|
Sanurita
| |
| Tuesday, August 22, 2006 - 8:15 am: |
| 
|
सध्या पुणेकरान्साठी सार्वजनिक वाहतुक एक मोठी समस्या आहे. अनेक उपाय सुचवले जात आहेत. उदाहरणार्थ, स्काय बस, वोल्वो,मेट्रो...तुमचे मत काय आहे? यापैकी कोणता मार्ग जास्त उपयुक्त आहे?का अजून काही मार्ग आहे?
|
Samuvai
| |
| Tuesday, August 22, 2006 - 8:53 am: |
| 
|
चांगला (आणि ज्वलंत) विषय. मेट्रो सगळ्यात चांगला उपाय वाटतो.
|
Jaaaswand
| |
| Tuesday, August 22, 2006 - 2:13 pm: |
| 
|
थोडेसे विषयांतर..पण उपाय म्हणजे जे रस्त्यांच्या डागडूजींसाठी वेठबिगारीवर काम करणारे मजूर लोक आहेत त्यांना, अजून काही रोजगार ( side by side कुटिरोद्योग वगैरे ) मिळवून देणे कारण ह्या लोकांना, रस्त्यांची कंत्राटे घेणार्या लोकांकडूनच कामे मिळतात.. मग इतर ह्यांची पोटे भरणार कशी.. तसेच ह्या लोकांची संख्याही मोठी.. मग कशाचेही राजकारण करणार्या आपल्या नगरसेवकांच्या पदरी मते पडणार कशी.. मग दृष्टिकोन असा होतो कि जे आत्ता काम ( कंत्राट ) करत आहोत ते निकृष्ट करायचे.. मग परत आहेच पुन्हा रस्ता दुरुस्ती.. आणि आपल्या पोटाची निश्चिंती.. आणि मते मिळाल्यामुळे नगरसेवकांचे बंगल्याच्याही भिंतीही दर दिवाळीला plastic paint ने रंगतात... !!!!! राजकारण.. एखाद्या गोष्टीचे करायचे कि नाही आणि करायचेच तर किती एवढी सद्सद्विवेकबुद्धी ??? जरी आपल्या राजकारण्यांना मिळाली तरी खूप समस्या सुटतील
|
Sanurita
| |
| Wednesday, August 23, 2006 - 5:55 am: |
| 
|
अरे हे विषयन्तर नाहीच आहे. ही समस्या अनेक विषय निर्माण करते. रस्ते चान्गले नसणे,प्रदुषण..म्हणून मला असे वाटते की बस नीट करण्याची गरज आहे.त्या सी.एन.जी. वर करण्यची आहे.स्काय बस, मेट्रो ने प्रश्न सुटणार नाहीत. अनेक जण असे आहेत कि त्याना दुचाकी परवडत नाही.पण बस नाहीत म्हणून ते वापरतात. अनेकाना लाम्ब जावे लागते. त्याना गाडी चालवणे नको असते.पण त्याना पर्यायच नाहीये.शाळा कोलेजमधली मुले.सर्वानच दुचाकी वापरण्याशिवाय पर्याय नाही.यामुळेच प्रदूषण आणि खड्डे या समस्या निर्माण होत आहेत.
|
Zakki
| |
| Wednesday, August 23, 2006 - 1:14 pm: |
| 
|
हे वाचा. २३ ऑगस्टपासून ४ दिवसात खड्डे बुजवीन, नाहीतर राजीनामा देईन! पुण्याचे महापौर. ह्त्त्प्://व्व्व.एसकलओमेसकलेसकल्रिघ्त्फ़्रमे्त्म्ल अरेरे, आता विडंबनाचा एक मोठा विषय गेला! आता खड्ड्यात जा म्हंटले की लहान मुले विचारणार 'बाबा, ( Sorry, Daddy, ) खड्डा means what? काही मोठी माणसे पण संभ्रमात पडतील. खड्ड्यात जा म्हणाले, पण खड्डा कुठे शोधायचा या पुणे शहरात? म्हणजे तेव्हढ्यासाठी मुंबईत जायचे की काय? नि लवकरच भारतातल्या सगळ्याच महापौरांनी असे केले तर अमेरिकेत जाऊन खड्डा पहावा लागेल!
|
>>>> तर अमेरिकेत जाऊन खड्डा पहावा लागेल! छ्याऽऽ छ्याऽऽ छ्या! अमेरिकेत कशाला जावुन होय? जल्ला खड्डा ता बघाचा ना? मन्ग चार दिसात काय होणार हे? कावुन घोर करुन घेता तुमी समदी लोक, आमास्नी समजतच न्हाई बघा! येवढ काय ते पुण्यातल्या रस्त्यान्च्या खड्यान्च कौतुक? आख्ख्या जलमात या पुणेकरान्नी कधी खड्डे बघितलेच नाय की काय जणू? म्हणुनशान प्रशासणावर अन झालाच तर नगरशेवकान्वर तोन्डसुख घेताय ते? अवोऽऽ रस्ता हे त खड्डे असणारच की हो! ऑँ? नाही म्हणता? रस्त्याला खड्डे नस्तात म्हणता? आत्ता तुमच्या.... अवोऽऽऽ! अवोऽऽ पाटील, तुमास्नीच बोलतो हे! माझ्याशीच वाद घालुन र्हायले ना तुमी?? मन्ग? तुमच्या मते काय की रस्त्याला खड्डे नस्तात! आमी म्हणतो असतात, नव्हे नव्हे! असायलाय पायजेल, त्याबिगार रस्ता वळखु कसा येणार की त्यो रस्ता हे म्हणुन! नाही पटत? मग बसा बोम्बलत! अन जाता जाता वाईच पलिकडल्या गल्लीतली कोण हे ना ती, ती हो, हो तीच ती, तिला बघायला कोपर्यातल्या टपरीवर तासन तास ध्यान लावुन बसलेले अस्ता! नाय नाय, आपुन कायच्या काय बोलत नस्तो म्हणल, अगदी प्रुफ निशी दावुन देतो, खर हे की नाय? बोला बोला? उभे र्हाता की नाय कोपर्यावर तिच्या जायच्या यायच्या टायमाला? आन्गाक्षी! नाय मी सान्गत नाय कुणाला, तसा आपुन शब्दाला लय पक्का! तर बोलायचा काय की ते ध्यान, अब्बॉ, चुकलच की माझ, माफी असुद्या बरका, तर त्या सुन्दरीच्या चेहर्यावर मुरुमाच्या पुटकुळीन पडलेले खड्डे असतील तर रस्त्यावर का असु नयेत? का असू नयेत म्हण्तो मी? द्या उत्तर, अवोऽ द्या कीऽऽ उत्तर! का? जीभ टाळुला डकली की काऽऽय? आता ते पुटकुळ्यान्चे पौडर लावुन अर्धवट भरलेले खड्डे बघायला तुम्हाला हिथ तासनतास वाट बघत हुब र्हाता येत तर मन्ग रस्त्यावरचे थोडे खड्डे बघितलेत तर कुठ बिघडल? रस्त्यावरच्या खड्ड्यान्च कलापुर्ण नजरेने सौन्दर्य ग्रहण करणे ही देखिल तुम्ची सामाजिक जबाबदारी न्हाय काय? अन सुन्दरीच कशाला होवी? ह्यो माणसान्ना देवानी घडीवला नव्ह? मन्ग जिथ माणसान्च्या चेहर्यावर मुरुमाचे खड्डे नी पुटकुळ्या अस्तात तिथ रस्त्यावर का असु नयेत म्हण्तो मी? बोला बोला? आमी रस्ते बनिवतो, होती थोडीफार चूक माणसान्च्या हातुन, अवो जिथ देव चुकतो तिथ माणस का नाही चुकणार म्हण्तो मी? देव चुकला की नाही? असतात की नाही खड्डे चेहर्यान्वर? मुरुमाचे? देवीचे? मन्ग? आत्ता काय बोलुन र्हाता रे भो तुमी, सारख आपल खड्डे खड्डे नि खड्डे! आता काम कर्तो तो चुकतो, साम्भाळुन घ्यायच असत! देव चुकला तर तुमी जाता कावो त्याला जाब विच्चारायला? जाता? न्हाय ना? मन्ग आमालाच का वेठीला धरुन नस्ता कान्गावा करुन र्हायले तुमी? तर ते खड्डे बिड्डे विसरा राव, चान्गली शिकली सवरलेली सुसिक्षित लोक तुमी, तुमाला शोभत का हे अस रस्त्यावर उतरण? आता पुन्ह्यान्दा खड्ड्याचा विषय नाय निघाला पायजेल, काय? न्हाय म्हणुनच दाखवा, मन्ग बघा, कोपर्यावर कशे थाम्बता तेच बघतो! ..... प्रहसन की काय ते अजुन अपुर्ण 
|
Drabhi04
| |
| Thursday, August 24, 2006 - 6:15 am: |
| 
|
punekar traffic sense mhnaJE MOTHA JOKE AHE red signal la thambne mhnaje punekarna APMAN vatate konhi vicharle tar tyachishe bhnadan karne mhnjae janmasiddha hakkach ahe..... tyana sushikshit G****V MHNAVAE KA?
|
Zakki
| |
| Thursday, August 24, 2006 - 12:16 pm: |
| 
|
ड्राभि०४, हे फक्त पुण्यातच नाही तर इतर शहरातहि होते. तर पुणेकर वाद विवादाच्या नियमांनुसार, 'सगळेच असे करतात, मग फक्त पुण्यालाच का दोष देता? तुम्ही ना, फारच बाई वाईट' असा मुद्दा निघतो. (तुमचा मुख्य मुद्दा गेला खड्ड्यात!)
|
Jaaaswand
| |
| Thursday, August 24, 2006 - 12:43 pm: |
| 
|
हा हा हा परत पुणेकर वि. इतर हा वाद सुरू वाटते !!!
|
Moodi
| |
| Thursday, August 24, 2006 - 12:49 pm: |
| 
|
ए या नागपूरकरांना पकडुन झुमरीतल्लैय्या मध्ये पाठवा रे, नुसते नावे ठेवतात दुसर्यांना. छे! काय बाई वाईट सवय असते एकेकांना. ~DDD  
|
पुणेकर ईतर बाबतीत परफेक्ट असतात जसे दुपारी दुकान बंद करणे, देशस्थांना शिव्या देने, जेवन तयार करायचा आधी किती खाशील असे विचारुन तेवढेच करने, जिवाला सामोसा खाणे, लग्नाच्या जेवणात पाहुन्यांना उपाशी ठेवने, माझेच फक्त खरे बाकी सर्व मुर्ख असे बेंबीच्या देठापासुन ओरडने, वैगरे वैगरे. मग ईतक्या सर्व गोष्टी शिस्तीत करन्याची सवय असताना फक्त रस्तावरिल वाहतुक नावाची शुल्लक गोष्ट का शिस्तीत करत नसावेत बरे?
|
Jaaaswand
| |
| Thursday, August 24, 2006 - 4:07 pm: |
| 
|
केदार तू फ़ारच गंभीर आरोप केले आहेस त्यातले बहुतेक मला ( पुणेकर म्हणून ) मान्य नाहीत आणि इथे एक प्रादेशीक युद्ध होण्याची शक्यता आहे !!!
|
Zakki
| |
| Thursday, August 24, 2006 - 4:29 pm: |
| 
|
जास्वंदा अरे घाबरू नकोस. इस्राइल अरब लोकांच्या युद्धांपेक्षा जास्त युद्धे या विषयावर झाली आहेत इथे. करणार काय, पुणेकरांना चिडवल्याशिवाय जेवण गोड लागत नाही! शिवाय तुझ्यासारखे नव्या रक्ताचे लोक येतच असतात! भांडायला!
|
Zakki
| |
| Thursday, August 24, 2006 - 4:33 pm: |
| 
|
तर आत्तापर्यंत किती खड्डे बुजवून झाले? कुणि मोजताहेत का? उगाच obvious गोष्टींवर चर्चा करण्यापेक्षा, काही विधायक कार्य करा! खरे पुणेकर सोडा, (ते नुसते चर्चा करत बसणार) पण कुणि मुंबईहून जाऊन या कामाची प्रगति कशी होते आहे, याची माहिति द्याल का?
|
Moodi
| |
| Thursday, August 24, 2006 - 4:45 pm: |
| 
|
कोण रे ते आमच्या पुण्याला नावे ठेवतय खड्ड्यांबाबत? हे बघा हे बघा आधी.( नागपूरकरांनी तर आधी बघावे म्हणजे पुण्यात शिकायला येण्या ऐवजी ते नागपूरात राहुनच प्रगती करतील.) http://www.esakal.com/esakal/08242006/NT00CB95C2.htm http://www.esakal.com/esakal/08242006/NT00CB964E.htm आणि मुंबईकरांचे काय काम इथे? त्यांनी पुण्याला नावे ठेवण्या ऐवजी मिठी नदीला पडलेली प्लॅस्टीकचे मिठी, बेकायदा झोपडपट्टी, परप्रांतियांचा विळखा, नद्या, समुद्र, तलाव, उशिरा किंवा लवकर येणार्या लोकल्स यावर चर्चा करावी. नव्हे मोहीमच राबवावी. मुंबई बघ्घा अशी साफ होईल( आधीच केलीय परप्रांतियांनी). 
|
Maitreyee
| |
| Thursday, August 24, 2006 - 4:56 pm: |
| 
|
ए ए चला तिकडे एक बीबी दिलाय ना तुम्हाला तिकडे करा असल्या पुणेकर यव अन त्यव च्या फ़ालतू गप्पा! उगीच आपलं ज्या त्या बीबी वर काये 
|
जास्वंद अरे मी पण अर्धा पुणेकरच आहे. (शिक्षण, कर्मभूमी ई.) पण जेव्हा मी पुण्यात असतो तेव्हा सिग्नल वर गाडी थांबवतो. (मग लोक असे की बघतात काय बावळट माणूस आहे हा. नशीब लगेच म्हणत नाही क्या अलिबाग से आयेला है क्या म्हणून.) च्यायला आमचा मराठवाडा बरा. थोडाफार जो रस्ता आहे त्यावर खड्डे तरी नाहीत.
|
Zakki
| |
| Thursday, August 24, 2006 - 9:56 pm: |
| 
|
खड्ड्यांचा प्रश्न अनुत्तरितच आहे. काय प्रगति झाली आत्तापर्यंत? चारपैकी दोन दिवस तर गेले. म्हणजे अर्धे काम संपायला पाहिजे. अर्धे पैसे तरी संपले का? project manager कोण आहे? दैनंदिन अहवाल प्रसिद्ध करायला हवा. जरा Power point वापरून, निरनिराळ्या प्रकारचे रंगित आलेख, जमल्यास थोडे Animation असे सगळे साग्रसंगीत व्हायला पाहिजे. त्यासाठी कुणाला कंत्राट दिले आहे? कितीतरी प्रश्न, खास पुण्यातल्या खड्ड्यांबद्दलचे म्हणून इथे विचारतो.
|
Sanurita
| |
| Friday, August 25, 2006 - 6:06 am: |
| 
|
अरे मूळ विषय बाजूलाच राहीला..आपण येथे सार्वजनिक वाहतूकी विषयी चर्चा करत आहोत.
|
केदारेश्वरा, अर्धा पुणेकर वगैरे अशी काही भानगड पुण्यात नसते. एक तर न-पुणेकर किंवा १०० टक्के पुणेकर. (हन्ड्रेड पर्सेन्ट पेस्तनकाकासारखे..)त्यातले काही नर्मदेतले गोटे पुण्यात राहून कोरडेठाक ते कोरडेठाक राहतातच... दुसरे असे पुण्यातील रस्ते हे माझ्या तीर्थरूपांची वडीलार्जीत प्राॅपर्टी आहे हे प्रत्येक अट्टल पुणेकराचा समज असतो त्यामुळे मी त्यावर कसाही धावेल अशी त्याची भूमिका असते... (एक सायंकालीन किस्सा नं१-- सेनापती बापट आपले वडील काय? न.२ नाही, का बुवा? न.१-- नाही म्हणजे हा सेनापती बापट रस्ता आहे. आपण आपल्या बापाचा रस्ता असल्यासारखे हा रस्ता अडवून उभे आहात म्हणून विचारलं!!!!) तसेच तुझ्या झालेल्या चुका-- पुणेकर दुकान बन्द करीत नाहीत.ते अधून मधून ग्राहकाना दर्शन देण्यासाठी ते उघडतात. शिव्या देण्याबाबत ते फक्त देशस्थावरच अन्याय करत नाहीत. किती खाशील हे विचारूनही ते जेवण तयार करतात ही माहीती चुकीची आहे... म्हनजे'करतात' हे चूक आहे. जगातील प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. एक बाजू पुणेकराची असते अन दुसरी बाजू चुकीची असते...
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|