Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
हितगुज साहित्य आणि कॉपीराईट ...

Hitguj » Views and Comments » मायबोली-हितगुज » हितगुज साहित्य आणि कॉपीराईट « Previous Next »

Meenu
Wednesday, June 28, 2006 - 8:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

admin copy right protect करण्यासाठी maayboli असा watermark टाकता येईल का post ला ... आज मिल्या चं विडंबन वार् 0dयापेक्षाही जास्त वेगानी मेलवर circulate होतय लेखकाच्या किंवा maayboli च्या नावाचा उल्लेख न करता ..

Psg
Wednesday, June 28, 2006 - 8:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ऍडमिन, काल मिल्यानी गुलमोहर वर विनोदी साहित्य, विडंबन मधे 'रेशमाच्या रेघांनी' या लावणीच्या चालीवर 'रेशमीयांच्या हिमेशनी' असे विडंबन लिहिले होते. ते आज अनेक लोकांना fwd mail मधून आले आहे आणि त्यावर मिल्याचे नावही नाही! असे अनेकदा झाले आहे. लोकांचे original साहित्य जे इथे पहिल्यांदा लिहिलेले असते, ते original author चे नाव वगळून forward होते, किंवा कहर म्हणजे मूळ नावही बदलेले असते!! मूळ लेखकाचे श्रेय हिरावले जाऊ नये य साठी आपण काही करू शकतो का?
१) आपण गुलमोहर वरच्या प्रत्येक पानावर maayboli.com चा watermark टाकू शकतो का, ज्यायोगे साहित्य कॉपी केले तरीही हा मार्क येईलच?
२) कोणतेही साहित्य पोस्ट करताना jpeg format मधे लिहावे का, म्हणजे कॉपी करणे अवघड जाईल, किंवा कॉपी केले तरी मूळ लेखकाचे नाव पुसले जाणार नाही?
३) अजून काही?


Hawa_hawai
Wednesday, June 28, 2006 - 2:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

PSG हे असे अनेकदा होत असते पण यावरून सुचलेले एक दोन मुद्दे

१. " माझ्या साहित्यावर मायबोलीचा वॉटर मार्क का? " असा पण issue निघू शकेल. :-)

२.शिवाय एखाद्या user ने दुसरीकडचे ढापलेले साहित्य मायबोलीवर पोस्ट केले आणि त्यावर मायबोलीचा watermark असला तर मायबोली गोत्यात येऊ शकेल असे वाटते.

यावरील एक लगेच अमलात आणण्याजोगा उपाय असा होऊ शकेल की आपले साहित्य लेखकानेच आपल्या नावाचा watermark उमटवून image file म्हणून पोस्ट करायचे. आणि ज्या software च्या मदतीने हा watermark/image तयार करता येईल त्याची माहिती आणि काही साईट असल्यास त्याची लिन्क गुलमोहर वर Admin Team ला देता येईल. म्हणजे लेखक लोकांना सोपे होईल.

मला s/w क्षेत्रातील अनुभव काहीही नाही तेव्हा ही फक्त एक सुचना आहे. प्रत्यक्षात हे किती शक्य आहे याची माहिती नाही.


Kmayuresh2002
Thursday, June 29, 2006 - 4:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरोखर हा मुद्दा फ़ार serious आहे.. काहीतरी उपाय करायलाच पाहीजे. मिल्याचे हे विडंबन मला office मधल्या जवळ जवळ आठ ते दहा लोकांकडुन मेलमधुन आले आहे

Meenu
Thursday, June 29, 2006 - 5:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

image file चा size कीती होईल तेही बघायला लागेल ना ...? ईथे ५० KB चं limit आहे ...

Giriraj
Thursday, June 29, 2006 - 6:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मेल्स चे ठिक आहे पण ब्लॉगवर जेव्हा इतर कुणाचे नाव नाही तेव्हा त्या blogger नेच लिहिले आहे असा अर्थ होतो. त्यामुळे मी दिलेल्या वरच्या link वर जास्तित जास्त feedback दिला गेला पाहिजे आपल्याकडून!
आणि मेल्स बद्दल बोलायचे तर प्रियाने केले आणि रुमाने केले तसे करता येऊ शकते... मला वाटते यात पाच मिनिटांहून अधिक वेळ आपला जाणार नाहीच.

आणि ही काळजी आपण प्रेत्येकानेच घ्यायला हवी हे निश्चित.पण एकजुटीने आपण मायबोलिकरांनी याबाबत अघाडी उघडली तर कुठेतरी या प्रकाराला आळा बसू शकेल.
HH ने मुद्दा मांडला आहे तोही वादातित आहे.
तेव्हा आपणच आता जगरुकपणे याबाबत कहि केले पाहिजे!


Indradhanushya
Thursday, June 29, 2006 - 7:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक करता येऊ शकते...
१.
www.community.webshots.com या साईट वर jpeg format मधे छायाचित्रे वैगरे टाकुन ती लिंक इतरांना Fwd करता येते.
२. सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे या साईट वरील कोणतीही इमेज कोणीही copy paste किंवा save as करू शकत नाही.

आमच्या Office Admin च्या कृपेन ही साईट सध्या तरी माझ्याकडे open होत नाही. तरी वरील साईट बद्दल कोणाला माहिती असल्यास जरूर कळवा...

Maudee
Thursday, June 29, 2006 - 9:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वरचे सगळे posts वाचून मला एक भा प्र पडला आहे.
विडंबन करण्यापुर्वी जे मुळ गाणं असेल त्याच्या कवि अथवा गीतकाराची परवानगी घेतलेली असते का?

म्हणजे परवानगी घेणे आवश्यक आहे की नाही???की त्याची गरज नसते???


Milindaa
Thursday, June 29, 2006 - 9:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गिरिराज, कसली लिंक दिली आहेस तू ? archives मध्ये आहे का ?

प्रिया आणि रुमा ने काय केले ?

फार vague पोस्ट्स असतात बुवा तुझी... :-)


Giriraj
Thursday, June 29, 2006 - 10:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तु आता उगवलास होय.. अरे तिकडे SG वर भरपूर चर्वितचर्वण झाले.

http://aamhimarathi.blogspot.com/2006/06/reshmiyachya-ganyanividamban-kavya.html

यट्थिकाणि मिल्याच्ये विडंबन आहे.. ते त्याच्या नावाशिवाय आहे.. आणी कुण्या 'ललिता'चे आभार मानले गेले आहेत.. मि त्या ब्लॉगवर त्या रोहितला feedback दिलाय त्यबद्दल.
(सखी)प्रिया आणि रुमा याना तेच विडंबन मेल्समधून आले आणि त्यावरही मिल्याचे नाव नव्हते. प्रिया ने तिला मेल पठवणार्‍याचे प्रबोधन केले आणि रुमाने कवितेत मिल्याचे नाव टाकून पुन्हा त्याच सगळ्यांना ती मेल forward केली..... हुश्श!
हे सगळे प्रकरण SG वर झाले!

Milindaa
Thursday, June 29, 2006 - 12:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे, मला त्या ठिकाणी कोणताही फीडबॅक दिसत नाही. त्याने काढून टाकला का ?

Maitreyee
Thursday, June 29, 2006 - 1:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तिथे त्याला हवा तोच फ़ीडबॅक तो अप्रूव्ह करतो वाटते! anyway त्याला काय तो मेसेज कळला असेलच आतापर्यन्त.

Milya
Thursday, June 29, 2006 - 2:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गिरी, रुमा, सखीप्रिया... खूप खूप धन्यवाद एवढी मेहनत घेतल्याबद्दल...

मी पण feedback द्यायचा प्रयत्न करतो... त्या blog वर

माउडी : तुझा मुद्दा संयुक्तिक वाटतोय मला...
मी तरी अशी कुणाची परवानगी घेतलेली नाही. कायद्याने तशी गरज आहे की नाही मला माहीत नाही पण जेव्हा माझ्यासारखा एक सामान्य माणुस लिहितो जो प्रथितयश नाही, तेव्हा त्याचे विडंबन मूळ प्रसिद्ध कवी पर्यंत पोचणे अवघड असते आणि पोचले तरी त्याला फ़ारसा फ़रक पडु नये... काजवा सूर्याची बरोबरी करयला बघत असेल तर सूर्य केवळ त्याकडे दुर्लक्ष करु शकेल नाही का?

आता ह्या 'हिमेश' च्याच विडंबनाविषयी.. शांता शेळके किंवा लता मंगेशकर ह्यांना काही फ़रक पडेल काय कुनी 'मिल्या' ने त्यांच्या गाण्याचे विडंबन केले म्हणुन का त्यांची योग्यता कमी होईल?...

पण तुझा मुद्दा अतिशय योग्य आहे... पण मला खरेच माहिती नाही की अशी परवानगी घेणे आवश्यक आहे का नाही? प्रतिथयश विडंबन्कार अत्रे किंवा यशवंत देव काय करायचे कुणास ठाउक?

कुणा जाणकाराला माहिती असेल तर जरूर सांगावे...

पण माझ्या मते मूळ गाण्याच्या संबंधित कुणाला आक्षेप असेल तर विडंबनकाराने त्याची माफ़ी मागायची तयारी नक्कीच ठेवली पाहिजे..

अजुन एक वेगळा मुद्दा असा, हे 'हिमेश' चे विडंबन हे रुढार्थाने विडंबन नाही.. कारण मूळ गाण्याच्या आशयाची तोड्फ़ोड ह्यात नाही.. मूळ गाण्यावरुन घेतलेली प्रेरणा आहे फ़क्त.. शब्द पूर्ण वेगळे आहेत.. चाल कदाचित तीच आहे पण जोपर्यंत कुणी ते त्या चालीत गाउन record करत नाही तोपर्यंत चालीची पण चोरी आहे असे म्हणता येत नाही...

पण

पहाटे पहाटे मला जाग आली
तुझी रेशमाची मिठी सैल झाली

ह्या गाण्याचे कुणीतरी

पहाटे पहाटे मला झोप आली
तुझी घोरण्याची गती मंद झाली
असे विडंबन केले होते...जे मूल गाण्याच्या आशयाची तोडफ़ोड करते. तेव्हा असा प्रश्ण येईल मग... पण हेच खरे विडंबन

ह्यापुढे जाउन समजा हिमेशच्या वाचनात हे आले तर काय? तो काय करेल?


Maitreyee
Thursday, June 29, 2006 - 2:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हिमेश काय करणार! काही करता येणार नाही त्याला! त्याच्या गाण्याबद्दल कोणी काय म्हणावे हे तो सांगू शकत नाही:-) इथे बुश ची पण यथेच्छ टिंगल होते Tv channels वर! त्यात त्याचे visuals पण वापरलेले असतात, context सोडून तेही! मग हिमेश क्या चीज है :-)
पण असं का विचारत आहेस तू मिल्या?


Robeenhood
Thursday, June 29, 2006 - 2:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिल्या व इतर भद्रजन,
विडम्बनात copyright चा प्रश्न येतच नाही. ती स्वतन्त्र निर्मिती मानली जाते.फार तर एक good gesture म्हणून मूळ लेखकाची माफी मागतात लोक पण तोही एक विनोदाचा भाग म्हणून. अगदी चालीला सुद्धा copy right नाही. हा मुद्दा गुलशनकुमार याने अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात लताची गाणी, रफीची सोनू निगमच्या आवाजात रेकाॅर्ड करून कॅसेटच बाजारात आणली त्या वेळी उपस्थित झाला आणि केवढा गहजब झाला. पण कोर्टाने त्याला स्वतन्त्र निर्मिती मानली. या प्रकाराला कव्हर व्हर्शन रेकाॅर्डिंग म्हणतात. ते मान्य आहे. In popular music a cover version is a new rendition (performance or recording) of a previously recorded song.

Popular musicians may play covers as a tribute to the original performer or group, to win audiences who like to hear a familiar song, or to increase their chance of success by using a proven hit or to gain credibility by its comparison with the original song. Covering material is an important method in learning various styles of music. Bands may also perform covers for the simple pleasure of playing a familiar song. A cover band plays cover versions exclusively.

त्या मानाने विडम्बनाला तर काॅपी म्हणताच यायचे नाही.त्यामुले मूळ लेखकाचा यात सम्बंध नाही. ट्रेडमार्कच्या copy right बद्दल वेगळेच नियम आहे.त्यासाठीच तर ट्रेडमार्क रजिस्टर करतात. तो इथे गैरलागू आहे.
काही मूळ लेखक तर अज्ञातच आहे.उदा. मायबोलीवरच सर्क्युलेट झालेली'रिस्क तळीराम' ही उत्कृष्ट निर्मिती असून त्याचा कर्ता कुणालाच माहीत नाही...

आणि शेवटी अजिन्ठा वेरूळची शिल्पे, ताजमहालचे कारागीर, अनेक मन्दिरे यांचे निर्मात्यानी तरी कुठे हक्क ठेवलाय!!


Arch
Thursday, June 29, 2006 - 2:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ मिल्याला अनुमोदन. मिल्याच गाणं (गाणं म्हणूया आपण) रेशमाच्या रेघांनीच्या चालीवर म्हणता येत. North India मध्ये कित्येक भजनं सिनेमाच्या गाण्यांच्या चालीवर म्हटली जातात. मला वाटत नाही त्यासाठी ते परवानगी घेतात आणि घ्यावी लागते.

Badbadi
Friday, June 30, 2006 - 3:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Admin ,
काल गुलमोहोर च्या साहित्याच्या copyrights बद्दल बराच उहापोह झाला...
आपण हा प्रश्न काहि प्रमाणात तांत्रिकदृष्ट्या सोडवू शकतो असे मला वाटते. गुलमोहोर आणि रंगीबेरंगी च्या pages वर right click disable करता येइल आणि ctrl-c पण disable करता येऊ शकेल. याने copy चे प्रकार बंद होतील आणि मायबोलीवर चे साहित्य जपले जाईल. या सगळ्याला लागणारा वेळ आणि efforts जास्त आहे हे मान्य.. पण जर हे शक्य आहे तर करता येईल का याचा विचार करावा.



Bee
Friday, June 30, 2006 - 4:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शेवटी साहित्यावर water mart टाकला काय आणि copy disable केल काय, तरीही ज्याला साहित्य ढापायचे आहे ते तो लिहूनही काढू शकतो. तेंव्हा हे दोन्ही उपाय मर्यादीत आहेत. मायबोलिवरचे साहित्य मेल वरून इतरांना पाठविले जाते ह्याचा अर्थ ह्यात मायबोलिकरांचा समावेश असू शकतो. पण असे बरेचसे चांगले लेख मेलवरून आपल्याला अधुनमधुन येत राहतात. हा लेख कुणी लिहिला ह्याची पर्वा आपण बाळगत नाही. पाठविणारी व्यक्ती देखील हा लेख तिनेच लिहिला आहे असे म्हणत नाही. तसेच काहीसे ह्या विडंबनाबद्दल झाले असेल. जोवर कुणी असे म्हणत नाही की हे विडंबन मी केले आहे तोवर भिती कशाला..

गिरिराज दाखव पाहू तो ब्लॉग जिथे मायबोलिवरचे साहित्य कुणा भलत्याने आपल्या नावावर लिहिले आहे. आणि मायबोलिकरांचे खरे नाव इथले नाव असेल ह्याची काही शाश्वती नाही. तेंव्हा कदाचित ते त्याच व्यक्तीचे लिखाण असू शकते. मराठी साहित्यात अशा चोर्‍या घडल्याची उदाहरणे मी अजून तरी वाचलेली नाहीत जशी संगीत क्षेत्राबद्दल वाचली, ऐकली आहेत. खुद्द आशा भोंसलेच्या तोंडून ऐकली आहेत.


Admin
Friday, June 30, 2006 - 4:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ज्या सगळ्यांनी सूचना केल्या आहेत त्यांना धन्यवाद.
लिखाणाची copy पूर्णपणे थांबवणे अशक्य आहे, विशेषत्: कवितांची.
काहीही उपाय केले तरी ज्याला मुद्दाम चोरायचे आहे तो सरळ वाचून टाईप करू शकतो. कवितांना पुन्हा टाईप करायला वेळही लागत नाही. आणि जेंव्हा प्रयत्नपूर्वक लेखकाचे नाव वगळले जाते तेंव्हा यामागचा उद्देश स्पष्ट आहे.
आणि उघड उघड जाऊदे पण थोडाफार बदल करून चोरायचे हे तर बर्‍याच लेखनप्रकारात फार पूर्वीपासून चालत आले आहे.
एक उपाय मी स्वत्: करतो तो काही वेळेला यशस्वी ठरला आहे.
१) मला जर लेखकाचे नाव दिसले नाही तर मी ती email पुढे माझ्या मित्राना पाठवत नाही. माझ्यापुरता तरी त्याच प्रसार थांबवतो.
२) मला जर मूळ लिखाणाचा स्रोत माहिती असेल तर मी मुद्दाम " reply all करून ते लिखाण कुठून घेतले आहे याची link टाकतो. पुष्कळदा अशी चोरी करणार्‍याला त्याच्या मित्रमंडळीमधे खोटा मोठेपणा हवा असतो. ४-५ वेळेस त्याने कुठुनतरी उचलले आहे हे एकदा त्याच्या मित्रमंडळींमधे जाहीर झाले की अशा emails येणे बंद होते. जो स्वत: चोरत नाही पण फक्त forward करतो तो ही तेच उत्तर देऊन कंटाळतो कारण कुठेतरी त्याच्यावरही ठपका येतो.
हे नेहमी यशस्वी होते असे नाही पण करणे सोपे आहे.


Bee
Friday, June 30, 2006 - 4:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Admin एकदम अचूक विचार मांडले आहेत तुम्ही. पूर्णपणे पटले.

Milya
Friday, June 30, 2006 - 4:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मैत्रेयी... मी आपला एक सवाल उपस्थित केला होता गं... त्याचे उत्तर तू दिलेलेच आहेस पण

रॉबिन : धन्यवाद ह्याची कायदेशीर बाजु मायबोलीकरांना सांगितल्याबद्दल...
अर्थात ही सर्व माहिती मला काल रात्री घरीच समजली होती...
:-)

अरे गिर्‍या तुझ्या प्रयत्नांना यश आले बघ त्या blog वाल्याने माझे नाव ही टाकले आहे आणि मायबोलीची link पण दिलिय.

Psg
Friday, June 30, 2006 - 5:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे गिर्‍या तुझ्या प्रयत्नांना यश आले बघ त्या blog वाल्याने माझे नाव ही टाकले आहे आणि मायबोलीची link पण दिलिय.
हो? ये हुई ना बात!! :-)
सो आपण कधीतरी आवाज उठवला तर त्याची दखल नक्किच घेतली जाते. यात गिरिराज, रुमा, सखीप्रिया, मीनु, डीमडू, स्मिता_डॉड, मयुरेश आणि अनेक हितचिंतकन्ना धन्यवाद! आम्ही हा विषय आधी SG Rd BB वर सुरु केला आणि मग तो इथे शिफ़्ट झाला..



Limbutimbu
Friday, June 30, 2006 - 5:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ऍडमिन नी सुचवलेला दोन नम्बरचा उपाय मी त्याच दिवशी प्रतिक्रियेच्या पहिल्या दुसर्‍या पोस्ट मधेच, एस जी रोड बीबी वर कुणाला तरी सान्गितला होता! :-) (ग्रेट पीपल ऑल्वेज थिन्क्स इक्वली अशी काहीतरी म्हण हे ना? , ती आठवली) :-)

Badbadkanda
Thursday, December 14, 2006 - 9:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मायबोलिवरच्या लिखाणाच्या कॉपिराईटबद्दल तुम्ही जागरूक आहात हि चांगली गोष्ट आहे. जर तुम्हाला काही ठोस ऊपाय सापडले तर ते बिचाय्रा ' जे. के. रोलिंग' बाईंना देखिल कळवा. त्यांचे करोडो डॉलर्सचे बेस्टसेलर 'हैरी पॉटर' चे लिखाण खुलेआम कॉपिराईट चोरी होत आहे.

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती







Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators