Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through September 14, 2006

Hitguj » Views and Comments » Current Affairs » ईस्लामी दहशतवादावर ऊतारा » Archive through September 14, 2006 « Previous Next »

Samuvai
Wednesday, September 13, 2006 - 6:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुमचे हिन्दुत्ववादी गटातले हा काय प्रकार आहे?

chyayala ,
एक भाबडं निरीक्षण देशाशी, धर्माशी संबंधित प्रश्नांवर पोटतिडकीने लिहीणार्यांना हिंदुत्ववादी "गटात" टाकून द्यायच आणि चर्चेत एकही मत न मांडता तापलेल्या चर्चेला v&c वरच्या लाथाळ्या म्हणायच असा trend दिसतोय सध्या :-)

श्रावण, Asami_asami ,
सुरेख मते मांडली आहेत. आणि उत्तरांपेक्षा सध्या प्रश्नच जास्त आहेत हेच खर!

लिंबू,
तुमच post अजिबात विसंगत नाही. सावरकरांच्या "मोपल्यांच बंड" मध्ये उल्लेख आहे. परीस्थितीची चाहूल लागून ब्राह्मण आणि काही नायर (क्षत्रिय) ह्यांनी जागृतीचा प्रयत्न केला होता. पण घाणेरड्या जातीपातीच्या राजकारणाने बहुजन समाज ह्या जागृतीपासून दूरच राहीला. आणि शेवटी हजारो हिंदू ईस्लामी दहशतवादाचे बळी ठरले.
(एक ऐतिहासिक सत्य: ह्याच मोपल्यांना गांधींनी The brave, god fearing mopalas अस गौरविलं होतं)



Chyayla
Wednesday, September 13, 2006 - 6:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काय पण खोटे बोलतो हा माणुस, म्हणे लालभाई नी अशी भाषा वापरली नाही... हा घ्या आत्ताचा पुरावा

पराभूत, हेकट, एकांगी आणि अतिरेकी मनोवृत्तीच्या आणि विचारसरणेच्या माणसांकडून दुसरे अपेक्षिणार तरी काय म्हणा? इति लालभाइ

अर्थात ते त्यान्ना स्वत: लाच लागु पडतय
आता बोला..


Samuvai
Wednesday, September 13, 2006 - 7:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

chyayala ,
अहो काही लोकांना अनुल्लेखाने मारणेच श्रेयस्कर असते. ते जर जाणूनबुजून करतायत हे जर तुम्हाला पटत असेल तर का उत्तर तरी देता?


Lopamudraa
Wednesday, September 13, 2006 - 10:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चायला, संतू, समई वगैरे वगैरे मंडळींनी इथे आणि वंदेमातरमच्या बीबीवर विरोधकांबद्दल जी personally attacking भाषा वाप्रली आहे तशीच वापरणार असाल तर तुमच्यात आनि लालभाईत फरक काय उरला >>>>>>>> लाल्भाइने वर दिलेल्या भाशेत कधिच उत्तर दिले नाही म्हणुन दोन्ही बाजुच्या चर्चेला काहितरी अर्थ होता.. आणि आम्ही पण काही सजेशन द्यायचे तर त्याना रोखठोक द्यायची हिम्मत करत होतो.. करण हे नक्कि माहित होते की त्यावर असभ्य उत्तर येनार नाही..!!!बाकी चालु द्या.. कुलकर्णी// ..!!!

Shravan
Wednesday, September 13, 2006 - 7:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हिंदूंचे संगठन होण्याची आवश्यकता सर्वानी बोलून दाखविली आहे.
पण त्यातील धोका म्हणजे जर असे काही संगठन चालू झाले तर मुस्लीम समाजही भयग्रस्त होऊन तेही असुरक्षीततेच्या भावनेतून एकत्र यायला सुरुवात करतील आणी मग परिस्थिती अधिकच हाताबाहेर जाइल.

असं आहे एकंदरीत.. एक उपाय किंवा एक उत्तर अनेक प्रश्नांना जन्म देत आहे.

हिंदूंनी प्रथमत: आपापसातील भेद मिटवावेत. ज्या प्रश्नांवर मतभेद आहेत (उदा. आरक्षण इ.) अशा प्रश्नांवर एकत्र येऊन चर्चेतून, दोन्ही बाजूंनी थोड्याशा तडजोडी करुन साधारण सर्वमान्य असे उपाय सुचवावेत. (असा अशावाद म्हणजे जरा जास्तच झाले काय?) .

नंतर संगठन करताना मात्र ते शुद्ध राष्ट्रभक्तीच्या तत्वावर करावे. त्या संघटनेत देशाबद्दल आस्था असणार्‍या सर्व धर्मीयांना प्रवेश असावा. अशा पद्धतीने एकत्र आलेल्या हिंदू, मुस्लीमांनी सामाजीक प्रश्नांवर काम करायला सुरुवात करावी. या संघटनेत कोणत्याही धार्मीक भावनेला दुय्यम स्थान असेल अथवा असा मुद्दाच उपस्थित केला जाणार नाही. (प्रत्येकाच्या धर्माचा आदर ठेऊन). या संघटनेच्या समाजकार्यातील भरीव योगदानानंतर दोन्ही समाजातून बर्‍यापैकी संघटनेला लोकमान्यता प्राप्त होण्यास मदत होइल. संघटनेने राष्ट्रीय सणांना एकत्र येऊन संचलन करावे. इतर धार्मीक सण वेगवेगळेच साजरे केल्यास उत्तम. उगाच एकमेकांच्या धर्माबाबत आपल्या संघटनेत कसे प्रेम आहे हे दाखविण्याच्या फंदात पडू नये. वर सांगीतल्या प्रमाणे धार्मीक भावना संघटनेत आणूच नयेत. लोकांचा एकंदरीत मुस्लीम समाजाकडे बघण्याचा दृष्टीकोण दुषीत झाल्याने बर्‍याच मुस्लीमांची खुप कुचंबना होत आहे. अशांना ही संघटना मुख्य प्रवाहात येण्यासाठी चांगले व्यासपीठ ठरू शकेल.

अशा संघटना जातीय तणावाच्या वेळीही फार उपयुक्त ठरु शकतील.

पोलीस दलातील श्री.सुरेश खोपडे यांच्या पुढाकाराने भिवंडी या संवेदनशील शहरात अशा प्रकारच्या दोन्ही समाजाच्या लोकांनी एकत्र येउन स्थापलेल्या शांतता कमिटीच्या माध्यमातून निर्माण झालेल्या जातीय सलोख्याचे फार मोठे उदाहरण आपल्या सर्वांसमोर आहे.

हाच patern मोठ्या धर्तीवर राबविल्यास, R.S.S. सारखे मोठे संगठन निर्माण केल्यास बरेच फायदे होऊ शकतील. न जाणो याच संघटनेतून मग सर्वमान्य नेता पुढे येइल की ज्याबद्दल सर्व धर्मीयांना विश्वास असेल व असा 'तो' मग धार्मीक राजकारणाला छेद देऊन भारताला नव्या दिशेकडे घेऊन जाईल.

वरील तोडगा कठीण वाटू शकतो, मात्र तो सर्वथैव अशक्य नक्कीच नाही.



Vijaykulkarni
Wednesday, September 13, 2006 - 8:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

१ भारतात किमान दहा कोटी मुस्लीम आहेत.
पाकिस्तानशी झालेल्या तीन युद्धामध्ये किती
जणानी गद्दारी केली?
२ पाकिस्तान ने १३ कश्मीर घशात घातला
असे आपल्याला ज्या उत्कटतेने वाटते त्याच उत्कटतेने
भारताने २३ कश्मीर गिळला असे पाकिस्तानी मायबोलीकरान्न वटत असेल का?
३ सर्व मुस्लीमान्ना हाकलून दिल्याने आपले प्रश्न सम्पणार आहेत का? आणी जर सम्पले नाहीत तर कुणाला हाकलणार?
शिखान्ना? दलिताना? कुणीतरी आर्यान्ना हाकलण्याचे आन्दोलन सुरू केले तर?
४ मुठभर शिखान्नी अतिरेकी कारवाया केल्या म्हणून आपण
सर्व शिखान्ना एकाच रन्गात रन्गवत नाही. मग मुस्लीमान्च्या बाबतच असा अट्टाहास का?
५ इन्दिरा हत्येनन्तर निश्पाप शिखान्विरुद्ध दन्गल करणारे, मुम्बई दन्गलिनन्तर निश्पाप हिन्दुना बॉम्ब स्फोटात मारणारे आणी गोध्रा घटनेनन्तर निश्पाप मुस्लीमान्ना मारणारे यान्च्यात फरक काय?
६ आज एका धर्मासाठी प्राण हातावर घेणारे जर
योगायोगाने दुसर्या धर्मात जन्माल आले असते तर?

येतो आता सोनियामातेच्या आरतीची वेळ झाली.


Moodi
Wednesday, September 13, 2006 - 9:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्रावण एका बाबतीत माझा आक्षेप आहे. केवळ मुस्लीम घाबरतील, त्यांच्यात असुरक्षीतता निर्माण होईल यासाठी हिंदुंनी संघटीत होऊच नये का? जाती, पोटजाती आणि प्रांतिय वादावर आधारलेला हिंदु समाज विस्कळीत झालाय हे मुस्लीमांनी केव्हाच जोखलेय. मग ते जर आपल्यातल्या दुहीचा फायदा घेत असतील तर का नको एकत्र यायला.

रहाता राहिली RSS तर त्यांचे चांगले काम बाजूला पडते आणि लोकांना नेमका ब्राम्हणवादच दिसतो. खूप जण आक्षेप घेतात की संघ ब्राम्हणवादी आहे पण गोपीनाथ मुंढेंसारखे अनेक नेते इतर समाजातुन आले आहेत हे सोयिस्कररीत्या विसरतात.

बाकी मुद्दे चांगले आहेत, पण मुस्लीम समाज कधी त्यांचा हट्ट सोडेल असे वाटत नाही, तुम्ही वर उदाहरण दिलेय, पण पोलीस स्टेशन होऊ नये यासाठी काय झाले ते सर्वांना माहीत आहेच. आधी त्या भडकाऊ समाजवादींना आवरले पाहीजे सरकारने, मग शांतता नांदेल.


Moodi
Wednesday, September 13, 2006 - 9:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा कुलकर्णी काय जबरदस्त सामान्यज्ञान आहे हो तुमचे, मानले पाहीजे.

भारतात १० कोटी मुस्लीम आहेत...

कुठुन शोधुन काढलीत ही आकडे वारी कुलकर्णी महाशय तुम्ही? १० नव्हे १६ च्या वर आहेत. आधी १४ कोटी होते, त्यात भर पडली बांगलादेशी अन पाकड्यांची.

पाकीस्तानी मायबोलीकर??????????? कुठे भेटले तुम्हाला? कधी झाला हा जीटीजी? वृतांत येऊ द्या की जरा. फोटु पण टाका.

भारताने काश्मीर गिळला??? I beg your pardon ! अशी स्वप्ने कधीपासुन पडायला लागली तुम्हाला? काय बेफाम आणि बेलगाम विधाने करताय. शाळेत इतिहास काय झिया आणि याह्याखानकडुन शिकलात का?

हो आम्हाला यांना हाकलायचे आहे. पाकीस्तानी आणि बांगलादेशी घुसखोर, बेकायदा वास्तव करणारे नागरीक, अतीरेकी.

बाकी जे नागरीक जे भारताला आपली मायभूमी, देश मानतात, शांततेने रहातात, धर्मासाठी देशाला दुय्यम ठरवत नाहीत, अतीरेक्यांना साथ देत नाहीत अशांचे स्वागत आहेच.

निरपराधांना मारणे हा गुन्हा आहेच. पण शिखांनी पंजाब सोडुन इतरत्र स्वतहुन दंगली केल्याची उदाहरण दाखवा जरा. गुरुद्वारावरुन गणपतीची मिरवणूक जाते तेव्हा दगडफेक होत नाही, उलट पाणी सरबत वगैरे वाटले जाते. वडाची साल पिंपळाला चिकटवत बसु नका.



Chyayla
Wednesday, September 13, 2006 - 11:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुस्लिम असो वा नसो हिन्दुन्चे सन्घटन आवश्यक आहे, हिन्दु सन्घटन म्हणजे मुस्लिम विरुद्धच असला गैरसमज पसरविला जातोय.
आज जग इस्लाम आणी ख़्रिश्चन दोघान्च्या अतिरेकी स्वरुपामुळे हिन्दु जिवन्पद्धतीकडे मोठ्या आशेनी पहात आहे. कारण सर्वेपि सुख़िन्: सन्तु.." आणी "वसुधैव कुटूम्बकम" ची घोषणा फ़क्त हिन्दुचीच.

ज्याप्रमाणे हिन्दुना मुस्लिम्विरुद्ध तसेच हिन्दुना शिख, दलित, आणी इतराविरुद्ध असल्याचा निष्फ़ळ प्रयत्न चालु आहे, पण शिख़ समाजाने तो स्वत्:हुन हाणुन पाडला त्याला विरोध केला, आणी हाच फ़रक आहे, शिख़, इतर आणी जिहादी मुस्लिमान्मधे.

हिन्दुत्वाची कास धरणारा रास्वस या देशाचे पर्यायाने मानव समाजाचे उज्ज्वल भविष्य आहे. आणी त्याला पर्याय नाही.
श्रावण म्हणतात त्याप्रमाणे काही मुस्लिमान्चा "भाजप" वर विश्वास नसेलही, पण सत्याची कास सोडता कामा नये कारण त्यातुनच विश्वास निर्माण होइल, ही एक परिक्षाच आहे, आणी परिक्षा काही ऐर्या गैर्याची होत नसते तर अस्सल सोन्याचीच होत असते.
तुम्हीच बघा असल्या पान्ढर्या बगळ्याना, लबाडाना, देशद्रोही तत्वाना आज ही जळी स्थळी काष्ठी पाषाणी केवळ सन्घच दिसतो, ज्याप्रमाणे औरन्ग्याच्या सैन्याला सन्ताजी धनाजी दिसत होते.

भारत माता कि जय.




Kedarjoshi
Thursday, September 14, 2006 - 2:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे जरा मुड लाईट करन्यासाठी.

http://video.google.com/videoplay?docid=5035729538471801346&;q=ganesh+animation

Limbutimbu
Thursday, September 14, 2006 - 3:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मूऽऽऽडीऽऽऽऽऽ! व्वा! क्या बात है! कसल झणझणीत उत्तर दिल हेस! :-)
>>>> पण त्यातील धोका म्हणजे जर असे काही संगठन चालू झाले तर मुस्लीम समाजही भयग्रस्त होऊन तेही असुरक्षीततेच्या भावनेतून एकत्र यायला सुरुवात करतील आणी मग परिस्थिती अधिकच हाताबाहेर जाइल.
श्रावण, बाकी पटल पण तुमच हे गृहितकच पटल नाही आणि याच गृहितकावर आधारीत नेमस्त कॉन्ग्रेसिन्च भ्याड राजकारण पुर्वी चालल आणि स्वतन्त्र भारतात मतान्च लान्गुलचालन सुरू झाल! एनीवे, तुमच्या मतान्चा आदर करतो!
समुवै, थॅन्क्यू! :-)


Shravan
Thursday, September 14, 2006 - 4:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हिंदूंनी आपापसातील मतभेद विसरून एकत्र येण्याची गरज मीही अधोरेखीत केली आहे. मात्र संगटना बांधताना ती धार्मीक भेद करनारी नको तर देशप्रेम हा अजेंडा असनारी हवी असे माझे मत आहे. त्यात हिन्दु तर संघटीत होतिलच पण त्यात इतर धर्मीयही त्याच एका भावनेने एकत्र आलेले असावेत म्हणजे त्या संघटनेबद्दल दोन्ही समाजात विश्वास निर्माण होइल.

भिवंडीचे मी दिलेले उदाहरण हे याआधीच्या १६ ते १७ वर्षांतील तिथल्या परिस्थितीत झालेल्या बदलाबद्दल होते. खोपडेंनी अशा कमिट्या स्थापल्यावर १२ ते १५ वर्ष तेथे शांतता होति. अगदी १९९३ च्या दंगलीतही भिवंडी शांतच होती. सर्वात संवेदनशील समजल्या गेलेल्या शहरासाठी ही फार मोठी achievment होती. मात्र खोपडे निवृत्त झाल्यावर पुन्हा धर्माचे राजकारण करणार्‍यांनी तेथे डोके वर काढले. (आबू आझमी). या लोकांनी केवळ स्वत:चे राजकारणात स्थान टिकवण्यासाठी नंतर पुन्हा पद्धतशीरपणे तेथील वातावरण तापवले.

बाकी मूडी, तुम्ही कुलकर्णींच्या मुद्द्यांवर दिलेले उत्तर बरोबर वाटले.


Samuvai
Thursday, September 14, 2006 - 4:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्रावण,
ईतर अनेकांनी वर लिहील्याप्रमाणे फक्त तेवढं मुस्लिम भयग्रस्त होण्याच सोडून सगळं झकास! काय चूक आणि काय बरोबर हे प्रामाणिक खंडन मंडनाने ठरवता येतं. अशी unbiased मतं वाचायला मिळाली की बरं वाटतं.

४ मुठभर शिखान्नी अतिरेकी कारवाया केल्या म्हणून आपण
सर्व शिखान्ना एकाच रन्गात रन्गवत नाही. मग मुस्लीमान्च्या बाबतच असा अट्टाहास का?

कुलकर्णी,
हाच प्रश्न मी तुम्हाला विचारला तर? शीख, जैन, बौद्ध यांचा पिंड ह्याच मातीततला आहे. त्यांच तर सोडाच. पण सार्या जगात आक्रमक राष्ट्रभक्त, वंश शुद्धिबाबत दक्ष म्हणून प्रसिद्ध असलेले jews कोकणात (हो अगदी "संघिष्ट" कोकणस्थांबरोबर) गेले १-२ नाही २५०० वर्ष सुखानी नांदत आहेत. आता त्यातले बरेच जण सन्मानाने, चांगल्या आठवणे मनात बाळगत ईस्त्राईल ला गेले. अशीही ऊदाहरणे आहेत की एक भाऊ तिथे आणि एक ईथे (मातृभूमी सोडणे नाही म्हणून घट्ट पाय रोवून ईथेच राहीलेला माझा वर्गमित्र आहे). पारशी आहेत. का त्रास होत नाही त्यांचा आम्हाला?
आणि का त्रास होतो ईस्लाम चा सार्या जगाला? मूठभर लोकांच काम असत तर कधीच नेस्तनाबूत करता आल असत. ह्या अतिरेकी कारवायांना mass support आहे. भिवंडी, मालेगाव, भेंडी बाजार, बेहरामपाडा, अलिगढ मुस्लिम विद्यापीठ ... डोळे उघडे ठेवून (आणि बुद्धी शाबूत ठेवून) नुसते चाललात ह्या भागांमध्ये तरी लक्षात येईल.


Limbutimbu
Thursday, September 14, 2006 - 4:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्रावण, जातिय नेत्यान्नी घाबरविलेल्या मुस्लिम समाजाचा भयगण्ड दूर करणे हा खरच एक आवश्यक कृतीचा विषय हे व त्यात जो तो आपापल्या परीने गाजावाजा न करता देखिल हातभार लावु शकतो! अर्थात अशा कामास सुसुत्र सन्घटनात्मक जोड मिळाली तर अधिकच उत्तम! :-)

Chyayla
Thursday, September 14, 2006 - 5:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सन्घाच्या पुर्ण नावामधे "राष्ट्रिय स्वयमसेवक सन्घ", यात राष्ट्रिय हाच निकष आहे, त्यात धार्मिक निकष नाहिच, आणी रास्वस काय करते तर हीन्दुन्चे सन्घटन.

श्रावण, अरे जे अजाणतेपणी सन्घाला विरोध करतात कारण ते या हीन्दु या शब्दाबाबत पसरवलेल्या अपप्रचाराचे बळी ठरल्यामुळेच. की सन्घ धार्मिक तत्वावर आहे, हिन्दु शब्द हा काहि रिलिजन दाखवत नाहीच तो एक जिवन पद्धति दाखवतो, आणी उच्च न्यायालयाने हि यावर शिक्कामोर्तब केले आहे.

धार्मिक भावना तिथेच येतात जेन्वा धर्माच्या नावावर जिहाद आणी क्रुसेड चालवतात व देशविरोधी कारवाया करतात तेन्व्हा त्याच्या प्रत्युतरात ओघाने हिन्दु या शब्दाला धार्मिकता जोडल्या जाते. कारण हिन्दु या धार्मिक आधारावर देश तोडणार्या तत्वान्ना विरोध करतो.

असे म्हणतात ना घाण साफ़ करताना तुमचे हातही घाण होणारच पण काय याचा अर्थ तुम्ही स्वता: घाण होता काय?

ही तथाकथित सेक्युलर आणी डावी पिल्लावळ याच गोष्टिचा फ़ायदा घ्यायचा प्रयत्न करतात.



Soultrip
Thursday, September 14, 2006 - 10:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नावात बरेच काही आहे!
कुलकर्णी तुमचं खरं नाव काय आहे सांगाल का? जर खरोखर कुलकर्णी असेल तर तुमचा case-study म्हणुन seriously अभ्यास केला पाहिजे. नक्की कोणी आणि कसं तुमचं hammering केलं की जेणेकरुन तुमची मते अशी जयचंदवादी बनली आहेत!


Vijaykulkarni
Thursday, September 14, 2006 - 11:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विचारी, सन्यत बुधीमान आणी बहुश्रुत माणसाल जयचन्द म्हणतात का? एक भा. प्र.



Soultrip
Thursday, September 14, 2006 - 12:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विचारी, सन्यत बुधीमान आणी बहुश्रुत >>>>
>>>> असं लोकांनी म्हटलं पाहिजे हो याकुब्-भाईसाब! हे ही जर कळत नसेल तर.... सुज्ञासी जास्त सांगणे न लगे!

Santu
Thursday, September 14, 2006 - 1:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सामुवाई
पारशी,ज्यू लोकांचा त्रास होत नाहि.______हे मात्र खरे आहे.
उलट हे लोक खरया अर्थाने आपल्या संस्क्रुतिशी समरस झाले आहेत.

पण मुसलमान ही जमातच उपद्रवी आहे. आपणच नाहि तर सारे जग.यांच्या पासुन त्रस्त झाले आहे.उदा:कॅनडा,ब्रिटन,सर्व युरोप,आॅस्ट्रेलिया या सर्व ठिकाणी हे क्रुतघ्न त्यांचेच खाउन त्यांच्याच देशात दहशतवादि क्रुत्य करत आहेत. हि समस्या फ़क्त भारताची नाहि तर पुर्ण जग त्या पासुन त्रासले आहे.

कुणि भिवंडिचा विषय काढला म्हणुन आठवले.१९४७ सालि या मुसलमानानि पकिस्तानचा स्वातंत्र्य दिवस साजरा केला होता भिवंडित तेव्हा दंगल झाली होति.त्या मुळे त्यांच्या मनात काय आहे यात कुणि भ्रमात राहु नये.


Shravan
Thursday, September 14, 2006 - 5:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझा मुस्लीम असुरक्षीततेचा मुद्दा सगळ्यात जास्त limbutimbu ना समजला आहे. हिंदू संघटन करताहेत म्हणल्यावर मुस्लीम कदाचीत जास्त लक्ष देणार नाहीत. पण स्वत्:ला धर्मनिरपेक्ष म्हणविणारे व त्या समाजातील स्वार्थी राजकारणी पद्धतशीरपणे अपप्रचार करून त्यांच्यात असुरक्षीततेची भावना निर्माण करतील.

खरे तर R.S.S. ची राष्ट्रभक्ती अगदी वादातीत आहे, किंवा या तत्वावरच ती संघटना चालते. मात्र वर सांगीतल्याप्रमाणे तथाकथीत धर्मनिरपेक्ष म्हणविणारांनी व मुस्लीम राजकारण्यांनी पद्धतशीर, सुनियोजीत अपप्रचार करून या संघटनेला एकाकी पाडले आहे. दुर्दैवाने मुस्लीम व बरेच हिंदूही या त्यांच्या प्रचाराला बळी पडले आहेत. खरे तर जेव्हा राष्ट्रभक्तीच्या तत्वावर संघटनेचा विषय निघतो तेव्हा R.S.S. चे नाव पुढे येते. मात्र सद्य परिस्थितीत संघटनेबाबत पसरविले गेलेले गैरसमज दूर करण्यासाठी जेवढा वेळ व शक्ती लागेल त्यापेक्षा बर्‍याच कमी वेळात व श्रमात दुसरी त्याच तत्वावर संघटना बांधता येईल. बाकी संघाबाबत, त्यांच्या राष्ट्रभक्तीबद्दल अतिशय आदर आहेच.


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators