It was heartening to see little Prince coming out from 60 ft ditch spending almost 50 hours in a dark pit. Salute to brave-heart Prince and Indian Army. Has media sensionalised (hyped) this event and was the show of sympathy and wishes from all corners a real show of humanity?
|
या मुलाला Army, Fire Service & Air Services च्या जवानांनी प्रयत्नाची शर्थ करुन बाहेर काढले आणी हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनी मुलाला २ लाखाची मदत कशासाठी जाहिर केली ते कळतच नाहिये... या बातमी मध्ये ( mid-day च्या साईट वर) त्या जवानांच्या कौतुकाचे ४ शब्द देखील नाहीत...!!
|
सगळ्यात हाईट म्हणजे, झी वर सारखे ही बातमी दाखवत होते आणि हितचिन्तकांचे संदेश, फ़ोन वगैरे पण होते, तर त्यात एक बाई म्हणे झी का बहोत धन्यवाद! हम कल से सिर्फ़ यही चॅनल देख रहे है.. ऐसी रोमांचक खबरे और दिखानी चाहिये!!!! म्हणजे अपेक्षा काय या बई ची? रोज असेच काहीतरी घडावे आणि आपल्याला चघळायला मिळावे?? btw ज्या पद्धतीने perfect Planning करून योग्य ती काळजी घेऊन हे operation यशस्वी केले ते पाहून छान वाटले! आपल्या देशात किडामुन्गीइतकी पण मनुष्य जिवाला किम्मत देत नाहीत असे म्हटले जाते पण इथे इतक्या सगळ्यांनी जिवापाड मेहनत केली एका लहानग्यासाठी! gr8 job! आणि आता श्रेय घेण्यासाठी मिडियाचे चढाओढ चाललिय!! झी वाले तर त्या मुलाचा जीव वाचल्याचे पण श्रेय स्वतलाच घेत आहेत!!आनन्द आहे सगळा!
|
Seema_
| |
| Monday, July 24, 2006 - 3:06 am: |
| 
|
आज आमच्या ईथे १८ wheeler truck चालवणारी एक बाई थोडावेळ कुठतरी थांबली असताता तीचे लक्ष नसल्याचे पाहुन एक african american माणुस तीच्या truck मध्ये चढला . Gun point वर ठेवुन त्याने त्या बाईला truck चालवायला लावले . गडबडीन निघताना नेमका truck police car ला dash मारुन निघाल्यामुळ cop च्या लक्षात आल आणि त्यानी chase चालु केला . It was slow speed chase. कारण थोड्याच वेळात truck ची पुढची दोन चाक निखळली . पुर्णपणे expressway बंद करण्यात आला . जवळपास 3 and 1/2 hr chase चालला होता . channel 8 live दाखवत होते. kidnap करणार्या माणसान negotiators बरोबर बोलण सुरु केल्यावर आधी channel 8 वाल्याशी बोलणार अस सांगितल . कारण , प्रसिद्धी आणि मागण्या कळाव्यात म्हणुण . channel 8 वाल्यानी आपल्या news corrospondent बरोबर kidnapper बोलल्याबद्दल Full news केलेली . सारख chanel 8 च महत्व ठसवण्याची धडपड चालु होती . पण त्याच बरोबर पोलिस ज्या धाडसान आणि कुशलतेन हे सगळ handle करत होते त्याच खुपच कौतुक करत होते . even इतर पोलिसांच्या मदतीन traffic कस स्मूदली सुरु आहे हे सुद्धा कव्हर करायला ते विसरले नाहीत . त्यांच म्हणन होते There is nobody like DPD. They are the best. And we are proud of them सांगायच मुद्दा काय , media वाले बातमी खमंग होण्यासाठी आणि स्वताला credit मिळवण्यासाठ हे असले उद्योग करतच रहाणार . आणि इतक्या सगळ्या channel मधुन टिकुन रहाण्यासाठी त्यान तो मार्ग सोपा वाटत असावा . रोज त्याना अशा थरारक बातम्या मिळणार तरी कुठुन ना ? आणि लोकच याला चालना पण देतात . फ़क्त त्यानी खर्या hero ना ( वरच्या case मध्ये लष्कराचे जवान ) ही तेव्हढेच coverage द्याव इतकच . पण लक्षात कोण घेणार ?
|
Prady
| |
| Monday, July 24, 2006 - 1:00 pm: |
| 
|
ह्या prince ची बातमी आज CNN वर पण सांगताहेत. खालच्या सरकत्या पट्टीवर मगाशीच वाचली.
|
Bee
| |
| Monday, July 24, 2006 - 4:02 pm: |
| 
|
मी आज वरचे पोष्ट्स वाचले आणि घरी आल्यानंतर बातम्या बघितल्या तर संपूर्ण बातम्यात प्रिन्सबद्दलच सांगत होते. ५० तास तो फ़क्त ५ वर्षांचा मुलगा खाली ६० फ़ूट जमिनीमध्ये राहिला. केवढा कष्ट बिचार्या त्या जीवाला. बघता बघता माझे हृदय भरून आले. त्याच्या घरच्यांना काय वाटले असेल ह्याची तर कल्पनाच करवत नाही. मला एक गोष्ट्स कळलीच नाही. ज्या खड्ड्यात तो मुलगा पडला त्यास व्यास किती होता? ज्या अर्थी जो मुलगी पडला आणि तो जमिनीवर आडवा होता त्या अर्थी वरतुन दोर बांधून कुणीतरी खाली उतरू शकत नन्वत का? मला बातम्या बघून काहीच कळत नव्हते की नेमका तो खड्डा कसा होता. त्यात त्यांनी अजुन एक सुचवले होते की बाजूला आणखी एक खड्डा खोदावा. शेवटी तसेच केले आणि म्हणूनच पन्नास तास लागले. खरच केवढे करावे लागले सैनिकांना.. वर असेही वाटले हीच घटना जर अमेरिकेत घडली असती तर त्यांच्याकडे काही खास resources असते का की आपल्या देशाप्रमाणेच त्यांनीही वेळेची वाट बघितली असते. इतके तास लागले असते का? वर हा खड्डा बोअर वेलचा होता म्हणजे बराच निमुळता असेल. आणि वरुन काय माती पडत होती त्या मुलाच्या अंगावर.. अरेरे. काहीकी असो शेवटी तो सहीसलामत वर आला हीच फ़ार मोठी कृपा झाली.
|
अमेरिकेत घडली असती तर त्यांच्याकडे काही खास resources असते का की आपल्या देशाप्रमाणेच त्यांनीही वेळेची वाट बघितली असते>>> बी अरे, काही महीन्यापुर्वीच अमेरिकेत सेगो ( की सेगा) माईन प्रकरण घडले आहे. त्यात १३ जन गेले. अम्रेरिकेने पण तसाच वेग़ळ खड्डाच खणला असता. कारण तोच एक उपाय होता. तो मुलगा ज्या खड्ड्यात अडकला होता त्या खड्याच्या व्यासात मोठा माणुस जाउ शकत नव्हता. बाजुला एक जुनी विहीर होती. जर मशीनरीने खणण सुरु केले असते तर तो लहान मुलगा ज्या खड्ड्यात होता त्याला क्षती पोचली असती म्हनुन आर्मी ला हाताने खड्डा खणावा लागला.त्या साठी ५० तास लागले. त्या आर्मी च्या Project Manager च खरच कओतुक करायला पाहीजे.
|
बी अरे तो खड्डा फ़क्त १ फ़ूट व्यासाचा होता. तो मुलगा आत पडला पण बाहेर काढणे इतक्या अरुन्द जागेतून शक्य नव्हते! पण जिथे तो बसल होता ती जागा जरा रुन्द होती. त्यामुळे भुयार खणून दुसर्या बाजूने बाहेर काढणे हाच एक मार्ग होता. आणि हो अमेरिकेत पण सेम अशीच केस झाली होती काही वर्षापूर्वी. तेव्हाही जेसिका नावाच्या लहान मुलीला याच पद्धतीने काढले होते बाहेर. आता 1-2 वर्षापूर्वी पेनसिल्वानिया मधे एका खाणीत पाणी शिरले आणि एका अरुन्द pocket मधे १० लोक अडकले होते त्या पाणी भरलेल्या खाणीत. तेव्हापण त्या लोकांना असेच दुसर्या बाजूने tunnel करून बाहेर काढले होते. तेव्हाही असेच 2-3 days media ने असेच फ़ुल्ल कव्हरेज दिले होते. त्यामुळे मला नाही वाटत आपल्या आर्मीने वेळेची वाट पाहिली वगैरे. योग्य ती काळजी घेतली इतकेच.
|
Dineshvs
| |
| Monday, July 24, 2006 - 5:12 pm: |
| 
|
अरे असा खड्डा, ऊघडा राहुच कसा दिला जातो ? आपल्या कायद्यात हजारो सुरक्षिततेचे नियम आहेत, ते फक्त कागदावर, विहित नमुन्यात माहिती भरुन देण्यासाठी आणि त्या निरिक्षकाला चरण्यासाठीच आहेत का ? या बाबतीत, जबाबदार रादर बेजबाबदार व्यक्तीला शिक्षा होणार आहे का ? उत्तर " नाही " असेच आहे.
|
Dinesh77
| |
| Monday, July 24, 2006 - 8:24 pm: |
| 
|
प्रिन्सचा किस्सा पेपर मधे वाचला. पण मला ऐक कळत नाही त्या मुलाला पाच सहा लाखाची मदत कशासाठी? त्याला औषधोपचार वगैरे ठिक आहे पण पाच सहा लाख? असे पैसे अनाठयी वापरले जात आहेत असे नाही वाटत? ज्यांना खरी गरज आहे ते राहीले बाजूला. मला पण आता कुठल्या तरी खड्ड्यात पडावेसे वाटू लागले आहे. मला कोणी वीस पंचवीस लाखाची मदत करेल काय? (वयानुसार पैसे वाढवले आहेत) }
|
Yog
| |
| Monday, July 24, 2006 - 8:33 pm: |
| 
|
dinesh77, अगदी अगदी... "खड्ड्यात गेली मुम्बई" असे घडले तर मुम्बईला केव्हडे मोठे आर्थिक package मिळेल नाही? 
|
Atul
| |
| Monday, July 24, 2006 - 9:51 pm: |
| 
|
लष्कर आणि त्या मुलाचे खरेच कौतुक आहे, एवढा छोटा मुलगा इतका वेळ तग धरुन होता हेच विशेष.
|
Bee
| |
| Tuesday, July 25, 2006 - 1:16 am: |
| 
|
मी फ़क्त इतकेच ऐकले की झीने त्या मुलाच्या शिक्षणाचा खर्च उचलला आहे. आता त्याचे शिक्षण कितीतरी वर्ष चालेल तोवर झीचे विचार कितपत बदललात कोण जाणे. पण सध्य त्यांनी त्या मुलाला मदत केली आहे इतकेही पुरे आहे. झीलाही publicity ची गरज आहे. तो मुलगा त्यांचे एक उत्तम माध्यम बनला आहे. सरकारने त्याला ५ / ६ लाख देऊ केले हे नव्हते ऐकले मी. हे थोडे illogical गणित झाले. त्या मुलाला लष्करी सैनिकांची मदत मिळाली इतकी सरकारनी मदत केली ती पुरेसी झाली. दिनेश ७७ म्हणतात तसे भारतात सगळेच मग खड्ड्यात पडलील. चांगली कल्पना आहे. दिनेश पडणार का मग KP, MT thanks!!!!!!
|
Bee
| |
| Tuesday, July 25, 2006 - 1:31 am: |
| 
|
काल मी ५० फ़ूट म्हणजे किती खोल असेल ह्याचा विचार करत होतो. मला मीटर मध्ये कल्पना करायला जमले असते. पण ऐनवेळेवर किती फ़ूट म्हणजे एक मीटर हे काही आठवले नाही. मग मी विचार केला माझी उंची अमूक अमूक आहे म्हणजे माझ्या डोक्यावर अजून ९ ते १० बी उभे राहिले की तो खोल खड्डा तयार होईल. अबब
|
Dinesh77
| |
| Tuesday, July 25, 2006 - 2:03 pm: |
| 
|
तोच विचार करतोय. फ़क्त खड्डा शोधतोय
|
आता इथे २ दिनेश झाले! ५० फूट म्हणजे साधारण ५ मजले. इथे फ्लॅटची उंची १० फूट धरली आहे.
|
Laalbhai
| |
| Wednesday, July 26, 2006 - 2:21 am: |
| 
|
मार्मिक कार्टून आहे अगदी.
|
Aadi_gem
| |
| Wednesday, July 26, 2006 - 5:07 am: |
| 
|
50 foot khali paDlyaavar haaD model na..??? aankhi ek HEIGHT.... eka reporter ni Sonia gandhila vicharle... tenva ti mhanali ki, "asa karaa, ek dori aat soda aani tya mulala var odhun ghya....!" (yaa nantar mi aani maza bhau 2 taas hasat hoto :-)) aata he jar itaka sopa asata tar army ni nasata kela kaa...???
|
Bee
| |
| Wednesday, July 26, 2006 - 5:53 am: |
| 
|
मला तरी सोनीयाच्या त्या विधानात काहीतरी तथ्य वाटतेय. तो मुलगा ज्या अर्थी खाली पडू शकतो तसा तो वरही येऊ शकतो त्याच मार्गानी दोरीच्या सहाय्यानी. पण त्याला इतके कळायला पाहिजे ना की दोर गच्च धरून ठेवावा. शरीर शक्य तितके निमुळते करावे म्हणजे तो वर येऊ शकेल. तो प्रतिसाद द्यायला खूप लहान होता.
|
Rahul16
| |
| Wednesday, July 26, 2006 - 6:35 am: |
| 
|
aadi_gem, sonia gandhicha joke hota ka....??? reporter ne soniya la kashyakarata vicharawe aani kay vicharawe???.....99% indian reporters la seriously ghet jau naka.....tyach tya batmya sangun sangun aani tech tech prashna vicharun tyanche doke kharab zale aahe.
|