|
Laalbhai
| |
| Monday, July 17, 2006 - 7:21 am: |
| 
|
अरे शुरुमेही हार मान रहे हो. केदार मी "आमच्याबद्दल" बोलत नव्हतो! घटना बदलायची इच्छा कुणाची आहे, हे का आता मी सांगायला हवे?
|
Laalbhai
| |
| Monday, July 17, 2006 - 7:23 am: |
| 
|
मुख्य म्हनजे राज़कारणात सुशिक्षीत लोक आले पाहीजेत अगदी पूर्ण पाठिंबा.. ..
|
Moodi
| |
| Monday, July 17, 2006 - 8:09 am: |
| 
|
झकास अहो जे तुमच्या मनात आहे, तेच आमच्याही मनात आहे, पण सत्तेसाठी लांगुलचालन करणार्या, कायदा हवा तसा वाकवणार्या राजकीय नेत्यांना हे जमेल का? हा लेख बघा. http://www.loksatta.com/daily/20060717/vishesh.htm
|
Zakki
| |
| Monday, July 17, 2006 - 12:39 pm: |
| 
|
पण बहुतेक शिक्षीत लोक तर अमेरिकेत आहेत? थांबा केदारजोशी, हे खरे नाही हो! अजिबात खरे नाही. का उपरोधाने म्हणाला होतात तुम्ही? मग बरोबर आहे. भारतातहि अनेऽक, कोट्यवधी हुषार, कर्तबगार, कळकळीचे कार्यकर्ते आहेत. त्यांना खरे तर भारताबद्दल फार जवळून माहिती आहे. जर काही शंका असेल, तर 'net' वर त्यांना काहीहि कळू शकते. असे बरेच लोक राजकारणापेक्षा लोकांना मदत करतात. (जसे काही डॉक्टर फुकट तपासणि, औषधे देतात, खेड्यांमधे जाऊन काही लोक शिकवतात इ.) त्यांना त्यांची कुवत माहित असेल, एकदम सगळा देश सुधारणे शक्य नाही, पण जेव्हढे करणे जमेल तेव्हढे करावे असे त्यांना वाटत असेल. कदाचित् ते इतरांना असे काम करायला प्रवृत्त करून, सर्व समाजच, हळू हळू का होईना, स्वत:चे भले करेल असे त्यांना वाटते. कदाचित् त्यांचे goals वेगळे असतील, कदाचित् ब्रम्ह सत्यं जगन्मिथ्या हे अंतिम सत्य त्यांना कळले असेल. म्हणून ते या बाबतीत काही करत नाहीत.
|
झक्की, त्या वाक्याला उपरोधाची झलक तर होतीच पण मला हे म्हनायचे होते की शिक्षीत लोक राजकारणात उतरत नाहीत. अमेरिका ह्यासाठी लिहिले आहे की भोग आणी चंगळवादाचे हे चांगले उदाहरण आहे. just एक उपमा दिली. अमेरिकेतच त्या शिक्षीतांनी राहायची गरज नाही अगदी भारतात राहुनही ते एकदम cool असतात. काही घेने देने नसते. त्यांनी अगदी थोडे जरी सामाजिक काम केल, कोणाला मदत केली तरी पुरे, पण माझ्या पाहान्यातले बरेच शिक्षीत लोक नुसत्या गप्पा मारतात, काम करायची तयारी नाही. गरीब वस्तांत जाउन शिकन्याचे महत्व पटवुन देन्यापेक्षा multiplex मधे जाउन macdy चा burger किंवा pizza खाउन एखादा पिक्चर पहाने हे त्यांना चांग्ले वाटते. त्सुनामी आल्यावर मी ईथे अमेरिकेत मदत निधी गोळा करत होतो. ७० टक्के लोक मला म्हनाले की ते पैसे खर्या लोकांकडे जानार नाहीत म्हनुन ते contri करनार नाहीत. आता खरे लोक म्हनजे काय? हे स्वत्: तर जाउन मदत करत नाहीत पण कोनी मदत करत असेल तर त्याला पैसे पण देत नाहीत. अशा लोकांसाठी मी शिक्षीत शब्द वापरला कारण ते सु शिक्षित नाहीत म्हनुन. हो तुमचे अगदी बरोबर आहे की राजकारणाशिवाय बरेच लोक मदत करतात पण ती कमी पडते आहे. पण जर system बदलायची असेल तर तर राजकारणातच उतरावे लागेल. झक्की, तुम्ही मला अहो वैगरे म्हनु नका कारण की तुम्ही अहो जाहो म्हणावे ईतका मोठा मी नाही.
|
Zakki
| |
| Monday, July 17, 2006 - 4:38 pm: |
| 
|
जेंव्हा लातूरच्या भूकंपासाठी मदत पाठवली होती ती ज्यांना गरज आहे, त्यांना मिळण्या ऐवजी दुसर्याच लोकांनी दाबून ठेवली नि ते कपडे, ब्लेंकेटे विकली! त्यानंतर इथल्या बहुतेकांना भारतात मदत पाठवण्याबाबत शंका आहे. आता कुणि स्वत: च्या देखरेखीखाली अशी मदत केली तरच होईल, नाहीतर विसरा. माझा एक अत्यंत हुषार, नि रिलायन्स मधे Vice president होऊन रिटायर झालेला मित्र आहे, नेहेमी भारतातच राहिलेला. त्याचे अनुभव पुढे कधीतरी कुठेतरी लिहीन.
|
Laalbhai
| |
| Monday, July 17, 2006 - 5:22 pm: |
| 
|
माझ्या पाहान्यातले बरेच शिक्षीत लोक नुसत्या गप्पा मारतात, काम करायची तयारी नाही. केदार तुमच्या वरच्या संपूर्ण पोस्टला माझा पूर्ण पाठिंबा आहे. चुकीच्या समजुती, सभोवतालच्या परिस्थितीचा अभ्यास करण्याची तयारी नाही, समाजाचे आपण काही देणे लागतो ही जाणीव नाही, फक्त आमच्या हक्कांवर गदा आली नाही पाहिजे, हा दुराग्रह! पण हक्क शाबुत रहावेत म्हणून कोणतेही कष्ट करण्याची तयारी नाही. या सगळ्यातून केवळ द्वेष वाढीला लागतो. त्याचे प्रातिनिधिक स्वरूप आपण मायबोलीवरही पहातो आहोच!
|
मी लिहिणार आहे ते या बी बी च्या विषयाशी सम्बन्धित नाही. पण झक्कींच्या पोस्टच्या सम्बन्धात मात्र आहे. या लातूरच्या भूकम्पात मी रीलीफ कार्यात होतो २ महिने. जबाबदारीच्या पदावर. तत्पूर्वी १९९० च्या कोकणातील महापुरातही होतो. दोन्ही ठिकाणी झोपायला जागा नाही म्हणून जीपमध्ये व प्रसंगी सकाळच्या नाश्त्यावर दिवस काढले आहेत. ते जाऊ द्या, पूरग्रस्ताना मदत म्हणजे लोकांची एकच कल्पना आहे ती म्हणजे जुने कपडे देणे!! विरलेल्या साड्या, भोके पडलेली बनियन्स, पोरांच्या outdated चड्ड्या इ. वस्तू लोक उदार मनाने व त्यागाच्या भावनेने देतात.... या आपत्तीत एक लफडा होतो.लोकाना वस्तू देताना पाचपोच नसतो. रायगडच्या कातकर्याना त्यानी stretchlon च्या पॅंटी वाटल्या. लातूरच्या खेड्यातील बायकाना पन्जाबी ड्रेस!कोणीही यावे स्टोव्ह, बादली देउन जावे.. या मंडळींकडे भांड्यांचे चार चार पाच पाच सेट होतात त्याचा त्याना काही उपयोग नसतो...तसेच असंबद्ध कपड्यांचे. मग ही मंडळी त्या जादा मदतीत मिळालेल्या वस्तू बाजारात विकून पैसे करन्याचा प्रयत्न करतात अन पेपरात बातम्या येतात आपत्तीग्रस्तांची मदत बाजारात अथवा यंत्रणेने अफरातफर केली.. लातूरला त्यावेळी भूकम्पाबरोबर खूप जोरदार पाऊसही असे.आम्ही सारखे फ़ील्डवर भिजायचो. एक NGO वाल्यानी तक्रार केली की एका अधिकार्याने मदतीतले कपडे चोरून परिधान केले आहेत तुम्ही कारवाइ करा.त्यावर पेपरात चविष्ट बातम्या आल्या... वरिष्ठानी त्याना बोलावले तुम्ही मदतीतील कपडे घेतलेत का? तो अधिकारी म्हनाला'हो, हा काय अंगावरचा कोट त्यातलाच आहे' वरिष्ठ उखडले म्हणाले लाज नाही वाटत का? याना कळेना काय झाले ते. शेवटी त्यानी सांगितले'अहो मी पावसात खूप भिजलो म्हणून कपडे काढून सुकायला टाकले तोपर्यन्त आॅफिसात उघडे बसता येत नाही म्हणून हा कोट सामानातून काढून घातला होता...' तिकडे पेपरात जोरात बातम्या मढ्याच्या टाळूवरील लोणी वगैरे वगैरे... तात्पर्य काय मदतीत अपहार होतो हे अर्धसत्य आहे प्रत्यक्ष वस्तुस्थिती वेगळी असू शकते... या अमेरिकेतून मदत म्हणून पॅक टिनमधून पोर्क देखील आले होते अर्थात आम्ही ते वाटले नाही ते सोडा. गम्मत म्हणजे तिथले लोक desperately चहा पत्ती व साखरेची मागणी करीत.शेवटी नगरमधील एका साखर कारखानदार पुढार्याला फोन करून हे पदार्थ मागवले तेव्हा मंडळी जरा प्रसन्न झाली... रुपी बॅंकेचे लोक मात्र आधी आले त्यानी लोकाना काय पाहिजे त्याची यादी नेली व त्या वस्तू आणून दिल्या. त्यात वह्या,पुस्तके,तवे,आणि चहापत्तीचा समावेश होता...!! त्या वेळी अन प्रत्येक आपत्तीच्या वेळी मदतीला बाजारात पाय फुटले अशी बोम्ब (अगदी अमेरिकेतून देखील)होत असते. त्याची हीही एक बाजू आहे. पण मदत्कार्यातील कर्मचारी आणि ग्रामस्थ यांचे सम्बंध मात्र खूप जिव्हाळ्याचे होत जातात असा माझा अनुभव आहे... (हे पोस्ट नन्तर उडवले तरी चालेले नाही तर लालभाई म्हणणार(इन्ग्रजीत)इथे याचा काय संबंध?)
|
Peshawa
| |
| Monday, July 17, 2006 - 7:04 pm: |
| 
|
kedar: काही घेने देने नसते. त्यांनी अगदी थोडे जरी सामाजिक काम केल, कोणाला मदत केली तरी पुरे, पण माझ्या पाहान्यातले बरेच शिक्षीत लोक नुसत्या गप्पा मारतात, काम करायची तयारी नाही. kedar every person who is productive is helping society to move. regardless of shikshaNa. Shikshit loka gappa marat basataat paN social kaam karat naahI by making demand that all shikshIt loka has to contribute in social welfare is itself a tyranical demand and is a condescending attitude. To identify what is lacking and to fix what is lacking are two different spear of activities. If most of them fixing their own problems it is good enough... at least for me "encouranging" to shoulder is the way. to "expect" to shoulder is huge mistake as it always leads to tyranny by those who "expect".
|
Laalbhai
| |
| Monday, July 17, 2006 - 7:43 pm: |
| 
|
लालभाई म्हणणार(इन्ग्रजीत)इथे याचा काय संबंध नाही, याचा relevance आहे की... आपल्याला वस्तुस्थिती माहिती नसते आणि तरीही आपण काहीतरी (गैर)समज करून घेतो, हा धडा मिळतो ना यावरून..
|
encouranging" to shoulder is the way. to "expect" to shoulder is huge mistake as it always leads to tyranny by those who "expect">>>>> Peshwa: agree. Let me clear my point. I am not expecting everybody to go and work in field. That expectetion is wrong. What I want to say is, just think that there are people who needs help. BTW: gappa maarne ( ya vishayavar) haa khara point. I did almost devote my 12-15 years in RSS Pariwar. Since I was doing some kind of public work i was in contact with people. THey always said, you should do this and do that and by this way and that way. But nobody of them will do it in person. You know you can make out while you talk. My point is this. I have seen 70% people who only talk. I do not have any expectation that all litrate people should work for others. But in INDIA we need other educated people to take some responsibility for the country. for gods sake we are not America, We want to be like them a full developed country. (Americans do lot for their society) We are trying built our country which has so many issues including cast, religion and Garibi. Robeenhood: 100 persent agree.
|
आता कुणि स्वत: च्या देखरेखीखाली अशी मदत केली तरच होईल, नाहीतर विसरा>> झक्की किती जागी आपण स्वत: पुरे पडनार. आपल्याला दुसर्या वर विश्वास ठेवावा लागेल. मान्य आहे की मदत कार्यात भ्रष्ट्राचार होतो, काही लोक अगदी त्यातुन पैसा कमवतात. पण काही खरच गरजु असतात, ह्या १० टक्के भ्रष्टाचारी लोकांमुळे ती मदत पोचत नाही. आत्ताही ह्या स्फोटातिल लोकांना मदत करनारी वकीलांची एक टोळी तयार झालीये. ते लोक ३० टक्के घेतात, पुर्ण आर्थीक मदतीच्या. हे म्हनजे मढ्याच्या टाळु वरील लोनी खाणेच आहे. पण म्हनुन अशा आपत्तीत तुम्ही ( the people ) थोडीही मदत करनार नाहीत का????? की फकत अशी मदत लोकच खाउन जातील म्हनुन काहीच करायचे नाही. स्वत्: करने सर्वांना जमत नाही. वेळे अभावी, देशात नसल्यामुळे ई.ई. असो मदत कशी करावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्यामुळे आपण कशाला वाद घाला.
|
काश्मीर प्रश्न हा आता खुप जुना झाला तरीही तो तितकाच नवीन आहे. दरवेळी भारतात जे स्फोट होतात त्यांचे मुळ नेहेमी काश्मीर व नंतर पाक असे असते. इतके वेळेस हे होऊनही आपण जागे का होत नाही. आपण चा अर्थ येथे भारत सरकार असा वाचावा. की जागे व्हावे वाटत नाही. जे आहे ते चालु द्यावे व आपळी पोळी त्यावर भाजुन घ्यावी असा तर त्यांचा कल नाही ना? जर असे असेल तर तो प्रश्न सुटनारच नाही. खलीस्थान चा प्रश्न असाच होता. हत्या, दंगली, स्फोट यांनी पंजाब हादरुन गेला. तत्कालीन पंतप्रधानांनी हुशारी गटस दाखवुन सुवर्ण मंदीरा वर चाल केली व दहशतवाद मोडुन काढला. त्यात नंतर त्यांना प्राण द्यावे लागले पण आज तरी पंजाब हा प्रश्न भेडसावत नाही. खलीस्थान वाद्यांना देखील पाकची मदत होती पण वेळीच आवरल्या मुळे परत एकदा भारताची फाळनी झाली नाही. माझ्यासारख्या सामान्य नागरिकाला काही उपाय सुचत आहेत दहशतवादची जड उखडुन काढायला ते आपल्या समोर मांडतो. १. काश्मीर चा स्पेशल टेरीटरी हा दर्जा काढुन टाकावा. आज आम भारतीय काश्मीर मधे प्रॉप्रटी विकत घेउ शकत नाही. तो कायदा रद्द करुन सर्व भारतीय लोकांना जमीन विकत घेन्यास उद्दुक्त करावे. २. खुप मोठ्या संखेने ईतर राज्यातील लोकांना तिकडे स्थलांतरीत करावे. अतिरेक्यांना लोकल लोकांचा सपोर्ट जो आहे तो कमी होईल. ३.लोकल लोकांचा सर्पोट का आहे? तो भिती मुळे की अन्य काही कारणामुळे हे शोदुन काढुन त्यावर काही उपाय योजना करावी. ४.ईंडस्ट्रीयल बेल्ट घोषीत करुन पहीले १५ वर्षे टैकस पैकेज द्यावे. ५. एक स्पेशल कोर्ट स्थापन करुन पकडलेल्या अतिरेक्यांना फक्त फाशीची शिक्षा द्यावी. ६.मोसाद ने जे साह्याय्य देउ केले ते वापरावे व independent cell स्थापण करुन पाक व्याप्त काश्मीर मध्ये दंगली, स्फोट कसे घडवता येतील ते पहावे. ७. मुंब.ई मधील बेहरामपाडा, भारत नगर ई वस्त्यांवर रेड टाकावी व ज्या घरात शस्त्र सापडतील त्या लोकांवर टाडा / पोटा लावावा. ८. युनोत ची पाक व्याप्त काश्मीरची केस पडुन आहे ती मागे घ्यावी. न घेतल्यास पाक वर चढाई केली जाईल असे सुचवावे. मला माहीत आहे की हे स्वप्नरंजन वाटेल. पण ही fact आहे की आपला problem पाक नाही आपण स्वत्: आहोत. आपला attitude काही महीने बदलला पाहीजे. २ सैनीक पळवुन नेल्यावर इस्रायल एका दुसर्या राष्ट्रावर हल्ला बोलु शकते. भारताचा संसदेवर हल्ला होउनही आपण गप्पच. सवा लाख से एक लढाउ तो गुरु गोविंदसिंग कहलावु. ह्या वाक्याच्या अर्थ भारताचा पंतप्रधानाला मी सांगायची गरज नाही.
|
Zakki
| |
| Tuesday, July 18, 2006 - 1:34 am: |
| 
|
पुढच्या वेळि मदत मागण्या ऐवजी लग्नाला जशी registry करतात तशी registry करा. म्हणजे हवे तेच मिळेल. नि नको असलेले मिळाल्यास ते परत पाठवून द्या, दोन शिव्या घालून!
|
Tanya
| |
| Tuesday, July 18, 2006 - 5:22 am: |
| 
|
एक सहज साधी शंका. भारतात एवढे अस्थिर वातावरण आहे. मुंबईत बॉम्बस्पोट झालेत आणि अजुनही स्पोट करणार्यांचा शोध लागत नाही हल्ली भारतातील channel वर बर्याच बाबा लोकांचे प्रवचनाचे पेव फुटले आहे.( कोणी त्याविषयी उगाच राग मानु नये.) तर अश्या बाबा / गुरु लोकांना त्यांच्या सिद्धिने अतिरेक्यांचा शोध लावता येऊ नये??? की फक्त अशी जनता तयार झाली / करायची की त्यांना प्रवचनात गुंतुन त्यांच्यावर आरामात अतिरेक्यानी हल्ले करावे आणि त्याचा त्यांनी विरोधही करु नये? की फक्त 'स्पिरीट' वगैरे गोंडस कोषात परत स्वतः गुरफुटुन घ्यावे. अशी कोणतीच संस्था नाही की जी आपल्या लोकांना फक्त आपल्या संस्कृतीविषयी माहिती न देता, त्यांना त्यांच्यावर हल्ले करणार्यांना तितक्याच खंबिरपणे तोंड देऊ शकतात हे शिकवतात?
|
Santu
| |
| Tuesday, July 18, 2006 - 6:08 am: |
| 
|
केदार अगदि बरोबर अजुन काहि उपाय सुचताहेत ते सान्गतो बलुच लोकांना आपला suport जाहिर करावा. सिन्धि चि जी अल्-जुल्फ़िकार म्हणुन सिन्धु देशाची मागणि करनारि सन्घटना आहे.तिला जाहीर पाठिम्बा द्यावा. मुहाजिर लोंकांसाठि उर्दुस्तान किंवा जिनापुर(हि त्यांचिच मागणी आहे)करण्याची आपण मागणी करावी.व त्यांचा फ़ुटिर नेता अल्ताफ़ हुसेन याला भारतात येण्याची परवानगी देवुन. पकिस्तानात दह्शतवाद माजवण्या साठी मदत करावी. तसेच जे शिआ मुसल्मान बाल्टिस्तान ची मागणी करतात त्याना आर्थीक व moral suport द्यावा. uno च्या मागणी प्रमाणे अफ़गणिस्तान मधे सैन्य पाठवुन त्या बाजुने सुधा एक वेगळा फ़्रंन्ट उघडावा
|
Moodi
| |
| Tuesday, July 18, 2006 - 12:54 pm: |
| 
|
ही दै. पुढारीतील बातम्यांची लिंक. http://www.pudhari.com/Archives/july06/18/Link/rashtriyaA.htm
|
Zakki
| |
| Tuesday, July 18, 2006 - 3:43 pm: |
| 
|
केवळ कुणि सांगीतले म्हणून दुसर्या कुणाला अटक करता येत नाही. सबळ पुराव्याखेरीज चौकशीशिवाय डांबूनहि ठेवता येत नाही. जर शंका असेल तर, कर चुकवला, लायसनशिवाय गाडी चालवली, ट्रॅफिकचे नियम तोडले अश्या आरोपाखाली अटक करून मग त्याच्याकडून माहिती काढून घेता येते. तसे कसे करायचे हे कदाचित् पोलिसांना माहीत असेल.
|
Zakkas
| |
| Wednesday, July 19, 2006 - 2:10 am: |
| 
|
झक्की, मोक्कासारख्या कायद्याअंतर्गत पोलीसांना पुराव्याशिवाय डांबण्याचे अधिकार आहेत. रॉबिनहूड, मी अबु आझमीला टाडासारख्या कायद्याखाली ट्राय करून गोळ्या झाडून ठार करावे असे लिहीले होते. मोक्का कायद्याअंतर्गत दहशदवाद्याला ठार करता येते. हे पहा http://www.rediff.com/news/2001/jan/10spec.htm What is sought to be punished under MCOC? MCOC (Section 3) seeks to punish the following: i. Committing offence of organised crime which result in death. Punishment is death itself or imprisonment for life or a fine.
|
Saranga
| |
| Wednesday, July 19, 2006 - 8:49 am: |
| 
|
http://www.saag.org/papers19/paper1884.html ही लिन्क बघा. SIMI च्या प्रेरनेत मुस्लिम खलीफ़ा आणि उम्मा आहे. SIMI चा भारतीय प्रजासत्तेच्या मुळ तत्वे secular, democratic, republic ह्या गोष्टी वर विशवास नाही आणि हे ते अभिमानाने बोलतात. मग ह्यान्ना देशद्रोही घोषीत करुन अटक का करु नए?
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|