|
Mvrushali
| |
| Monday, October 02, 2006 - 12:48 am: |
| 
|
मुगाचं बिरडं कसं करतेस गं तू?
|
Bee
| |
| Monday, October 02, 2006 - 3:18 am: |
| 
|
वालाच बिरडं मी ऐकल आहे पण मुगाच बिरडं नाही.. मृ लवकर लिही कृती..
|
Zpratibha
| |
| Tuesday, October 03, 2006 - 12:34 pm: |
| 
|
नेहमीच्या पुरणपोळिच्या जेवणाबरोबर देशावर केला जाणारा झणझणीत सारभात. (वरुन लिंबु पिळले कि आणखी स्वादिष्ट लागतो.) तसेच गावाकडिल लग्नात आदल्या दिवशी असलेला पिठलभात किंवा पिठल भाकर, सोबत लसणाची पाट्यावर वाटलेली चटनी, कांदा,पापड,लोणच, पिठल्यात वरुन कच्चे तेल असेल तर... आई ग पुढे लिहवत नाहिये... त्या लग्नाच्या आदल्या रात्रिच्या पिठल्याचि सर दुसर्या कोणत्याहि वेळेस येत नाहि. आणखिहि बरीच लिस्ट पुढच्यावेळेस.
|
मृण्मयी अगं आत्ता वाचंलं गं miss केलं तुझं आमंत्रण. काही हरकत नाही तू परत करशीलच नाही का माझ्यासाठी?
|
Mrinmayee
| |
| Tuesday, October 03, 2006 - 9:02 pm: |
| 
|
वरदा,अगदी!! कधी येतेस तेव्हडं सांग म्हणजे मुग भिजत घालते
|
मृण्मयी अगदी कधीही तयार आहे. ए तू मुगाचं बिरडं वालासारखंच करतेस का? अख्खे मूग भिजलेले आहेत आज माझ्याकडे उसळीसाठी. लवकर recepie सांग ना म्हणजे नवीन काहीतरी करून पाहीन.
|
Mrinmayee
| |
| Wednesday, October 04, 2006 - 10:49 pm: |
| 
|
वरदा, मुगाच्या बिरड्याची रेसिपी टाकली आहे. /hitguj/messages/103383/46715.html?1160003340
|
मी आजच वाचला हा तोन्डाला पाणी सुटले. बर मला शाकाहारी आनी मान्साहारी दोन्ही आवडते. मला आवडनारे शाकाहारी तुप भात ( साधा पान्ढरा भात नाही तुप हाताची पन रेसीपी आहे. तान्दुळ मिर्चि, तमाल पत्र लवन्ग आनि बरच काही असत.) डाळ (कोकनात करतात तस वरन्-- वाटलेल खोबर घातलेल) बटाट्याची काप चपाती ताकाची कढी लोनच तळलेले उडदाचे पापड कान्दा टोमटो आनि दाहि मान्साहारी कोल्हापुरी मटन मासे(इसवण म्हणजे सुरम इ,कोलन्बि बान्गडा सगळे फ्राय) माश्याचि चटनि सगळे कोकणी पध्दतीने केलेले.
|
Zpratibha
| |
| Friday, October 06, 2006 - 6:56 am: |
| 
|
साध वरण भात त्यावर तुप तोंडि लावायला भेंडिची साधि भाजी, लिंबाच लोणच. ताकाची गरम कढि भात त्याबरोबर दुधीभोपळ्याची गोड्या मसाल्याची भाजी किंवा पापड उडदाची आमटि भाकर,भात, कांदा, लोणचे, पापड. मटकिची उसळ बरोबर भरपुर कांदा, लिंबु,वरुन कच्चे तेल.
|
Vinya
| |
| Friday, October 06, 2006 - 9:23 am: |
| 
|
प्रतिभा, तुझी आणि माझी आवड एकदम जुळते. लग्नाच्या आधीचा पिठल भात आणि मटकीची उसळ. वाह. वाचुनच तोन्डाला पाणी सुटल.
|
Bee
| |
| Friday, October 06, 2006 - 11:27 am: |
| 
|
लग्नाच्या आधी पिठल भात आणि मटकीची उसळ.. कुठल्या भागात अशी प्रथा आहे?
|
Milindaa
| |
| Friday, October 06, 2006 - 4:28 pm: |
| 
|
अरे तो स्वतः लग्नाच्या आधी करायचा तो असेल
|
Zpratibha
| |
| Monday, October 09, 2006 - 4:44 am: |
| 
|
अरे बी लग्नाच्या आधीचा म्हणजे लग्नघरी असणारा आदल्या रात्रिचा स्वयंपाक असे म्हणायचे असेल विन्याला. बरोबर ना रे? काय आहे कि लग्नघरि गावाकडे बरिच पाहुणे मंडळि आदल्या दिवशिच किंवा अगदी दोन्/ तिन दिवस सुद्धा आधि येतात, पण आदल्या दिवशी जास्तच. तेव्हा कमी वेळात घरच्या बायकांना करता येणारा आणि सर्वांना आवडणारा असा हा मेनु ठेवतात. आणि विन्या आवड सारखी असण्याचे आणखिहि एक कारण असण्याची शक्यता आहे ती म्हणजे माझे माहेर जुन्नरचे व सासर नाशिकचे त्यामुळे दोन्हिकडिल खाण्याच्या चालिरिती बर्याच सारख्या असतात. नाही का?
|
Zpratibha
| |
| Monday, October 09, 2006 - 7:18 am: |
| 
|
गावी पाटावर केलेल्या शेवया त्यावर भरपुर तुप,दुध आणि साखर किंवा गुळ. मला आठवतय गावी सुट्टित गेल्यावर मे महिन्यात मोठ्या बायका सकळि घरातिल काम लवकर आटोपुन शेवयाच्या पाटावर शेवया करायला बसायच्या आणि आम्हि मुले त्या खालि बसुन सुप किंवा चाळनी घेउन येळायला बसायचो.जसेजसे पुर्ण व्हायचे ते सुप किंवा चाळन कडक उन्हात ठेवायचे. हा stock वर्षभर पुरेल व माहेरवाशिण लेकिबाळिंना जवळच्या नातेवाईकांना वाणावळा देण्याईतपत बनवत असत. आता मात्र वेळेअभावी सगळिकडे यांत्रिक मशिनवर केल्या जातात. पण ती चव मात्र येत नाहि. गावाकडे लग्नाच्या दिवशी नवरानवरीला आणि त्यांच्या कलवर्यांना आजुबाजुचे नातेवाइक सकाळिच शेवया खायला बोलवायची पद्धत आहे.
|
Athak
| |
| Monday, October 09, 2006 - 7:34 am: |
| 
|
wow आज चुकुन इकडे आलो अन तोंडाला पाणी सुटले वाचुन नशिब आज डब्यात पिठल चपाती ( भाकरी पाहिजे होती ) आहे , आताच जेवण सुरु केले असते पण आताकुठे सकाळचे १० वाजलेत
|
Varshac
| |
| Monday, October 09, 2006 - 2:14 pm: |
| 
|
प्रतीभा तु ईतका सगळा गावाकडील मेनु लिहिलायस कि वाचुन अगदी तोंडला पाणी सुटले. मला आवडतो तो अजुन येक पदार्थ म्हणजे मासवड्या. तेलावर परतलेला कांदा,सुके खोबरे, धणे,कोथींबिर, यांचे झणझणित सारण बेसनच्या शीजवलेल्या पीठात भरुन केलेल्या वड्या, त्याच्या बरोबर केलेली तिखट आमटी आणि गरमागरम बाजरीची भाकरी. व्वा
|
अगदि मनातल बोल्लीस बघ वर्षा. मला ह्या मासवड्या खूप आवडतात
|
Zpratibha
| |
| Tuesday, October 10, 2006 - 7:13 am: |
| 
|
वर्षा अगदि खर ग बाई मी कशी बर विसरेन मासवड्यांना. अग आई इतक्या छान बनवते कि लिहितानाहि अगदि कसतरि होतय बघ. भरपुर लसुण, कोथिंबीर आणि वरुन तोंडि लावायला कच्चा कांदा व लिंबु असेल न तर काहि विचारुच नको बघ. मी दिवाळिला आई कडे गेले ना कि एकदा करायलाच सांगते तिला. दिवाळिच्या फराळापेक्षा तेच कर सांगते. आई ग, दुपारचे १२.३० वाजलेत लंच टाईम झालाय. पण हे सर्व वाचुन्/ लिहुन रोजचे जेवण जेवायची अजिबात ईच्छा नाहिये पण भुकही खूप लागलिय
|
Bee
| |
| Tuesday, October 10, 2006 - 7:57 am: |
| 
|
जर मासवड्यांचा मांसाशी काही संबन्ध नसेल तर लिहा ही कृती..
|
Varshac
| |
| Tuesday, October 10, 2006 - 3:09 pm: |
| 
|
प्रतिभा, रुपाली, मलादेखिल आईची आठवण येत होती मासवड्याबद्द्ल लिहितना. यकदा स्वताहुन उद्योग केला होता मासवड्या बनवन्यचा, पण त्याबद्द्ल न लिहिलेलेच बर.
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|