Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through November 05, 2006

Hitguj » Views and Comments » Current Affairs » ईस्लामी दहशतवादावर ऊतारा » Archive through November 05, 2006 « Previous Next »

Rahul_1982
Wednesday, November 01, 2006 - 4:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


नमस्कार श्रवण,
फ़ारच छान आणी अगदि
ultimate उपाय वटतोय
याने एकोपा तर राहीलच शिवाय दहशतवाद सुद्धा संपुष्टात येण्यास प्रयत्न होतील.


Vijaykulkarni
Thursday, November 02, 2006 - 1:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्रवण आणी झक्की
अनुमोदन.

श्रवण आणी झक्की
अनुमोदन.
श्रवण, सुन्दर समरोप केलात!
मी आभार प्रदर्शनाचे भाषण टाकु का?
:-)


Chyayla
Thursday, November 02, 2006 - 2:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्रावण, तुमचा मुद्दा आदर्श आहे, पण आपण देशातील सध्याची परिस्थिती आणी अगदी वास्तविकतेचे भान ठेवुन चर्चा करु या.

ईथे मी आर्थिक, धार्मिक, राजकिय व सामाजिक बाबीन्चा विचार करुन मुद्दे मान्डतोय.

१) लोकशाही मधे असे होणे जरा कठीणच वाटते कारण "मुन्डे मुन्डे मतिर्भिन्ना" हे अगदी नैसर्गिक आहे. चान्गलया परिवारातही भान्ड्याला भान्डे लागतच आणी वाद होतातच. तुमची कल्पना एखाद्या राजेशाहीत लागु होउ शकते. व्होटब्यान्केपायी आणी सत्तेसाठी कोण हे प्रामाणिकपणे करायला तयार होइल?

२)एकत्र येण्यास सगळ्यात महत्वाची अट म्हणजे सगळे धर्म सहिष्णु असणे आवश्यक आहे, ती परिस्थिती भारतात काय सम्पुर्ण जगात नाही.

३) धर्म ही सगळ्यात मोठी प्रेरणा आहे, उगीच नाही जिहादी मरायला तयार होत.

४) काही जिहादीन्ची निर्मिती जबरदस्तीने केल्या जाते, त्यान्चा गरीबीचा फ़ायदा घेउन अगदी स्वाभाविक उदा. एखाद्या गरिबाला जर कोणी म्हटले की मी तुला १० लाख देईल तु हे कर तो परिस्थिती बघुन नक्कीच तयार होईल. हाच विचार करेल की मी मरेल पण कुटुम्बाला हलाखीच्या स्थितीतुन बाहेर काढेल, शिवाय मेल्यावर ही जन्नत मिळेल.
तेन्व्हा या जगातुन गरीबी नाहीशी झाली तर हे होउ शकेल, पण गरीबी पुर्णपणे ह्या जगातुन नाहीशी झाली नाही आणी मला नाही वाटत ती होईलही.

५)सत्तेसाठी याचा काय उपयोग म्हणुन आजही आपण पहातो जो प्रामाणिकपणे जाती, धर्म, वर्ग विरहीत हिन्दु सन्घटन करणारे आहेत त्यान्ना सगळ्यात जास्त विरोधक आहेत.

मी नुसते प्रश्न उपस्थित करीत नाही हिन्दुत्वामधे या सगळ्या प्रश्नान्ना उत्तरे आहेत. त्याचीच उजळणी करतोय, प्रामाणीक चर्चेची अपेक्षा आहे.

१) वसुधैव कुटुम्बकम, व परधर्म सहिष्णुता केवळ हिन्दुतच आहे, बाकी कोणी साम्प्रदायिक मनस्थितीतुन बाहेर पडाण्याईतके प्रगल्भ झाले नाही.

२) राजकारणात, रामराज्य व शिवाजीन्चे हिन्दवी स्वराज्य हे आपाल्याकडे आदर्श निर्माण झालेले आहेतच. त्यामुळे आदर्श राजकारण हे आपल्यासाठी स्वप्नरन्जन नाही प्रत्यक्ष उदाहरणे आहेत.

३)सन्ताच्या शिकवणुकीमुळे पावन झालेली ही भुमी, गरीबीतही समाधानाने कसे जगावे व अध्यात्मिक उन्नती कशी करावी याचा समर्थ आचार, विचार मान्डला आहे, त्यामुळे आर्थिक कारणामुळे दहशतवादी होण्याचा सम्भवच होत नाही.
शिवाय कुणाचे वाईट करण्यासाठी तर कधीच तयार होणार नाही. "सर्वेपी सुखिन्: सन्तु, सर्वे सन्तु निरामया" ही हिन्दुत्वाची शिकवण.

४) हिन्दुत्वामधे तुम्हाला उपासनेचे स्वातन्त्र्य आहे, कोणतीही जबरदस्ती नाही. कट्टरतावाद मुळीच नाही, दुसर्याच्या विचारान्चा, आदर्शान्चा सन्मान करुन चान्गल्या गोष्टी सामावुन घेणे, बदलत्याकाळानुसार अनुकुल होणे म्हणजे सनातन, नित्यनुतन रहाणे, कारण परिवर्तनाचा गीतेचा नियम त्यान्ना ठाउक आहे.

अजुन बरीच तत्वे आहेत, ती मी ईथे अजुन मान्डलीच नाहीत. ह्या सगळ्याना हिन्दुत्वामधेच उत्तरे आहेत हे तुम्हाला वाटत नाही का? हिन्दुत्वाला नाकारणे म्हनजे तुम्ही जे मुद्दे मान्डले त्यालाही नाकारणे होईल.
जर हिन्दु, हिन्दुत्वच नाही राहिले तर तुमच्या सारखे विचार करणारे सुद्धा मिळणार नाहीत.
हिन्दुत्वाच्या या सुन्दर फ़ुलाला वाचवण्यासाठी पण काही काटे धारण करावेच लागतात, पण तेही स्वसरन्क्षणासाठी. पण आज त्यालाच कोणी हिन्दु साम्प्रादायिकता, कट्टरवाद म्हणुन रन्गवण्याचा प्रयत्न करताहेत.

हिन्दु सन्घटनेचा विचार तुम्ही पण मान्डलाच आहे, पण तुम्हाला मुसल्मान्नान्चे एकत्र येण्याची भीती वाटते ती हिन्दु सन्घटना असली काय अन नसली काय ते होणारच आहेच अशी भिती मनात ठेवु आपण किती काळ तग धरुन राहणार? ते आधीच सन्गठीत आहेत.

शिवाय हिन्दु सन्घटन जर कोण्या सत्तान्धान्ना मुस्लिमान्विरुध्हच अस गैर्समज करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला काही ईलाज नाही, मी मागे हा मुद्दा मान्डलाच होता कि हिन्दुन्नी जात, पात, धर्म, वर्ग विसरुन एकत्र येणे ही काळाची गरज आहेत, कारण हिन्दुन्ना धर्मान्तरीत करुन लचके तोडण्यासाठी गिधाडे टपलेलेच आहेत.

एकन्दरीत केवळ मुस्लिमविरुध्ह नव्हे (या तुछ्: कारणासाठी कधीच नव्हे) तर मानव कल्याणासाठी व विश्वशान्तीसाठी हिन्दु सन्गठन आवश्यक आहे.


Laalbhai
Thursday, November 02, 2006 - 7:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार च्यायला..

या सहिष्णू हिंदू धर्मातील दलितांविषयी आपले काय मत आहे? त्यांचा प्रश्न कसा हाताळावा? नुकतेच विजयवाडातल्या एका खेड्यात सवर्णांनी दलितांवर सामाजिक बहिष्कार टाकल्याने हजारो दलित उपाशी मरत आहेत.

विषयबाह्य असेल पण तुमचा हिंदू धर्माविषयी गाढा अभ्यास दिसतो, म्हणून विचारले.


Zakki
Thursday, November 02, 2006 - 12:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हिंदू धर्म, हिंदुत्व ही तत्वे चांगली आहेत. ती आज पाळल्या जात नाहीत. म्हणून लालभाई म्हणतात तसे होते.

कदाचित् मुसलमान धर्मातहि काही चांगली तत्वे असतील. पण ती आज विकृत स्वरुपात पाळली जात आहेत म्हणून हे प्रॉब्लेम्स.

तर माझ्या मते, असे अनेक मुसलमान असतील ज्यांच्या मते त्यांच्या धर्मानुसार दहशतवाद असू नये! त्यांनाच हाताशी धरून, त्यांना पाठिंबा देऊन, त्यांनीच जर काही केले तर होण्यासारखे आहे. म्हणूनच बिन लादेन सारख्या पुढार्‍यांना नि मौलवींना,वेळ पडल्यास, कायदेशीर रीत्या 'गप' बसवले पाहिजे!

याचे एकतरी उदाहरण आहे. सावरकरांची मते पटत नाहीत, ते कदाचित् हिंसाचाराला उत्तेजन देतील, म्हणून त्यांना कायदेशीरपणे जाहीर सभांमधून बोलायला बंदी घातली होती. स्वतंत्र भारतात भाषणस्वातंत्र्य नसलेली एकमेव व्यक्ति म्हणजे सावरकर!


वैयक्तिक रीत्या बोलायचे तर, मी काय करू? भारतातल्या, हिंदूंच्या, वाईट गोष्टींबद्दलचा राग, विषाद काही केल्या मनातून जात नाही, त्याने माझे मनच किडून गेले आहे! तेंव्हा जाता जाता अत्यंत विषादपूर्वक टोमणा!

आजकालचे हिंदू काऽही करणार नाहीत, नुसते आप आपसात भांडत बसतील नि निवडणुका आल्या की पुन: दहशतवादाचे राजकारण करतील!


Shravan
Thursday, November 02, 2006 - 1:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विजयकुमार, तुम्ही समारोपाचे भाषण केले की नवा विषय सुरु होणार. तेव्हा तेवढे आता नको.. :-)

च्यायला, तुमचा हिंदू संघटनामागचा उद्देश उद्दात्त व स्तुत्य आहे पण RSS हे हिंदुचे संघटन असा शिक्का बसल्यामुळे त्यांच्या चांगल्या गोष्टींकडे ही सोयीस्कर दुर्लक्ष केले जाते हे आपण पाहतो आहोतच. हे एवढे ढळढळीत उदाहरण समोर असताना पुन्हा आपण तेच जर करणार असू तर आपले श्रम, शक्ती, वेळ वायाच जाण्याची जास्त भिती आहे.

लालभाई, उशीरा का होईना पण आपण आलात..
तुमचा मुद्दा सकृतदर्शनी योग्य वाटतो आहे. जरी च्यायला म्हणतात तसे केवळ हिंदूंना एकत्र करायचे म्हणले तरी खुपच परिश्रम या तुम्ही उपस्थित केलेल्या कारणासाठी घ्यावे लागतील हे निश्चित..


Yogy
Thursday, November 02, 2006 - 2:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


एक भा. प्र.
हिंदुंचे संघटन करताना आपण "हिंदू" कोणाला म्हणणार?

एखादी व्यक्ती हिंदू आहे हे तुम्ही कशावरून ठरवणार?



Chyayla
Thursday, November 02, 2006 - 2:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार लालभाई, हिन्दु, हिन्दु सन्गठन म्हटले की सन्घ हा शब्द अनिवार्य. मी काही प्रवक्ता नव्हे पण लहान्पणा पासुन जे सन्स्कार सन्घामधे झालेत त्या आधारावर एक प्रामाणिक मत तुमच्यासमोर ठेवतोय.
सन्घ न बोलता स्वत:चे कार्य निमुटपणे करत असतो, सामाजिक समरसता हा केवळ बडबड न करता प्रत्यक्ष आचारणात आणतो. तो कोणालाच दलित किन्वा खालच्या जातिचा व एकन्दरीत जातीव्यवस्था तत्वता: व प्रत्यक्ष व्यवहारात कधी मानत नाही.
वर्धेच्या सन्घ शिबिरात महात्मा गान्धीन्नी भेट दिली तेन्व्हा त्यानी सन्घाची ही परिक्षा घेतली होती व बाल स्वयमसेवकान्ना प्रश्न विचारलेत कि तुम्ही कोण प्रत्येकाने उत्तर दिले मी हिन्दु आहे. कोणीही म्हटले नाही की मी महार, दलीत किन्वा ब्राह्मण आहे. जरी सगळ्या जातीचे स्वयमसेवक मान्डीला मान्डी लावुन जेवायला बसले होते.
तुम्ही जर नीट पणे निरीक्षण केल्यास सन्घाने असल्या कोणत्या ही घटनेला प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष समर्थन कधीच दिले नाही.

जे सन्घाला हेतु पुरस्सर दलित विरोधी दाखवण्याचा प्रयत्न करतात त्यातल्या किती जणान्ना हे माहित आहे. आज सन्घ हिन्दु धर्मातील सामाजिक कुरिती, जातीव्यवस्था याविरुध्ह प्रत्यक्ष कार्य करत आहे, त्याची कुठेही जाहिरात नाही कदाचित यामुळेच विरोधक सन्घाला दलित विरोधी म्हणुन हेतुपुरस्सर रन्गवतात कारण सन्घ हिन्दु दलित, पददलित आहे हे मानतच नाही त्याद्वारे तो समाजाचे कधी विभाजन करतच नाही.

कोणत्याही समाजात कालानुसार सामाजिक कुरिती येतात पण त्याला जो कवटाळुन बसेल स्वता:त बदल किन्वा सुधारणा करत नाही तो सम्पला वरच्या पोस्ट मधे म्हटल्याप्रमाणे हिन्दु जुन्या व अन्याय गोष्टी काढुन ताकुन नव्या गोष्टी आत्मसात करायला नेहमी तयार असतो म्हणुन त्याला सनातन म्हटले आहे. मुस्लिम समाजाप्रमाणे कट्टर, व मध्ययुगीन विचारसरणीचा नाही की त्याय बदल करणार नाही. एक प्रकारे हिन्दु समाजातील दोष नाहीसे करुन समाज सुधारणेचे कार्य सन्घ करत आहे.

मी स्वत: दलित वस्तितल्या शाखेत लहानपणी जायचो मी तिकडे दलित, महार, बुध्ह, पारधी एवढेच नव्हे तर ख्रिस्चन व मुस्लिम स्वयमसेवकान्सोबत खेळलो आहे आम्ही सगळे मीळुन भगव्या ध्वजाला प्रणाम करायचो. जात कधीच विचारली गेली नाही त्यातले अजुनही माझे चान्गले मित्र आहेत.
म्हणुन जर कोणी सन्घाला जातियवादी म्हटले तर मी किन्वा जो कोणीही सन्घाच्या सम्पर्कात आला असेल तर तो कधीच मानणार नाही.
याउलट जे दलित सन्घटना म्हणवतात त्यामधे केवळ ब्राह्मणान्विरुध्ह वरच्या जातीविरुध्ह सतत गरळ ओकल्या जाते तुम्ही मला प्रामाणिक पणे सान्गा अश्यानी समाजात एकोपा होउ शकेल काय?

हिन्दुत्व, वेद पुराण कुठेच जातीचा उल्लेख नाही, ती एक धार्मिक म्हणण्यापेक्षा सामाजिक व्यवस्था आहे, आणी कोणत्याही व्यवस्थेत कालानुसार दोष येतातच त्याला दुर करणे ईष्ट.
उदाहरण द्यायचे तर युरोपातील काळ्या लोकान्वर लादली गेलेली गुलाम्गिरी ते तर भयन्कर होते, सिन्हासमोर टाकणे, भाट्टित ढकलुन देणे, पायात लोखन्डी वजन टाकुन समुद्रात सोडणे असले क्रुर कर्मे गोर्या लोकान्नी केली, अन्याय होता पण एवढी क्रुरता हिन्दु समाजात कधीच नव्हती. आज तेच काळे गोरे एकत्र रहातात आहे मग आपण का नाही राहु शकत?

आज सन्घामधे जे ब्राह्मण मी पाहिले त्यान्च्या पुर्वजान्नी काही अन्याय केल्याची जाणीव आहे व एक सामाजिक जबाबदारी स्वता: घेतात, मी दरवर्शी सगळ्यान्सोबत आम्बेडकरान्च्या पुतळ्याला माल्यार्पणास जातो व समाजावर केलेल्या उपकाराची क्रुतज्ञता व्यक्त करतात, शिवाय सेवा वस्ती मधे जाउन मागास, दलित समाजासोबत हित्गुज करतात, एवढेच नव्हे तर शन्कराचार्यान्चे हस्ते आम्बेडकरान्ना माल्यार्पण करण्याचा तसेच "न्: हिन्दु पतितो भवेत" अशी घोषणा करवली जे कित्येक शतकात नव्हते झाले ते शक्य करण्याचा चमत्कार घडवला. आज ब्राह्मणान्पेक्षा ईतर समाजच जातियवाद करतान्ना दिसतोय. सन्घ नुसता बोलत नाही प्रत्यक्ष क्रुती करतो.

तुम्ही जी घटना सान्गितली ति लज्जास्पद आहे आपल्याला अश्याच अन्याय व ईतर सामाजिक अन्यायाविरुद्ध हिन्दु समाज एकत्र करणे आवश्यक आहे कदाचित अर्ध वा पुर्ण शतक लागेल पण सुरुवात झालेली आहे तुम्ही ही या सगळा तिरस्कार व द्वेष बाजुला ठेवुन स्वागतच आहे.

योगी, हिन्दु शब्दला साम्प्रायिक नजरेतुन बघण्यापेक्षा न्यायालयानेही मान्य केलेल्या व्याखेवर जा, हिन्दु धर्म नव्हे तर भौतिक, अध्यात्मिक, सामाजिक उन्नती करत पुढे जाण्याचा जीवन मार्ग आहे त्याला धार्मिक म्हनणे गैर आहे अशा मार्गात देशप्रेमी मुस्लिम, ख्रिस्चन जे, सहिष्णु व दुसर्या मतान्चा आदर करतात ते ही सामील आहेत


Chyayla
Thursday, November 02, 2006 - 3:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्रावण, परिश्रमाला घाबरुन कसे चालेल, तात्कालिक फ़ायदा मिळवण्यापेक्षा दिर्घकालीन फ़ायदा बघा, एवढ्या मोठ्या समाजासाठी, राष्ट्रासाठी एक शतक काहीच नाही, आपली सन्स्क्रुती कित्येक शतके टिकली कारण त्याच्या सनातनतेमुळे. तुम्हीच म्हटल्याप्रमाणे जसे मुस्लिम्पण एकत्र येण्याची भिती वैगेरे हा मागच्या पोस्ट मधे म्हटल्याप्रमाणे कधी तरी व्हायचेच मग त्यावर आतापासुनच कायमस्वरुपी तोडगा का नसावा? हिन्दु सन्घटनेवर RSS चा ठप्पा लागला म्हणताय पन एवढी प्रदिर्घ, उदात्त आणी प्रामाणिक वाटचाल कुणी केलि नाही, तुम्ही नवीन सन्घटना सुरु कराल त्यालापण ह्या दिव्यातुन जावेच लागेल आणी परत तेच व्हायचे. तेन्व्हा जो प्रामाणिक, द्वेशरहीत प्रयत्न सातत्याने चालु आहे त्यालाच पुढे चालवणे म्हणजे वेळेचा अपव्यय टाळणे नाही का?

उदाहरण द्यायचे तर बाळ ठाकरे म्हणतात कासवाच्या गतिने सन्घाची वाटचाल सुरु आहे कधी होणार हिन्दु सन्गठन पुर्ण कुणास ठावुक, पण ईथे गती पेक्षा सातत्य आवश्यक आहे, आणी शिवसेना काय जोपर्यन्त बाळ ठाकरे किन्वा कोणी प्रभावशाली व्यक्ति अस्तित्वात राहील तोपर्यन्तच त्यानन्तर सम्पले, त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तिवर अगदी सोनिया पेक्षा ही सनातन, चिरन्तन तत्वावर विश्वास ठेवणे कधीही चान्गले कारण कोणताही मनुश्य हा परिपुर्ण नाही काही मर्यादा असतातच अगदी महात्मा म्हणवलेल्या गान्धिन्च्या हातुन चुका घडल्याच ना? तत्वे, विचार टिकतात व्यक्ति नव्हे, सन्घामधे कधी कोणी डॉ. हेडगेवार कि जय असे कधी म्हणत नाहे, तुमच्या लक्षात माझे म्हणने आले असावे.

परत ही प्रामाणिक चर्चा अशीच चालावी ही ईछा


Yogy
Thursday, November 02, 2006 - 4:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


मज अज्ञान्यास क्षमा करा पण
आपण RSS म्हणता तेव्हा आपणास केवळ वनवासी आश्रमाचेच कार्य अपेक्षित आहे की बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, वंदे मातरम, पतित पावन या "परिवारातील" संघटना पण अपेक्षित आहेत?


मी पण लहानपणी संघाच्या शाखेत जात होतो. एकदा मी माझा मित्र ताज अली याला संघाच्या शाखेत घेउन गेलो तर त्याला सामील करून घेण्यास नकार दिला गेला. ताज हा माझ्या चांगल्या मित्रा. न्पैकी एक असल्यामुळे मी देखील दुसर्‍या दिवसापासून शाखेत जाणे सोडून दिले.

आपण एक अनुभव सांगितला म्हणून मलाही एक सांगावासा वाटला इतकेच.

बाकी चर्चा चालू द्या



Yogy
Thursday, November 02, 2006 - 4:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रदिर्घ, उदात्त आणी प्रामाणिक

ज्येष्ठ स्वयंसेवक बंगारू लक्षमण यांना टीव्ही वर पैसे घेताना तहलका वाल्यांनी पकडले याबद्दल आपले काय मत आहे?

राम नाईक पेट्रोलियम मंत्री असताना केरळमधील अनेक संघ स्वयंसेवकांना "आतल्या मार्गाने" पेट्रोल पंपांचे वाटप झाले याबद्दल आपले काय मत आहे?

की सुदर्शनजींनी सांगितले हे स्वयंसेवक परिक्षेत नापास झाले, हेच तुम्हीही म्हणणार?

दुसर्‍यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे इतर पक्षही तसल्याच मातीचे आहेत हेच स्पष्ट होत नाही का?



Zakki
Thursday, November 02, 2006 - 5:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बरे, संघ म्हणू नका, हिंदू म्हणू नका. फक्त 'दहशतवादाविरुद्ध असलेल्या लोकांचा समूह' किंवा 'राष्ट्रवादी' असे म्हणा. मग संघवाले, संघात नसलेले, हिंदू, मुसलमान, कम्युनिस्ट, बीजेपी, रिपब्लिकन, काँग्रेस, सगळे एकत्र करा! काही फरक पडत नाही. जोपर्यंत अश्या 'राष्ट्रवादी' संघटनेचे नियम जे मान्य करतात ते सगळे यात सामील. फक्त ते दहशतवादाविरुद्ध असले पाहिजेत!

Yogy
Thursday, November 02, 2006 - 7:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


सहमत... दहशतवादाविरुद्ध असलेल्या लोकांचा समूह


Chyayla
Thursday, November 02, 2006 - 11:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

योगी, तुम्ही नीट वाचले नाहीत माझे मुद्दे, व्यक्ति म्हणुन कोणाचेही पतन होउ शकते हा मुद्दा मी आधीच मान्डला आहे अगदी सन्घात जाणारा सुद्धा, म्हणुन मी सन्घटनेची आणी त्याच्या तत्वाचा उल्लेख केला यातच तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे. सन्घात जाणारी ही सामान्य व्यक्तिच, चरित्र निर्माण करणे हे सन्घाचे काम त्यात काही व्यक्ति नापास होउ शकतात.

सन्घाचे काम सगळ्या क्षेत्रात आहे, तुम्हाला विहीप चे कार्य नाही आवडत तुम्ही वनवासी कल्याण आश्रमाचे कार्य करु शकता, ज्याच्या त्याच्या रुचीनुसार तो त्या त्या क्षेत्रात कार्य करु शकतो ध्येय एकच मार्ग अनेक.

विहीप ने सन्त महन्त जे विभाजीत होते पण समाजावर त्यान्चा पगडा होता अश्यान्ना एकत्र आणले, विहीप चा एक स्तुत्य उपक्रम "घर वापसी" याद्वारे जे दुर्बल घटकातुन, समाजाच्या खालच्या स्तरातुन ज्यान्चे फ़सवुन वा जबरदस्तीने धर्मान्तरण झाले अशान्ना परत हिन्दुन्मधे आणत आहे, ह्या घटकाला आत्मसात करुन घ्याय्ला, त्यान्च्याकडे लक्ष द्यायला कुणी तयार नव्हते त्यान्ना समाजाचा एक घटक म्हणुन सन्मानाने परत आणण्याचे कार्य विहीप ने केले आणी करत आहे हे आज कोणाला माहिती आहे?

एक उदाहरण्- मी ज्या वस्तित रहायचो त्या वस्तित बरेच आम्बेडकरी बुध्ह धर्मिय होते, पण हे धर्मान्तरीत झालेत खरे पण आर्थिक स्थिती तशीच राहिली परिणाम मिशनरी लोकान्साठी कळपात ओढायला एक कुरण उपलब्ध झाले आज त्यान्ना फ़सवुन ख्रिस्चन करण्यात आले. कारण त्यान्ना माहिती आहे एकदा समाजापासुन तुटला की त्याचा लचका तोडायला सोपे जाते, आधीच मनात एक द्वेश असतो त्याचा शिवाय पैसा शिवाय कित्येक जणान्चे ख्रिस्चन मुलीन्शी लग्न करवुन कित्येक तरुण धर्मान्तरीत केलेले आजही पहात आहे. त्यान्चे एकच काम की मिशनरीन्च्या कार्यात मदत करणे, रस्त्यावर उभे राहुन येशु क्रुपा म्हणुन पत्रक वाटने, सेमिनार आयोजित करणे त्यासाठी त्यान्ना चक्क पगार मिळतो, एका मित्राकडे गेलो असता त्याच्याकडे क्यालेन्डर पाहिले त्यावर एका बाजुला गौतम बुध्ह व दुसर्या बाजुला क्रॉस मी चाटच पडलो तेन्व्हा त्यानी हे सगळे प्रकार सान्गितले आज तो कोणतिही नौकरी करत नाहे केवळ सेमिनार करतो शिवाय त्याचे एका ख्रिस्चन मुलीशी लग्न सुध्हा झालेले आहे, व मिशननेच एक घर घेउन दिले, मला सान्गा एवढे आमिश उपलब्ध असल्यामुळे कोण धर्मान्तरीत नाही होणार ही स्थिती मी खेड्यातली, किन्वा वनवासी भागातली नाही सान्गत आहे तर चक्क शहरातील सान्गत आहे.


Asmaani
Friday, November 03, 2006 - 12:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

pls read the below metioned article.

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/300017.cms

Shravan
Friday, November 03, 2006 - 1:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

योगी, तुम्ही संघातील काही लोकांच्या चुकीच्या वर्तनासाठी सगळ्या संघाला अपराधी ठरवत आहात. हे काही एवढे पटले नाही बुवा..
संघाची चांगली कामे खुप आहेत की.. म्हणजे जेव्हा जेव्हा नैसर्गीक आपत्ती आल्या आहेत तेव्हा तेव्हा भारतातील कोणत्याही कोपर्‍यात संघवाले मदतीसाठी जावुन पोहचले आहेत हे दुर्लक्षून कसे चालेल? तसेच संघाचे प्रखर राष्ट्रभक्ती हे एक प्रमुख तत्व आहे.
बाकी हे विषयाला सोडून झाले का??

झक्की, असेच संघटन मी म्हणत होतो.


Yogy
Friday, November 03, 2006 - 2:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

योगी, तुम्ही संघातील काही लोकांच्या चुकीच्या वर्तनासाठी सगळ्या संघाला अपराधी ठरवत आहात. हे काही एवढे पटले नाही बुवा..
संघाची चांगली कामे खुप आहेत की.. म्हणजे जेव्हा जेव्हा नैसर्गीक आपत्ती आल्या आहेत तेव्हा तेव्हा भारतातील कोणत्याही कोपर्‍यात संघवाले मदतीसाठी जावुन पोहचले आहेत हे दुर्लक्षून कसे चालेल? तसेच संघाचे प्रखर राष्ट्रभक्ती हे एक प्रमुख तत्व आहे.


जर काही लोकांच्या चुकांसाठी पक्ष जबाबदार नाही असे म्हणायचे असेल तर मग संघापेक्षा काँग्रेस काय वाईट आहे. शिवाय संघाशी तुलना करता काँग्रेस्स ला खूप मोठा जनाधार आहे. नैसर्गिक आपत्तीच्या काळात काँग्रेस्सनेही तितकेच योगदान दिले आहे. काँग्रेस्सच्या राष्ट्रभक्तीबाबत ही काही शंका घेता येणार नाही.

माझे म्हणणे एवढेच आहे की कोणताही एकांगी विचार घेऊन संघटन करणार्‍या संघटनेच्या मागे जाण्यापेक्षा सर्वसमावेशक असणे चांगले नाही का?

संघ दलित्-दलितेतर असा भेदभाव करत नाही असे आपण मानता, मग त्यांची समानता समोर मुसलमान किंवा ख्रिश्चन आले की का नाहीशी होते?

विहिंप हा तर खाजवून खरूज काढणारा पक्ष आहे हे माझे स्पष्ट मत आहे. अगदी सावरकरांनी देखील "गाय" हा एक केवळ उपयुक्त प्राणि आहे त्याला देव मानू नका असे स्पष्ट सांगितले होते पण केव्हाही ईद वगैरे सण आला की विहिंप चे लोक लगेच गोरक्षणाचे बोर्ड घेऊन रस्त्यावर येणार्‍या जाणार्‍या ट्रकची तपासणी करतात. याला काय म्हणावे?

बजरंग दल ह तर केवळ गुंड लोकांच समूह आहे. मिरवणूका काढणे, ट्रफिक ची वाट लावणे, दगडफेक करणे हेच केवळ यांना जमते.


Chyayla
Friday, November 03, 2006 - 10:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

योगी, तुम्हाला जर अस वाटतय तर मग सन्घाला न समजुन घेउन केवळ साम्प्रदायिक, व ईतर चुकिचे विशेषण का लावता? मग सन्घच का वाईट आहे? असे आम्ही म्हणु शकतो.

तरी तुमच्यासाठी मुख्य फ़रक काय आहे ते देत आहे विचार करावा.

१) कॉन्ग्रेससाठी राष्ट्रभक्ती दुय्यम आहे तर व्होटब्यान्क पहिले त्यामुळे ईस्लमिक दहशतवादाचा बन्दोबस्त करण्यास व तसेच त्यान्च्या कच खाउ धोरणामुळे असमर्थ आहे, तर सन्घ राष्ट्रहीत व समाजहीतामध्ये तडजोड करत नाही.
मग पुढे जिहादी असो वा कुणी त्याला घाबरत नाही ईथे जे जे राष्ट्रहीतास विरोध करतात ते मुस्लिम, ख्रिश्चन वा हिन्दु असो त्या सगळ्यान्ना विरोध करतो. त्यामुळे सन्घ केवळ मुस्लिमाना, ख्रिश्चनानाच विरोध करतो हे म्हणने खोडसाळपणाचे आहे.

२)त्यान्च कार्य म्हणजे राजकारणातुन समाजकारण करणे तर सन्घ ही सामाजिक सन्घटना असुन ती समाजकारणातुन वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करते. राजकारण तर केवळ एक क्षेत्र आहे, त्या एका क्षेत्रातील यशामुळे सुधा विरोधकान्च्या पायाखलची वाळु सरकली होती, आजही कॉन्ग्रेसला तडजोड स्विकारुन ईतर विरोधकान्शी युति करावी लागते केवळ एका पक्षाला दुर ठेवण्यासाठी. यातच त्या पक्षाचे यश दिसुन येत आहे आणी हे बीना जनाधाराशिवाय शक्य नाही.

३)सन्घाजवळ निश्चित ध्येय आहे ते म्हनजे "परमवैभवम नेतु मे स्वराष्ट्रम" राष्ट्राला परमवैभव प्राप्त करुन देणे. कॉन्ग्रेस जवळ सत्ताकारणाशिवाय ध्येय नाही.

४) सन्घाजवळ स्वता:चे हिन्दु तत्वज्ञान आहे, तर कॉन्ग्रेसला ते कम्युनिस्टान्कडुन कामापुरता आयात करावे लागते ते सुध्हा केवळ विरोध करायला मतलबापुरता.

५) सन्घाजवळ अनुशासन युक्त असे जगातील सर्वात मोठे सन्घटन आहे, कॉन्ग्रेसकडे याचा अभाव आहे. तुम्ही जर नेहमी सन्घटनेची ताकद केवळ राजकिय बलाबल वरुन पहाल त्याला काही ईलाज नाही, सत्ता ही कायम राहणारी नसते हे लक्षात ठेवा, शिवाय तुमची सत्ता आणी जनाधार यामधे गफ़लत होत आहे असे वाटते.

६) सत्ता आहे तर कॉन्ग्रेस जिवन्त आहे, सन्घाचे सत्तेशीवाय ही काम अबाधीत चालते.

७) सन्घ आणी त्याच्या सन्घटना ह्या घराणेशाहीच्या गुलाम नाहीत, तर कॉन्ग्रेस केवळ घराणेशाहीवरच चालते व लोकशाही तत्वाचा पुर्ण अभाव आहे.

८) गान्धीन्चे स्वदेशी, गावाकडे चला, रामराज्य ह्याचा अन्गिकार सन्घामधे हिन्दु तत्वज्ञानामुळे आधीच आहे, तर कॉन्ग्रेस ने गान्धीवादी विचारान्ना केन्व्हाच तिलान्जली दिली. आता गान्धीन्चा नावाचा उपयोग केवळ विरोधकान्चा विरोध करण्यासाठी होतो, भले स्वता:च गान्धी तत्वाच्या विरोधात आचरण करत असतात.

९) सन्घाला ज्या कॉन्ग्रेस मधल्या नेत्यान्नी राष्ट्रहीतासाठी योगदान दिले त्या सगळ्यान्चा अभिमान व आदर आहे, उदा. सरदार वल्लभभाई पटेल, सुभाषचन्द्र बोस, लाल बहादुर शास्त्री, ईन्दिरा गान्धीन्नी दाखवलेला कणखरपणा व ईतर अनेक व्यक्ति व घटना यावरुन एक लक्षात येत की सन्घ आन्धळेपणे कॉन्ग्रेसला विरोध करत नाही, त्यान्च्या चान्गल्या कार्याला समर्थनच देतो. तर कॉन्ग्रेसला सन्घ व त्याच्या सन्घटनान्ना केवळ शत्रु मानते, केवळ सत्तेसाठी. एकन्दरीत हा मोठेपणाचा पुर्ण अभाव व आन्धळा विरोध दिसुन येतो.

१०)सन्घाला विरोध करणारे पण एकान्गी विचारधारेचे आहेत त्यात कॉन्ग्रेस, समाजवादी पार्टी, लालु, मुस्लिम लिग, कम्युनिस्ट पण आलेच ते तुम्हाला कसे चालते, अश्यान्ना सन्घाला एकान्गी म्हणन्याचा काय अधिकार आहे.

११)अजुन एक महत्वाचा मुद्दा, तुम्ही सगळे जण केवळ राजकिय माध्यमातुन दह्शतवादावर तोडगा शोधत आहात, पण आपल्याला दहशतवादाचा मुकाबला सर्व बाजुनी करावा लागेल, अगदी आर्थिक, सामाजिक व वैयकितिक पातळीवर सुधा. अशा ठिकाणी सर्व समावेशक अशी सामाजिक सन्घटनाच उपयोगाची. त्यामुळे मी हिन्दुत्व व हिन्दु सन्गठन यावर भर देत आहे. ह्या दोघान्चा उपयोग कसा होउ शकतो त्याची चर्चा आधीच झाली आहे.
कॉन्ग्रेसजवळ ही स्थिती उपलब्ध नाही, त्यामुळे सर्व आघाड्यावर दहशतवादाचा मुकाबला करण्यास तसेच वर जो फ़रक दाखवला आहे त्यामुळे कॉन्ग्रेस ईथे फ़ारच दुबळी ठरते.

अजुनही बरेच मुद्दे मिळतील, जिथे कॉन्ग्रेस आणी सन्घ यामधला फ़रक दाखवता येईल, लक्षात येतील त्याप्रमाणे लिहेन. वरचे काही ठळक मुद्दे लिहिले आहेत. एक खुलासा: मी सन्घाचा कोणताही अधिकारी नाही, पण ज्याला सन्घाच्या कार्याची ओळख झाली आहे असा सामान्य नागरिक म्हणुन माझ्या आकलनात आले त्याप्रमाणे लिहीत आहे.


Chyayla
Saturday, November 04, 2006 - 11:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी माझे मुद्दे मान्डले, योगीन्च्या प्रत्येक शन्कान्चे उत्तर दिले, तरी याउपर ही झक्की, श्रावण व योगी तुमचे "दहशतवादाविरुद्ध समुह" बनवण्यावर एकमत दिसत आहे. मी अशा राष्ट्रवादी विचारसरणीतुन असे काही सन्गठन करायला माझा विरोध नाही. उलट मदतच करेल कारण जे जे राष्ट्रहीतास योग्य त्यास मी पण समर्थनच करेल.

तरी आता तुम्ही हे सान्गा हे सन्गठन कसे होइल, कोण शामिल होतील, कोण नेत्रुत्व करेल, त्याचे उद्देश, कार्यक्रम, तत्वे कशी रहातील त्याबद्दल प्राप्त व वास्तविक परिस्थितीत कसे होईल ते सान्गा, तुम्ही जे मुद्दे मान्डाल त्याची उपयोगिता, सर्वमान्यता, सर्वसमावेशकता कशी राहील वैगेरे... मला वाटत योगी तुम्ही याबद्दल काही सान्गु शकाल? शक्य ती, मी सुधा मदत करेल. तर येउ द्या...


Shravan
Sunday, November 05, 2006 - 5:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

च्यायला, मुद्दे सविस्तर व छान पद्धतीने मांडले आहेत.

बाकी आपण इथे मोठ्या अहिमिकेने या मुद्द्यावर चर्चा करत आहोत व तिकडे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी कदाचीत हा प्रश्न सोडविण्यासाठीच एक उपाय मांडला आहे. म्हणजे कदाचीत याच मुद्द्यावर ते उपाय शोधत असावेत असे समजून त्यांच्या मुद्द्याबाबत मी इथे सांगतो..

त्यांनी सरकारी नोकरीमध्ये मुस्लिमांसाठी आरक्षण असू शकेल असे सुतोवाच केले आहे. म्हणजे एक समिती की काय नेमली गेली आहे तिचे काम चालू आहे या मुद्द्याशी निगडित. त्याबाबत सिंगांनी तसे वक्तव्य केले आहे. म्हणुनच ते महत्वाचे आहे.
कसा वाटला उपाय? म्हणजे मुस्लिम एवढ्या सोप्या पद्धतीने मुख्य प्रवाहात येतील, त्यांची परिस्थिती सुधारेल, दहशतवादाला आळा बसेल.
कशाला लोकशिक्षण, NGOs , दहशतवाद विरोधी संघटना (आणी आपल्या चर्चाही)हव्यात. एवढा सोपा मार्ग असताना. नाही का?

बाकी हे पुन्हा मुद्द्याला सोडून झाले म्हणा. माझ्याकडून असे नेहमीच व्हायला लागले आहे. क्षमस्व..!!!




मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators