|
>>>> याआधी घडलेली अनेक उदाहरणेही पहा. BB कशामुळे बंद होतात तेही पहा. >>>> कळतेच आहे लोकांना सगळे. मलाही कळवत आहेत लोकं. अहो तुम्हाला कळवुन नि तुम्हाला कळुन काय उपयोग? मॉड्स किन्वा ऍडमिनला कळवायला हव ना? आता हातासरशी तुम्हीपण फिडबॅक देवुन टाका ना राव! DDD
|
इथे कुठेतरी इतिहासाचा उल्लेख झाला.. पश्चिम बंगालच्या राजनैतिक इतिहासावर.. बंगालच्याच वृत्तपत्राचा त्यांना " घरचा आहेर " History is just not on the communists’ side
|
Moodi
| |
| Monday, July 17, 2006 - 10:04 am: |
| 
|
लालभाई इथे कुठला बीबी बंद पडावा असे कुणालाच वाटत नाही, फक्त होते काय की प्रत्येकाची पक्षनिष्ठा, मते ही वेगळी असल्याने ह्या बीबीची पण लोकसभा होतेय. प्रत्येकाचा मुद्दा हा त्याच्या नजरेतुन वेगळा असल्याने हे वाद होणारच. म्हणून म्हटले की वेगळा बीबी असावा. 
|
Zakki
| |
| Monday, July 17, 2006 - 12:19 pm: |
| 
|
मूडीताई, खरे आहे हो तुमचे. पटते मला नि इथल्या सर्व भारतीयांना. पण अमेरिका फक्त स्वत:च्या (वाचा: बुशच्या, रमीच्या, काँडीच्या, ) मनाला काय वाटेल ते करते. जगात कुणालाहि त्यांना विरोध करण्याचे आर्थिक, लष्करी सामर्थ्य नाही. भारताबद्दल काही अमेरिकनांचे इतके वाईट मत आहे, अमेरिकेत सुद्धा भारतात काही वाईट झाल्याचे वाटत नाही. ही सत्य परिस्थिती आहे. वाईट आहे, पण खरे आहे. आता भारतीयच काय, जगातले सगळेच लोक मात्र अधिकाधिक संख्येने अमेरिकेत येऊ इच्छितात. बर्याच लोकांची जी समजूत आहे की भारतीय अमेरिकेतून, इंग्लंडमधून बाहेर पडले तर त्या देशांची परिस्थिति बिघडेल, ती तितकीशी खरी नाही. अमेरिकेत इतर काही लोक आहेत, जे भारतीयांपेक्षा हुषार, कर्तबगार आहेत. भारतातल्यासारखेच ते लोक राजकारणात येत नाहीत. शिवाय किती भारतीय आता अमेरिका किंवा इंग्लंड सोडून जातील? अनेकांनी इथल्या लोकांशी लग्ने केली आहेत, ते? जे इथल्या लोकांबरोबर गेली तीस वर्षे राहिले, वाढले, ते? आता भारतात तरी या लोकांबद्दल कुणाचे मत चांगले उरले आहे? (अर्थात्, भारतीयांचे हि बरोबर आहे). तर सत्य परिस्थिती ही अशी असते. भावनेच्या भरात आपण काही लिहून जातो, पण खरे पाहिले तर या प्रश्नांची उत्तरे सोपी नाहीत. ब्रम्ह सत्यं जगन्मिथ्या! हटकेश्वर, हटकेश्वर!
|
Moodi
| |
| Monday, July 17, 2006 - 12:34 pm: |
| 
|
झक्की तुम्हाला किती उपरोधीक बोलायचे ते बोला. मला अमेरीकेतल्या भारतीयांबद्दल काहीही म्हणायचे नाही. अन मी काही त्यांच्याबद्दल म्हटलेले पण नाही. भारतीय जगात कुठेही जावोत, पण त्यांच्या मातृभूमीप्रती भावना ह्या मायदेशातील भारतीयांसारख्याच असतात. मी कुणालाही, अगदी तुम्हालाही अमेरीका सोडुन जा असे म्हणत नाही अन म्हणणारही नाही. पण वारंवार जे तुम्ही भारत असा भ्रष्टाचारी, भारतातील लोक लबाड, अप्रामाणीक, भारतातील कायदा असा( कोर्टाचा अपमान करु नये म्हणतात, कायदेविषयक लढाई आपण चांगला वकिल नेमून लढु शकतो.) प्रत्येक पोस्टमध्ये उल्लेख करता, त्यालाच माझा आक्षेप आहे. माझा आक्षेप आहे तो बुश प्रशासनाच्या ह्या धोकादायक कार्यपद्धतीला( माझ्या मताला बुश काय विचारणार? पण जसे तुम्ही अमेरीकेबद्दल भावनाप्रधान होऊन लिहीता ना तसेच मी पण भारताबद्दल तितक्याच भावनेने लिहीते.). जर 9/11 नंतरही बुश प्रशासन पाकीस्तानला जो पाठिंबा द्यायला तयार होतय त्याची कडू फळे भारतीयांनाच भोगायला लागत आहेत. तुम्हाला अमेरीकेची बाजू घ्यायची घ्या, मी भारताची बाजू घेणारच. भारतीयांना भ्रष्टाचारी म्हटल्याने अमेरीकेची काळी कृत्ये कधीच कमी होणार नाहीत.
|
Laalbhai
| |
| Monday, July 17, 2006 - 2:42 pm: |
| 
|
प्रत्येकाची पक्षनिष्ठा, मला तर इथे काही व्यक्तींचा फक्त इतर पक्षांबद्दलचा द्वेष दिसतो आहे. आणि तो व्यक्त करताना काळ, वेळेचेही भान दिसत नाही. That's what I guess some people said, that they get irritated with such kind of untimely arguments! These guys are really irritating.. will never improve. तारस्वरात बोललो की आपण बोलतो ते सत्य होत नाही, हे शेंबड्या पोराला पण कळते पण या महाभगांना कळत नाही. असो. स्वतःची चड्डी फाटकी आहे, त्यामुळे झाकायचे ते उघडे पडले आहे. पण तिकडे लक्ष न देता, दुसर्याच्या कपड्यांवरची ठिगळे शोधण्यातच काय धन्यता मानली जाते, या लोकांकडून, काय कळत नाही...
|
Laalbhai
| |
| Monday, July 17, 2006 - 11:16 pm: |
| 
|
Now look at it.... http://210.210.17.73/esakal/07182006/NT00B11B42.htm भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारने या अतिरेक्यांना नऊशे कोटी दिल्याचा आरोप कॉंग्रेसचे प्रवक्ते सत्यव्रत चतुर्वेदी यांनी केला. ""अतिरेकी याच पैशातून भारतविरोधी कारवाया करीत आहेत. मुंबईतील स्फोटांसाठीही हाच पैसा वापरला गेला असावा,'' असा आरोप त्यांनी केला. ते म्हणाले, ""अतिरेक्यांना खंडणी दिली किंवा नाही याबाबत श्री. जसवंतसिंह यांनी मौन पाळले आहे. त्यामुळेच खंडणी दिली असावी, या संशयाला बळकटी येते. तत्कालीन पंतप्रधान वाजपेयी व अन्य वरिष्ठ नेत्यांनी स्पष्टीकरण द्यावे. अन्यथा श्री. जसवंतसिंह यांच्या पुस्तकातील माहिती खरी असल्याचे मानावे लागेल.'' ही माहिती असत्य असल्यास श्री. जसवंतसिंह यांना भाजपतून काढण्याची मागणीही त्यांनी केली.
|
श्रीयुत झक्की जसे हिन्जवडीत चॉकलेट वाटुन कॉलर ताठ करायचा प्रयत्न करित होते तसेच बहुदा चॉकलेट्स वाटुन तेव्हाच्या अपर्हुतान्ची सुटका झाली असावी असे समजण्यायेवढी भारतीय सामान्य जनता मूर्ख हे असा समज बहुदा या कॉन्ग्रेस प्रवक्त्याचा झाला असावा त्यामुळे अपर्हुतान्च्या बदल्यात काय सौदा झाला असावा याचे हीन दर्जाचे राजकारण वैचारीक पाचपोच नसलेली कॉन्ग्रेस लालभाईन्च्या साथीने करीत हे असे आम्ही म्हणल्यास वावगे ठरेल का? (झक्कीन्चा उल्लेख असाच, त्यान्नि वाटलेली चॉकलेट्स अजुनही हिन्जवडीकरान्च्या आठवणीत हेत) आख्ख्या कोलकता आणि बन्गाल मधे तेथिल डॉक्टर्स अपहरण व खण्डणी मागणार्या गुन्हेगारान्मुळे बेजार झाले असताना, दहशतीखाली वावरत असताना तेव्हाच्या अपर्हुतान्च्या सुटकेसाठी "किती कोटी रुपये" दिले वगैरे आकडे फोडुन लोकान्च्या कोणत्या नसा हे छेडु पहात आहेत त्यान्चे त्यान्नाच माहीत!
|
Santu
| |
| Tuesday, July 18, 2006 - 6:37 am: |
| 
|
इस्लामी दहशत वाद काय अमेरिकेची देणगि नाहि. तो त्यांच्या रक्ताततच आहे. आता स्पेन मधे रैल्वेत स्फ़ोट घडवले ते मुस्लिमानिच. परत इन्ग्लंड मधे पण असेच स्फ़ोट घडवले. होलंड मधे पण एका दिग्दर्शकाला मारले काय तर त्याने सिनेमात धर्म दुखवणारा उल्लेख केला. परत बाली मधे स्फ़ोट घडवनारे हेच बेसलान(हे तर रशीया मधे) ला ३०० लहान मुलां चा बळी घेणारे हेच. मधे कनडा सारख्या निरुपद्रवि देशात bomb conspirasy करणारे मुसल्मान पकडले. आता कनडाचा दोष काय तर तो मुस्लिम देश नाहि हाच. तेव्हा अमेरिकेचे सोडा या धर्मातच काहितरी क्रुर व विक्रुत आहे. डनिअल पर्ल ला सुध्दा अगदि बकरि सारखे कापले. अरे लांब कशाला संभाजी ला सुध्दा किति क्रुर पणे मारले. अगदि "लाल" चिन ला सुध्दा uighir च्या मुसल्मानांचा ताप आहे. हा धर्म साधारण धर्मा सारखा नाहि. तेव्हा मुस्लिम नसणे हाच बाकिच्या जगाचा दोष. यात अमेरिके च काय देणेघेणे नाहि.
|
Moodi
| |
| Tuesday, July 18, 2006 - 8:17 am: |
| 
|
संतु तुला फक्त नवाकाळ अन वार्ताहार यातीलच बातम्या इथे अपेक्षीत असतील तर ती चुकच आहे. ही खाली दिलेली लिंक वाच. अमेरीका पूर्ण दोषी नसेल पण मग लादेनला कुणी पोसले? डॅनीअल पर्लला कोणत्या देशात पकडुन मारले गेले? अनेक प्रश्न आहेत नाही का? हेच दहशवादी भारत, अमेरीका अन अन्य देशात शिकुन सवरुन, उत्तम तंत्रज्ञान मिळवुन जगात अन याच देशात इतके विनाश घडवुन आणतात, अन तरीही आपण म्हणणार की यात काहीच कुणाचा दोष नाही? http://www.esakal.com/esakal/07162006/NT00AFC3A2.htm
|
Bee
| |
| Tuesday, July 18, 2006 - 8:36 am: |
| 
|
संतु तुम्हाला कविता खूप आवडतात का? तुमचे पोष्ट एखाद्या मुक्तछंदातील कवितांच्या आकृतीबंधाप्रमाणे असते.
|
Moodi
| |
| Tuesday, July 18, 2006 - 8:40 am: |
| 
|
ही बातमी पण तेवढीच खळबळजनक आहे. जर भ्रष्ट मंत्र्यांच्या, कंत्राटदारांच्या मदतीने हे असेच चालू राहिले तर मग कठिण आहे. http://www.loksatta.com/daily/20060718/vdh02.htm
|
Saranga
| |
| Tuesday, July 18, 2006 - 10:19 am: |
| 
|
A news from Economic Times, today • Left Cites Rich-Poor Divide For Violence, BJP Sees Fundamentalism & SP A Conspiracy Our Political Bureau MUMBAI POLITICIANS can pursue a blinkered view in advancing the agenda of parties they belong to. Take the Mumbai serial blasts — a tragedy that should have brought all parties together, cutting across ideologies. The reality, however, is different. The Left, for example, blames the economic policies and globalisation for the recent violence. According to Gurudas Dasgupta, a CPI veteran and party ideologue who has chaired many parliamentary committees on finance and markets, the widening disparity between the rich and the poor stokes the simmering tension, which often boils over into violence. Mr Dasgupta thinks it’s an ongoing conflict between ‘haves’ and ‘have nots’. He was in Mumbai on Sunday, trying to explain terrorism the way the Left views it. The Marxists think India should stop aping the west and refrain from flowing with the tide of globalisation. He, as per the Left’s political position, didn’t blame any community or religion for the recent terror strikes. Diametrically opposite to the Left’s view is the BJP’s. Right from day one, the BJP has been blaming Muslim fundamentalism as the root cause of terror. The party thinks that the Congress and the UPA government’s kidglove handling of Muslim terrorists has only helped the perpetrators. It even wants the defamed anti-terrorist law Pota (Prevention of Terrorism Act), which was repealed by the Congress regime, to be brought back. It’s alliance partner, the Shiv Sena, went a step further in raising the pitch against violence. Sena chief Bal Thackeray publicly castigated certain organisations and political parties for being soft on terrorism. Carrying on his party’s agenda, the Sena supremo revived the almost forgotten term, ‘minority appeasement’ to blame the Congress. He was countered by the Samajwadi Party that likes to project itself as a saviour of Muslims. The SP city chief, Abu Azmi, went to the extent of indicating a conspiracy hatched by ‘Hindu militants’ to defame Muslims. His boss, Amar Singh, held the national security advisor MK Narayanan responsible for, what he calls, intelligence failure and sought his resignation. The only party which so far doesn’t seem to have any stand on the issue is Congress. Facing pulls and pressures from its 12 alliance partners, the Congress appears to be trying to be accommodate every partner’s view on the issue. The Congress Government in the state, where the home ministry is handled by the NCP, wants to use its dreaded law, MCOCA (Maharashtra Control of Organised Crime Act); however. at the Centre, it is opposing a similar legislation. As one senior home ministry official noted, political parties are not ready to rise above their individual constituencies and treat the disaster as a serious internal security issue. “Each political party is looking at the Mumbai bomb blasts from its own political perspective,” he said.
|
Moodi
| |
| Tuesday, July 18, 2006 - 9:00 pm: |
| 
|
काय जावईशोध लावलाय विद्यार्थ्यांसाठीच्या पुस्तकात. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/1773565.cms
|
Zakki
| |
| Tuesday, July 18, 2006 - 10:12 pm: |
| 
|
लिंबूटिंबू, मी आणि माझी चॉकलेटे हे अगदी नगण्य आहेत हो, या संदर्भात. उगीच इथे मला ओढू नका. माझे 'झाले' म्हंटले ना! चॉकलेटे देणे म्हणजे केवळ सहकार्यांबद्दल सद्भावना नि आपुलकी दाखवण्याचा प्रकार आहे, लाच नव्हे. गोडीगुलाबीने राहिल्यास कामे लवकर होतात हे जगभर खरे आहे.
|
>>>>> माझे 'झाले' म्हंटले ना!   Gr8
|
Laalbhai
| |
| Wednesday, July 19, 2006 - 3:47 pm: |
| 
|
सारंग, खरे म्हणजे "सगळ्याच" पार्ट्या या संधीसाधू आहेत, हे अगदी खरे आहे. मुद्द कोणताही असो, BJP ने कम्युनिस्टांना आणि कॉंग्रेसला, कम्युनिस्टांनी BJP ला आणि कॉंग्रेसला, कॉंग्रेसने BJP आणि कम्युनिस्तांना... शिव्या दिल्याशिवाय कोणत्याच घटनेचे वर्तुळ पूर्ण होत नाही. लोकांना हे दिसतेच आहे, त्यामुळे कुणाच्याही आणि कोणत्याही अपप्रचाराला जनता फारशी गांभीर्याने पहात नही. सब घोडे शेवटी बारा टक्की.. त्यामुळेच तर गेल्या ३,४ लोकसभा निवडणूकीत कुणालाही बहुमत मिळत नाहीये. इथुन पुढेही बराच काळ ते मिळणार नाहीये. हे बर्याच पार्ट्यांना कळले आहे. म्हणूनच निवडणूकीच्या आधीपासूनच आघाड्या स्थापन झालेल्या असतात.
|
Raina
| |
| Wednesday, August 02, 2006 - 2:54 am: |
| 
|
"घरकामासाठी बालकामगार ठेवण्याला बंदी " आजच्या लोकसत्तातील बातमी. उशीरा का होईना ही बंदी आली हे बरेच झाले.
|
Jaaaswand
| |
| Wednesday, August 02, 2006 - 8:35 am: |
| 
|
सही लेख.. Indian Muslim
|
Soultrip
| |
| Friday, August 04, 2006 - 11:25 am: |
| 
|
परवा दोन PMT drivers च्या आत्मघातकी bus race मधे चिरडुन एक मुलगी मरण पावली! Authorities नी काहीही action घेतली नाही! समाज एक दिवस (कि, फक्त बातमी वाचेपर्यंतच?) हळहळला, that's it! ... या भारतात आताशा जीवनाची किंमतच कमी नव्हे, राहिलीच नाही! माणसं ही thick-skinned झाली आहेत. डोळ्यावर कातडे पांघरुन घेऊन आपापल्या परीने चंगळवादी संस्कृती enjoy करताहेत!
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|