|
मंडळी तुम्हाला काय वाटतं? मला तरी इथला सपूर्ण कारभार गबाळग्रंथी झाल्या सारखा वाटतो आहे. शिस्त नाही.. प्रामाणिकपणा नाही. duplicate ID ची चंदी आहे. विशेष म्हणजे admin चा इथे न्याय नाही. परिणती तुमच्यासमोर आहे. मज्जाच मजा आहे बुवा इथे. भले भले आपला अवतार बदलतात. मै किस खेत की मुली हू बडे दुख की बात हैं आखिर हमने हमारी प्रामाणिकता उतार कर फ़ेकी दी अब हमे भी छक्के पंजे सिखने पडेगे.
|
हे बघा तुम्ही जे कोणी असाल ते... admin स्वत:चा वेळ, पैसा खर्च करून या लष्कराच्या भाकर्या भाजताहेत. वास्तविक हे फार ग्रेट काम आहे. लोक त्याचा फायदा घेताहेत, तुमच्यासकट. काही तुमच्यासारखे गैरफायदा घेतही असतील. तुम्हाला इथला कारभार आवडत नसेल तर admin तुम्हाला इथे यायला काय गूळखोबरे घेऊन आले होते की पालखी? तुम्हाला नीट लाभ घेता येत नसेल तर नका घेऊ पण उगीच दुगाण्या झाडण्याचे कारण नाही. मला माहीत आहे हा नेहमीचाच ID धारक आहे. दुसर्या कुठल्या कारणाने दुखावलेले अनेक शिखंडी इथे येऊन नथीतून तीर मारीत असतात. त्यातलाच हा प्रकार.. तसे पाहिले तर मूळ ID हाही बनावटच असतो. admin नी न्याय द्यायचे म्हणजे काय करायचे? त्यानी खरे तर स्वातंत्र्य दिले आहे. तुमच्या सारखे मूर्ख त्याचा गैरवापर करतात त्याला ते काय करणार.. मी सर्वाना आवाहन करतो की या विकृत आय डीच्या कोणत्याही पोस्टवर कुणी काहीही काॅमेन्ट्स न करता अनुल्लेखाने हा ID सम्पवावा!!
|
मला अनुल्लेखाने मारुन हा प्रश्न कायमचा मिटणार नाहीये रॉबीन. तुमचे काय इथे सर्वांचेच मायबोलिवर प्रेम आहे आणि तुमच्यासकट इथे सर्वजण admin च्या पाठिवर कौतुकाची थाप मारतील की त्यांनी जे काम करुन दाखवले दूरवर पसरलेल्या मराठी लोकांना एकत्रीत आणले ते प्रशंसनीय आहे. मला जे म्हणायचे आहे ते इतकेच की दिवसेंदिवस इथले वातावरण गढूळ होत चाललेले आहे. इथे duplicate ID नी नुसता धिंगाना मांडला आहे. त्याला आवरण्यासाठी आणि त्यावर बंदी घालण्यासाठी इथे काही परिवर्तन घडून येईल का? इथे परिवर्तन घडून यावे, हे संकेतस्थळ प्रामाणिकपणे चालावे असे admin ला वाटते का? इथल्या मायबोलिकरांना, ज्यांचा मायबोलिवर जीव जडला आहे त्यांना आपले duplicate IDes टाकून देऊन खर्या नावाने इथे लिहिणे जमेल का? पदोपदी इथे जे वाद होतात त्यातील निदान एखाद्या तरी वादावर admin ह्यांनी समंजसपणे फ़क्त दोन शब्द जरी बोलले तरी ती गोष्ट मायबोलिवर चांगले परिवर्तन घडून आणू शकते. पण इथे असे होत नाही. खुद्द इथले नेमस्तक 'छान मनोरंजन होत आहे आमचे' अशा प्रतिक्रिया लिहितात त्याची मला खूप खंत वाटते की अरे तुम्ही नेमस्तक म्हणून इथे काम करता मग काय फ़क्त अमुक एक पोष्ट इथल्या तिथे हलवणे किंवा उडवून टाकणे येवढीच तुमची जबाबदारी आहे? दरवेळी इथे एकच उत्तर ऐकायला मिळते "इथले नेमस्तक आपला परिवार सांभाळून इथली कामे करतात. Admin ह्यांनी आपल्या कष्टाच्या कमाईतून मायबोलिची निर्मिती केली. जे आहे ते खूप काही आहे. जे चालले आहे ते खूप काही आहे". हे उत्तर ऐकून फ़ुकट ID घेणारी व्यक्ती लाजिरवाणी होऊन मागे वळते आणि duplicate ID घेऊन इथले वातावरण गढूळ, कर्कश्य आणि कलुषित करणार्यांचे चांगलेच फ़ावते. तुमच्यासारख्या परिपक्व व्यक्तीला माझे म्हणणे कळू शकेल अशी माझी अपेक्षा आहे.
|
Zakki
| |
| Sunday, November 19, 2006 - 3:30 pm: |
| 
|
आत्ता! अहो Duplicate ID असो किंवा अगदी खरेखुरे, पाळण्यातले किंवा कागदोपत्री जे नाव असेल ते घेऊन लिहिले तरी काय लिहिले आहे त्याला महत्व आहे. विनोद, कोपरखळ्या, इस्लामी दहशतवादाची, लग्नातील विधींची चर्चा यात बरेच चांगले मुद्दे दिसून येतात. मग ID , समजा 'गाढव' कींवा 'अफजल' अशी आहे म्हाणून ते खोटे ठरते का? तरी बरे काही वेडेवाकडे, लिहीले तर बरेचसे Disk space च्या black hole मधे वाहून जाते. शेवटी एक महामंत्र: सारख्याच गोष्टी दोन व्यक्तींना भिन्न दिसतात, त्याचा परिणाम त्यांच्यावर भिन्न होतो. ते सर्व त्या व्यक्तीच्या तात्कालिक भावनेवर अवलंबून आहे. तुम्हाला जी व्यक्ति आवडत नसेल, तिला मार्मिक टोमणे मारलेले तुम्हाला आवडतील, तर कुणि म्हणतील, गढूळ, कर्कश्य नि कलुषित आहे! मला तरी असे वाटते की जे आवडत नाही ते सोडून द्यावे, नि जे आवडते त्यात भाग घ्यावा. अगदी कुणि तुम्हाला डायरेक्ट प्रश्न विचारला तरी त्याला उत्तर न देण्याचे स्वातंत्र्य तुम्हाला आहे, त्याला 'उथळ, पांचट नि घृणास्पद' असे म्हणण्याचे स्वातन्त्र्य तुम्हाला आहे!
|
Ajjuka
| |
| Sunday, November 19, 2006 - 4:04 pm: |
| 
|
एकाक्षरी प्रश्नासूर व इतर अनेक आयडींच्या मालका, निखळ विनोदाने लिहिलेली गोष्ट तुला झेपली नाही, स्वतःच्या चुका शोधायची, मान्य करायची हिम्मत नाही म्हणून नवीन आयडी घेऊन कुणावरही कसेही चिखलफेक सुरू केलीस म्हणून शेवटी ऍडमिनने खबरदारीचा उपाय म्हणून ती गोष्ट काढून टाकली तर आता तू ऍडमिन वरच घसरतोस? उपकार समज तू अजून इथे आहेस. यालाच चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात
|
Chafa
| |
| Sunday, November 19, 2006 - 5:00 pm: |
| 
|
स्वतःच्या चुका शोधायची, मान्य करायची >>>> हा कळीचा मुद्दा आहे. इथे वारंवार होत असलेली नाचक्की पाहूनही 'आपल्याकडून काहीतरी चुकत असेल' अशी जर शक्यताही गृहीत धरायची नसेल तर इतरांवर आग पाखडण्यात काय अर्थ आहे? 'माहीत नाही' नावाचा एक BB होता पूर्वी. त्याचा गैरवापर करुन तो कोणी बंद पाडला? रेसिपीज वर प्रश्नांचा भडीमार कोणी केला? शब्दार्थ BB वर उच्छाद कोणी मांडला? त्यात विचारलेल्या ९९ टक्के प्रश्नांची उत्तरं, गूगल केले, तर सहज सापडतात. उगाच तिथे प्रश्न विचारले म्हणजे आपण किती मोठे साहित्यिक असा आव आणायचा असेल तर मग तिथे झालेल्या टिंगलीलाही स्वतःलाच जबाबदार ठरवावे. सतत विचारलेल्या बावळट प्रश्नांना नवीन मायबोलीकर प्रामाणिकपणे उत्तरे देतातही. पण एक दिवस ते सुद्धा वैतागतातच. माणसाने चौकस जरुर असावे पण त्याचबरोबर किमान सामान्यज्ञान जवळ बाळगावे. ते जर नसेल तर गप्प तरी बसावे. ते म्हणतात ना Even a fool, when he holdeth his peace, is counted wise! आणि आता चक्क आपल्या कृत्यांचे खापर ऍडमिनच्या माथी फोडायचे? हद्द झाली! इथे दिवा देण्यात काही अर्थ नाही. जे लिहिले आहे ते गांभीर्यानेच लिहिले आहे. त्याचा उपयोग शून्य आहे हे माहीत असूनही. रॉबिनहूड, माफ कर, रहावलं नाही.
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|