Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through August 08, 2006

Hitguj » Views and Comments » Current Affairs » स्वतंत्रता दिवस » Archive through August 08, 2006 « Previous Next »

Jadhavad
Thursday, August 03, 2006 - 9:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार मंडळी,
९ ऑगस्ट, सिंगापुर स्वतंत्रता दिवस.
१५ ऑगस्ट, भारत स्वतंत्रता दिवस.


लहानपणी, शाळेत असतांना एका दिवसाची आतुरतेने वाट बघितली जायची, तो दिवस म्हणजे १५ ऑगस्ट. आपल्या देशाला स्वतंत्रता देणार्‍या स्वातंत्र्-सैनिकांनी कष्ट घेवुन पुढच्या पिढीला दिलेल्या एका भेटीचा दिवस. सकाळी लवकर उठुन शाळेत ध्वज्-वंदन करतांना ह्यामागे एक देशभक्तीची भावना असायची. ढगाळलेल्या वातावरणात, प्रमुख पाहुण्यांचा उपस्थितीत, स्वतंत्रता दिवशी ध्वजाला salute करतांना व 'जरा याद करो कुर्बानी' एकतांना ऊर अगदी भरुन यायच. नंतर लाल किल्यावरच भाषण T.V वर बघितल्या नंतर भारताच्या प्रगतीची कल्पना यायची. .... कमी-अधीक आपल्या बहुतेकांचा हा अनुभव.
काळापरत्वे ह्या दिवशीचा सकाळचा ध्वज्-वंदना चा कार्यक्रम झाल्यावर बाकी दिवसाच्या कार्यक्रमांमध्ये पण बदल झाला. केबल T.V. channels वर 'स्वतंत्रता दिवस विशेष' सादर व्हायला सुरुवात झाली. क्रांती, कर्मा, उपकार, पुरब्-पश्चिम, क्रांतीवीर,.... असे चांगले सिनेमा बघायची हमखास वेळ ह्या आठवड्या मध्ये व्ह्यायला लागली. रंगोली तर पुर्ण देशभक्ती च्या गान्यांणी भरलेली असायची....... पण त्याच्या पुढे काय?
१९४७ ला लाल किल्ला वरुन भाषण करतांना नेहरुजींनी म्हंटले होते, when all the words is asleep, india awakes . पण खरच is india awake? . मोठा प्रश्न आहे. निव्वळ एक सुटीचा दिवस म्हणुन ह्या दिवसाकडे आता बघितल जावु लागले आहे. वर्षात असणार्‍या १२ हक्काच्या सुटीपैकी एक दिवस. आपण मोठे लहान मुलांना ह्या दिवसाच महत्व सांगतो पण आपण स्वत:?. एक प्रश्न स्व्:ताला विचारा आणि खर उत्तर सांगा. मोठे झाल्यावर आपल्या पैकी किती जण सार्वजनीक ध्वज्-वंदनाला गेलोय? मुळात हे विचारा की, शेवटच्या कोणत्या वर्षी मी ध्वज्-वंदन केलय?
३५ वे प्रेसिडेंट, जे.एफ़. केनेडी नी त्यांच्या देशाला केलेल्या पहील्या भाषनात राष्ट्राला उद्देशुन म्हंटले होते, Ask not what your country can do for you, ask what you can do for your country . त्यांच्या देशाने त्या वाक्याचे महत्व ओळखुन प्रगती केली. सिंगापुरचे पहीले प्रधान मंत्री Lee Kuan Yew ह्यांनी T.V समोर जनतेला केलेल्या भाषणात जनतेच्या प्रश्नांना महत्व दिले. ...Singapore shall be forever a sovereign democratic and independent nation, founded upon the principles of liberty and justice and ever seeking the welfare and happiness of the people in a most and just equal society... आज सुद्धा त्यांच्या विचारांना महत्व आहे. ह्या विचारांवर केलेल्या प्रगतीचे फ़ळ हे देश आज चाखत आहे.

सिंगापुर मध्ये आज सुद्धा ९ ऑगस्ट ला प्रत्येक देशवासी त्यांच्या घरावर देशाचा झेंडा अभिमानाने फ़डकवितो. केवळ एक सुटीचा दिवस म्हणुन न बघता एक प्रगतीचा दिवस म्हणुन ९ ऑगस्ट ओळखला जातो. एका तासात रेल्वेने पुर्ण कव्हर करता येणार्‍या ह्या देशात प्रगती जागोजागी दिसते. चांग़ी एअरपोर्ट पासुन बून ले पर्यंत आणि मरीना बे पासुन वुडलँड पर्यंत. अगदी रेल्वेचा प्रवास सुद्धा अगदी शिस्तबद्ध. रस्ता क्रॉस करतांना देसी रिक्षावाले जसे दुसर्‍याच्या नावाचा(आणी त्याच्या पिढ्यांचा) उदघोष करतात, इथे तो नाही. भारताने स्वातंत्र्यानंतरच्या ५९ वर्षांमध्ये केलेल्या प्रगतीची आर्थिक, सामाजीकदुष्ट्या तुलना सिंगापुर च्या ४१ वर्ष स्वातंत्र्य मिळालेल्या सम्रुद्ध राष्ट्राबरोबर करतांना एक जाणवते, शिस्त फ़क्त बोलण्यात न ठेवता आचरणात आणणे ही महत्वाचे असते. नेमका हाच मुद्द आम्ही विसरलो. हमे यह करना है, हमे वोह करना है. .... ह्याच्यामध्ये वेळ दवडुन सामर्थ्य व्यर्थ घालविण्यापेक्षा काहीतरी समाजोपयोगी काम करण्यात वेळ जर आम्ही invest केला असता तर नक्कीच २०२० एवजी २००२ मध्ये आम्ही महासत्ता झालो असतो. अहो जिथे माझ्या देशाचा झेंडा माझ्या घरावर फ़डकवायला ५ शतक लागतात, तिथे लाल फ़िताशाही कशी असेल ह्याची कल्पना केलेलीच बरी. चांगीवर विमान लँड झाल्यानंतर मी ३० मिनटात बाहेर असतो. आणी मलाच चांगला एक तास छत्रपती शिवाजी इंटरनेशनल वर (हुज्जत करत?) घालवावा लागतो. ही आमची प्रगती नक्कीच असु नाही शकत.

मागच्या महीन्यात जाहीर झाल्याप्रमाणे आताचा सिंगापुर मधला बेकरीचा दर ५ वर्षामधला सगळ्यात कमी आहे. म्हणजेच financial analysis केल तर नक्कीच काही तरी प्रगती असली पाहीजे. मग माझ्यादेशात का नाही तशी प्रगती? उत्तर आहे, मागे विचारलेल्या प्रश्नात. मला माझ्या देशाची प्रतीज्ञा च पाठ नाही मग मी कसा काय विचार करु शकतो की कस्टम मधुन (मांडवली केल्याशिवाय?) माझा नवीन डिजीटल केमेरा बाहेर निघेल. दंड भरायचा कंटाळा, मग एक हिरवा कागद हातात ठेवल्याशिवाय ट्रेफ़ीक हवलदार सोडत नाही हो, तिथे नियमांची काय कमाल? अहो जिथे गाई-गुरांचा चारा रखवलदार खातो, आणि धर्मांधाच्या नावावर राजेरोस बाजार भरतो, तिथे टाळुवरचे लोणी आबाधीत कसे राहील?

तुम्हाला काय वाटतेय?
अजुन एका रंग दे बसंती ची गरज आहे?
तुम्ही चुकताय?.... समाज चुकतोय? प्रदेश चुकतोय? की राज्यकर्ते चुकताय?

अमित


Laalbhai
Thursday, August 03, 2006 - 11:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Jadhavad

अहो महाशय, आहात कुठे? इथे "राष्ट्रवादी" लोकांची फौज उभी आहे, दिसत नाही काय?

नियम पाळणे, आपापली छोटी छोटी कामे मन लावून आणि प्रामाणिकपणे करणे, आपल्यापरीने आपण भ्रष्टाचार न करण्यास उत्तेजन देणे, आजुबाजुच्या मागासलेल्या लोकांना शिक्षण घेण्यास प्रवृत्त करणे, छोट्या छोट्या पातळीवर तोशिस सोसून गुन्हेगारीचा विरोध करणे... म्हणजे राष्ट्रवाद नाही बाप्पा...

मनात "राष्ट्रदेवता" उच्च स्थानावर असली की सगळे मस्त. (मनातले मांडे मनात खायचे, कसे?) झेंडे फडकावत जयजयकार केले की तुम्ही "राष्ट्रवादी" होता, हे अजुन तुमच्या गावापर्यंत पोचले नाही का राव? कुठल्या बुद्रुकात रहाता?


Soultrip
Thursday, August 03, 2006 - 12:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'स्वतंत्रता दिवस' च्या ऐवजी 'स्वातंत्र्य दिन' असा शब्द्-प्रयोग जास्त बरोबर आहे. (नाही तर, ते zee-Marathi वाटतं)

सिंगापुरामधे public cleanliness प्रचंड आहे (अतिशय कठोर नियमांमुळे) पण private area, rather घरांमधे कमालीची अस्वछ्ता जाणवते. प्रत्येक apartment च्या elevator मधे urine detector लावलेला असतो, म्हणजे पहा काय परिस्थिती आहे! (भारतात नेमकं उलटं असतं! आपण आपलं घर, apartment ची building चकाचक ठेऊत, पण सरकारी कार्यालयाच्या जिन्याच्या प्रत्येक कोपरा पानाच्या पिचकारीने लाल करु!)

HDB मधील समस्त घरे bugged (i.e. electronically) असतात हे मे सिंगापुर सोडल्यानंतर वाचलं होतं (आणि वाटलं, वाचलो! .. उगाच जोषमधे येऊन जास्त्-काही बरळलो नाही:-))

Still, I do have a lot of respect towards Singapore. Rather, I used to always compare it with US; though it is like comparing apples with oranges.

You mentioned how every TV channel is showing the stereotypical patriotic songs, movies etc. But in a way, you also are doing same thing by starting this BB just before 15th August!

आणखी एक गोष्ट मला चांगली समजलीय. आपण जेंव्हा बाहेर असतो (म्हणजे परदेशात) तेंव्हा बरेच excited, patriotic वगैरे असतो! भारतात आलो, थोडा काळ लोटला की परत कशाचच काही वाटत नसतं! (अमेरिकेतुन परत आल्या-आल्यानंतर फक्त एकदाच मी मोठ्या हौसेने, आणि मुलीला बरोबर घेऊन, MIT मधील ध्वज्-वंदनाला गेलो होतो!)
थोडक्यात काय तर, 'नेमेची येतो मग पावसाळा' सारखं होतं! पुढच्या वर्षीच्या १५ Aug ला भारतात असलास तर बघ काय वाटते ते (किंवा काहीच कसे वाटत नाही ते!) कोठे तरी वाचलेलं वाक्य मला आठवलं. It is not totally out of context here. ... "It is very easy to die for a country. But it is very, very difficult to LIVE for a country!"

घाईत लिहिल्याने विचार जरा विस्कळीतपणे मांडलेले आहेत, but I guess, the gist is conveyed!


Bee
Friday, August 04, 2006 - 2:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमित, लेख चांगला लिहिला आहे. तुझी कळकळ पूर्णपणे उतरली आहे ह्या लेखात. अगदी स्वाभिवकपणे आपण सिंगापोर आणि भारत अशी तुलना करतो जे इथे राहतात ते तरी करतातच. पण आपला देश इतका मोठा, इतक्या विविध स्तरांचा आहे त्याला वर आणणे हे खूप शक्तीशाली काम आहे. हा देश अगदी छोटा आहे त्यामुळे जडणघडण करायला सोपे जाते. हे म्हणजे अगदी छोटे कुटुंब आणि मोठे खटल्याचे कुटुंब असे आहे.

Amanjot
Friday, August 04, 2006 - 5:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

in olden days joint families were run by one "Karta" and family members though fought sometimes, everything was under control of Karta. When decentralisation of control is started, families started becoming Nuclear families.....

Are we forwarding towards nuclear country.....???

Just think.....

Jadhavad
Friday, August 04, 2006 - 8:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लालभाई:
ईथे राष्ट्र'वाद'ची फ़ौज आता नाही आलीये, ७० च्या दशकात जनता'वादी' होते, मग ८० मध्ये समाज'वादी' आले. एवढी वादा-वादी झाली, मग जनतेच भल का नाही झाल? अजुन ही एक सुर एकु येतो...'टोपीवाल्या इंग्रजांचा काळ बरा होता'.... मग कुठे असते हे "वादी"?

सोउल्ट्रिप्:: reply pointed
सिंगापुर एवजी आपण जर्मनी किंवा फ़्रान्स च उदाहरण घेतल, तरी तिथे शिस्तच दिसते. दुसर्‍या महायुद्ध्याच्या काही सैनीकांना मी जर्मनी मध्ये भेटलो तेव्हा त्यांच्या अनुभवावरुन कळल की, तिथेही Discipline is the key of progress हेच अंकीत आहे.
well, other side of the coin is, i have started this BB b4 9th Aug.. :-)
परदेशात असतांना patrotic असण जर खरच चांगल वाटत असल तर अमेरीकेत किती देसी लोक्स अडचणीला मदत करतात, हा पण एक मुद्दा आहेच.


Laalbhai
Friday, August 04, 2006 - 9:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Jadhavad

मी लिहिलेले खरे म्हणजे तुम्हाला उद्देशून नव्हते. तुमचे विचार खरेच प्रामाणिक आहेत आणि नक्कीच पटण्यासारखे आहेत.

पण स्वतःच्या कट्टरतावादाला आणि द्वेशाला राष्ट्रवाद म्हणायचे, आणि इतरांना शिव्या देत स्वतःची राष्ट्रनिष्ठा सिद्ध करण्यचा प्रयत्न करायचा, असा प्रकार चालू आहे. त्याचा संताप म्हणून माझ्याकडून लिहिले गेले.

तुमच्या प्रामाणिक चर्चेत विघ्न आणले असल्यास क्षमस्व.

पण तुमच्या मुद्द्यांना अनुसरून "राष्ट्रवाद" म्हणजे काय, याची चर्चा व्हावी असे वाटते.


Kashi
Friday, August 04, 2006 - 10:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

amit lekh..changla lihla aahes..
smaranike sathi ka nahi pathavla


Ganeshbehere
Friday, August 04, 2006 - 11:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमित,
मी बी च्यां मताशी पुर्ण पणे संमत आहे, आपण केंव्हा हि डायरेक्ट तुलना करतो, पण प्रतेक देशांत परिस्थिती वेगवेगळी असते.
भारताची आणि सिंगापुर/अमेरिका ची डायरेक्ट तुलना नाहि होऊ शकत, मान्य आहे की आपल्या सरकार आणि कायद्यांमधे चुका आहेत......पण भारतात जी परिस्थिती आहे ती थोडी वेगळी आहे, एवढी मोठी लोकसंक्या, निरक्षरता, जाती वाद या गोश्टी आता जात आहे, माझ्या मते लोक हळुहळु साक्षर होत आहे त्यामुळे बाहेर जो बदल बघायला मिळतो तो आता भारतात पण पाहायला मिळेल, आणि काहि दिवसांनी तुला हि तुलना उलट बघायला मिळेल,(पुढे लोक भारताचा एक आदर्श देश मन्हुण उदाहरणे देतिल). हे एक माझे मत आहे (चु. भु.दे. घे./CBDG)


Jadhavad
Monday, August 07, 2006 - 11:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हेच तर एक स्वप्न आहे. असा दिवस बघायला नक्किच आवडेल.



Soultrip
Monday, August 07, 2006 - 12:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुढे लोक भारताचा एक आदर्श देश मन्हुण उदाहरणे देतिल>>>>
उगीच स्वप्नरंजनात राहु नका!
I also used to feel same earlier. Now I know for sure, it is NOT going to happen at least in my life time!
There would be growth, development (in pockets)etc. as we see it even now, but it needs MUCH MORE to be a DEVELOPED country, needs MUCH MORE to be a global super-power & we don't have it!

Corruption, laziness & tendency of opting short-cuts are embedded in our DNAs. Unless we get rid of them (& which is next to impossible) we will just grow with the usual growth rate of 7 to 8% (that too..with a good monsoon).

Aschig
Monday, August 07, 2006 - 8:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

> Corruption, laziness & tendency of opting short-cuts are embedded in our DNAs.

Thats not quiet true. Almost all of it is by nurture and not by nature. The good thing about Amit's article is that he ends with questions, not statements. When you make statements, you have already decided something. When you aks questions, you are ready to change (whether you WILL change is a different question).

Just yesterday I was having a discussion with a friend about the recent incident of an elected minister visiting the flood-affected and choosing to worship the river-godess instead of taking concrete steps. That, I believe, is due to nurture rather than nature.

Laloo, on the other hand, is taking good steps for railways (i do not know what he is doing in other walks of life).

These are of course just examples and do not prove anything. But what is important for everyone is to look inside themselves, and their surrounding and see what change will be good. If you decide nothing can change the current situation, you automatically help make the situaton worse.

(BTW, the above is a statement :-)

Soultrip
Tuesday, August 08, 2006 - 4:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Ashish: Ending an article with questions is just a part of writing a good article! It is just rhetoric, .. that's it!
Assuming you are in the US, you are bound to be optimistic about India. (The reason I mentioned above in my previous posting)

I volunteer for a e-group that fights for better roads in Pune. Thru' that forum (& some other forums)I have come in contact with Kareer, Kalamadi et al. The ineraction with them & other govt.offcials have led me to draw that pessimistic conclusion.

I can give a recent example of our laziness/short-cut attitude. Baner road is being concretized. That other half is so 'work in progress' (but not complete). Our junta can not wait for its completion, skips the regular road & chooses that half-completed (halk-baked road) to travel on! When asked by the security officer, they fight with him! I have seen numerous such incidences. That would be an altogether different topic of article.


Now I know even I would have been hurt had somebody said this to me when I was in the US. Still, you should check out the facts yourself, first hand & then comment!(i.e. come back to India, spend one-two years & then talk such lofty, mushy things)

Laalbhai
Tuesday, August 08, 2006 - 5:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Soutrip,
मला जरा वेगळे वाटते. with due respect to your frustration and sincere efforts to make some change in the situtation, I would say, you expected too much from your fellow citizens! हा निराशावाद नाही. वस्तुस्थितीची जाणीव आहे.

आपला प्रवास ५ पावले पुढे आणि ४ पावले मागे असा चालू आहे. त्याला इलाज नाही. इतक्या कष्टांनी किमान एक पाऊल पुढे जाते, हे महत्त्वाचे आहे.

निराश होऊ नका इतकेच सांगणे आहे. आयुष्य पणाला लावली लोकांनी समाजासाठी तरीही हाती काही आले नाही, अशीही हजारो उदाहरणे आहेत.

काम करत रहा, लोकात मिसळत रहा. तुम्हाला परिस्थितीची सवय होईल. तुमच्या लिखाणावरून तुम्ही सामाजिक कार्यात भाग घ्यायला सुरवात करून फार दिवस झालेत असे वाटत नाही. (तसे नसल्यास क्षमा असावी.) तेंव्हा निराश न होता, रेटून जमेल तसे काम करत रहा, असा एक आगाऊ सल्ला देण्याचा मी प्रयत्न करीन.:-)

I hope, in this discussion atleast, mine being communist will not irritate you! I took the liberty to say something to you because you have strong urge to do something for the socity. You must not get away with frustration. Defeat is another story altogether. But definately, frustration would be the last thing I would like to see in young chaps like you. :-)

एक आणखी सांगावेसे वाटेल की "जग" / "समाज" बदलण्याची अपेक्षा करू नका. आपण आपल्या भोवतालची परिस्थिती नेटाने बदलण्याचा प्रयत्न करावा. याचे दोन फायदे होतात.
१. भोवतालची परिस्थिती जोर लावला तर नक्कीच बदलू शकते. आपल्या कष्टांचे फळ दिसते, त्यामुळे आणखी काम करण्याचा हुरुप येतो.
२. आपल्या भोवतालची साधी परिस्थिती बदलायलाच किती कष्ट पडतात याची जाणीव होते. तेंव्हा समाज बदलायला किती कष्ट लागतील, हे लक्षात येऊन, येणारे नैराश्य टळते.

बघा पटते का. मीही थोडीफार लुडबुड करतो, त्या अनुभवावर काही सांगावेसे वाटले.:-)


Bee
Tuesday, August 08, 2006 - 5:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Most of my post always ends with questions :-)

Why we always comment on Indian politicians, Indian governement- when we realised so hard that they are not capable to improve India? there are so many Indians who have well analysed the root causes of India's problems? but what next? only analysis is ready and no solution or rather no resources, no initiatives, no action-plan to close those root causes. So to me this is an important factor that Indian citizens are all depend on our government. Whatever our govt does - either follow them or keep quiet. There are/there will be many intellectuals like- Ashish Mahabal, Soultrips but ultimately radius of their capabilities will be limited or whether it will reach towards the generic problems of India is at a great question. Because we all are very self-centred.

Laalbhai
Tuesday, August 08, 2006 - 7:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रथम काम करायला सुरवात करावी आणि संयमाने, काय मिळाले याचा विचार न करता, ते करत रहावे.

आपला प्रकाश कुठवर पोचतो, पोचतो की नाही, या शंकाअ तुम्हाला जागच्या जागी खिळवून ठेवण्याशिवाय काहीही करत नाहीत.




Because we all are very self-centred.
>>

oh yes.. I forgot, this is a "statement"! :-) ~D


Aschig
Tuesday, August 08, 2006 - 8:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

soultrip, keep up the good work.
My only exception was to your statement connecting laziness to DNA. I believe it depends on how we are brought up.
And that can be contagious. So being aware is the only way you can hope to make others aware. And trying to rub it off in a non-painful way.

If it makes anyone feel good, there are many other countries which are worse than India. But I hope we want to hear better than that.

My example of laloo was in a good sense. So situations (in this case his dream of becoming PM) can bring out the good in people.

Samuvai
Tuesday, August 08, 2006 - 9:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

soultrip ,
लोकांना अस करण्यापासून परावृत्त करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे त्यंच्यात हा देश, हा समाज माझा आहे ही भावना जागवण्याचा प्रयत्न. हे लहाणपणापासून व्हायला हव. आज लोक जे तुम्हाला short-cuts घेताना दिसतात ते समाजाची "धारणा" योग्य झाली नसल्याचे लक्षण आहे. त्यासाठी "मुळातून" प्रयत्न हवेत. कुटुंब आणि शाळा ह्या संस्था बळकट करुन त्यांतून विशुद्ध त्यागाचे आणि समाज / राष्ट्रभक्तिचे संस्कार रुजायला हवेत. म्हणजे आपण "मी" च्या पलिकडे बघायला शिकू.
तुमच्या कामाबद्दल मनापासून अभिनंदन!


Ganeshbehere
Tuesday, August 08, 2006 - 11:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रथम काम करायला सुरवात करावी आणि संयमाने, काय मिळाले याचा विचार न करता, ते करत रहावे,>>>>>>>>>>>>>
आप आपल्या परिने जेवढे चांगल करता येईल तेवढे करत राहावे, एका अपयशाने निराश होऊ नये. आज नाही तर उद्या नक्किच त्याचे फ़ळ मिळेल.

Laalbhai
Tuesday, August 08, 2006 - 1:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरे आहे बेहेरे तुमचे.. साहब मिले सबुरी में. :-)

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators