|
Rohinip
| |
| Thursday, August 17, 2006 - 7:11 pm: |
| 
|
I have been ROM maayboli user for long time. This is the first time I am writing and truly it is good site for many occasions, knowledge sharing etc. I have one question and been thinking for long time if I should post here or not. I have little fear that some people out here may not respond with sensitivity or misinterpret. But I am going ahead and posting it and looking for good suggestion/guidance. --------------------------------- I am talking to the boy and he seems ok. His family is not so open-minded in terms of their certain viewpoints I feel so as I haven’t met in person but there were certain incidences I felt their outlook is little different. They believe caste, creed and usual stuff. Boy is good-natured so I thought of going ahead. But one thing is eating me up that before I go ahead, should I tell that my one sister is divorcee and staying with my parents?? The boy and I are of opinion that we should never hide anything when we enter in marriage. Many times boy curiously inquired about my sis and her husband. But I avoided. Now I am very serious about this guy and for some reason this guy keeps on saying that we should be open about everything. I really want to disclose this news with him but I feared how he might react. As I think his family is little orthodox and believes in “marriage is made in heaven” and they might hold girl and her family responsible for nothing. And his family “seems to be” of opinion/viewpoint that they wouldn’t marry of their son to a girl whose sister is divorcee. His family may fear their thousands of relatives or for false status, his father might feel that marrying his son to a girl whose sister is divorcee is status issue. My sister was innocent divorcee with kid. Her husband having ex-marital affair cheated her. And my family went through hell when this shock happened to her, so we prefer to keep it ourselves about her status. All I learnt during this phase that however the society or so-called people/relative/friends are educated or social or seemed nice, my family went through hell by their talks, taunts, torture and unwanted sympathy of no use for any reason. We broke off all crooked relatives/family friends ties, as they were more pain than being nice during this period to my parents. My sister was humiliated for no reason. Her kid was asked non-sense questions about her father and this treatment was given by high-class society where I was raised. I am mentioning here the society not to show-off but the same educated, so-called social people harassed us by enquiring non-sense questions. With this incidence, I avoid further humiliation of my sister by not talking or telling to anybody about her marital status. My pain is my pain. But today I am writing here as I can’t ask my mom or dad or sister herself, as I feel painful but thought this anonymity might help. And sensible people out here help me in right direction. Now with my guy, situation is reverse, he believes in relatives, he is also curious about why I don’t talk of relatives so frequent?? He also inquired many times to me about my brother-in-law. He has of opinion that relatives are helpful etc. but what I see his relatives are more nuisance as my parents met them, they created some issue about how marriage should be etc. Now my fear is, 1) How to break this topic after so many days knowing each other while communicating for marriage purpose for 4 months? 2) How will he react to this news thinking that what background he comes from? (I really don’t know his reaction on this front as I never discussed any such issues with him) 3) How his family would react to it? (I really like this guy now and thinking of going ahead but fear his family might force him to break up, though guy also says that he likes me a lot and wants to go ahead but might feel upset that I hid this news for so long. He generally believes in speaking upfront, so I gave many times hint with the intention to speak on this topic that I take little while if there is a pain associated with my memories or any information, to that he said if you love me and believe me, you wont hide it. Many times I argued that please don’t look at the things that I “hid” or “lied” but it is just that I feel pain to talk about certain things. But he disapproved so this gave me more fear that he might feel I lied to him and does not agree that people may tell any small lies NOT with the intention to cheat but to stop un-avoided circumstances Or fear of being misinterpreted by listener). 4) I have been disturbed, as I really want to tell him and know his decision. I am sad too what if he breaks up or miss-understands me? I also don’t want that if he does not want to go ahead after knowing this truth, unnecessary my sister would get humiliated and hurt that I disclosed to unknown person who did not marry me. Same guy might tell to 10 different people. I only know what my family went through when they came to know about my sister. They were non-sense curious and would ask stupid questions and won’t realize that it is hurting for a parent to see their daughter’s home broke with one kid. 5) One last thing our society is still won’t accept such innocent people however they are educated or social. Please help me with serious responses.
|
Arch
| |
| Thursday, August 17, 2006 - 7:50 pm: |
| 
|
रोहिणी, त्याला हे कधितरी कळणारच. त्यामुळे तू सांगितलेल जास्त योग्य. ह्यात लपवून ठेवण्यासारख काही नाही. He should not be judging you with what happened with your sister, no matter whose fault it is. आणि तो जर तुझ्याकडे बघून लग्न करणार नसेल तर पुढे तुला तो इतर कुणाच्या वागण्यावरून किंवा चुकांवरून कशावरून जबाबदार धरणार नाही? relationship should start and build on trust
|
Mrinmayee
| |
| Thursday, August 17, 2006 - 8:21 pm: |
| 
|
रोहीणी, तुझं पोस्ट वाचलं. इथे बरेच लोक खूप वेगवेगळे सल्ले देतील. काही अत्यंत प्रामाणिकपणे (ही संख्या जास्त) तर काही जण उगीच काहीतरी लिहून जातील. सगळ्यात पहिले तर हे सांग स्वत:ला की "हे सगळे सल्ले आहेत. शेवटी निर्णय माझाच असणार!" family background मधला असणारा फरक, मग तो कुठल्याही प्रकारचा असो, अश्या परीस्थीतीत बरेच प्रश्ण उभे करतो. पण शेवटी आयुष्य जर तुम्हा दोघांन एकत्र काढायचं असेल तर तुला या मुलाला आधी विश्वासात घेणं आवश्यक आहे असं नाही का तुला वाटंत? जे काय तुझ्या बहीणीच्या आयुष्यात घडलं ते खरंच दुर्दैव! पण त्यात तिचा काय दोष? हे जर तुला कळतय तर त्याला पटवून देताना का ईतकी अडचण? तुझं arranged marriage असतं तरी तुझ्या घरच्यांना हे तर सांगावच लागलं असतं! आजवर टाळंत आलेला विषय आणखी टाळण्यापेक्षा त्याच्यासमोर तु स्पष्टपणे हे सांगायला हवं. त्याचबरोबर नातेवाईकांचा मुद्दा पण. शेवटी कठीण परिस्थीतच आपल्या माणसांची ओळख होते. तुमचे नातेवाईक खरंच 'आपले' म्हणवायला अपात्र ठरले. पण त्यामुळे तुम्ही एकमेकांसाठी अयोग्य तर ठरंत नाही. कारण या दोन गोष्टींचा तसा परस्पर काही संबंध नाही. हे सगळं सांगीतल्यावर त्याची प्रतिक्रिया ही तर खरी कसोटी! तुझं दु:ख समजून जर त्याच्याकडून धीर आणि 'सगळं ठीक होईल' हे अश्वासन तुला मिळलं आणि तो तुझ्यावतीनं त्याच्या कुटुंबीयांना हे समजाऊ शकला तरच पुढचा तुमचा एकत्र प्रवास सुखरूप आणि आनंदानं होऊ शकतो. नाही तर न समजून घेणारी व्यक्ती खरंच आपली साथीदार असावी का ही बाब विचार करण्यासारखी पण नाही. कारण उत्तर नकारात्मकच असणार! समाज तर सगळ्या बाजुंनी बोलतो.पण त्याला हे सगळं सांगून आपला भार हलका करून, त्याची साथ मिळाली तर याच बोलणार्या लोकांची तोंड तुम्ही गप्प करु शकाल, एकत्र येऊन! Good luck for your future. !!
|
A_sayalee
| |
| Thursday, August 17, 2006 - 8:40 pm: |
| 
|
माफ़ कर रोहिणी पण मला नक्की एवढा पेच का आहे तेच समजलं नाहिये. divorcee असणं ह्यात लाजीरवाणं काय आहे अथवा असावं? तेहि आजकालच्या काळात? लपवण्याचा प्रयत्न करून तू त्याच्या मनात शन्का-कुशंका निर्माण होउ देत आहेस.
|
Maitreyee
| |
| Thursday, August 17, 2006 - 8:42 pm: |
| 
|
मलाही तसेच वाटते! तू त्याला नीट समजावून सांग काय घडले ते. खरे तर हे वाचून मला तरी असे वाटले की यात तुझी तर नाहीच पण बहिणीची पण काही चूक नव्हती, मग घाबरायचे कशाला! त्याची reaction काय यावरून तुला सुद्धा संधी मिळेल तो खरोखर कसा आहे हे जाणून घेण्याची! त्याने या कारणावरून नाते तोडले तर तो लायक नव्हताच असे समज!
|
Kiran
| |
| Friday, August 18, 2006 - 3:26 am: |
| 
|
तुझा प्रश्ण व इतरांच्या posts चांगल्या आहेत. माझेही २ शब्द!! अगदी खरे आहे. ही तुझ्या भावी नवर्याला ओळखायची संधीच समज. तू जर त्याच्या बाबतीत serious असशील तर लग्नाच्या अगोदर त्याला सर्व गोष्टी सांगणे गरजेचे आहे. ह्याने बर्याच गोष्टी साध्य होतील. त्याचे विचार आणि ह्यावरील मत कळेल ह्यावरुन त्याची विचारसरणी आधुनीक आहे कि तू म्हणतेस त्याप्रमाणे त्याच्या घरच्यांप्रमाणे आहे. ( btw त्याच्या घरचे जुन्या विचारांची आहेत हा तुझा फ़क्त तर्क आहे की काही प्रसन्ग ही घडले आहेत?) नातेवाईकान्शी चान्गले सम्बन्ध असणे ही त्याची अपेक्षा चुकीची नक्कीच नाही कारण त्याला पार्श्वभूमी माहीत नाही. एक लक्षात ठेव, हे सांगताना तुला अपराधी वाटुन घ्यायचे काहीच कारण नाही. पुढचे पाऊल उचलण्याअगोदर आधीचे पाउल स्थिर झालेच पाहिजे. कदाचीत बोलताना नाही ते बोलले जाईल किंवा चुकीचा अर्थ काधला जाण्याची शक्यता वाटत असेल तर एका कागदावर मुद्देसुद लिहुन काढ आणि त्याला समक्ष वाचायला दे. किंवा अगदी वरील मजकूर थोडा बदल करून प्रिन्ट करून दिलास तरी चालेल. त्यला पुर्ण माहिती दिल्यानन्तरही जर त्याची प्रतिक्रिया तुच्छतेची किंवा नकारात्मक असेल तर त्याचा विचार तिथेच थाम्बव. तो तुझ्या योग्यतेचा नाही असे समज. फक्त तो तुला आत्तापर्यन्त का सान्गित्ले नाहीस असे विचारु शकतो? त्याचे तुमच्या relations प्रमाणे उत्तर तयार ठेव. त्याच्या सर्व valid प्रश्नांची योग्य उत्तरे दे. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे +ve attitude ठेव. तो आणखी १० जणांना सांगेल ह्याची मुळीसुढ्दा काळजी करु नकोस.
|
Chiku
| |
| Friday, August 18, 2006 - 9:40 pm: |
| 
|
रोहिणी मलाही असे वाटते की तु त्याला सर्व सत्य परिस्थिती सांगावीस. आज जरी तु त्याला तुझ्या बहीणीबद्दल सांगीतले नाहिस तरी केव्हा तरी त्याला ते कळणारच. शिवाय जे झाले त्यात तुझ्या बहिणीचा, तुझा आणी तुझ्या आई-वडिलांचा काहिच दोष नाही. मग आत्ता लपवुन ठेवुन नंतर सर्वांना त्रास होण्यापेक्शा खरे सांगुन सर्वांच्या विश्वासाने तुझ्या भावी संसाराची सुरवात होणे चांगले नाही का? आधी तु त्याच्याशी मोकळेपणाने बोलुन घे. त्याचा कल बघुन, जर तो यात तुला साथ द्यायला तयार असेल तर तुझे व त्याचे आईवडिलपण बोलु शकतात. तुझ्या आई-वडिलांचे तुझ्या बहिणीबद्दलचे पुढचे plans काय आहेत, तिची किती जबाबदारी तुझ्यावर रहाणार आहे किंवा नाही तुम्हाला तुझ्या भावी सासरकडुन तिच्यासाठी कोठली मदत लागणार आहे का? हे सर्व मुद्दे त्यांच्याशी बोलुन स्पष्ट केले कि त्यांनाही सर्व समजुन घेणे सोपे जाईल. तुझे त्याच्याशी लग्न झाले की अजुन एक कुटुंब तुमच्याशी जोडले जाणार आहे त्यामुळे त्यांची साथ असणेही महत्वाचे आहे.
|
Shonoo
| |
| Saturday, August 19, 2006 - 8:24 pm: |
| 
|
अगं त्याची बहीण जर घटस्फोटिता असेल तर तुला, तुझ्या घरच्यांना काय वाटेल? त्याने त्याच्या कुटुम्बीयांबद्दल असंच काही तुझ्यापासून लपवून ठेवलं तर तुला काय वाटेल? तुझी, तुझ्या घरच्यांची तयारी असेल का एखाद्या घटस्फोटित मुलीच्या भावाशी लग्न करण्याची? तुझ्या प्रश्नाचं उत्तर तूच शोधायला हवं
|
Dineshvs
| |
| Sunday, August 20, 2006 - 12:59 pm: |
| 
|
माझ्या भावाने अगदी जाणुनबुजुन, घटस्फोटित स्त्रीशी विवाह केला. मी त्यावेळी त्याच्या बाजुने खंबीरपणे उभा राहिलो. या विवाहाने मला मायेची वहिनी मिळाली, गेली २० वर्षे ते सुखाने संसार करत आहेत. आणि अजुनहि याबाबतीत धीटपणा नाही ? वाईट वाटले !
|
Ajjuka
| |
| Sunday, August 20, 2006 - 5:13 pm: |
| 
|
होना आणि दिनेश इथे घटस्फोटीता वधू नाही तिची बहीण आहे तरीही.. मला तर वाटतं तू सरळ सांगून टाकावस कारण लपवण्यासारखं यात काही नाही. फक्त सांगितल्यावर जर त्या लोकांनी गहजब मांडला तर खंबीर रहा कारण इतक्या irrlevent कारणावरून जर ते स्थळ नाकारणार असतील तर ते स्थळ किंवा तो मुलगा तुझ्या योग्यतेचा नाही हे नक्की.. थोडा त्रास होईल पण its all worth it !
|
Amanjot
| |
| Monday, August 21, 2006 - 7:49 am: |
| 
|
रोहिनि, तुला कसलि कालजि आहे ति कलतेय... तो काय म्हनेल यापेक्शा तो तुला सोदुन जाइल याचि तुला कालजि आहे.. खर आहे माझेहि मत इतरान्सारखेच आहे... तु त्याला समजावुन सान्ग... तो तुला समजावुन घेउ शकला तरच तो तुझा चान्गला जिवनसाथि होउ शकतो... आजच्या कालात तु सान्गतेस तशि परिस्थिति अनेक जनान्च्या बाबतित घदते... कमि अधिक प्रमानात... जस तु इतरना सान्गायला घाबरत आहेस तसच इतर जन सान्गत नाहित.. म्हनुन आपल्याला महित नसत... आनि आपलि चुक नसेल तर घाबरयच कशाला.. Go Ahead... Tell him the truth.. and your fear also... He will understand you.. Be positive... ALL THE BEST!!! We are waiting for Good News from u... Don't wait for long now... once again All The Best...
|
Dineshvs
| |
| Monday, August 21, 2006 - 4:32 pm: |
| 
|
अज्जुका, तेच तर म्हणतोय मी, कि जर त्या मुलीच्या कुटुंबियानीच न्युनगंड ठेवला, तर तिला काय वाटेल ? अगदी एक अपघात म्हणुन हे सगळे विसरुन, अगदी सामान्य वागले पाहिजे. आणि त्या घराशी संबंध जोडणार्या व्यक्तीने देखील हाच दृष्टिकोन ठेवला पाहिजे.
|
Arch
| |
| Monday, August 21, 2006 - 6:12 pm: |
| 
|
जाणून बुजून काय शब्द आहे न? जाणून म्हणजे समजून आणि बुजून म्हणजे घाबरून. खर तर जाणून बुजूनचा स्वैर अर्थ घेतला तर न घाबरता, मुद्दामहून होतो. जाऊ दे. उगाचच विषयांतर झाल आहे. बर का मिलिंदा, दिनेशनी वाचल्यावर मी काढून टाकीन.
|
Zakki
| |
| Tuesday, August 22, 2006 - 12:17 am: |
| 
|
म्हणजे आपण सगळे जसे आरक्षण, वंदे मातरम् न म्हणणे, हुसेनची चित्रे हे सर्व होऊ देतो तसे. आपण 'जाणतो' पण तसेच 'बुजतो', की मते मिळणार नाहीत. मग मान्य करा काऽहीहि! अगदी 'जाणून बुजून'!!
|
Rohinip
| |
| Tuesday, August 22, 2006 - 4:57 am: |
| 
|
hi , I did speak with the guy this weekend. He was upset, little taken a back. He did ask the valid questions and I gave genuine answers. as usual, why didnt I tell then in first place? my answer was genuine that I waited for the right time and really wanted to know a person who can understand my situation and pain. because evey time when I spoke upfront to the proposal boys, they knew that they are unconfortable but asked invalid and painful questions , in a way felt humilated or in some cases put forward parents reasons. though I never expected that they should marry me while being uncomfortable or their parents not being happy. to avoid this humilation, i waited. It still pains the memories of sister badly to speak about. this guy did say I would upfront n etc etc. I jsut told him one thing that one has to go through the pain , I would do this, that can say anybody but when you go thorugh the pain or see your someone close tears, this wont come easy, secondly,he said his parents may not be comfortable. but its ok with him. and if his parents say NO then he cant do anything about it. I was hurt. I have questions, 1) can I convince this guy why he cant explain the real situation to his parents? 2) does he feel suspicious?(as he said if anything is hidden for long time means it is a lie. where as I explained the same thing wrote above about keeping it myself till now has genuine reasons). 3) what do you think, is guy telling me the truth that he does not have problem but he cant go ahead to marry if his parents has? this question I am asking because he is the same guy who told me always that all that matters is me, and no one else. he jsut loves me and wants to marry me. so why this hypocrisy? please understand people out here, I am NOT forcing him but wonder where does this so called claims of love and being very social goes ? Please suggest how do I handle this? It is very painful to see we might break away? should I convince him ? thanks
|
Manuswini
| |
| Tuesday, August 22, 2006 - 5:19 am: |
| 
|
शूनू, तुझे हे प्रश्ण मला पटले नाही, रागवु नकोस, पण dovorce ह्याची कारणे genuine आहेत आणी जर मुलाला रोहिनिवर विशवास असेल आणी तो जर family ला भेटला असेल तर ह्याच्यात काहीच वाईट नाही. रोहिणीने लिहिले आहे त्यावरुन वाटते की काही वेळा नको तिथे नको त्या लोकांना आधीच का सांगावे? आणी humilation घ्या? शूनू मुलगा मुलिच्या घरी जात नाहे लग्न करुन... तेव्हा मुलाची बहिण dovorcee असली वा नसली तरी एखाडी मुलिची बहिण जर dovorcee असेल तर त्याला काहीच फरक नसतो जर divorce मगे genuine कारण होते. divorcee बहिणीची जबाबदारी जेवढी भावावर असते तेवधी मला नाही वाटत ती बहिणीवर असेल. रोहिणी आहे का अशी situation
|
Dineshvs
| |
| Tuesday, August 22, 2006 - 8:12 am: |
| 
|
सॉरी, आर्च, जाणुनबुजुन ला असाहि अर्थ असेल हे मला माहित नव्हते. मला वाटत होते कि कुठल्याहि प्रकारे. कदाचित " जाणीवपुर्वक " हा शब्द जास्त योग्य ठरला असता. २० वर्षांपुर्वी केलेले ते धाडस मला आजहि अभिमानास्पद वाटतेय. पण माझे ईथले विचार पटत नसतील, तर माझेहि सगळेच पोस्ट उडवुन टाकले तरी चालतील. एरवीहि मी मुद्दामच V & C वर येत नाही.
|
Maitreyee
| |
| Tuesday, August 22, 2006 - 12:18 pm: |
| 
|
जाणून बुजून हा शब्द प्रयोग मला वाटते हिन्दीतील जान बूझ के यावरून आला असावा. बुजून चा अर्थ घबरून असा जो मराठीत आहे त्याचा इथे संबन्ध नाहिय बहुधा cbdg रोहिणी, sorry , पण त्या मुलाची प्रतिक्रिया वाचून सखेद आश्चर्य वाटले. ज्या व्यक्तीला अयुष्याचा जोडीदार म्हणून निवडलय तिने केवळ माझी बहीण घटस्फ़ोटित आहे हे सांगितल्यावर यात एवढं react करण्यासारखं काय हे मला विचार करूनही कळलं नाहिये!
|
Yogibear
| |
| Tuesday, August 22, 2006 - 1:19 pm: |
| 
|
Rohinip: Let him absorb the information, give him some time. Don't attempt to convince or justify your side, rather just be who you are. After some time, the dust will settle and then you both can have a good matured conversation. Good Luck!
|
Storvi
| |
| Tuesday, August 22, 2006 - 3:24 pm: |
| 
|
जर त्याला आई-वडीलांच्या मर्जी विरुद्ध जायचं नसेल तर हे नातं इथेच तुटलेलं बरं.. convince करून लग्न तर होईल नंतरचा मनःस्ताप पण भोगावा लागेल.. आणि ही तर सुरुवात आहे. जर ह्या ठिकाणी त्या मुलाला स्वतःचे मत नसेल तर पुढच्या आयुष्यात कल्याणच आहे...
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|