Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through October 20, 2006

Hitguj » Views and Comments » Current Affairs » ईस्लामी दहशतवादावर ऊतारा » Archive through October 20, 2006 « Previous Next »

Kedarjoshi
Wednesday, October 18, 2006 - 9:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

योगी
आजही २००६ मध्ये भारतात असमानता आहे.
तुम्ही कुठल्या समानते बद्दल बोलत आहात. शिक्षण, नोकरी मध्ये असमानता आहे म्हणुनच तर आरक्षन ई. वैगरे वर घोळ चालु आहेत. संपुर्ण भारतच जर ह्यातुन जात असेल तर एखादा समाज त्याला कसा काय अपवाद असेल.
दलीत किंवा ईतर मागासवर्गीयानी नाही दहशतवाद केला हे पण लक्षात घ्या.
आणी सुधारणा म्हणत आहात तर त्या केल्या तर तो समाज उडवुन लावतो. शरियत बदलायला तयार नाही. (शाहबानो). ह्या वर काय उपाय आहे हेच कळत नाही. मुस्लीम समाजात ही अनेक चांगले कार्यकर्ते होऊन गेले आहेत. हमिद दलवाई वैगरे पण तो समाज त्यांचापाठीमागे जायला तयार नाही.


Chyayla
Wednesday, October 18, 2006 - 10:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्की केदार, एकदम सही...पटल बुवा.

अमेरिकेबद्दल माझे काही खुप छान मत नाही पण द्वेशही नाही, त्यान्नी जे केल ते भोगत आहेत, पण मुर्दाडासारखे खपवुन पण घेतले नाही. कम्युनिस्टान्ना अमेरिकेविरुद्ध काही पण बोला त्यान्ना लगेच मान्य. त्याचप्रमाणे योगी तुम्हाला नेमका तो अमेरिकेविरुद्धचा मुद्दा मान्य झालेला दिसतोय? काय नवल.

ईस्रायल तर एक आदर्श आहे...स्वताचे रक्षण करण्याचा पुर्ण अधिकार आहे त्यान्ना.. लगे रहो... ईतरान्ना तिळ्पापड का तर हे सगळे ईस्लामी दहशतवादाच्या नाकावर टिच्चुन टिकुन आहेत अजुनही


Peshawa
Wednesday, October 18, 2006 - 11:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हिंदू धर्म सुधारणेसाठि सर्व स्तरांवर प्रयत्न करण्यात आले
शैक्षणिक पातळी म्हणजे एखद दुसरा नेता होत नसावा नाही का? तरिही आपण खिळा अजन/अजना चक्रावर मारलात. धार्मिक सुधरणा होणे आवश्यक आहे हे फ़ार महत्वाचे आहे. आणि ह्याला माझे पुर्ण अनुमोदन आहे. ह्या सुधारणा त्यांच्या धर्मात enlightened मुसल्मानच करू शकतो आणि अशा मुसल्मानांना प्रोत्साहन देणे आपले कर्तव्य आहे. अता आपण योग्य प्रष्ण विचारलात असे किती झाले? होतायत आणि किती होतील?

किती झाले ह्याचे उत्तर अपण स्वत: दिले आहे
किती आहेत ह्याचे उत्तर ऐकण्यास मी उत्सुक आहे
किती होतील - वयक्तिक मी खुप आशावादी आहे :-)

हिंदू समाजात शिक्षणाच्या झालेल्या प्रसारामुळेच मुलतत्त्ववाद्यांना तेवढे स्थान राहिलेले नाही
हे विधान पुन्हा मला पटत नाही. १९५० साला पसुन गेलि पन्नास वर्शे हींदु समाजात शैक्षणिक प्रसार वाढतो आहे. अजुनही १००% हिंदु साक्शर नाही. आणि ह्याच काळात हिंदुं मधील मुलतत्ववाद देखिल वाढतो आहे. ह्या न्यायने हाच trend कायम राहिला तर आपले विधान कसे खरे थरते? पुन्हा अमेरिकेत १००% साक्शरता आहे पण इथे मुलततत्ववाद गेल्या दोन निवडनुका जिंकला आहे :-)

पुन्हा येथे आपण कोणत्या प्रकारचे शिक्षण देतो हे महत्त्वाचे आहे
हा मुद्दा मह्त्वाचा आहे. पण असे शिक्षण जे दहशतवाद मुलतत्ववाद घालवेल असे देणे शक्य आहे का? आपणच म्हणालात
'एकाच विचारसरणीच्या साच्यातील माणसे घडवणे भारताच्या परिस्थितीत फार अवघड आहे.' हा तिढा कसा सोडवायचा?

जर कृष्णवर्णीय हे गुलाम आहेत अशीच शिकवण शाळेत तिली तर पुढचे वागणे त्याला अनुसरूनच असणार आहे.
आमेन: तेच तर सर्वांचे म्हणणे आहे. कोणत्याही इतर शिक्षणापेक्षा धर्मग्रंथाची शिकवण हिच खरी माणली तर धर्म्ग्रंथातील असे उतारे जे दुस्र्या बद्दल अनादर शिकवतात ते शिकवु नका काढून टाका असे मुस्लिमाना सांगितले तर ते ऐकतिल असे आपल्याला वाटते का? धर्मग्रंथ edit करण्या इतका कोणता धर्म आज सळसळता जिवंत आहे? पन काही धर्मानी असे उतारे काल्बाह्य थरव्ले आहेत. माझि अशी आशा आहे एक्दिवस मुस्लीम्सुधा करतील. पण वाट पहणे सगळ्यांनाच जमते असे नाही :-)




Dinesh77
Thursday, October 19, 2006 - 1:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

च्यायला,
तुमचे म्हणणे पटले, इस्त्राइल खरोखरच आदर्श आहे.
फ़क्त दोन जवानांसाठी त्यांनी शत्रूला बेचिराख केले आणि आपण बघा ज्याने आपल्या संसदेवर हल्ला केला त्याला फ़ाशी देण्याचीही तडफ़ दाखवु शकत नाही.


Kedarjoshi
Thursday, October 19, 2006 - 2:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आपल्या देशात आपण लगेच फाशी का देउ शकत नाहीत ह्या प्रश्नाचे उत्तर.
ईस्त्रायल हा देश बहुंताश एकधर्मीय देश आहे.पण भारतात अनेक धर्म आहेत. ईस्त्रायल ह्या देशातील नागरीक त्यांच्या सरकार नी घेतलेल्या भुमीकेसोबत निष्टावान असतात. आपल्या देशात कोणी कुठलीही भुमीकाच घेत नाही मग निष्टावान राहन्याचा प्र्श्नच नाही. त्या देशात मानविहक्क वाले अजुन जन्मलेच नाहीत आपल्या देशात त्यांनी थैमान घातले आहे. त्या देशातील नागरिक हे देशाशी निष्टा ठेवतात, आपल्या देशात व्यक्तीनिष्टा असते देश आधी नसतो. झालेच तर नविन फुटीर मत वादीच जास्त झालेत त्यामुळे देशाचा शत्रु तो माझा मित्र अशी भावना काही व्यक्ती घेत आहेत व त्यांचा पाठीमागे काहे लोक धावत आहेत.

कायदा हा नावालाच आहे त्यामुळेअच १३ वर्षापुर्वी जे झाले त्यांना आज शिक्षा मिळते. प्रत्यक्ष ईंदीरा गांधीना ज्यांनी मारले त्यांना सजा द्यायला काही वर्षे लागले मग सामान्य नागरिकाची काय कथा.

अश्या अनेक मुलभुत गोष्टींमुळे आपल्याकडे देशाच्या शत्रुविरुध्द काही हालचाल करता येत नाही.




Yogy
Thursday, October 19, 2006 - 2:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


इस्रायलच्या धोरणांना आपण आदर्श मानता हे वाचून हसू आले. इस्रायलने त्याच्या जन्मापासूनच हे धोरण अवलंबून देखील अजूनही त्यांना दहशतवादाचा नायनाट करता आलेला नाही.
दोन जवानांसाठी त्यांनी शत्रूला बेचिराख केले म्हणणे सोपे आहे. या तथाकथित शत्रूंमध्ये कित्येक बायका, निष्पाप मुले त्यांनी मारली आहेत. इतके "देशप्रेम" तर इस्रयली ज्यूंवर अत्याचार करणर्‍या हिटलरनेच दाखवले असेल.
ज्यांचा दहशतवादाशी दुरान्वयेही संबंध नाही ते मरताहेत.. मरु द्या, काही फरक पडत नाही... आपला एक मारला तर त्यांचे पन्नास मारू...
दुर्दैवाने अशाच धोरणांमुळे दहशतवादाला प्रोत्साहन मिळते.

माफ करा पण अशा "ज्वलंत राष्ट्रवादी" धोरणांपेक्षा माणुसकी मी जास्त महत्त्वाची मानतो.

आपल्या देशातील लोकशाहीचे अनेक दुर्गूण आहेतच. तशी कोणतीच राज्यव्यवस्था परिपूर्ण नसते. आपल्या लोकशाहीच्या सर्वसमावेशक स्वरूपमुळे ती तितकीशी कार्यक्षम नाहीये...

आजच प्रियदर्शिनी मट्टू च्या खटल्याचा निकाल वाचला... आपली न्यायालये आणि प्रसारमाध्यमे कार्यक्षम आणि प्रभावी आहेत आणि ह्याचे मुख्य कारण आपली राज्यव्यवस्था, सर्वाना असलेले अभिव्यक्ती स्वातंत्र्य हेच आहे.



Kedarjoshi
Thursday, October 19, 2006 - 3:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

योगी मी इस्त्रायलच्या धोरनांना आदर्श मानत नाही. फक्त फरक दाखवुन दिला. आणी आज तरी कुठल्याही देशाचे धोरण आदर्श मानावे असे नाही. पण ज्या काही चांगल्या गोष्टी असतात त्या उचलाव्यात वाईट गोष्टी सोड्याव्यात.


माफ करा पण अशा "ज्वलंत राष्ट्रवादी" धोरणांपेक्षा माणुसकी मी जास्त महत्त्वाची मानतो ---

मग का काश्मीर देउन टाकायचा का? कारण तिथेही रोज मृत्यु होतातच. मग माणुसकी ला जागुन त्यांना काश्मीर द्यायला तुमची काहीच हरकत नसावी.

झालच तर जगाच पातळीवर काय करावे म्हणता. अमेरिकेला सांगता तुम्ही अफगान, ईराक मध्ये जाऊ नका आता ते ईराण व कोरीया मध्ये पण जानार.
का जात आहेत याचा विचार केला तर त्यांना आपले स्थान ढळु द्यायचे नाही असे लक्षात येईल त्या साठी ते काही हजार लोकांचा बळी द्यायला तयार आहेत.
अमेरिका करतेय ते चुक आहे पण कोणी थांबवु शकते का त्यांना? फार तर काय UNO मधे भाषण करता यील yesterday evil was here and I can still smell him म्हनुन. या ऊपर काहीही नाही.

योगी तुम्ही व्यक्ती म्हणुन विचार करत आहात देशाचा लिडर म्हणुन नाही. एकाद्या देशाचा लिडर झाल्यावर काहीही करुन आपला देश कसा विजेता राहील हेच बघावे लागते. कदाचीत हाच नेमका फर आप्ल्यात व ईतर राष्त्रात आहे वा असावा.


Sunilt
Thursday, October 19, 2006 - 6:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ते दोन सैनिक इस्त्रायलला आजपावेतो मिळालेले नाहीत. आणि ते मिळण्यासाठी वाटाघाटींशिवाय पर्याय नाही हे देखिल त्यांना आता कळून चुकले आहे.

थोडक्यात, दादागिरीला आदर्श मानणार्‍यांचे काही खरे नाही !!!!!!!!


Peshawa
Thursday, October 19, 2006 - 7:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माफ करा पण अशा "ज्वलंत राष्ट्रवादी" धोरणांपेक्षा माणुसकी मी जास्त महत्त्वाची मानतो
ज्वलंत राष्ट्रवाद घातकच. माणुसकी मह्त्वाचीच पण सगळि माणसे सारखी म्हणुन प्रष्ण सुटत नाहीत. भरपूर माणुसकी असुनही सुटत नाहीत...

एक अतिशय ओढुनताणुन उदाहरण देतो. दोन माणसे तुमच्या समोर बळि जाणार आहेत. एकाला वाचवणयाइतकीच तुमची कुवत आहे आणि हे दोघे इसम समजा तुमच्या दोन बहीणींचे नवरे आहेत (वैयक्तीक घेउ नका तुम्ही म्हणजे कोणिही सामान्य माणुस ह्या अर्थि वापरतोय) कोणाला वाचवाल?

एका राष्ट्राचा नेता म्हणुन जेंव्हा निर्णय घ्याची वेळ येते तेंव्हा बरेच निर्णय १००रातील ९५ हिस्से अशा प्रकारचेच असतात. निर्णयाची जबाब्दारी नसताना अमुक राष्ट्र असे का वागत नाही अमुक नेता असे का करत नाही म्हणणे खुप सोपे आहे.

त्यातू बर्याच वेळा एकाच प्रषणाची अनेक उत्तरे असतात. प्रत्येकाचे फ़ायदे तोटे असतात अशावेळी योग्य उत्तर निवड्णे अवगढ असते. कारण कोणालातरी 'होणारा तोटा' सहन करावा लागतो. तो सहन करायची तयारी नसेल तर प्रतीकार होतो. reservations, kaashmir, narmadaa, mumbai jhopaDpaTTi किती तरी उदाहरणे...

केवळ माणुसकी आहे म्हणुन प्रष्ण सुटले असते तर फ़ार बरे झाले असते! राश्ट्रवाद म्हणजे माणसाच्या स्वार्थाचे सामुहीक रूप... आपला बळि जात नाही हे ज्याचे त्याने पहायचे असते. दुसर्याचा बळी घेणार नाही असे एकवेळ तुम्ही ठरवाल पण सगळिच मानवी जमात असे वागू शकत नाही म्हणुनच अशा मुल्यांना उत्तुंग मुल्ये म्हणतात


Dinesh77
Thursday, October 19, 2006 - 7:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मान्य, त्यांना ते दोन सैनिक अजुन मिळाले नाहित, पण
तुम्ही हा विचार केला का की, पुन्हा हिजब्बुल्ला असे धाडस करणार नाही.

म्हातारी मेल्याचे दुःख नाही हो पण काळ सोकावतो आहे.


Dinesh77
Thursday, October 19, 2006 - 7:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रियदर्शनी मट्टू ला १० वर्षानी निकाल मिळाला,
फ़ारच कार्यक्षम नाही का आपली न्यायसंस्था?????????????
आणि तुम्ही हे विसरता, न्यायालयाने फ़क्त त्याला दोषी ठरवले आहे, फ़ाशी वगैरे मिळेपर्यंत तो एकतर म्हातारा तरी होईल किंवा मरुन तरी जाईल, मग द्या त्याच्या शवाला फ़ाशी आणि गा गोडवे आपल्या कार्यक्षम न्यायसंस्थेचे!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!


Saurabh
Thursday, October 19, 2006 - 11:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

डॉ. फ़ारुख अब्दुल्ला - "फाशीची शिक्षा देणार्‍या न्यायाधीशांचे खून पडतील" (संदर्भ - सकाळ १० २० २००६, अफझल फ़ाशी संदर्भात)

नोंद घेणे - एका उच्चशिक्षीत, प्रतिष्ठीत (बोंबला!), सामाजिक अत्याचार झालेले असण्याची शक्यता जवळ जवळ शून्य असलेल्या, भारताच्या राजकीय जीवनात आणि पर्यायाने मुख्य प्रवाहात सामील( hopefully ) असणार्‍या मुस्लीम व्यक्तिने, संसदेवर हल्ला सारख्या अत्यंत देशद्रोही गुन्हा सिद्ध झालेल्या मुस्लीम व्यक्तिच्या शिक्षेला दिलेला प्रतिसाद.

बाकी सर्व विशेषणे बाजुला सारून देखिल देशाच्या न्यायसंस्थेचा इतका उघड उघड उपमर्द खपवून घेतला जातो हे दुर्दैव!




Samuvai
Friday, October 20, 2006 - 8:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

sunilt ,
तुमच्या "analysis" कडे वळू.
** अन्याय झाल्याच्या भावनेतून दहशतवादाचा जन्म होतो.
मी ईस्लामी दहशतवादाचा जेव्हा विचार करतो तेव्हा तो ई. स. 637 च्या सुमारास महंमद बिन कासिम ने ह्या देशाला आपले अपवित्र पाय लावले तेव्हापासून करतो. त्या क्षणापासून आजपर्यंत ईस्लामी दहशतवाद्यांची ना प्रेरणा बदलल्ये, ना उद्दिष्ट, ना पद्धती. हा नाही म्हणायला हत्यारांमध्ये high tech पणा आला असेल पण मानसिकता आणि उद्दिष्ट तिच.

जगभर "लढत" असलेल्या ईस्लामी "गाझीं"चे उद्दिष्ट एकच आहे - "ना"पाक जग "पाक" करणे, सगळ जग हिरव्या रंगात रंगवणे.
ह्यात मला तुमच्या "analysis" च कुठेही समर्थन दिसत नाही.

yogi ,

माफ करा पण अशा "ज्वलंत राष्ट्रवादी" धोरणांपेक्षा माणुसकी मी जास्त महत्त्वाची मानतो.

मग अफजल च काय कराव म्हणता? कारण त्याला फाशी दिल्याने त्याचा मुलगा डाॅक्टर होवू शकणार नाहीये. सोडुन द्यायच त्याला मानवतेसाठी? देशाच एवढ काय घेवून बसलात.


Santu
Friday, October 20, 2006 - 8:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दोन सैनिक मिळाले नाहित))))) मिळाले नाहित तर मिळाले नाहित(पण अजुन दोन न्यायच धाडस तर होणार नाही ना) पण येवढ्याने इस्रायल ने अशी पाचर मुसल्मानाच्यात मारलिय कि असे धाडस करायला परत हिज्बुला धजावणार नाहित.
नाहितर आपला मन्मोहन सिन्ग २५० लोकांच्या चिन्ध्या पाकिस्तान(इथ्ल्या मुसल्मानाच्या सहाय्याने) ने उडवल्या तरी षंढा सारखा गप्प बसलाय. इस्रायल काय किंवा अमेरिका काय हि राष्ट्रे स्वाभिमानी आहेत.परवाच पुतिन(रशियाचा अध्यक्ष)ने सुध्दा इराक़ मधे रशियन नागरिकांचा बळि घेणारया आतंकवाद्याना कुठलाही विधिनिषेध न बाळगता ठार मारण्याचा आदेश आप्ल्या गुप्तहेर संघटनाना दिला आहे. स्वताच्या नागरिकांचे रक्षण करणे हे राज्यकर्त्याचे प्रथम कर्तव्य आहे.उगिच माणुसकिची फ़ुकट बड्बड काय कामाची.

राष्ट्र्वाद म्हनजे सामुहिक स्वार्थ)))) स्वताच्या लोकांचा(राष्ट्राचा) स्वार्थ साधण्यास गैर ते काय.सध्याच्या वर्तमान काळात तरी राष्ट्र हा समुहच महत्वाचा आहे.जो पर्यंत जगातिल लोक मि माझे राष्ट्र हा भाव सोडत नाहित.तो पर्यंत हे असेच चालनार.

सौरभ
अहो या अब्दुल्ल्याने असे म्हटले यात नवल ते काय सर्व मुसलमानांच्या मनात हेच आहे त्या बिच्यारयाने स्पष्ट बोलुन दाखवले एवढेच


Yogy
Friday, October 20, 2006 - 12:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दोन सैनिक मिळाले नाहित))))) मिळाले नाहित तर मिळाले नाहित(पण अजुन दोन न्यायच धाडस तर होणार नाही ना) पण येवढ्याने इस्रायल ने अशी पाचर मुसल्मानाच्यात मारलिय कि असे धाडस करायला परत हिज्बुला धजावणार नाहित.

अहो अशा पाचरी कित्येक वर्षे इस्रायल मारत आलेली आहे. अशा वागण्याने जर प्रश्न सुटत असता तर इस्रायल ने पहिला हल्ला केला तेव्हाच दहशतवादी मुकाट बसायला हवे होते. इतका सोपा उपाय जर लागू पडता तर मध्यपूर्वेतील प्रश्न चिघळण्याचे काही कारणच नव्हते.
स्वत:च्या नागरिकांचे रक्षण करणे हे अर्थातच राज्यकर्त्यांचे कर्त्यव्य आहे पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही दुसर्‍या देशातील निरपराधांवर अत्याचार करावेत. दहशतवाद्यांना शिक्षा व्हायलाच पाहिजे

माफ करा पण अशा "ज्वलंत राष्ट्रवादी" धोरणांपेक्षा माणुसकी मी जास्त महत्त्वाची मानतो.

ह्या वाक्यावर आलेल्या प्रतिक्रिया हास्यास्पद आहेत. मी कोठेही काश्मीर किंवा अफजलचा उल्लेख न करता देखील अनेकांनी अनेक मते माझ्या तोंडी टाकली आहेत. अफजलचा गुन्हा सिद्ध झाल्यामुळे त्याला शिक्षा होणे आवश्यकच आहे. मात्र त्याला शिक्षा दिल्यावर होणार्‍या परिणामांचा विचार करून ह्या शिक्षेचे स्वरुप निश्चित करण्यात यावे. काश्मिरी नागरिकांसमोर अफजलचे चित्र "शहीद" असे उगीच व्हायला नको

Santu
Friday, October 20, 2006 - 1:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अश्या वागण्याने प्रश्न सुटत असता तर))))) मग कशा वागण्यने हा प्र्श्न सुटला असता.इस्रायल ने काय अहिंसावादी,(विनोबा भावे सारखे) सत्याग्रहिंचे शिष्ट मंडळ या मुजोरा कडे न्यायला हवे काय.
जिना पुढे यांचा काय उजेड पडला व यानी कसे शेपुट घातले हे पुर्वी पाहिलेच आहे.

शिक्षा दिल्यावर होणारया परिणामा चा विचार करुन शिक्षा द्यावी)))))मग त्या साठी न्यायालय कशाला हे काम "आपले धर्मनिरपेक्ष"राजकारणी सुध्दा चांगले करतील.कदाचित ते त्याला कश्मिर चा मुख्यमंत्रि सुध्दा करतिल

कश्मिरच्या जनतेला(मुसलमान) इकडे रहायच नाही हि बाब काय लपुन राहीलेली नाहि त्यांच राष्ट्रांतर त्यानि धर्मांतर केले तेव्हाच झाले आहे
तेव्हा काहि केल तरी त्यांना तो शहिदच वाटणार


Saurabh
Friday, October 20, 2006 - 4:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


अफझलचा गुन्हा लक्षात घेता कोणत्याही "भारतीय" नागरिकाच्या मनात तो "शहीद" झाला ही भावना येता कामा नये. ज्यांच्या मनात येईल ते भारतीय नागरिकत्वास अपात्र आहेत. त्यांना ओढुनताणून भारतीय म्हणवण्याचा प्रयत्न तत्काळ सोडुन ह्या कारणावरून आंदोलने झाली तर गोळ्या घातल्या जातील असे आदेश दिले पाहिजेत.

इथे कोणत्याही जमातिच्या घटनात्मक हक्कांचा प्रश्न नाही आहे ह्याविशयावरची आंदोलने खपवून घ्यायला. आणि दहशतवा"द्या"(दा नव्हे)च्या समर्थकांना काय वाटेल ह्याचा विचार करुन शिक्षा ठरवायची? (अफझलचा डाव उधळून त्याला पकडण्यात) शहीद झालेल्या जवानांचे आप्त आंदोलने करीत नाहीत म्हणून त्यांचा विचार नाही?



Yogy
Friday, October 20, 2006 - 5:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


ही बातमी वाचा

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2209715.cms

अफजल च्या बाजूने लढणार्‍या.मध्ये दोन प्रवाह आहेत.
१. अफजलला बचावाची योग्य संधी मिळाली नाही त्यामुळे हा निकाल त्यांना अमान्य आहे.
२. भारतासारख्या "सुसंस्कृत" देशात फाशी वगैरे शिक्षा असणास काही लोकांचा विरोध आहे. त्यांचा विरोध "अफजलच्या फाशी" ला नसून "फाशी" या शिक्षेलाच आहे.

दहशतवाद्यांची प्रवृत्ती लक्षात घेता त्याच्या फाशीचे भांडवल केले जाणार हे नक्की. येथे दहशतवाद्यांच्या समर्थकाला काय वाटेल याचा विचार अपेक्षित नसून ह्या शिक्षेच काश्मीर प्रशावर होणार्‍या दूरगामी परिणामांचा विचार अपेक्षित आहे.

आता राहिला प्रश्न आंदोलनांचा, दुसर्‍या माणसाची बाजू ऐकूनच घ्यायची नाही (थेट गोळ्या झाडायच्या) असे ठरवले तर लोकशाही आणि "हिटलरशाही"त फरक काय राहिला?

येथे मी कोठेही अफजल "निर्दोष" आहे असे म्हटलेले किंवा सूचित केलेले नाही हे स्पष्ट करतो नाहीतर काहीतरी भलताच अर्थ काढून चर्चा पुढे जायची.


Sunilt
Friday, October 20, 2006 - 5:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इस्त्रायलच्या गेल्या ५० वर्षांचा इतिहास पहा. त्यांचे एकही युद्ध आठवड्यापेक्षा जास्त चालले नाही आणि त्या प्रत्येक युद्धात त्यांना यशच मिळाले.

आता हे युद्ध पहा. महिन्याहून अधिक काळ चाललेल्या या युद्धात त्यांना अपयशच आले !!!!!

आता इस्त्रायलने गाझा पट्टीतून गाशा गुंडाळण्याचे ठरविले आहे हे आपण वाचले असेलच !

सामुवाई, इतिहास पुन्हा एकदा नीट वाचा. महंमद बिन कासिम तुम्ही म्हणता त्याच्या कितितरी नंतर भारतात आला. आणि एक बॉंबस्फोट करून तो देश हिरवा कसा होणार हे एकतर शेंबडे पोर आणि तुम्हीच जाणोत !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!


Saurabh
Friday, October 20, 2006 - 6:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


अफझलच्या फ़ाशीचे दूरगामी परिणाम काश्मीर प्रश्नी होतील असे वाटण्याचे मुख्य कारण जे कोणी ह्या काश्मीरप्रश्नी भारत सरकारच्या विरोधात लढत आहेत त्यांना त्यांच्या ह्या "सैनिकाचा" मृत्यु त्यांच्या अस्मितेचा प्रश्न वाटतो. त्यांना अधिक जोमाने लढण्यास प्रवृत्त करणारा. संसदेवरील हल्ला आणि त्यात भारतीय सैनिकांचे गेलेले बळी हा भारताला राष्ट्रीय अस्मितेचा प्रश्न वाटतो का हे भारताने ठरवायचे आहे.

इथल्या प्रतिसादावरून उघड आहे की काही टक्के भारतीय नागरिकांना तो वाटत नाही!

राहता राहीला फाशी ही शिक्षा "सुसंस्कृत" देशात असावी का? जरूर असावी. ज्यांनी समान्य नागरिकांचे बळी घेतलेले आहेत त्यांनी त्यांचे सर्व मानवी अधिकार स्वहस्ते त्यागलेले आहेत असे धरायला काहीही हरकत नाही. त्यांनीच मारलेल्या नागरिकांच्या पैशांवर त्यांना जन्मठेपेच्या नावाखाली आजन्म पोसत राहण्याची काही गरज नाही. शिवाय पुन्हा कधितरी कंदाहारसारख्या घटनेला वाव ठेवला जातो ते निराळेच.

मी कोठेही सर्व आंदोलनांवर गोळ्या झाडणे योग्य आगे असे म्हणालो नाही. पण काश्मीर खोर्‍यात जी आंदोलने झाली ती "फाशी" विरोधात की "अफझल फ़ाशी" विरोधात ते ज्याने त्याने तपासावे. जर ती आंदोलने अफझलच्या फ़ाशी विरोधात असतील, तर ती चिरडलीच पाहिजेत.



मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators