|
Yogy
| |
| Wednesday, November 15, 2006 - 1:45 pm: |
| 
|
इथली एककल्ली आणि भरकटलेली चर्चा पाहून लिहायचे नाही असे ठरवले होते पण आता अंनिसहि हिंदूधर्मविरोधी आहे असे मुद्दे आले म्हणून राहवले नाही. santu पुण्यातील छोट्या शेखसल्ल्याच्या दर्ग्यात होणार्या अनेक प्रथांचा उदा. तोंडात दाभण खुपसून घेणे विरोध करण्यासाठी अनीस ने काम केले आहे. मोहरम मध्ये होणार्या मातममध्ये लहान मुलांना सहभागी करू नये, त्यांना शारिरीक इजा करू नये म्हणून जनजागृतीचे काम अंनिस ने केले आहे. माझ्या माहितीप्रमाणे मुसलमान समाजात हिंदुंपेक्षा कमी अंधश्रद्धा आहेत. बहुधा ते एकाच देवाला मानत असल्यामुळे असे झाले असावे. तुम्हाला जर कुठे मुसलमाणांवर अत्याचार करणारा एखादा बाबाफकीर माहित असेल तर सांगा मी अनिसकडे पाठपुरावा करीन. अंधश्रद्धा कोणत्याही धर्मात असली तरी ती वाईटच आहे.
|
Chyayla
| |
| Wednesday, November 15, 2006 - 1:47 pm: |
| 
|
धन्यवाद केदार, मी तर प्रत्येक पोस्ट मधे याच गोष्टीचा आग्रह धरला आहे, मुळ विषयाकडे वळावण्यासाठी, श्रावण, झक्की, योगी याना मुद्दे मान्डुन आराखडा पण दिला होता. पण त्यानन्तर मुद्यान्ची वाट पहात आहे, झक्की नी द.वा.वी काढायचे तेवढे सुचवले, पण ते कसे सर्वमान्य व प्रभावी होउ शकेल याचा विचार करणे गरजेचे आहे, सगळ्या पक्षातले लोक या राष्ट्रकार्यासाठी एकत्र येत असेल तर या सारखी आनन्दाची गोष्ट नाही. या निमित्यानी जरी समाज सगळे भेद विसरुन एकत्र आला तर देशाचे भविष्य उज्वल राहील. तुम्ही म्हटल्या प्रमाणे तातडीचे व दुरगामी उपाय कसा करता येइल त्याचा ही विचार करणे गरजेचे आहे. आज आपल्या समोर पन्जाब मधिल दहशतवाद सम्पवण्याचा प्रत्यक्ष अनुभव आहे त्याचा उपयोग करता येइल. १) तातडीच्या उपायामधे मागे श्रावण नी सुचवल्याप्रमाणे, काश्मीर मधे जगमोहन सारखे, पन्जाबच्या धर्तीवर ज्याप्रमाणे दह्शतवाद सम्पवण्यात आला त्याप्रमाणे लष्करी कार्यवाही करणे आवश्यक वाटते. २)शिवाय मुस्लिम जनतेमधे ही कोणतेही लान्गुलचालन करुन वेगळे असण्याची भावना निर्माण करणे, थाम्बवणे आवश्यक आहे. पन्जाब मधे आपण शिखाना वेगळे आरक्षण किन्वा ईतर फ़ुटीरतावादी विष पेरले न्हवती. ३)सगळ्यात महत्वाचे म्हणजे, सरकारी ईछाशक्ती ती जर झाली अर्धे काम फ़त्ते, त्यासाठी अश्या एकत्र आलेल्यानी दबाव आणणे. ४)मुस्लिमानामधे आपण या देशाचे नागरिक आहोत, या देशाच्या सन्स्क्रुतीप्रमाणे परधर्म सहिष्णुता, दुसर्या धर्माचा व विचारान्चा आदर. ईथल्या धर्तीवर जन्माला आलेले महामानव एका धर्माचे नव्हे तर एका देशाचे व सन्स्क्रुतीचे आहेत. याची जाणीव निर्माण करुन देणे. ५) त्यानापण या कार्यात घेउन तथाकथित असुरक्षिततेची भावना काढणे गरजेचे आहे. कागाळी केल्याशिवाय ईथला नागरिक प्रतिक्रिया देत नाही याला ईतिहास साक्शी आहे. ६)पन्जाबमधे तिथल्या जनतेने प्रत्यक्ष दहशतवाद नाकारला म्हणुन तिथे तो सम्पवण्यास मदत झाली. तेन्व्हा सामाजिक व राजकिय ईछाशक्ती एक झाली तर ताबडतोब दहशतवाद सम्पेल. ७) दहशतवादी घटनान्चा त्यान्नीपण एकत्र येउन निषेध करणे आवश्यक आहे, त्यामुळे सगळा समाज एक असल्याचे दिसुन येइल. कारण दहशतवाद त्यान्च्यावरही उलटतो, हे मालेगावच्या घटनेने सिद्ध झाले आहे. ८) जातिय, प्रान्तिय, भाषिक, धार्मिक वा ईतर कोणतेही वाद घालवुन एकत्र येण्याचे जे काही प्रयत्न सुरु आहेत त्याना पाठिम्बा देणे, याप्रकारे समाजाची एकता दिसुन आली तर दहशतवाद सम्पायला वेळ लागणार नाही. माझ्या तर्फ़े मदत करण्याचे कबुल केल्याप्रमाणे काही व्याव्हारिक मुद्दे मान्डत आहे, ईतरान्कडुन येउ द्यात, स्वागत आहे.
|
Lopamudraa
| |
| Wednesday, November 15, 2006 - 1:51 pm: |
| 
|
हुश्श दमलो बाबा इतक लिहुन>>>>> कशाला लिहिता.. मग (नाहितरी तुम्ही लिहिलेल्यात वाचायसारखे काय असते? आणि राहु द्या.. भोळ्या भाभड्या.. हिंदु जनतेला.. अडाणी तुमचे खुप खुप आभार या पुढे तुम्ही लिहिणार नाही वाचुन... ..
|
Yogy
| |
| Wednesday, November 15, 2006 - 1:54 pm: |
| 
|
केदार आणि झक्की आपला चर्चा रुळावर ठेवण्याचा प्रयत्न स्त्य्त्य आहे. १. तातडीचे उपाय. सर्व मुसलमान दहशतवादी आहेत असे मानू नये. भावनिक प्रश्न उदा. राममंदीर, गोरक्षण हे सध्या बाजूला ठेवणे. इतके दिवस हे प्रश्न असेच भिजत होते तेव्हा काही फरक पडला नाही. आताही काही फरक पडू नये. शाहरुख खान, अझिम प्रेमजी, सानिया मिर्झा, इरफान पठाण अश्या मुस्लिम समाजातील यशस्वी लोकांना ब्रँड अम्बसिडर म्हणून वापरून मुसलमानांना या देशात सुरक्षित वातावरण आणि समान संधी दिल्या जातात हे पटवून देणे. २. दुरगामी उपाय. मुसलमानांना मुख्य प्रवाहातले शिक्षण देण्यासाठी त्यांना सवलती देणे. हमीद दलवाईंसारखे समाजसुधारक त्या समाजात निर्माण होतील असे पाहणे. धर्मापेक्षा मानवजात महत्त्वाची हे त्यांना पटवून देण्यासाठी प्रयत्न करणे (हा मुद्दा हिंदुंसाठी ही महत्त्वाचा आहे). अजून सुचले की सांगतो.
|
Chyayla
| |
| Wednesday, November 15, 2006 - 1:57 pm: |
| 
|
अनिस च्या चान्गल्या कामाला पुर्ण समर्थन, आता हा विषय बाजुला राहु द्या आणी या मुळ विषयावर १)योगी, मान्य आणी आपणही तसे मानत नाही की सगळे मुसल्मान दहशतवादी आहेत म्हणुन. २)बाकीचे प्रष्न हे केवळ राष्ट्रकार्यासाठीच होते, या मार्गाने होत असेल तर बाजुला ठेवायला काहीच हरकत नाही. ३)सवलती देण्यामधे आक्षेप कारण वर पन्जाबमधे आपण अजुनही सवलती देत नाहीत. शिवाय मुसल्मानच मागासलेला आहे हे चुक आहे, या देशात हिन्दु ८०% टक्के आहेत, त्यामधे मागास, जाती जमाती, वनवासी यान्ची सन्ख्या जास्त आहे त्यामुळे धार्मिक आधारावर सवलती देउन फ़ुटिरतावादी भावना निर्माण करण्यापेक्षा आर्थिक आधारावर सवलती देण्याला काय हरकत आहे? त्यामधे सगळ्याच उपेक्षिताना लाभ होउ शकेल. आजवर आरक्षणाचा हेतु सामाजिक तेढ वाढवण्यासाठीच केला आहे, अगदी आम्बेडकरानी म्हटले होते की काही कालावधी नन्तर हे बन्द व्हायला पाहिजे, त्यान्नापण कोणी जुमानत नसल्यचे दिसुन आले आहे, शिवाय धार्मिक आधारावर आरक्षण दिल्यास ईतर उपेक्षित वर्ग ज्याला खरोअखरच गरज आहे त्यात असुया निर्माण होणारच, त्यामुळे आर्थिक आधारावर सवलती ही माझ्या कडुन सुधारणा. ४) धर्मापेक्षा मानवजात श्रेष्ठ हे हिन्दुना सान्गायची गरजच नाही त्यामुळे ईथे शक्तिचा अपव्यव वाचला... कारण हिन्दु हा धर्मच नव्हे तर आनन्दी जीवन जगा आणी जगु द्या असे मानणारा जीवन मार्ग आहे हे मागेच स्पष्ट केले आहे. ज्याना हे अजुन समजले नाही त्यान्चासाठी जाग्रुती करणे एकदम मान्य. तुम्ही सुद्धा मुद्दे मान्डलेत त्याबद्दल खरच धन्यवाद.
|
Kedarjoshi
| |
| Wednesday, November 15, 2006 - 3:49 pm: |
| 
|
च्यायला माझे ही ४ थ्या मुद्द्याला समर्थन. धर्मापेक्षा मानवजात महत्त्वाची हे त्यांना पटवून देण्यासाठी प्रयत्न करणे (हा मुद्दा हिंदुंसाठी ही महत्त्वाचा आहे). योगी मला नाही वाटत हा त्यांना पटला जाईल. कारण प्रश्न फक्त भारतातच असता तर तुमचा मुद्दा योग्य पण अभारतीय मुस्लीम भारतीय मुस्लीमांवर प्रभाव टाकत असतात. माणवता ही मोठीच पण ह्या साठी जगातल्या मोठ्या लोकसंखेच्या धर्मानी तसे वागायला हवे. आम्ही मारणार व तुम्ही मरा असे आता या युगात व्हलीड नाही असे वाटते. रादर कुठल्याच युगात न्हवते नाहीतर रामायण महाभारत, पहीले व दुसरे महायुद्ध घडले नसते. अगदी अलीकडे ईराक युद्ध पण घडले नसते. अमेरिकेने माणवता मोठी म्हणुन त्यांना सोडुन द्यायला पाहीजे मग. मी आधी मांडलेले काही तातडीचे उपाय. १. दहशतवाद कोणाचाही असेल तर गोळी हाच अल्पकालीन उपाय. २.मुस्लीम घर्मात जे फालतु टाईप चे फतवे निघतात त्यांआ बंदी. ३. मिडीयाचा वापर करुन सुशिक्षीत, पुरोगामी मुस्लीमांच्या मुलाखाती नेहमी TV वर दिसतील असे पाहने. ४. थोड्या थोड्या कारणाने ज्या दंगली होतात त्या थांबयाचा प्रयत्न करणे. ५. दंगलीत पकडलेल्या दोन्ही घर्माचा लोकांना वेळ न लावता कठोर शिक्षा सुनावने व त्याचे प्रसारण करने. काही दुरगामी उपाय. १. सर्व भारतीय समान हे फक्त कायद्यात आहे. प्रत्यक्षात कसे आणता येइल हे पाहणे खरेतर सरकारची जबाबदारी आहे पण मतांसाठी अजुनही फाटे फोडले जातात. मुस्लीम शरीयत असायला हरकत नाही पण जसे हिंदु काय्द्यात बदल केले गेले तसे त्यात ही पुरोगामी बदल व्ह्हावेत जेने करुन ४ बायका, तलाक तलाक, शरीयत कायदयापेक्षा मोठी ह्या गोष्टी बदलन्यास मदत होईल. २.शिक्षण कोणाचेही दुमत नसावे. पण नोकरीत आरक्षण नसावे. कारण मग परत स्पेशल ट्रीट्मेंट झाली. मुख्य प्रवाहात येन्यासाठी कुठलीही स्पेशल ट्रीट्मेंट नसावी. ३.पुरोगामी मुस्लीमच त्यांचा समाज समोर आनु शकतात आपण नाही, त्यामुळे जास्तीत जास्त पुरोगामी मुस्लीम कसे तयार होतील हे पाहाने. ४. हिंदु धर्मीय स्वतच्या धर्मीयांना पण निट वागवत नाहीत. ह्यात बदल कसा करता यील हे पाहाने.
|
Kedarjoshi
| |
| Wednesday, November 15, 2006 - 4:29 pm: |
| 
|
कालबाह्म झालेल्या आणि देशाला पोषक नसलेल्या रुढींच्या उच्चाटनाचं काम करायला मुसलमान आणि इतर धर्मीयांनीही आपल्यातील भारतीयत्वाला अग्रक्रम द्यायला हवा. हमीद दलवाईंच्या अनुभवांवरुन मुसलमानात हे विचारपरिवर्तनाचं कार्य किती अवघड आहे हे ध्यानात येतं. इतर धर्मांत आणि जातींत ते सोपं आहे असं नाही. - पु.ल.
|
Chyayla
| |
| Wednesday, November 15, 2006 - 4:38 pm: |
| 
|
केदार, तुमचा पण ४ था मुद्दा मान्य...योगायोग, त्याबद्दल काही मुद्दे मी पण मान्डत आहे. अर्थात ईतरही मुद्दे तुम्ही चान्गले मान्डले आहेत, आता असे वाटतेय की चर्चा परत मुळ विषयावर येत आहे. १)काही हिन्दु अजुनही जात, पात, धर्म, अन्धश्रद्धा यात अडकलेले आहेत. २)काही मुर्ख ब्राह्मणान्नी धर्मान्तरण झालेल्यान्ना परत हिन्दु धर्मात प्रवेश करु दिला नव्हता, त्यामुळे काश्मिर, गोव्यातिल आपलेच बान्धव आपल्यापासुन दुरावलेत व कायमची डोकेदुखी होउन बसलेत, पण शिवाजी महाराजान्नी काही ब्राह्मणानकडुनच काहीन्ना परत धर्मात आणले होते तोच आदर्श पुढे चालु रहावा. ३)शिवाय दलितान्वर जे अत्याचार केलेत त्यामुळे सुद्धा ते दुरावलेत, पण हे एका समाजिक व्यवस्थेत कालौघात निर्माण झालेले दोश होते ते काढुन टाकणे तेवढेच आवश्यक आहे. डॉ आम्बेडकरान्नी ही जाणीव निर्माण करुन दिलीत त्यान्चे हे फ़ार मोठे उपकार आहेत. ४)ह्या सगळ्यानपर्यन्त खरे हिन्दुत्व काय हे पोचवणे गरजेचे आहे, तर मला वाटते यामुळे आपल्या समाजातिल दोष निघुन काही कलन्क पण धुवुन निघतील, अर्थात ह्या सुधारणान्ना कुणाचा विरोध नसावा. दुरगामी उपायानमधे या गोष्टीन्चा समावेष व्हावा. मागे तुम्ही म्हटल्या प्रमाणे आपण आपल्या समाजातील दोष काढु शकतो, पण मुस्लिमान्नी सुद्धा त्यान्च्यातिल दोष काढायला पुढे यायला पाहिजे. फ़तव्याच्या बाबतीत मागे मी एक उपाय सुचवला होता की काफ़िरान्ना मतदान करु नये असा फ़तवा काढला तर बरेच प्रष्न सुटतील, काट्याने काटा काढणे हे त्यान्ना अपील होउ शकते. जाउ द्या हा त्यान्चा मार्ग झाला आपला नव्हे आपण समाजात एकजुट कशी होईल तेच कार्य पुढे चालु ठेवु या.
|
Santu
| |
| Thursday, November 16, 2006 - 7:02 am: |
| 
|
काहि मुर्ख ब्राह्म्णानी)))))) च्यायला हा मुद्दा अगदि बरोबर आहे खरे तर सर्व भारतिय मुसलमान हे खर तर पुर्विचे हिन्दुच आहेत अगदि कोकणात सुध्दा आडनावे सुध्दा मोडक वैगेरे असतात(दाऊद चे आडनाव सुध्दा कासकर आहे हे ईथे नमुद केले पाहिजे). याना हळु हळु परत हिन्दु धर्मात आणले पाहिजे.आणी हे लवकरात लवकर केले पाहीजे.वील ड्युरांट त्याच्या history of civilisation मधे म्हनतो indias delicate complex of order and freedam,culture and peace can at any movement be over thrown by barberians invading from without or multyplying within . यातले barberians कोण हे शहाण्यास कळावे. धर्मा पेक्षा मानवजात)))))) केदार मुसलमान हे समजावुन घेतिल का? योगी. राममंदिर व गोरक्षण हे सध्या बाजुला ठेवणे))))))मुसल्मान जर साधे वन्दे मातरम म्हणायला तयार नाहित मग हिन्दुनी एवढा त्याग का करायचा. राम मंदिर हे झालेच पाहिजे उलट.उलट मुसलमानानी क्रुष्णजन्म भुमी सुध्दा हिन्दुच्या हवालि केलि पाहिजे
|
संतु नाही ते वाक्य योगीचे आहे मी त्याला खाली उत्तर दिले आहे.
|
Zakasrao
| |
| Friday, November 17, 2006 - 6:57 am: |
| 
|
आता संसदेवर हल्ला करणार्या अफ़झलने दयेचा अर्ज़ दिला आहे.त्यासाठी देशात मोठा गदारोळ चालु आहे. त्यासन्दर्भात एक कविता मेल आली आहे. ती upload करतो. 
|
Zakasrao
| |
| Friday, November 17, 2006 - 7:02 am: |
| 
|
त्या कवितेचा दुसरा भाग size limit मुळे तस कराव लागल. पण सर्व नेतेमन्डळी मुस्लिमान्चे लाड करण्यासाठि race करत आहेत. हि कविता त्याचिच प्रतिक आहे. 
|
Mahesh
| |
| Friday, November 17, 2006 - 8:05 am: |
| 
|
झकास राव, झकास आहे कविता... आपल्या समाज मनाला सारखी मरगळ का येते देव जाणे. भारत पुन्हा ग्लानीर्भवति झाला आहे.
|
Chyayla
| |
| Friday, November 17, 2006 - 1:25 pm: |
| 
|
झकासराव, तुमचा आयडी आणी कविता पण लई झकास हाये. तुम्ही नवीनच दिसता आहात, स्वागत आहे शिवाजी महाराजान्नी एका अफ़जल चा वध करुनच दहशतवाद कसा सम्पवावा याचे व्याव्हारिक उदाहरण दिले होते. ईतिहासापासुन शिकण्याची लायकी नाही रे ये देशातल्या गद्दारान्ची, जो ईतिहास विसरतो त्याला ईतिहास कधीच माफ़ करत नाही.
|
Zakasrao
| |
| Saturday, November 18, 2006 - 4:16 am: |
| 
|
धन्यवाद महेश, च्यायला ती कविता मला मेलवर मिळालि मी इथे नविनच आहे सम्भाळुन घ्या. बाकी च्यायला अस म्हणण्यासाठी चांगला chance मिळत आहे.
|
Sunidhee
| |
| Saturday, November 18, 2006 - 9:20 pm: |
| 
|
ही चर्चा २५०-३०० पोस्ट्स नन्तर वाचणे मी तरी सोडुन दिले होते कारण फक्त शब्दांचा कीस काढणे चालु झाले आहे आणि क्रुति न करता केवळ बड्बड करण्यातच लोकाना रस आहे कि काय असे वाटु लागले होते. त्यात ज्या कोणी प्रामाणिकपणे काही चांगले मुद्दे मांडले त्या कडे कोणी लक्ष देत नाही अशी परिस्थिति आली होती. एक वाचक ह्या नात्यानेच हे लिहित आहे, कोणी रागावु नये कारण माझ्यासारखे भरपुर वाचक हे वाचत असतात आणि त्यातुन उपयोगी पडतील असे मुद्दे नक्किच घेत असतात. कोणाला एकाच व्यक्तीला उद्देशून तर अजीबात नाहिये. नन्तर वाचले नाही पण शेवट्चे ७-८ पोस्ट्स मधुन पुन्हा निट मुद्दे मांड्ले जात आहेत हे चांगल झाल आहे. शेवटी माझा मुद्दा असा, आत्ता फक्त मुम्बई चा विचार करुन बोलत आहे. निदान मुम्बईत तरी कोट्यावधि जनतेसाठी जास्त पोलिस असावेत. आणि त्याना जरा निट सोयी द्याव्यात, पगार, वगैरे. मी अस ऐकलं होतं कि फक्त ४०-५० हजार पोलिस आहेत मुम्बईत. अस खरच असेल तर हे proportion भयानक आहे. दहशतवाद कमी होणार तरी कसा जर रक्षणकर्तेच कमी असतिल तर.. त्यानी कुठे कुठे एकाचवेळी धावायचं? तपास लावायचा? आपल्यासारखी सामान्य माणसं खुप करतात वेळ आली की पण त्यांचे हात पण किति पुरे पडणार?
|
Santu
| |
| Sunday, November 19, 2006 - 12:53 pm: |
| 
|
एकदम झकास आहे तुमची कविता
|
सुनिधी, तुमचा मुद्दा अगदी योग्य आहे. कोणती ही रजा न घेता बारा बारा तास जीव धोक्यात घालून काम करणार्या पोलिसान्ना पन्ख्याखाली बसून टाईमपास करणार्या कारकूनान्पेक्षा कमी पगार असतो.
|
Chyayla
| |
| Monday, November 20, 2006 - 2:20 am: |
| 
|
सुनिधी आणी विजय तुम्ही काढलेला पोलिसान्चा मुद्दा पण विचारात घेण्यासारखा आहे. आणी सुनिधी तु जी चिन्ता व्यक्त केली की हा BB भरकटला होता अगदी मान्य आहे, उगाच चान्गल्या चर्चेत मधेच गान्धी, सोनिया, पेशवे, अफ़जल, जातियवाद, चहाटळपणा मग त्या अपप्रचारावर उत्तरे, वाद होणे सहाजिकच होते. तेन्व्हा आतातरी या सम्बन्ध नसलेल्या गोष्टीना कुणी काढु नये ही विनन्ती. १) पोलिसान्ची कमी सन्ख्या, कमी पगार, कमी सुविधा त्यामुळे ते थिटे पडतात. याशिवाय अतिरेक्यान्च्या आधुनिक AK-56 समोर त्यान्च्या बन्दुकान्चा काय निभाव लागणार. २)सोबत गुप्तचर यन्त्रणाही चान्गली असणे आवश्यक आहे, पाकिस्तानच्या ISI चे जाळे भयन्कर पसरलेले आहे, ती तर अल्-कायदा पासुन ते सगळ्या दहशतवादी सन्घटनामधे समन्वय राखुन आहे, काश्मिर आता हैद्राबाद, बन्गाल व बर्याच ठिकाणी तसेच अफ़गाणीस्तान व जगभारातल्या प्रत्येक दहशतवादी घटनेत त्यान्चा हात, पैसा आहेच. त्याला तोडीस तोड यन्त्रणा असणे आवश्यक आहे. ३)सगळ्यात महत्वाचे म्हणजे पुळचट कायदा बदलवणे, जिवावर उदार होउन पकडलेल्या अतिरेक्याना जेन्व्हा कायद्यातील पळवाटा काढुन सोडण्यात येते तेन्व्हा किती निरपराधान्चे प्राण धोक्यात आलेले असतात. तेन्व्हा पोलिसान्सोबत सक्षम कायदा ही असणे आवश्यक आहे. ४) सिमी सारख्या ज्या येथिल नागरिकान्ची माथी भडकवुन जिहाद मधे शामिल करवुन कारवाया करते, अश्या सन्घटनान्वरही बन्दी असणे आवश्यक आहे, याशिवाय लोकजाग्रुती असणे ही आवश्यक आहे. कारण जर त्यान्ना ईथल्या जनते कडुन समर्थन मिळाले तर काम कठीण होते. त्यासाठी सामान्य, व मुस्लिम नागरिकानी पण सावध असणे आवश्यक आहे. ५) सामान्य नागरिकान्नी सुद्धा सावध राहण्याचे दुसरे कारण पोलिस सर्व ठिकाणी पोहचु शकत नाही, त्यामुळे सन्देहास्पद हालचाली, वस्तु यान्ची माहिती सजग नागरिकानकडुन मिळल्यास पोलिसान्ना पण मोठे सहाय्य होते. ६) झालेल्या घटनान्नी नेत्यानी माथी भडकवण्याचे काम टाळावे, तसाअजवरचा अनुभव पाहता जेन्व्हा एखादे क्रुत्य दहशतवाद्यान्नी घडवुन आणल्याचे लक्षात येते तेन्व्हा दन्गे किन्वा ईतर अप्रिय प्रकार झाले नाहीत उदा. मालेगाव, रघुनाथ व अक्षर्धाम मन्दिरावर हल्ला. पण जेन्व्हा ईथला जिहादी नागरिक एखाद्या घटनेत शामिल होतो तेन्व्हा तेन्व्हाच समाजाकडुन उस्फ़ुर्त कडवट प्रतिक्रिया मिळाली आहे त्यान्ना थाम्बवणे कठीण जाते उदा: गोधरा हत्याकान्ड व त्यामुळे मिळालेली प्रतिक्रिया. ७) मिडीयाची भुमिका पण आक्षेपार्ह आहे नको त्या गोष्टीन्चा उदो उदो केल्या जातो, जसे मागे मुशार्रफ़ भारत भेटीवर आले होते तेन्व्हा तर भारतातला मिडिया भारतासाठी आहे की मुशर्रफ़ साठी असा प्रष्न पडावा, ताजे उदा: अफ़जल चे उदात्तिकरण. त्यामुळे सवन्ग प्रसिद्धी मिळवण्यापेक्षा एक जबाबदारी त्यान्नी पण घेणे आवश्यक आहे. अमेरिकेत जेन्व्हा ट्वीन टॉवर्स उध्वस्त केले तेन्व्हा मिडियानी अशीच बातमी दिली की अमेरिकेवर हल्ला त्यासाठी त्यान्नी सरकारला, गुप्तचर यन्र्तणाना धारेवर धरले नव्हते किन्वा उगाच राजिनाम्याचे मागणी नव्हती केली. आपल्याकडे आपण काश्मिरात हल्ला, बन्गलोर मधे हल्ला म्हणुन त्या क्षेत्राकरता मर्यादीत करतो किन्वा लष्कर, सरकार वर वाभाडे काढुन मोकळे होतात व एकामेकाला दोष देत राहतात हे निश्चितच टाळले पाहिजे. उलट यामुळे आपण देशाची एकजुटता दाखवण्यास अपयशी ठरतो. ८)राजकिय पक्ष यानी एकि दाखवणे आवश्यक आहे उगाच एकामेकावर दोषारोपण करण्यापेक्षा राजकिय अभिनिवेष बाजुला ठेवुन आपण देशाच्या बाहेर व देशातील सन्कटानसमोर, दहशतवादासमोर एक राष्ट्र म्हणुन उभे ठाकणे आवश्यक आहे. ९)लष्कराला जर सराकारचा पुर्ण पाठिम्बा, सहकार्य मिळाले तर त्यान्चे पण मनोबल उन्चावुन ते यशस्वीपणे दहशतवाद तातडीने काबुत आणु शकतात. पन्जाबचे उदाहरण आणी अनुभव आहेच आपल्या पाशी. अशाप्रकारे, लष्कर, पोलिस, कायदा, मिडिया सोबत राजकिय ईछाशक्ती, व एक जबाबदार नागरिक म्हणुन आपली पण काही जबाबदारी येते या सगळ्यान्च्या समन्वयाने तात्पुरता व कायमचा दहशतवाद सम्पवायला मदत होईल, ईतर मुद्द्यान्ची चर्चा आपण केलीच आहे.
|
Laalbhai
| |
| Monday, November 20, 2006 - 2:28 am: |
| 
|
Chyaayalaa, your post dated Wednesday, November 15, 2006 - 8:47 am: needs an appreciation. My heartiest congratulations to you on writing such feasible solution(though very tough to implement!). However, I still wonder what BJP/RSS is doing for this? (For that matter any political party, but I am wondering about RSS/BJP because you said sometime back that "RSS-Way" is the only solution to stop the terrorism.) Just minor addition as per my knowledge. You can not compare Punjab and Kashmir head to head. The situation is quite different. Mr. Gill had done good work in Punjab to stop the terrorism, but it was mainly people who wanted peace. Rural women of Punjab played very important role in Punjab. In contrast, Kashmiris lacks that kind of will-power. They do not have enough support from Center (which was opposite in case of Punjab.) All center/state governements have measerably failed to provide basic facilities to Kashmiris. So most of the young generation is jobless and workless and educationless. Evenif they are willing to go against terrorist, they are not sure that there will be a good future for them. Common man in Kashmir is not interested either in India or in Pakistan. They want good future and peace. Irony of the situation is that, none - who claims for Kashmir - has guts, will, vision and power to give such assurance to Kashmiries. There is no solution for Kashmir in near future, because politicians (from all sides) do not want that! Terrorism, of any form or from any origin can not be stopped by gun point. Period. You need to have people to support you.
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|