Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through August 17, 2006

Hitguj » Views and Comments » Relationships » नवरा, बायको, संसार, तडजोड इ. » Long distance relationship » Archive through August 17, 2006 « Previous Next »

Manuswini
Wednesday, August 16, 2006 - 11:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

mod मला कल्पना नाही की हा विषय कुठे लिहिला गेलाय. असेल तर तुम्ही निर्णय घ्या काय करायचे ते.
हा विषय एथे लिहायचा कारण हल्ली मी बरेच friends , आजुबाजुची couples long dsitance relationship मधे आहेत, offcourse post marriage बद्दलच फक्त मी म्हणते आहे एथे. तेव्हा त्या नुसार मते तुमची Expect करतेय.
मला हा अनुभव नाही:-)
पण बर्‍याच आजुबाजुच्या मैत्रिणीचे frustration बघुन किंवा एक आश्चर्य वाटते म्हणुन एथे लिहावेसे वाटते की how does these couples handle the stress, frustration, emotional needs etc etc

ही सर्व लोक खुश रहातात का?
किंवा काय challenges face करावी लागतात?
कुठला approach मदत करु शकतो for the couple who are einvolved?

are there any real couples here who are going through it or have done it for a while for whatsoever reason and how did they cope up?

please DO NOT MAKE unnecessary or unhealthy comments here for this posting ,
what is required if its long term demand for any personal reason you have to stay away from your partner?
THIS IS PURELY A GENUINE efforts to know how this stress is also managed in already stressful life,so pelase contribute if you have one to share


Bee
Thursday, August 17, 2006 - 6:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनु, विषय चांगला आणि वेगळा आहे. मीही स्वानुभव नाही घेतला ह्याबद्दल पण माझे कित्येक मित्रमैत्रिणी आणि परिचयाचे काकाकाकू आपापल्या जोडीदारापासून दूर राहत आहेत.

जी जोडपी थोडी तरुण आहेत त्यांच्यामध्ये सहसा बायको देशात चांगल्या नोकरीवरती असते. मग इथे नवरा आला की तो नविन ठिकाणी असल्याकारणामुळे बायकोला लगेच आपली नोकरी सोडता येत नाही. कारण कुणास ठावूक नवर्‍याची नोकरी कितीवर्ष इथे असेल. अशावेळी बायको इथे दर तीन किंवा सहा महिन्यांनी येते. काहीवेळी बायको स्वतः नोकरी करत नाही, घरी मुल असते. त्यावेळी ती वर्षातून एकदा तरी इथे येते. मग एकदा नवरा स्थायिक झाला की दोघेही एकत्र राहून विरह भरून काढतात :-)

इथे काही काकाकाकू असे आहेत की काकूंना इथे राहण्याचा विट आलेला असतो. मग त्या पुण्यात किंवा मुंबईत राहतात आणि अधुनमधुन इथे येतात. काकांचे अशा वेळी चांगलेच हाल होतात. ही बाब मला काही पटली नाही. जेंव्हा नवर्‍याला गरज असते आधाराची तेंव्हा तुम्ही वेगळे होता. तो बिचारा तुम्हाला पैसे पाठवितो किंवा इतकी जुनी बायको तुम्ही म्हणून त्याच्यावर तुमचा अधिकार असतो तर तुम्ही देशात पळता वर त्यांचीच तुम्हाला मदत होते, तुमची नाही. इथे अधुनमधुन येतात म्हणजे दोन्ही देशात छान चैन होते. खरच मनाला पटत नाही ही गोष्ट.

ह्या दुसर्‍या काकाकाकूंच्या प्रकारात काही उदा. मी असे बघितले की नंतर त्या दोघांना एकमेकांचे काही वाटत नाही. तर काही उदा. इतके विनोदी निघालेत की इथे काकू आल्यानंतर त्या काकांचा भरपूर लाड करतात आणि दोघेही अगदी तरुण जोडप्यांप्रमाणे हिंडतात. आम्ही अशा जोडप्यांना अतिउत्साही जोडपे म्हंटले होते इथल्या एका सहलीमध्ये :-)

तर आता stress चा भाग. माझ्यामते नविन जोडप्यांनाच अधिक त्रास सहन करावा लागतो आणि ते करतातही सगळे व्यवस्थित adjust..



Giriraj
Thursday, August 17, 2006 - 10:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इतकी जुनी बायको तुम्ही म्हणून >>>>ही concept ज़रा विशद करून सांग बरे बी!

मला हा विषयच नीटसा कळला नाही खरं तर!


Moodi
Thursday, August 17, 2006 - 10:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मलाही हा विषय नाही कळला( सॉरी पण खरच) आणि बी जुनी बायको म्हणजे रे काय? मग नवरा जुना का नाही?

आणि मनुस्विनी एथे नको लिहूस, ते इथे ithe आहे. मराठीत एथे ethe नाही.( कृपया रागवु नये)


Rahul16
Thursday, August 17, 2006 - 10:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

well...mi pan barech mitra pahile aahet.

navara Indiat nokari la , bayko infy madhe....US la....

kinwa Navara s/w madhe ...job US la aani bayko indiat Visa milanyachi wat pahat.......ase bahutek wela 2 warsh chalate mag sobat. pan to parayant 'soneri kshan' nighun gele asatat.

well kay pahije he aapan aaplech tharawale pahije......jyacha tyacha prashna


Moodi
Thursday, August 17, 2006 - 10:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा विषय जऽऽऽरा याच्याशी निगडीत दिसतोय( विषय तसा वेगळाच आहे म्हणजे त्या मुलीला दुसर्‍यविषयी वेगळे वाटतेय, पण दूर रहाणे हा धागा दिसतोय या दोन बीबींमध्ये)

/hitguj/messages/46/111318.html?1151138601

Bee
Thursday, August 17, 2006 - 10:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी काकाकाकूंचे उदा. देताना जुनी बायको म्हंटले ह्याचा अर्थ लग्नाला खूप खूप वर्ष झालीत. चांगली २० ते २५ वर्ष. ह्याचा अर्थ काकांना नविन बायकोपण आहे असे होत नाही किंवा जुनी बायको म्हणजे त्या काकू, काकांसाठी टाकावू वगैरे झाल्यात असेही मला म्हणायचे नाही. 'जुना नवरा' लिहिण्याची गरज भासली असती तर मी लिहिले असते तसे. तेंव्हा त्या वाक्याचा अगदी सरळ सरळ अर्थ घ्यावा. कदाचित तुम्हाला तो आधीच लक्षात आलेला असेल पण काही गोष्टी मुद्दाम विरोधाला विरोध म्हणून सुरू होतात मायबोलिवर. हे मी सर्वांसाठीच लिहित आहे, फ़क्त मूडी ई.ई. साठी नाही.

Maitreyee
Thursday, August 17, 2006 - 10:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

का रे बी आता तुला लोकांनी प्रश्न विचारले तर irritate झालास का? :-O
मनुस्विनी, long distance relationship म्हणजे नक्की वर लोक ज्याबद्दल म्हणताहेत तेच म्हणायचेय का तुला?


Bee
Thursday, August 17, 2006 - 11:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुरवातीला मलाही असेच वाटले होते की मनुने बरोबर स्पष्ट केले नाही. मी तसे लिहिले पण होते. मग नंतर एकदोनवेळा तिचे पोष्ट्स वाचले तर तिने खरच बीबीचा तेवढे एक शीर्षक वगळून बाकी सगळे नीट स्पष्ट केले आहे. तिचे म्हणजे असे आहे की लग्नानंतर (post marriage as she said above) सगळेच नवरा-बायको पटून एकत्र राहतातच असे नाही. ह्या ना त्या कारणाने त्यांना काहीकाळ दूर रहावे लागते (long distance relationship as what she said) . तर असे करताना त्या जोडप्याला काय तडजोड मग ती भावनिक तडजोड असो वा आर्थिक मानसिक असो, ती कशी होते आणि त्यावर आपण एक मित्र म्हणून काय करू शकतो. बरोबर ना मनु.. नसेल तर क्षमस्व.

मैत्रेयी, irritate नाही.. फ़क्त वाद होऊ नये इतकीच भिती होती.


Manuswini
Thursday, August 17, 2006 - 11:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी
तुझे बरोबर आहे.
मी हे बघितले की माझ्या काही मैत्रिणी नोकरीकरता एकमेकांपासुनवेगळे, नवर्‍याची नोकरी फिरती म्हणुन बहुधा वेगळे,बायकोचे शिक्षण चालु आहे दुसरीकडे म्हणुन दोन दोन देशात तर दोन वेगवेगळ्या city त वगैरे, असे post marriage रहातात.
मी तर हे बघितले की नुकतेच लग्न होवुन वरिल पैकि एका कारणासाठी वेगळे असतात.
मग कसे काय त्यांची relationship टीकते.
माझे मित्र मैत्रिणी म्हणतात खुप कठिण असते. chances are high of misunderstandings specially in young couples, just by talking over phone some times simple thing can be a issue as communication is only over phone, emotional closeness is not there or lessened. is it true always? if not how this is handled? what is required?
वर वर सगळे ठिक वाटते पण यंत्रागत वागणी आणी बोलणी आणी एक दुरावा असतो अशी माझी एक मैत्रिण म्हणाली.
कधी कधी ह्याची सवय लगुन जाते तेव्हा partner जवळ असो वा नसो एकटे रहाणेच पसंद करतो. असे खरोखर होते का? कितपत काही गोष्टीची काळजी घेतली तर हे असे होत नाही?
माझी एक मैत्रिण म्हणाली की मनु हे(असे दुर दुर रहाणे) जितके होईल तितके Avoid करणे चांगले पण तिने नक्की कारण सांगितले नाही. तो खुपच व्ययतिक प्रश्ण होईल तिला म्हणुन मी विचारले सुद्धा नाही.

जसे बी म्हणाला की जुनी लग्न झालेली जोडपी ह्यांना खरेच एवढे वाटत नाही का? हा सुद्धा एक प्रश्णच आहे?
का त्यांच्या लग्नातील charm संपले असते का?;-) म्हणुन का?

मूडी,
राग नाही आला बरे का :-)


Moodi
Thursday, August 17, 2006 - 11:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हं आता विषय खोलवर कळला. पण जाणकारांचे मत जाणुन घेणेच आवडेल.


Giriraj
Thursday, August 17, 2006 - 1:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ओहो.. असे आहे होय!
तुझे बरोबरच आहे बी.. इथे लोक्स कशाचाही काहीही अर्थ घेऊन काथ्याकूट करतात.

माझ्या एका मित्राची कथा तर अशी झालेली की मुलगी लहान असूनही (वय वर्षे १.५) बायकोला भारताबाहेर वर्षभरासाठी जावे लागले.त्यामुळे मुलीची भावनिक गुंतवणूक बापाशी जास्त झाली.मुलीला आईची आठवण आणि कमी वाटू नये म्हणून लाड वढले आणि त्यातून थोडा हट्टीपणा निर्माण झाला.वर्षभर तिघांची स्थिति नाजूकच झालेली.
पण आजच्या धकाधकीच्या आणि स्पर्धेच्या जगात हे आवश्यक होऊ लागलय हे मात्र नक्की.




Kedarjoshi
Thursday, August 17, 2006 - 2:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विषय खरच मस्त आहे. या सगळ्या तुन मि स्वत्: जात आहे. ( ऑफकोर्स माझी बायको भारतात नाही, माझ्या सोबत ईथे US मध्येच आहे. पण माझ्या नोकरी चे स्वरुपच असे आहे की मला सोमवारी सकाळी विमानात बसुन दुसर्या स्टेट मद्ये जावे लागते, नंतर मी परत गुरुवारी वापस घरी येतो. त्यामूळे ही अगदिच काही लॉन्ग डिस्टंस मधे मोडत नाही पण तरिही आम्ही आठवड्यातील चार दिवस सोबत नसतो.

माझी नोकरी अशी आहे की मला prentations, project reviews blah blah नेहमी करावे लागते. शिवाय मी स्वत्: एका वेगळ्या client साठी पण काम करतो. दरवेळी बायको व मुलीला नेणे शक्य नसते. मग आम्हीच तोडगा काढला की आठवड्यातील चार दिवस कामाचे व तिन घरचे. अगदीच काही वाईट नाही. मी बायको व मुलीशिवाय राहु शकत नाही त्यामूले प्रज्ञाला हे साडे तिन दिवस सहन करावे लागतात.

दुसर्या देशात राहाताना आधीच बायको एकटी पडते कारण नोकरी नसते, ओळखी नसतात वैगरे, त्यात असे काही प्रकार झाले की तिला माणसिक त्रास होनारच. तसा तिला होतो ही (मलाही होतोच), मग मधेच मंगळ किंवा बुधवारी ति वापस यायला सांगते व कधी कधी मी तिचे ऐकतो. स्ट्रेस तर असतोच पण आम्ही एकमेकांना सांभाळुन घेतो. Due thanks to Pradnya.


हे सर्व त्रास वर जायचे असेल व जास्त पैसे क्मवायचे असतील तर सहण करावे लागतात. एकाच जागेची नोकरी हा पर्याय आहे, पण जे पैसे consulting मध्ये मिळतात त्याचा ६० टक्केच नोकरीत मिळतील) मग त्या पैशांसाठी आम्ही हे आणखी १ - २ वर्षे सहण करु. आम्ही दोघांनी मिळुनच हा निर्नय घेतला. शेवटी आपला देश, मित्र, नातेवाईकांना सोडुन आपण परदेशात येतो ते कशाला ईथले रस्ते व पाणी चांगले आहे म्हणुन? मी तरी पैसे कमवायला आलो आहे.

बि तुझा मुद्दा काकुना का पैसे देतात तरि काकु जातात कांकाचे हाल होतात.
अब्बे बि, पैसे दिले म्हणजे कांकाची जबाबदारी संपली का? तुझाही तसा विव्हु असेल तर बदल तो. लग्न फक्त कांकासाठी नसत व कर्त्यव्या साठी तर नसतच. काकुंची माणसिक ओढातान कोण समजुन घेईल?

सध्या तर असे दिसुनचे येते की projects वर दुसर्या देशात जावे लागते. हा अविभाज्य भाग आहे S/W मध्यल्या नोकरीचा.
माझी मैत्रीन निशा पण अशीच माझ्या बरोबर us ला आली. मि जसे बायको ला सोबत आणले तसे तिने नवर्याला सोबत आणले. तो सिने फोटोग्राफी करतो अ नावाजलेला आहे. त्याने त्याचे करिअर २ वर्षासाठी बाजुला ठेवले व तो ईथे आला. असे समजुतदार माणसही असतात.

तर मुळ मुद्दा समजुन घेन्याची कुवत असेल तरच अशा वेगळ्या राहन्याचा भानगडीत पडावे. हे कोणी चॉईस नी करत नाही.मजबुरी असते.

आता मनु तुझा मुद्दा. नविन लग्न असेल तर असे राहावे का? - माझे उत्तर नाही असे आहे. अरे लग्न आपण का करतो? जोडीदार हवा म्हनुन. रुम पार्टनर पाहीजे म्हणुन नाही. प्रेमविवाह असेल तर हरकत नाही पण ठरवुन झालेल्या लग्नात वधु व वर एकमेकांना निट ओळखत नसतात. लग्न झालेकी जर दोघेही वेगवेग्ळे राहात असतील तर समजुन घेने केवळ अशक्य असते. जवळ राहुन जे साधता येते ते फोन द्वारे येत नाही. त्यात जर मुलगी सासरी राहात असेल तर भांडने होन्याची श्क्यता जास्त असते. कदाचित तुझी मैत्रीन ह्यातुन जात असेल.

लग्न जुने झाल्यावर चार्म संपत नाही. नक्की चार्म कशाला म्हणायचे आहे तुला?



Arch
Thursday, August 17, 2006 - 3:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अशातच असही होत की दोघांनाही career महत्वाच वाटत. मग ती project साठी एका देशात तो project साठी दुसर्‍या देशात. मधल्या भेटींमुळे मुल झाल असेल ते तिच्या किंवा त्याच्या आईवडिलांकडे. पैसा ऐसपैस असल्यामुळे भारतात आईवडिलांना आणि मुलाला चांगल घर, नोकर चाकर दिले आहेत म्हणून आपली जबाबदारी आपण आईवडिलांवर टाकली आहे ह्याची जाणीवही नाही. असो. प्रत्येकाने आपल्याआपल्या priorities ठरवायच्या असतात.

मनु, चांगला विषय आहे.


Avikumar
Thursday, August 17, 2006 - 4:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी दिड महिन्यापुर्वीच यु एस ला आलो. माझ्याबरोबर माझा एक मित्र ही आला. त्याचे लग्न होवुन फक्त ३ महिने झाले आहेत. त्याची बायको लग्नापुर्वी जॉब करत होती. पण लग्नानंतर हैदराबादला यावे लागल्याने तिने तो जॉब सोडला. मित्रानेही चांगली ऑनसाईट संधी मिळतेय म्हनून ऑफ़र स्विकारली. आणि आता 'मधु इथे अन चंद्र तिथे' चालु आहे. दिडच महीन्यांत स्वारी जाम वैतागलिय. पळून जावेसे वाटतंय असे म्हणायला लागलीय. तिकडे बायको पण बहुदा माहेरीच असते.

हे खरेच दुर्दैवी आहे. विशेषत: अरेंज मेरेज असल्याने त्याने काही काळ बायकोबरोबर काढणेच योग्य होते. पन ज्या संधीची तो दोन वर्षे वाट पहात होता ती अशी अवेळी चालुन आल्याने सगळे गणितच चुकले त्याचे. काय विचित्र दैवयोग म्हणायचा.

ज्या दिवसांमध्ये प्रेमाचे नाजुक धागे गुंफायचे, सहजिवनाची स्वप्ने रंगवत सहचारिणीबरोबर नविन आयुष्याला सुरुवात करायची, ते दिवस तो रुक्ष कोड पहात आणि किबोर्ड बडवत काढतोय. पण प्रत्येकाच्या priorities ज्याच्या त्यानेच ठरवायच्या......

Manuswini
Thursday, August 17, 2006 - 5:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ते लग्न love marriage असो वा arranged माझ्या एका जवळच्या मैत्रिणीचे असेच तुटायला आले होते लग्न.
दुरुन फोना फोनि चालयची, सासु,सासरे वरुन कितीही चांगले असले वा वागले तरी कुठे ना कुठे कधीतरी शब्दाला शब्द जोडुन मुलाला सांगितले जातात.
जेमतेम फोनवरिल बोलण्यात सुद्धा ह्याने दुरावा निरंआण होतो ईती माझी ह्याच औन्ह्बवातुन गेलेली मैत्रिण.
पण मला कोणी सांगितले आणी sahrE इथे केले तरे बरे होईल की एकुण एक कश्या प्रकारच्या गोष्टीमुळे हे सर्व सहक साध्य होवु शकते??
ह्या सर्व friends,couples जरा निरुत्सक दिसतात हा विषयावर बोलायला का तर म्हणे तो एक कठिण काळ होता एवढेच सांगु तुला की तु हा option choose करुन नको. मग मला प्रश्ण पडला का का हे एतके कठिण आहे?

as far "charm", I dont know what exactly one of my friend meant but I guess people have grown up together for years so may be that spark is missing or less restlessness ... I dont know , it was comemnt by my friend so I am figuring out. so dont know if thats what she meant.
anyways , maaybolikars comments are welcome



Zakki
Thursday, August 17, 2006 - 5:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पूर्वी (अनेऽऽक वर्षांपूर्वी) आम्ही पण तरुण होतो. (असे अंधुकसे आठवते आहे). त्या वेळी माझी बायको मुलांना घेऊन चार चार महिने भारतात जात असे. मी इथले सगळे पदार्थ अत्यंत आवडीने खात असल्याने निदान जेवणखाणाचा प्रश्न मिटला. पण माझ्या अमेरिकन मित्रांनी म्हंटले, अरे तुझी बायको तिथेच राहिली नि तुला सोडून दिले तर? किंवा तिला भीति नाही वाटत का की तू तिला सोडून 'धंदे' करशील? मी म्हंटले 'छ्या:, मी काय त्यातला वाटलो का?' त्यावर एकमुखाने सर्वांनी होऽऽ' म्हंटले!
पण यातच भारतीय संस्कृतीचा विजय आहे नाही का? त्या सर्व मित्रांनी नि त्यांच्या बायकांनी लगेच म्हंटले, आम्ही नाही हो एकमेकांशिवाय वेगळे राहू शकणार, आमचा विश्वासच नाही!
नवी जुनी बायको नवरा यावर एक अफलातून जोक 'घडला', पण तो सांगणे इथे उचित होणार नाही.



A_sayalee
Thursday, August 17, 2006 - 9:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनु विषय छान आहे. माझे बाबा बद्ल्या होत असल्यामुळे अजुनहि आई-बाबा लांबच रहतात. माझ्या लहानपणापासून असंच आहे कारण आई नोकरी करते. आता तर retirement ला आलेत दोघही, आणी बाबांना फ़ार एकटेपण येतय असं आम्हा सर्वांचं मत आहे....
किति काळ अस विभक्त रहायचं त्याचा विचार करावा अश्या जोड्प्यांनी. थोडिफ़ार तडजोड ठिक, पण सहजीवनाला किति मुकायचं?
त्यातून मुलं असतील तर, single parenting हे complicated मुद्दे आणी त्याचे बरे-वाईट परिणाम आहेतच


Popatpanchi
Thursday, August 17, 2006 - 9:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Very appropraite discussion.I am sorry for writing in english,I can not write in ''shuddha'' devnagari using keyboard.
I am working in USA and my wife is working in the UK.Sometimes it is really difficult for both of us.But we do have perfect understanding(ofcourse credit goes to my better half!) and we are managing it.This is a temporary phase and we do plan to be togather soon.I would like to know experiences of other people.

Manuswini
Thursday, August 17, 2006 - 9:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे विषय इथे शेवटी काढायचे कारण माझ्या खुप जवळच्या मैत्रिणी मित्र ह्यातुन जात आहेत. काही विचारले तर सहसा काही उत्तर देत नाहीत फक्त एवढेच सांगतात की hey i tell you its tough, you dont opt for it , मी बर्‍याच वेळा म्हटले अरे यार tough,tough काय आहे ते समजवा ना मग.
मग हा त्यांचा व्ययक्तिक प्रश्ण ही आहे म्हणुन गप्प बसले.

मग इथे आले लिहायला........ मंडळी लिहा ना अजुन


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators