Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through November 17, 2006

Hitguj » Views and Comments » Relationships » नवरा, बायको, संसार, तडजोड इ. » Kanyadaan! » Archive through November 17, 2006 « Previous Next »

Zakki
Wednesday, November 15, 2006 - 9:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दान ह्या शब्दाचा झक्कींनी सांगितलेला अर्थ मला तरी मान्य नाही

मी दान चा अर्थ सांगीतला नाही, कदाचित् दुसरा काही असू शकेल असे म्हंटले होते. मी त्या विधीचा अर्थ सांगीतला. त्यात 'दान' अशी भावना येत नाही. तर त्या विधीला दान का म्हणतात मला माहित नाही.

बाकी मुलगी दान करायला ती काही वस्तू नाही, हे मला मान्य आहे.

आमच्या पिढीत (अंध)श्रद्धेपायी असले विधी केले जातात. माझ्या मते हे सगळे विधी का करावेत ह्याचे उत्तर फक्त अंधश्रद्धा हेच आहे.

आजकाल लग्न म्हणजे 'पाऽर्टी', 'धमाल'. अग्निसमोर शपथ वगैरे गोष्टींना आता अर्थ नाही, कारण बर्‍याच जणांना अग्नि देव आहे, किंवा पवित्र आहे असे मनातून वाटतच नाही. गीतेवर हात ठेवून शपथ घेतात नि खुशाल खोटे बोलतात. तर शो कशाला करायचा?

माझ्या मुलीने लग्न लास वेगास ला जाऊन केले. जावयाची आई ज्यू नि बाप कॅथॉलिक. त्यांच्या घरी कुणाला चर्च मधे इन्टरेस्ट नाही! आपल्या पद्धतीचे लग्न केवळ आमच्या समाधानासाठी त्यांनी करून घेतले. आता लग्न म्हंटले म्हणजे जेवण नि पार्टी आलीच, मग हातासरशी लग्न पण उरकून घेतले एव्हढेच! कुणिही एव्हढा विचार केला नाही की हेच का नि तेच का? काय करायचे ते करा, नि आम्हाला पाऽर्टीला मोकळे करा लवकर एकदाचे!


Asmaani
Wednesday, November 15, 2006 - 9:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चंद्रकोर, एक स्त्री म्हणून हे कन्यादान प्रकरण मलाही तितकेसे पटत नाही. पण दुसरीही एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायला हवी, की हल्लीच्या युगात कन्यादान हे केवळ शास्त्र म्हणून केले जाते. पूर्वीच्या काळी कन्यादान हे अगदी शब्दश: घेतले जाई. तेव्हा मग अगदी सासरी कितीही त्रास झाला तरी तिने सासरीच रहायचे, आइ वडील मुलीच्या घरचे पाणीही पिणार नाहीत, पती परमेश्वर वगैरे rediculous समजूती होत्या. आता ह्यापैकी काय राहिले आहे. सासरी त्रास झाला, नाही पटले नवर्‍याशी, तर मुलगी आई वडिलांकडे परत येउ शकते.("दान दिलेली वस्तू परत घेता येत नाही" हा दानाचा नियम धाब्यावर बसवून आईवडील आपल्या मुलीला पुन्हा स्वत्:च्या घरात आधार देवू शकतात. हल्लीच्या नव्या anti domestic violence act प्रमाणे तर लग्न झालेले असो किंवा नसो, वडीलांच्या घरावर मुलीचा हक्क आहे. चु. भू. दे. घे.). आइ वडीलांनी मुलीच्या घरची पाणी न पिणे वगैरे घोष्टी तर आजच्या जमान्यात अगदीच कालबाह्या आहेत. आजच्या कमावत्या मुली आईवडीलांना आर्थिक आधार देतातच पण सुशिक्षित जावई देखील ह्यात मागे नाहीत. आणि बर्‍याच सुशिक्षित कुटुम्बाम्मधे हल्ली पती परमेश्वर न रहाता पत्नीचे चांगले मित्र व्हायच्या प्रयत्नात( काही यशस्वीही आहेत ह्यात. ) असतात.
सांगायचा मुद्दा असा की जो विधी(कन्यादान) मुदलातच आपला अर्थ महत्त्व, नियम आणि परिणाम सग़ळंच गमावून बसला आहे त्याचा कशाला इतका विचार करायचा? जीवशास्त्रात vestegious organs (कदाचित स्पेलिंग चुकले आहे) बद्दल माहिती होती. म्हणजे असे अवयव की ज्यान्चे उत्क्रांती च्या प्रक्रीयेत कार्य नष्ट झाले पण तरीही ते अजूनही शरीरात असतात. उदा. कानाचे बाहेर्चे स्नायू जे प्राण्यामधे अजूनही अcतिवे असतात. पण माणसा.म्म्धे इनcतिवे झाले आहेत. ह्या कन्यादानासारख्या प्रथांचे exactly तसेच आहे. so just leave it! ok! माय्बोलीवर बरेच interesting bb आहेत. आपण चन्द्रकोर, तुम्हीसुद्धा, आपला मोर्चा तिकडे वळवू या!


Sanchu
Wednesday, November 15, 2006 - 9:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


चंद्रकोर,वरील पुस्तके मीही वाचलेली नाहीत,पण मला वाटते कन्यादानपेक्षाही
नॉर्थ मधील states मधे जे चालते ते भयानक आहे....
तिथे तर मुलगी जन्मली कि लगेच.......जावुदे,लिहव्त पण नाही असे आहे ते...........
लग्नानंतर हुंड्यावरुन छ्ळ होणे, मारणे असले प्रकार अजुनही खेड्यापड्यात चालु अहेत ग..........स्रीच स्रीची शत्रू हेच खरे.......
अशा प्रथा थाम्बविने जास्त गरजेचे आहे असे नाही वाटत तुला?
अग, लग्नानंतर मुलगी राणीसारखी रहात असेल तर काय त्या एका विधीपाई रडत बसायचे? arranged असो की love marriage , जाणार तर मुलगीच ना मुलाकडे?
आणि कन्यादान केल्यानंतर त्या नवर्यामुलाच्या आयुष्याचे सोने की मातेरे, हे मुलगीच करणार ना? :-)
दिवे घ्या शेवटच्या वाक्याला नाहीतर त्यावरुन भल्ता वाद व्हायचा :-)......


Rachana_barve
Wednesday, November 15, 2006 - 10:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला तरी वाटते अस चिडण्यापेक्षा प्रत्येक लग्नाळू (किंवा ज्यांच लग्न ठरल आहे आणि ज्यांना वैदिक पद्धतीने लग्न करायचे आहे अशा) लोकांनी प्रत्येक विधीचा अर्थ आधी विचारून मग चर्चा करून कोणत्या विधींना खरच आजच्या युगात अर्थ आहे असेच विधी करावेत. आजकाल मुलं पण बर्‍यापैकी open असतात. आणि पटतच नसेल तर सरळ रजीस्टर लग्न करून मोकळे व्हावे

Anilbhai
Thursday, November 16, 2006 - 1:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पटतच नसेल तर सरळ रजीस्टर लग्न करून मोकळे व्हावे >>
हे काही पटत नाही. पटत नसेल तर लग्नच का करावे?. :-)


Yog
Thursday, November 16, 2006 - 2:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भाई.. .. .. ..

Deshi
Thursday, November 16, 2006 - 2:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ऐक्झटली अनिलभाई,

शिवाय कन्यादान नंतर अजुन एक विधी असतो तो लोक विसरले वाटत. ' गर्भदान '


Zakki
Thursday, November 16, 2006 - 3:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नि शिवाय कानपिळी नावाचा पण एक प्रकार असतो. फक्त वराचे कान पिळून त्याला सांगतात, माझ्या बहिणीशी नीट वाग. मला वाटते वराच्या बहिणीनी पण वधूचे कान पिळून तिला सांगायला पाहिजे की नीट वाग.

इथल्या मुलांना हे प्रकार म्हणजे नुसते गंमत वाटते, माझ्या मुलीने साफच सांगीतले, की माझे दान वगैरे काही नाही. खरे तर तुझ्या आईने मला तू दान केला आहेस हेच खरे. कारण आता मी सांगेन तसे वागायचे, आईचे नाही! उगीच काहीतरी जुन्या प्रथा आहेत, आपण त्याच्यावर वादविवाद घालायला पुणेकर थोडीच आहोत? एकदा हा लग्न्समारंभ पार पडला की इतर अनेक गोष्टी आहेत वाद करायला!


Chandrakor
Thursday, November 16, 2006 - 9:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

you r right anilbhaee खरंच! कन्यादानासारख्या अनैतिक, स्त्रीचे माणूसपणच नाकारणार्‍या प्रथांचा आग्रह धरणार्‍या पुरुषाशी कुठल्याही स्त्रीने खरंच लग्न करु नये!

Swa_26
Friday, November 17, 2006 - 5:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देशी, तो विधी 'गर्भदान' नसून 'गर्भाधान' असा आहे. (गर्भ धारण करण्यासाठी योग्य असा मुहूर्त बघून तो केला जात असावा) चु. भू. द्या. घ्या. just a correction !!

Swa_26
Friday, November 17, 2006 - 5:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वरील पोस्ट हे केवळ चुकीची दुरुस्ती करण्यासाठी आहे, त्यावर चर्चा सुरू करून BB चा विषय भरकटविण्याचा हेतू नाहीय.

Giriraj
Friday, November 17, 2006 - 6:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा! कोण करतय कन्यादान! :-)

Mahesh
Friday, November 17, 2006 - 8:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लेक लाडका या घरचा होणार जावई त्या घरचा
हे गाणे म्हणणारेही कमी नसतील. (स्वानुभव नाहीये.)


Naatyaa
Friday, November 17, 2006 - 2:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नि शिवाय कानपिळी नावाचा पण एक प्रकार असतो. फक्त वराचे कान पिळून त्याला सांगतात, माझ्या बहिणीशी नीट वाग.>>> परत कान पिळुन घेउन वर मुलिच्या भावाला आहेर करायचा.. हेकब???

Varadakanitkar
Friday, November 17, 2006 - 3:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझा अजुन एक विचार... लग्न होऊन मुलगी सासरी जाते आणि सासरच्या सगळ्यांना सांभाळते पण असे किती पुरुष आहेत जे बायकोच्या घरच्या सगळ्यांना सांभाळायची जबाबदारी घेतात? म्हणून कन्यादान होते तसेच पुत्रदान पण व्हावे आणि मुलांनी सुद्धा बायकोच्या आईवडिलांना तशाच प्रेमाने सांभाळावे. कितीतरी वेळा मुलीचे आईवडिल एकटे पडतात पण मुलाच्या आईवडिलांवर तशी वेळ नाही येत हे चुकीचं आहे. जशी मुलगी त्याच्यासकट family ची जबाबदारी घेते तशी त्यालाही घ्यायला लागवी आणि हे आपल्या विधिंमधे नक्कीच कुठे सांगितल्याचं मला आठवत नाही...

Varadakanitkar
Friday, November 17, 2006 - 3:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्कीकाका माझ्या लग्नात हा विधी झाला होता. सगळ्या नंडांनी माझा कान पिळला होता. मी तेव्हाच म्हटलं की आता माझ्या नवर्‍याचं दान पण करा तर लोकांनी माझं तोंड बंद केलं की आता उगाच लग्नात तमाशा नको म्हणून...:-(

Deshi
Friday, November 17, 2006 - 3:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वरदा ह्याला विधीची काय गरज आहे. माझ्या लहान भावाच्या सासरी सग्ळ्या मुलीच पर्यायाने त्यांना कोणीतरी सांभाळनारे (आर्थीक) पाहीजेच आहेत. माझा लहान भाउ आर्थीक हातभार लावतोच दर महीन्यात तेही पुत्रदान न करता.
आणी हल्ली कोणी मुली सासरच्यांना सांभाळत नाहीत. लगेच नवरा म्हणजे हक्क पण सासर्चे म्हणजे नवर्याच्या जिवावर टपलेले अशा भुमीका मुली घेतात.



Varadakanitkar
Friday, November 17, 2006 - 3:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देशी अगदी चुकीचं आहे. माझ्या आजुबाजुला अमेरीकेतही खूप जणी आहेत ज्या भारतात परत जातात कारण त्यांच्या सासु सासर्‍यांना सांभाळायला कुणी नाही पण अशा कुणीही नाहीत ज्या आई वडीलांसाठी परत जातात...आणि मुली त्या घरात फ़क्त आर्थिक मदत करत नाहित तर जाऊन राहातात ज्यामुळे मानसिक आधारही असतो त्या वयात कुणीतरी जवळ असल्याचा. असं कुणी केलय की बायकोचे आई वडील एकटे आहेत त्यांनाही जवळ कुणीतरी हवं म्हणून त्यांच्याजवळ ४ दिवस तरी जाऊन राहीलेत (कायमचं तर सोडाच)? हे होत नाही हेच खरं...

Chandrakor
Friday, November 17, 2006 - 3:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चला, at least कोणाला तरी माझं म्हणणं लक्षात येतंय तर! वरद, लोकंनी तुझं तोंड बंद केलं हे सहाजिक आहे गं! हक्क मागणारी सून कशी परवडेल कुणाला? पण at least तू बोलण्याचं धाडस केलंस हे नक्कीच कौतुकास्पद आहे. काही दिवस काही वर्ष मुलींना गप्प बसवले जाईल, but definitely not forever!. lets hope so!
आणि ज्यांन कन्यादानाचा फार पुळका आहे आणि ज्यांना," कन्यादनाची प्रथा मुलीला नवर्‍याच्या मालकीच्या वस्तूचे किंवा गुलामाचे status देते" हे मान्य नही न, त्यांनी एक गोष्ट लक्षात ग्यावी की अजुनही खेड्यापाड्यामधेच नव्हे तर अगदी पुण्यासारख्या पुढारलेल्या शहरात सुद्धा नवर्‍याला प्रॉपर "मालक" म्हणून सम्बोधण्यात येते. माझ्या एक मैत्रीणीच्या बहिणीचे लग्न झाले. नंतर तिच्या नवर्‍याबद्दल बोलतांना तिचे आई वडील कायम, "आमच्या चारुचे मालक असंच बोलायचे. तडफडाट होत असे ऐकून. शेवटी एक दिवस ह्यावरुन मी तिच्या आईशी खूप वाद घातला. शेवटी उत्तर असेच मिळाले की आम्ही कन्यादान केले आहे. तेव्हा ते तिचे मालकच आहेत. माझी कन्यादानाबद्दलची तिडिक किती वाधली असेल तुम्हीच विचार करा!


Asmaani
Friday, November 17, 2006 - 4:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मग देशी, मुलीला सासरी जाण्यासाठीही,चंद्रकोरने म्हटल्याप्रमाणे तिने देवाब्राम्हणासमोर, एकनिष्ठतेची आणि सासरच्यांना आपले मानून साम्भाळण्याची शपथ घेतली तर पुरायला हरकत नाही. त्यासाठी तिचे दान कशाला करायला हवे?

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators