Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through August 08, 2006

Hitguj » Views and Comments » Current Affairs » Mumbai Local Train Serial Blasts » Archive through August 08, 2006 « Previous Next »

Laalbhai
Monday, August 07, 2006 - 11:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गांधीबाबासारखी तुर्कस्तानची काळजी कसली करताय?

>>>

तुम्ही मूर्ख, अक्कलशून्य आहात आणि वादासाठी वाद घालत आहात. इतःपर तुमच्याशी बोलणे हा मी माझ्या वेळेचा अपव्यय समजेन.

Samuvai
Monday, August 07, 2006 - 11:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लालभाई,
मला पातळी सोडून अपशब्द वापरता येत नाहीत. सगळ समजून वादासाठी वाद कोण घालतय हे जाहीर आहे. मुद्दे असतील तर मांडा.

admin ,
कृपया अपशब्दांची नोंद घ्या.


Samuvai
Monday, August 07, 2006 - 12:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणि हो, एक विसरलोच मला वेगळ्या शिव्या देण्याची गरजच नाही कारण "लालभाई", " comrade ", डावे (सगळ समानार्थी बर भारतीय, हिंदू, वैदिक, आर्य सारख) हे शब्द म्हणजेच ... :-))

Gs1
Monday, August 07, 2006 - 12:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

laalbhai >>>मी जसे केदार यांना म्हटले तसे विचारसरणीचा द्वेष सोडला तर आपले बर्याचशा बाबतीत एकमत होऊ शकते


अगदी योग्य बोललात. आता प्रत्यक्षात पण तसेच वागा आणि विचारसरणीचा वा वैयक्तिक द्वेष न बाळगता लिहा अशी विनंती. आमच्याही मनात कुणाचा द्वेष नाही. त्याशिवाय प्रामाणिकपणाही आवश्यक आहे, संवाद होण्यासाठी. तो नसेल तर अर्थपुर्ण संवाद होउ शकणार नाही.

आता तुमचाच वरचा शेवटचा परिच्छेद घ्या.

तुमच्या हट्टासाठी मान्य केले की...

पंधरा दिवस वर्तमानपत्रात गाजलेली घटना तुम्हाला माहित नाही असे मानायचे का ? नसेल तर ते न शोधता हे निखालस खोटे आहे वगैरे चुकीची विधाने करणे योग्य आहे का ?

आणि युतीने एकदा का होईना प्रयत्न केला, तो तुमच्याच लालभाईंनी सक्रियपणे हाणून पाडला आणि आता वर पुन्हा तुम्हीच खुशाल विचारताय की पुन्हा का नाही प्रयत्न केला. तर्कदुष्टतेची परिसीमा आहे ही.

आता यातली देशप्रेमाची कृती व भूमिका कोणती आणि देशद्रोहाची कोणती हे उघड आहे असे मला वाटते.



Laalbhai
Monday, August 07, 2006 - 12:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Admin
खरोखरच नोंद घ्या.. मी सकाळपासून पहातोय. मी कुठेतरी एकमत आणि सुसंवाद साधायचा प्रयत्न करतोय पण ही व्यक्ती मुद्दाम मला डिवचण्याचा प्रयत्न करते आहे.

अत्ताचेच उदाहरण म्हणजे.. मी तुर्कस्थानाचे उदाहरण दिले होते. तर या महामूर्खाने "मी तुर्कस्थानची काळजी करतोय" असा निष्कर्ष काढला.

सकाळपासून (मागे झाले तसेच कम्युनिहमला शिव्या देत मला उचकवण्याचा प्रयत्न झाला होता तसेच आजही चालू होते!) या व्यक्तीने अनेकवेळा निरर्थक विषयावर वाद घालण्याचा प्रयत्न केला होता.

तुम्ही दखल घ्याच.


Laalbhai
Monday, August 07, 2006 - 12:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आता यातली देशप्रेमाची कृती व भूमिका कोणती आणि देशद्रोहाची कोणती हे उघड आहे असे मला वाटते.

>>>

आहे ना... नक्कीच आहे. मतांसाठी देशाच्या सुरक्षेशी खेळ करणे हा नक्कीच देशद्रोह आहे आणि ते मी कधीच नाकारलेले नाही. त्यामुळेच मी कोणत्याही "राजकीय" पक्षाचे समर्थन करणे टाळतो... हे मी शंभर वेळा म्हणूनही तुम्हाला कळले नाही का?

आमच्याही मनात कुणाचा द्वेष नाही.

हा तुमचा दावा किती हस्यास्पद आहे, ते समस्त मायबोलीकरांना कळलेच आहे! मायबोलीवर माझ्या माहितीप्रमाणे विरोधी मतांचा द्वेश करण्याची परंपरा तुमच्या विचारसरणीच्या लोकांनी सुरु केली, हे मायबोली - जाहीर आहे!

त्याशिवाय प्रामाणिकपणाही आवश्यक आहे, संवाद होण्यासाठी. तो नसेल तर अर्थपुर्ण संवाद होउ शकणार नाही.


हे समुवैंनाही सांगा.. त्यांच्या वादात कुठेही प्रामाणिकपणा मला दिसला नाही!

तर्कदुष्टतेची परिसीमा आहे ही.

नाही.. तर्कदुष्टता नाही. पण लोकशाहीत असे होतेच. चांगल्या कामात विघ्न आणायला अनेक लोकं टपलेले असतातच. सगळेच राजकीय पक्ष हे करतच असतात / आहेत.

पण चांगल्या कामासाठी पुन्हा पुन्हा प्रयत्न करत रहाणे, ह्याला "राजकीय इच्छाशक्ती" असे म्हणतात. त्याचा अभाव, तुमच्या पक्षासहित, सर्वच राजकीय पक्षात आहे.




Samuvai
Monday, August 07, 2006 - 1:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Gs1 ,
भोंगळ विसारसारणीच्या भोयांना आपले दोष झाकण्यासाठी दुसर्यांना शिव्या देणे आवश्यक वाटते. पण लालभाई तुमच्यावर घसरण्या आधी गप्प बसा कसे आमच्या पदव्या वाढतायत मूर्खाचा महामूर्ख झालो. :-)
पण एका गोष्टीसाठी तुम्ही साम्यवाद्यांचे आभार मानायलाच हवे तर्कट्पणा करुन तुमच मनोरंजन नाहीतर कोणी केल असत काही दिल्लीत काही गल्लीत पण माकडचेष्टा त्याच :-)

पण मी मुद्दे सोडणार नाही कारण हा माझ्या देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. मी विचारलेल्या प्रश्नावर (कुराण पुर्णपणे "अपरिवर्तनीय" आहे. आणि त्यातच "जिहाद" सांगितला आहे. मग तुम्ही कस समजावणार "त्यांना"?) प्रामाणिक चर्चा होऊ शकेल काय?





Laalbhai
Monday, August 07, 2006 - 1:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भोंगळ विसारसारणीच्या भोयांना आपले दोष झाकण्यासाठी दुसर्यांना शिव्या देणे आवश्यक वाटते.

You said it yourself!!!

तुम्ही ज्यांना ज्यांना शिव्या देता त्यांची यादी.

१. मुसलमान
२. ख्रिश्चन
३. मिशनर्‍या
४. कम्युनिस्ट
५. कम्युनिझम
६. कॉंग्रेस (चांगले वाईट सगळेच)
७. अहिंसावादी स्वातंत्र्यसैनिक (ही तर फारच मोठी यादी आहे.)
८. समाजवादी
९. देशाची घटना
१०. आंबेडकर
११. तुम्हाला विरोध करणारे सगळे
१२. ब्राह्मणेतर

हुश्श दमलो.. यादी अपूर्ण आहे याची नोंद घ्यावी. सगळी यादी दिली तर मायबोलीचा server overload होईल.


Admin
Monday, August 07, 2006 - 4:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>तुम्ही मूर्ख, अक्कलशून्य आहात आणि वादासाठी वाद घालत आहात. इतःपर तुमच्याशी बोलणे हा मी माझ्या वेळेचा अपव्यय समजेन.
लालभाई तुम्ही वैयक्तिक पातळीवर उतरत आहात. मुद्याला धरून बोला. तुम्हाला वेळेचा अपव्यय वाटत असेल तर लिहू नका. दुर्लक्ष करणे तुमच्या हातात आहेच. त्यासाठी दुसर्‍याला मूर्ख म्हणायची गरज नाही. सामुवै यानी कुठेही तुम्हाला अपशब्द वापरलेले नाहीत

Laalbhai
Monday, August 07, 2006 - 5:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मूर्ख म्हणायची गरज नाही.

ठिक आहे, तुमचे काम आणखी अवघड करायचे नाहीये म्हणून, इतके खरे न बोलण्याची काळजी घेईन. धन्यवाद. :-)

Dinesh77
Monday, August 07, 2006 - 8:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"समाजवादाच्या गफ़्फ़ा आहेत हो गफ़्फ़ा. अहो आम्ब्याचे एक पान सुद्धा नसते हो दुसर्‍या सारखे. तो रत्नागिरीचा गावगांधी म्हणतो त्याप्रमाणे समजा आला तुमचा समाजवाद आणि गेली कोकण रेल्वे थोट्या पांडबाच्या शेतातून तर थोट्या पांडबाला हात थोडेच फ़ुटणार आहेत? हाताची पाची बोटे सुद्धा नसतात एकसारखी. समाजात डावे उजवे रहायचेच. रामराज्यात सुद्धा रामाने मारुतीचे शेपुट काढून स्वताला नाही लावले. तो नरच राहीला आणी मारुती वानरच राहीला. काय म्हणता?"
अंतू बर्वा (पु. ल. देशपांडे)


Laalbhai
Tuesday, August 08, 2006 - 3:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो तेंव्हा वानर असला तरी तो उपाशी मरत नव्हता. उपाशी राहिला असता तर वानराने नराचा गळा घोटला असता. दैववादी तत्वज्ञान आहे तुम्ही सांगताय ते. कोकणी माणूस कसा दैववादी झालाय हे सांगणारे वाक्य आहे ते. पुलंच्या नावावर संदर्भ सोडून खपवू नये. बलात्कारी पात्र रंगवताना नाटककार त्यांच्या तोंडे जे संवाद घालतो ते, नाटककाराचे स्वतःचे नसतात, पात्राचे असतात. संदर्भ सोडून "पुलंची मते अशी" असा प्रचार करू नका हो please !

असो. तो विषय नाही BB चा.


Manishalimaye
Tuesday, August 08, 2006 - 5:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथे या बी बी वर मी नसतेच पण इथल्या एकाला एका संदर्भासाठी मेल केली आहे. मिळाली का? काय झाले. शंका खरी आहे का?

Samuvai
Tuesday, August 08, 2006 - 6:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लालभाई,
तुम्हाला परत अशी विनंती आहे की थोडी तरी लाज शिल्लक असेल तर आता तरी मुद्द्याला धरुन बोला. इथे healthy discussions अपेक्षित आहेत शिवराळ आणि खोटारडी नाही. जमल्यास मी मांडलेल्या मुद्द्याला धरुन बोला.


Laalbhai
Tuesday, August 08, 2006 - 6:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काय आहे समुवै, की मला लाज शिल्लक आहे की नाही, याचा विचार करण्यापेक्षा मला admin चे काम जास्त कठिण करायचे नाहीये, म्हणून आता तुमच्याशी संभाषण मी बंद करत आहे.

इथे काय अपेक्षित आहे आणि काय नाही, याची मला चांगलीच कल्पना आहे आणि तुम्ही जो कालपासून सर्व BB वर खोडसाळपणा सुरु केलाय, त्याचीही मला चांगलीच कल्पना आहे.

admin च्या सल्ल्याची बूज राखून मी आवरते घेतो. नाहीतर मी फारच सत्य बोलायला लागलो तर तुम्हालाच लाज येईल. तेंव्हा आता जरा शहाण्यासारखे वागा.


Limbutimbu
Tuesday, August 08, 2006 - 8:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे अरे अरे हे काय चाल्लय?
जरा कुठ मी जीयस ना माह्या पोस्ट्स चा हिसाब किताब देत होतो तर हिथ लईच रण पेटल की! :-) वाईच थाम्बा जरा!
नेक्स्ट वीक मधी मी हजर होतोचे!
:-)

Samuvai
Tuesday, August 08, 2006 - 9:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लालभाई,
कोणाची तरी बूज राखलीत ह्याचा आनंद आहे. नाहीतर आपणच टेकू दिलेल्या पंतप्रधानाचीही बूज न राखण्याची परंपरा "तुमच्या" लोकांची (हे अगदी खास तुमच्या estyle मध्ये :-)
बर आता मुद्दे मांडा.
समजा, दिनेशने दिलेल्या पु. लं. च्या उतार्यातील मते त्यांची नसतीलही. आमची आहेत अस धरुन उत्तर द्या.
वानर उपाशी राहील्यावर नराचा गळा घोटला असता? आता काय म्हणावे ह्या साम्यवादी तर्कशास्त्राला अहो, धर्मासाठी नरच काय पण वानरही जीव द्यायला तयार होते पण तरीही कोणी कोणाची बरोबरी करण्याची साम्यवादी मर्कटचेष्टा नाही केली असा त्या उतार्याचा अर्थ आहे. चुकीच असेल तर दुरुस्त करा दिनेश.

कठोर कृतीविषयी आमच लालभाईंना १००% समर्थन! पण ते आपल प्रबोधनाच काय झाल? सर्व भारतीय मुल्ला मोउलवींना मुळ प्रवाहात आणण्यासाठी आणखीन किती (शे?) वर्षे लागतील आणि हे नरसंहार थांबतील अशी आम्ही आशा करावी?


Dinesh77
Tuesday, August 08, 2006 - 1:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी लिहीलेल्या उतार्‍यात मी कुठेही असे म्हटलेले नाही की हे पु. लंचे मत आहे. हा उतारा माहित नसल्यास पु.लंचे "व्यक्ती आणि वल्ली" हे पुस्तक वाचा. (वेळ मिळाला तर) त्यात "अंतू बर्वा" ही गोष्ट आहे. त्यामुळे मी कुणाच्याही नावावर कसलेही संदर्भ खपवत नही आहे.

समुवै तुम्ही लावलेला अर्थ बरोबर आहे.

बलात्कारी पात्र रंगवताना नाटककार त्यांच्या तोंडे जे संवाद घालतो ते, नाटककाराचे स्वतःचे नसतात, पात्राचे असतात.

कोणतेही पात्र बलात्कारी नसते. आणि कलाकार लेखकाने लिहिलेले संवादच बोलतो नाटकात. पण मलाही हे कळते की लेखक काही बलात्कारी नसतो, तो त्या काल्पनीक पात्राच्या भुमिकेतून विचार करुन ते संवाद लिहितो.

(अंतू बर्वा ही व्यक्ती पु. लंना भेटलेली खरी व्यक्ती होती )


Laalbhai
Tuesday, August 08, 2006 - 3:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Dinesh77

तुमच्या स्पष्टीकरणाबद्दल धन्यवाद. "तुम्ही असे म्हणता" असा माझा गैरसमज झाला होता. तो दूर झाला.

परंतू हा या BB चा विषय नसल्याने, या विषयावर पुढे काही लिहित नाही. पुन्हा एकदा, धन्यवाद!


Zakki
Tuesday, August 08, 2006 - 5:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मग काय आहे बरे या BB चा विषय?

याचे शीर्षक आहे त्याबाबत कुणि काही बोलताना दिसत नाहीत. फक्त तू तू मैं मैं चालू आहे. 7 Aug., 07:47 पासूनची सगळी पोस्ट्स बघीतली तर त्यांचा शीर्षकात असलेल्या विषयाशी काय संबंध आहे कळत नाही!


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators