|
Prashantl
| |
| Friday, September 29, 2006 - 6:39 pm: |
| 
|
एक सुंदर विश्लेषण http://www.loksatta.com/lokprabha/20061006/pratibimba.htm
|
Sashal
| |
| Friday, September 29, 2006 - 11:31 pm: |
| 
|
१. बाॅबस्फोटातील आरोपींना आणखीन बाॅब सरकारी खर्चाने आणून देऊन "फोडा ते तुम्हास आनंद होईल तिथे" असे सांगावे काय? नाही .. त्यामुळे अजून हिंसाच होईल .. पण म्हणून ज्या लोकांनी ते घडवून आणले त्यांच्या देशात जाऊन आपण बॉंबस्फ़ोट करनं चुकीचं आहे .. २. पोलिस यंत्रणा बरखास्त करावी काय? कशाबद्दल ..? पोलिस यंत्रणा ही ideally कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आहे .. गुन्हेगारांवर अत्याचार आणि अन्याय करण्यासाठी नाही .. ३. आपल्यासाठी घरं दारं सोडून उणे ५० डिग्रीज तापमानात सुद्धा डोळ्यात तेल घालून देशाचे रक्षण करणार्या आणि देशाच्या सार्वभौमत्वासाठी सीमेवर रोज "हिंसा" करणार्या (प्रसंगी बलिदान करणार्या) जवानांना परत बोलवावे काय? हे जवान हिंसा करत नाहीत .. शत्रूच्या military forces शी झुंज देण्याचं काम करतात ते .. हे काम जेव्हा ते करतात तेव्हा ते सामान्य माणसांशी नव्हे तर military forces शी लढतात .. तेव्हा ही हिंसा नव्हे .. Prshantl , तुम्ही लिहीलंय ते पटलं ..
|
वेद अपौरुषेय नाहीत. अडीच तीन हजार वर्षान्पुर्वी इराणमधून पन्जाब कडे स्थलान्तरीत झालेल्या आर्यानी रचलेले ग्रन्थ आहेत ते. बाकी गान्धी हा मोठा गुन्तागुन्तीचा विशय आहे. सकाळ च्या २००५ दिवाळी अन्कात अनील अवचट यानी गान्धीन्वर सुन्दर लेख लिहिलेला आहे. माझ्या शेजारी काम करणारा चिनी माणुस म्हणतो की चीन मधल्या सामान्य माणसाना गान्धी बद्दल फार आदर वाटतो. एक प्यालेस्तिनी म्हणतो की अम्हाला एखादा गान्धी मिळाला असता तर बरे झाले असते. आमच्या ओफीस खाली एका गोर्या माणसाने शुध्ह शाकाहारी जेवणाचे दुकान उघडले आहे. त्याला ती प्रेरणा गान्धी वाचून मिळाली असे तो म्हणतो. गेल्या वर्शी कर्नाटकातल्या एक्क खेड्यात गेलो असताना एका अतिशय सुस्वाभावी आणी चरित्र्यावान माणसाच्या म्रुत्यू नन्तर सर्वा वक्त्यानी त्याची तुलना गान्धीशी केलि. टाइम मासिकाने एकविसाव्या शतकावर प्रभाव टाकणरी व्यक्ती म्हणुन आइनस्टाईन ला निवडले आणी दुसर्या क्रमान्कावर गान्धी होते. पण आईनस्टाईन जिवन्त असता तर त्याने नम्रपणे हा सन्मान गान्धीना दिला असता. लौरी बेकर या वास्तुविशारदाने केवळ एका भेतीतच गान्धी विचारनी प्रभावित होउन भारतात स्थायीक होउन स्थानीक सम्ग्रीतुन गरिबान्साठी घरे कशी बान्धाता येतील यावर मोलचे सन्शोधान केले. गान्धी च्या निधनानन्तर पेढे वाटणार्यानी सुध्हा पन्नास वर्षानन्तर प्रार्थनेत गान्धीन्चा समावेश केला आखिर कुछ तो बात होगी एकीकडे हे चित्र आणी दुसरिकडे "टकल्यामुळे देशाची वाट लागली" असा डायलोग मारणारी माणसे
|
Meggi
| |
| Saturday, September 30, 2006 - 6:14 am: |
| 
|
' मी कैद्यांवर माझ्या मुलांसारखं प्रेम करते ' अस म्हणणार्या किरण बेदीने कित्येक कैद्यांची मनोवृत्ती बदलली आहे. मी मागे एकदा तिहार जेलच्या कैद्यां वरची documentry बघितली. मोठे मोठे खुनी - दरोडेखोर पश्चातापाने रडत होते. या गुन्हेगारांनी camera समोर मान्य केलं की समाजावर सूड घेण्यासाठी त्यांनी अपराध केलेत पण ते चुक होतं. पोलिसांच्या 3rd degree torture ने जे कैदी सुधारले नाहीत ते कैदी किरण बेदी समोर नमले होते. ही किमया बाकी पोलिस का नाही करु शकले? या कैद्यांना कायद्याने फाशिची शिक्षा केलीच, पण गुन्हेगाराला मारण्या आधी किरण बेदीने त्यांच्यातल्या गुन्हेगारी प्रवृतीला मारलं. हा तिचा गांधीवादच नाही का? गुन्हेगारापुढे विनवण्या करणे, हा गान्धीवाद नाहि. अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचाराविरुद्ध लढा विनवण्या करुन नाही तर निर्भय होऊन अहिंसात्मक मार्गाने दिला आहे. भगत सिंग, राजगुरु यांच्या बद्दलपण मला नितांत आदर आहे. त्यांनी केवल देशाचा विचार केला होतां. पण त्यांनी निवडलेला मार्गाने केवळ तरुण जाउ शकत होते. गांधीजींनी केलेल्या लढ्यात, असहकार चळवळीत, १० - १२ वर्षाची मुलंपण सहभाग घेऊ शकत होती तसेच ९५ वर्षाचे वृद्ध देखिल.
|
Peshawa
| |
| Saturday, September 30, 2006 - 7:25 am: |
| 
|
अडीच तीन हजार वर्षान्पुर्वी इराणमधून पन्जाब कडे स्थलान्तरीत झालेल्या आर्यानी रचलेले ग्रन्थ आहेत ते. Why peddle theories as facts ? People have trouble accepting one mesiah. Gandhi is no exception, His exceptionality does not rest on his followers but on his unique method to solve the problem at hand at that time... The method can be debated or refuted as per one's own judgement and views about the problem and the 'quality' of solution one seeks... about his being great; those who feel he was should not shove it down the throats of those who are 'gandhi atheists' . He did what he believed was right and had the capability to win support for his brand of thinking. Not only that he has influenced many fighters who have adopted his methods with certain success I think that is enough to recognize him as one of the great minds of this century and his methods as one of many that have the capability to achieve certain goals...
|
Kedarjoshi
| |
| Saturday, September 30, 2006 - 5:58 pm: |
| 
|
अडीच तीन हजार वर्षान्पुर्वी इराणमधून पन्जाब कडे स्थलान्तरीत झालेल्या आर्यानी रचलेले ग्रन्थ आहेत ते.>>> कुलकर्नी ऋगवेद हा आर्य येन्या पुर्वी अस्तित्वात होता. तसेच नविन ईतीहासकार असे म्हणतात की aryan invasion theory is wrong there was no invastion .
|
Asmaani
| |
| Saturday, September 30, 2006 - 10:57 pm: |
| 
|
http://www.loksatta.com/lokprabha/20061006/good.htm. he sudhha vachaa pls.
|
Zakki
| |
| Sunday, October 01, 2006 - 2:54 pm: |
| 
|
अस्मानी, हा लेख मला आवडला. यात गांधीजींच्या चांगल्या गोष्टी कोणत्या नि त्यातून घेण्यासारखे काय हेच लिहिले आहे. मला तरी त्यात न पटण्यासारखे काही वाटले नाही. आता खुद्द गांधी या व्यक्तिबद्दल आदर वाटो, न वाटो (कारण त्यांचे राजकारण बरेच न आवडण्याजोगे होते) तरी त्यांनी सांगितलेल्या गोष्टी चांगल्याच होत्या, त्याच बघाव्यात. मागे इथे TV वर गांधींबाबत दोन पंडितांची (?!) चर्चा झाली. एकाने पुराव्यासकट गांधीजींचे दोष नि चुका दाखवून दिल्या. दुसरा नुसताच वरील प्रमाणे फक्त चांगल्या गोष्टींबद्दल बोलला. चर्चेचा समारोप करणार्याने म्हंटले, एखादी सुंदर फुलबाग असेल तर त्याचे सौंदर्य बघायचे की खाली किती चिखल नि किडे आहेत यावरून त्याचे महत्व ठरवायचे असे आहे हे. दोन्ही करता येईल. काय करावे हे ज्याचे त्याने ठरवावे. दुर्दैवाने भारतात (कदाचित् अजूनहि) व्यक्तिपूजेला जास्त महत्व आहे. म्हणुन एखादी व्यक्ति म्हणजे देव म्हणायचे नि मग स्वत: विचारच करायचा नाही! तरी आपल्याकडे एक गोष्ट आहे, श्री दत्ताने ११ गुरू केले होते. कारण प्रत्येकाकडून काही ना काही शिकण्यासारखे घ्यायचे, दोष घ्यायचे नाहीत. पण आजकाल एखाद्या सिनेमानटाने धडधडीत गुन्हे केले, अतिरेक्यांना मदत केली, तरी लोक आपले त्याच्यामागे धावतातच! त्याला तुरुंगातून सोडवण्यासाठी प्रार्थना करतात! (यात जे लोक त्याचे केवळ अभिनयगुण बघतात, किंवा कायद्याने त्याचा बचाव करण्याचे काम घेतलेले वकील, मला धरायचे नाहीत!) निदान आपण शिकलेल्यांनी तरी व्यक्ति न बघता केवळ गुण किंवा अवगुण बघावे, लिहिणार्यापेक्षा लिखाणावर भर द्यावा, 'तुम्ही भाजप वाले, तुम्ही कम्युनिस्ट,' असले बोलू नये! दुर्दैवाने राजकीय पक्षांना आजकाल स्वार्था पलिकडे काही विचारसरणि, तत्वेच नाहीत. मग त्यांच्याबद्दल कसली डोंबलाची चर्चा करणार?
|
Chyayla
| |
| Monday, October 02, 2006 - 12:42 am: |
| 
|
गान्धीगीरी एकदम ठिसुळ पायावर उभी आहे असे मी म्हणनार नाही, गान्धी हे एका व्यक्तिचे अपयश असु शकेल त्याबद्दल आपण चर्चा केलिच आहे. गान्धीन्नी जी परम्परागत हिन्दु तत्वे (यही बात थी बन्दे मे) जसे सत्य, स्वावलम्बन, स्वदेशी, रामराज्याची सन्कल्पना, शाकाहार, जीवनातील शुचिता, तसेच गौतम बुद्ध, जैन महावीर यान्नी दिलेली अहिन्सेची शिकवण वापरलीत त्यामुळे एक अध्यात्मिक आयाम त्याला लाभला, साहाजिकच ही तत्वे लोकान्ना पटली व त्यामुळे सामान्यजन गान्धीकडे पर्यायाने स्वातन्त्र्य लढ्याकडे आकर्षित झालेत हे एक सामाजिक जिवनातले यश मानावेच लागेल. आज या मुल्यान्ची गरज आहे, राष्ट्र, धर्म, अध्यात्म या बाबतीत ठरावीक सन्घटना सोडल्या शिवाय कुणीच बोलत नाहे उलट धर्म ही अफ़ुची गोळी वैगेरे मुक्ताफ़ळ उधळतात, व सेक्युलरिज्म च्या नावाखाली गान्धीन्ची हत्या रोज सुरु आहे, अध्यात्म तर फ़ारच दुर रहिले, आणी राष्ट्र.. .झाल... न बोलणेच बरे. झक्कि, त्या कार्यक्रमाच्या समारोपात शेवटचे वाक्य म्हटले आहे ना की एखादी सुंदर फुलबाग असेल तर त्याचे सौंदर्य बघायचे की खाली किती चिखल नि किडे आहेत यावरून त्याचे महत्व ठरवायचे असे आहे हे. दोन्ही करता येईल. काय करावे हे ज्याचे त्याने ठरवावे. याची दुसरी बाजु अशी मान्डता येइल की आपण झालेल्या चुकान्ना घाण म्हटले तर त्या चुकानपासुन शिकणार कधी, या उलट तुम्ही जे गुरु दत्तान्चे उदाहरण दिले ते पटण्याजोगे आहे. उदा. गान्धीजीन्नी जी लान्गुलचालन, बलात्कारचा प्रसन्ग आल्यास आत्महत्या करावी असला सल्ला वैगेरे ही म्हणजे ह्या चुकान्चे काय परिणाम होतात ते आपण पाहिले आहे, निदान आतातरी ह्या चुका करु नये येवढे आपण शिकलो तरी पुष्कळ झाले, गान्धीन्नी अप्रत्यक्ष पणे काय करु नये तेही शिकवले आहे. देशान्तर्गत कितीही मतभेद असोत, पण देशाच्या बाहेर गान्धी आपलेच आहेत, त्याबद्दल नेहमी अभिमान राहीलच.
|
Meggi
| |
| Monday, October 02, 2006 - 12:13 pm: |
| 
|
बलात्कारचा प्रसन्ग आल्यास आत्महत्या करावी असला सल्ला >>समीर, हे वाक्य खरं आहे का? reference दिलास देशील का? कारण मी Gandhiji's Biography, Gandhiyan Thoughts हि पुस्तके पुर्ण वाचली आहेत. त्यामध्ये हा उल्लेख मला कुठे आढळला नाही. असो.. या आधी केलेल्या पोस्ट प्रमाणे माझा गांधीवादावर काही प्रमाणात विश्वास आहे. पण मी त्यांच्या विषयीची पुस्तके वाचलित तेव्हा मला काही प्रश्न पडलेत. १. दुसर्या महायुद्ध्याच्या वेळी जेव्हा भारतीय सैन्याने इंग्रजांना मदत करायची नाही असे ठरवले तेव्हा गांधिजीचे विचार असे होते की ' ब्रिटिशांचे नागरिक असल्याने त्यांना मदत करणे आपले कर्तव्य आहे. ' मला या मागची भुमिका अजिबात कळली नाही. २. ब्रह्मचर्य चे पालन. त्यांच्या आश्रमातिल लोकांना ब्रह्मचर्याचे पालन करणे आवश्यक होते. मला त्यांचे हे मत अगदिच अनैसर्गिक वाटले. त्यांचे काही विचार खरच आचरणात आणण्या सारखे असतिल तरी, त्यांचे काही विचार आणि निर्णय पार चुकीचे होते.
|
Santu
| |
| Monday, October 02, 2006 - 12:57 pm: |
| 
|
मेगी हे वाक्य खर आहे. जेव्हा नौखाली येथे दन्गल झाली तेव्हा गांधी तेथे गेले होते.तेव्हा तीथल्या हिन्दु स्त्रियांनी असे विचारले की समजा मुस्लिम गुंड जर स्त्रीयांवर बलात्कार करायला लागले तर त्याचा प्रतिकार अहिंसेनी कसा करायचा तेव्हा गांधी म्हणाले की स्त्रीयांनी आत्महत्या करावी व पुरुषांनी मुसलमानांचे र्हुदय परिवर्तनाचा प्रयत्न करावा. हे सुचेता क्रुपलानी यांनी नंतर लिहिले.त्या प्रमाणे सुचेता क्रुपलानी सायनाईड ची बाटली स्वताजवळ बाळगत.कारण त्यांच्या वर बलात्कार करुन मारण्याचा फ़तवा पुर्व पाकिस्तान(बांगलादेश) नातल्या मौलवींनी काढला होता. या बाई पुढे युपी च्या मुख्यमंत्री झाल्या या नौखाली यात्रेच्या वेळी गांधी गोंधळले होते मुसलमानांचा मुकाबला अहिंसेनी कसा करायचा याचा प्रश्न शेवटी त्यांना पडला होता.या दौरयात पदोपदी लोक त्यांच्याशी प्रतिवाद करत होते दांडी यात्रे वेळची परिस्थीती राहिली नव्हती.शेवटी तर गांधी दंगल थांबवण्या साठी उपोषणा ला बसले तेंव्हा विस्थापित पुर्व बंगाली गांधी को मरने दो असे म्हणत नेहरुंच्या अंगावर गेले.
|
Lalitas
| |
| Monday, October 02, 2006 - 1:57 pm: |
| 
|
कालच्या सामना वर्तमानपत्रांत उत्सव पुरवणीत "प्रेशर टॅक्टीज" असा लेख आहे. मला पटला कारण मी कालच "लगे रहो..." पाहिला आणि रात्री हा लेख वाचनात आला.... http://www.saamana.com
|
. दुसर्या महायुद्ध्याच्या वेळी जेव्हा भारतीय सैन्याने इंग्रजांना मदत करायची नाही असे ठरवले तेव्हा गांधिजीचे विचार असे होते की ' ब्रिटिशांचे नागरिक असल्याने त्यांना मदत करणे आपले कर्तव्य आहे. ' मला या मागची भुमिका अजिबात कळली नाही>>>>>>>>>> मेगी तुझ्या प्रश्नाचे उत्तर गांधीनी आधी नाही अशी भुमीका घेतली कारण भारत हा या युध्दात न्हवताच. पण लगेच जिन्हा यांनी घोषीत केले कॉंग्रेस ने ब्रिटीशांना सपोर्ट केले नाही तरी चालेल मुस्लीम लिग करनारच. असे म्हणुन त्यांनी ब्रिटीश लोकांना सपोर्ट केला. गांधीनी लगेच या घोषनेचा विचार परत एकदा करुन ब्रिटीशांना हो म्हंटले. ( कारण त्यांना अजुनही मुस्लीम लिग की काय चिज आहे हे घ्यान्यात आले न्हवते. ह्या सर्वाचा फायदा १९४६ व ४७ मधे मुस्लीम लिग ला झाला. जिन्हा काही दुधखुळे न्हवते त्यांना ब्रिटीशांना हो म्हणुन पाक पदरात पाडुन घ्यायचा होता पण हे राजकारण दुर्देवाने गांधीच्या लक्षात आले नसावे किंवा येउअनही ते फार काही करु शकले नाहीत. BTW या आधीही बोयर युद्धाच्या वेळीही गांधीनी peace corp स्थापणा करुन ब्रिटीशांना मदत केली होतीच.
|
Chyayla
| |
| Monday, October 02, 2006 - 5:09 pm: |
| 
|
तुमच्या लक्षात एक गोष्ट आली का? गान्धीगीरी त्यान्च्या आफ़्रिकेतल्या लढ्यापासुन १९४२ व त्यापुढे काही काळ यशस्वी ठरली कारण तेथे प्रश्न होता सामान्य जनाशी निगडीत व त्यान्चा राजकारणात अन्यायाविरुद्ध सहभाग. पण हाच यशस्वी मन्त्र इस्लामपुढे यशस्वी होउ शकला नाही कारण एकच मात्रा सगळ्याच ठिकाणी लागु होत नसते. आणी पुढे राष्ट्रपातळीवरचे निर्णय घेण्यास अपयशी ठरली कारण तिथे समोर होता कमालीचा असहिष्णु जिहादी इस्लाम. ईथे पाहिजे होते ठकास ठक. ईन्ग्रजान्पुढे ती मात्रा चालण्याचे कारण ते लोकशाहीवादी व थोडे सहिष्णु (जिहादी पेक्षा) शिवाय त्यान्ची परिस्थिती पहिल्यासारख़ि समर्थ राहिली नव्हती. मऊ मेणाहुनही विष्णुदास आम्ही, हाणु नाठाळाचे माथी काठी असे सन्त सुद्धा म्हणतात. गान्धीन्च्या हे तेन्व्हाच लक्षात आले असते तर चान्गले झाले असते, (त्यान्नी पुर्ण हिन्दुत्व वापरले असते) शेवटी तेही मनुष्यच होते, चुक होणे समजु शकते, फ़क्त एकच हा मनुष्य प्रामाणिक होता त्यामुळे आदरास पात्र आहे. आपण महात्मा म्हणुन जरा जास्तच अपेक्षा केली असे वाटते.
|
ch (तुमचा पूर्ण id टाईपायला काहीतरीच वाटतं हो!), तुमचे म्हणणे पटले. सर्व रोगांवर एकच औषध चालत नाही. cancer ला जशी chemotherapy च लागते तशी मुसलमानांचा मुकाबला हिंसेनेच करणे योग्य होते.
|
Chyayla
| |
| Monday, October 02, 2006 - 11:37 pm: |
| 
|
चन्द्र्कोर, अहो या ID मधे काही वाईट नाही हो, अस्सल मराठी टपोरी शब्द आहे तो. कोणीपण सहजपणे बोलु शकतो आणी बघा हा शब्द तोन्डात कसा पटकन बसतो "च्यायला" अजुन एक खुलासा मी कुठेपण मुसल्मान असे म्हटले नाहीत कारण त्यामुळे जे खरोखर देशप्रेमी मुस्लिम आहेत उदा. मुजफ़्फ़र हुसैन, ए. पी. जे. कलाम आणी इतर बरेच काही त्यान्चा अपमान होउ शकतो, म्हणुन मी "जिहादी मुस्लिम" असला शब्दप्रयोग वापरतो तेन्व्हा सरसकट सगळ्या मुस्लिमान्साठी हिन्सा चालणार नाही, कारण हे औषध देशप्रेमी मुस्लिमान्साठी लागु नाही.
|
Sanurita
| |
| Tuesday, October 03, 2006 - 4:18 am: |
| 
|
चला, म्हणजे काही लोकाना तरी गान्धीजीच्या विचारन्ची आज गरज आहे असे वाटते. च्यायला तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. जिहादी सोडून अनेक चान्गले योगदान देत असलेले मुसलमान आहेत.
|
Samuvai
| |
| Tuesday, October 03, 2006 - 4:26 am: |
| 
|
sashal , मी तुमच्या सगळ्यात interesting उत्तराबद्दल आधी चर्चा करतो: ३. आपल्यासाठी घरं दारं सोडून उणे ५० डिग्रीज तापमानात सुद्धा ... "हे जवान हिंसा करत नाहीत .. शत्रूच्या military forces शी झुंज देण्याचं काम करतात ते .. तेव्हा ही हिंसा नव्हे .." बर मग आपल्या सार्वभौमत्वाचा घास घेऊन उभे केलेले गोरे सार्जंट म्हणजे शत्रूचा military force नव्हता काय? का ते ही सामान्य माणसात गणता तुम्ही? जागे व्हा ... आपले जवान आपल्या शत्रूला ठार करतात ही तुमच्या लेखी हिंसा नसली तरी गांधेवादाच्या लेखी हिंसाच (च वर भर देऊन वाचावे) आहे. ** पण म्हणून ज्या लोकांनी ते घडवून आणले त्यांच्या देशात जाऊन आपण बॉंबस्फ़ोट करनं चुकीचं आहे .. ह्या आधी २ वेळेस (१९६५ आणि १९७१) आपण ते फोडलेले आहेत आणि ते फोडताना शहीद झालेल्या जवानांच्या कृपेनेच आज तुम्ही स्वतंत्र भारतात ताठ मानेने जगताय meggi , फाशी देण्याआधी मन:परिवर्तन वगैरे करायचे असेल ते खुशाल करा. आमचा पुनर्जन्मावर पूर्ण विश्वास आहे. त्याचा पुढचा जन्म सन्मार्गाने व्यतीत व्हायला त्याने मदत होईल. पण पुन्हा मला संशय आहे की शिक्षेला धाडून मन:परिवर्तन हा गांधीवाद आहे काय मी संयम ठेवून गांधी ह्या व्यक्तीबद्दल चकार शब्दही उच्चारला नाव्हता. पण तुम्ही गांधींनी उच्चारलेल्या वाक्यावरच प्रश्नचिन्ह लावलत म्हणून ही घ्या त्यांची काही वाक्य: (बलात्कारीत आणि अपहरण झालेल्या हिंदू स्त्रियांसाठी) आहात तिथे सुखात रहा. हिंदूंनी आत्मसमर्पण करावे म्हणजे त्यांच्या रक्ताने ह्या भूमीत ईस्लाम पावन होईल. The brave god, fearing mopalaas भाई राशिद (अब्दुल राशिदच ना हो तो? स्वामी श्रद्धानंदांचा खुनी) शहीद राशिद वाट चुकलेले देशभक्त (भगतसिंग प्रभुती)
|
Meggi
| |
| Tuesday, October 03, 2006 - 2:57 pm: |
| 
|
केदार, धन्यवाद. ही पार्श्वभूमी मला माहित नव्हती. डोळे झाकुन गांधीजींना पाठिंबा देणे, ही मोठी चुकच म्हणायची. सन्दु आणि समुवै, वर लिहिलेली वाक्ये वाचुन तर मन सुन्न झालं. बदलत्या स्थितीप्रमाणे मते पण बदलावी लागतात गांधीजींना आणि त्यांच्या अनुयायाना कळले नाही, हे आपलं दुर्दैव.
|
Sashal
| |
| Tuesday, October 03, 2006 - 4:28 pm: |
| 
|
गांधीजी हे जसे एक महान नेता होते त्याचबरोबर एक politocian होते .. so, त्यांनी कधी काहि situations मध्ये जे उद्गार काढले ते प्रसंगजन्य होते हे सगळ्यांत आधी accept करायला हवं .. पण मला असं वाटतं की, इथे ही चर्चा फ़क्त गांधीवाद, गांधी यावर restricted नसून अहिंसावादावर आहे .. Samuvai , कुठल्याही कारणाने निर्दोष व्यक्तींवर हिंसा, अन्याय, अत्याचार होणं हे चूक आहे .. तेव्हा हिंसा support करताना प्रत्येकाने किमान एव्हढा विचार करावा की या कृत्याने किती निर्दोष लोकांवर अन्याय होतोय .. मी हे admit करते की माझा १९६५ आणि १९७१ च्या युध्दांचा सखोल अभ्यास नाही पण तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे आपल्या सैन्यांनी civilians वर बॉम्ब फ़ोडले??? मला हे accept करायला strong evidence लागेल .. आता तुम्ही माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या .. 9/11 किंवा तत्सम घटनांबद्दल तुमचं मत काय? तुम्हाला या घटना justifiable वाटतात का?
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|