाऊंट किंवा क्रेडिट कार्ड क्रमांक द्यायचा आणि आम्ही तो पडताळून पहायचा पण मला नाही वाटत त्याला कुणी तयार होईल) पण तांत्रिक दृष्ट्या शक्य नसले तरी मानसशास्त्रिय द्रुष्ट्या अगदी सहज, कुणालाही शक्य आहे. कितीही हुषार चोर असला तरी कधी ना कधी तो चुका करतोच तसे कितीही हुषार duplicate ID असला तरी कधी ना कधी त्याच्यातिच्या नेहमीच्या लिहिण्याच्या पद्धतीवर घसरतोच. त्यावरून अंदाज बांधता येतो. याचा गैरवापर करून काही हुषार ID तिसर्याच व्यक्तिच्या लिहिण्याच्या पद्धतीने लिहितात जेणेकरून त्या व्यक्तिकडे संशयाचे बोट दाखवले जावे. पण तेही कधितरी घसरतातच. जे लोक अगदी ठामपणे आपण duplicate ID ओळखला म्हणतात ते अशा चुकिच्या माणसाकडे बोट दाखवणे सहज शक्य आहे. duplicate ID यावर एक अगदी सोपा उपाय आहे. जे आपण प्रत्यक्ष व्यवहारात करतो तेच. जसे आपण फक्त माहितीच्या व्यक्तिवर विश्वास ठेवतो तसे इथेही फक्त माहितीच्या (आणि तो विश्वास मिळवण्याचे प्रत्येकाचे निकष वेगवेगळे असतील) id काय लिहितात त्यावर विश्वास ठेवायचा. केवळ मायबोली आहे म्हणून सगळ्यांचे हेतू स्वच्छ आहेत असे नाही. जितकी एखादी community, offline or online, मोठ्या समाजाचे जास्तीत जास्त प्रतिनिधित्व करते तितकेच त्या समाजातले चांगले वाईट घटकही त्यात येणे हे ओघाने आले. duplicate ID म्हणजे एका वर्गाला किंवा व्यक्तीला समाजाच्या मोठ्या वर्गाची वाटलेली भीती. कधी कधी त्याचा चांगला परिणाम होऊन त्या मोठ्या गटाला एका वेगळ्या दृष्टिकोनातून पहाण्याची, विचारांची संधी मिळते. तर कधी कधी उगीचच वैयक्तिक मत्सर किंवा सूड भावनेपोटी केलेली विधाने ऐकावी लागतात. वरवर आपल्याशी गोड बोलणारे पण मागून काड्या करणारे पुष्कळ लोक आपल्या रोजच्या जीवनात येतात. ते एक प्रकारचे duplicate id हे एकदा लक्षात आले की प्रत्यक्ष आयुष्यात करतो तेच उपाय इथेही लागू पडतात हे ही लक्षात येते.
|
Laalbhai
| |
| Monday, November 20, 2006 - 6:03 am: |
| 
|
Well Dear Admin, duplicate id बद्दलचे विवेचन चांगले आहे. (परिपूर्ण नाही.) पण तुमचे "आम्ही आमच्या कडून ती माहिती कधी कुणाला सांगितली नाही." हे एक वाक्य पुरेसे होते. तुम्ही बोलता त्याप्रमाणे वागत असालच. त्यात वाद काय घालायचा? आता तुमचे विवेचन परिपूर्ण नाही ते यासाठी की तुम्ही जे काही विचार इथे मांडले त्यातली काही वाक्ये तशीच muddam ह्या id ने मला विरोध करताना वापरली होती. ह्याचा अर्थ काय घ्यायचा? तुम्ही स्वतः duplicate id घेऊन लिहिता, असा आरोप करू का मग मी? ~D . तेंव्हा duplicate id चे तुमचे विवेचन चांगले असले तरी ते परिपूर्ण नाही, असे वाटते. अर्थात, तुमचा अनुभव मोठा आहे. जसे मी म्हटले की duplicate id हा माझ्या चिंतनाचा विषय नाही. तुम्ही माझ्या मूळ प्रश्नाला उत्तर दिले आहे, तेंव्हा माझे समाधान झालेले आहे. तुमच्या उत्तराबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
|
Dineshvs
| |
| Monday, November 20, 2006 - 7:04 am: |
| 
|
Admin तुमचे निवेदन वाचुन मला खुपच आनंद झाला. तुमची तांत्रिक अडचण पण समजुन घेता आली. जसे आपल्याला आलेल्या ईमेल्स पैकी, ज्या आपल्याला ओळखीच्या लोकंकडुन आलेल्या असतात, त्यांचीच आपण दखल घेतो, तसेच मीहि यापुढे ईथे करणार आहे. तुमचा सल्ला माझ्यासाठी खुपच मोलाचा आहे.
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|