Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through July 17, 2006

Hitguj » Views and Comments » Current Affairs » बातम्यांचे / लेखांचे संकलन » General » Archive through July 17, 2006 « Previous Next »

Moodi
Sunday, July 16, 2006 - 10:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्की हे वाचा, रागवु नका पण परत आमच्या भारताला नावे नका ठेऊ, तुमची अमेरीका तेवढीच जबाबदार आहे. आमचे प्रशासन जर मुर्ख अन भ्रष्टाचारी आहे तर तुमच्या बुशचे प्रशासन ठार आंधळे.

http://www.esakal.com/esakal/07162006/NT00AFC3A2.htm

Zakki
Sunday, July 16, 2006 - 1:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बरोबर आहे मूडी. कधी कधी माझे डोके नि लिखाण वहावत जाते. काय करणार? आतून जिथे तळमळ जास्त असते, त्या ठिकाणी निराशा झाली तर दु:ख जास्त होते. आता अमेरिका काय, आंधळी, खोटी, स्वार्थी, उर्मट, अशी सगळी आहे. पण त्याचा फक्त थोडा राग येतो कधी कधी. शिवाय त्याचा अर्थ भारताने भ्रष्टाचारी असावे हे तर्कशास्त्रात कसे बसते बुवा? असो.

बाकी इराक नि अफगाणिस्तान इथे प्रचंड प्रमाणात सैन्य ठेवण्याचे कारण जे सांगण्यात येते ते सगळे खोटे हे सर्वांना माहीतच आहे. फक्त त्यामुळे कदाचित् मुसलमान राज्यांवर (विशेषत: इराणवर) जरा धाक राहील, नि ते अगदीच अतिरेकी पणा करणार नाहीत अशी सर्वांनाच आशा वाटते. नि गरज पडली तर आणखी सैन्य तिथे पाठवायला जो वेळ लागेल तो वाचेल, म्हणून कुणि काही बोलत नाहीत. कारण अमेरिकेपेक्षा मुसलमान राष्ट्रांचा धोका मला नि बर्‍याच लोकांना तरी जास्तच वाटतो.


Moodi
Sunday, July 16, 2006 - 2:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्की मी भारताच्या भ्रष्टाचारी धोरणांचे अन त्या वृत्तीचे अजीबात समर्थ करीत नाहीये, त्या आधीचा वरचा लेख पण वाचा, खरच आपल्या सर्वांच्या डोळ्यात अंजन घालणारा आहे. मुस्लीम राष्ट्रांचा धोका जास्त आहे अन त्याची भिती ही तेवढीच पराकोटीची आहे हे पण मला मान्य आहे, कारण हे लोक देश अन मायभूमीपेक्षा धर्मालाच अधिक प्राधान्य देतात.

पण साऊथ आशियातील प्रबळ शक्ती बनत चाललेल्या भारताने आतापर्यंत पाक पुरस्कृत दहशतवादाचे हजारो पुरावे देऊनही, सिद्ध करुनही अमेरीका केवळ भारतावर अन चीनवर नजर ठेवण्या साठी पाकड्यांना अशी विघातक शस्त्रे दहशतवादाविरुद्ध लढण्याकरता देत असेल तर( पाकीस्तान दहशवादाविरुद्ध लढतय म्हणे, व्वा! काय असामान्य ज्ञान आहे बुश प्रशासनाचे.) भले होवो त्या अमेरीकेचे अन बुशचे. मग लादेनसारखे भस्मासूर तुमच्या अमेरीकेत काहीही करो, परत म्हणू नये बुशने की मुशर्रफ हा शांततावादी नेता आहे.( पुढे अमेरीका मुशर्रफला शांततेचा नोबेल पुरस्कार पण देईल कदाचीत).


Laalbhai
Sunday, July 16, 2006 - 3:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुळात सर्व जगातला इलामी दहशतवाद ही अमेरिकेची सर्व जगाला भेट आहे. (त्याची पावती त्यांना नव्या शतकाच्या सुरवातीलाच अगदी जोरदार मिळाली!)

कम्युनिझमचा पराकोटीचा द्वेश करताना जे पेरले तेच आता मोठ्या प्रमाणावर उगवते आहे आणि ते काबूत ठेवायला अमेरिकेला जड जाते आहे. सत्य आहे ते इतकेच. बाकीच्या सगळ्या झालरी. ज्या या सत्याला धरून फडफडताहेत! :-)


Zakki
Sunday, July 16, 2006 - 5:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे सर्व मला मान्य आहे, खरेच आहे.

तर अमेरिका वाईट आहे, त्यांनी हे केले नि ते केले, म्हणून आता भारताला नावे ठेवू नयेत, नि भारतीय प्रश्नांबद्दल माझी अक्कल पाजळू नये, कारण भारताला मदत व्हावी म्हणून मी काऽहीहि करत नाहीये. तेंव्हा 'भारत' म्हंटले, भारतीय म्हंटले, की मूह को बडा ताला, हाथमे हथकडी, और लगे तो आँखोपे परदाभी!

नशीब इथे मला आता अनेक उद्योग मागे लागले आहेत. त्यामुळे असेहि इथे येणे जमणारच नाहीये.

फक्त थोडे लिहितो.

अर्थात् तुम्ही मात्र अमेरिकेबद्दल काय वाट्टेल ते लिहा. जरी कदाचित् अमेरिकेत परत कधीहि येणार नसलात, अमेरिकेचा स्वार्थीपणा घालवण्यासाठी काऽही प्रयत्न केले नसतील तरीहि.

कारण अमेरिकेतल्या कुणालाच जगातील इतर लोक काय बोलतात याची पर्वा नाही. जोपर्यंत अमेरिकेचे संगीत (?!), सिनेमे, फॅशन, भाषा इ. सर्व जगात आधिकाधिक पसरत आहेत, बौद्धिक नि शारीरिक श्रम अत्यंत स्वस्तात करणारे लोक इथे यायला धडपडत आहेत, तोपर्यंत सब कुछ ठीक. मग बोलेनात का काऽही पण!



Laalbhai
Sunday, July 16, 2006 - 6:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमेरिकेचा स्वार्थीपणा घालवण्यासाठी काऽही प्रयत्न केले नसतील तरीहि.

माझी उडी इतकी मोठी नाहीच आहे मुळात.

मला वाटते जग बदलण्याच्या गोष्टी करण्यापेक्षा आपल्या भोवतालची परिस्थिती बदलण्याचा थोडा थोडा प्रयत्न केला तरी आपल्यापुरते पुरे असते. हां, आता हे माझ्या कम्युनिस्ट विचारसरणीला काहीसे विसंगत आहे. पण चालायचेच. सुसंगती सगळीकडेच दिसली असती तर कम्युनिझमच काय, जगातल्या कोणत्याही "इझम"ची मनुष्यजातीला गरज पडलीच नसती. :-)


Moodi
Sunday, July 16, 2006 - 9:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्की अहो तुम्ही माझ्यापेक्षा वय, शिक्षण, अनुभव, ज्ञान सगळ्याच बाबतीत मोठे आहात, मी तुमच्याशी वाद घालत नाहीये, फक्त वर सकाळमध्ये आलेले दोन्ही लेख वाचा म्हणतेय.

पाकीस्तान सारख्या कुचकामी, वाशिंक दंगलींनी ग्रस्त, कुठलीच प्रगती नसलेल्या देशाला अमेरीका कायम सगळे तंत्रज्ञान, मदत, शस्त्रास्त्रे, पाठिंबा कायम का देत आलीय अन का देतेय याचे मी दिलेल्या कारणाव्यतीरीक्त एक तरी नीट ठोस कारण देऊ शकाल का तुम्ही? का अमेरीकेच्या प्रगतीत पाकींनी हातभार लावलाय? (हो लावलाय ना, अल कायदा अन दाऊद, लादेनला आश्रय देऊन वर्ल्ड ट्रेड सेंटर उडवुन देण्यात तर मोट्ठा हातभार लावलाय.)

एकीकडे मैत्रीचा हात पुढे करायचा अन दुसरीकडे भारताला बॉंबस्फोट, घुसखोरी, अप्रत्यक्ष / प्रत्यक्ष लढाई, दंगली इत्यादी द्वारा त्रास देणार्‍या पाकड्यांना कायम मदत द्यायची हे कुठल्या तत्वात बसते?

झक्की आम्ही सर्वसामान्यच आहोत अन त्याचमुळे असले प्रश्न आम्हाला कायम पडतात, ते बाकी कुणाला काय पडणार?



Prasik
Sunday, July 16, 2006 - 9:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे बघा मित्रहो, जरी पाकिस्तान जर का आतन्कवाद ला मदत करत असला तर ते तिकडच्या नेत्यामुळे. त्यानि आता पर्यत भारता विरुध भडकावुनच लोकचि वाहवा मिळवली. ति त्याचि गरज होती. आणि आमेरिका बद्दल सागायचे झाले तर... ते फ़क्त त्याच्या फ़ायद्याचेच बघणार. मग ती आतन्कवाद ला साथ असो वा विरोध.

Limbutimbu
Monday, July 17, 2006 - 3:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>>> मुळात सर्व जगातला इलामी दहशतवाद ही अमेरिकेची सर्व जगाला भेट आहे. (त्याची पावती त्यांना नव्या शतकाच्या सुरवातीलाच अगदी जोरदार मिळाली!)
आयला, अमेरिकेचा जन्मच मुळी उण्यापुर्‍या तिनशे साडेतिनशे वर्षान्पुर्वीचा! इस्लाम अन त्यान्च्या दहशतवादी जेहादी तत्वान्चा जन्म त्याच्या कित्येक शतके आधी झालेला! तर हे लालभाइ, तुमच्या तत्वज्ञानात हिन्दुस्थानवर झालेले इस्लामी हल्ले मोजण्यात येत नाहीत का? की इतिहासात सोइस्कर पणे डोकवायचेच नाही असा पण केला हे?

Laalbhai
Monday, July 17, 2006 - 7:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी रशिया, अमेरिका शीतयुद्ध याविषयी बोलत होतो. त्यावेळेस तालिबान, ओसामा यांना पोसले आणि तेच आता सर्व जगात डोईजड होत आहेत.

पाकिस्तानात भरपूर शस्त्रे, अवैध मार्गाने, अमेरिकेच्याच कृपेने आली. त्यांचा वापर भारताविरुद्ध होतोय.


Gs1
Monday, July 17, 2006 - 7:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



भारतातल्या सर्व जिहादी दहशतवादाला बाबरीचा विध्वंस वा गुजरात दंगली कारणीभूत आहेत असा धादांत खोटा प्रचार कम्युनिस्ट आणि त्यांचे मिडियातले पित्तू अजूनही हिरिरीने करत आहेत.

पण मग लंडन, न्युयॉर्क, बाली अशा जगभरच्या थैमापुढे हे कारण अगदीच उघडे पडते तर अमेरिकेला जबाबदार ठरवणे चालू आहे.

अर्थात अमेरिकेला झळ पोहोचत नव्हती तोपर्यंत अमेरिकेने जिहाद्यांकडे दुर्लक्ष केले, वेळप्रसंगी रशियाविरुद्ध वापरून घेतले, शस्त्रे पुरवली हे खरे आहे. अजूनही पाकिस्तानला मदत चालू आहेच.

पण तसे भारतातले कम्युनिस्टही जिहाद्यांना भारताचे लचके तोडण्याच्या कॉमन कार्यक्रमाअंतर्गत मिळालेले आहेत, सत्तेचा फायदा घेत त्यांना सर्व ती राजकीय मदत करत आहेत. पण म्हणून भारतातला जिहाद ही केवळ कम्युनिस्टांची भारताला भेट आहे असे म्हणता येत नाही, त्याच न्यायाने अमेरिकेने जे पुर्वी केले केवळ त्याला धरून अमेरिकेची भेट असेही म्हणता येत नाही. कारण लिंबुने म्हटले तसे इस्लामी दहशतवादाचा जन्म याच्या फार पुर्वीचा आहे.

मग स्वत:च्या फायद्यासाठी त्यांच्याशी युती कधी अमेरिकेने केली असेल, तर कधी भारतातल्या कम्युनिस्टांनी, पण ते फक्त सह आरोपी म्हणता येतील, मुख्य आरोपी नाहीत. तसेच बाबरी पाडणे वा गुजरात दंगली या जिहादावरच्या ( असमर्थनीय ) प्रतिक्रिया आहेत जिहादचे कारण नव्हे.

मग कोण आहे इस्लामी दहशतवादाला जबाबदार ? या प्रश्नाचे प्रामाणिक निदान जर केले नाही तर उपचार तरी योग्य ते कसे होणार ? हा या बीबीचा विषय नसल्याने या विषयावर मी लवकरच स्वतंत्रपणे लिहिन.





Limbutimbu
Monday, July 17, 2006 - 8:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>>> पण तसे भारतातले कम्युनिस्टही जिहाद्यांना भारताचे लचके तोडण्याच्या कॉमन कार्यक्रमाअंतर्गत मिळालेले आहेत, सत्तेचा फायदा घेत त्यांना सर्व ती राजकीय मदत करत आहेत.
हे नीटसे समजले नाही पण "नक्षलवादी" चळवळीला कोण उचलुन धरल हे याचाही विचार करण्याची वेळ आली हे! मुस्लिम जेहादीनी भागत नाही म्हणुनकी काय नक्षलाईट्स ना भडकाविणारे अन सहाय्य करणारे कोण त्यावरही थोड भाष्य अपेक्षित हे! :-)

Lopamudraa
Monday, July 17, 2006 - 8:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा या बीबीचा विषय नसल्याने या विषयावर>>>>>>
मला तर हल्लि हे सगळे bb सारखेच दिसताहेत.. कोणता उघडला आणि कोणता बंद केला.. कळतच नाही.. दिवा..!!!

Limbutimbu
Monday, July 17, 2006 - 8:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>>> हा या बीबीचा विषय नसल्याने
>>>>> मला तर हल्लि हे सगळे bb सारखेच दिसताहेत.. कोणता उघडला आणि कोणता बंद केला.. कळतच नाही.. दिवा..!!!
अग लोपा, जीएस ला पण एल्ट्याची बाधा झाली बहुतेक!
आधी भरपुर विषयान्तर करायच, बीबीचा विषय सोडुन चौफेर, रटाळ, पानचट, मोठमोठा आशय सान्गत असल्यागत लिहायचे अन पोस्टच्या शेवटी "हा या बीबीचा विषय नाही तरीही...." अस कायतरी लिहुन मोकळे व्हायचे (आणि त्याबरोबरच मिलिन्दाचे काम वाढवायचे!)
DDD

Laalbhai
Monday, July 17, 2006 - 8:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बाबरी मशिदीचा विध्वंस अनेक कारणांपैकी एक आहे, यात शंकाच नाही. पण तो BB चा विषय नाही.

देशाच्या अंतर्गत सुक्षेची BJP ला इतकी काळजी असती तर हवाला कांड होऊच दिले नसते. अनेक उदाहरणांपैकी हे एक उदाहरण.. असो. दुसर्‍याच्या नावाने बोंब मारीत धुळवड खेळण्याची मला सवय नाही. माझी राष्ट्रनिष्ठा सिद्ध करण्यासाठी मला इतर कोणाला शिव्या देत बसण्याची गरज वाटत नाही!




Laalbhai
Monday, July 17, 2006 - 9:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भारतातला जिहाद ही केवळ कम्युनिस्टांची भारताला भेट आहे असे म्हणता येत नाही,

उलटे, उलटे... भारतातला मुस्लिम आतंकवाद ही भारतातल्या सर्व धर्मातल्या कट्टरपंथियांनी आणि अतिरेक्यांनी, भारताला दिलेली भेट आहे.

बाबरी पाडणे वा गुजरात दंगली या जिहादावरच्या ( असमर्थनीय ) प्रतिक्रिया आहेत जिहादचे कारण नव्हे.

So now, there is an acceptance that Gujarat riots were planned! Mods please paste this at the top of this BB.

बाबरी मशिद तर सर्व BJP च्या नेत्यांच्या उपस्थितीतच पाडली गेली. हलकटपणा करत वर मखलाशी केली की मशीद पाडण्याचा आमचा कोणताही प्लन नव्हता. मग आता भारतीय संविधानाप्रमाणे त्या कृत्याची शिक्षा घ्यायची तर लाज, शरम आणि भीती वाटते आहे.

असले हे भेकड लोक! कृत्य करायचे पण त्याची जबाबदारी नाकारायची!



Laalbhai
Monday, July 17, 2006 - 9:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Now let the truth come out why Mr. Mahajan died! Was it only because siblings' rivalry or something else????

anyway, ह्या घटनेमागचे सत्यही कधी बाहेर येईल असे वाटत नाही.

Moodi
Monday, July 17, 2006 - 9:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला वाटत की ह्या वादावर नवीन बीबी उघडला जावा. कारण बॉंबस्फोटासाराख्या घटनेवर सर्व थरातुन प्रतीक्रिया येणार.
जे कुठल्याच पक्षाच्या बाजूने नाहीत, पण मुंबईतील घटनेवर मते मांडु पहात आहेत, त्यांना इथे मत मांडणे कठिण होईल, अन शेवटी सगळ्या गदारोळात हा बीबी भरकटला म्हणून मॉड बंद करतील.



Laalbhai
Monday, July 17, 2006 - 9:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गंमत कशी असते पहा.
मी या हल्ल्यांबाबत बोलताना कधीही कोणत्याही भारतीय राजकीय पक्षाला अथवा संघटनेला जबाबदार धरले नाही. कारण ह्यावेळेस मतभेद विसरून सगळ्यांनी एकत्र येण्याची आवश्यकता असते, इतके भान किमान मला आहे.


पण ही आततायीपणा करणारी मंडळी केवळ कम्युनिस्ट, ख्रिश्चन मिशनर्‍या आणि अवघी मुस्लिम जमात यांना शिव्या देण्यातच आयुष्याची इतिकर्तव्यता मानतात! वेळ काळ, कशाचेही भान ठेवणे या लोकांना जमत नाही.

जे काही चालले आहे, ते सर्वांच्या समोर आहे, लोकांना काय ते पटते आहे आणि अनेकजण मला तसे कळवतही आहेत!


Laalbhai
Monday, July 17, 2006 - 9:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अन शेवटी सगळ्या गदारोळात हा बीबी भरकटला म्हणून मॉड बंद करतील.

मूडी काही लोकांना "तेच" हवे आहे.

याआधी घडलेली अनेक उदाहरणेही पहा. BB कशामुळे बंद होतात तेही पहा.

कळतेच आहे लोकांना सगळे. मलाही कळवत आहेत लोकं.


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators