Yogy
| |
| Friday, October 20, 2006 - 6:42 pm: |
| 
|
कोणत्याही प्रश्ना मध्ये अस्मिता आली की तो प्रतिष्ठेचा प्रश्न बनतो आणि सर्वसमावेशक उत्तर शोधणे अवघड होऊन बसते. अफजलची घटना "त्यांना" कशी वाटते यापेक्षा ह्या घटनेचा ते फायदा कसे करुन घेणार नाहीत.. आणि ज्यायोगे दहशतवाद्यांची नवीन भरती वगैरे करताना त्यांना हा मुद्दा कसा वापरता येणार नाही हे पाहणे आवश्यक आहे. फाशीची शिक्षा हा स्वतंत्र चर्चेचा विषय आहे. या शिक्षेबद्दलचे माझे मत तुमच्यासरखेच आहे. मात्र ज्यांना ह्या शिक्षेलाच विरोध करायचा आहे त्यांची मते ऐकून घ्यायला मला नक्कीच आवडेल
|
Saurabh
| |
| Friday, October 20, 2006 - 6:48 pm: |
| 
|
फ़ायदा करुन घेउ इच्छीणारे नुसती "जन्मठेप झाली" ह्या गोष्टीचा फ़ायदा करून घेणार नाहीत ह्याची खात्री कोण देणार? किंबहुना कोणतीही "शिक्षा झाली" ह्याचाही ते फ़ायदा नव्या दहशतवाद्यांच्या नियुक्तिसाठी करुन घेउ शकतात. थोडक्यात तुमच्या दुसर्या वाक्याच्या आशयाला धरून, "ते काय करतील" हा निकष नसून ह्या गुन्ह्याला "भारत काय शिक्षा देउ इच्छीतो" हा निकष आहे.
|
Yogy
| |
| Friday, October 20, 2006 - 7:31 pm: |
| 
|
फाशी या शिक्षेचे "अपील" दहशतवाद्यांसाठी अर्थातच जास्त आहे. त्याला "हुतात्मा" बनवले तर भारताला त्याचा जास्त तोटा होण्याची शक्यता आहे. भारत काय शिक्षा देऊ इच्छीतो हे न्यायालयाने दाखवून दिलेलेच आहे. मात्र या शिक्षेमुळे चुकीचे संदेश जाणार नाहीत याची काळजी घेणे आवश्यक आहे. हे वाक्य मी अफजलच्या बाजूने बोलत नाही हे स्वतंत्रपणे स्पष्ट करतो.
|
Peshawa
| |
| Friday, October 20, 2006 - 7:58 pm: |
| 
|
न्यायालय त्याच्या चौकटीत काम करते. त्याने जो दिला तो न्याय नाही असे म्हणणे म्हणजे सगळ्या न्याय्व्यवस्थेवरच प्रष्णचिंन्ह लावणे. असे करण्यात गैर काही नाही. पण मग उद्या कोणताही निकाल का ग्राह्य धरावा? सगळेच जण राश्ट्रपतीन्ना साकडे घालतील. अफ़्जल कसा निर्दोश आहे हे सिद्ध व्रुत्तपत्रातुन अत्ता करण्या इअवजि त्याला फ़ाशी नको म्हणणारी मंडळि योग्य वेळेस कोर्टात त्याच्या बाजुने का उभि राहीली नाहीत? हे वराती मागुन घोड ह्याला मानवतावाद असले ढींच्याक पोलके का नेसवतात? अता ह्यांन्न सगळ्या process मधले loop holes दिसतात जेंव्हा केस चालु होति देंव्हा काय फ़ेणि लाऊन पडले होते काय? अफ़जलला एका सार्वभौम व लोकशाहीने मान्य केलेल्या process गुन्हेगार थरवले आहे. मान्य नसेल तर process बदला कोण नाही म्हणत नाही. पण राष्त्रपतींना अधिकार आहे तेंव्हा त्यांच्या कडुन माफ़ी मिळवणे योग्य पण मला वाटते अता निर्णय फ़िरवणे योग्य नाही. हे म्हणजे Duckworth-Lewis मेथड ने match गमावल्यावर ती मेथड कशी वाइट आहे आणि कसा हरलेला संघावर कसा अन्याय झाला आहे आणि त्याला बाहेर काढणे कसे गैर आहे अमानवतावादी आहे वैगेरे म्हणण्यासारखे आहे. मला ह्या मानवतावाद्यांच नवल वाटत आम्ही सांगतो तसे करा म्हणायला लंगोट्यांचे झेंदे करून जातील पण हेच सत्तेमधे बसुन योग्य निर्णय घेऊन दाखवा म्हटले की टाच लावून पळतील किंवा आपले ती पुर्व करायला असंख्य माणस मारतील :-)
|
Yogy
| |
| Friday, October 20, 2006 - 8:10 pm: |
| 
|
लंगोट्यांचे झेंदे प्रथमच ऐकले
|
Chyayla
| |
| Friday, October 20, 2006 - 10:51 pm: |
| 
|
पेशवा पुर्ण समर्थन. मानवतावाद्यान्चा एक अलिखित नियम आहे, जेन्व्हा आतन्कवादी सामान्य जनतेची कत्तल करतात तेन्व्हा एक शब्द्पण निघत नाही, काश्मीर मधे हिन्दुन्ची कत्तल झाली, आपल्याच देशात निर्वासितान्च जीवन त्यान्चा नशीबी आला, कशाला येतिल बापडे मदतीला हीन्दुन्च्या रक्ताची काय किम्मत ते काय मानव आहेत का मानवाधिकार त्यन्च्या बाजुने असायला?... आणी जेन्व्हा अफ़जल सारख्याची पाळी येते तेन्व्हा अगदी बेम्बिच्या देठापासुन सारे एकजात ओरडतील. आपल्या कडे लग्नात एक ब्यान्ड पार्टी तयार ठेवण्याची पधत आहे लग्न लागले की "वाजवा रे वाजवा" म्हटल की झाले सुरु. हा असलाच प्रकार हे लोक करतात अशावेळेस त्यान्ना विचारावेसे वाटते "तेन्व्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म".
|
फाशी सारखी कठोर शिक्शा देताना १ त्याच्यावरचा आरोप अगदी स्पष्टपणे सिद्ध झाला आहे का? अफ़ज़ल विरुद्धचा पुरावा अगदीच तकलादू आहे आणी काही पुरावा तर पोलिसान्नी खाडाखोड करून केला आहे हे तर सर्वोच्च न्यायालयाने सुध्हा मान्य केले आहे. २ त्याला आपला बचाव करण्याची योग्या सन्धी मिळाली आहे का? वास्तविक पोलिसान्कडचा पुरावा भक्कम असता तर त्याला असे घाई गडबडीत दोषी ठरवण्याचे नाटक करावे लागले नसते. ३ खालच्या कोर्टात ज्या न्यायाधीशानी तिघानाही फाशी दिली त्यान्नी "महीला वकील काय करून पुढे येतात हे मला ठाउक आहे" असे उद्गार भर कोर्टात काढून मजा आणली होती. ज्या पोलिस अधिकार्याने केवळ चार दिवसात (!) या प्रकरणाचा तपास पूर्ण केला तो नन्तर ड्रग डीलर शी सम्बन्ध ठेवण्यावरून प्रकाशात आला होता. ४ एवढे सारे होउनही सन्सदेवर हल्ला करणारे कोण? याचे उत्तर आपल्याकडे नाहेई. ह्या कटाची महीती असणर्या एकमेव माणसाला मारून टाकण्याचा काही मन्डळीन्चा अग्रह का? की हा सारा बनाव काश्मिर पोलिसानी केला आहे या अफ़ज़लच्या आरोपात तथ्य आहे? परच टीवी वर पाहीले की राहुल महाजन राजकारणात पदर्पण करणार आणी अफ़ज़ल ला फाशी देण्याची मागणी करणार! आनन्द आहे
|
भारतासारख्या "सुसंस्कृत" देशात फाशी वगैरे शिक्षा असणास काही लोकांचा विरोध आहे. त्यांचा विरोध "अफजलच्या फाशी" ला नसून "फाशी" या शिक्षेलाच आहे >>>>> काय तरी वाद. अमेरिकेत सुध्दा देहदंड शिक्षा आहेच. ईंजेक्शन टोचुन आजही लोकांना मारले जाते व त्याचे प्रसारण १० मिनीटानंतर होते. काय हरकत आहे फाशी द्यायला. माणवातवादी म्हणे आणी त्या नावाखाली ज्यांनी अमानविय कृत्ये केली त्यांनाच वाचावायचे. क्या बात है तु मार मै तुझे बचाता हुं. BTW अनेक बाकी गोष्टींकडे हे लोक का लक्षात घेत नाहीत जसे गरिब लहान मुल वैगरे. त्यात कदाचित प्रसिद्दी नसते म्हणुन का? पेशवा अगदी बरोबर. anyway तमसो मा जोर्तीगमय ह्या दिवाळीला आपल्या भारतात योग्य तो प्रकाश पडो.
|
Santu
| |
| Saturday, October 21, 2006 - 1:24 pm: |
| 
|
घाई गडबडित दोषी ठरवण्याचे नाटक))))))सुप्रिम कोर्टापेक्षा तुमच्या कडे "आतली" माहिति दिसतेय
|
आता तर आयुर्वेदिक औषधान्चे व्यापारी बाबा रामदेव यान्नी सुद्धा अफझल ला फाशी देण्याची मागणी केली आहे. फुकटात प्रसिद्धी मिळविण्याची ही नवी युक्ती राखी सावन्त ला सान्गायला हवी.
|
Santu
| |
| Sunday, October 22, 2006 - 7:03 am: |
| 
|
मागे या रामदेव बाबा च्या मागे व्रुंदा करात(तिच ति कपाळावर रुपयाएवढ कुंकु लावणारी) अशाच सवंग प्रसिध्दि साठी लागली होति.पण तीच्या मित्रा नी पण(लालु,मुलायम) यानी पण तिला साथ दिली नाहि.कारण त्याना पण तिची स्वताचीच ++++ करायची सवय आवडली नाही.व बाई तोंड्घशी पडली.
|
Giriraj
| |
| Tuesday, October 24, 2006 - 7:59 am: |
| 
|
सापडला की नाही अजून उतारा?
|
Sunilt
| |
| Tuesday, October 24, 2006 - 11:09 am: |
| 
|
प्रथम रोगाचे निदान तरी होऊ देत नीट. उतार्याचे नंतर बघू.
|
उतारा सापडला हो! आत फक्त कोम्बडी सुया, लिम्बू आणी काळी बाहुली हवी आहे
|
Yogy
| |
| Tuesday, October 24, 2006 - 7:16 pm: |
| 
|
हा हा अगदी योग्य उपाय सुचवलात... संपूर्ण स्वदेशी आणि संस्कृतीरक्षक उपाय आहे
|
Deshi
| |
| Tuesday, October 24, 2006 - 7:49 pm: |
| 
|
अरेरे मला वाटल लालभाई सारखी वाद घालायची धमक तुम्हात असेल ते निदान मुद्दे तरि मांडत होते तुम्ही ... लगे रहो. कदाचित आता येथे वाद घालन्यासारखे काही उरले नाही वाटत. कारण विरोधक एकतर सर्वपोस्ट ला हास्यास्पद तरी म्हणतात नाही तर वरील काही पोस्टस सारखे. उत्तर देतात.
|
Zakki
| |
| Tuesday, October 24, 2006 - 8:54 pm: |
| 
|
विजय कुळकर्णी यांचे अफजलखानबद्दल लिहिलेले मुद्दे विचारात घेण्याजोगे आहेत. ते का विचारात घेतले नाहीत? असे कुणि वकिल का नाहीत की जे या मुद्द्यांवर भांडू इच्छित नाहीत? केवळ फाशी की नाही यापेक्षा तो दोषी की नाही हे आधी निर्निवादपणे ठरायला नको का?
|
Santu
| |
| Wednesday, October 25, 2006 - 6:08 am: |
| 
|
अहो जक्की सुप्रिम कोर्टाने ठरवलय की एकदा दोशी परत खालच्या कोर्टाने पण ठरवलय मग आणखी किति दळण दळायच या अफ़जल्खाना साठि.
|
सन्सदेवरील हल्ला हा भाजप सरकारने तहलका प्रकरणावरून लोकान्चे लक्ष विचलीत करण्यासाठी केलेला बनाव होता. या कटाचा शेवटचा दुवा अफझल आहे. आणी म्हणून अफझल ला ठार मारण्यासाठी भाजप परीवारातल्या सर्व सन्घटनानी आन्दोलन सुरु केले आहे.
|
Mahesh
| |
| Wednesday, October 25, 2006 - 12:12 pm: |
| 
|
अरे बापरे हा तर भाजप आणी मित्र पक्षांवर सनसनाटी आरोप आहे.
|