|
आपल्या हिंदू विवाह पद्धतीत कन्यादान फार महत्त्वाचे मानले आहे. पण खरोखर तुम्हाला सगळ्यांना या रुढीबद्दल काय वाटते? एका जिवंत माणसाचं दान करणं नैतिकदृष्ट्या बरोबर आहे का? एका पुरुषाने दुसर्या पुरुषाला एक स्त्री दान करणे ह्यात स्त्रीचा अपमान नाही का? शिवाय लग्न स्त्री व पुरुष दोघांचे होत असते. मग ज्यावेळी मुलीचे वडील कन्यादान करतात त्याच वेळी मुलाच्या आईने पुत्रदान का करु नये? आपली सर्वांची मते अपेक्षित आहेत.
|
Manuswini
| |
| Tuesday, November 14, 2006 - 6:51 am: |
| 
|
मला तरी हा एक जुन्या चाली रुढीतील शब्द आहे, त्या वर उगाच उहा पोह करुन काही होणार नाही राग नसावा पण अश्या बर्याच प्रथा आहेत त्या वर नुसती चर्चा करुन काहीच फायदा नाही ते राजीव गांधी सारखे 'हमे देखना है' असे आहे. फक्त लोकांचे thinking and approach बदलला तर ठिक. पुरुषप्रधान संस्कृती तेव्हा होती म्हणुन स्त्री सासरी जायची.. वरील post चा अर्थ असा नसावा की कन्यादान support केले आहे. आता हेह्c पहा ना लग्नात मुलाचे पाय धुणे अजुन्ही चालते, मुलाकडची म्हणुन मुलिच्या आई वडीलानेच फोन करणे जर विवाहविषयक गोष्टी बोलायच्या असतील(हा समज अजुन्ही MS, MBA वगैरे so called socially moved circle people still believe and मुकपणे parents हीच मुले support करतात की तुझ्या आई वडीलांनीच फोन करावा राग तर येतो पण काय करणार तेव्हा उगाच पाने पाने लिहुन काय फरक? लिहिणारे लिहितात पण खरे कोणी सांगेल की मी लग्नात असा आग्रह केला नाही की ही प्रथा मोडीस काढली किंवा माझे आई, वडील स्वःता अशी अपेक्षा करत नाही की मुलिच्या कडुनच पत्रिका येणे, त्यांनेच फोन करणे, मुलाच्या आई वडीलांच्या आवडीनुसार होणे जावु दे हा एक रटाळ topic आहे. रागवु नये दिवे घ्यावे
|
Zpratibha
| |
| Tuesday, November 14, 2006 - 7:12 am: |
| 
|
मनु दिवे कशाला? अगदि मनातल बोललीस. चोथा कितिहि चावला तरि......
|
मनु अगदी खर बोललीस! आणि मुलगी मुलाकडे जाते [मला वाटत अजुनही--काही सन्माननीय अपवाद वगळता]म्हणुन ती मुलाला देउन टाकली,मुलाला तिचे दान दिले[विकली नाही, कुठलीही गोष्ट फुकट दिली म्हणजे दानच दिली. होना?]म्हणुन "कन्यादान" हा शब्द असावा. मुलगा सासरी गेला असता[आणि तोही फुकट] तर कदाचित "पुत्रदान" शब्द रुढ झाला असता. मला यातले विशेष काही कळत नाही जे वाटले ते लिहिलेआहे [चु. भु द्या. घ्या.]
|
Shyamli
| |
| Tuesday, November 14, 2006 - 2:07 pm: |
| 
|
पहीली गोष्ट....... आपण कीतीही सुधारलो अस स्वत:ला म्हणत असलो तरी लग्न आणि त्याला अपरीहार्य असणार्या सगळ्याच पध्दती, रुढी, परम्परा म्हणुन सांभाळतोच तसच हेही आहे ह्यात कन्यादान केल्यानी मला नाही वाटत कुणा मुलीचा अपमान होतो किंवा तत्सम काही....... नुसत ह्या वीधी ला नाव कन्या"दान" आहे म्हणुन ते काही कुणा व्यक्तिचा कुणाला केलेल दान नाहीये... ह्या विधीला तसाच सुरेख अर्थही आहे..... लग्नात प्रत्येक वीधीचा अर्थ समजाऊन सांगतात गुरुजी लोक तो ऐकावा.. सांगत नसतील तर सांगाव तसं नक्कीच हे वीधी पटायला लागतील.... आणि इतर गोष्टी करतोच ना आपण केवळ रुढी, परंपरा म्हणुन मग या एकाच पध्दतीनी काय घोड मारलय? हां बदलायचच झालं तर खरच काही पध्दती बदलायला हवय उदा: मनु तुला वाटल तस की मुले लग्नात पाय धूउन घेतात............यालाही कारण आहे त्या क्षणि नवरामुलगा विष्णुरुप समजला गेला आहे आपल्या कडे आणि ती वरपूजा आहे, तर हे ज्या कोणाला आवडत नसेल त्यांनी हे बदलाव ना असे छोटे छोटे बदल होतच आले आहेत पुढेही होत राहतील.........
|
Disha013
| |
| Tuesday, November 14, 2006 - 2:54 pm: |
| 
|
नवरामुलगा विष्णुचे रुप आहे तर नवरीमुलगी लक्ष्मीचे रुप समजले जाते.....मग या हिशोबाने मुलाच्या आई-वडीलांनी पण सुनेचे पाय धुवायला हवेत... पण असे होत नाही आणि होणारही नाही......... अशा परम्परा बदलणार नाहीत मुलाकडची मंडळी.......सो या चर्चेला अंत नाही
|
Zakki
| |
| Tuesday, November 14, 2006 - 3:35 pm: |
| 
|
माझ्या मते कन्यादानाचा अर्थ 'मुलीचे दान' असा नाही. त्या विधीला कन्यादान का म्हणतात मला माहित नाही. पण संस्कृतात एकाच शब्दाचे अनेक अर्थ होऊ शकतात, समास कसा सोडवाल त्यावर ते अवलंबूब असते, किंवा त्या शब्दाचा कोणता अर्थ तुम्ही लावाल त्यावर! तर त्या विधीत, माझ्या मते असे सूचित केले आहे की पाणी जसे मुलीच्या वडिलांच्या हातातून जावयाच्या हातात पडते नि नंतर मुलीच्या हातात पडते, त्या प्रमाणे ती मुलगी धर्माचे पालन, सद्वर्तन इ. चालीरिती माहेरच्या प्रमाणेच सासरीपण अखंडित ठेवेल. कुठेतरी पुढल्या मंत्रांत असेहि म्हंटले आहे की, मुलीचे वडिल जेंव्हा म्हणतात, ही मुलगी तुमच्या घरी मी दिली, तेंव्हा जावई म्हणतो की देणारे तुम्ही नसून, आमचे एकमेकांवरील प्रेम आहे म्हणून आम्ही हा लग्नविधी करतो आहोत. वगैरे वगैरे. माझ्या मते, आपण एव्हढे Physics, Chemistry, Biology, Math., law, logic इ. शिकतो नि ९९ टक्के मार्क मिळवतो, पण आपल्या हे कसे लक्षात येत नाही की कुठल्याहि गोष्टीवर मत देण्या आधीच तिला त्याज्य ठरवू नये, नीट अभ्यास करावा. एव्हढे हुषार आहात तर तेही समजून घेता येईल, नि त्याप्रमाणे ठरवता येईल की कन्यादान, पायधुणी चा खरा अर्थ काय, नि मग ठरवा ते त्याज्य आहे का, करायला पाहिजे का? वास्तविक, आजकाल अमेरिकेत पाय धुणि कुणीच करत नाही. धर्माचे पालन यापेक्षा 'पाऽर्टी" साठी निमित्त म्हणून लग्न होते. कुणिही मनाला येईल तसे लग्न लावतात नि लावून घेतात! अहो अनेक वर्षांपूर्वी (१९५८, १९५९) या देशात भारतीय नि संस्कृत समजणारे अत्यंत थोडे लोक होते, तेंव्हा आमचे येथिल त्या वेळचे गुरुजी, कै. पटवर्धन यांनी रामरक्षा म्हणून लग्न लावले अशी एक दंतकथा आहे!
|
Saurabh
| |
| Tuesday, November 14, 2006 - 5:26 pm: |
| 
|
श्यामली ईज म्हणिंग ऑफ़ राईट! गुरुजी लग्नात विधिंचे अर्थ सांगण्याचा प्रयत्न करतात. तो पटेल किंवा नाही हा वेगळा मुद्दा. दान ह्या शब्दामागे बरीच मोठी चांगली भावना आपल्या समाजात आहे. १. दान दात्याला परत घेता येत नाही. २. ग्राहकाची (ग्रहण करणारा ह्या अर्थाने, नाहीतर परत चर्चा व्ह्यायची ह्या शब्दावरून) ते दान सुयोग्य पद्धतीने सांभाळणे, योग्य तो आदर करणे आणि कोणत्या उद्देशाने ते दान त्याला दात्याने दिलेले आहे ह्याची जाणीव बाळगणे ही नैतिक जबाबदारी आहे. विकत घेतलेल्या वस्तुचा हवा तसा वापर ग्राहक करु शकतो. दानाचे तसे नाही. ३. दान हे सामान्यतः ग्राहकाचे भले करण्यासाठी दिलेले असते. आपली जबाबदारी कमी करण्यासाठी नाही. ते सुयोग्य हातात दिले जावे ही देखिल दात्याची जबाबदारी आहे. असे अनेक भावार्थ सांगता येतील. अर्थात हेच सगळे अर्थ मुलाला का लागु नाहीत असाही प्रश्न विचारता येईल. तर अर्थातच ते लागु आहेत. मुले सासरी जात असती तर उलटाही शब्द प्रचलीत झाला असता. ज्या कुटुंबात ती मुलगी जाणार त्या कुटुंबाच्या सदस्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव अप्रत्यक्षरित्या करुन देण्यात येते. लग्नाच्या अनेक विधींतून अशाच जाणीवा दोन्ही पक्षांना करून दिल्या जातात. केवळ दान हा शब्द आला म्हणून बिथरायचे कारण नाही.
|
बिथरायचे कारण एवढेच आहे की दान ह्या शब्दाने स्त्री ला वस्तूचा दर्जा मिळतो. कन्यादान हे नवर्या मुलाला केले जाते. म्हणजेच त्या विधीने दान करण्यात आलेली स्त्री कायमची त्याची होते. मग अर्थातच पतीला सर्वस्व मानून त्याच्याशी जन्मभर एकनिष्ठ रहाणे वगैरे आलेच. आता गम्मत अशी आहे की नवरा मुलगा बाकी मोकळाच आहे. त्याचे दान झालेले नाही. त्यामुळे मग असा अर्थ झाला की पत्नीवर त्याचा पूर्ण हक्क आहे पण पत्नीचा त्याच्यावर हक्क नाही. (माझा इथे एकनिष्ठतेवर अजिबात आक्षेप नाही. on the contrary मला असे म्हणायचे आहे की अशा एकतर्फी पद्धती असं सुचवतात की एकनिष्ठता ही फक्त स्त्रीची जबाबदारी आहे. आणि झक्की, कन्यादान हे कन्यादान ह्या अर्थीच दिले घेतले जाते. "मुलगी देणे " हा शब्दप्रयोग फार commenly वापरला जातो.
|
Saurabh
| |
| Tuesday, November 14, 2006 - 9:20 pm: |
| 
|
विवाह विधी हे हक्क वगैरे प्रकरण सुचवतात हे पटत नाही. तो समाजाने केलेला विवाहसंस्थेचा गैरवापर आहे. विवाह विधी केवळ कर्तव्ये आणि जबाबदार्यांचीच जाणीव करून देतात (मुखतः वधु आणि वराला, आणि आजुबाजुच्या घटकांना देखिल). हक्क / अधिकार हा ज्याने त्याने स्वतःच्या वर्तनाने कमवायचा आसतो.
|
Ajjuka
| |
| Wednesday, November 15, 2006 - 2:18 pm: |
| 
|
भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास हे राजवाड्यांचे पुस्तक वाचा. प्रत्येक गोष्टीला संस्कृती संस्कृती म्हणत गहिवरल्या नजरेने बघणे थोडे तरी थांबेल. वि + वह या धातूचा मूळ अर्थच मुलीला पळवून नेणे असा होतो. लग्नाच्या प्रत्येक प्रथांमधे प्राचीन समाजाच्या व्यवस्थेचे प्रतिबिंब आजही दिसते. मुळात लग्नसंस्था सुरू झाली त्याचे महत्वाचे कारण म्हणजे पुरूषांना असलेली insecurity . स्वतःचा वंश वाढावा अशी प्रबळ नैसर्गिक इच्छा आणि झालेले मूल आपलेच आहे याची खातरजमा करण्याची 'त्या स्त्रीचा शब्द' यापलिकडे नसलेली सोय, यातून आलेली insecurity . मग त्यातून स्त्रीवर मालकी असण्याची गरज. इत्यादी इत्यादी... असो.. मनू म्हणते तसं.. चावून चावून चोथा झालाय.. जोवर कन्यादान किंवा मुलगी देणे म्हणजे खरंच दान असा अर्थ होत नाही असे म्हणत रहाल तोवर आशेला जागा नाही.
|
Dinesh77
| |
| Wednesday, November 15, 2006 - 2:20 pm: |
| 
|
चंद्रकोर, कन्यादानाच्या आधी नवरा मुलगा मुलीच्या वडिलांना "नातिचरामि" असे वचन देतो हे विसरलात का? म्हणजे नवरा मुलगा ही एकनिष्ठतेची जबाबदारी स्विकारतो.
|
Chandrakor
| |
| Wednesday, November 15, 2006 - 3:33 pm: |
| 
|
oh really? वचन नवरा मुलगा मुलीच्या वडीलांना देतो? मुलीला नाही? असे असेल तर परत माझ्याच म्हणण्याला पुष्टी मिळते. मुलगी ही एक दान करण्यायोग्य वस्तू असल्याने जो दान करतो त्याला वचन देण्यात येतेय. मुलील वचन द्यायची गरज नाही. वस्तूला कय कळणारे वचन वगैरे नही का? आणि by the way ही so called "एकनिष्ठतेची शपथ" पाळली किती जायची हो? ह्या कन्यादानाला कन्यादान ह्याच अर्थी पाहिले जात असे ह्याचा पुरावा म्हणजेच स्त्रीला विधवा झाल्यास पुनर्विवाहास(पूर्वीच्या काळी) असलेली बंदी! तिचे दान झाले म्हणजे ती वस्तू आता कायमची नवर्याच्या मालकी ची झाली. मग तो मेला तरी तिच्याशी दुसरा कुणी लग्न करणार नाही. मग़ ती वस्तू जाळून नष्ट केली जात असे. असो. हे झाले पूर्वीच्या जमान्यातले. आजही स्त्री च्या वस्तू status मधे फारसा फरक पडलाय असे मला वाटत नाही. खरोखर आपल्या विवाहपद्धतीचे निरिक्षण केल्यास असेच दिसून येते की बघबघीच्या prograam पासून कन्यादानापर्यंत प्रत्येक विधी म्हणजे स्त्री जातीच्या अपमानाची मालिका आहे. कान्दापोहे प्रोग्राम मधे सुद्धा, मुलगा मुलगी बघायला जातो. पण जिथे मुलगी मुलाकडे जाते तिथे मात्र मुलगी "दाखवायला " नेली जाते. जोपर्यंत बायकांना ह्या गोष्टींची चीड येत नाही, तोपर्यंत हे असेच चालू रहाणार!
|
Chandrakor
| |
| Wednesday, November 15, 2006 - 3:47 pm: |
| 
|
आणि नवरा मुलगा जर वचन देतो तर मग नवर्या मुलीने वचन द्यायला काय हरकत आहे. तिलाही वचन देण्यास सांगावे की बाबा," ह्य माणसाचा मी नवरा म्हणून स्वीकार करतेय. मी त्याच्याशी एकनिष्ठ राहीन. त्याच्या कुटुम्बाला माझं समजेन." that's it! why it is necessary to donate her? मुलाच्या वचनावर जर तुम्ही विश्वास ठेवणार असाल तर मग मुलीने काय घोडं मारलंय? का मुलीला वचन देण्याचाही अधिकार नाही? अरे हो sssss ! न स्त्री स्वातन्त्र्यमर्हती नाही का? मग बरोबर आहे. "कन्यादान" चिरायू होवो!
|
Deshi
| |
| Wednesday, November 15, 2006 - 4:16 pm: |
| 
|
जोपर्यंत बायकांना ह्या गोष्टींची चीड येत नाही, तोपर्यंत हे असेच चालू रहाणार! मग तुम्हाला चिड तरी का येत नाही? चंद्रकोर तुम्ही पुर्वीचा जमाना असे लिहिले तो फक्त काही शतकांचा आहे. त्या आधी भारतात मातृस्त्ताक पध्दत होती. मुलीला तिचा नवरा स्वतला शोधता येत होता व पुन्रविवाह ही अस्तीत्वात होता. तुम्ही जो अन्याय अन्याय म्हणता तो गेल्या काही शतकातील परकीय आक्रमंनामुळे न्रिमान झालेली मरगळ आहे. व तुमच्या आमच्या सारखे सुशिक्षीत ती काढुन टाकायचा प्रयत्न करत आहेत. तुम्हाला व अनेकांना लग्न संस्था मान्य नसेल तर तुम्ही तसेही एकत्र आता राहु शकता व समाजाचा दृष्टीकोन बदलत आहे अशा रिलेशन्स बद्दल. मी देखील स्त्री फक्त गुलाम आहे ह्या विचाराचा नाही. पण तुम्ही तरी कुठे ते पुर्ण मंत्र वाचले आहेत. नुसते कन्यादान हा श्बद मात्र पकडुन ठेवला आहे व कोणी पुर्षानी एकादे पोस्ट मांडले की लगेच ते उडवुन लावत आहात. झक्की नी जसे सांगीतले की दान ह्या शबदाचे अन्के अर्थ आहेत पण ते तुम्हाला मान्य नाही. अगदी मान्य की बघायचा कार्यक्र्म वाईट मग at least स्वत्: पासुन तुम्ही तो कार्यकर्म करुन नका त्या ऐवजी हॉटेल, बागेत भेटा. अनेक जन अशी करता. मग ते पुर्ष का बायकांचे गुलाम झाले का? वर तुम्ही लिहीले एकनिष्ट फक्त पत्नीच राहते पती नाही. हे कसे काय बुबा जनरलाईज करु शकता तुम्ही. तुमचा कन्यादान ह्या शब्दाला विरोध समजु शकतो पण पुरुष म्हणजे स्त्री ला क:पदाथे समजनारे ही भुमीका काही योग्य नाही वाटत. (तुमच्या सर्व पोस्ट मध्ये तसाच सुर वाटतोय.)
|
Nalini
| |
| Wednesday, November 15, 2006 - 6:05 pm: |
| 
|
पण जिथे मुलगी मुलाकडे जाते तिथे मात्र मुलगी "दाखवायला " नेली जाते. मला तरी वाटतं, हि प्रथा सर्वत्र(समस्त हिंदू धर्मात) नाही. आमच्याकडे मुलगा; मुलीला पहायला मुलीच्या घरी येतो. बाकी तुमचे चालू द्या.
|
Yog
| |
| Wednesday, November 15, 2006 - 6:18 pm: |
| 
|
चन्द्रकोर.. ज्या पद्धतीने तुम्ही एकान्गी प्रश्ण विचारून bb उघडला आहे त्यावरून असे प्रश्ण विचारण्यामागे तुम्हाला फ़क्त वाद आणि तिरस्कार अपेक्षित आहे असे दिसते.. कोण कसा वागतो किवा स्त्रीला कसे वागवले जाते हा वेगळा विषय आहे त्याचा सम्बन्ध उगाच कुठल्यातरी सोहळ्याशी जोडून मग त्या पध्दतीच कशा चूकीच्या आहेत हे सान्गणे कुठल्याही तर्काला धरून योग्य वाटत नाही. आणि केवळ त्याच अनुशन्गाने लिहायचे असेल तर हा अन यासारख्या सम्बन्धीत अनेक विषयान्ची इथे already कडवे चोथ, पौर्णिमा उलटून गेली आहे मग पुन्हा अस्तानन्तर ही नविन चन्द्रकोर कशाला..? त्यातूनही तुम्हाला खरोखरच जर कन्यादान या हिन्दू संस्कृतीतील सोळा संस्कारापैकी एक पवित्र मानल्या गेलेल्या संस्काराबद्दल काही प्रश्ण आणि माहिती हवी असेल तर उत्तर द्यायला आवडेल. अर्थात त्यासाठी तितका सुस्पष्ट, शुध्ध अन सन्तुलीत दृष्टीकोन तुमचा असेल तर. नाहीतर काय झक्की नी म्हटल्याप्रमाणे एखादा शब्द घेवून त्याच्याबद्दल पूर्ण माहिती न करून घेता नुसत्याच शब्दान्च्या लाह्या भाजायच्या असतील तर चालू देत. तशा लाह्या भाजणार्या भडभुन्ज्या भगिनी अन बन्धू इथे भेटतीलच. त्यातूनही वेळ मिळाला तर स्वताच्या कल्पनाशक्तीला आवर घालून अनेक अभ्यासक, PhDs , पुरोहीत, संशोधक (स्त्री व पुरुष दोन्ही) यानी मिळून एक अतीशय उत्कृष्ट सम्पादीत केलेले पुस्तक जरूर वाचा : विवाह संस्कार शोध व बोध (सन्कलन, राष्ट्र सेविका समिती, पुरोशीत शाखा, नाशिक) यात पाच भाग आहेत : भारतीय विवाह संस्कार पद्ध्दती हेतू व उद्दिष्ट्ये (१) विवाहापूर्वी (२) प्रत्त्यक्ष विवाह समारम्भ (३) विवाहानन्तर (४) शन्का समाधान व विवाह विशयक कायदा (५) या पुस्तकात एकन्दरीत विवाहाचा अर्थ, विवाह संस्कार, हळद, देवप्रतिष्टा, मन्गलाष्टके, कन्कणबन्धन, कन्यादान, सप्तपदी, लक्ष्मीपूजन अन अशा कितीतरी महत्वाच्या विषयावर अतीशय वैज्ञानिक, तात्विक अन logical भाषेतून उहापोह केला गेला आहे. यातील तिसर्या भागात page 158 पासून पुढे, कन्यादान विधी, संस्कार, अर्थ, सर्व सर्व दिले आहे. संस्कृत शोल्कान्पासून प्रत्त्येकाने त्याचे केलेले interpretation in past and today's context .. शक्य असते तर मि इथे लिहीले असते.. but its almost 5 page chapter . वेळ मिळेल तेव्हा माझ्या रन्गीबेरन्गी पेज वर लिहीन. तेव्हा ही स्त्री वस्तू, अपमान, पुत्रदान असली बालिष्ट धूळ उडवणे जरा थाम्बवा नाहीतर उद्या स्त्रीच्या गळ्यात मन्गळसूत्रच का "घन्टा" का नाही बान्धत असा bb एखाद्या उपटसुम्भाने उघडला तर त्या चर्चेतून काय निष्पन्न होईल याच विचार करून पहा. (पटत असल तर घ्या नाहितर सोडून द्या..)
|
Chandrakor
| |
| Wednesday, November 15, 2006 - 8:49 pm: |
| 
|
योग, माझ्याविरुद्ध आगपाखड करण्यापूर्वी जरा माझी पोस्ट नीट(सुस्पष्ट शुद्ध आणि संतुलित दृष्टीकोन ठेवून) वाचा म्हणजे मला नक्की काय म्हणायचे आहे ते तुमच्या लक्षात येईल. शेवटी जळे त्याला कळे म्हणतात ते खरेच आहे. ज्यांना कधीही दान केले जाणार नाही त्यांना माझे म्हणणे पटणार नाही. तुम्ही सांगितलेले पुस्तक मात्र नक्की आवर्जून वाचेन मी. आणि दान ह्या शब्दाचा झक्कींनी सांगितलेला अर्थ मला तरी मान्य नाही. दान म्हणजे दान. आपली एखादी वस्तू without any consideration प्रतिफळाची अपेक्षा न ठेवता दुसर्याला देणे म्हणजे दान. आणि देशी, ह्या गोष्टीची एक स्त्री म्हणून मला चीड येते अपमान वाटतो म्हणूनच येथे लिहिण्याचा प्रपंच केला ना? नलिनी, मुलगा मुलीच्या घरी जाऊ दे(बघाबघीला) किंवा मुलगी मुलाकडे, मुलाच्या बाबतीत मुलगी बघणे आणि मुलीच्या बाबतीत मुलगी दाखवणे असेच शब्दप्रयोग होत असतात. देशी, खूप ऐकले आहे की once upon a time भारतात, मातृसत्ताक पद्धती होती. नक्की कधी होती हो? ह्यासंदर्भात पुरावा म्हणून एखादी कथा किंवा एखादी हकिकत उपलब्ध आहे का? हा मातृसत्ताक काळ रामायण किंवा to be precise मनुस्म्रुती च्या आधी होता का? मी खोचकपणे विचारत नाहीये. i am asking genuinely. ह्या काळात पुरुष सासरी जात होते का? पुत्रदान अस्तित्वात होते का? तसे नसेल तर मातृसत्ताक पद्धतीचा नेमका अर्थ काय होता? कन्यादान जे supporta करत आहेत त्यांना, पुत्रदानाविषयी एवढा आक्षेप का असावा? पूर्णपणे पत्नीचे होण्यात त्यांना कमीपणा वाटतो का भीती वाटते? आणि माझ्या प्रश्नाचे उत्तर नाही दिले तुम्ही? पती जर नातिचरामी सारखे वचन देउन स्वथाचा विवाह पूर्न करु शकत असेल तर पत्नीच्या बाबतीत हे का चालत नाही? तिचे दान का व्हावे लगते? अ जे support करत
|
Chandrakor
| |
| Wednesday, November 15, 2006 - 9:00 pm: |
| 
|
कन्यादान हा पवित्र संस्कार आणि पुत्रदान ही बाकी बालीश धूळ! वा! जगातल्या प्रत्येक भागात या ना त्या प्रकारे विवाह होत असतात. काही ठिकाणी तर चक्क मुलीच्या वडीलांना पैसे दिले जातात. हा प्रकारही निंद्यच आहे. पण कन्यादानही मला तरी तितकेच अमानुष वाटते. मुली च्या लग्नात मुलीसाठी पैसे घेणे आणि जावयाला वरदक्षिणा देउन मुलगी दान करणे ह्या दोन्ही गोष्टी सारख्याच अनैतिक आहेत. कारण विकणे काय आणि दान करणे काय, दोन्हीत स्त्रीचे status वस्तू चेच रहाते. लग्ना आधी वडीलांच्या मालकी आणि लग्नानंतर नवर्याच्या मालकीची फक्त एक वस्तू!
|
Deshi
| |
| Wednesday, November 15, 2006 - 9:06 pm: |
| 
|
नक्की कधी होती हो? >>>>> केरळाचा मलबार भागात आजपण आहे. अदिवासी समाजाचा तुमचा अभ्यास किती आहे ते मला माहीती नाही पण महाराश्ट्राचा काही भागात (मुंडा समाज) आजही आइचे नाव लावतात बापाचे नाही. त्याला मातृसत्ताक पद्धत म्हणतात. तुम्हाला पुरावा हवा असेल तर तुम्ही आजही अगदी महाराष्ट्रात चंद्रपुर च्या जंगलातिल पुराम अदिवासींना भेटा. आजही तिथे मुलगी तिचा नवरा ठरविते व मुलाला काही रक्क्म वधु पित्याला द्यावी लागते. (तिन पुरावे झाले). नेमका तुमचा प्र्श्न काय आहे. कन्या दान च्या ऐवजी पुत्रदान हवा का तुम्हाला? म्हणजेच स्त्री मोठी पुरष नको असे म्हणायचे आहे का? माझ मत विचाराल तर आज दोन्ही कामी नाही. नवरा बायको समान पातळीवर असावेत. कोनीही कोणाला कमी लेखु नये. thats all लग्नानंतर नवर्याच्या मालकीची फक्त एक वस्तू! काय म्हणता काय ईकडे माझ्या बायकोचेच मला ऐकावे लागते. माझ्या सर्व मित्रांचाही हाच अनुभव. माझ्या मैत्रीनी देखील नवर्याना सर्वांसमोर कधी कधी झापतात. कुछ पट्या नही तुमच लग्न झाल आहे का? नसेल तर अजुन्ही वेळ गेली नाही. निदान तुमच्या पुरते तुम्ही बघने, दाखविने, कन्यादान, विधी हे सर्व टाळु शकता. at least तुमची जी चिड आहे ती कामी तरी येईल. स्वत पुरते बंद करुन पाहा निदान तुम्ही तरी सुटाल. मनु नी आधी सांगीतल्या प्रमाने ह्या जुन्या चालीरीती आहेत उगीच चिड चिड करुन काय फायदा.
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|