Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through September 26, 2006

Hitguj » Views and Comments » Current Affairs » ईस्लामी दहशतवादावर ऊतारा » Archive through September 26, 2006 « Previous Next »

Itsme
Saturday, September 23, 2006 - 7:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गिरी, तुझ्या सारख्या लोकांचे काय करायचे ... हि सुध्दा एक मोठीच समस्या आहे !!

Vijaykulkarni
Saturday, September 23, 2006 - 1:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केदार जोशी,
पोलीस आणी न्यायव्यवस्था नि पक्शपाती आहेत असा विश्वास मुस्लीमान्च्या मध्ये निर्माण करायला हवा.
कोणत्याही कारणासाठी निर्दोश माणसान्चा खून करणे ही गुन्हा आहे आणी असा गुन्हा करणर्या
माणसाला त्याचा धर्म न पहाता कठोर शिक्शा होईल ही खात्री त्यना पटवणे.


Vijaykulkarni
Saturday, September 23, 2006 - 1:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुस्लीम लन्गूलचालनाचे तुणतुणे काही ठराविक मन्डळी का वाजवतात याचे उत्तर सोपे आहे.

१ हिटलर ने ज्या प्रमणे ज्यु द्वेशाचा आधार घेउन सत्ता काबीज केली तसे जमते का हे पहाणे.

२ हजारो वर्शान्च्या चतुर्वर्ण्याच्या गुलामगिरी नन्तर आता कोठे डोळे किलकिले करणर्या बहुजन समाजा च्या डोळ्यान्वर मुस्लीम द्वेशाचे झापड लावून त्याना वापरून घेणे.

हे बहुजनान्च्या सुध्ह लक्शात येउ लागले आहे.

भुजबळ आले, राणे आले, मुन्ढे ही येतील.




Santu
Saturday, September 23, 2006 - 1:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छगन आल्यावर "तेलगी" पण सोकावला.
राणे आल्यावर चेंबुर मधील धंदा "हरया नारया "नी बंद केला.
अर्थात शासना ची तिजोरि हाता मधे मिळल्यावर मटका घ्यायची गरज काय
हे बहुजन नसुन "खाऊजन"आहेत


Robeenhood
Saturday, September 23, 2006 - 4:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आता चाललीय ही चर्चा इस्लामी दहशतवादावर उतारा या सूत्राला धरून चाललीय काय? moderator साम्प्रतसमयी'अवतार' घेऊन ह्या बीबीचे निर्दालन का करीत नाहीत?. मूळ विषय सोडून काही विकृत आय डींची गरळ ओकण्याची ही जागा झाली आहे. यातील काही आय डी तर criminal स्वरूपाची भाषा करीत आहेत.
मायबोली संस्कृतीच्या गळ्याला नख लावणारी ही चर्चा बन्द करण्यासाठी हा बी बीच बन्द करावा हे उत्तम...
की चालकाना हवे तेच इथे चालू आहे?
मला तर परिणिता या आय डी ने इतरत्र केलेले आरोप आता खरे वाटू लागले आहेत


Lopamudraa
Sunday, September 24, 2006 - 5:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अगदी रॉबिनहूड.. एक परिणीता चा मुद्दा सोडला तर मला तुमचे म्हणने १०१% पटले.. अणि काही ID आपल्या बाजुने लिहितात म्हणुन त्यांना डोक्यावर धरले आहे.. त्यांची भाषा दिवसेदिवस अजुन घाणेरडी होत चाललि आहे (चांगली होति कधी?)त्याबद्दल कोणी अवाक्षरही बोलत नाही..मी विरोध करुन रोश पत्करलाय.. त्या तालिबान ने अगदि सैनिकाबाद्दल्ही अपप्रचार केला पण तेव्हा एकही मायबोलिकराने एक अक्षरानेही विरोध केला नाही. इथे मोठ(वयाने आणि विचाराने) हक्काने रागवनारे कोणीच नाही का?नाही तर आपण आपली गांधीगिरी सोडुन त्यांच्याच भाषेत उत्तर द्यायला लागावी..

Santu
Sunday, September 24, 2006 - 2:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला प्रामाणीक पणे असे वाटते
की मुसलमाना साठि "विशेष"न्यायालये असावित
त्याचे न्यायाधिश हे सुध्दा मुसलमान च असावेत.
त्यांच्या गुन्ह्याचा शोध घेण्या चे काम सुध्दा
"राष्ट्रिय व्रुत्तिच्या"मुसलमान अधिकारयांवर सोपवावे.
शिया लोकांना शिया अधिकारि द्यावेत.सुन्निना सुन्नि.
म्हणजे त्यांचा "न्याय"व्यवस्थे वर विश्वास बसेल.

कारण हिन्दु हे भयंकर जातिय व धर्मवेडे असल्या मुळे
त्यांच्या बद्दल "आपल्या"(धर्मनिरपेक्ष)अल्पसंख्याक"लोकांना विश्वास वाटणार तरी कसा.


Chyayla
Sunday, September 24, 2006 - 10:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

यान्च हे नेहमीचच आहे, जेन्व्हा मुद्दे सम्पतात तेन्व्हा समुवै नी म्हटल्या प्रमाणे यान्चे द्वेषाचे नेहमीचे फ़ुत्कार बाहेर पडतात, तसेच मधुन मधुन पण गरळ ओकणे सुरुच असते म्हणा, जी एस नी म्हटल्याप्रमाणे हा "BB" चा समारोप करायची वेळ आली आहे.

Shravan
Monday, September 25, 2006 - 3:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या बॉंबस्फोटातील आरोपींच्या उदाहरणावरुन गैरसमज झाले आहेत असे वाटल्याने जाता जाता थोडे लिहीतो आहे.

मी त्या आरोपींचे वा त्यांच्या कृत्याचे समर्थन अजिबातही केले नाही. किंवा त्यांना होणारा पच्छातापाचे उदात्तीकरणही मला करायचे नाही. फक्त सामान्य मुस्लीम मुख्य प्रवाहापासून दूर असल्याने त्यांच्यातीलच समजविघातक प्रवृत्तींचे कसे soft target होतात हे मला संगायचे होते. या घटनेपासून मला एवढेच सांगायचे होते की या सामान्य मुस्लीमाच्या मनात आपाल्या व्यवस्थेबद्दल विश्वास निर्माण करण्याची थोडीफार जबाबदारी आपल्या प्रत्येकाची आहे. यात कोणताही मुस्लीम अनुनय वा लांगुलचालन करण्याचा प्रयत्न नाही. फक्त सद्यपरिस्थितीत शक्य असलेल्या गोष्टींचा विचार केल्यावर जे वाटले ते लिहीले आहे.

अशा आरोपींनी कितीही पच्छातापाचे अश्रु ढाळले तरी शिक्षेत थोडीही सवलत देण्याचा प्रश्नच दुरपर्यंत उद्भवत नाही हे इथल्या प्रत्येकाला, देशातील प्रत्येक नागरीकालाही व त्याहून जास्त न्यायव्यवस्थेला चांगलेच कळते त्यामुळे या विषयावर चर्चा नको.


Shravan
Monday, September 25, 2006 - 3:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संतू, प्रश्न हिंदूंनी मुस्लीमांवर वा मुस्लीमांनी हिंदूंवर विश्वास ठेवण्याचा नाही तर भारतीय संविधानावर विश्वास ठेवण्याचा आहे. धर्मावर अधारीत न्यायव्यवस्था ठेवणे हे अधिकच फुट पाडण्यास व एकमेकांपासून दुर जाण्यास निमंत्रण ठरेल. तुम्ही सुचविलेला मुद्दा वरकरणी पटू शकतो पण वास्तवातील परिणाम चांगले निश्चित नसतील.
(तुमचे हे मत प्रामाणीक आहे असे समजून उत्तर दिले आहे).


Shravan
Monday, September 25, 2006 - 4:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश, मुस्लीमांना मुख्य प्रवाहात आणायचे म्हणजे त्यांना सवलती वा अनुदाने द्यायची नाहीत तर बरोबर उलटे करुन त्यांच्या सध्याच्या अधिकच्या सवलती व अनुदाने बंद करायची. अशा गोष्टीमुळेच ते स्वत्:ला भारतीय घटनेपासून वेगळे समजू लागले आहेत. समान नागरी कायदा लागू करणे व भारतीय घटना सर्वोच्च आहे हे त्या प्रत्येकाच्या मनावर बिंबवणे होय.

Samuvai
Monday, September 25, 2006 - 9:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

lopamudraa ,
नाही तर आपण आपली गांधीगिरी सोडुन त्यांच्याच भाषेत उत्तर द्यायला लागावी..

कुठल्याही भाषेत उत्तर द्या - फक्त कळकळीची विनंती ईतकीच की मुद्दे मांडा. नुसते ताशेरे ओढायचे सोडून द्या.

मायबोली संस्कृतीच्या गळ्याला नख लावणारी ही चर्चा बन्द करण्यासाठी हा बी बीच बन्द करावा हे उत्तम...
की चालकाना हवे तेच इथे चालू आहे?

robeenhood ,
अहो, एका BB च्या संस्कृतीला so called नख लागल तर कीती कळवळलात. मग अवघ्या हिंदुस्थानच्या गळ्याला नख लावणार्या "संस्कृती" विरुद्ध लोक तळमळीने लिहीणारच. फार तर तुमच्या लेखी "गरळ" ओकणार्यांची वक्तव्य admin च्या नजरेस आणून द्या. आख्खा BB बंद करायची criminal भाषा का करताय?

अगदी बरोबर shravan .

मित्रहो,
मला वाटतय की चर्चेचा समारोप आपण आपल्याला प्रामाणिकपणे पटणार्या उपायांसाठी काय कृती करु शकू हे सांगून करुया.

मी सुरुवात करतो:
१. वेळ, पैसा, श्रम दान करुन हिंदू संघटना बळकट करेन.
२. जमेल तेव्हा जमेल तसा "राष्ट्र" हा विषय लोकांसमोर मांडेन. सुरुवात नातेवाईकांपासून
३. आजूबाजूला डोळसपणे बघायचा प्रयत्न करेन. संशयास्पद लोकांचे नागरिकत्व तपासण्याची विनंती पोलिस अधिकार्यांना करेन.


Vijaykulkarni
Monday, September 25, 2006 - 3:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

थोडक्यात,
कमळावर शिक्का मारा.
:-)


Deshi
Monday, September 25, 2006 - 5:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरेतर मी लिहीनार न्हवतो. पण कुलकर्णींची पोस्ट वाचली व लिहावे वाटले.

एकुनच ह्या बिबिवर स्वत:चे निट मुद्दे मांडायचे नाहीत, दुसर्‍यांनी मांडले की त्याला फाटे फोडायचे ( जसे गांधी विरोध, भाजपा, मुस्लीम व्देश) ई असे म्हणुन मोकळे व्हायचे.

अरे विरोध करनार्यांनो विरोध करा पण मुद्दासहीत.

उगीच मुद्दे नसताना काहीतरी विरोध करायचा. तुम्ही मुस्लीम कसे चांगले आहेत, अनेक देशात त्यांनी किती चांगले काम केले, (भारतात काय केले हे तरी लिहा) भारतात त्यांनी कशी एकात्मता आणली, गांधीन मुळेच हा देश निर्मान झाला अशा विष्यांवर का लिहित नाहीत मग.

आत्तापर्यंत एकही विरोधकाने निट मुद्दे का मांडले नाहीत? असे का व्हावे? मुस्लीम विरोध केला की त्याला लगएच अती उअजवा असे ठरविले के झाले नाही का? की ह्यालाच सुड्यो सेकुअलर म्हणतात. फक्त विरोधा साठी विरोध.

ईथे मुस्लीम विरोधी लिहिनारे सर्वच काही भाजपा नसावेत हे का वाटत नाही लोकांना. हिंदु म्हणले की भाजपाच का? की हिंदु म्हंटली की अती उजवाच का वाटत बाबा विरोधकांना काही कळत नाही.


बाकी चालु द्या तुमचे.


Samuvai
Tuesday, September 26, 2006 - 4:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

deshi ,
अगदी वर्मावर बोट ठेवलत. ह्या BB वर झालेल्या चर्चेचा कोणी तुमच्या सारखा प्रामाणिक अभ्यास केला तर त्याला तुम्ही काढलेल्या निष्कर्शाप्रत पोहोचणे कठीण नाही. हा BB विरोधासाठी विरोध करणार्यांसाठी नव्हताच (मी ह्या BB चा उद्देश पहिल्या post मध्येच स्पष्ट केला असूनही काही लोकांना "चालकांच्या हेतूबद्दल" अजूनही शंका आहे). तंगड्या घालणे नेहमीच सोपे असते. पण ज्यांना खरच ईस्लामी दहशतवादाबद्दल चिंता आहे, त्याच्यी कारणमिमांसा करण्याची आणि उपाय शोधण्याची तळमळ आहे त्या सर्वांना एक व्यासपीठ देण्याचा प्रयत्न केला आणि तो बराचसा यशस्वी झाला आहे.
म्हणूनच आता अंतिम आणि अतिशय कठीण चरणाने समारोप ... मी काय करु शकेन?


Viveki
Tuesday, September 26, 2006 - 6:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


लोपामुद्रा, 'काही आयडी आपल्या बाजूने लिहितात म्हणून..... अवाक्षरही बोलत नाहीत' असे तुम्ही म्हणावे हा एकदम खो खो विनोद आहे. तुम्ही स्वत : लालभाईच्या personal attacking चे 'त्याने असे कधीच नाही केले' असे धादांत खोटे समर्थन करतांना याच बीबीवर पुराव्यानिशी रंगेहाथ पकडल्या गेल्या आहात.

तुमच्या स्वत : च्या वागण्याला तुम्ही स्वत : च गांधीगिरी असे प्रशस्तीपत्रक देण हा आजून एक मोठा खो खो विनोद. स्वत : च्या गटातल्याचे समर्थन करण्यासाठी असे धाडधाडीत खोटे बोलणे म्हणजे गांधीगिरी ? ते खोटे उघडकीला आणल्यावर तरी खरी गांधीगिरी करणार्‍या कोणीही माफी मागितली असती, चूक कबूल केली असती. तुम्ही खोटे बोललात हे मी पुराव्यानिशी सिद्ध केले आहे. ते तसे नाही हे दाखवून द्या नाहीतर आधी स्वत : ची चूक मान्य करा आणि मग इतरांना कसे वागाए याचे डोस पाजा.

तुम्ही गांधी प्रकरणात माझी बाजूही घेतली आहे त्याब्दाल धन्यवाद, पण याचा अर्थ असा नाही की तुमचे उघड उघड खोटेही मी तुम्ही आपल्या विचाराच्या आहात म्हणून डोक्यावर घ्यावे, की जसे तुम्ही लालभाईचे घेतले.

माझा हिंदुत्ववादाला विरोध आहे आणि धर्मनिरपेक्षतेला पाठिंबा. कितीतरी चांगले मुद्दे मांडता येतील या हिंदुत्ववाद्यांना गप्प करायला. मला ते नीट मांडता येणार नाहीत हे कबूल करतो, पन कोणी हिंदुत्ववादी मुद्दे मांडले की तुम्ही आनि रॉबिनहूड वगैरे लोकही कधीही मुद्दे न मांडता फक्त कुत्सित शब्दात त्यांची हेटाळणी करणे एवढेच करता आनि त्याला वर गांधीगिरी असे नाव देता हा तिसरा खो खो विनोद आहे. आनि मग वैय्क्तिक हेटाळणीने चिडुन त्यांनी काही जहाल लिहिले कि तुम्ही यांची बाषा बघा म्हणुन बोंब मारता, पुन्हा मुद्द्याच्या नावाने शून्यच हा चौथा मोठा खो खो विनोद आहे. असल्या वागण्यामुळेच यांच्याकडे मुद्दे नाहीत असे सगळ्यच धर्मनिरपेक्षतावाद्यांबद्दल म्हनायला मोकले रान मिळते विरोधकांना.

सामुवई, हो मी नाही लिहिले चर्चेत, तेवढे नाही समज्त मला अजून हे मान्यच आहे म्हनून तर माझे पोस्ट हे फक्त गटबाजीबद्दल होते, तुमच्याही आनि यांच्याही. मी दोन वर्ष येतोय मायबोलीवर. आजतरी तुम्हा लोकांना नीट लोजिकल उत्तर देईल असे कोनी नाही मायबोलीवर, पण याचा अर्थ तुमचे युक्तिवाद बिनतोड आनि १०० टक्के बरोबर आहेत असा अर्थ नाहीये. मी वाचन सुरु केल आहे, लिहायला पण लागेन. तेंव्हा आमने सामने होईल आनि विरोधी मुद्द्यांब्द्दल तुम्ही किती सहुष्णुता दाखवता तेही कळेल.

वर वापरलेल्या खो खो चा अर्थ खो खो हसने असा घ्यायचा की त्या रेडिओ मिर्चीवरच्या खो खो पाटलाचे भंकस जोकसारखा असा घ्यायचा ते तुम्हीच ठरवा.


Viveki
Tuesday, September 26, 2006 - 7:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


देशी, तुमचे म्हनने एक्दम ब्येस पटले बघा. मला मुस्लिम अनुनयही पटत नाही आणि हिंदुत्ववादही पटत नाही, पन हिंदुत्ववाद्यांना इथे विरोध करायचा म्हटल तर विजय कुलकर्नी, रॉबिनहूड, परिणीता असल्या लोकांच्या रांगेतही उभ रहायला नको वाटत.

स्वत : वर शिक्का न बसता स्व्तंत्र मत मांडायची सोयच नाही का ?


Samuvai
Tuesday, September 26, 2006 - 7:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

viveki ,
hats off ! (हा विनोद नाही)
तुम्ही कधी लिहीताय ह्याची वाट बघतोय कारण तुम्ही म्हणताय तसे प्रामाणिक विरोधी मुद्दे कोणी लिहीतच नाहीये. माझ्या विचारप्रक्रीयेतही दोष असतील - मला ते तुमच्यासारख्या खर्या विवेकी माणसाकडून परखून घेणे आवडेल.
माझ्या मते आपण जन्मत:च सगळे हिंदू संस्कृती (त्या भारतीय म्हणा, आर्य म्हणा, वैदिक म्हणा) ह्या विक्रमादित्याच्या सिंहासनावर बसलेलो आहोत. जी फक्त "अस्माकम सकुटुंबानाम सपरिवाराणाम" च नाही तर "द्विपद चतुश्पद सहितानाम" "क्षेम स्थैर्य आयु आरोग्य" मागते. "सर्वेपि सुखिन: सन्तु" म्हणते ... ह्या सिंहासनावर गुराख्याचा पोर बसला तरी योग्य न्याय करेल. करंटेपणाने त्यावरुन उतरुन त्यावर बसलेल्यांचा घात करणारे, करु ईच्छिणारे सगळेच एक दिवस पराभूत होतील. केवळ ह्या BB वरच नाही तर जगात सर्वत्र. मला खात्री आहे की असाच प्रामाणिक अभ्यास चालू ठेवलात तर एक दिवस तुम्हालाही पटेल की जगातील सर्वात "धर्म"निरपेक्ष "धर्म" म्हणजे हिंदू. आणि मग विश्वबंधुत्वाशी प्रतिबद्ध असणार्या ह्या धर्माचा "वादी" होण्यात तुम्हाला काहीच गैर दिसणार नाही. :-)

तुमच्या अभ्यासास मन्:पूर्वक शुभेच्छा!


Santu
Tuesday, September 26, 2006 - 7:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्रावन
धर्मावरिल न्यायव्यवस्था फ़ुट पाडेल))))अहो धर्मावरिल न्याय व्यवस्थ हि फ़क्त आपल्या "प्रिय लाडक्या मुसलमाना" साठी असेल.म्हणजे पहा त्यांना पहिजे तेवढ्या "काफ़ीर हिन्दुना" कत्ल करता येईल
पाहिजे तितके बाॅम्ब स्फ़ोट घडवता येतिल व कमित कमि शिक्षा हि होईल. सध्या या हिन्दु च्या राज्यात बाॅम्ब स्फ़ोटाला १५ वर्षानी का होईना कडक शिक्षा "मुसलमाना"ना होते आहे हे बदलले पाहिजे.

सध्या मक्केला जायला ' प्रिय मुस्लिम' बांधवांना"फ़ार त्रास होतो.
तेव्हा सिध्दिविनायक,साइबाबा यांच्या मंदिराचा ताबा सरकार ने घेवुन(तसा आत्ता घेतलाच आहे)त्याचे उत्पन्न मक्केच्या यात्रे साठी अनुदान देण्यास उपयोगी आणता येईल.खर तर सर्व काफ़िर हिन्दु वर कर बसवुन हे उत्पन्न या कामी "धर्मनिरपेक्ष"सरकारने वापरावे.

खरे तर सैन्यात सुध्दा मुसलमाना ना अग्रक्रमाने जागा राखिव ठेवल्या पाहिजेत.त्या मुळे ज्यांना बाॅम्ब फ़ोडायाची हौस आहे ते लोक अतिरेकी बनणार नाहित.व विनसायास आपल्या धर्मबांधवाची(पाकिस्तानातल्या) सेवा करु शकतील.

हे सर्व केल्या वर "प्रिय मुस्लिम बांधवांचा" आपल्या संविधाना वर विश्वास बसेल असे मला प्रामाणिक पणे वाटते


Vijaykulkarni
Tuesday, September 26, 2006 - 11:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आम्हाला शिक्शा, पण श्रिक्रिश्ण आयोगाने ठपका ठेवून ही ते आरोपी मोकळे, असे का?
या प्रश्नावर आपल्याकडे काय उत्तर आहे?

माझ्या लहानपणी स्वानन्त्र्य दिनी
शाळेत रन्गीबेरन्गी कागदात गुन्डाळलेल्या लेमन च्या गोळ्या वाटल्या जायच्या.

प्रत्येकाल आप्लाच रन्ग सुन्दर आहे असे वाटायचे. त्यावरून भान्डणे ही व्हायची.

सर्वा धर्मात आमचाच धर्म श्रेश्ठ असा वाद घालणारी माणसे पाहीली की मला हा प्रसन्ग आठवतो.



मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators