|
१ अफ़ज़ल हा शरण आलेला अतिरेकी आहे. म्हणजे खर्या अतिरेक्यान्च्या द्रुष्टीने गद्दर. अशा माणसाला इतक्या मोठ्या कामगिरिवर पाठवतील ते? यापुर्वीही अनेकदा अतिरेकी शरण आले आहेत. तुमचे असे म्हणने आहे का अतिरेक्यानी शरन यायला नाही पाहीजे. २ हल्ल्यानन्तर दुसर्याच दिवशी अडवाणीन्नी जहीर केले कि ते पकिस्तानी होते. कशावरून? तर त्यान्चा चेहरा पाकिस्तानी वाटतो. आजपर्यंत अनेकदा ISI ने घटना घडवुन आनल्या आहेत. भाजपावर तुम्ही शंका घेऊ शकता तर लालाकृष्ण पाक वर का घेऊ शक्त नाहीत. ३ दिल्ली पोलिसानी सम्पूर्ण प्रकरणाचा दोनच दिवसात तपास लावला. यावर कुणी विश्वास ठेवील काय? न ठेवायला का झाले. हा काय पुरावा आहे का? ४ या प्रकरणाच्या तपास अधिकारी म्हणून तुलनेने कनिश्ट आणी एन्कौन्टर फेम अधिकार्याला का नेमले? खर्तर तिथेच त्याने करायला पाहीजे. ५ हल्यात मेलेले ते चार अतिरेकी कोण? हे अजुनही महिती नाही पण त्य नन्तर सारे सैन्या सीमेवर नेवुन लावणाच्या तुघलकी कारभारात आपले करोडो रुपयान्चे नुकसान झाले आणी काही सैनिक मेले. या वर उत्तर काय द्यावे. योगी च्या भाषेत आता हास्यास्पद म्हणतो. सैन्य उभे करणे तुघलकी. वा. ६ अफ़झल ला अटक केल्याबरोबर त्याला माध्यमान्समोरे पेश करून त्याच्या तोन्डातुन गुन्हा कबूल करून घेण्याचे कारण? अशी पत्रकार परिषद झालीच नाहे असे न्यायालयात धडधडीत खोटे सान्गूनही पोलिसान्वर काहीच कारवाई का नाही? ह्यावर आत्ता माहीती नाही काढुन उत्तर देतो. ७ मला काश्मीरी पोलिसान्नी पाठवले आहे आणी माझ्या मोबाईलवर त्यान्चा नम्बर सापडेल असे सान्गुनही त्या दिशेनी तपास का नाही? हे कोण उवाच. तरीही वरिलप्रमानेच नंतर उत्तर. ८ अफझल वर अन्याय झाला आहे आणी त्याच्या विरुद्धचा पुरावा विश्वासार्ह नाहे हे मान्य करून ही फाशी कायम करताना सर्वोच्च न्यालयाने दिलेली कारणमिमान्सा बालिश आहे शहाबानो वेळेस तुम्ही कोठे होता तेव्हाच नाहीका सांगायचे. कुलकर्णी तुम्ही दिलेले मुद्दे न्यायालयात उभे राहु शकत नाहीत. चुक मान्य करायला धेर्य लागत. अफझल मेला काय नी न मेला काय पण तुम्ही उगाच भाजपावर हमला केल्याचे खापर फोडताय म्हणुन मी वाद घालतोय. खरेतर इस्लामी दहशत्वादावर माझ्याकडे तरी काही उतारा नाही. कारण उतार करायाला रोग असावा लागतो.
|
Dinesh77
| |
| Friday, October 27, 2006 - 5:58 pm: |
| 
|
योगी, ५५ कोटी देण्याचे कोणी मान्य केले होते त्याचा पुरावा द्याल का? इस्लामी दहशतवाद हा माणुसकीला लागलेला रोग आहे. उपाय जालीम आहे, करण्यासाठी प्रचंड धाडस लागेल. एक उदाहरण, माणसाला ताप आल्यावर तापाचे जे जंतु असतात त्यांना कुठलाही डाॅक्टर सुधारण्याचा प्रयत्न करत नाही, त्यांना मारुनच टाकावे लागते, भले त्यासाठी शरीरातील काही चांगले घटक मेले तरी............................
|
दिनेश ५५ कोटी हे त्यांना द्यायचे भारतीय सरकारने मान्य केले होते. एकट्या गांधीचा हात न्हवता त्यात. त्यामुळे तो मुद्दा काढन्यात आता नाही.
|
Yogy
| |
| Friday, October 27, 2006 - 7:20 pm: |
| 
|
फाळणीपूर्वी भारताच्या मध्यवर्ती बँकेत ३७५ कोटी रुपये होते. त्यापैकी पाकिस्तानचा वाटा ७५ कोटी निश्चित करण्यात आला होता. पाकिस्तानच्या जन्माच्या वेळी लागतील म्हणून २० कोटी त्यांना त्वरीत देण्यात आले. २ december १९४७ रोजी झालेल्या चर्चेनुसार उरलेले ५५ कोटी भारत सरकार नंतर देईल असे सांगण्यात आले. भारत सरकार हे पैसे देण्याची टाळाटाळ करत होते तेव्हा पाकिस्तानचे तत्कालीन नेते लियाकत अली यांनी सी. डी देशमुख यांना तार करून या पैशांची मागणी केली होती. लक्षात ठेवा की हे ५५ कोटी ही पाकिस्तानला देणगी किंवा भेट नसून ते त्यांचे हक्काचेच पैसे होते. राष्ट्रपित्यावर आरोप करण्याआधी थोडा इतिहास वाचा हो.
|
Peshawa
| |
| Friday, October 27, 2006 - 8:33 pm: |
| 
|
८ अफझल वर अन्याय झाला आहे आणी त्याच्या विरुद्धचा पुरावा विश्वासार्ह नाहे हे मान्य करून ही फाशी कायम करताना सर्वोच्च न्यालयाने दिलेली कारणमिमान्सा बालिश आहे.>>> एक करा कुलकर्णी उपोशणावर बसा आमरण. अफ़जल मेला तर तुम्ही सुधा देह त्याग करा. किंवा न्यायालयां वर विश्वस नसेल तर समांतर court चालु करा. तुमच्या पुढे खटले चालवु ह्या पुढे आणि न्याय दिलात की जोड्याने हाणु बालिश न्याय दिलात म्हणुन... मग तो न्याय काही का असेना आम्हाला logical वाटत नाही इतक कारण पुरेस आहे!* I am not against asking president to pardon him. the provison is made in our constitution and therefore is a valid path to take. Also if one really thinks that legal system is rotten to the core (which I agree) one should force the elected government to change it and not to disregard the secular process of delevring justice it usually has serious consequences in democratic setup. *this is just to show that questioning a secular process leads बळि तो कान पिळी. I apologize for the language
|
Dinesh77
| |
| Friday, October 27, 2006 - 8:37 pm: |
| 
|
कोण राष्ट्रपिता? मागेच मी म्हटल्याप्रमाणे, राष्ट्रपिता या शब्दालाच माझा विरोध आहे. गांधीच्या आमरण उपोषणाला भिउन तत्कालिन सरकारने घेतलेला अत्यंत चुकीचा निर्णय. जेव्हा एखादी व्यक्ती राष्ट्रापेक्षा स्वताला श्रेष्ठ मानू लागते, तेव्हा ते राष्ट्र लयाला जाते. गांधीची ही सर्वात मोठी आणि अक्षम्य चूक आहे.
|
Yogy
| |
| Friday, October 27, 2006 - 9:01 pm: |
| 
|
एकदा मान्य केलेली गोष्ट पाळणे हा चुकीचा निर्णय? गांधीजींनी स्वत:ला राष्ट्रापेक्षा मोठे मानले? हा हा आमच्या संस्कृतीत स्वप्नातही दिलेले वचन पाळणारा हरिश्चंद्र राजा आहे तुम्हाला कदाचित संघ, अभाविप यांची उज्जैनमध्ये स्वत:च्या गुरूला ठार मारणारी वेगळीच संस्कृती अभिप्रेत असावी. हा दुवा तुमच्या सोयीसाठी http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/1933758.cms विषयांतराबद्दल क्षमस्व
|
तुम्हाला कदाचित संघ, अभाविप यांची उज्जैनमध्ये स्वत:च्या गुरूला ठार मारणारी वेगळीच संस्कृती अभिप्रेत असावी योगी एखाद्या घटनेवरुन तुम्ही पुर्ण संघाला मध्ये का आणताय. तुम्हाला संघ माहीती आहे का व त्याची संस्कृती अशी असते का? (का आता संघा कडे गाडी वळवायची आहे अफझल चा मुद्दा फसल्यामुळे) दिनेश गांधीना विरोध करतात म्हणजे संघाचेच का? ( कदाचित ते असतील ही पण तुम्ही तसा अंदाज लावताय). बघा किती संघविरोधी विष भिनलय.
|
Zakki
| |
| Friday, October 27, 2006 - 11:44 pm: |
| 
|
अहो ते ५५ कोटी तर गेलेच. अफजलचेहि जे काय व्हायचे ते इथे चर्चा करून टळायचे नाही. पूर्वी हा दहशतवाद नावाचा प्रकार नसताना कुणि काय केले नि का केले या प्रश्नांचा काथ्याकूट करण्यात काहीच अर्थ नाही. संघ असो, भा.ज.प. असो वा कॉन्ग्रेस असो. इथे खरे तर सगळ्यांचेच चुकते आहे नि सगळेच निष्क्रिय नि हतबल बनलेले दिसताहेत. खरा मुद्दा इस्लामी दहशतवादावर उतारा काय असा आहे. त्यासाठी बहुधा सर्वांना एकत्रित येण्याची गरज आहे. जुन्या गोष्टींवरून भांडण उकरून काढण्याची नाही! भारतात फार हुषार नि विद्वान लोक रहातात म्हणे, मग त्यांना का हे प्रश्न पडावे? इथे अमेरिकेत शहाणे, सुसंस्कृत लोक नाहीत. त्यांना एकच माहित. कुणि अरे म्हंटले की आपण कारे म्हणायचे नाहीतर सैन्य पाठवून दिसेल त्या मुसलमानाला ठोकून काढायचे. चांगले नाही ते. पण थोड्याफार प्रमाणात त्याचा उपयोग होतो. तुम्ही आता उच्च संस्कृतीचे वारसदार, हजारो वर्षे संस्कृति टिकवून ठेवणारे, अनेक आक्रमणांना तोंड देऊन पुन: जगात निदान काही क्षेत्रात मानाचे स्थान मिळवून बसलेले, श्रीकृष्ण, गांधी अश्या लोकांच्या तत्वज्ञानाचा फायदा मिळालेले शहाणे लोक. तुम्हाला काय सुचताय्? असा हा प्रश्न आहे! का ज्यांना अधिकार आहेत, अक्कल आहे, जनतेने निवडून दिले आहे, ते सगळे लाचलुचपत नि स्वार्थ नि पैशाच्या मागे लागले आहेत? नि जे तसे नाहीत ते नुसतेच वादावादी करतात, त्यांना मुख्य मुद्दा कुठला याचाहि विसर पडतो! हंऽऽ! मला तर शेवटचेच खरे वाटते.
|
Vikram
| |
| Saturday, October 28, 2006 - 5:58 am: |
| 
|
पकिस्तान आनि भारत यामधिल सघर्श ५० वर्शापुर्वी होता तसाच अहे आनि नेम्के कारन आपल्या देशातिल राजकिय इच्याशक्ति. नेहरुन पासुन आज सोनिया पर्यन्त प्रतेकाने य मुद्द्यावर गभिर पने विचार केला नाही अनि हे युद्ध कसे चालुच राहील याचि दक्शता घेतलिये.आनि आता जो अतिरेक चाललय तो तेथिल लोकाच्या ५० वर्शातिल दुर्दशे मुले, आतिरेकि भरति अनि रोजगार हा एक उद्योग्ग अस्तित्वात आलाय कारन रोजगरच्या सन्धि खुपच कमि आहेत पकिस्तान चे सर्व रजकारन काशमिर विशयावरच चालले अहे त्यामुले त्याना हा विशय सम्पावयाचा नहिये हा प्रकार म्हनजे फ़क्त घानेरदे राजकारनाचा खेल अहे आनि तो कुनालाही सम्पावयाचा नाहिये आनि हे १९५० पासुन चाललेय
|
Santu
| |
| Saturday, October 28, 2006 - 8:00 am: |
| 
|
एकदा मान्य केलेली गोष्ट चुकिचा निर्णय कसा)))))))राष्ट्र हितासाठी खोटे बोलले तर काय झाले(जीनांनी तर राष्ट्र हिता साठी मुडदे पाडायला कमी केले नाही).ज्यावेळि ५५कोटि द्यायचे ठरले ते परिसस्थिति शांत असताना नंतर पाकड्यानी कश्मिर मध्ये लढाई चालु केली. असे असताना पैसे दिले असते तर खुन करायला आलेल्या माणसाला खजिर शोधुन दिल्या सारखे झाले असते. संघाची गुरुला मारणारी संस्क्रुति)))))))एक घटने वरुन संघटने ला वेठिस धरणे योग्य नाहि.तसे मग नेहरुंनी इष्कबाजी बाजी केलि(एडविना,सरोजिनी नायडु ची मुलगी,झाले तर शेख अब्दुल्लाची बायको)म्हणुन काय कोण काॅग्रेस संस्क्रुती इष्कबाजिची आहे असे म्हणत नाहि.
|
Chyayla
| |
| Saturday, October 28, 2006 - 8:23 am: |
| 
|
केदार तुमच म्हणन एकदम बरोबर... गई भैस पानी मे... हे नेहमीचच, मुद्दा पराभुत झाला की सन्घाला शिव्या देणे तेवढा एक कलमी कार्यक्रम उरला आता. पाहु आता, गान्धी, शिवाजी, पेशवे, अफ़जल, सन्घ वैगेर खुसपट काढुन झालीत आता पुढे? तशी एकन्दरीत चर्चा छान झाली, सगळ्यान्नी मुद्दे पण छान मान्डलेत, आता उगीच वर सान्गितल्या प्रमाणे येरे माझ्या मागल्या प्रकार सुरु झाला आहे. झक्कीजी, ह्या BB वर आधीच उतारा काढला गेला आहे आणी तो म्हणजे हिन्दु सन्घटन त्याला पर्याय नाही, सगळे जाती, धर्म, वन्श, प्रान्त भेद दुर सारुन सगळा राष्ट्ररुपी समाज जाग्रुत करणे. हो अगदी सन्घाला अभिप्रेत असलेले राष्ट्रवादी मुस्लिम, ख्रिश्चन (त्यान्ना कुठेही हाकलायची गरज नाही) व ईतर जे सध्या ईथेसुद्धा द्वेष आणी ईर्षेमुळे हिन्दुना, सन्घाला शिव्या घालत आहेत ते सुधा. आम्ही पुढे जाणारच तुम्ही याल तर तुमच्यासह न आल्यास तुमच्या शिवाय. यात गद्दारान्ची जयचन्दवादी भुमिका स्वीकारायची की आपसातले वाद घालवुन एकत्र यायचे ते ज्याचे त्याने ठरवायचे आहे. "वयम पन्चाधिकम शतम" हा आपला मन्त्र आहे. तुम्हाला काही गरळ ओकायचे असेल तर त्यासाठी दुसरा BB उघडावा तिथे स्वस्थ चर्चा अपेक्षीत आहे. पण हिन्दु सन्घटनेला पर्याय नाही हेच खरे, आणी हाच उतारा. सामुवै, मला वाटत ह्या BB चा समारोप करावा असे वाटत.
|
Sunilt
| |
| Saturday, October 28, 2006 - 10:48 am: |
| 
|
"इस्लामी" दहशतवादावर हिंदू संघटन हा उपाय ? तुमची पण कमालच आहे, च्यायला !!!!!! अहो, हे हिंदू संघटन १९२५ पासून आहेच की. हा "इस्लामी" की काय तो दहशतवाद त्यानंतर चालू झाला. जो रोग उपाय अस्तित्वात असताना झाला तोच त्या रोगावरचा उपाय कसा काय होऊ शकतो ? आणि दुसरे म्हणजे, हा तथाकथित इस्लामी दहशतवाद थैमान घालतो आहे तो मुखय्त्वे अमेरीका, इंग्लंड, इस्त्रायल आणि भारतात. ते का ते आधी पहा आणि मग हिंदू संघटन हा उपाय असू शकतो का ते सांगा.
|
Sahilshah
| |
| Saturday, October 28, 2006 - 11:36 am: |
| 
|
(ईस्लामिक ?) दहशतवादावर एक चागला लेख. http://www.pudhari.com/static/features/diwali06/parisamwad1.htm
|
Chyayla
| |
| Saturday, October 28, 2006 - 1:55 pm: |
| 
|
सुनिल, आता मी काय म्हणाव...तुम्ही तर ही सगळ्यात कमालीची पोस्ट लिहिली या BB वर, एवढी हास्यास्पद आणी धडधडीत खोटे तुम्ही लिहु शकता यावर विश्वासच बसत नाही. हे म्हणजे अतीच झाले. ईस्लामच्या जन्मापासुनच हा दहशतवाद सुरु आहे हे मला ईथे लिहाव लागतय. ईस्लामचा प्रचार आणी प्रसार केवळ तलवरीच्या जोरावरच झाला याला फ़ार मोठा ईतिहास आणी पुरावा द्यायची गरज पडु नये. गेल्या कित्येक शतकापासुन हे आपण भोगत आहोत. आज तलवारी जाउन बॉम्ब, रायफ़ल्स आल्यात पण ती जिहादी मनोव्रुत्ती अजुनही कायमच आहे फ़ार दुर कशाला शिवाजी महाराजान्ना मुस्लिम आक्रान्तान्विरुद्ध हिन्दु पतशाहीची स्थापना केली ते पण विसरलात की विसरायचे नाटक करताय, अर्थात त्याला पण गुन्डगिरीच म्हटले आहे तुमच्या सारख्या तत्वान्नी आधी आपले घर ठिक करा मग जागतिक दहशतवादाच्या गोष्टी करा. हिन्दुन्चे सन्गठन भारतापुरता दहशतवाद सम्पवायला पुरेसे आहे, तुम्ही म्हणता १९२५ मधे हे सन्घटन झाले... नाही अजुनही ते पुर्ण झाले नाही, अजुनही तुमच्या सारखी मन्ड्ळी जाग्रुत व्हायची आहेत. शिवाय व्होट ब्यान्केपायी, द्वेशापायी, जातियवादी शक्ती, झोपेच सोन्ग घेणारे बाकीच आहेत.
|
साहील तो लेख वाचला. लिंक बद्दल धन्यवाद. सर्वांची मते दहशतवाद विरोधीच आहेत. अगदी ईस्त्रायलचा आदर्श ठेवला पाहीजे असे काही जण म्हणतात. विरोधकानी ही मते वाचली पाहीजेत. दहशतवाद नाहीच असे जे म्हणतात त्यांचासाठी काही बोध्दीक. जामा मशीदीवर हल्ला हा पण त्या दहशतवादाचा एक भाग असनार शिवाय मालेगावात जे मशीदीत स्फोट झाले ते पण दहशत्वाद्यानी आम मुस्लीमांना इस्लाम खतरेमे असे सांगन्यासाठीच केला असन्याची शक्यता आहे. पण आता आम मुस्लीम पण जागरुक होतोय. वेळ लागेल पण नक्कीच मुस्लीम जनता मुख्य प्रवाहात येईल. ती तशी आणने ही त्यांची व भारताची गरज आहे.
|
Chyayla
| |
| Saturday, October 28, 2006 - 9:48 pm: |
| 
|
सहिलशाह, तुम्ही दीलेला लेख खरच विरोधकान्च्ये डोळे उघडणारा आहे. मुस्लिम दहशतवादाच्या विरोधात तथाकथित हिन्दु दहशतवाद उभा करण्याचा काही लोकान्चा प्रयत्न चालु आहे. हिन्दु सन्घटना काही हे काम करत नाही मग काय आपणच स्वत: स्फ़ोट घडवुन आणायचे आणी बोम्ब ठोकायची की हिन्दु सन्घटनान्नी केले, याच्या आधी कित्येक प्रयत्न झालेत, मागे अल्-उम्मा या सन्घटनेनी तर काही मशिदी व चर्चेस मधे पण स्फ़ोट घडवुन आणल्याचे आपण पाहिलेच अर्थात तिथे प्राणहानी होउ नये म्हणुन पुर्ण काळजी घेतली होती आणी मग वाजवा रे वाजवा प्रमाणे सगळे हिन्दु सन्घटनावर तुटुन पडले होते. जेन्व्हा सत्य उघडकीस आले तेन्व्हा चकार निशेधाचा शब्द किन्वा हिन्दु सन्घटनान्ची माफ़ी सुध्हा मागितली नाही. केदार तुमच्या मताशी सहमत आज मुस्लिम जनता पण यामुळे जाग्रुत होत आहे. बिचारे मालेगाव स्फ़ोटानन्तर दन्गली घडण्याचा अन्दाज व प्रयत्न सुध्हा फ़सला, हे म्हणजे सुजाण मुस्लिम जनतेनेच कम्युनिस्ट आणी तथाकथीत सेक्युलर पिल्लावळीच्या थोबाडात मारल्या सारखे झाले.
|
दहशतवादा विरुद्ध लढताना त्याच्या मूळ कारणावर सुद्धा उपाय केला पाहिजे. काश्मिर खोर्यातील बहुसन्ख्य लोकन्ना जर भारतात रहायचे नसेल तर त्यन्च्यावर जबर्दस्ती का? जाउद्यात कि कुठे जायचे आहे त्यान्ना
|
काश्मिर खोर्यातील बहुसन्ख्य लोकन्ना जर भारतात रहायचे नसेल तर त्यन्च्यावर जबर्दस्ती का?>>>>>>>>>> LOL. HHPV parat ekda HHPV. आधी ज्यांना त्या देशात सामाविष्ट व्ह्यायचे नाही त्यांना तिथुन हाकलुन द्यायचे मग म्हणायच आता जणगणना करा आमचीच लोकसंख्या बहुसांखीक मग आम्हाला त्या देशा सोबत राहायचे आम्हाला सोडुन द्या. आधी काही दहशतवादी (रादर फुटीरतावादी) म्हणत होते की आम्हाला वेगळा काश्मीर द्या पण आता तसे नाही. मी ईथे आधीही लिहिले होते की काश्मीर पेच कसा नंतरच्या काळात म्हण्जे १९७९ नंतर निर्मान केला गेला आहे. गूगल केल्यावर तुम्हाला अनेक लिंक मिळतील व ईच्छा असेल तर वाचुन काढता येतील त्यामुळे मी परत ईथे मांडन्याचे कष्ट करनार नाही. आता १९७९ च का? जरा निट लक्ष देऊन पहा की ईंदिरा गांधीनी भुट्टो सोबत करार केला. पण भुट्टोला execute करन्यात आले. १९७१ ला जी सप्शेल हार मानावी लागली ( ९३००० युध्द कैदी) व बांग्लादेशाची निर्मीती झाली त्याचा हा बदला आहे. काय करनार काही लोकांना हे लक्षात येत नाही. (झोपी गेलेल्यांना जागे करता येते नाही) आपलेच दुर्देव. सो कॉल्ड आझाद काश्मीरला भारतात परत आणा असे कोणी म्हणत नाही पण हा ही प्रांत सुडुन द्या असे काही लोक म्हणतात. खरेतर अशांना पेश्व्याने मस्त मार्ग सांगीतला आहे आमरण उपोषन. अशाच लोकांमुळे भारत युनो कडे गेला. तत्कालिन सरकारला वाटले की युनो मदत करेल. फाळनी पेक्षा ही मोठी चुक आहे. बाय द वे. कुलकर्णी भाजपाने संसदेवर हमला केला याचा अजुन तुम्ही पुरावा दिला नाही. का?
|
Zakki
| |
| Sunday, October 29, 2006 - 1:12 am: |
| 
|
खरे म्हणजे १९४७ साली, काश्मीरचा राजा हरिचंद नि त्याची मुस्लिम प्रजा या सर्वांच्या मते, ते इतर पंजाबी, सिंधी नि पठाण लोकांपेक्षा उच्च दर्जाचे आहेत असे मत होते. म्हणून त्यांना ना भारतात ना पाकीस्तानात जायची इच्छा होती. अर्थातच नेहेरूहि काश्मीरचेच, नि त्यांनाहि काश्मीर वेगळेच हवे होते. पण तेव्हढ्यात् पाकीस्तानने काश्मीरवर हल्ला केला नि मग हरीचंदराजाची घाबरगुंडी उडाली नि भारतात सामील होतो असे लिहून द्यायला तो तयार झाला, मग भारताने तिथे जाऊन पाकिस्तानचे आक्रमण थोपवले. मग नेहेरूंच्या मूर्खपणामुळे हा प्रश्न यूनो कडे गेला. तिथे ब्रिटिश नि अमेरिकन यांना neutral भारतापेक्षा अमेरिकन गटातला पाकीस्तानच जास्त पसंत होता. पण हरीचंदने भारतात सामिल होतो असे लिहिल्याने उघड उघड सर्व काश्मीर पाकीस्तानला न देता, त्यांनी बळकावलेला भाग त्यांच्याच कडे ठेवावा असे म्हंटले. त्यामुळे तेथे अमेरिकन सैन्य ठेवून रशियावर हेरगिरी करणे त्यांना सोपे होते. भारताने अमेरिकेला असे कधीच करू दिले नसते. त्यात भर म्हणून काश्मीर आहे तसाच सुंदर रहावा म्हणून नेहेरूंनी भारतातील इतर कुणाला काश्मीरमधे जमीनीची ownership कायद्याने बंद केली. त्याचा फायदा अगदी बेनझीर भुट्टो ने सुद्धा (आणि तिच्या आधीच्या पाकीस्तानि PM's नि) घेऊन सांगीतले की याचा अर्थ काश्मीर भारताचा भाग नाही हे भारताने मान्य केले आहे, पण त्यांनीच आक्रमण करून काश्मीर बळकावले आहे. धन्य ते नेहेरु!! मग काय, काश्मीरचे हिंदू इतके दिवस तिथे जिवंत राहिले हेच नवल! नि आता निर्वासित होऊन दिल्लीत आले! भारत सरकार म्हणते ' They came here by their own choice !' म्हणजे मुसलमान व्हा, मरा किंवा चालते व्हा, यापैकी त्यांनी शेवटचा choice निवडला! खरे आहे भारत सरकारचे! आता विजय कुलकर्णी सारखेच इतर अनेक लोकांना वाटत असेल, तर जाऊ दे त्यांना फुटून, नि मग नंतर केरळा, तमिळनाडू, नागा, खलिस्तान, जाऊ दे या सगळ्यांना कुठे जायचे ते! खरे तर मागे कुणि तरी प्रस्ताव मांडलाच होता की महाराष्ट्र, गुजरात, नि कर्नाटक यांचाच फक्त एक वेगळा देश करावा, हवेत कशाला दळीद्री यू पी, नि एम. पी., नि बिहार, ओरिसा वाले नि यंडू गुंडू?
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|