|
Sanurita
| |
| Friday, September 22, 2006 - 9:36 am: |
| 
|
गान्धीगिरी चा आता किती उपयोग आहे?
|
Soultrip
| |
| Friday, September 22, 2006 - 1:34 pm: |
| 
|
मला वाटतं, 'धरणं धरणे' , 'उपोषण' ही गांधींची या देशाला देणगी आहे. (त्याचा बरेच लोक 'वेगळ्या' हेतुसाठी उपयोग करतात, त्यामुळे तो शाप वाटतो ही गोष्ट निराळी!) But the fact remains that he taught us 'how to oppose in a civilized manner'. वैयक्तिक जीवनात मात्र गांधीवादी तत्वे (मी मुद्दाम गांधीगीरी हा काहिसा dilute करणारा शब्द वापरत नाही) अंमलात आणणे फार अवघड आहे. आपल्यापैकी कितीजणामधे ते मानसिक धाडस, संयम आहे की 'शेजार्याने आपल्या घरासमोर थुंकलं तर शांतपणे, स्मित्-हास्य करुन ते धुऊन काढु शकू?'
|
Yogibear
| |
| Friday, September 22, 2006 - 1:50 pm: |
| 
|
Sanurita: आपल्या प्रष्णाचे चे उत्तर लवकरच कळेल... In UP, they do it with roses and Gandhigiri
|
Zakki
| |
| Friday, September 22, 2006 - 4:16 pm: |
| 
|
बातमी वाचून आनंद झाला. आता जे हिंसा करतात, त्यांच्या बाजूने काही जण लिहितील, उदाहरणे देऊन सांगतील, बघा मारामारी केली म्हणून आमचे काम झाले, नाहीतर होत नव्हते! अमेरिकेत तर कित्येक लोक उघड उघड म्हणतात की इराण, सिरिया, कोरीया इ. वर सरळ हल्ले करा, दुसरा मार्ग नाही! त्यांना जिथे तिथे लढाई, हाणामारीच दिसते. म्हणजे एखादा कॅन्सरने आजारी पडला म्हणून उपचार करू लागला की ' He declared war on cancer!' , तसे. अगदी सा रे ग म प. वर सुद्धा संगीतका 'महायुद्ध' होते! थोडक्यात मानवाचा जंगलीपण अजून पूर्ण गेला नाही. नुसते वरवर आपले काट्याचमच्याने खाणे नि शेक हॅंड करणे एव्हढेच.
|
Dinesh77
| |
| Friday, September 22, 2006 - 6:14 pm: |
| 
|
बातमी वाचुन आनंद झाला, पण............... हेच लोक जर त्या दारुच्या दुकाना समोर गेले असते तर त्या मालकाने उपरती येउन दुकान बंद केले असते नाही का?
|
Samuvai
| |
| Monday, September 25, 2006 - 9:03 am: |
| 
|
अरेरे! गांधी उशिरा जन्माला आले हे महाराष्ट्राचे दुर्दैव नाहीतर त्या शिवाजीच्या मागे लागून हिंदवी स्वराज्य वगैरे वेडगळ कल्पनांसाठी आपला जीव खर्चणारे वाचले असते: आधी लग्न कोंडाण्याचे म्हणत मुलाच लग्न टाकुन बलिदान केलेले तानाजी मालुसरे, आधी दोन प्रहर धावून मग तीन प्रहर रक्ताच अर्घ्य ओतणारे बाजी प्रभू देशपांडे, महाराजांच आज्ञापत्र मिळताच लाखाच्या सैन्यावर नंगी समशेर फिरवीत तुटून पडणारे सरनौबत हात थकतील, वर्ष पुरणार नाही म्हणून ईथेच थांबतोय.
|
Sanurita
| |
| Monday, September 25, 2006 - 12:17 pm: |
| 
|
मला वाटते शिवाजी महाराज आणि गान्घीजी ही तुलना योग्य नाही. पण आत्ता अगदी सगळीकडे नाही तरी काही वेळा शक्य होऊ शकेल. आता लख़नौ मध्ये तो गुर्नामसिग अस्वस्थ झालाच ना. फ़्क्त थोडी वाट पाहयाला हवी पण लाच घेणारान्वर परिणाम होणे अवघड वाटते.
|
Samuvai
| |
| Monday, September 25, 2006 - 1:05 pm: |
| 
|
sanurita , का नये करु तुलना शिवाजी आणि गांधींच्या मार्गाची? दोघांचेही ध्येय स्वातंत्र्य, दोघांचेही शत्रू परकीय जुलमी शासक राहता राहीला प्रश्न सुव्यवस्थेसाठी गांधी मार्ग अवलंबिण्याचा. मी सामान्य माणूस आहे. आणि जेव्हा माझ्या आजूबाजूला पाहतो तेव्हा गांधीवाद यशस्वी होईल अस मला वाटत नाही. उदा. Income Tax office ला गेलात तर काही निर्लज्ज पणाचे पुतळे मिळतील. कोणी सत्याग्रहाने लाच न देता त्यांच्याकडून काम करवून घेतल्याच ऐकीवात आहे काय? ( anti-corruption वाल्यांची धमकीही द्यायची नाही बर - कारण त्यातही हिंसा आहेच). माझ्या धर्मात कारणाशिवाय वाचिक हिंसा (कोणावर टिका करणे) ही निशिद्ध सांगितली आहे. माझ्या माहीतीप्रमाणे गांधी क्रंतिकारकांना "वाट चुकलेले देशभक्त" म्हणालेले आहेत ... मुद्दा हा आहे की गांधीवाद हा अत्यंत ठिसूळ पायावर उभा आहे.
|
गांधीवाद हा अत्यंत ठिसूळ पायावर उभा आहे. >>>> ga.ndhivad haa lokmanya tilakaa.nchyaa chatusutrii var aadhaarit aahe..
|
Samuvai
| |
| Tuesday, September 26, 2006 - 4:49 am: |
| 
|
ga.ndhivad haa lokmanya tilakaa.nchyaa chatusutrii var aadhaarit aahe.. जरा विस्ताराने सांगाल काय? माझ्या अल्प ज्ञानाप्रमाणे "गणेशखिंडीतला गणपती नवसाला पावला" हे चापेकरांच्या तोंडून ऐकून लोकमान्यांच्या चेहर्यावर अतीव समाधान पसरले होते. ताबूतापुढे नाचणारे स्वत्वशून्य हिंदू पाहून त्यांनी राष्ट्रीय जागृतीसाठी सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती सुरु केली. उगाच मोठ्या लोकांची नावे घेतली की तत्वज्ञान मोठे होत नाही. आणि ह्याही BB वर विनंती आहे की मी वर काही मुद्दे मांडले आहेत - जमल्यास त्यांना उत्तरे द्या.
|
Aschig
| |
| Tuesday, September 26, 2006 - 7:54 am: |
| 
|
सामुवाई, गांधी आणी शिवाजी यांची तुलना या करता होवु शकत नाही की त्यांच्या काळात खुप फरक होता. एक common गोष्ट घेवुन तुम्ही सर्व गोष्टी नाही compare करु शकत. तुमचे आदर्श शिवाजी आणी केवळ गांधी त्यांच्यासारखे नव्हते म्हणुन हा विरोध नाही ना? समजा गांधी होते तसेच असते फक्त या फरकानी की त्यांनी फाळणी होवू दिली नसती. मग ते भावले असते का? फाळणी मुळे गांधींना विरोध असेल तर तो गांधीवादापर्यंत कशाला न्यायचा? समजा आज Pakistan नसता आणी शिवसेनावाले हैदोस घालत असते तर तुम्ही शिवाजीच्या बाजुने बोलला असतात की गांधींच्या? मी देखील एक मुद्दा मांडला आहे, "पण Pakistan आहे ना!" सारख्या वाक्यानी तो उडवुन न लावता थोडा विचार कराल अशी आशा बाळगतो.
|
Samuvai
| |
| Tuesday, September 26, 2006 - 10:40 am: |
| 
|
Aschig , तुम्ही सगळी conclusions स्वत:च काढत चालला आहात आणि तेही वादाच्या आधी ... मी ही गांधी ह्या व्यक्तिच्या राजकीय यश अपयशाबद्दल चर्चा करु ईच्छित नाही. गांधीवादाबद्दलच मते मांडू. जरा "जर्-तर" सोडा आणि तुमचे मुद्दे मांडा. हा पहिला मुद्द: गांधी आणी शिवाजी यांची तुलना या करता होवु शकत नाही की त्यांच्या काळात खुप फरक होता. १. बर मग भगतसिंग, सावरकर, सुभाषबाबू आणि हजारो क्रांतिकारक जे मारता मारता मरेतो झुंजले त्यांचा काळ तर तोच होता ना? २. काळ बदलल्याने काय बदलल होत? काय फरक होता शत्रू म्हणून ईंग्रज आणि ईस्लामी फौजांत हे सांगाल काय? ३. जुलूम करणारा जितका गुन्हेगार तितकाच सहन करणारा. जुलुमी सशस्त्र शत्रूसमोर मार खायला शिकविणारे कुचकामी तत्व म्हणजे गांधीवाद.
|
Santu
| |
| Tuesday, September 26, 2006 - 11:46 am: |
| 
|
आत्यंतिक अहिंसा हि अनैसर्गिक गोष्ट आहे.उलट हिंसा ही च नैसर्गिक गोष्ट आहे. वाघाच्या समोर सावज आल्यावर हिंसा अथवा अहिंसा यांच्या फ़िजुल द्वैतात पडणे त्याला परवडणार नाहि. उलट आत्यंतीक अहिंसा हिच हिंसा आहे जर एखादा विक्रुत जर आपल्या पत्नी ची छेड काढत असेल तर त्याला धडा शिकवणे हे मनुष्याचे कर्तव्यच आहे. हिंसा की अहिंसा हि बडबड तिथे व्यर्थ आहे. गांधी म्हणत की बलत्काराची आपत्ति आल्यास महिलेने आत्महत्या करावी. हि कसलि गांधिगिरि हि तर पुचाटगिरी
|
गांधीवाद हा अत्यंत ठिसूळ पायावर उभा आहे. >>>> ga.ndhivad haa lokmanya tilakaa.nchyaa chatusutrii var aadhaarit aahe.. लोपा टिळक हे जहाल मत वादी होते, मवाळांशी त्यांचे पटायचे नाही हे सर्वांना माहीती आहे. गांधी ची अंहीसा हे टिळकांनी कधी सांगीतली. गांधी चे राजकीय गुरु हे टिळक कधीच न्हवते. शिवाय मी गांधींवर अनेक पुस्तक वाचली आहेत त्यात ही कुठे कोणी असे लिहीले नाही. उलट मला तर असे वाटले की अहीसा ही शिकवन जी मुळात हिंदु, जैन व नंतर मोठ्या प्रमानात बोध्द घर्माची होती त्याचा वापर भारतात येन्या आधी गांधीनी अफ्रिकेत करुन पाहीला होता व त्यांचा स्व:तचा त्यावर विश्वास बसला होता. पण तु म्हणतेस तेव्हा काही आधार असेल तर तु तो सांगशील काय. ता.क मी गांधी विरुध्द शिवाजी ह्या वादात भाग घेत नाहीये. पण just जाता जाता ई.स १२५० ते १६४५ पर्यंत भारताची जि स्तिथी होती त्यात व १८१८ ते १९६० यात फार काही बदल आहे असे मला वाटत नाही. (भारत ह्या दोन्ही काली पारतंत्रात होता) उलट गांधीना जे वातावरण उपलब्ध होते ते शिवाजींना कधीच न्हवते. १६४५ ते १८१८ ह्या काळात मराठ्यांचे राज्य बहुतांश भागावर होते. मुस्लीम राज्य प्रंपरा निदान भारताच्या काही भागावर राहीली नाही. कोणाची हिम्मंत झाली नाही १८१८ परयंत महाराष्ट्रा कडे डोळे वर करुन पाहन्याची. शिवाजी हे गांधी पेक्षा वाईट परिस्थीत लढले आहेत. त्यांची तुलना गांधीशी कधीच होऊ शकनार नाही. करने अयोग्य राहील. तेथे अंहीसा चाललीच नसती पण बिट्रीशऽचा काळात हिंसा पन चालली असती. असा एखादा राजा असता तर नंतर नेताजी होऊ पाहात होते पण btw गांधी द्वेष्टा असने वेगळे नी डोळस विरोध करने वेगळे. मी गांधी द्वेष्टा नाही आहे, उलट ते एक महान व्यक्ती होत असे माझे ही मत आहे. पण आपलाच तो खरा मार्ग व बाकीचे म्हनजे (शस्राने क्रांती घडवु पाहानारे)म्हनजे वाट चुकलेले देशभक्त व त्यांचा मुळे माझ्या अंहीसंक लढ्याला गालबोट लागत आहे असे वाटने व म्हनणे हे माझ्या कधी पचनी पडनार नाही. उलट गांधी नी ह्या वाटन्यात हिंसा दाखवली. प्रत्येक वेळी सत्याचा आग्रह अगदी ठिक पण स्वत्:चा दुराग्रह का त्यामुलेच १९४८ साली गांधी स्वत्: उदगार काढले की अब मुझे कोन पुछता है, मेरा अब कोई सुनता नही. हे असे त्यांना स्वातंत्राच्या एकाच वर्षात असे का व्हावे. त्यांचा फॉलोअर्स नीच (नेहरु) त्यांना गुंडाळुन ठेवले. हे सत्य आहे. अती तेथे माती त्यामुळे गांधी सारख्या महान माणसाचा विचारसरनी ला आज जास्त फ़ॉलोअरस नाहीत.
|
हे पण वाचा.. http://www.esakal.com/esakal/09252006/55FC8F13F5.htm
|
Moodi
| |
| Tuesday, September 26, 2006 - 6:07 pm: |
| 
|
एकाच गोष्टीचा खेद वाटतोय, ती म्हणजे कॉंग्रेसवाल्यांना इतक्या वर्षांनी महात्मा गांधी ऐंवजी (म्हणजे गांधीवाद) गांधींच्या तत्वज्ञानाची ओळख एका अशा माणसाने करुन द्यावी, की जो कितीतरी निरपराध मारले गेलेत, आणि ज्यांना शस्त्रासाठी सहाय्य करणे(शस्त्रे लपवण्यास हनीफ कडावालाला मदत करणे) अशा कटासाठी तुरुंगात जाऊन आलाय. वाल्याचा वाल्मिकी होत असेल तर खरच आनंद आहे. चूका माणुसच करतो आणि वेळ आली की सुधरतो देखील. संजय दत्तला आता तरी गांधींच्या तत्वज्ञानाची ओळख होतेय का ते बघू.
|
Yogibear
| |
| Tuesday, September 26, 2006 - 6:22 pm: |
| 
|
Kedar: >> गांधी चे राजकीय गुरु हे टिळक कधीच न्हवते Articles By Gandhi - Gokhale: My Political Guru
|
योगी मी पण तेच म्हणतो की गोखले हे गुरु होते, टिळक न्हवे. त्यांना टिळकांचा वारसा लाभला कारण १९२० नंतर राजकीय पटलावर भरीव कार्य (जनते मध्ये) करनारे गांधी शिवाय कोणीही न्हवते. त्या लेखात फक्त ते म्हणतायत की I had no idea of its nature then: nor had he. About the same time, I had the good fortune to wait on the master's master (Justice Mahadev Govind Ranade), Lokamanya Tilak, Sir Pherozeshah Mehta, Justice Badruddin Tyabji, Dr. Bhandarkar as also the leaders of Madras and Bengal. I was but a raw youth. ईथे ते महादेव रानडेंना गोखलेचे गुरु म्हणत आहेत. त्या नंतर एक , आहे. बाकीचे म्हनजे टिळक व ईतर हे नेते आहेत असे ते लिहीत आहेत.
|
Samuvai
| |
| Wednesday, September 27, 2006 - 4:10 am: |
| 
|
sanurita च्या "आज गांधीवादाचा उपयोग आहे काय?" ह्यावर चर्चा व्हावी असे वाटते. मी दिलेले ईतिहासाचे संदर्भ एवढ्याचसाठी की शत्रू हा शत्रू असतो आणि "रणाविण स्वातंत्र्य कोणा मिळाले" हे त्रिकालाबाधित सत्य आहे. आज आपल्यापुढे दोन "fronts" आहेत लढायला ... अतंर्गत आणि बाह्य. आणि माझं अस प्रामाणिक मत आहे की गांधीवाद ह्या दोन्ही शत्रूंशी लढायला कुचकामी आहे. ज्यांना तो उपयोगी आहे असे वाटते त्यांना खालील प्रश्नांची उत्तरे देणे भाग आहे: १. बाॅबस्फोटातील आरोपींना आणखीन बाॅब सरकारी खर्चाने आणून देऊन "फोडा ते तुम्हास आनंद होईल तिथे" असे सांगावे काय? २. पोलिस यंत्रणा बरखास्त करावी काय? ३. आपल्यासाठी घरं दारं सोडून उणे ५० डिग्रीज तापमानात सुद्धा डोळ्यात तेल घालून देशाचे रक्षण करणार्या आणि देशाच्या सार्वभौमत्वासाठी सीमेवर रोज "हिंसा" करणार्या (प्रसंगी बलिदान करणार्या) जवानांना परत बोलवावे काय? गरजच काय ह्या सगळ्याची? अहो आम्हाला नवीन मार्ग दाखवलाय मुन्नाभाई नी - गांधीवाद. म्हणजे सगळ्या समस्यांवर एकच उपाय - "फूल भेजो".
|
Sanurita
| |
| Wednesday, September 27, 2006 - 6:16 am: |
| 
|
सामुवाइ, मी माझे म्हणणे मागे घेते.शिवाजी महाराज आणि गान्घीजी.परिस्थिती वेगळी असली तरी त्यान्चे शत्रू एकच होते. आणि गान्घीजी ग्रेट आहेत म्हणून बाकीच्यान्चे बलिदान कमी होत नाही.किन्वा सीमेवर लढणारानी पाकिस्तान ला फुले देणे अपेक्षित नाही. पण सामान्य माणसान्चे देशान्तर्गत प्रश्न सोडवायला तर उपयोग होइल कि नाही? गान्घीजी बद्दल अजूनही देशात आदराने बोलतात. आजही सामन्य माणसाचे खूप प्रश्न आहेत. आणि ते सोडावण्यासाठी जर आपण मारामारी केली तर ते एकूणात नुकसान आपले आणि पर्यायाने देशाचे आहे.उदा,बसच्या काचा फ़ोडणे. अरे बस आपल्यासाठीच आहे ना? लगे रहो मधे भूमिका सन्जय दत्त ने केली आहे. तो तिथे केवळ एक अभिनेता आहे. त्याने व्यक्तिगत आयुष्यात जर देशद्रोह केला असेल तर त्याला शिक्शा व्ह्ययला हवी.तिथे फुले देण्यात अर्थ नाही.सामान्य माणसच्या जिवावर उठणाराला शिक्शा हवीच आज हा देश ज्या सामान्य माणसावर उभा आहे.तो अगदि वाईट नाहीये.त्याला समजून घ्यायला गान्घीगिरी उपयोगी पडेल असे वाटते.
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|