|
Chyayla
| |
| Friday, November 10, 2006 - 10:37 pm: |
| 
|
आयला, सेक्युलर पिल्लावळिला मुद्दा व पुराव्यासकट दिलेले उत्तर चान्गलेच झोम्बले वाटत, बरेच चवताळले कि हो. स्वनामधन्य, व तथाकथित व्यव्हारिक सत्यतेचा काही तरी पुरावा देण्याची तसदी करावी. आता दलितान्वरच्या अत्याचारासाठी कोणाला शिव्या द्याव्या? येवुन जावुन हिन्दुन्ना मग द्या शिव्या, द्या खोटी उदाहरणे असले प्रकार दिसत आहे, पण ज्या सन्घटना जातीविहिन समाज एकत्र करतेय त्याना का म्हणुन यात गोवण्याचा प्रयत्न. ईथे असल्या तद्दन खोट्या आरोपान्ना उत्तरे देण्याची गरज नाही, उत्तरे दिली की दुसरे खुसपट शोधायचे, आणी उत्तराची जबाबदारी आमच्या कडुन का? तुमची पण काही जबाबदारी आहे की राव, त्यात काय सुट मिळवली की काय? आता राहुलला विचारावेसे वाटते, आता बोल तुझे मित्र काय करत आहेत...कोणता विषय सुरु आहे "ईस्लामिक दहशत वादावर उतारा" आणी हे काय सुरु आहे?
|
बोध्द घर्मातील महायन व हिमायन कोणी घडवुन आणले? त्याच जैन घर्माला मुख्य घर्म कोणी माणले? १९८४ मध्ये फक्त कॉग्रेस चेच लोक होते हत्या करणारे त्यांना तुम्ही हिंदु घर्माचे अत्याचार म्हणवता? अहो ते तर तुमचेच पार्टी बंधु होते. गुजरात मधील अत्याचार हे दोन्ही घर्माचे होते. मुंबै मध्ये दोन्ही घर्मानी मार खाल्ला. कुळकर्णी निदान मुद्दे तरि व्यवस्थीथ मांडा.
|
Deshi
| |
| Friday, November 10, 2006 - 10:46 pm: |
| 
|
आयला, सेक्युलर पिल्लावळिला मुद्दा व पुराव्यासकट दिलेले उत्तर चान्गलेच झोम्बले वाटत>>>>> LOL.
|
Santu
| |
| Saturday, November 11, 2006 - 6:55 am: |
| 
|
दिनेश अहो याना अक्कल कधीच येणार नाही.कारण ज्याच्या कित्येक पिढ्या या आक्रमक मुसल्माना नी नासवल्या कित्येक अबलान वर वर्षनु वर्षे बलात्कार केले.सभाजी गुरुगोविंद सिगासारख्या धर्मवीरा ना हालहाल करुन मारले. अजुन काश्मिर मधे पण हिन्दु चे सरसकट कत्तल केली.तरि यांचे डोळे उघडत नाहित.एव्हढा मोठा भुभाग हिरावुन घेतला (धर्मा च्या नावखाली) तरी यांचे डोळे उघडत नाहित. असल्या लोकाची तुलना फ़क्त फ़ाळणिच्या काळी सिंध मधिल काॅग्रेसी हिंदु नेत्याशी करता येईल. हे लोक तेव्हा सावरकरांची व संघाची अशीच रिक्रुटवीर म्हणुन हेटाळणि करत. पण जेव्हा त्यांच्या स्त्रिया मुलींवर मुसलमानानी त्यांच्या डोळ्या देखत बलात्कार केले तेव्हा यांचे डोळे उघडले पण त्याला फ़ार उशिर झाला होता.
|
विशिष्ठ गणवेश, अभिवादन करण्याची पद्द्धत, सन्चलने, सन्कुचीत राष्ट्रवाद, राष्ट्राच्या गतवैभवाच्या कहाण्या, एका अल्पसन्ख्य समुदायाला टार्गेट करणे, त्या समुदायाला एकदा हाकलून दिले की सर्व समस्या आपोआप सुटतील हा द्रुढ विश्वास. गतकाळातील पराभवाची वारन्वार आठवण करीत द्वेशाची आग पेटती ठेवणे. या सार्या गोष्टी हिटलर कडून उचललेल्या आहेत. सन्स्क्रुत प्रचुर भाषणे, वेदिक सन्स्क्रुतीचे गुणगान ( एकही वेद न वाचता) आपलीच सन्स्क्रुती सर्वश्रेश्ठ, भाकरी शी काहीही सम्बन्ध नसलेली प्रतिकात्मक आन्दोलने, अशा सार्या गोस्ठी समाजातील केवळ काही वर्गान्नाच अपील होतात. आणी म्हणूनच हजारो उच्चशिक्शीत चारित्र्यवान आणी प्रामाणीक तरुणानी घरादाराकडे पाठ फिरवून प्रचार केला तरीही मध्यमवर्गीय ब्राम्हणान्च्या पलिकडे सन्घ अजूनही पोचलेला नाही. भारतातील सर्व जातीधर्मान्ना घेऊन एकविसाव्या शतकात पुढे जाण्यासाठी कोन्ग्रेस ला पर्याय नाही.
|
Zakki
| |
| Saturday, November 11, 2006 - 1:24 pm: |
| 
|
मला वाटते इथे इस्लामी किंवा दहशत या शब्दांपेक्षा वाद हा एकच शब्द लोकांच्या मनात भरला! Admin , जरा 'वाद' शब्द लहान नि बाकीचे, विशेषत: उतारा, मोठे नि ठळक कराल का?, धन्यवाद. अहो, मधे कुणि तरी म्हंटले होते, की हे आपापसात आरोप प्रत्यारोप, कॉंग्रेस, संघ अशी भांडणे करण्यापेक्षा इस्लामी दहशतवादावर उतारा सांगा. तर आत्तापर्यंत माझ्या पहाण्यात आलेले दोन प्रयत्न: एक लालभाईंनी नुकतेच लिहीलेले आहे की मुसलमानांनी स्वत:हून सुधारण्याचे प्रयत्न केले पाहिजेत. माझ्या मते हा फार मूलगामी नि अतिदूरच्या (१०० ते २०० वर्षे ) काळातील उपाय आहे. सध्या ताबडतोब करण्याजोगा एकच उपाय. नाहीतरी सध्या भारतात गेला बाजार चारपाचशे पक्ष असतीलच, तर एक नवा पक्ष काढा, दहशतवादविरोधी (नि हो, त्याचे नाव ताबडतोब 'द. वा. वि.' किंवा मराठीत ज्याला 'डीडबल डब्ल्यू' म्हणाल असे ठेवा). नि इतर कोणत्याहि पक्षाने सांगीतले नसेल असे त्याचे धेय ठेवा, 'वेळ पडल्यास आम्हीच दहशत घालू, पण दहशतवाद थांबवूच.' इति
|
Chyayla
| |
| Saturday, November 11, 2006 - 1:24 pm: |
| 
|
राहु द्या विजय तुमचे हे सगळे मुद्दे आधिच खोडल्या गेले आहेत, आता परत त्याची उजळणी करायची आवश्यकता नाही. तुम्ही स्वता: जातियवाद, द्वेष यातुन बाहेर पडणार नाही तोपर्यन्त या परकियान्कडुन उसने घेतलेले रडगाने गात बसाल. तुमची स्वता:ची गुलामगिरीची मानसिकता गेली नाही. अहो देशी, हेच ते सोनियाचे गुलाम शिरोमणी जे काश्मिर पाकिस्तानला देउन टाका म्हणणारे देशद्रोही यान्च्या या सगळ्या बाष्कळ कारणामागे देशद्रोहाची भावना असल्यास काय नवल हो, अगदी त्याला साजेसे लिहिलेत. तुम्ही तर अजुन एकदाही विषयाला धरुन ईस्लामिक दहशतवादावर उतारा किन्वा मुद्दे मान्डले नाही, फ़क्त स्वता:चा जातीद्वेष काढत बसलेत, तुम्हाला काय अधिकार दुसर्याना जातियवादी म्हणण्याचा. या आता... सोनियाचे पाय चाटायची वेळ झाली असेल. आज काल जय करायला विसर्लेत तुम्ही
|
Santu
| |
| Saturday, November 11, 2006 - 1:29 pm: |
| 
|
मध्यममार्गि ब्राह्मणा पलिकडे संघ पोचला नाहि.)))) देशातल्या दोन मुख्य पक्षा मधिल एक पक्ष. आजही काॅग्रेस व भाजप मधे खासदार सन्खेत फ़ारसा फ़रक नाहि. हा पक्ष उभा केला हे काय फ़क्त ब्राह्मण मागे असल्याचे लक्षण आहे काय? आत्ता सुध्दा युपीत भाजप च मुलायम ला पर्याय आहे काॅग्रेस नाहि.(वाचा निकाल परवाचा) राजनाथ,कल्याणसिन्ग,मुन्डे हे काय ब्राहम्ण आहेत.? उलट सोनिया बाईच ब्राहम्ण आहे(जर राजिव ने आईचा धर्म लावला असेल तर.)
|
Chyayla
| |
| Saturday, November 11, 2006 - 1:49 pm: |
| 
|
झक्की, तुमचा उतारा एकदम मान्य. एक शन्का ईथे नुसत्या गोष्टी आणी स्वता:च्याच देशप्रेमी देशबान्धवान्चे द्वेष करणारे, जातियवादी, काश्मिर पाकिस्तानला द्या म्हणणारे, अफ़जल ची फ़ाशी माफ़ करा म्हणणारे, एकान्गी हेकट विचार करणारे, स्वता:च दहशतवाद्यान्चे समर्थक म्हणुन स्पष्ट दिसतात अशान्कडुन काय अपेक्षा करावी किन्वा यान्चे काय कराल?. चोराला मदत करणारा चोरच ना, मग ह्यानापण दहशतवादी का म्हणु नये. मी आरोप करत नाहिये, हे सगळे त्यान्चीच स्वता:ची मुक्ताफ़ळे आहेत. जर सगळ्या पक्षान्नी मिळुन असा द. वा. वी काढला तर, कॉन्ग्रेस, डावे आणी ईतर जातियवादी पक्षान्चे अस्तित्वच सम्पले. कारण काय सान्गायची आवश्यकता आहे? नुसत्या कल्पना करुन नाही चालत हो कसे कराल ते सान्गा, मी माझे मुद्दे मान्डले व त्यानन्तर मी तुम्हाला, आणी योगी ना आवाहन केले होते की तुम्ही कसे कराल ते सान्गा, मी पण तुम्हाला सहाय्य करतो, योगी तुम्ही माझ्या प्रश्नाचे उत्तर अजुन दिले नाही
|
Chyayla
| |
| Saturday, November 11, 2006 - 2:07 pm: |
| 
|
सन्तु, मागे काही वर्षे असलेच जातीद्वेष पसरवणार्याना अचानक रावण महान वाटु लागला, दसर्याच्या दिवशी श्री रामाच्या विरोधात रावण विजय र्याली काढायचे उद्योग सुरु केले बरेच वर्ष हे चालु होते. पण कोणीतरी जेन्व्हा त्यान्ना सान्गितले की रावण तर ब्राह्मण होता....झाले मला वाटत तेन्व्हा पासुन बन्द. विजय तुम्ही ज्या नेहरुन्च्या कॉन्ग्रेसचा उदो उदो करताय ना ते पण ब्राह्मणच, राजीव सोनिया त्यान्चेच... आता झाली ना पन्चाईत सन्स्क्रुत भाषा एका जातीची काय? वाल्मिकी काय ब्राह्मण होते काय ज्यान्नी रामायण सन्क्रुत मधे लिहिले उलट तुम्ही बघाल, आपले सन्त, महात्मे, कित्येक रुशी मुनी, देव सुद्धा हे अब्राह्मण आहेत. उलट त्या रावणाला सुद्धा ब्राह्मण असुन आपले मानले नाही तेन्व्हा हे सिद्ध होते की आपली सन्स्क्रुती ही जातियवादी नाही. किन्वा एका विशिष्ट जातीची जहागिर तर नाहीच. लालभाईन्ना परत राग यायचा पण हे सत्य म्हणुन मी लिहिणारच, कारण हा हेतुपुरस्सर एका जातीचा द्वेष करण्याचे वीष ईन्ग्रज, मिशनरी व ईतर परदेशी शक्तिन्नी पेरले आहे, तेच उसने आणी खोटे ज्ञान हे ईकडे पाजळत आहे, मी त्यान्ना आवाहन करतो स्वता:च्या बुद्धिनी विचार करा, किती दिवस तुम्ही वैचारिक गुलाम रहाणार आहेत.
|
Zakki
| |
| Saturday, November 11, 2006 - 3:14 pm: |
| 
|
च्यायला, धन्यवाद. माझ्या वरील लिखाणात एक चूक झाली आहे, ती सुधारतो. दहशतीचा फारसा उपयोग नाही. त्या ऐवजी सर्व मुसलमानांना, विशेषत: अतिरेक्यांना पत्रे लिहून कळवा, की संजय दत्तने 'गांधीगिरी' करायला सांगीतली आहे. तर, तुम्ही हिंसाचार थांबवला नाहीत तर आम्ही तुमच्याशी वाद घालू! नि केवळ 'झलक' म्हणून वरील सर्व लेखांच्या प्रति admin कडून मागून घ्या नि त्यांना पाठवा!! एका दिवसात शरण येतील ते सगळे!! अरे हो, त्या अतिरेक्यांचे पत्ते, आपल्या आमदार, खासदार, पोलीस किंवा संजय दत्त यांच्याकडून घ्या, किंवा त्यांनाच आधी हे तुमचे पत्रक पाठवा.

|
मुन्डे हे काय ब्राहम्ण आहेत.? मुन्डे लवकरच कॉन्ग्रेस मध्ये येणार आहेत. सन्घाच्या काही लोकन्न जवळून पहाण्याची सन्धी मला मिळाली. त्यान्चे व्यक्तिगत चारित्र्य शम्भर नम्बरी सोन्यासारखे असते यात शन्का नाही. त्यन्च्या मनात जातीयतेचा विचार ही येत नाही हे पण अगदी खरे. मे फक्त अपील बद्दल बोलत होतो.
|
Chyayla
| |
| Sunday, November 12, 2006 - 1:02 am: |
| 
|
१) विजय, तुम्ही एवढे गुणगान केले सन्घाच्या लोकान्चे हेच जरा तुमच्या लालभाईन्ना सान्गा "व्याव्हारिक सत्य". २)लष्करी खाक्या, शिस्त, सुत्रबद्धता याला काय हीटलरी म्हणाल काय? ३)राष्ट्राच्या गतवैभावाच्या कहाण्या- का? ते खोटे आहेत का? ईतिहासापासुन धडा घेउन वर्तमानकाळात चुका सुधारुन, उज्ज्वल भविष्य निर्माण करणे चुक आहे का? हिन्दु सन्घटन ईतिहासापासुन शिकले कि जातियवादाने काय होते, त्यान्नी जातियवाद कधीच फ़ेकुन दिला. खरे जातियवादी तुम्ही आहात जे एका जातीला टार्गेट करीत आहात. तुम्ही का जातियवाद पाळता याच उत्तर द्या की राव. मग तुमच्या प्रश्नाला अर्थ उरतो. ४)हिन्दु सन्घटन कोणाच्या विरोधात नाही, एखाद्या विशिष्ट समुदायाला हाकलुन लावणे किन्वा द्वेष करणे ह्या क्षुल्लक कारणासाठी मुळीच नाही ते आधी पण स्पष्ट केले आहे. हिन्दु सन्घटन केवळ हिन्दुचे दोष नष्ट करुन त्यान्ना एकत्रित करण्यासाठी आहे. ५)सन्स्क्रुत सगळ्या भाषेची जननी, सगळ्यात सम्रुद्ध भाषा आहे तसेच एकमेव प्राचीन चिरन्तन टिकलेली सन्स्क्रुती जी आजच्या काळातही मानवकल्याण साधते त्याचा अभिमान बाळगायला काय हरकत आहे? आज खर म्हणजे जग इस्लामिक जिहाद, क्रुसेड, पाश्चात्य तणाव्पुर्ण जीवनशैली यामुळे त्रस्त झाले आहे, ते आज केवळ हिन्दु सन्स्क्रुती कडे मोठ्या आशेने पहात आहे, योग, ध्यान, आयुर्वेद ह्या सगळ्यान्नी एक विश्वास निर्माण केला आहे. आज मी ज्या भारतिय मेडिटेशन सेन्टर मधे जातो तिथे मला भारतियान्पेक्शा पाश्चात्यच लोक जास्त भेटतात. ६)आपली सन्स्क्रुती म्हणजे "वसुधैव कुटुम्बकम", व "सर्वेपी सुखिन: सन्तु" अशी घोषणा करणारी आहे, बाकी एवढी प्रगल्भता अजुन कुठे दिसते? आणी अशा सन्स्क्रुतीवर उभ्या ठकलेल्या राष्ट्रवादाला तुम्ही सन्कुचित कोणत्या आधारे म्हणता? ७)वैदिक सन्स्क्रुती केवळ तोन्डाने बडबड करण्यासाठी नाही की वेद वाचायची गरज पडेल, ती प्रत्यक्ष जगण्यासाठी आहे आणी त्यात भाकरी पण आलीच. ८) खरे म्हणजे भाकरी विषयी तुम्ही हायकमान्ड सन्स्क्रुती जोपासणार्या सोनियाला विचारा जर तुम्हाला खरच भाकरीची एवढी चिन्ता असेल तर, केवळ कॉन्ग्रेसच्याच राज्यात महागाई वाढली आहे, आणी आता सुद्धा गरिब माणसाला जगणे मुश्किल केले आहे. ईतके वर्ष कॉन्ग्रेसनेच राज्य केले ना, मग याला जबाबदार कोण, महाशय तुम्ही दुसर्याकडे बोट दाखवण्यापुर्वी आधी स्वता:कडे बघा. ९)अपील सगळ्यानाच होते, फ़क्त जे मेकॉलेचे बेसुमार भेसळयुक्त उत्पादन झाले आहे त्यान्ना सोडुन.
|
Santu
| |
| Sunday, November 12, 2006 - 12:42 pm: |
| 
|
मुंडे काॅग्रेस मधे येणार)))))येवु द्या की मग काय वाईट त्यात.प्रश्न काॅग्रेस मधे येण्याचा नाहि.सन्घ किंवा भाजप नी एका मागास वंजारी माणसाला उपमुख्यमंत्रि केले ना का फ़क्त ब्राह्म्णाची तळि उचलली याचा आहे?
|
Chyayla
| |
| Sunday, November 12, 2006 - 4:22 pm: |
| 
|
तुमच्या अपीलाच्या खोडसाळपणावर वरच्या पोस्ट्मधुन निघालेला मुद्दा- जर पाश्चात्य व जगातील ईतर ज्याना सन्स्क्रुत, गिता, योग, ध्यान, आयुर्वेद ई. माहित नव्हते किन्वा त्यान्च्या मुळ सन्स्क्रुतित नव्हते तरी सुद्धा त्यान्ना अपील होते, तर मग जो भारतात जन्मला मग तो कोणीही असो त्याला अपील न व्हायला काय झाले? जिहादी, मिशनरी, कम्युनिस्ट (परत राग यायचा कुणाला, पर्वा नाही) आणी ईतर ज्यान्ची अवैज्ञानिक, एकान्गी, कट्टर, असहिष्णु, मध्ययुगीन तत्वे फ़ोल ठरली व ज्यामुळे लोकान्चा भ्रमनिरास झाला, त्यामुळे घाबरुन जाउन त्यान्नी पसरवलेला हा खोडसाळ विचार जेन्व्हा तुमच्या सारखे मुळ भारतिय सुद्धा स्वता:च्या बुद्धीने विचार न करता ईथे पाजळता तेन्व्हा तुमची कीव वाटते. यावर उत्तर देण्याची तसदी घ्यावी, नाही जमल्यास अजुन एखादे खुसपट काढालच, बघु या अजुन तुमच्या कडे काय विष भरुन ठेवले आहे, निदान ते पण बाहेर निघुन गेले तर बरे राहील, तुमच पण मन साफ़ होईल... तर येउ द्या.
|
Zakki
| |
| Sunday, November 12, 2006 - 4:45 pm: |
| 
|
केवळ हिन्दु सन्स्क्रुती कडे मोठ्या आशेने पहात आहे, नुसतेच अध्यात्मासाठी नाही तर अमेरिकेसारख्या भांडलवादी देशात आज मोठमोठ्या संस्थांचे CEO, president यांनी गीतेचे तत्वज्ञान, त्यांच्याच उद्योगात रोजच्या व्यवहारात कसे वापराता येइल, हे समजून घेण्यासाठी अधिकाधिक भारतीयांना सल्लागार म्हणून घेतले आहे, नि त्यांच्याबरोबर न चुकता वेळ घालवतात. ३० ऑक्टोबर चा Business Week वाचा!
|
Laalbhai
| |
| Monday, November 13, 2006 - 2:41 am: |
| 
|
केदार, "संघद्वेश" वगैरे नाही फारसा. उलट मागे एकदा (बहुतेक मूडी यांना उत्तर देताना) इतकी मोठी संघटना उभी करणे कौतुकास्पद आहे, असेही मी म्हटले होते. राग आहे तो "आपणाशिवाय इतर सर्व राष्ट्रद्रोही आणि कम - अस्सल" या अहंगंडाचा! आणि इतर धर्मांविषयी द्वेश पेरत समाजाची मानसिक फाळणी करण्याच्या प्रयत्नाचा. बरं यातून स्वधर्महित तरी साधते आहे का? तर मुळीच नाही. हे सर्व केवळ सत्तेसाठी चाललेले आहे. म्हणजे यांच्या कोलांट्याउड्या बघा.. १९९१ ला मनमोहनसिंगानी अर्थव्यवस्थेला नवे रूप देण्याचा प्रयत्न केला तेंव्हा संघाने स्वदेशीच्या नावाने बोंब मारली. सत्ता आल्यावर स्वदेशीसाठी काही करायचे सोडून निर्गुंतवणूकीला चालना दिली. बहुराष्ट्रीय कंपन्यांसमोर पायघड्या घातल्या. (विदेशी गुंतवणून वाढल्यामुळेच India shining नावाची आचरट कल्पना यांनी काढली!) आता सत्ता नाही तर ह्यांचा सुदर्शन बहुराष्ट्रीय कंपन्यांना शिव्या देत, आयुर्वेदाच्या पिछेहाटीसाठी MNC ना जबाबदार धरतो! (परवाच्याच पेपरात बातमी आहे!) सत्तेसाठी किती कोलांट्याउड्या माराव्यात? जी संघटना स्वतःला अहंगंडाने तत्ववादी म्हणवते, ती स्वतःच्याच तत्वांची इतकी मोडतोड करते, हे हस्यास्पद नाही का? आयुर्वेदाचे एक उदाहरण घेतले तरी संघाचे पितळ उघडे पडते. आयुर्वेदिक औषधे निर्माण करणार्या देशी कंपन्याच औषधात भेसळ करून आयुर्वेदाचे नाव बदनाम करत असतात. ह्यासाठी संघाने काय केले? उत्तर : काही नाही! आयुर्वेद हे एक उदाहरण झाले. हिंदू धर्माचे इतर काही high points आहेत, ते जोपासण्यासाठी, टिकवण्यासाठी, वाढनवण्यासाठी संघ काय करत आहे? हिंदू समाजात असलेल्या तृटींसाठी संघ काय करत आहे? ताळेबंद मांडला तर ह्या सगळ्याच बाबतीत बोंब आहे. म्हणजे धर्माचा वापर केवळ सत्ता हस्तगत करण्यासाठी का? सध्याची संघाची परिस्थिती पहाता ती एक गोंधळली आणि सत्ता गेल्याने हवालदिल झालेली संघटना आहे. पुन्हा सत्तेवर येण्यासाठी इतर धर्मियांविरुद्ध द्वेश निर्माण करण्याचे घातक कारस्थान ही संघटना करत आहे, म्हणून राग. आणि ह्याचे अनुयायी कसे आंधळे असतात पहा. आज जो "स्वयंसेवक" होतो तो उठून "समान नागरी कायद्याचा" पुरस्कार कतओ. पण खुद्द त्यांच्याच गोळवलकर गुरुजींचा समान नागरी कायद्याला मुद्देसूद विरोध होता, ह्याची किती स्वयंसेवकांना कल्पना आहे? त्यांचा विरोध, त्यांचे मुद्दे समजावून घेण्याचा प्रयत्न कोण करते आहे? कुणीही नाही, कारण मग सत्तेसाठी जो प्रचार करायचा त्यात बाधा येईल. तुम्ही कोणत्या काळात संघाला वहून घेतले मला कल्पना नाही. पण आजचा संघ हा अतिशय गोंधळेला, सत्तेसाठी हपापलेला आणि म्हणूनच अतिशय घातक आहे!
|
Laalbhai
| |
| Monday, November 13, 2006 - 2:48 am: |
| 
|
सन्घ किंवा भाजप नी एका मागास वंजारी माणसाला उपमुख्यमंत्रि केले ना का फ़क्त ब्राह्म्णाची तळि उचलली याचा आहे? >>>> मुंडे यांना प्रमोद महाजनांनी वरती आणले. BJP अथवा संघाने नाही. तसेही मुंडे यांचे "राजकिय कर्तृत्व" हा चर्चेचा विषय होऊ शकत नाही. पण वैयक्तिक हितसंबंधांसाठी एखाद्या मागास जातीतल्या माणसाला वरती आणले तर त्याचा "पक्षाचे धोरण" म्हणून गाजावाजा करणे, हा दांभिकपणा आहे. ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी : मुंडे आणि महाजन हे नातेवाईक आहेत. मुंडेंचे राजकारणातले godfather महाजन. म्हणून तर महाजन गेले आणि महाराष्ट्र भाजपात मुंडेंना शह द्यायला लोक सरावले!(वाचा : ताजा चिमूरच्या जागेचा शिवसेनेबरोबरचा वाद.)
|
Laalbhai
| |
| Monday, November 13, 2006 - 3:29 am: |
| 
|
वेदिक सन्स्क्रुतीचे गुणगान ( एकही वेद न वाचता) >>> सन्स्क्रुत प्रचुर भाषणे, वेदिक सन्स्क्रुतीचे गुणगान ( एकही वेद न वाचता) आपलीच सन्स्क्रुती सर्वश्रेश्ठ, भाकरी शी काहीही सम्बन्ध नसलेली प्रतिकात्मक आन्दोलने, अशा सार्या गोस्ठी समाजातील केवळ काही वर्गान्नाच अपील होतात. आणी म्हणूनच हजारो उच्चशिक्शीत चारित्र्यवान आणी प्रामाणीक तरुणानी घरादाराकडे पाठ फिरवून प्रचार केला तरीही मध्यमवर्गीय ब्राम्हणान्च्या पलिकडे सन्घ अजूनही पोचलेला नाही. उच्च!!
|
Laalbhai
| |
| Monday, November 13, 2006 - 3:40 am: |
| 
|
स्पेन वर मुस्लीमांनी खुप वर्ष राज्य केले. त्यांनी चर्च ला मश्जीद व रस्त्यांना पण मुस्लीम नावे दिली. नंतर अनेक वर्षांनतर परत किरीस्ताव लोकानी स्पेन जिंकले व त्यांनी परत त्या मशीदींचे चर्च मध्ये रुपांतर केले व रस्तानां परत किरेस्त्वाव नावे दिली. दुसरे उदा. तुर्कांचे. केमाल पाशाने सर्व ईंग्रजीपणा पुसुन (अगदी रोडच्या नावापासुन) तुर्की पणा आणला. ह्या माणसाला सारे जग आदर्श माणते. कारण? कारण त्याला स्वत्:ला माहीती होते तो कोण आहे. स्पेन मधल्या किरिस्तावांना माहीती होते तो कोण आहे. >>> केदार, मला ह्या विषयावर वाद घालायचा नाही. पण अशा नामांतरास सावरकरांचा सख्त विरोध होता हे खरे का? ते म्हणायचे की "ही उर्दूप्रचूर नावे ही महायुद्धात झालेल्या जखमांचे व्रण आहेत, ती मिटवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी अभिमानाने मिरवली पाहिज्ते." हे खरे का? शब्द वेगळे असतील पण ते असे काहीसे म्हणले होते, असे आठवतेय.
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|