Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through August 07, 2006

Hitguj » Views and Comments » Current Affairs » Mumbai Local Train Serial Blasts » Archive through August 07, 2006 « Previous Next »

Soultrip
Wednesday, August 02, 2006 - 11:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कधी नव्हे ते, या मुद्यावरती मात्र दुजोरा लाला :-)

डावे, उजवे, मधले राजकारणी
सगळेच एक माळेचे मणी!
स्वत्:च्या बेचाळीस पिढ्यांचं कोट्-कल्याण करत
एक दिवस, विकून टाकतील भारत!!


Laalbhai
Wednesday, August 02, 2006 - 1:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कधी नव्हे ते, या मुद्यावरती मात्र दुजोरा लाला

>>>

वैचारिक मतभेदांचे रुपांतर शत्रुत्त्वात केले नाही तर आपले बर्‍याच बाबतीत एकमत होऊ शकते. Afterall, we all are thinking (and acting) for the betterment of the socity, aren't we? :-)


Samuvai
Thursday, August 03, 2006 - 6:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लालभाई,
आम्हालाही समाजवाद, साम्यवाद ह्यातील सगळ्या चांगल्या गोष्टी आम्हाला पटतात. The only difference between us is for us (nationalists), country is above all.


Laalbhai
Thursday, August 03, 2006 - 10:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

The only difference between us is for us (nationalists), country is above all.

>>>>>

With all due to respect to your nationalism, Mr. Samuvai, "स्वतःच्या तथाकथित राष्ट्रभक्तीचा वृथा दंभ" असे मी जे मी म्हणतो, ते ह्यालाच!

कोणतीही तत्वप्रणाली कोणत्याही institution शी विनाकारण द्रोह करा असे सांगत नाही. कोणतीही तत्वप्रणाली मूळातून वाईट नसते. तिचे चांगले वाईट असणे, हे, ती प्रणाली अनुसरणार्‍या लोकांच्या वागणूकीवरून ठरते.

किमान माझ्या पहाण्यात तर सगळ्याच पक्षातले आणि तत्वप्रणालीचे काही लोकं भंपक, भोंगळ, स्वार्थी आहेत. तसेच काही लोकं चांगली आहेत.

तुमच्यासाठी राष्ट्र सर्वात मोठे आहे, तर मग कसे काय हो तुमचे मंत्री संत्री भ्रष्टाचारात अडकलेले? कसे काय देशाच्या सुरक्षेशी खेळ कराणारा तमाशा करणारे?

असो. मला यावर काही वाद घालायचा नाहीये. पण "आम्हीच राष्ट्रवादी" हा तुमचा दावा किती पोकळ आणि भोंगळ आहे, हे तुमच्या नेत्यांनी सिद्ध केलेलेच आहे. त्यामुळे किमान मलातरी "अमुक अमुक एकांचा राष्ट्रद्रोह" असे BB सुरु करण्याची गरज नाही!:-)


Laalbhai
Thursday, August 03, 2006 - 10:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

डावे, उजवे, मधले राजकारणी
सगळेच एक माळेचे मणी!
स्वत्:च्या बेचाळीस पिढ्यांचं कोट्-कल्याण करत
एक दिवस, विकून टाकतील भारत!!


>>>
soultrip
इथे माझेही तुम्हाला पूर्ण अनुमोदन. :-)

Admin
Friday, August 04, 2006 - 4:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मंडळी अजूनपर्यंत तरी भान ठेवून लिहीत आहात धन्यवाद.

पण हळुहळु आम्ही असे तुम्ही तसे म्हणत, वाद, मी असा तर तू कसा या व्यक्तिगत पातळीवर येणार नाही याची काळजी घ्या.


Samuvai
Friday, August 04, 2006 - 7:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अगदी बरोबर. माणसे स्वताहाला तत्ववादी म्हणवत तत्व सोडून वागताना दिसतात. किंबहुना तेच बहुसंख्य आहेत. मला त्याबद्दल काही म्हणायचच नाही.
प्रश्न असा आहे की तुमची "वैचारिक बैठक" तुम्हाला काय करायची परवानगी देते. राष्ट्रवाद भ्रष्टाचाराची कदापिही परवानगी देत नाही जसा साम्यवाद ७ पिढ्यांच कोटकल्याणाची देत नाही. आमचा विरोध चीनमध्ये पाउस पडला की इथे छत्र्या उघडण्याला आहे. समस्त लाल माकडांनी चीन युद्धाच्या वेळेस काय तमाशे केले ते सर्वश्रुत आहे. विसारसारणी चांगली असेल तर कार्यकर्ते तसे वागतीलच ह्याची शाश्वती नाही पण विसारसारणीतच जर देशद्रोहाची (किंवा "देश" ह्या संकल्पनेशी पूर्ण प्रतिबद्धतेच्या अभावाची) बीजे असतील तर मात्र त्या विचारसारण्यांमधून संप, नक्षलवाद, हत्याकांड, बाॅंबस्फोट असली निश्पन्न होतात हे निसंशय. बघा पटतय का बाकी सर्व BBs वरचा राष्ट्रवादाच्या नावाचा शंख मनोरंजक आहे.


Laalbhai
Friday, August 04, 2006 - 9:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ha ha ha ...

back to square one.. वाजवा रे वाजवा... झाले सुरु परत

Samuvai
Friday, August 04, 2006 - 10:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुद्दे मांडा काॅम्रेड.
उसन हसण्याची वेळ तर आपल्या सगळ्यांवरच येणारे बाॅबस्फोट का झाले आणि कुठल्या mentality तून झाले ह्याचा तर्कशुद्ध अभास केला नाही तर (मुद्द्यावर येतो परत).


Samuvai
Monday, August 07, 2006 - 6:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लालभाई,
एक प्रश्न:
सर्व दहशतवादी मुसलमान का असतात?
आता ते अशिक्षित आणि बेकार असतात अशी साम्यवादी कारणे देऊ नका. अशिक्षित आणि बेकार हिंदू, ज्यू, पारशांमध्येही अनेक असतात म्हणून ते स्फोट नाही करत परकियांशी हातमिळवणी करुन.
(ह्या समस्येची तुलना अमिताभ च्या दाढीतल्या फोडाशी होणार नाही अशी माफ़क अपेक्षा आहे)


Laalbhai
Monday, August 07, 2006 - 7:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सर्व दहशतवादी मुसलमान का असतात?
>>>

धार्मिक कट्टरतावाद, वैचारिक मागासलेपणा, स्वार्थी लोकांनी केलेला धर्माचे अपहरण.

जर त्या धर्मातल्या लोकांना, अजुनही बिन लादेन आणि त्याच्या गॅंगमधली लोकं, त्यांच्या धर्माचे शत्रू वाटत नाहीत, यातच त्यांच्या मागासलेपणाचे रहस्य आहे.

"धर्म" याची अतिशय बेसिक व्याख्या, तुम्ही आयुष्य कसे नीतीने जगावे याची guideline यापलिकडे फारशी काही आहे, असे मला वाटत नाही. पण हजारो वर्षापूर्वी लिहिलेली तत्वेच जर जशी च्या तशी लागू करायचा प्रयत्न केला तर तो मूलतत्ववाद. ह्या मूलतत्ववादाने मुस्लिम समाजाला फार मोठ्या प्रमाणावर पोखरले आहे.

मागच्या एका चर्चेत साम्यवादाविषयी बोलताना मी माझे मत सांगितले होते की कोणतीही विचारधारा असो, तिने स्वतःला काळाच्या कसोटीवर वारंवार घासून पाहिले पाहिजे. आणि आवश्यक वाटल्यास त्यात बदल केले पाहिजेत. हेच "धर्मालाही" लागू होते! हजारो वर्षापूर्वी सांगितलेली तत्वे, ही आज जशीच्या तशी लागू होतील, हे समजणे म्हणजेच मागासलेपणा आहे. मुस्लिम धर्माचे रडगाणे हेच आहे. त्यामुळे मूलतत्ववादाकडे झुकणारी लोकं तिकडे जास्त आहेत. (मला तर हिंदू धर्मालाही काही प्रमाणात हा धोका जाणवतोय!)

------------------------

उत्तर

आता साम्यवादात याला उतारा काय, असे तुम्ही विचारण्याआधीच मी सांगतो की साम्यवादात असे काहीही नाही की जे या प्रश्नालाजसे च्या तसे लागू होईल!

तर यावर उपाय म्हणजे माझ्या दृष्टीने मुस्लिम समाजात जे सुधारक आहेत त्यांनी एकजूट करून समाजाचे प्रबोधन जोराने केले पाहिजे. सरकारने मदरसे वगैरे बंद करून शालेय शिक्षण आवश्यक केले पाहिजे. शेजारी राष्ट्रातून येणार्‍या व्यक्तींवर कठोर नियंत्रण ठेवले पाहिजे.

प्रबोधन आणि कठोर निर्णय (आणि त्याची अंमलबजावणी) हे यावरचे दोन अत्यावश्यक उपाय आहेत, असे किमान मला तरी वाटते.

इथे एक लक्षात घेण्यासारखे आहे, की हिंदू धर्मात कृतीशील समाजसुधारकांची आणि विचारवंतांची फार मोठी परंपरा आहे. तरीही हिंदू धर्मातल्या अनेक अनिष्ट प्रथा, मागासलेपणा पूर्णतः गेलेला नाही. त्या पार्श्वभुमीवर मुस्लिम समाजात त्यांना मागे नेणारेच नेते जास्त मिळाले, असे दिसून येते.




Gs1
Monday, August 07, 2006 - 8:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लालभाई आपण खरच उत्तम पोस्ट लिहिले आहे. विशेषत्: उत्तर.

Samuvai
Monday, August 07, 2006 - 9:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एकदम बरोबर.
पण मग्:

१. मदरसे बंद करा फक्त "हिंदुत्ववादी" पक्ष म्हणतात. समस्त लालभाई अशा सरकारच्या मागे आहेत जे मदरशांना सेवाकेंद्रे मानतात.
२. भारतातील एकमेव "लाल" सरकार माहाराष्ट्रातून गठडी बांधून पाठवलेल्या घुसखोरांना "उतरवून" घेते घुसखोरी रोखणे तर दूरच.

लालभाई, काळाच्या कसोटीवर "घासल" जाऊन उरण्याच धैर्य फक्त सनातन धर्माकडे आहे. बाकी धर्म आणि साम्यवादासारख्या भंपक theories ना "घासल" तर संपतील ते.


Samuvai
Monday, August 07, 2006 - 9:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणखीन एक प्रश्न:
आमच्या देशाचा तुकडा तोडून, आमच्या माता-भगिनींना त्यांच्याकडे सोडून येइपर्यंत "त्यांच्या" मनपरिवर्तनाचे प्रयोग झाले आहेत. प्रबोधनाचा परिणाम दिसत नाही आणि कठोर अंमलबजावणी करणारे "जातीयवादी" ठरतात. मग हिंदूंनी करायच काय?


Laalbhai
Monday, August 07, 2006 - 9:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

GS1 :
धन्यवाद! :-)

मी जसे केदार यांना म्हटले तसे विचारसरणीचा द्वेष सोडला तर आपले बर्याचशा बाबतीत एकमत होऊ शकते. After all we all are thinking (and acting) for the betterment of the socity :-)


Laalbhai
Monday, August 07, 2006 - 9:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सामुवाई..

तुमची माहिती निखालस अपुरी आणि अर्धवट आहे.

१. महाराष्ट्रातल्या कोणत्याही सरकारने बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध ठोस कारवाई केलेली नाही. अगदी शिवसेनेच्याही वल्गनाच ठरल्या.

२. बॉंबप्शोट झाल्यावर पहिल्याप्रथम पश्चिम बंगाल सरकारने सिमीची पाळेमुळे खणून काढण्यासाठी प्रयत्न सुरु केला होता.

३. बांगला देश पुरस्कृत दहशतवादाचा सामना गेली कित्येक वर्षे पश्चिम बंगाल सरकार करते आहे.

आणि कुणी जातीयवादी म्हणाले तर why do you bother? when you had a power and you knew what was good for the country and the socity, why did you not execute things which were good for the socity? पण नाही, स्वतःला "जातीयवादाचा" शिक्का लागेल म्हणून घाबरायचे, कारण मतपेटीवर तोटा होतो ना!

काय फरक तुमच्यात आणि तुम्ही ज्यांना शिव्या देता त्यांच्यात? तुम्ही जर तत्वांचे आणि विचारांचे पक्की असता तर, असे कोणतेही शिक्के स्वीकारून तुम्ही देशासाठी जे भल्याचे आहे, ते केले असते... पण नाही. दांभिकपणा म्हणतो तो हाच बरं का समुवै... तत्वांपेक्षा आणि विचारांपेक्षा तुम्हालाही मतपेटीचीच चिंता अधिक आहे.


Laalbhai
Monday, August 07, 2006 - 10:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आमच्या देशाचा तुकडा तोडून, आमच्या माता-भगिनींना त्यांच्याकडे सोडून येइपर्यंत "त्यांच्या" मनपरिवर्तनाचे प्रयोग झाले आहेत. प्रबोधनाचा परिणाम दिसत नाही आणि कठोर अंमलबजावणी करणारे "जातीयवादी" ठरतात.

तुम्ही तुमच्या माता - भगिनींना कुणाकडे आणि कशासाठी सोडले, हे मला माहिती नाही. पण प्रबोधनाचे जे काही मार्ग असतात, ते तुम्हाला शिकवत बसण्यास मला वेळ नाही. थोडा इतिहास (सर्व बाजूंनी) वाचलात तर "प्रबोधन" म्हणजे काय, हे तुम्हालाही कळेल.


मग हिंदूंनी करायच काय?

माझ्या तत्वांप्रमाणे, विचारांप्रमाणे, देशापुढचा कोणताही प्रश्न हा एका विशिष्ठ जमातीचा नसतो. तर तो सगळ्या देशापुढचा असतो. (मी तुमच्याइतका राष्ट्रवादी नाही, त्यामुळे असे असेल कदाचित.)

मुस्लिम दहशतवादाचा प्रश्न हा देशापुढचा प्रश्न आहे. फक्त हिंदूंपुढचा नाही.

जातीयवादाचा शिक्का बसण्याविषयी मी लिहिलेच आहे.


Samuvai
Monday, August 07, 2006 - 10:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फाळणीच्या वेळी "आमच्या" माता-भगिनींच काय झाल "तुम्हाला" माहीत नाही? एकतर तुम्ही खोट बोलताय वा वेड घेऊन पेडगावला जाताय. इतिहासाविषयी अज्ञान म्हणतात ते हेच बर लालभाई.

प्रबोधनाचे मार्ग मला समजावण्या ऐवजी त्यातला एकतरी यशस्वी झालाय का ते सांगा.

खालील प्रश्न तुम्हाला पडलेत का हो कधी:
१. कुराण पुर्णपणे "अपरिवर्तनीय" आहे. आणि त्यातच "जिहाद" सांगितला आहे. मग तुम्ही कस समजावणार "त्यांना"? कारण कुराण सोडल नाही तर "ना"पाक काफीरांना कापण अपरिहार्य आहे आणि कुराण सोडल तर तो मुसलमान रहाणार नाही (अहो, विश्वबंधुत्वाला मान्यता देणारा हिंदूच होईल कि हो तो ...)


युती शासनाच्या वेळी महाराष्ट्र पोलिसांच पथक घुसखोरांना सीमा सुरक्षा दलाच्या ताब्यात द्यायला निघाल होत. साम्यवादी कार्यकर्यांनी train वर हल्ला करुन घुसखोरांना सोडवले होते ह्यावरुन विधानसभेत प्रचंड गदारोळ झाला होता.



Laalbhai
Monday, August 07, 2006 - 11:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ओह्.. पुन्हा इतिहासात अडकलात का? अहो फाळणीच्या वेळेस... जाऊ द्या.. तुम्हाला सांगण्यात काहीच अर्थ नाहीये.

प्रबोधनाचे मार्ग मला समजावण्या ऐवजी त्यातला एकतरी यशस्वी झालाय का ते सांगा.

हिंदू धर्मात मोठ्या प्रमाणावर यशस्वी झालाय. मुस्लिम धर्मात असे प्रयोग मोठ्या प्रमाणावर झालेले नाही. ज्या प्रदेशात झाले तिथले मुस्लिम बरेच बरे आहेत. उदाहरणार्थ तुर्कस्थान.

खालील प्रश्न तुम्हाला पडलेत का हो कधी:

नाही. मला असे प्रश्न पडले नाहीत. पडणार नाहीत. कारण मुस्लिम धर्म मागासलेला आहे, हे मान्य असले तरी तो सुधारणारच नाही, हे मला मान्य नाही. शेवटी धर्म माणसांनीच बनलेला असतो. वळण लावले तर प्राण्यांनाही लागू शकते. मग माणसांना का नाही?

मुळात माझ्या विचारसरणीचा भाग म्हणा किंवा आणखी काही म्हणा.. माणसावर विश्वास ठेवायला मी शिकलोय. ज्यांना हे जमत नाही ते दुर्दैवी असतात!

अगदी तुम्हालाही मी काय म्हणतो ते कळेल असा माझा विश्वास आहेच ना!


युती शासनाच्या वेळी महाराष्ट्र पोलिसांच पथक घुसखोरांना सीमा सुरक्षा दलाच्या ताब्यात द्यायला निघाल होत. साम्यवादी कार्यकर्यांनी train वर हल्ला करुन घुसखोरांना सोडवले होते ह्यावरुन विधानसभेत प्रचंड गदारोळ झाला होता.

तुमच्या हट्टासाठी मान्य केले की असे झाले होते, तर पाच वर्षात याचा एकच प्रयोग का झाला? पाच वर्षात किमान पाच वेळा तरी या घुसखोरांना बाहेर हाकलण्याचा प्रयत्न का नाही झाला?

Samuvai
Monday, August 07, 2006 - 11:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हिंदूंच नाही हो स्फोट हिंदूंनी नाही केले मुस्लिमांच म्हणतोय मी आणि ते ही भारतीय. गांधीबाबासारखी तुर्कस्तानची काळजी कसली करताय? :-) तुमच्या प्रबोधनाने तो ईमाम बुखारी राष्ट्रीय प्रवाहात येईल काय? (तुम्ही हो म्हणाल हो पण ज्यांचा जीव जातो आणि ज्यांचा देश तुटतो त्यांच काय?)
हां. हा बरोबर प्रश्न आहे. पाचदा नाही समूळ नि:पात होईपर्यंत का नाही हाकलले बांगलादेशीयांना. प्रबोधन हिंदूंचच करायला हवय. म्हणजे बहुधा ईतरांच प्रबोधन करण्याची गरजच भासणार नाही.


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators