Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through September 28, 2006

Hitguj » Views and Comments » Current Affairs » ईस्लामी दहशतवादावर ऊतारा » Archive through September 28, 2006 « Previous Next »

Samuvai
Wednesday, September 27, 2006 - 7:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कल्याण सुभेदाराची सुन काय किंवा पोर्तुगिज किल्लेदाराची बायको काय याना शिवराय किंवा चिमाजिअप्पा यांनी सन्मानुन परत पाठवल्या ...

नाही संतु, हे कोणीही हिंदू मान्य करणार नाही. अगदी शिवसैनिक वा पतित पावन वालेही नाही. श्रीकृष्णाने द्रौपदीच्या विटंबनेचा बदला म्हणून अनेक अक्षौहणी सैन्याची कत्तल करवली पण कौरव स्त्रियांच्या निरीला हात घालायचे आदेश जिंकल्यावरही दिले नाहीत. रावणाच्या पत्नीला रामाने "जशास तशी" वागणूक दिली नाही.
ही आपली संस्कृती नाही.

svsameer ,
शिक्षणाचे मान्य पण बेरोजगारीमुळे अतिरेकी निर्माण होतात? "दिवार" मध्ये a. k. hangal च्या तोंडी एक सुरेख वाक्य आहे "भूख लगी तो क्या हुव - ईस दुनिया मे हर कोई भूखा ईन्सान चोरी करने लगे तो दुनिया का क्या होगा?" टायगर मेमन आणि समस्त पिलावळ ही बेरोजगारीमुळे बाॅcब फोडते काय?




Santu
Wednesday, September 27, 2006 - 7:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बाबरिच्या आधी बन्गालात दंगल झालि
फ़ाळनी झाली.
काश्मिरि हिन्दु च्या गा==वर लाथ मारुन
काश्मिर मधुन हाकलले
हे सर्व काय गुजरात मुळे झाले काय.
उलट गुजरात्यानी च प्रत्याचाराची भाषा प्रथमच
केली आहे धन्य त्यांची


Santu
Wednesday, September 27, 2006 - 8:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सामुवाई
अरे पण रावणाने पण काय सीतेवर
जबरदस्ती केलि नाहि.

अरे या सगळ्या सौजन्याचा उपयोग काय
आल्लाउद्दिन ने रामदेवरायाच्या मुलाची वाग्दत्त वधु
खेचुन नेली त्यावेली सगळ्या महाराष्ट्राची अब्रु जणु खेचुन नेली
नन्तर येसुबाई ना सुध्दा औरंगजेबाच्या कैदेत १८ वर्षे रहावे लागले. संभाजिच्या सुध्दा एका बायको वर कैदेत जबरदस्ति(दुर्गाबाई) झाल्याचा दाखला आहे.


Soultrip
Wednesday, September 27, 2006 - 9:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उपरती झाल्यासारखं वाटेल काहीजणांना! ..
पण, आपण येथे हिरीरीने मुद्दे मांडतो, गुद्दे न घालता (पक्षी, आपल्या लोकप्रतिनिधी सारखे) चर्चा करतो. पण काय होतं हो निष्पन्न यातुन?
जो खरा target audience आहे (अशिक्षित हिंदू-मुस्लिम, धर्मांध मुल्ला-मौलवी, आपमतलबी नगरसेवक ते मंत्री-संत्री यापैकी कोणताही एक्\अनेक घटक...) यांच्या पर्यंत आपली ही मतं पोचतात का? की, नुसत्या वांझ चर्चेत TP करायचा आणि स्वत्:ला (आणि दुसर्‍यानां) दे.भ. असल्याचा भास आणुन द्यायचा? sorry , मला कोणत्याही ID ला target करायचं नाही. I'm confused about the whole exercise of debates on blogs/e-groups/etc.!
दुसर्‍या एका BB वरती आपण भारतियांचं काय चुकतय, यावर पोटतिडिकीनं लिहिलं गेलंय. हो, माझ्याही एक्-दोन posts आहेत. पण मला सांगा, मायबोली.कॉम browse करणारा कोणता माणुस रस्त्यात, जिन्यात थुंकेल? कोणीही नाही करणार आपल्यापैकी. कारण आपण सुशिक्षित आहोत. जो खरा target audience आहे (अशिक्षित जनता), त्यांचं प्रबोधन, शिक्षण ( civic sense चं) कोण करणार, हा मुद्दा आहे! अशा अडाणी जनतेला धर्मांधतेची अफुची गोळी झिडकारुन 'आपापली रोजी-रोटी कशी नेकीनं कमवता येईल' हे सांगणारा सामाजिक संत पाहिजे!!
गरज आहे म.फुल्यांची, गरज आहे गाडगे-बाबांची!!!


Gs1
Wednesday, September 27, 2006 - 9:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


संतु, काय लिहिताय तुम्ही हे ? हा जंगलचा कायदा झाला, माणसांचा नाही. ज्याला जी गोष्ट योग्य वाटेल त्यासाठी त्याने ताकदीचा वा हिंसेचा वापर करायचा म्हटले तर केवळ अराजकच माजेल. गांधीहत्या हीसुद्धा याच कारणासाठी समर्थनीय ठरू शकत नाही. गांधीजींनी हिंदुंचा फार मोठा विश्वासघात केला, लाखोंच्या हत्येला ते जबाबदार आहेत, आणि अजूनही पुढे त्यांच्या कृतींमुळे देशाला धोका होता ही नथुरामची कारणमीमांसा अगदी पूर्ण पटते, जो कोणी मुळातून तो सर्व इतिहास वाचेल त्यालाही बहुधा पटेल, त्या वेळेलाही बहुसंख्य कॉंग्रेसजनांसह सगळ्याच देशात गांधीजींबद्दलच्या संतापाची एक लाट आली होती हे तर स्पष्टच दिसते, पण म्हणून गांधीजींना मारण्याचा अधिकार त्याला कोणी दिला ? असा उद्या कुणापासूनही देशाला धोका आहे असे कोणाला वाटले म्हणून त्याने त्याला मारत सुटायचे का ?

एकदा नागरिक म्हणून आपण घटनेची चौकट स्वीकारली आहे, देशभक्त असू तर करायचे सर्व उपाय हे घटनेच्या विद्यमान चौकटीत चर्चिले पाहिजेत.

सध्या तरी स्वसंरक्षण सोडुन इतर वेळी हिंसा करण्याचा हक्क हा केवळ 'राज्याला' आहे. तो जमावाच्या हाती देण ही मोठी धोकादायक गोष्ट आहे, अगदी तो जमाव आपल्या बाजूचा असला तरीही. दुर्दैवाने आज तसे कणखर सरकार नाही की जे सर्वांच्या जीविताची शाश्वती देउ शकेल हेही खरे आहे, पण प्रयत्नांची दिशा ही असे कणखर सरकार निर्माण करण्याकडे असली पाहिजे, जमावाचे सैनिकीकरण करून त्यांचा कायदा लागू करण्याकडे नाही.

गोध्रानंतर हीच संधी नरेंद्र मोदींनी घालवली याचे मला नेहेमीच वाईट वाटते. त्यांनी ताबडतोब कुठल्याही दडपणाला न जुमानता त्या मुसलमानांवर कणखर कारवाई केली असती, तर हिंदू समाज असा रस्त्यावर उतरला नसता.

जोपर्यंत असे कणखर 'स्टेट' निर्माण होत नाही तोपर्यंत आपले संरक्षण आणि प्रतिकार यासाठी समर्थ असणे, एखाद्या वेळी दंगलखोर जमाव चालून आला तर त्यांचा पूर्ण नि:पात करणे हे आपदधर्म म्हणून योग्यच आहे. पण बलात्कार, निरपराधांची कत्तल, वैध रितीने बांधलेल्या मशिदी पाडण्याची भाषा बरोबर नाही, मुस्लमान जे करतात तेच हिंदुंनी केले पाहिजे असे नाही असे मला वाटते.





Gs1
Wednesday, September 27, 2006 - 9:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


खरे म्हणजे V&C तून मी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे, पण कधी कधी राहवत नाही, म्हणतात ना जित्याची खोड...


Gs1
Wednesday, September 27, 2006 - 9:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


समीर, मुसलमानांचे प्रबोधन हे एक मृगजळ आहे. ते का फसले, का शक्य होत नाही यावर विस्तारानेच लिहावे लागेल. भारतात वा जगातही अगदी केमाल पाशापासून ते हमिद दलवाईंपर्यंत याबाबत काय घडले हे तुम्हीच थोडे अभ्यासलेत तर लक्षात येईल.

मला तरी 'कणखर धर्मनिरपेक्ष सरकार' हा एकच मार्ग दिसतो. असे सरकार भारतात रहायचे असेल तर भारतात सरकार व कायदे धर्मनिरपेक्ष असावे असे वाटणार्‍यांची पुरेशी बहुसंख्या असणे आवश्यक आहे. अशांच्या प्रभावी संघटानाशिवाय ते शक्य नाही. श्रावण यांनी याच्याशीच मिळताजुळता विचार मागे मांडला होता असे आठवते.

विवेकी, मला तरी असे वाटते की सद्यपरिस्थितीत धर्मनिरपेक्षतेच्या त्यातल्या त्यात जवळ कोण असेल तर ते हिंदुत्ववादी आहेत. सावरकरवादी ( कोणी उरले असतील तर) तर खरे खरे धर्मनिरपेक्षतावादी आहेत, आणि संघाचे तत्वज्ञान आणि व्यवहारही बर्‍यापैकी धर्मनिरपेक्षतावादी आहे. म्हणजे काय तर सघवाले म्हणतात की हे हिंदुराष्ट्र आहे आणि हिंदू धर्मातच सहिष्णुता असल्याने इथे सर्व धर्मियांना समान हक्काने रहाता येईल, त्यांच्या धर्माचे पालन करता येईल. सावरकर म्हणतात की हे हिंदुराष्ट्र आहे आणि हिंदुधर्मात नसते सांगितले तरीसुद्धा इथे सर्व धर्मियांना समान हक्काने रहाता येईल, त्यांच्या धर्माचे पालन करता येईल. हिंदु कोण याची या दोघांची व्याख्याही वेगवेगळी आहे.

गमतीची गोष्ट अशी की खर तर हीच मंडळी त्यातल्या त्यात सेक्युलर आहेत, पण तरी स्वत्:ला सेक्युलर म्हणवणारे अनेक जण यांना शिव्या देतांना दिसतात, तेर हेही अनेकदा सेक्युलॅरिझमलाच नाव ठेवतांना दिसतात.

हिंदु, धर्म, संस्कृती, राष्ट्र, हिंदुत्व, राज्य या सगळ्या शब्दांच्या अर्थाच्या घोळातून निर्माण झालेले गैरसमज आहेत. आपण वाचन कराल तसे आपल्याला दिसेलच. काही मदत लागल्यास जरूर कळवा.


Santu
Wednesday, September 27, 2006 - 11:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जीयस
प्राण्यात सुडाची प्रेरणा असल्याने त्याच्यावर आघात करणारा
वचकुन असतो आघाताला उगिच प्रव्रुत्त होत नाहि.
सुड हि काहि प्रमाणात सरक्षक प्रेरणा आहे हे प्राणिशास्त्रिय सत्य नाकारता येत नाहि.दया, क्षमा या सतप्रव्रुत्तिचा अतिरेक झाल्याने हिन्दु त ही सदगुण विक्रुति आली आहे.
जेव्हा एखाद्या समाजाला आपल्या वर केल्या गेलेल्या इतिहासकालिन अत्याचाराची धगधगति जाणिव असते.
आणी आपण केलेल्या पराक्रमाची आठवण असते. असा समाजच सूडाने पेटुन व विजिगिषेने चेवुन कडवे राष्ट्र म्हणुन उभा राहु शकतो.
जसे इस्रायल सारया मुस्लिम जगाच्या नाकावर टिच्चुन उभे आहे. नुसते उभे नाहि तर स्वाभिमानाने उभे आहे

जेव्हा रानटि शत्रुशी गाठ पडते आणि केवळ राष्ट्र वाचवणे एव्हढाच प्रश्न असतो तेव्हा सूडाला पर्याय नाहि


Santu
Wednesday, September 27, 2006 - 12:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हि पहा घातकी अवलाद
सोपोर्-काश्मिर मधे मुसल्मानानी जैशे-महमद चा
अतिरेकि महमद अफ़जल ला(संसदे वर हल्ला करणारा)
फ़ाशि चि शिक्षा झाल्याबद्दल दगडफ़ेक केलि हे
चित्र पुर्ण भारतात दिसायला वेळ लागणार नाहि


Vijaykulkarni
Wednesday, September 27, 2006 - 12:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राज्याभिषेकासाठी शिवाजी माहराजान्ना गागाभट्टाला का बोलवावे लागले


Dinesh77
Wednesday, September 27, 2006 - 1:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विजय कुलकर्णी,
तुमचा प्रश्ण नीट कळला नाही. जरा स्पष्ट करुन सांगा.
पण माझ्या माहिती नुसार गागाभट्ट स्वःता आले होते शिवाजी महाराजांकडे.


Moodi
Wednesday, September 27, 2006 - 1:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कारण तिथे तुम्ही नव्हते म्हणून.(इथे तुम्ही म्हणजे विजय कुलकर्णी असे वाचावे, नाहीतर बाकीचे जाम चवताळतील)

कुलकर्णी भाऊ इतिहासात जे काही घडले त्याचा आम्हाला पण खेद आहेच, ते उगाळतच बसणार आहात का तुम्ही? आणि ती लोकलच्या या डब्यातुन चढुन दुसर्‍यात जाण्याची पळापळी सोडा, नीट एका जागी बसा शहाण्यासारखे, काय?

संतु सूडाला प्रत्युत्तर म्हणजे सूड नसतो हे लक्षात ठेवा. वरती जी एस आणि श्रावण यांनी बरेच काही सांगीतले आहे, ते नीट वाचा. ही साध्वी ऋतुंभरा सारखी भाषा सोडा, तशीच भाषा वापरत रहाल तर आयुष्यात कुणाशीही नीट मिळुन मिसळून रहाता येणार नाही. ही वस्तुस्थिती आहे, आपला देश धर्मनिरपेक्ष आहे तो राहू द्यावा. सुडाने कुणाला मारण्या ऐवजी त्याचे ते मारणेच कायद्याने कसे रोखता येईल ते बघा, प्रयत्न करा, मदत करा.

शिवाजी महाराजांनी कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला सन्मानाने घरी पाठवले, कारण ते जनकल्याणकारी, लोकहितकारक राजे होते म्हणूनच. त्यांच्यावर जिजाऊमाता आनि दादोजी कोंडदेव तसेच समर्थ रामदास स्वामींचे संस्कार होते म्हणूनच ते महाराज झाले.


Moodi
Wednesday, September 27, 2006 - 2:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संतु आणखीन एक इझ्रायल हा जसा स्वतच्या शिस्तीवर उभा आहे तसाच अमेरीकेच्या पाठिंब्यावर सुद्धा. कारण अमेरीकेत ज्युंचा अमेरीकेच्या अर्थव्यवस्थेत बराचसा हात आहे, जर अमेरीकेने इझ्रायलचा पाठिंबाच काढुन घेतला तर? का माघार घेतली गेली लेबनॉनमधून त्यांचे मूळ उद्दीष्ट पुरे झालेले नसतानाही? सगळ्या घटनांचा विचार करा, एकदम राजनाथ सिंगसारखे बोलु नका.

Shravan
Wednesday, September 27, 2006 - 2:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संतू, सूडाच्या प्रेरणेच्या निर्मीतीबद्दल आपण जे लिहीले आहे ते तात्वीक चौकटीत बसू शकेल कदाचीत.. पण भारतातील सद्यपरिस्थितीत हा तुमचा तर्क लागू पडणार नाही. कारण शिवाजी महाराज वा त्याअधी वा नंतर च्या इतिहासात मुस्लीम हा बाहेरून येऊन राज्य बळकवणारा, रणांगणात ऊघड युद्ध करणारा शत्रू होता. सध्या भारतातील ज्या दहशतवादाबद्दल आपण बोलत आहोत तेथे असा उघड शत्रू नाहीए. आहेत ते भारतीय घटनेने आपल्या राष्ट्रात सामावून घेतलेले आपल्या बरोबरीने जगण्याचे हक्क दिलेले मुस्लीम. (तो इतिहासातील चुकांचा परिपक असू शकेल तुम्ही म्हणता तसा पण तसे तुम्ही वा इतर लाखो लोक जरी म्हणाले वा क्षणभर ते मान्य जरी केले तरी ही परिस्थिती आता बदलणार नकीच नाही) मागे मी म्हटल्याप्रमाणे हा वार उघड नसून छुपा आहे. समोरून येणारा नाही तर पाठीवर होणारा आहे. अशा परिस्थितीत सुडाची प्रेरणा इतिहास आठवून कशी निर्माण होउ शकेल?

नेमका आपल्या विचारात फरक पडण्यास हेच कारण आहे. वरील माझ्या सगळ्या पोस्ट बारकाईने वाचा. त्यात तुम्हाला कुठेही मुस्लीम अनुनय दिसणार नाही. प्राप्त परिस्थितीत (वर सांगितलेल्या) काय करता येईल हेच मी लिहिले आहे व तुम्ही ही प्राप्त परिस्थिती नाकरून याबाबत बोलत आहात. मात्र कितीही जणांनी ही परिस्थिती नकारली तरी त्यामुळे ती निश्चित बदलू शकणार नाही हेही तेवढेच सत्य आहे. मुस्लीम समाज हा भारतीय घटनेचा व भारताचा एक अविभाज्य भाग झाले आहेत हे प्रत्येकाने मान्य केले तर याबाबत अधिक फलदायी चर्चा केरता येईल.


Moodi
Wednesday, September 27, 2006 - 9:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा लेख बघा, मुत्सद्दी अभ्यासूंची नितांत आवश्यकता आहे भारताला.

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2021424.cms

Limbutimbu
Thursday, September 28, 2006 - 3:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>> खरे म्हणजे V&C तून मी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे, पण कधी कधी राहवत नाही, म्हणतात ना जित्याची खोड...
अगदी अगदी! मी तर यचजीवरुनच घेतली हे पण....!
हे असल वाचल की...!


>>>>राज्याभिषेकासाठी शिवाजी माहराजान्ना गागाभट्टाला का बोलवावे लागले

कुलकर्णी महाशय, तुम्ही साळसुद पणे नुस्ताच प्रश्ण नको त्या बीबीवर विचारला असलात तरी तुमच्या प्रश्णामागचा आशय आणि रोख गेली पन्धरा वर्षे ऐकत आणि पहात असलेल्या ब्राह्मण देव्ष्ट्या विखारी प्रचारामुळे माझ्या तरी चान्गलाच परिचयाचा हे!
महाराष्ट्रातल्या बामणान्नी राज्याभिषेकास नकार दिला म्हणुन काशीवरुन ब्राह्मण बोलवावे लागले असा धादान्त खोटा प्रचार बहुजन समाजात बहुजन समाजाकडुन आणि काही ब्राह्मण्यत्व गमावलेल्या बामणान्कडुन गेली पन्धरा वर्षे सातत्याने केला जातो हे!
मात्र हे अतिशहाणे हे विसरतात की विजयनगरचे व देवगिरीचे साम्राज्य नष्ट झाल्यानन्तरच्या जवळपास अडिचशे वर्षान्च्या कालखन्डात कोणत्याही हिन्दू राजाचा राज्याभिषेक विधी झालेला नव्हता आणि त्यासाठी आवश्यक असलेले धार्मिक ज्ञान काशीहूनच शिकुन येणे आवश्यक होते. नव्हे त्या काळीच नव्हे तर आजही उच्च वेदाध्ययनास व साधना सिद्धीच्या अभ्यासास काशीस जाण्याची प्रथा हे! अर्थात काशीहून गागाभट्ट येणे याचा दुरान्वयानेही अन्य ब्राह्मणान्च्या विरोधी भुमिकेशी सम्बन्ध लावणे म्हणजे वडाची साल पिम्पळाला लावण्या सारखे आहे. तरीही एकवीसाव्या शतकात सोळाव्या शतकातील घटनान्बद्दल जाणिवपुर्वक खोटी असत्य वीषारी माहिती सातत्याने पुरवुन ब्राह्मणान्चा सामुहीक घात करण्याचे कारस्थान रचले जाते असे म्हणले तर त्यात वावगे काय?
प्रत्यक्षात शिवाजी महाराजान्ना शस्त्र व तलवारीनिशी युधाचे आव्हान देवुन विरोध कुणी केला हे इतिहासास सर्वान्ना ज्ञात हे पण असे बोलले की अफजल खाना बरोबरच्या कृषाजी पन्डीताचे उदाहरण फेकण्याची सवय असलेल्या व झोपल्याचे सोन्ग घेतलेल्यान्ना जागे करता येणार नाही.
महाराष्ट्रातून ब्राह्मण हद्दपार करणे हाच एककलमी कार्यक्रम ज्यान्चा हे त्यान्च्या तोन्डी कोण लागणार?
आता मी पुन्हा सन्यस्त! तुम्ही घाला काय घोळ घालायचा तो!
च्यामारी बीबीचा विषय काय, हा "कुलकर्णी" नाव घेवुन आलेला विचारतो काय, आहे कशास काही मेळ?


Limbutimbu
Thursday, September 28, 2006 - 3:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>>> कुलकर्णी भाऊ इतिहासात जे काही घडले त्याचा आम्हाला पण खेद आहेच, ते उगाळतच बसणार आहात का तुम्ही?
मुडी, तुझ्या या वाक्यातली चूक वरच्या पोस्ट वरुन उमजेल अशी आशा करू का?
कशाचा खेद बाळगतेस? का? असल्या खोट्या वावड्या तू पण सत्य समजुन चालणार का?
एका अर्थी बरोबर हे, असत्य पुन्हा पुन्हा मान्डत राहिले की सन्ख्या शास्त्राच्या नियमानुसार व कालौघात तेच सत्य वाटायला लागते कारण पिढी दर पिढीगत इतिहासाचे खरे ज्ञान पुढे दिले जातेच असे नाही!
:-)

Samuvai
Thursday, September 28, 2006 - 4:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

च्यामारी बीबीचा विषय काय, हा "कुलकर्णी" नाव घेवुन आलेला विचारतो काय, आहे कशास काही मेळ?

अहो लि.म्बू पण उत्तर का देता मग? आणि तेही एवढा वेळ घालवून लांबलच्चक?

राज्याभिषेकासाठी शिवाजी माहराजान्ना गागाभट्टाला का बोलवावे लागले
% महाराजांना काशीचेच ब्राह्मण आवडायचे (आपण नाही का देवगड हापूसच मुद्दाम मागवतो - अगदी तस्सच!)
प्रश्न तार्कीक नसेल तर उत्तरही तसच हव :-)

बरं, माझा प्रश्न अनुत्तरितच आहे: जबाबदार नागरिक म्हणून आपण काय करु शकतो?



Shravan
Thursday, September 28, 2006 - 5:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सामुवाई, बरोबर बोललात. काही गोष्टींकडे दुर्लक्ष केलेलेच बरे.

प्रत्येकाची जबाबदारी या विषयावर बोलुयात..


Chyayla
Thursday, September 28, 2006 - 5:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ओहो अछा: ...लिम्बुटिम्बु आता लक्षात आला हा खवचट्पणा, मानल बुवा तुम्हाला, मला वाटत याप्रकारे ह्या मन्डळीनी असल्या बर्याच फ़ालतु आणी असत्य गोष्टी पसरवुन समाजाला तोडण्याचा प्रयत्न चालावला आहे, खरच मूडी कदाचित तुझ्या पण ध्यानी मनी हे आले नसेल, काय पण खवचटपणा म्हणायचो हो. काय लोपमुद्राजी आणी इतर लाल हे चालते का तुम्हाला?

समुवै तुम्ही जे मुद्दे मान्डले ते एकदम मान्य, सामान्य नागरिक म्हणुन हे करण्यासारखे आहे ते सगळे मुद्दे तुम्ही मान्डलेत.
जाती भेद, भाषा, प्रान्त, धर्म यान्चा आधार घेउन समाज विघातक कार्य करणार्या शक्ति जे ज्या ज्या माध्यमान्चा उपयोग करतात त्या बाबतित जागरुक असणे व इतरान्ना पण जागरुक करणे हा मुद्दा जोडावासा वाटतो.


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators