Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through July 04, 2006

Hitguj » Views and Comments » General » विचारा तर खरं! (अर्थात Open Space !!) » Archive through July 04, 2006 « Previous Next »

Robeenhood
Saturday, June 24, 2006 - 10:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कै तरीच कै.... ......


Zakki
Saturday, June 24, 2006 - 3:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ज्यांना माहित नाही अश्यांसाठी खुलासा: होर्हे पोसाडा हा यांकी बेसबॉल टीमचा प्रसिद्ध कॅचर नि चांगल्यापैकी बॅटर आहे, गेली काही वर्षे.

असामीला एकधम धडकी बसली असेल. घाबरू नको असामी, इतक्यात यांकी रेड सॉक्स गेम नाहीये, तोपर्यंत फुटकळ टीमशी खेळून 'जिंकलो' म्हणून मिशीला तूप लावून (किंवा I can't believe it's butter लावून) खुषीत रहा.
, असामी


Dineshvs
Saturday, June 24, 2006 - 3:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रॉबीन, दिल्लीत, गुजराथमधे पण य चा ज होतो.

यमुना, जमुना
यसोदा, जसोदा
यसवंत, जसवंत


Pra_amr
Tuesday, June 27, 2006 - 5:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Dear All,

I am Pranesh. I had Bcom and doing job as Computer operator in Company. I had some VB6, Orcale, C, C++ courses from private institute.

Now at this time I can't do MCA or something like that.

Should I give Microsoft, Oracle, Sun, and Cisco examinations and obtain their certifications.

Is this certifications have weitages for best carrier.

Pra_amr
Tuesday, June 27, 2006 - 5:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

I mean to say should i give Microsoft, Oracle, Sun, or Cisco any ONE or TWO examinations and obtain their certifications

Mrdmahesh
Tuesday, June 27, 2006 - 7:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्राणेश,
ओरॅकल, सन, सिस्को, मायक्रोसॉफ्ट यापैकी कुठलेही एक certification केलेस तरी पुष्कळ आहे.. भाराभर certifications करून वेळ, पैसा वाया घालवू नकोस... तुझी आवड कशात आहे, यापैकी तुला सोपे काय वाटते.. याचा विचार कर अन् त्याप्रमाणे certification कर... मुख्य म्हणजे ज्याचे certification करणार आहेस त्याचे fundas आधी तयार कर... नुसतेच नावाला certification नको...
एकच certification एवढ्याच साठी की या सगळ्या technologies, vast आहेत... उदा. नुसत्या सन चीच जावा certifications मुळी ३ / ४ आहेत.. यावरून तुला लक्षात येईल की जावा किती vast technology आहे.
सगळ्याच technologies ना मागणी आहे तेव्हा नीट विचार करून निर्णय घे...
आणखी एक काम कर... तुझे english सुधार... :-) (त्याचा ही एखादा couse केल्यास हरकत नाही....)


Zakki
Tuesday, June 27, 2006 - 7:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो रे बाबा. उदा. इंग्रजीत, विद्यार्थि परीक्षा 'घेतात' नि मास्तर 'देतात'. तेंव्हा 'Should I take microsoft ... certification tests? असे म्हण.

त्यापेक्षा अमेरिकेत ये. इथे कुणालाहि जराश्या प्रयत्नाने कसलिही नोकरी मिळते ---- . सर्टिफिकेटच काय, कुठलेहि ज्ञान किंवा अक्कल नसली तरी! स्वानुभव!


Pra_amr
Wednesday, June 28, 2006 - 4:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Zakki, MrdMahesh, Dhanyawad,

Varil Course che exam Punyat hote ka ? aslyas kontya institutations madhey ? aani Course Fees aani Exam Fees kiti aste ?

Cool
Wednesday, June 28, 2006 - 7:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


दैनिक सकाळ मधे 'पन्नास वर्षांपुर्वी' नावचे एक सदर येत असते, त्यात सकाळलाच आज पासुन 'पन्नास वर्षांपुर्वी' आलेली बातमी परत दाखवतात. या बातम्यांमधे भारत सरकारचा उल्लेख 'हिंदचे सरकार' असा केलेला आढळतो. जाणुन असे घ्यायचे आहे की असा उल्लेख करणे कुठपर्यंत चालु होते, आणि ते officially थांबविण्यात आले की काळाच्या ओघात बदलले.

याच सदरात बर्‍याचदा इतर देशांच्या प्रतिनिधींबद्दल (भले तो राष्ट्र प्रमुख असो वा राजदुत) ऐकेरी शब्दांचा वापर आढळतो, तो का असावा.


Limbutimbu
Wednesday, June 28, 2006 - 7:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कूल, भारत स्वतन्त्र जरी १९४७ मधे झाला तरी घटना समिती स्थापुन स्वतन्त्र घटना तयार करुन त्यानुसार लोकप्रतिनिधीन्च्या सन्सदेची उभारणी होइस्तोवर (मला नेमके साल आठवत नाही पण बहुदा ५२ किन्वा ५३ असावे) पुर्वीचा उल्लेख चालू होता! तोवर १९३५ पासुन १९४७ पर्यन्त चालत आलेले इन्ग्रजी राजवटी अन्तर्गत मिळालेले प्रातिनिधिक स्वातन्त्र्यातील सरकार कारभार चालवित होते! कालान्तराने घटना बनल्यावर व "निधर्मी" "समाजवादी" राजवटीचे अवलम्बित्व केल्यानन्तर "हिन्द" असा धर्माधिष्ठीत उल्लेख करण्याचे नाकारण्यात येवुन "भारत" असे नामाभिदान प्राप्त झाले! "निधर्मी" ते "सर्वधर्मसमभा" हा प्रवास तसा मनोरन्जक देखिल हे जरी हा प्रवास रक्तरन्जित वाटेवरुन झाला! पण तो वेगळा विषय हे!
वरील माहीतीत चुक भुल असल्यास कृपया सुधारणा करावी
कूल, तुझ्या दुसर्‍या प्रश्णाच्या अनुषन्गाने असे सान्गावेसे वाटते की पन्चवीस तीस वर्षान्पुर्वीपर्यन्त एकेरी उच्चारण आक्षेपार्ह वाटत नसे, बापाला बाप म्हणायची पद्धत होती पण कालान्तराने बाबा वडील या शब्दान्च्या ऐवजी पपा मम्मी डॅडी आल्यानन्तर एकेरी सम्बोधने हद्दपार होवुन तिथे भारदस्त आदरार्थी वचने सर्रास वापरायचा प्रघात सुरू झाला! सर्रास म्हणण्याचे कारण पुर्वी राजमान्य राजश्री येवढे सम्बोधन पुरेसे असे, मग राजेही गेले नी त्यान्ची स्वतःचीच मान्यता गेल्यावर कुणाला काय सम्बोधावे या प्रश्णाच्या धुक्यात समाज सापडला, ज्याने त्याने आपापले मार्ग चोखाळले! उत्तराचा हा एक भाग अन दुसरे असे की दख्खनच्या या महाराष्ट्रीय मातीत ढोन्गी नम्रता नाही! त्यामुळे हिन्दीतला "आप" मराठीत "आपण" म्हणुन क्वचित वापरला जावुन "तु किन्वा तुम्ही" हे सम्बोधन नियमित वापरले जाते आणि असा मराठी जेव्हा एखाद्या हिन्दी भाषिकाला सहजतेने "आप" ऐवजी "तुम" असे सम्बोधतो तेव्हा बर्‍याचदा तो हिन्दीभाषीक चिडतो, वैतागतो!


Cool
Wednesday, June 28, 2006 - 9:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


LT माहिती बद्दल धन्यवद.



Mrdmahesh
Wednesday, June 28, 2006 - 10:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्राणेश,
पुण्यात अशा certifications च्या परीक्षा NIIT मध्ये चालतात... पुढील चौकशी (फी, registration वगैरे..) तिथे जाऊन कर..
या certifications चे courses चालवणार्‍या अनेक institutes आहेत.. उदा. SEED, NIIT, kArrox etc. . प्रत्येक instt. मध्ये जाऊन चौकशी कर.. प्रत्येकाचे "दर" वेगळे आहेत..


Storvi
Thursday, June 29, 2006 - 7:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला माझ्या एका भाच्याच्या कविता पोस्ट कराय्च्या अहेत रंगिबिरंगी मध्ये, पण सध्या मायबोली वर्च्या कविता ज्य पद्धतीने email मधुन plagerize होऊन येत आहेत, मला हे सेफ़ वाटत नाहिये. मोठ्या माणसांना situation शी जुळवुन घेता येतं पण हा लहान मुलगा आहे, आणि कविता फ़ार चांगल्या आहेत, सो काळजी वाटते आहे. कोणाकडे काही उपाय आहेत का?

Mekhla
Thursday, June 29, 2006 - 8:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

storvi,
look at
http://creativecommons.org/faq.
they have some free copyright licenses that you can use for posting work online.
Hope this helps.



Bee
Friday, June 30, 2006 - 8:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शिल्पा, आत्ता admin ने उत्तर लिहिलेच आहे ह्यावर. जर तेही नसेल पटत तर आम्हाला मेल करुन ह्या बालकविता वाचायला दे.. तुमच्या घरात बरेच जण कवी दिसतात. तू, तुझी आई, भाचा. आरोही ही आगामी कवयित्री होणार म्हणजे.. :-)

Storvi
Friday, June 30, 2006 - 5:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>बालकविता >>अरे बी ह्या 'त्या' भाच्याच्या नाहीत रे बाबा.. आणि त्यांना बालकविता म्हणणे म्हणजे :-O असो तुला काय माहित म्हणा तु अजुन वाचल्यात कुठे. :-)

Admin
Friday, June 30, 2006 - 7:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Storvi,नुसत्या ईमेलनी साहित्य पाठवणे आणखी धोकादायक. कारण वेबसाईटवर लिहिलेले लिन्क देऊन नंतर दाखवता तरी येते. जर इमेलने पाठवले गेले तर कुणी कुणाला पाठवले याचा माग ठेवता येत नाही. फक्त अगदी विश्वासातल्या लोकाना पाठवले तर हरकत नाही पण मग तेवढ्याच कमी लोकांपर्यंत ती कविता पोहोचते.

Storvi
Friday, June 30, 2006 - 9:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Admin मी रंगीबीरंगी वरच टाकणार आहे. ती मेखला ने दिलेली link चांगली वाटते, ति वपरुन पाहीन शिवय, direct post करण्या पेक्षा gif करुन पोस्ट करेन. त्याने फ़ार फ़रक पडेल असे नाही पण तेवढेच plagerize करणार्या ला जरा जस्त कष्ट पडतील...

Bee
Tuesday, July 04, 2006 - 7:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

PET/PMT exams बद्दल मला माहिती हवी आहे. आजकाल पुर्वीसारखे PCM/PCB % लागत नाही असे ऐकले. ह्या नविन परिक्षेबद्दल व engineering/medical मध्ये प्रवेश मिळण्याकरिता हवा असलेल्या criteria बद्दल कुणाला काही माहिती आहे का? कुणाला एखादी छानसी लिंक देता आली तर बरे होईल. मला शोधून सापडली नाही.

Soultrip
Tuesday, July 04, 2006 - 8:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्र: पुण्यात मराठी पुस्तकांचं (साहित्य) चांगलं shop कोणतं? Crossword मला माहित आहे. पण तेथे बरीच पुस्तके नाहीत. (उदा: बनगरवाडी)

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators