|
Chyayla
| |
| Wednesday, September 27, 2006 - 6:21 am: |
| 
|
आपलाच तो खरा मार्ग व बाकीचे म्हनजे (शस्राने क्रांती घडवु पाहानारे)म्हनजे वाट चुकलेले देशभक्त व त्यांचा मुळे माझ्या अंहीसंक लढ्याला गालबोट लागत आहे असे वाटने व म्हनणे हे माझ्या कधी पचनी पडनार नाही. पटतय तुमच म्हणन, एक प्रकारे गान्धीन्नी भगतसिन्ग राजगुरु व अनेक क्रान्तिकारकान्ची आणी तसेच इतर देशभक्तान्च्या विचारान्ची अप्रत्यक्श हत्याच केली आहे, ही एक प्रकारची हिन्साच म्हणावी लागेल. गान्धीन्चे काही चान्गले गुण होते त्यान्च्या विचारात एक अध्यात्मिकता दिसत होती त्यामुळे त्यान्ना छान जनाधार लाभला होता, व वन्दनिय ठरले होते पण सगळ्यानाच ती अध्यात्मिक उन्ची पेलता येते असे नाही नन्तर जे काही घडले ते फ़ार मोठे अपयश होते असे म्हणावे लागेल. आज आपण पहातो गान्धिगिरीचा उपयोग चान्गल्या कामाएवजी वाइट कामासाठीच आजकाल केल्या जातो, सत्याग्रह म्हणन्यापेक्शा दुराग्रहच दिसतो, आजकाल तर मेघा पटकर, अरुन्धती रॉय, व तथाकथित NGO सारखे एरे गैरे लोक सुधा धरणे देतात, आन्दोलन करतात विधायक कार्याला मदत करण्याएवजी माथि भडकवण्याचे कार्य आणी चान्गल्या कार्यात आपले उपद्रव मुल्य प्रस्थापित करण्यासाठी करतात, ही एक खरी शोकान्तिका झाली आहे गान्धिगिरिची. ज्याप्रकारे सगळीकडे हिन्सेने प्रश्न सुटत नाही त्याप्रमानेच सर्वत्र गान्धीगिरीचा उपयोग नाही, हे लक्शात घ्यावे, आवश्यक तिथेच ते वापरले गेले पाहिजे असे मला वाटते sanurita तुझा घोळ होतोय, देशाच्या रक्शणासाठी आणी शत्रुशी लढतान्ना गान्धिगीरीचा उपयोग नाही, समुवैन्नी हाच मुद्द मान्डला आहे तु म्हणतेस त्याप्रमाणे सामान्य माणसाच्या रोजच्या जिवनाशी जोडण्यात काही अर्थ नाही. तिथेही पण फ़ार गडबड होते, जसे कि ज्या भ्रष्ट अधिकार्यावर गान्धीगिरीचा उपयोग होत नाही अशा ठिकाणी पण लाच लुचपत खात्यात किन्वा पोलिसात तक्रार करावीच लागेल, मग ही एक प्रकारे हिन्साच ना? मग इथे तक्रार करु कि नये हा प्रश्न येतो.
|
Aschig
| |
| Wednesday, September 27, 2006 - 6:49 am: |
| 
|
well said sanurita ...
|
Lopamudraa
| |
| Wednesday, September 27, 2006 - 7:02 am: |
| 
|
सानुरिता.. gud ....!!! मी अजुन मुन्नभाई बघितला नाहीये.. पण तुम्ही लोक सगळे त्याबद्दल चांगल बोलता आहात.. बघावाच लागेल आता..!!!
|
Samuvai
| |
| Wednesday, September 27, 2006 - 8:03 am: |
| 
|
sanurita , सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान सर्वथैव निषिद्धच आहे. त्याबद्दल कधी वाद नव्हताच. पण लाचखोर, ऊन्मत्त अधिकार्यांना काय करावे म्हणता? पोलिसांच्या ताब्यात दिले आणि त्यांनी third degree लावला तर हिंसाच की हो ती! सामन्य स्त्री वर बलात्कारासारखा दुर्धर प्रसंग ओढवला, ती विनवणी काय कमी करते? पण एका तरी नराधमाने तिच ऐकल्याच ऐकिवात आहे काय? ह्या ऊलट तिला स्वसंरक्षणाबद्दल प्रशिक्षण दिले असेल, तिच्याकडे हत्यार (अगदी मिरची पूढी चालेल) असेल, तर ह्या हिंसेने तिच्या वाचण्याची शक्यता १% तरी आहे अस नाही वाटत तुम्हाला?
|
Prashantl
| |
| Wednesday, September 27, 2006 - 1:54 pm: |
| 
|
प्रत्येकाने आपले कर्तव्य न चुकता पार पाडत रहावे. (कर्मयोग) धर्माचे (मनुष्य)पालन करावे. (धर्मयोग). प्रत्येकच्या स्वातन्त्र्याचा आणि मताचा आदर राखावा अन्यायाचा प्रतिकार धर्माच्या आणि कर्तव्याच्या कक्षेत राहून करावा. या दोघात गल्लत होउ नये म्हणून विवेक वापरावा. वेळ लागेल पण सत्याचा विजय निश्चित होतो. (येथे प्रश्न हिंसेचा वा अहिंसेचा नाही आहे. काही वेळा दोन्ही समर्थनीय असू शकतात)
|
Prashantl
| |
| Wednesday, September 27, 2006 - 5:57 pm: |
| 
|
काही दिवसांपूर्वी एका कारच्या मागे एक स्टिकर पाहीला. त्यावर लिहिले होते Love your enemies आणि जवळ जाऊन पाहिले तर त्याखाली एक fine print पण होती, ...that will surely get them confused! I couldn't agree more to it. In this world -For our actions a reaction is always taken for granted/expected and cause-effect cycle continues. When someone beats that by either giving equal (not opposite) reaction or sometimes no reaction, much better and long lasting results can be achieved. Love is the basic human nature and not violence. These are the things Gandhi ji asked a common man to try in his daily life... अजून एक ओळ आठवली Love your children the most when they don't deserve it आपण इतरांशी कसे वागतो हे watch करणे फ़ार जरूरी आहे. हात उगारून आणि शस्त्रे परजून होणारे परिणाम अपेक्षेप्रमाणे झाल्यासारखा जरी वाटला तरी त्यामागे धाक किंवा भीतीच असू शकते. आदर किंवा प्रेम नसतेच. त्यामुळे तो अल्पायुषी ठरू शकतो. The Whole is based on pure Love -total understanding आणि गान्धींचा मार्ग हा त्यावर आधारित होता असे माझे मत आहे. Solution was secondary...The way of doing it was more important for Him . one ex. can be -how we raise/treat our kids. कधी कधी फ़टके ही जरूरी असतात पण त्याचाही मागे प्रेम असणे जास्त जरूरी आहे, नव्हे असतेच. मी अजून त्यांचे My Experiments With The Truth वाचले नाहिये पण जमल्यास लवकरच वाचेन. May be that will shed more light... त्यांचा मार्ग ठिसूळ होता असे म्हणणे फ़ार धाडसाचे आहे असे मला वाटते.
|
Kedarjoshi
| |
| Wednesday, September 27, 2006 - 6:26 pm: |
| 
|
प्रशांत जरुर वाच. एक सुंदर पुस्तक आहे ते. गांधी विरोध नक्की कधी पासुन सुरु झाला ह्या बद्दल काही माहीती नाही. पण मी ( माझ्या वाचनावरुन) असा कयास बांधु शकतो की तो साधारण १९४२-४३ पासुन सुरु झाला कारण ह्याच काळात जे सो कॉल्ड हिंदु मुस्लीम एक्य होते ते तुटुन पडायला सुरु झाले. १९४६ मुस्लीम लिग ने जो हाहाकार माजवला व बंगालात जी सामुदायीक कत्तल करन्यात आली त्याने हिंदु समाजातील लोक चिडले व येथुनच खरे गांधीना विरोध व्ह्यायला स्रुरुवात झाली कारण जो अहिंसक समाज गांधींपाठीमागे जात होता त्यांना एकदम आपली फसवनुक झाली असे वाटायला सुरु झाले. गांधीजी स्वत्: ह्या दंगली मुळे परेशान झाले त्यांना त्यांचा विश्वासघात केल्याचे वाटले. ( जसे परत १९६२ मधे हिंदी चिनी भाई भाई झाले तसेच). हिदुं समाजातील नेत्यांना गांधीच्या वकत्व्यावरुन असे वाटायला सुरु झाले की गांधी फक्त मुस्लीमांचीच कड घेतात. (उदा मुस्लीम हिंदुना मारत असतील तर त्यांनी तो मार सहन करावा, प्रेमाने जिंकावे, अहिंसा बाळगावी, बलात्कार केला तर स्वत्:च आत्म क्लेश सहन करावेत) या वत्य्वाने हिंदु अजुन चिडले ( साहजीकच आहे त्या परिस्तिथीच असे होनारच) व नंअतर फाळनी मुळे तर अजुनच रक्त पात झाला व त्यांची हत्या झाली. १९४२ च्या आधीही खुपदा पक्ष नेतृत्वा वरन वाद झाले.पण उघड उघड गांधीचा विरोध कोणी केला नाही. उदा १९३५ सुभाष बाबु, त्याचा आधी रविद्रनाथ टागोर ह्या लोकांनी कॉग्रेस सोडुन जाने पसंत केले. ऑफकोर्स हा माझा कयास आहे तो चुकीचा असु शकतो.
|
Moodi
| |
| Wednesday, September 27, 2006 - 8:58 pm: |
| 
|
केदार बरोबर आहे तुझे, नौखालीमुळे गांधीजी हिंदू समाजापासुन खूपच दूर निघुन गेले. आधी माझाही गैरसमज होता की फाळणीला ते जबाबदार आहेत म्हणून, पण जीनांबद्दल वाचल्यावर हे गैरसमज दूर झाले.
|
Zakki
| |
| Wednesday, September 27, 2006 - 9:14 pm: |
| 
|
कुणि चूक म्हणा, बरोबर म्हणा, पण सावरकर इ. व गांधी विनोबा इ. निदान राष्ट्र नि समाज यांचे कल्याण कसे होईल, याचा स्वार्थापेक्षा अधिक जास्त विचार करत असत असे मला वाटते. त्या मानाने आजचे किती पुढारी, नेते, तसा विचार नि आचरण करतात? भारतातच नाही तर इतर जगातहि. भारतात लोकांनी गांधींच्या मागे जाण्याचे ठरवले म्हणून गांधी मोठे ठरले. सावरकरांच्या मागे गेले असते तर सावरकर मोठे ठरले असते! अमेरिकेत नि इतर काही राष्ट्रातील लोक आपणहून प्रयत्न करतात नि स्वार्थाबरोबर देशाचेहि कल्याण करतात, पुढारी कसे का असेनात! भारतातहि तसेच व्हायचे असेल तर कदाचित् होईलहि. मला तरी आशा आहे!
|
Samuvai
| |
| Thursday, September 28, 2006 - 4:50 am: |
| 
|
मला वाटत चर्चा गांधीवादाकडून गांधी ह्या व्यक्तीवर केंद्रीत होत आहे. sanurita , तुम्ही सीमेपलिकडच्या शत्रूसाठी गांधीवाद उपयोगाचा नाही हे मान्य केलेत. उत्तम! गांधीवादाची निरर्थकता किमान ५०% पटली तुम्हाला. आता देशांतर्गत शत्रूंविषयी मी वर काही प्रश्न विचारले आहेत. त्यावर चर्चा व्हावी असे वाटते (तुम्हाला उद्देशून लिहीली कारण तुमची प्रमाणिक चर्चेची ईच्छा आहे. बाकी तथाकथित गांधी समर्थकांचा मुद्द्यांच्या नावाने शंखच आहे :-)
|
Sanurita
| |
| Thursday, September 28, 2006 - 5:10 am: |
| 
|
मलाही वाटते कि गान्धीवाद ठिसुळ पायावर उभा आहे म्हणणे खूप च धाडसाचे आहे. आणि मी ज्या सामान्य माणसाबद्दल बोलत आहे. तो बलात्कार वगेरे सारखे गुन्हे करणारा विक्रूत नाही.कायदा बन्द करा आणि गान्धीवाद करा असे कोणीच म्हणणार नाही. प्रशान्त म्हणतो ते खूप बरोबर आहे.सगळ्याच गोष्टीन्चा टोकाचा करून चालत नाही. खूप अवघड आहे. ख्ररे बोलणे आणि वागणे. आणि प्रत्येकाने याची सुरुवात स्वत्:पासून करायला हवी.
|
Samuvai
| |
| Thursday, September 28, 2006 - 12:27 pm: |
| 
|
म्हणजे तुमच्या म्हणण्याप्रमाणे खरे बोलणे ही गांधीवादातील एकच गोष्ट उपयोगाची असून ईतर सर्व टाकावू आहे म्हणजे ब्रिटीशांसारख्या शत्रूला मन:परिवर्तनाने जिंकणे, बलात्कारी धटिंगणांसमोर आत्मसमर्पण करणे, गेला बाजार सद्य:स्थितीतील खलनायक पाकिस्तान आणि त्याच्या भारातातील बगलबच्च्यांना (बाॅबस्फोट fame ) फुले देऊन जिंकणे वगैरे - असे म्हणायचे काय?
|
Dinesh77
| |
| Thursday, September 28, 2006 - 1:18 pm: |
| 
|
खर बोलणे म्हणजे गांधीवाद कसा? गांधींच्या कितीतरी आधीपासुन संत महंतांनी लोकांना खर बोलण्याची शिकवण दिली होती.
|
Samuvai
| |
| Thursday, September 28, 2006 - 2:43 pm: |
| 
|
Dinesh77 , माझे पुढचे मुद्दे घेऊ नका हो आधी ... क्रम चुकतो exactly! "सत्यं वद धर्मम चर" "परोपकार्: पुण्याय पापाय परपीडनम" "तेन त्यक्तेन भुन्जिथा" ... ही तत्वे हजारो वर्षे जुन्या अपौरुषेय वेद उपनिषदांनी सांगितली आहेत. राक्षसांसमोर जाऊन आत्मघात करवून घ्या ईतकच काय ते गांधीवादात "नवीन" दिसते.
|
Dinesh77
| |
| Thursday, September 28, 2006 - 4:27 pm: |
| 
|
समुवै, क्रम चुकवल्याबद्दल क्षमस्व. (हसरा चेहरा) पण शनिवारी मुन्नाभाई बघितल्यापासुन माझ्या मनात हा प्रश्न घोळतो आहे. उगिच कुठल्याही मुद्याला धरुन गांधीगिरीचा उदो उदो चालला आहे. मला तरी मुन्नाभाई तद्दन फ़िल्मी वाटला. अनेक गोष्टी व्यवहारशून्य आहेत. कुठलिही वयात आलेली मुलगी अशी रस्त्यावर राहु शकते? करमणूक म्हणुन ठीक आहे, पण व्यवहारात त्याचा काहिही उपयोग नाही. बरे झाले हा चित्रपट नाही पाठवला आॅस्कर साठी
|
Shyamli
| |
| Thursday, September 28, 2006 - 4:36 pm: |
| 
|
दीनेश चित्रपट सुमारच आहे..... पण कुठलीही चांगली गोष्ट अशी सांगीतली की पटते पब्लिकला म्हणुन समाजावर काहीतरी परीणाम करणारा आहे हा चित्रपट नुसतीच करमणुक नाहीये म्हणुन उदो उदो... बाकी तुम्ही म्हणताय तो मुद्दा मला पण पटलाय...
|
Sanurita
| |
| Friday, September 29, 2006 - 6:41 am: |
| 
|
सामुवाइ, गान्धी वादाला तुम्ही निरर्थक म्हणता ते वाचून मनापासून वाईट वाटले.फ़क्त खरे बोलणे हेच गान्धीवादाचे तत्व योग्य आहे असे मी म्हटलेले नाही.तो फ़क्त एक मुद्दा होता.माझा अजूनही हा मुद्दा आहे.की समाजातल्या साध्या प्रश्नान्वर गान्धीवाद वापरून पहायला काय हरकत आह? तो चित्रपट चान्गला की वाईट हा मुद्दा नाही. पण समाजवर परिणाम करणार्या प्रभावी माध्यमाने चान्गले गोष्टीची आठवण करून दिली तर काय बिघडले? सन्ताची शिकवण होतीच पण देशाला गान्धीवादाने योग्य वेळी त्याची आठवण तर करून दिली? आज गान्धीवादाची असणरी गरज तुम्हाला जाणवत नाही. हे दुर्देव आहे. आणि तुम्ही गान्धीवादाला निरर्थक म्हणता म्हणजे तुम्हाला तो समजलाच नाही असे म्हणवेसे वाटते.
|
amhala tyatle kahi tari samajale mhanun ch tyala nirarthak mhantle...tar kay chukle
|
Samuvai
| |
| Friday, September 29, 2006 - 11:12 am: |
| 
|
sanurita , असेलही कदाचित. पण मी वर दिलेल्या एकाही परीस्थितित तो लागू होत नाहीये. तुम्ही समजावून सांगाल काय गांधीवादाची मुख्य तत्वे काय आणि त्याचा खर्या खुर्या आयुष्यात कुठे उपयोग होऊ शकतो? yaggojoshi ,
|
Saurabh
| |
| Friday, September 29, 2006 - 4:14 pm: |
| 
|
सामुवै, तुम्ही वर sanurita ला विचारलेलाच प्रश्न मी तुमची गांधीवादावरची मते वाचून तुम्हाला विचारणार होतो. तुम्ही सांगा गांधीवाद नक्की काय होता? शत्रुसमोर आत्मसमर्पण म्हणजे गांधीवाद नव्हे हे मी गांधीवादावर काहीही अभ्यास नसतानादेखील खात्रीने सांगु शकतो. खरेतर शत्रुने कितीही प्रतिकार / हल्ला केला तरी आपले ध्येय न सोडता कार्य करत राहणे हा अत्यंत अवघड आणि अत्यंत आवश्यक गुण आहे. आत्मबल वाढवणे ही गांधिवादाची मूळ प्रेरणा असावी असा माझा कयास आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे गांधिवाद हा proactive आहे reactive नाही. त्यामुळे पाकिस्तानने हल्ला केला तर आपल्या जवानान्नी लढु नये, किंवा बलात्काराचा प्रयत्न होत असल्यास त्या स्त्रीने प्रतिकार करु नये वगैरे सारखी उदआहरणे ही गांधिवादाची उदाहरणे म्हाणून देणे अयोग्य आहे. अर्थातच गांधीवाद हा cure of all diseases नाही. त्या कसोटिवर अजुन कोणतेही तत्वज्ञान उतरलेले नाही. पण म्हणून ते तत्वज्ञान ठिसूळ किंवा निरर्थक आहे हे अविचारी विधान आहे.
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|