|
Chyayla
| |
| Friday, November 10, 2006 - 6:11 am: |
| 
|
लालभाई, १) सध्यातरी सन्घा व्यतिरिक्त राष्ट्रिय विचारधारा घेउन सन्घटन करणारी कोणतीच प्रभावशाली सन्घटना नाही. त्यामुळे सन्घ ईथे येणे सहाजिकच आहे. सन्घ स्वता:हुन कधी प्रचार करत नसल्यामुळे गैरसमज पसरवणार्यान्चे फ़ावते. माझ्या अनुभवानुसार, तुमची मानसिकता अशी झाली की सन्घाचा नेहमी अपप्रचारच व्हावा, त्यामुळे कुठे सन्घाची प्रशन्सा किन्वा गैरसमज दुर होण्याचा प्रयत्न झालास तुम्हाला लगेच मळमळ होणे साहजिकच आहे. हिन्दु आणी सन्घ या शब्दाची अलर्जी काही नवीन नाही. २)कॉन्ग्रेस व कोणी असो जो राष्ट्रहीताच्या आड येतो त्या सगळ्यान्चा विरोध सन्घ करतो, कॉन्ग्रेसच्या चान्गल्या कामाचा, नेत्यान्चा सन्घाने नेहमी प्रशन्सा केली हा मुद्दा तुम्ही का विसरलात. त्यामुळे आन्धळेपणे विरोध करत नाही हे स्पष्ट आहे. कॉन्ग्रेसने राष्ट्रहिताचे, समाज न तोडण्याचे कार्य करावे, सन्घापेक्षा चान्गला सहकारी मिळणार नाही ही खात्री. ३) कॉन्ग्रेसची मतालोलुपता हा मुद्दा खोटा, हे आपण सिद्ध करुन दाखवावे ( आवाहन) मी त्याची उजळणी करणार नाही, परन्तु ईथे तुम्हाला नेहमीच पुरावे मिळतात आहे, त्याकडे का दुर्लक्ष करताहेत. ४) गान्धी बद्दल ही मी लिहिले आहे, त्यान्चा आदर सन्घात केल्या जातो, पण सन्घ व्यक्तिपेक्षा राष्ट्राला जास्त महत्व देतो हा मुद्दा पण मान्डलाच आहे व त्याबद्दल चर्चा झालेली आहे. ५)ईस्लामी दहशतवादावर सन्घाचा प्रचार्- पुन्हा तुम्ही माझ्या मुद्द्याला बगल दिलीत व हिन्दु सन्घटन केवळ जिहादीन्विरुद्ध ह्या छोट्या कारणासाठी म्हणुन नाही तर मानवतेच्या व विश्वशान्तीसाठी आहे ते कसे तर तो पण मुद्दा मी आधिच मान्डला आहे. त्यामुळे इस्लामी दहशतवाद असो नसो हिन्दु सन्घटन आवश्यक आहे. परन्तु पर्यायाने यातच इस्लामी दहशतवादावरही उपाय अन्तर्भुत आहे, कसा ते पण सविस्तरपणे लिहिले आहे. याउलट ईथे आवाहन करुनही कुणीच सर्वसमावेशक व प्रभावशाली उतारा सान्गु शकले नाही यातच काय ते सन्घाची उपयोगिता दिसुन येते, शिवाय सन्घाला पर्याय नाही हे सुद्धा सिद्ध होते. ६) सन्घाची हीच सगळ्यात मोठी खासियत आहे की सन्घ हा पुस्तकी वा कल्पनेत जगत नाही तर प्रत्यक्ष आचरणावर भर देतो, केवळ ह्याच कसोटीवर मी सन्घाला समर्थन देतो. त्यामुळे दलितान्च्या बाबतित तुम्ही पुस्तकी कल्पना म्हणताहात हा तुमचाच कल्पनाविलास का समजु नये, मी ज्या प्रत्यक्ष कार्याचे वर्णन केले, जे मी स्वता: व्यक्तिशा: केलेले आहे त्यामुळे तुमचा हा मुद्दा मी किन्वा कुणीही ज्याचा सन्घकार्याशी सम्बध आला तो मानणार नाही. यावर मीच तुम्हाला विचारतो तुम्हीच सन्घाला नेहमीचेच जातियवादी म्हणन्याचा मुद्द्याची उजळणी केली असे का म्हणु नये. माझ्या मुद्द्याच्या समर्थनार्थ मी वास्तविक उदाहरणे दिलीत. तुम्ही जे उदाहरण दिले त्या घटनेला सन्घ जबाबदार नाही, उलट अशा घटनान्चा निषेध केला आहे. BTW तुम्ही जे उदा: दिले त्यावर ग्रुहमन्त्र्यान्ची ताजी टिप्पण्णी "नक्षलवाद्यान्चा जातियवादाच्या आडुन सरकारवर हल्ला" हे प्रकरण तसेही जातियवादाचे निश्चित नाही. ७) तरीही अजुनही हिन्दु समाजातील जातियवाद सम्पला नाही ८२ वर्षे सन्घाचे कार्य सातत्याने सुरु आहे तरिही, कारण हिन्दु समाज अजुन पुर्णपणे जाग्रुत झालेला नाही आणी त्याला जाग्रुत करणे हेच सन्घाचे मुख्य ध्येय आहे. जो पर्यन्त हिन्दु समाज जातियवाद फ़ेकुन एकत्र येत नाही तोपर्यन्त सन्घाचे कार्य पुर्ण होणार नाही. ईतक्या शतकान्चा जुना सामाजिक रोग ईतक्या कमी वेळात जाणे थोडे कठिण आहे, पण अशक्य नाही आणी सुरुवात झाली आहे हे महत्वाचे. ८)तुम्ही जे ८० वर्शाच्या कामाबद्दल म्हणताहात त्यावरच मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यान्चे विचार व त्यावर उत्तरही दिले आहे. ९) सन्घाच्या अपयशाचे खापर्- छे छे... उलट मी सन्घाच्या यशाचे सगळ्यात मोठे श्रेय कॉन्ग्रेस व कम्युनिस्ट यान्नाच देतो, कारण त्यान्च्या राष्ट्रविघातक, समाजात विद्वेश, सत्तान्धता व त्यासाठीचे लान्गुलचालन तसेच ईतर कारवाया, स्वता:च्या जन्मदेशातच पराभुत झालेले तत्वज्ञान, घराणेशाहिची गुलामगिरी, पोथिनिष्ट कट्टरता या व ईतर अनेक कारणान्मुळे त्यान्चा दिसुन आलेला फ़ोलपणा तर याउलट यापुढे सन्घाचे प्रामाणिक कार्य अजुनच उठुन दिसते. १०) तुम्ही जे म्हणता आहात की तुमच्या अनुभव / माहिती की सन्घ चातुरवर्ण्य मानतो. या तुमच्या शब्दानमधेच गोन्धळल्याचा भाव दिसुन पडत आहे. जर तुम्हाला सन्घ कार्याचा खरोखर अनुभव असेल तर ईतके असत्य बोलण्याचे धाडस तुम्ही करु शकणार नाही, आणी तुम्हाला माहिती आहे म्हणता तर नेहमी प्रमाणे सन्घाबद्दल गैरसमज, अपप्रचारामुळे हे शक्य आहे. मी ईकडे केवळ पोकळ दावा करत नाही त्यासाठी ही लिन्क देत आहे. http://sangh.wordpress.com/2006/08/31/dalit-leader-buries-the-hatchet-with-rss/ शिवाय रमेश पतन्गे यान्चे हे विचार सुद्धा अवश्य वाचावे http://hvk.org/specialrepo/mms/ ११)द्वेशाचे राजकारण हा उपाय होउ शकत नाही... हे जर तुमच्या लक्षात येत आहे तर तुम्ही का समाजाला एकत्र आणणार्या राष्ट्रवादी शक्तिन्चा द्वेष करताहात. BTW तुमची परत गफ़लत झाली आहे सन्घ ही सामाजिक सन्घटना असुन, समाजाला द्वेशरहित बनवुन एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहे. ख्रिश्चन व मुस्लिम यान्चाबद्दलचा द्रुष्टिकोण आधीच स्पष्ट केला आहे. १२) सन्घाच्या कार्याबद्दल तुम्हाला खरी माहिती असेल नसेल, पण मी ज्या तत्वान्ची चर्चा केलि त्यावर कुणी शन्का काढल्या नाहीत, किन्वा खोडुन काढल्या नाहीत. तेन्व्हा सन्घाबद्दल तुमचे नेहमीचे पुर्वग्रहदुषीत विचार बाजुला ठेवुन प्रामाणिक चर्चा करण्याचे धाडस ठेवत असाल तर मलापण पुढे चर्चा करायची की नाही ते ठरवता येइल. तरी मी आपला आभारी आहे.
|
माझ्या माहिती / अनुभवानुसार संघ ही एक चातुर्वण्य मानणारी संघटना असल्याने....>>>>>>>>>>>>>> तुमच्या गप्पा (वाद) चालू द्या, पण मला एक सांगा लालभाई की तुम्ही कधी संघात गेला तरी आहात का हो?
|
Laalbhai
| |
| Friday, November 10, 2006 - 7:17 am: |
| 
|
च्यायला.. माझ्या "पूर्वग्रहदुषित" मतांची चिरफाड केल्याबद्दल धन्यवाद! संघाचा राष्ट्रवाद म्हणजेच खरा आणि एकमेव राष्ट्रवाद, अशा समजाचे कारण काय? संघाच्या अपयशाचे जाउद्या, कोण कोणत्या बाबतीत संघाला भरघोस यश मिळाले आहे, याची तरी यादी तुम्ही देऊ शकाल का? इतरांना गोंधळेले म्हणण्याआधी सध्याची संघाची स्थिती काय आहे, याचा आढावा घेतलात, तर कोण गोंधळलेले आहे, हे दिसतेच आहे. तुम्ही दिलेल्या पहिल्या लिंकवरुनच दिसते आहे की अजुनही दलित नेत्यांना आपलेसे करुन घेण्यात संघाला यश आलेले नाही. खुद्द नागपुरातच २ महिन्यापूर्वी वाजत गाजत धर्मांतर झाले. आता याचे खापर मिशनर्या, परदेशी पैसा, डावे यांच्यावर फोडून तुम्ही मोकळे होणार. का कोणीही संघाचा माई का लाल (माई का भगवा?) तिकडे जाऊन धर्मांतर थांबवू शकला नाही? दलितांवरच्या अत्याचांचा नुसता निषेध करून काय भागते? नुसते मीडियामधे संघाचे वर्चस्व नाही म्हणून संघाच्या कामाची दखल घेतली जात नाही, असा कांगा केला की झाले का? की ढसाळ आणि सुदर्शन यांच्या हस्तांदोलनाचे चित्र दाखवले की हिंदू सघटन साधते का? आपण तेवढे राष्ट्रभक्त आणि इतर सगळे राष्ट्रद्रोही, धर्मबुडवे असा तुम्हा लोकांचा सूर का असतो कोण जाणे? (मानसशास्त्रात, पराकोतीचे न्युनगंड असणारी लोकं जास्त offensive असतात, असे काहीसे म्हटले जाते, तसे तर संघाच्या बाबतीत होत नाही ना? ) तुम्हाला विरोध केला की अप्रामाणिक आणि दुजोरा दिला की राष्ट्रभक्त, प्रामाणिक काय? तसे असेल तर तुमच्या राष्ट्रप्रेमाच्या कसोटीवर उतरण्याची मला आवश्यकता नाही. असो. मागचे एक पोस्ट वाचून तुम्ही हिंदू धर्माबद्दल काही चांगले प्रतिपादन करू शकाल असे वाटले म्हणून तुमच्याशी चर्चा करण्याची इच्छा झाली होती. पण तुम्हीही संघप्रचारापेक्षा फार काही वेगळे करत नाही आहात हे स्पष्ट झाले आहे. मग तुमच्या प्रचाराला इस्लामी दहशतवादाचा विरोध, संघाच्या प्रखर राष्ट्रवाद, संघाचे अतुलनीय सामाजिक काम, असे कितीही पातळ पाणी चढवले तरी त्याने फरक पडत नाही. मुळात आडातच नाही तर पोहर्यात कुठुन येणार? तुम्ही आणि तुमच्या बंधूंनी कितीही लेखणी चालवली तरी संघ ही एक मुळात विद्वेष पेरणारी संघटना आहे, राष्ट्रवादी म्हणवणार्या ही संघटना खुद्द स्वातंत्र्यलढ्यातच सहभागी झाली नाही, हिंदू संघटनाच्या गोंधळ घालताना दलितांच्या प्रगतीसाठी ही संघटना काहीही भरीव करत नाही, ही आणि अशी अनेक व्यावहारिक सत्ये बदलत नाहीत. तुमच्याशी चर्चा मी थांबवत आहे. माझ्या मुद्द्यांना सविस्तर उत्तर दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
|
Laalbhai
| |
| Friday, November 10, 2006 - 7:24 am: |
| 
|
परत एकदा लिहीतो की हा लढा त्यांनी स्व्:तच लढायाचा आहे. त्यांचा समाजात ज्या चालीरीती आहेत त्या त्यांनीच बदलायच्या आहेत आपण त्या बदलु शकत नाहीत. पिरीयड. आपल्या समाजात ज्या वाईट प्रवृती आहेत त्या मात्र आपण बदलु शकतो व बदलायलाच पाहीजे. दलीत, महार हे शब्द आपण्च काढुन टाकु शकतो. >>> वरच्या २५ पानी चर्वितचरणात हा एकमेव महत्वाचा मुद्दा आलेला आहे. माझ्यामते चर्चा तिथेच सुरु होते आणि तिथेच संपते. धन्यवाद केदार.
|
Chyayla
| |
| Friday, November 10, 2006 - 9:32 am: |
| 
|
संघ ही एक मुळात विद्वेष पेरणारी संघटना आहे, राष्ट्रवादी म्हणवणार् ०दया ही संघटना खुद्द स्वातंत्र्यलढ्यातच सहभागी झाली नाही, हिंदू संघटनाच्या गोंधळ घालताना दलितांच्या प्रगतीसाठी ही संघटना काहीही भरीव करत नाही, ही आणि अशी अनेक व्यावहारिक सत्ये बदलत नाहीत हीच तुमची पुर्वग्रह्दुषीत विधाने, त्यामुळे मला पण चर्चा करायची ईछा: नाही, तुम्ही सन्घाबद्दल विचारले ती तुमच्याच भाषेत उत्तरे दिलीत. माझे एकही आवाहन तुम्ही पेलु शकत नाहे असे दिसते. पुरावे न देता सरळ धादान्त खोटे नाटे काही बोलायचे याला काय अर्थ? तसे तुमची अपेक्षित उत्तरे वाचुन भरपुर मनोरन्जन झाले. तुमच्या उत्तराला एकच शेरा- रडीचा डाव खेळलात आपण. माझच चुकल गाढवासमोर वाचली गीता... स्वता: ईन्ग्रजान्ना मदत करुन स्वातन्त्र्यलढ्याला विरोध करणारे डावे तुम्ही, तुम्ही काय आम्हाला राष्ट्रवादाबद्दल शिकवताय, ही तुमची नेहमीची ठरावीक सन्घाला बदनाम करण्याची पद्धत जुनीच. तुमच्यासारख्या राष्ट्रविघातक शक्तिन्ना जळी, स्थळी काष्ठी पाषाणी सन्घच दिसतो, जसे औरन्गजेबाच्या सैनिकान्ना सन्ताजी धनाजी दिसायचे म्हणे, एक प्रकारे धास्ती घेतली हे एक मोठे यश आहे, ईतर यशानबद्दल आधीच लिहिले आहे. तुमच्यासाठी नाही सान्गत पण तुमच्या अपप्रचाराला उत्तर, हेडगेवार हे स्वता: कॉन्ग्रेस कार्यकर्ते व क्रान्तिकारक होते, जन्गलचा सत्याग्रहामधे स्वता: भाग घेतला होता, शिवाय क्रान्तिकारकान्ना मदत ही केली होती, आणी सन्घ स्वयमसेवकान्ना वैयक्तिक ईछेने स्वातन्त्र्य चळवळीत भाग घेण्याचे आवाहन हे पुरावे आहेत. तरी तुम्हाला धन्यवाद यासाठी की तुमच्यामुळे ही बाजु या BB मान्डता आली. अजुन काही खुसपट असतील तर येउ द्या. बाकी चर्चा चालु द्या, नन्तर लिहेन
|
सन्घ स्वता:हुन कधी प्रचार(advertisement)करत नाही. मस्त हं 'chayla' पण तु मात्र चांगली salesmanship करतोस. अरे! विषय काय? 'ईस्लामी दहशतवादावर ऊतारा ...' आणि तु संघाची advertisement कसली करत बसलास ईस्लामी दहशतवादाच्य उतार्यावर बोलना.. तु पण ना 'च्यायला'...
|
Chyayla
| |
| Friday, November 10, 2006 - 11:43 am: |
| 
|
राहुल, जरा नीट पुर्ण BB वाचुन काढ मी या विषयावरच बोललो आहे. तुम्ही आणी तुमच्या सेक्युलर पिल्लावळीच्या Salesman नी एक तरी धड उपाय सान्गितला काय? स्वता:च्या गुलामगिरीचे प्रदर्शन आणी फ़क्त शिव्या देण्याशिवाय काय मुद्दे मान्डलेत ते बघा. आणी तुम्ही स्वता: काय दिवे लावले हो, जे मला म्हणताय. तुमच्या अपप्रचाराला उत्तर मिळालेल सहन नाही होत आहे वाटत. माझ्या चान्गल्या Salesmanship ची तारीफ़ केल्याबद्दल धन्यवाद. पण मुद्द्यानी उत्तर दिले असते तर बरे झाले असते, उगीच अगाउपणा केल्या सारखे नसते वाटले. तु पण ना राहुल... आता काय तु जिहादीन्ची Salesmanship घेउन Advertisement करणार काय?
|
Laalbhai
| |
| Friday, November 10, 2006 - 12:38 pm: |
| 
|
तुमच्यामुळे ही बाजु या BB मान्डता आली. >>>> कस्सचं कस्सचं! तुम्ही उगाच मला मोठेपणा देताय हां. (मी असलो काय, नसलो काय, तुमचे इतरांना दोष देण्याचे महत्कार्य चालूच असते. तोच तुमचा "कर्मयोग"! मी फक्त निमित्तमात्र!) 
|
Laalbhai
| |
| Friday, November 10, 2006 - 12:43 pm: |
| 
|
हेडगेवारांनी अनेकांना, "राष्ट्रिय स्वातंत्र्याच्या चळवळीत जाण्यापेक्षा संघकार्याला वाहून घे, तुझ्या चरितार्थाची व्यवस्था मी करतो." असे सल्ले दिले होते. हे सर्वश्रुत आहे. अनेकांच्या मुलाखती, लेख यातून हे आलेले आहे. ह्याचे पुरावे दिले तरी ते पुरावे संघव्याख्येनुसार "राष्ट्रद्रोह्यांचे" असतील, त्यामुळे इथेच थांबवूयात.
|
Chyayla
| |
| Friday, November 10, 2006 - 1:54 pm: |
| 
|
कम्युनिस्टान्चे हिन्दुद्वेश, आणी ईतर कार्य म्हणजेच राष्ट्रप्रेम होय बाकिचे सगळे जातियवादी असा तुमचा समज झालेला दिसत आहे. तुम्ही करता तो द्वेष नव्हे काय? तुम्ही ईतराना दोषच देत आहात ना, मग दुसर्याला म्हणण्याला काय अर्थ?
|
Todays Braking news from Pak. http://www.hindujagruti.org/temple/index.php?id=10 http://www.thenews.com.pk/daily_detail.asp?id=27636 अरे माझ लक्षच न्हवत ईकडे. welcome back लालभाई.
|
Yogy
| |
| Friday, November 10, 2006 - 4:17 pm: |
| 
|
चला आता पाकड्यांना चांगला धडा शिकवूया. आपणही इथे एका मशिदीत जाऊन डुक्कर कापूया. देशापुढचे सगळे प्रश्न चुटकीसरशी खलास. भारत माता की जय, वंदे मातरम हे देखील वाचा... http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/385631.cms आपल्या दलित बांधवांना जिवंत जाळले जाते अशा प्रशांकडे लक्ष देण्यापेक्षा आज आपल्याला पाकिस्तानातील मंदिरांचेच प्रश्न महत्त्वाचे वाटतात का?
|
नाही योगी तुमचे बरोबर आहे. एक बातमी म्हणुन लिंक दिली. (विषयाला प्रस्तुत वाटली म्हनुन) संघद्वेशावर गाडी आलीच का परत? का बर नेहमी असे काही मुद्दे आले की लोक संघद्वेश करतात? बाय द वे. मी संघकार्याला १५ वर्षे दिली आहेत व जबाबदारीच्या पदांवर काम केले आहे. लालभाईं सोबत अनेकदा वाद घातला ते पण मुद्द्यासगट, व त्यांना ही बरेचदा ते पटले. लालभाई ही शिकवन संघाचीच आहे दुसर्या कोणाची नाही. प्रत्येक चळवळीचे काही गुण दोष असतातच. as long as ती संघटणा राष्ट्र विरोधी कारवाया करत नाही तो पर्यतं OK त्यामुळे एखाद्या संघटनेतिल काही दोशांन्मुळे त्या संघटनेला निकालात जे काढत आहात ते चुकीचे आहे. व हाच मुद्दा संघ व्यतीरिक्त संघटनांसाठी पण लागु आहे. मे इथे संघ प्रसार करत नाहीये याची जरूरी नाहीये.
|
Deshi
| |
| Friday, November 10, 2006 - 4:53 pm: |
| 
|
चला आता पाकड्यांना चांगला धडा शिकवूया. आपणही इथे एका मशिदीत जाऊन डुक्कर कापूया>>>>>>> एक डुक्कर कापला की पाक ला धडा शिकवल्या जातो का? तुम्हीच ना ते काश्मीर पाकला द्या म्हणनारे. तुम्ही त्या मुद्यावर परत लिहीलेच नाही. मुद्दा पटला वाटत तुम्हाला. at least ईतर संघटणांविरोधी प्रचार करण्या पेक्षा विषयाला धरुनच लिंक आहे ती. का दहशतवादाच सत्य पचत नाही.
|
Yogy
| |
| Friday, November 10, 2006 - 5:27 pm: |
| 
|
एक डुक्कर कापला की पाक ला धडा शिकवल्या जातो का? तुम्हीच ना ते काश्मीर पाकला द्या म्हणनारे. क्षमा करा पण काश्मीर पाकला द्या असे मी म्हटलेले नाही. आधीची चर्चा नीट वाचा at least ईतर संघटणांविरोधी प्रचार करण्या पेक्षा विषयाला धरुनच लिंक आहे ती. का दहशतवादाच सत्य पचत नाही. बरोबर आहे दहशतवादाचं सत्य पचत नाही आम्हाला. मंदिरात खाटीकगिरी करणे हा दहशतवाद आहे. मात्र बाबरी मशीद पाडने हा धर्माभीमान व देशाचे रक्षण करण्याचा स्तुत्य प्रयत्न आहे. एकदम पटले. मी पण आता छातीला आडवा हात लावून प्रणाम करत जाईन.
|
Dinesh77
| |
| Friday, November 10, 2006 - 6:14 pm: |
| 
|
बाबरी मशिद खरोखरच मुसलमानांची होती की रामजन्मभुमी आहे त्याचा विचार करा. जो पर्यंत तुमच्या घरात येउन तुमच्या देवघरासमोर गाय मारत नाहीत तोपर्यंत तुम्हाला अक्कल नाही येणार. do not take it personally
|
दिनेश७, ज्यांना आपण स्वत्: कोण आहोत याचा विसर पडतो त्यांना शिव्या देन्यायात काही अर्थ आहे. तुम्ही रागात येऊन लिहू नका. शिवाय गाय हा फक्त प्राणी आहे. त्यामुळे मारला तरी चालतो. ईतीहासापासुन शिका असे म्हणतात. स्पेन वर मुस्लीमांनी खुप वर्ष राज्य केले. त्यांनी चर्च ला मश्जीद व रस्त्यांना पण मुस्लीम नावे दिली. नंतर अनेक वर्षांनतर परत किरीस्ताव लोकानी स्पेन जिंकले व त्यांनी परत त्या मशीदींचे चर्च मध्ये रुपांतर केले व रस्तानां परत किरेस्त्वाव नावे दिली. दुसरे उदा. तुर्कांचे. केमाल पाशाने सर्व ईंग्रजीपणा पुसुन (अगदी रोडच्या नावापासुन) तुर्की पणा आणला. ह्या माणसाला सारे जग आदर्श माणते. कारण? कारण त्याला स्वत्:ला माहीती होते तो कोण आहे. स्पेन मधल्या किरिस्तावांना माहीती होते तो कोण आहे. तिसरे पण उदा देऊ का? नको ईतके पुरे आता. मग वरिल लोकांनी पण चुकाच केल्या का? की त्यांचा संस्कृतीचे दर्शन घडवीले.
|
Yogy
| |
| Friday, November 10, 2006 - 7:52 pm: |
| 
|
माफ करा केदार पण आपण दिलेली दोन्ही उदाहरणे सयुक्तिक नाहीत. पहिले स्पेनचे उदाहरण हे मध्ययुगातील म्हणावे लागेल. माझ्या माहितीप्रमाणे इ.स. ८०० च्या आसपास मुस्लिमांच्या स्पेनमधील पाडावाला सुरुवात झाली. नंतर ख्रिश्चनांची सत्ता आली. त्यांनीही त्याकाळात धर्मप्रचारासाठी केलेले अत्याचार पहा. त्या काळातील आदर्श आता पाळणे योग्य आहे का? दुसरे उदाहरण मुस्तफा केमाल पाशाचे. केमाल पाशाला आदर्श मानण्याचे कारण त्याने रस्त्यांची नावे बदलली हे नसून रिपब्लीक ऒफ टर्कीचा पहिला अध्यक्ष या नात्याने आधुनिक, प्रजातंत्रवादी आणि धर्मनिरपेक्ष समाजव्यवस्था करण्यासाठी केलेले सर्वांगीण प्रयत्न हे आहे. हे वाचा: http://en.wikipedia.org/wiki/Atat%C3%BCrk%27s_Reforms आणि रस्त्याचे/गावाचे नाव बदलणे व एखादे धर्मस्थळ पाडणे यात फरक नाही का?
|
तुम्हाला अलिकडील उदाहरण हवे असल्यास शिवाजी महाराज जेव्हा बंगरुळात गेले तेव्हा विजयनगर साम्राज्यवर ते काय बोलले ते पण वाचुन पहा. झालेच तर १९४७ नंतर सोरटी सोमनाथ चे मंदीर मशीदीतुन कसे निर्मान केले ते पण वाचा. योगी राम मंदीरावर ही चर्चा चालु नाही. त्यामुळे परत तो वाद नको. रादर चर्चेशी संबधीत मुद्द्या वर चर्चा करायला हवी. (त्यामुळे मी ती लिंक दिली). केमाल पाशा वर विकी पिडीयाचे वाचन कामी नाही. मी त्यांचा बद्दल अनेक पुस्तके वाचली आहेत म्हणुन उदा. दिले. त्यांनी अनेक काम जसे केले तसेच रस्ताचे नाव ही बदलले आहेत. कारण तो प्रश्न त्यांनी अस्मीतेचा माणला. आपल्या देशात आपण नुसते मंदीर बनवुन आपण पुढे जाणार नाही हे मला माहीत आहे. धार्मीक अत्याचार कोणाचेही असोत ते अमान्यच. पण मला एकतरी उदा द्या हिंदु घर्मीयांनी ईतर धर्मीयावर तसे अत्याचार केले.
|
पण मला एकतरी उदा द्या हिंदु घर्मीयांनी ईतर धर्मीयावर तसे अत्याचार केले. त्यान्ना आपल्याच धर्मातील दलितान्वर अत्याचार करण्यातून वेळ मिळाला नाही म्हणून? १९८४ मध्ये दिल्लीत शिखान्चे शिरकाणकरणारे कोण होते? गुजरात आणी मुम्बई दन्गे? ८००० जैन मुनीना सुळावर चढविण्याच्या प्राचीन घटनेचा समारम्भ अजुनही मदुराई मीनाक्शी मन्दिरात होतो. इस हमाम मे सभी नन्गे है.
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|