|
Puru
| |
| Thursday, May 11, 2006 - 5:26 am: |
| 
|
तो खो-खो पाटील म्हणजे कहर आहे. त्याची ती शिवराळ भाषा, तो accent अगदी ऐकवत नाही. The most sad part is - For most of the non-Marathi speaking janata, he appears to be a stereotype Marathi manoos, which is far from the reality. Already मुंबई मधे मराठी माणसाची गती ( from non-Marathi public's angle ) "मुंबई तुमची, भांडी घासा आमची" अशी झाली आहे ( MLA jayawantiben Mehta had said that! ) आत पेशव्यांच्या पुण्यामधे, जे मराठीचे माहेर म्हणुन ओळखले जाते, तेथे रस्त्या-वरची भाषा अशी रेडीओ मुळे सर्वमान्य होऊ लागली, तर "अमृताते पैजा जिंकणारी" आपली मायबोली लवकरच "गुंडबोली" अथवा "टवाळबोली" म्हणुन हेटाळली जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही! To prevent this on-slaught on Marathi, all like-minded people are requested to send emails of lodging protest to radio-mirchee. rjprakriti@indiatimes.com , rjmandy@indiatimes.com & rjkhokhopatil@Indiatimes.com
|
हा खो खो पाटील अत्यन्त आचरट आहे. मागे त्याला कुठल्या तरी कार्यक्रमाला बोलावले होते तिथे त्याने असाच काहीतरी आचरटपणा केला तर लोकानी त्याचा कार्यक्रम बन्द पाडून त्याला चोपण्याची तयारी केली होती. गम्मत म्हणजे हा प्राणी गुजराती आहे...
|
Puru
| |
| Monday, May 15, 2006 - 3:02 pm: |
| 
|
गम्मत म्हणजे हा प्राणी गुजराती आहे... .. तरीच तो मराठीची एवढी वाट लावतोय!
|
मुळात मला, रेडिओ मिर्ची म्हणल की अमिरखानच्या चित्रपटातिल मिरचीसेठ आठवतो! काही म्हणा, रेडिओ मिर्ची अतिक्रमण करतय, मराठी सन्स्कृतीवर, या ना त्या मार्गाने, यात शन्का नाही! अर्थात आमच्यासारखे रेडिओ मिरचि चुकुनही लावित नाहीत ही गोष्ट निराळी, पण "बहुजन समाजाचे" काय? पुरू, तुझ्या मतान्शी सहमत! कायम आक्रस्ताळी, उद्धट, विनाकारणच नको तिथे नको तसा भेसळीचा गावरान बाज आणित आणि इतरान्ना तुच्छ लेखित केलेली खोखो पाटलाची बडबड ऐकुन त्याच्या नरड्यात तत्काळ मोरीतला ओला बोळा कोम्बावा अशी तीव्र इच्छा होते! एक नक्की, तो आगीशी खेळतो हे, एखाद दिवशी तो पब्लिक कडुन जाम मार खाणार, मागेच खाणार होता पण वाचला! देव त्याला सुबुद्धी देओ!
|
Mpt
| |
| Tuesday, May 16, 2006 - 8:25 pm: |
| 
|
खो खो पाटिल चे बडबड मी ऐकली नाहि. पन त्याचि व्यक्तिरेखा ऊधम सिन्घ(??) ( MTV/channel V वर जाट लोकान्ची नक्कल करतो/ करत होता) सारख़ी वाटते. ऊधम सिन्घला(??) कुणी मारलेले किन्वा त्याच्यावर टीका केलेली माहीत नाही. ज़ात लोक तर खुप रान्गडे समजले जातात. काय फरक आहे उधम सिन्घ मधे आनि खो खो पाटिल मधे? खो खो पाटिलने अशी कोणती लक्षमण रेषा ओलान्डली?
|
Santu
| |
| Wednesday, May 17, 2006 - 5:25 am: |
| 
|
खो खो पाटिलचि अस्सल गावरान भाषा आपल्याला आवडते बुवा. अगदि झुणका भाकरीची गोडी आहे त्याला. हि भाषा पुणेरी गावरान आहे. त्याने आता कोल्हापुरी भाषे चा ठसका आणावा
|
Puru
| |
| Wednesday, May 17, 2006 - 8:45 am: |
| 
|
संतु आणि MPT तुम्ही घरामधे 'सुंबडी' , 'कचकच' असे शब्द बोलता का? सकाळ मधे (मी 'नवा काळ' , 'सामना' , police times म्हणत नाही!) 'रापचिक' , 'कल्ला' असे शब्द वाचता का? नाही ना? कारण, media rightfully follows some conventions of what to write, which words to use! मित्रांमधे मजा म्हणुन बोलणं वेगळं आणि mass media मधे लिहिणं, बोलणं वेगळं! & if we mix these things (like we are already doing via remix video songs), we end up spoiling our language, our culture, our identity, our future generation! म्हातारी मेल्याचे दुख: नाही, पण काळ सोकावतो! उद्या आणखी चार खो-खो पाटिल TV/Radio वरती फुटफुटतील, सर्व जनतेचीच अभिरुची बदलेल, हे दुख: आहे!!! (---बदललेली आहेच, अन्यथा खोखो च्या अशा सवंग भाषेचे असे समर्थन कोणीही केले नसते!)
|
Maudee
| |
| Wednesday, May 17, 2006 - 8:51 am: |
| 
|
अनुमोदन पुरु, खो-खो पाटील बोलतो ती काही आपली ग्रामीण भाषा नव्हे...... अस्सल ग्रामीण भाषेत एक वेगळ्या प्रकारचा गोडवा आहे....खो-खो पाटील उबग आणतो..... आणि खरच कित्येक अमहारष्ट्रिय लोक तो बोलतो तीच ख़री मराठी असे समजतात......
|
पुरू, माउडी, अगदी बरोबर बोल्लात! अनुमोदन!
|
Santu
| |
| Wednesday, May 17, 2006 - 1:21 pm: |
| 
|
पुरु आता सुंबडि कल्ला आपण नाहि वापरत.पण लई किंवा छान ला भारी असे वापरतो ना. आणी आपण वापरत नसलो तारी. जनता वापरते ना. तुम्ही सामना सिनेमा पाहिलाय का?त्यात निळु भाउ. नि असे किति तारि डायलोग मारलेत उद्:उडत्या पिसाची कोंबडी इ. आता याने मराठि माणसाची अभिरुची बिघडली का? अहो उलट पुर्विचे १५वर्षे चे सिनेमे काढुन पहा.उद:सामना,सिहासन,सखाराम सारखी नाटके यानी अभिरुची बिघडली नाहि.उलट सम्रुध्द झाली. उलट हि भाषा लोकांना आपली वाटते म्हणुनच खो खो प्रसिध्द झालाय व टिकलाय. व दादा कोंडकेन्चे सिनेमे हे सुध्दा गावरान च होते.पण ते आज सुध्दा लोकां ना आवडतात उलट अमराठि लोक सुध्दा ते पाहात असत.
|
खो खो पाटलाने ग्रामीण ढंगात बोलावे ना.... त्याबद्दल दुमत नाही. पण त्याचा डायलेक्ट हा कुठला डायलेक्ट आहे? महाराष्ट्रात कुठे अशी भाषा बोलली जाते? ही ग्रामीण भाषेची टिंगलच आहे. कुठल्याही भाषेची टिंगल वाईटच.पुणे जिल्ह्यात अशी मराठी कोठेही बोलली जात नाही.....
|
हा नुस्ता ग्रामिण किन्वा शहरी किन्वा अगदी टोकाच जाऊन बोलायच तर पुणेरी भटाबामणान्ची भाषा यातिल वाद नाही तर आक्षेप आहे तो सातत्याने आक्रस्ताळेपणा करीत आरडत ओरडत बोलल्या जाणार्या अत्यन्त उद्धट स्वरातील गचाळ भेसळयुक्त भाषेला आहे. आता भेसळी मुळे कोणाला आपली भाषा सम्रुद्ध झाली असे वाटत असेल तर वाटुदेत बापडे! काय बोलणार मग? "बहुजन" "बहुजन" करता करता "अभिजन" वर्ग डोळ्या आड मसणपाड करुन चालत नाही! त्यामुळेच दादा कोन्डकेचे सिनेमे बघितले किन्वा निळु फुलेला पटकथा लेखाकाने दिलेले सन्वाद म्हणले आणि त्याला ताळ्या शिट्ट्या मिळाल्या असल्या तरी त्यान्चे अनुकरण केले गेले नाही, केले जात नाही! की नाही निळु फुले स्वतः त्याच एक गाव बारा भानगडी इस्टाइल भाषेत बोलत! मागे काही वर्षान्पुर्वी माझा कोम्बडा स्टाइलची गाणी आली होती... त्या पुढे जाऊन "ओऽऽयेऽऽ ओऽऽयेऽऽ" असले किन्चाळत हेल काढणारे एक गाणे आले होते! त्या काळात पुण्यातून लोकलने प्रवास करणार्या मुलीन्ना विचारुन बघा... दिसली मुलगी की या गाण्यापासुन सद्गती प्राप्त झालेले काही पिसाट जोरजोरात ओये ओये किन्चाळायला लागायचे! त्यान्ची मजल त्या पोरीन्च्या कानाशेजारी जाऊन ओरडण्या पर्यन्त गेली होती, हे मी स्वतः शिवाजीनगर स्टेशनवर पाहिलेले आहे! प्रश्ण असा हे की खो खो पाटलाचे अनुकरण काही "बहुजन" करुन वागाबोलायला लागले, फार कशाला, तुमच्या घरातील तुमची मुलेच तसे बोलायला लागली तर चालेल का? (चालत असेल तर तुमचे चरण दाखवा) उगीच नाही, आजही "सुधा नरवणे प्रादेशिक बातम्या देत आहे" हे वाक्य लोकान्च्या मनात गुन्जत असते अन त्यान्च्या वरचा लेख लोकसत्तात छापुन येतो! खो खो वर पण येइल लेख छापुन... लोकमत किन्वा अशाच कुठल्यातरी समाचार मधे!
|
Santu
| |
| Thursday, May 18, 2006 - 5:05 am: |
| 
|
रोबिन खो खो चा डायलेक्ट हा पुणेरि ग्रामिण 40% व्सोलापुरी ६०% आसा आहे. आणी जरी नसला तरी काय बिघडले? आपण कुठल्याहि creative art ला आसे military छाप बंधन घालु शकत नाहि. लिम्बु तुमी म्हणता त्या प्रमाणे हा वाद पुणेरि शुध्द व ग्रामीण अस मि कुठ म्हणतोय उलट पुणेरी शुध्द भाषा चांगलीच आहे.ती हि आम्हाला आवडेतेच.पण या भाषे ला चांगले म्हट्ली म्हणजे पुणेरि वाइट असा याचा अर्थ नाहि. दुसरे ओये ओये च्या आधी पासुनच हे पिसाट मोकाट सुटलेत.त्याला गाणे काय करणार. सुधा नरवणे या अविस्मरणीय आहेतच.पण त्याच बरोबर दादा कोंडके किंवा निळु भाउ यांच्या बद्दल सुध्दा एखादे पान ख्रर्ची घालावे लागेलच. दुसरे भेसळ म्हणजे काय. आता english मधे marketing guru किंवा pandit हे शब्द वापरतात हि भेसळ नव्हे काय
|
Puru
| |
| Thursday, May 18, 2006 - 5:56 am: |
| 
|
लिंबु, अगदी सही बोललास! संतु, बाकीच्या BB वरची तुमची मतं मी वाचली; चांगली असतात! पण येथे मात्र तुम्ही साफ चुकतायत. Either you are not living in Pune or are originally from outside (kolhapur?) त्यामुळे तुमची जरा जास्तच गल्लत होतेय. ग्रामीण भाषा मला ही आवडते. बीडचा मकरंद अनासपुरे ("काय द्याचं बोला!") तर एकदम हीट! तात्पर्य, खो-खोची भाषा ग्रामीण तर नाहीच, (आणि हो, सोलापुरी तर एक टक्का पण नाही! अस्मादीक सोलापुरचेच असल्यामुळे ती भाषा कोळुन प्यालेले आहेत!) पण ती सवंग, अश्लील आहे. त्याला आमचा आक्षेप आहे! लिंबु म्हटल्याप्रमाणे, उद्या तुमचा मुलगा असं बोलु लागला तर तुम्हाला आवडेल काय? & Believe me, whatever we hear/see continuosuly, we follow it indirectly some day . तुम्ही भेसळीचं म्हणताय्; मराठीनं उदार अंत्:करणानं हजारो इंग्रजी शब्द 'आपलेसे' केलेले आहेत. e.g. Table, shirt, pant, pen, etc.etc.
|
सण्टू, तुझ करण्ट अफेअर मधल पटत, हिथल नाय! मार्केटिन्ग गुरु किन्वा पन्डित हे शब्द वापरत असतील, तर ते इन्डियात किन्वा अमेरिकेत, इन्ग्लन्डमधे नाही, आणि वापरले तरी भेसळीचा आरोप होउ शकत नाही कारण त्यान्च्या भाषा सन्स्कृतीत "गुरु" ही कन्सेप्ट नाही! आम्ही मात्र असलेली शब्द सम्पत्ती सुद्धा गैरवाजवी इन्ग्रजी शब्दान्ची उपाययोजना करुन गमावित आहोत.. शिवाय इन्ग्रजीत अनेक शब्दान्ची भर पडली हे खरे असले तरी इन्ग्रजान्ची इन्ग्रजी आणि इन्ग्लण्डच्या द्वेषातून अमेरिकनान्नी मोडतोड केलेली इन्ग्रजी, यातिल खरी मूळ कोणती मानावी हा प्रश्णच हे कारण जागतीक स्तरावर व्यवहारात अमेरिकन इन्ग्रजी जास्त चालते! पण हा विषय वेगळा हे! खो खो कोणत्या भाषेत बोलतो केवळ येवढाच प्रश्ण नसुन तो ज्या तर्हेचे झोपडपट्टी इस्टाइल बडबडतो, ते ही प्रसिद्धी माध्यमातुन अधिकृतपणे ते चीड आणणार हे! तो जे बोलतो ती मराठी महाराष्ट्राची नाही! तो ओढुन ताणुन ग्रामिण ढन्गाची भ्रष्ट घाणेरडी नक्कल करतो, आणि या सातत्य पुर्ण नक्कलेला आक्षेप हे! तस म्हणल तर माझी इथली भाषा देखिल गचाळ अशुद्ध असती हे तर मलाही मान्य करावेच लागेल, पण म्हणुन मी लिहित असलेल्या भाषेचा प्रश्ण निघाला तर ती खराबच हे भले त्यात मी कितीही भलाथोरला आशय वगैरे लिहित असेन. खोखो ची दोन्ही कडुन बोम्ब हे, भाषा पण खराब, उच्चारणही खराब, स्वर उद्धट, दुसर्यान्ना तुच्छ लेखणारा किन्वा कुणाची कशाची खिल्ली उडविणारा, कारम आक्रस्ताळा स्वतःकडे लक्ष वेधुन घेण्यासाठी बेम्बीच्या देठापासुन केलेला आरडा ओरडा, नको तिथे घेतलेले ठेक्याचे पॉझ आणि नको तिथे केलेले स्वरातील हेलकावे, अन येवढ करुन शेवटी मजकुरातला काही भरीव आशय म्हणावा तर तिथेही नन्नाचाच पाढा! आणि हे सगळ "मराठी" च सादरीकरण! मला एक सान्ग, रेडिओ मिर्चीवरच जे हिन्दी बोलल जात ते कस असत रे? जे इन्ग्रजी बोल्ल जात ते कस असत? मग त्या तुलनेत मराठी बाबतच जाणुन बुजुन गचाळ गलीच्छ बोलणार्या खोखो ची नेमणुक का? शिवसेनेला किन्वा मंअ.से. ला हा विषय देवुयात का?
|
Maudee
| |
| Thursday, May 18, 2006 - 7:09 am: |
| 
|
सन्तू, बोली मराठीचे अनेक प्रकर आहेत.....काही अजून बोलल्या जातात...काही काळाच्या पडद्याआड गेले आहेत(जस की बखरकालीन,ज्ञानेश्वरीतील मराठी,प्रभात्च्या जुन्या चित्रपटातील मराठी).प्रान्ताप्रान्ताप्रमाणे सुध्हा प्रकार आहेत ज्यात पुणेरी,वर्हाडी,सोलापुरी,सातारी, सान्गलीकडची,कोल्हापुरी..... असे बरेच प्रकार आहेत..... या प्रत्येक प्रकाराची स्वतःची वैशिष्ट्ये आहेत,परम्परा आहेत....ती भाषा तशी का घडली याची कारणे आणि इतिहास पण आहे......आणि सर्वात सुन्दर भाग म्हणजे प्रत्येक प्रकारच्या बोली मराठीला एक लयबद्धता आहे ज्यामुळे ती अम्रुताहुनी गोड वाटते कानाला..... मी वर दिलेल्या आणि माझ्याकडून राहून गेलेल्या कुठल्याही बोली मराठीच्या जवळ खो खो पाटीलची मराठी जात नाही.... लिम्बूने वर सान्गितल्या प्रमाणे ते फ़क्त गलिच्छ मराठी आहे.... वाईट याचच वाटते की तुमच्यासारखी काही खुद्द मराठी माणसे त्याला मराठी म्हणतात आणि त्या मुद्द्यावरून वादही घालतात.... 
|
Rahul16
| |
| Thursday, May 18, 2006 - 7:57 am: |
| 
|
Santu aadhi 'creativity' aani 'murkhpana' yat kay farak aahe yacah dole bandkarun 10 minite wichar kara. Creativiti nahi mhanunach he lok asa murkhapan karatat. Mi 'Kho-Kho patil" aaikala nahi pan V ki MtV warache 'Lola way' pahile aahe. he tasech kahitari aacharat asanar. Keral chya lokanchi keleli tingal or tyanchya swatahachya akaleche dindawade pahawat nahi. hya kho kho patil la nahi pan tyachya prodecer la char chaughanmadhe kutala pahije.
|
Santu
| |
| Thursday, May 18, 2006 - 9:01 am: |
| 
|
पुरु अहो अश्लिल आणी संवंग आहे हे बरोबर आहे.पण ति तशी आहे म्हनुनच लोकप्रिय आहे. त्याचा पण एक चाहता वर्ग आहे. आता सर्व अश्लिल संवन्ग गोष्टि वर बन्दि कशी घालणार. उद; सुरेखा पुणेकरच कारभारि दमान जसा अभंगवाणी चा चाहता असणार तसाच सुरेखाचा चाहता असणार.यात तुलनेचा प्रश्न येतो कुठे? भेसळि बद्द्ल लिम्बु बोलला म्हणुन मि सांगितले. सोलपुरि खुद्द नाहि तिला तेलुगु चि फ़ोडणि आहे मि म्हणन्तोय करमाळा अकलुज ची सोलापुरी. लिंबु भाउ अरे तो फ़्रेड्मन क कोण times मधे लिहतो अरे उठ सुट तो हे शब्द वापरतो तो उस गाव चा च ना रे.मग अरे अशी खिल्लि तर मद्राशांची हिदि सिनेमात किति उडवलिय. आता लालूच्या भाषेचि माप काय कमि का काढुन झाला.सरदारजी तर सारखा तोन्डि लावायला आहे. अग माउडे या जुन्या थोर थोर लोकांन्ची हा खोक्या कुठ म्हण्तोय बरोबरि करा म्हणुन पण जरा नक्कल करताना अतिरेकि आव आणावाच लागतो. त्याच एवढ काय?
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|