|
केदारेश्वरा, अर्धा पुणेकर वगैरे अशी काही भानगड पुण्यात नसते. एक तर न-पुणेकर किंवा १०० टक्के पुणेकर. (हन्ड्रेड पर्सेन्ट पेस्तनकाकासारखे..)त्यातले काही नर्मदेतले गोटे पुण्यात राहून कोरडेठाक ते कोरडेठाक राहतातच... दुसरे असे पुण्यातील रस्ते हे माझ्या तीर्थरूपांची वडीलार्जीत प्राॅपर्टी आहे हे प्रत्येक अट्टल पुणेकराचा समज असतो त्यामुळे मी त्यावर कसाही धावेल अशी त्याची भूमिका असते... (एक सायंकालीन किस्सा नं१-- सेनापती बापट आपले वडील काय? न.२ नाही, का बुवा? न.१-- नाही म्हणजे हा सेनापती बापट रस्ता आहे. आपण आपल्या बापाचा रस्ता असल्यासारखे हा रस्ता अडवून उभे आहात म्हणून विचारलं!!!!) तसेच तुझ्या झालेल्या चुका-- पुणेकर दुकान बन्द करीत नाहीत.ते अधून मधून ग्राहकाना दर्शन देण्यासाठी ते उघडतात. शिव्या देण्याबाबत ते फक्त देशस्थावरच अन्याय करत नाहीत. किती खाशील हे विचारूनही ते जेवण तयार करतात ही माहीती चुकीची आहे... म्हनजे'करतात' हे चूक आहे. जगातील प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. एक बाजू पुणेकराची असते अन दुसरी बाजू चुकीची असते...
|
Bee
| |
| Friday, August 25, 2006 - 10:07 am: |
| 
|
मागे म्हणजे खूप मागे १९९५ मध्ये फ़र्ग्यूसन रस्त्यावरची वडाची झाडे तोडण्यात आली. किती छान दिसायची ती झाडे आणि त्यांची ती दाट सावली. पारंब्या लोंबकायच्यात तेंव्हा नकली झुंबरांची गरज भासायची नाही. मग रस्ता वाढवायचा म्हणून ही झाडे मुळासकट उखडण्यात आली. मी पुणेकर नसून माझा जीव कळवळला. शे-पन्नास वयवर्ष झालेली झाडे उद्धस्त करण्यात आली. काय साधले त्यांनी. अजून वाहतूक प्रश्न आहेच ना कायम. झाडे तर गेलीत ना एकदाची. त्यावेळी जमेल तितक्या झाडांची पुनरुज्जीवन केले होते, पण ही ऐवढी मोठी झाडे त्यांचे मुळ रुजले नाही कुठेच. मला वाहतूकीचा हा विषय वाचून ते जुने चरा पडलेले दिवस आठवलेत. सुशिक्षित पुण्यात, फ़र्ग्यूसन समोर तरी असे घडायचे नव्हते. मात्र सोनाली रुपाली वैशाली ही खायची restaurant अजून तिथेच असतील. ती झाडांची canopy मला अजून डोळ्यासमोर दिसते. ती आता तिथे नाही.
|
Bee
| |
| Friday, August 25, 2006 - 10:18 am: |
| 
|
नुसती मेट्रो सुरू करुन हा प्रश्न सुटेल असे वाटत नाही. सगळेच जण मेट्रोनी प्रवास करणार्यातले नसतात. ज्यांच्याकडे आपले हक्काचे वाहन आहे ते मेट्रोमध्ये का शिरतील. खरी गरज आहे परिपुर्ण land-planning ची जी भारतात राबवने अशक्य आहे कारण पैसा खाणारे आणि अप्रामाणिक शासन. आपण कितीही सुचना केल्यात तर त्या अमलात आणणे हे थोडीच आपल्या हातात आहे. त्यांनाही चांगले काय हे कळत असेल पण स्वार्थापुढे टिकाव लागत नाही अशा गोष्टींचा. तरीही सुसंकृत आणि समंजस नागरीकांनी आमूलाग्र बदल घडवायचे सोडू नये. नक्की करा परिवर्तन. थोडे गांधी घेऊया, थोडे टिळक घेउया, थोडे सावरकर घेऊया.. असे बरेच जण घेतले की एक वेगळी शक्ती चालून येईल.
|
Mrdmahesh
| |
| Friday, August 25, 2006 - 10:31 am: |
| 
|
च्यायला आमचा मराठवाडा बरा. थोडाफार जो रस्ता आहे त्यावर खड्डे तरी नाहीत. >> केदार, १००% अनुमोदन. खरं तर नुसते खड्डे बुजवून उपयोग नाही. सगळे रस्ते परत खणून शास्त्रीय पद्धतीने करायला हवेत. ही खूप मोठी मोहीम आहे आणि त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती हवी. नेमका याचाच अभाव आहे. BTW पुण्यात खड्डे आहेत? कैतरीच बोलता बुआ तुम्ही. असले तरी खूपच कमी आहेत हो.
|
Moodi
| |
| Friday, August 25, 2006 - 10:45 am: |
| 
|
हो ना मराठवाड्यातील रस्ते माणसाला कसे अगदी हवेतुन वर खाली केल्याचा आभास देतात. गाडीत बसले की एकदा टेकडी अन मग एकदम खोऽऽऽऽऽल दरी. या बया! अंबेजोगाईला हा अनूभव घेतलाय वो आमी. आक्षी पाळण्यात बसल्यागत वाटतया जनु. पुण्यातील रस्त्यांची परिस्थिती जोपर्यंत सुधरत नाही तो पर्यंत निदान बस ( PMT PCMT ) तरी बरी. पण तरीही मिनी बस ठेवाव्यात जशा कंपनीसाठी असतात, म्हणजे त्या टमटम का गरुडा म्हणतात ना( ४ ते ६ सिटरवाल्या) त्यांचे प्रदुषण पण कमी होईल.
|
Bee
| |
| Friday, August 25, 2006 - 10:52 am: |
| 
|
पुण्यातील रस्ते नागपूरमधील सडकांपेक्षा चांगले नाहीत. नागपूरमधील सडका, भर उन्हात डांबर वितळून टिकतात इतक्या टणक आहेत म्हणून भगदाड पडत नाही. महाराष्ट्रात फ़क्त पुणे, मुंबई आणि नागपूर सध्या तरी इतकेच शहर चर्चीले जातात. पुणे-मुंबई सर्वात जास्त. म्हणून कदाचित फ़क्त पुण्यातील वाहतूकीचा उधोउधो होतो आहे. रस्त्यांचे ठिगळीकरण जिथे शक्य नाही तिथे शास्त्रीय पद्धतीने नविन रस्त्यांची नवनिर्मिती होईल का..
|
जिवाला सामोसा खाणे, कुठला? ज्ञानप्रबोधिनीसमोरचा का रे भो? अहो झक्की, कुठ येड पान्घरुन पेडगावात फिरताय? पुण्याबद्दल विचारताना? चार दिसान्चा हिशेब ना? तुम्ही बसा खड्ड्यान्ची मोजदाद करत! तिकडे हिशेब वेगळेच! अन बाईन्ची पाठ समदे थोपटत असतील, की कस्स कामाला लावलय! आता चार दिसात शिल्लक समद्या फन्डाचा उपयोग केवळ खड्डे (कसेतरी) बुजविण्याकरता खर्ची पाडायचा (पक्षी खिशात घालायचा)! केव्हड आव्हान हे! त्यान्चे हिशेब चाल्लेत अन तुमी काय हो कितीक झाल काम नि कितिक खड्डे बुजले विचारताय? अजुन एक दिवस शिल्लक हे, परवा पत्रकार परिषदेत माहिती मिळेल, अमुक इतके कोटी रुपयान्चे खड्डे बुजवले, (म्हन्जे तेवढ्या कोटी रुपयान्चा खड्डा पालीकेच्या तिजोरीला पाडला) नि उद्यामाडी शप्पथ, पुण्याच्या रस्त्यावर आता एकही खड्डा शिल्लक नाही तर राजीनाम्याची गरज नाही असही जाहीर करतील! काय करणार तुम्ही नविन जर्सीत बसुन अन आम्ही पुण्यात?
|
Bee
| |
| Friday, August 25, 2006 - 10:58 am: |
| 
|
तुम्ही इथे जसे पुण्याच्या पाट्या लावल्यात तसे खड्ड्यांचे एक दोन तरी छायाचित्र आणवून दाखवा बघू.. काय खड्डे खड्डे लावले आहे. मी ई-सकाळ रोज वाचतो एकही खड्डा गावत नाही.
|
Moodi
| |
| Friday, August 25, 2006 - 11:03 am: |
| 
|
अरे ईसकाळ वाचतो हा तरी याला खड्डा दिसत नाही.( अरे ये पी एस पी ओ नही जानता च्या चालीवर) सकाळवाले दावा ठोकतील तुझ्यावर.(दिव्यांची अख्खी माळ घे) 
|
Sanurita
| |
| Friday, August 25, 2006 - 11:26 am: |
| 
|
बी तु येच पुण्यात, म्हणजे तुला कळेल की सगळे का ओरडत आहेत ते. ऑफ़िस ला जाईपर्यन्त जीव वैतागून जातो खड्ड्यान्मुळे.
|
Bee
| |
| Friday, August 25, 2006 - 11:37 am: |
| 
|
सानुरिता, अक़्मंत्रनाबद्दल धन्यवाद. पुण्यात सगळीकडे हीच अवस्था आहे की काही भागातच? पुणे शहराचा Road map मिळेल का बघायला... रस्त्यांचे काम कुणाकडे असते? मेअरकडे ना..
|
Maudee
| |
| Friday, August 25, 2006 - 12:33 pm: |
| 
|
बी, तुझ्या माहितीसाठी पुण्यात सर्वात जास्त ख़ड्डे जुन्या मुंबई पुणे रस्त्यावरती आहेत. रस्त्याच्या या भागाबद्दल भांडणे आहेत की हा रस्ता नक्की कुणाच्या अधिकाराख़ाली येतो PMC , PCMC , की cabtonmment . त्यामुळे हा रस्ता कोणीच दुरुस्त करत नाही. बघुयात इतक्या गदरोळानंतर तरी त्यात काही फ़रक पडतोय का ते. बाकी मग रस्त्यावर ख़ड्डे... ख़ड्ड्यांचा रस्ता म्हणू हवं तर, संपुर्ण पुण्यात असा एकही रस्ता नाही जिथे ख़ड्डा नाही. मागच्या वर्षी किमान JM वरतरी ख़ड्डे नव्हते. यंदा तिथेही आहेत. मी असं ऐकलय की JM हा पुण्यातला सर्वात जुना रस्ता आहे २५वर्षापुर्वी कुणातरी बर्वे नावाच्या contactor ने तो बांधला होता. पण बिचार्याला त्या contract नंतर पुण्यातल्या एकाही रस्त्याच contract मिळाल नाही. अर्थात हे मी ऐकल कितपत ख़र आहे माहीत नाही. मागच्या वर्षी याच JM वरून ख़ूप गदारोळ झाला होता. की पावसामुळे जर ख़ड्डे पडतात तर JM ला ख़ड्डे का नाहीत.
|
Sanurita
| |
| Friday, August 25, 2006 - 1:13 pm: |
| 
|
माझ्या माहितीप्रमाणे तो रस्ता ब्रिटिशानी बान्धला आहे.त्याची मुदत ३५ वर्षे होती. त्यान्तर त्यानी ते कळवले ही होते.(मुदत सम्पल्याचे). --रिटा.
|
Zakki
| |
| Friday, August 25, 2006 - 1:43 pm: |
| 
|
बर्वे नावाचे कॉन्ट्रॅक्टर होते की स. गो. बर्वे, पुण्याचे प्रसिद्ध कमिशनर, यांच्या कारकीर्दीत हा रस्ता बांधला? कदाचित् ब्रिटिशांच्या काळात बांधला असेल पण कॉन्ट्रॅक्टर महाराष्ट्रीय होत, नि त्याला पुन: काही काम मिळाले नाही हे खरे.
|
Moodi
| |
| Friday, August 25, 2006 - 2:19 pm: |
| 
|
कसं मिळणार? सरकारची / महापालिकेची खाऊगिरी बंद नाही का होणार? पुणे महोत्सवात करोडोने पैसे उधळुन स्वतचे नाव कमवायचे( त्या करोडोतले काही यांच्या खिशात जातात, मग मुलाबाळांच्या लग्नाचा खर्च पण निघतो, पण आयकर खात्याची यांच्याकडे नजर जाणार नाही, ते आपले सामान्य माणसाला कंगाल करायला बसणार), पण रस्ते दुरुस्ती? अहं! नाव नका घेऊ. जिथे फक्त दुचाकीस्वाराकरता छोटे पूल बांधलेत, तिथे पण लोक ऐकत नाहीत, चार चाकी घुसवायला बघतात. स्वारगेट चौक, लकडी पुलाजवळचा अलका टॉकीजचा चौक, कोथरुड, चितळेजवळच तुळशीबागेसमोरचा रोड(शनीपार चौक), सातारा रोड - तिकडे बिबवेवाडी, कात्रज मार्गावर तुफान गर्दी. कशाचा कशाला ताळमेळ नाही. बरेच अपघात घडले तिथे, रिक्षावाले आणि खाजगी वाहतुक वाले आपली मनमानी करतात, त्यातुनच वाहतुकीचा मोठा प्रश्न उभा रहातो. सायकवाले, छोटे दुचाकीवाले( स्कूटी, होंडा वगैरे) ना पण त्रास होतो. सामान्य माणूस त्यामुळे घाबरुन बस, रिक्षा हाच पर्याय निवडतो. रस्ताच ओलांडता येत नाही मग काय करणार? पिंपरीजवळच्या भुयारी मार्गाचे २ वर्षापासुन काम चाललय, खणतायत आपले. पुण्यातल्या खड्ड्यांना आणि पुणेकरांना नावे ठेवणे सोपे आहे, पण जो रहातो तोच भोगतो. वेळ हीच आहे की सगळ्यांनी प्रशासनावर दबाव आणायचा. बास झाले त्या पुणे महोत्सवाचे कौतुक.
|
सेनापती बापट आपले वडील काय>>>>>> LOL बी अरे रुपाली, वैशाली अजुनही आहेत. जेव्हा ती वडाची झाड काढली तेव्हा मलाही फार वाईट वाटले. रस्ता काही फार मोठा झाला नाही पण पार्कींगची सोय केल्या गेली. लिंबु हो ती ज्ञान प्रबोधीनीच्या समोराची पाटी आहे. त्या माणसाला मी समोसा घेताना म्हंटले होते जिवाला दोन समोसे द्या. तो थक्क्क झाला होता ऐकुन. सर्वात वाईट रस्ता म्हणजे (६ महीन्यापुर्वी ची भेट) राहुल टॉकीज ते बेंगलोर बायपास. फक्त मधला विद्यापिठ ते ओंध रस्ता मस्त बाकीचा म्हणजे पाठदुखीला निमंत्रन. सिंमेटचे रस्ते का करत नसावेत बर पुण्यात.
|
Shravan
| |
| Friday, August 25, 2006 - 9:30 pm: |
| 
|
पुण्यातील रस्ते ही खरच फार मोठी समस्या आहे. तसे रस्त्यांची जबाबदारी ही महानगरपालीकेवर येते. मंजुर रस्त्यांसाठी निविदा मगविणे, contract देणे, contractor ला पैसे चुकते करणे अशी सर्व प्रशासकीय कामे महानगरपालीकेच्या अखत्यारीत येतात. नगरसेवक हे आप-आपल्या प्रभागातील रस्त्यांची मंजूरी पलिकेकडून मिळवतात. कामे करुन घेण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. महापौरांचा रस्ते खराब होण्याशी तसा काही प्रत्यक्ष सबंध नाही. आता त्यांनी राजीनाम्याची गोष्ट केली ती म्हणजे ते नैतीकता की काय म्हणतात ना त्यासाठी. आणि हो रस्ता दुरुस्ती सालाबादप्रमाणे उत्तम चालू आहे बरका या दिवसात (राजिनाम्याच्या गोष्टीपासून). म्हणजे असे की बाणेर रस्ता दुरुस्त केला. हा रस्ता म्हणजे एक 'भयाण' (हा शब्द योग्य का? याचीही मर्यादा ओलांडून पलिकडे जाणारा शब्द असेल तर तो वाचावा) प्रकार झाला आहे. तो दुरुस्त केला. महापौरांनीही हे जाहीर केले.. (म्हणजे राजीनाम्याच्य गोष्टीनंतर हा रस्त दुरुस्त झाला असे). पण दुरुस्ती विचाराल तर अधिचे खड्डे परवडले असा प्रकार केला आहे. मोठी खडी व त्यावर crushed खडी टाकून रोलर फिरवला आहे. आता जो पाउस होइल ना त्यामध्ये सर्व मोठी खडी उघडी पडेल आणी रस्ता म्हणजे म्रुत्युचा सापळा बनेल.सगळीकडे अशी दुरुस्ती चालू आहे. नेहमीप्रमाणे नगरसेवक प्रशासनाच्या नावाने खडे फोडत आहेत. रस्त्यांच्या कामातून मिळालेल्या कमिशनमधून घेतलेल्या गाड्यांमधून रस्तांची पाहणी चालू आहे. गेल्या वर्षी याच प्रश्नावर नगरसेवकांनी तातडीची सभा बोलावली होती. २,३ तास प्रशासनाच्य नावाने ठणाणा चालला होता. शेवटी आयुक्त नितिन करीर बोलले.. रस्त्यांच्या कामामध्ये कुणला किती कमिशण मिळते हे मी इथे जाहीर करू काय असा संतप्त सवाल जाहीर सभेत केला. सर्वत्र शांतता. सभा त्यानंतर घाईने अटोपली गेली हे सांगणे न लगे. तर सांगायचा मुद्दा म्हनजे हे नगर्सेवक, नेते जी आगपखड वगैरे करत आहेत सध्य रस्त्यांवरून ते दुसरे काही नसून केवळ स्वत:ला लोकांच्या रोषपासून वाचविण्याची धडपड आहे. रस्त्याच्या कामाचे पैसे कमी होण्याचे दुसरे ठिकाण म्हणजे पलिका अधिकारी. सर्व प्रशासकीय बाबी हातात असल्याने contractor lobby कडून बरेच घबाड मिळण्याची सोय असते. शिवाय contractor ला फक्त साहेबांची (राजकीय व प्रशासकीय) मर्जी सांभालळी तरी चालते. रस्ता कितीही कमी दर्जाचा बनविला तरी पुढची कामे मिळत जातातच. असो.. मुद्दा उपाय सुचवायचा आहे पण उपायाआधी पार्श्वभूमी जाणुन घेणे गरजेचे आहे म्हणून इअतके सारे..
|
Zakki
| |
| Friday, August 25, 2006 - 10:41 pm: |
| 
|
थोडक्यात म्हणजे जगात सर्वत्र जे चालते तेच पुण्यातहि. फरक एव्हढाच की कुणाला थोडी तरी लाज असते, कुणाला अजिबात नाही. जोपर्यंत जनजागृति होत नाही तोपर्यंत हे असेच चालायचे! माऽरे शिकलेले सुसंस्कृत लोक. पण लोकशाही, जनतेचे हक्क, हे बजावण्यासाठी लागणारे काम करायला कुणि तयार नाही!
|
>>>> थोडक्यात म्हणजे जगात सर्वत्र जे चालते तेच पुण्यातहि. हो झक्की, शेण खाणारे पक्षी दोन नम्बरचा पैसा खाणारे जगात सर्वत्रच असतात, नी "चलता है, जाने भी दो यारों" असे म्हणुन दुर्लक्ष करणारेही जगात सर्वत्र असतात, फक्त पुण्यात तस नसत! पुण्यात कडाडुन विरोध होतो, बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल या चालीवर बिन खड्ड्याचा रस्ता दाखव नाहीतर तुलाच गाडतो या भुमिकेतुन झगडणारी लोक कमिशनर आणि महापौराला कोर्टात खेचतात, नगरसेवकान्ना जाहीर कबुली द्यावी लागते की त्यान्ना आता कोणत्याही जाहीरच काय खाजगीत देखिल कुठ जातायेता येत नाही. कारण पुणेकर केवळ अण्डी टोमॅटो फेकण्यावर समाधान मानत नाहीत, जितक्या सहजतेने जिन्यातल्या कोपर्यान्मधे पिचकारी मारतील तितक्याच सहजतेने हे खाबू लोक समोर दिसले तर तोन्डावर थुन्कतील ही भिती येथिल राजकारण्यान्ना तोन्ड लपवायला भाग पाडते. इथे लालुशाही चालत नाही, तसली सोन्ग बिहार मधे! पुणेकर जोवर शान्त हेत तोवर ठीक हे! आणि आता पुणेकरान्च्या सहनशक्तीचा अन्त या कॉन्ग्रेस आणि प्रशासनाच्या शेण खादड्या युतीने पाहिला हे! त्याचे परिणाम दिसतीलच, कुठे अन कसे असे बावळटासारखे खाकी प्रश्ण विचारु नयेत. ते बर्वे असतील कोणीतरी आयुक्त, पण प्रत्य्क्ष बान्धकाम जोग कन्स्ट्रक्शन कम्पनीने केले होते! पाच पैसे देखिल खायला देणार नाही हे जाहीरपणे ठणकावुन सान्गुन पालिका प्रशासनाच्या मागे हात धुवुन लागुन, वेळेला पदरचा पैसा गेला तरी चालेल पण कमीदर्जाचे काम करणार नाही या निश्चयाने केलेला रस्ता तो जन्गली महाराज रोड! पुढे काही काळ मेसर्स जोग निविदा भरायचे पण जास्त दराच्या असे म्हणुन त्यान्च्या निविदा नाकारुन त्यानन्तर एकही काम त्यान्ना देण्यात आले नाही, येवुन जावुन सारसबाग ते पर्वती रोपवेचे काम त्यान्ना द्यायचे चालले होते पण तो प्रकल्पच सुदैवाने लौकर बासनात गुन्डाळला हे बरे झाले!
|
Bee
| |
| Saturday, August 26, 2006 - 3:33 am: |
| 
|
प्लीज इथे वाद करू नका.. जी काही बोलायचय ते नीट बोला :-) इथे अव तव चालणार नाही :-)
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|