Santu
| |
| Friday, June 23, 2006 - 8:09 am: |
| 
|
तेथिल अजुन काहि छाया चित्रे हे देवुळ सम्पुर्ण पहायला ४ दिवस लागतात ५००एकर वर आहे  
|
Abhi9
| |
| Friday, June 23, 2006 - 1:51 pm: |
| 
|
संतू भाऊ, लै झकास. by the way हे मंदीर नक्की कुठे आहे ते सांगता येईल का?
|
Santu
| |
| Friday, June 23, 2006 - 2:15 pm: |
| 
|
अभि अरे हे देवुळ आहे. कम्बोडिआ येथे अरे angakorwat temple य साइट वर भरपुर महिति मिळेल. हे देवुळ ९ शतकात बांधले याला ३७ वर्षे पुर्ण व्हायला लागली.सम्राट सुर्य वर्मन(दुसरा) याने ते पुर्ण केले  
|
Aschig
| |
| Friday, June 23, 2006 - 10:21 pm: |
| 
|
संतु एक्-दोन गमतीदार गोश्टि सांगाव्याश्या वाटतात या संदर्भात. बामीयन्ची मुर्ती ही Greek लोकांमुळे बनली. बुद्धाने मुर्तीपुजेला विरोध करुनदेखील त्याच्या म्रुत्युनंतर बोधीसत्वाच्या मुर्त्या बनु लागल्या. ह काळ होता साधारण २२०० वर्शांपुर्विचा. त्या पासुनच हिंदुनी मुर्तिपुजेचा विडा उचलला. त्या आधी हिंदु मुर्त्या नसत. लोकांचा कल स्वतःच्या आत पाहुन मोक्श मिळवण्याकडे होता तो लोखन्डी खांब १६०० वर्श जुना आहे.
|
Santu
| |
| Saturday, June 24, 2006 - 1:21 pm: |
| 
|
aschig तुझे म्हनने बरोबर आहे.वरिल जो पिलर आहे तो १६००वर्षे जुना आहे. तो पुर्वी उदयगिरि येथे होता गुप्त यान्च्या राज्यात तेथुन सुलतान अल्त्मश याने १२३३ ला उदयगिरि चा पाडाव करुन दिल्लित आणला.पुर्वि त्याच्या top ला एक चक्र होते(सुदर्शन) बहुतेक आणताना तुटले असणार. या पिलर ची प्रतिक्रुति उदयगिरि च्या गुहा मधे कोरलेली आहे त्यात हे चक्र दिसते हा विष्णु स्तंभ आहे
|
Zakki
| |
| Saturday, June 24, 2006 - 3:52 pm: |
| 
|
संतू, आस्चिग, तुम्ही फारच मनोरंजक माहिती दिली आहे. विशेषत: मूर्तिपूजा २२०० वर्षांपूर्वी सुरू झाली हे खरे असेल तर आता मूर्तिपूजेचेच काय देवळांचे तरी स्तोम का माजवावे? एक मुद्दा याविरुद्ध असा की मूर्तिपूजा ही केवळ मनात देवाची जाणीव रहावी म्हणून वापरली जाते. नाहीतर बर्याच लोकांना रोजच्या कटकटीत देवाचे स्मरण रहात नाही. म्हणून दैनंदिन व्यवहारात एकदा तरी देवपूजा करावी. नंतरच्या काळात असे झाले असावे की, सगळ्यांनाच चांगल्या मूर्ति कुठून मिळणार? म्हणून झाडे, साप, कुठलाहि दगड यांनाच देव मानून पूजा करू लागले असावेत लोक. शिवाय आपल्या सनातन धर्मात अमुक एकच देव आहे (विष्णू किंवा शंकर) असे नाहीच आहे, म्हणून मग तेहेत्तीस कोटी देव झाले. असे सगळे मला वाटते, माझा तसा काही अभ्यास नाही किंवा कुठे वाचले म्हणून मी असे म्हणत नाहीये. तेंव्हा खुश्शाल माझे म्हणणे खोडून काढा, तेव्हढेच मी काही तरी शिकेन. पुन: एकदा धन्यवाद.
|
Santu
| |
| Sunday, June 25, 2006 - 5:56 am: |
| 
|
जक्की देवपुजा करणे हे एक प्रकारचे meditation आहे.किंवा भक्तियोग आहे म्हणाना.तसेच भजन म्हणने,माळ जपणे,नामस्मरण करणे. हे सुध्दा योग आहे. म्हणुन तर विवेकानन्द सुध्दा काली ची पुज करत असत.तुकोबा भजनात गुन्ग होत असत. पण आपण मुर्त्या २२०० वर्षा पासुन ग्रीकां पासुन शिकलो हे काय पटत नाहि.कारण हाल्ली बेटद्वारका(हल्ली च्या द्वारके पुढे समुद्रात) उत्खनन केले तेव्हा काहि मुर्ति चे कार्बन डेटिंग हे ५०००वर्षा पर्यंत गेली आहे.
|
Santu
| |
| Sunday, June 25, 2006 - 6:32 am: |
| 
|
उलट काहि archiologist व anthropologist यान्च्या म्हणण्या नुसार. हिन्दु mythology चा मोठा प्रभाव ग्रिक लोकां वर आहे. उदा: वरुण्= ouranos शिव= dyonosus हि देवांची नावे जी पर्शिअन फ़ौज ग्रीकावर ४८० b.c. मधे चालुन गेली त्यात भारतिय सैन्या ची तुकडि होति. हल्लि memphis येथे काहि भारतिय लोकान्च्या modeled head 500b.c मिळाले. हे लोक तिथे व्यापारा साठि राहात होते. याचा अर्थ २५०० वर्षा पुर्वि पासुन हे चलन वलन चालु असले पाहिजे. alexander च्या पुर्वि पासुन.
|
Zakki
| |
| Sunday, June 25, 2006 - 1:02 pm: |
| 
|
पूर्वी इथे झेन च्या गोष्टींचा शेवट, ' आणि त्याला अंतिम सत्य समजले' अश्या अर्थाचा होत असे. रॉबिनहूड, तुला अंतिम सत्य समजले! आता तुझा शेवट व्हायला हरकत नाही(?!)
वा फारच मनोरंजक माहिति आहे इथे. काहो, भविष्य शास्त्रात ज्या राशी आहेत, मेष वगैरे, त्याहि आपण ग्रीक लोकांकडून उचलल्या, पूर्वी आपल्याकडे फक्त नक्षत्रे माहित होती असे म्हणतात. खरे, खोटे?
|
अहो बोवाजी झेन गोष्टींचे काय एवढे मनावर घेता.... ते तत्वज्ञान आपले नव्हे म्हणून खरेही नव्हे.
|
Aschig
| |
| Sunday, June 25, 2006 - 5:08 pm: |
| 
|
वेद हे निर्गुण ब्रह्मन मानीत. मुर्तिपुजा हे अनेक शतकांनंतर आलेल्या सगुण ब्रह्मनचे ध्योतक आहे. वेदांमध्ये केवळ नैसर्गीक अशा वरुण, अग्नि इत्यादींचे स्तवन आहे. आपल्या मेंदुचे evolution हे बाह्य जगताचे modelling करुन झाल्यामुळे आपल्याला icons व idols ची गरज भासु शकते. त्यात गैर काहीच नाही, पण वेदांमध्ये मात्र अद्वैताचा प्रभाव सर्वदुर जाणवतो. वेदांताचा Hinduism हा अनेक देवतांना मानणारा (polytheistic) धर्म नसुन एकच ब्रह्मन मानणार (monotheistic) आहे.
|
Santu
| |
| Monday, June 26, 2006 - 8:21 am: |
| 
|
जक्की अहो हिन्दु लोकांनी काहिच उचलले नाहि. उलट ग्रिकांवर हिन्दु चा (वैदिक संस्क्रुती)चा परिणाम झालाय. पुर्वि ग्रिक लोक हे सुध्दा हिन्दु सारखे दहन करत. पायथागोरस च्या आधी २०००वर्षे अर्यावर्ता तल्या क्रुशींना solar systim ही gravitational force नी एकत्र आहे हे माहिति होते. dick tereci हा त्याच्या ancient root of modren scince या पुस्तकात लिहलेय आता हे पहा रुग्वेदात असे वर्णन आहे. तथा चा स्मर्यएत योजनानाम सहस्रे द्वे द्वे शते द्वे च योगाने एकेना नीमीषार्धेना क्रममाणा नमो स्तु ते इती. याचा अर्थ (हे सुर्या तु अर्ध्या minit मधे २२०२ योजने जातोस.) आता १निमिश्=१६\७५ second १ योजन्=९मैल या हिशोबाने १सेकंदात सुर्य १८६०००मैल जातो्ए आजच्या हिशोबाने acurate आहे. हे विश्लेषण max mullar ने केले होते.तो वेदांचा अभ्यासक होता. रुग्वेदात सर्व राशिन्चा उल्लेख आहे हा griko-babylonian लोकां पेक्षा आधिचा उल्लेख आहे
|
Aschig
| |
| Tuesday, June 27, 2006 - 9:03 am: |
| 
|
santu , ग्रीक लोकांशी बराच संबंध असुन देखील भारतियांनी जर त्यांच्याकडुन काहीच घेतले नसेल तर ती अतीशय दुर्दैवाची बाब मानावी लागेल कारण कोणतीच संस्कृती परीपुर्ण नसते. तुम्ही दिलेल्या ऋचेच्या आसपासच्या ऋचा कशाबद्दल आहेत? त्या देखिल प्रकाश, सुर्य इ. भौतीक विषयांबद्दल आहेत की इतर random विषयांवर आहेत? heliocentric theory आर्यभटाला माहीत असायची शक्यता खुपच आहे. दुर्दैवाची गोष्ट ही की आम्ही त्यातच आंनद मानुन समाधानी रहातो. पुढे काय यावर जास्त लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.
|
Santu
| |
| Tuesday, June 27, 2006 - 2:32 pm: |
| 
|
aschig या मि ज्या रुचा दिल्यात त्या सुर्या वरच्या आहेत 4th verse of hymn no 1.50 सायना(१३१५-१३८७) म्हणुन एक बुक्का पहिला या विजयनगर सम्राटा कडे हा एक मंत्री होता.त्याने रुग्वेदावर भाष्य लिहिले होते.त्यात हि रुचा आहे हे भाष्य १८९० ला print केली मॅक्स मुल्लर ने त्यासाठि त्यानेच सान्गितल्या प्रमाणे ४०० वर्षे जुने manuscript वापरले होते.म्हणजे हे रोमेर च्या पण आधिचे manusript आहे. दुसरे वायु पुराणामधे 1500yr old सुध्दा विश्वाचि cycle म्हणजे निर्मिति व विनाश हि ( 8.64billin years this fact now agreed by modern scintist ) सान्गितली आहे हि गोष्ट पण याला दुजोरा देते. ग्रीकानी कडुन आपण काय घेतले हे काय अजुन समजत नाहि. पण जुने इतिहासकार हे बरेच श्रेय आपल्या civilisation ला देत नाहित कारण हे पुरावे तेव्हा उपलब्ध नव्हते तेव्हा त्यांची पण काय चुक नाहि म्हणता येणार.
|
Aschig
| |
| Wednesday, June 28, 2006 - 6:31 am: |
| 
|
santu तुम्ही दिलेली ऋचा मला काही आढळली नाही (१.५० सुर्याबद्दलच आहे, तरीही) Rigved 1.50 4 वेदांमध्ये आपल्या पुर्वजांना सुर्याच्या गतीशी काही देणे घेणे होते असे मला तरी वाटत नाही.
|
Santu
| |
| Wednesday, June 28, 2006 - 12:45 pm: |
| 
|
तुम्हि a tribute to hinduism या साईट वर जावुन त्यातल्या advane sciences मधे पाहा त्यात हा उल्लेख आहे. अजुन बरिच माहिति आहे त्यात.
|
Aschig
| |
| Wednesday, June 28, 2006 - 4:08 pm: |
| 
|
इतर अनेक ठिकाणी तो reference आहे. असे सहज शक्य आहे की एखादा चुकीचा मुद्दा नुसते असे references पाहुन फोफवतो आहे. मी जी link दिली आहे ती मुळ ऋग्वेदाची आहे. Tribute to Hinduism सारख्या sites त्यांच्या हेतुमुळे biased सहजच असु शकतात. त्यातील नासदीय सुक्ताचाच भाग घ्या. Cosmology बद्दलची, उत्पत्ती बद्दलची शेवटची ओळ अर्धवटच दिली आहे. असे का असावे? कारण साधे आहे त्याच ओळीच्या दुसर्या भागातुन जाणवते की वेदकर्त्यांना विश्वाची उत्पत्ती नेमकी कशी झाली हे माहीत नसावे त्यामुळे त्यांची पात्रता कमी होते असे मुळीच नाही. आपल्याला आपल्या heritage बद्दल गर्व जरुर असावा, पण इतक्या चांगल्या गोष्टी आहेत की तो चुकीच्या गोष्टींकरता असायची काहीच गरज नाही. तुम्हाला काय वाटतं?
|
Santu
| |
| Thursday, June 29, 2006 - 2:16 pm: |
| 
|
ascchig मॅ क्स मुल्लर यांचे सायनाचार्य याच्या रुग्वेदा च्या संहिते वर ६खंड १८९० ला प्राकाशित झाले होते त्यात तर हा उल्लेख आहे. व मॅक्स मुल्लर चि विश्वसनियता वादातित आहे. मग सध्याच्यच्या आव्रुत्तित हा उल्लेख का नाहि हे मला सांगता येणार नाहि. तुमच्या पण बोलण्यात तथ्य आहे. तसेच भास्कर भट्ट यांच्या तैतरीय ब्राहम्ण वरील टिके मधे पण हा उल्लेख आहे. हा मॅक्स मुल्लर विषयी चा उल्लेख wikipedia या साईटवर सुध्दा आहे.
|
Zakki
| |
| Thursday, June 29, 2006 - 8:17 pm: |
| 
|
वरच्या लिंक वरून ऋग्वेद कुठे वाचायला मिळेल ते कळले, पण त्याचा इंग्रजी अथवा मराठीत अर्थ सांगणारी पुस्तके किंवा लिंक कुठे मिळेल?
|
झक्की, english मधे येथे माहीती मिळेल. http://www.vedicbooks.com/catalogue.htm पुण्यनगरीत कोणी असेल तर कोथरुड डेपोजवळील वेदपाठशाळेत (वेदभवन) जायला सांगा तिथे अनेक पुस्तक आहेत.
|