|
इथे विषयांतर किती आणि योग्य कि अयोग्य याची चर्चा नको. ती चर्चा इथे हलवली आहे. आता गाडी मूळ पदावर आणा बघु.
|
Milindaa
| |
| Saturday, July 01, 2006 - 2:09 pm: |
| 
|
पण मॉडरेटर तो नवीन बीबी बंद आहे आणि मला त्यावर लिहायचं आहे तेव्हा जरा उघडाल का ?
|
रैना, छान लिहिले आहेस!
|
Moodi
| |
| Monday, July 03, 2006 - 2:20 pm: |
| 
|
रैना तुझ्या या उत्तम लेखाला शिर्षक पण एकदम समर्पक आहे. एक प्रश्न आहे मनात. जपान हा बुद्धधर्मीय देश, मग विपश्यना, गौतम बुद्धांचे तत्वज्ञान हे या लोकांपर्यंत पोहोचलेच नाही का? कारण बेकारी, दारिद्र्य, एकटेपणा हा आता जास्तच वाढीस लागलाय. अन यातुन बाहेर येण्यासाठी मार्ग भारतात नक्कीच आहेत, म्हणजे बेकारी, दारिद्र्य हे प्रश्न तर भारतात आहेतच पण निदान मित्र मैत्रिणी, नातेवाईक, जोडीदार अन थोडी फार अद्याप टिकुन असलेली कुटुंब व्यवस्था यातुन आशेचा किरण सापडतो आपल्याला. पण या अजुन काही सांगू शकशील याविषयी? म्हणजे या देशात तुला दिसलेल्या नातेसंबंधाविषयी?
|
हा बीबी उघडला आहे. लिहा काय लिहायचे ते 
|
Sayonara
| |
| Monday, July 03, 2006 - 7:21 pm: |
| 
|
मूडी, रैना तुझ्या शंकांचं निरसन करेलच पण दोन ओळी माझ्याकडूनही. १ : बुद्धधर्माविषयी मी काही लिहिणार नाही कारण मला स्वतला त्याची खोलवर माहिती नाही. पण खरंतर मला कधी ह्या लोकांवर त्याचा पगडा जाणवला नाही. २ : दारिद्र्य : जपानमध्ये कपड्यावरुन माणसाची परिक्षा अजिबात करता येत नाही. म्हणजे ही व्यक्ती मध्यमवर्गीय आहे की उच्च मध्यमवर्गीय आहे हे ठरवणं कठीण आहे. सगळेच छानछोकीत रहातात. ३ : एकटेपणा घालवण्यासाठी ही लोकं पाचिंकोमध्ये जाऊन तासनतास रमतात. किंवा जपानमध्ये ऑफिसनंतर पब मध्ये जाण्याची पद्धत आहे. एकटेपणा घालवायचा तोही एक मार्ग आहे. आपल्याकडे जंस उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की मुलं नातेवाईकांकडे रहायला जातात किंवा त्यांची मुलं आपल्याकडे येतात तसा काहीही प्रकार तिकडे नाही.(हे मी शहरातलं सांगते आहे.) किंवा आजी आजोबा ४,८ दिवस तुमच्याकडे येऊन राहिले आहेत हा प्रकारही मी कधी पाहिला नाही. खरंतर जॅपनीज बायकांना असं आठ दहा दिवस घरी कुणी येऊन रहाणं अजिबात पचनी पडत नाही. आता उदाहरणच द्यायचं झालं तर माझी एक जॅपनीज मैत्रिण आहे जिचा नवरा अमेरिकन आहे. आणि तिचे सासू, सासरे अमेरिकेत असतात. मध्यंतरी ते आपल्या नातवंडांना भेटायला म्हणून आठ दिवस जपानला आले. त्या आठ दिवसातले ४ दिवस ते मुलाकडे राहिले आणि उरलेले ४ दिवस हॉटेलमध्ये जाऊन राहिले. मला तरी हा प्रकार खूप खटकला.
|
Moodi
| |
| Monday, July 03, 2006 - 8:32 pm: |
| 
|
सायो भरपूर माहिती दिलीस की गं. इथे मला पण एक जपानी मुलगी भेटली, पण दुर्दैवाने तिला English चा पूर्ण गंध नसल्याने अन नंतर आमचा पण संपर्क तुटल्याने जपानी संस्कृती अन रहाणीमानाविषयी कधी समजले नाही. हो पाश्चिमात्य देशातही ऑफिसनंतर पब मध्ये जाण्याची पद्धत दिसतेय. माझा नवरा ऑफिस सुटल्यावर डायरेक्ट घरी येतो याचे त्यांना नवल वाटते. पण माझ्या अमेरीकन टिचरला मात्र भारतात अजुनही आई वडिल मुलांबरोबर रहातात त्याचे कौतुक वाटले. रैना सायोने छान विश्लेषण केलेय. तू सखोल वाचलेस का कधी बौद्ध धर्माविषयी? जपानी लोकांवर कधी या गोष्टीचा म्हणजे धर्माचा किंवा एकटेपणातुन अन उदासीनतेतुन बाहेर पडण्यासाठी counselling/ psychotherepy चा प्रभाव जाणवलाय का? या लोकांना सायकॉलॉजिस्ट कडे जाणे आवडते का?
|
Sayonara
| |
| Monday, July 03, 2006 - 9:04 pm: |
| 
|
मूडी, आपल्याकडेही हल्ली कुठे दिसतात फारशा joint families? अजिबात नाहीत असं नाही पण शहरातून त्याचं प्रमाण रोडावत चाललं आहे. पण टोक्योसारख्या मोठ्या शहरात एकत्र रहाणारी couples मी पाहिली नाहीत. एकतर इथे घरांची साईझ खूप लहान असते. US,UK च्या comparison मध्ये. आणि दुसरं म्हणजे वर म्हटलंय तेच कारण. इथे खूप कमी मैत्रिणी तुला घरी बोलावतील. मात्र तू बोलावलंस तर शंभरवेळा घरी येतील. तसंच तू एखाद्या शेजारणीकडे गेलीस तर तुला त्या घरात घेणार नाहीत. दाराबाहेर उभं करुन तुझ्याशी गप्पा कुटतील. माझ्या शेजारणीने जेव्हा आम्हांला चहाला घरी बोलावलं तेव्हा मला आश्चर्याचा धक्काच बसला. पण ती चार पाच वर्ष UK मध्ये राहून आल्यामुळे बहुतेक बदलली असावी असा सोयीस्कर समज मी करुन घेतला.
|
Raina
| |
| Tuesday, July 04, 2006 - 2:49 am: |
| 
|
मुडी, सायोनारा सारखेच माझे ही मत आहे. बौद्ध धर्म हा मायदेशातला आणि इथला सारखा नाही असे निरीक्षणाअंती माझे अनुमान आहे. ईथल्या बुद्धाला प्राणिसंहार निषीद्ध नसावा. वानगीदाखल सांगते- कामाकुरा- हे इथलं एक प्रेक्षणीय स्थान- भरपूर shrines आणि "दाईबुत्सू "- अवाढाव्य बुद्धमुर्ती. अशा ह्या कामाकुरात Vending Machines मध्ये Buddha Beer असे एक पेय पाहीले आणि हतबद्ध झाले. शिमोदा हे अमेरिकेच्या Commodore Perry ने जिथून जपानवर सर्वप्रथम चढाई केली ते ठिकाण- तिथे तर चक्क एक स्मारक पाहीलं तिथे लिहिलं होते ह्या जागी पहिली गाय Beef Consumption साठी कापल्या गेली. आसपास सुंदर shrines आणि मंदीरं तात्पर्य ह्यांचा बुद्ध जगावेगळा आहे. ६व्या शतकात चीन आणि कोरिया मार्गे जपान मध्ये बुद्ध आयात झाला. चीनी आणि कोरीयन बुद्धाला ही अभक्ष्य चालतंच की. शिंतो हा मूळ जपानी धर्म, मग बौद्धधर्म आला, आणि शेवटी क्रिश्चन धर्म. आत्ताच्या सामान्य जपानी माणसाला- कुठल्याच धर्माचे फार सोयरसूतक नाही. ते खुद्द आपल्याला हवे तसे ३ ही धर्माचे समारंभ पाळतात... म्हणजे नवजात बाळाचे नामकरण शिंतो पद्धतीने, लग्न क्रिश्चन पद्धतीने पांढ-या झग्यात आणि मृत्युसंस्कार बौद्ध पद्धतीने.. सगळी सरमिसळ.... धर्म ही जपान मध्ये तरी अफुची गोळी नाही असे वाटते.. ते चांगले का वाईट कोण जाणे- पण भावनिक आधारसंस्था (काल्पनिक सुद्धा) नाही हे खरे.... बाकी ढासळती कुटुंब व्यवस्था हे तर जगात सगळीकडेच आहे
|
Psg
| |
| Tuesday, July 04, 2006 - 6:18 am: |
| 
|
माझा प्रश्ण असा आहे की हे लोक इत्क्या पैश्याचं करतात काय? सतत काम आणि काम, कुटुंब म्हणावं इतकं मोठं नाही, नवरा बायको दोघेही कमावणारे, पैसा भरपूर मिळत असेल. मग कशावर खर्च करायचा तो? वर्षिक सुट्टी फ़क्त? का cost of living फ़ारच high आहे की sustain होण्यासाठी इतका पैसा मिळवावाच लागतो? म्हणून workoholics होतात का? आणि मग नैराश्य, एकटेपणा, आत्म्यहत्या.. अशी cycle आहे का?
|
Raina
| |
| Tuesday, July 04, 2006 - 7:06 am: |
| 
|
पूनम अगदी उलट आहे. इथल्या महागाईचा अंदाज द्यायला सांगते. महिन्याच घरभाडं(अगदी टिचभर खोलीच्- ६०,००० येन) {आपण यात राहूच शकत नाही अशा खोल्या , Health Insurance Premium/Social Insurance/ Labour Insurance वगैरे Deductions साधारण २५ आता किमती- तोक्यो ते योकोहामा ( suburb ) चे एकवेळचे तिकीट ४५०येन, १ लिटर दूध- २२८ येन, १ कप coffee २५० येन, भाज्या- टोमॅटो ३०० येन ला २, मुळा २०० येन ला एक मोठ्ठा, पालक २००येन जुडी एक जेवण ५००-१००० येन etc... etc.. वर्षाकाठी जेमतेम २-३ मिलियन येन कमावणा-या आणि संसाराचा गाडा ओढणा-या ह्या लोकांचे काय होत असेल बरं अगदी दरिद्री/ भणंग लोकाना निदान उघडपणे भीक मागता येते- पण पैशाचे सोंग ह्या निम्न्-मध्यमवर्गीय ते गरीब या सदरात मोडणा-या लोकांनी आणायचे कसे? अशातच नोकरी गेली आणि की माणूस हमखास "साराकीन" ( loan sharks ) च्या विळख्यात अडकत जातो... त्यांचे व्याजच एवढे असते की नंतर नोकरी लागून सुद्धा मुदलाची रक्कम एकरकमी देणे शक्य होत नाही... }
|
Raina
| |
| Tuesday, July 04, 2006 - 7:23 am: |
| 
|
त्यांचे राहू द्या- आपले देशबांधव पण कुठल्या परिस्तीथीत राहतात ना कधी कधी... दक्षिण कोरियात गेले होते कामासाठी तर शेजारच्या खोलीत एक तमिळनाडु च्या कुठल्या तरी दुर्गम भागातली एक मद्रकन्या.... तिला म्हणलं चल जेवायला जाउयात... तर म्हणाली मी माझे करुन खाते... सहज काय केलं होतं जेवायला विचारलं तर म्हणाली- घरुन येताना ५-७ किलो रवा आणला होता- तर रोज उपमा करुन खाते... देवा- म्हणजे ही मुलगी ( कंपनी living allowance )देत असूनही, सकाळ संध्याकाळ नुसत्या उपम्यावर इथे या परक्या देशात काम करत होती- आणि हे गेल्या महिन्याभर- २ दिवसांनी ती परत जाणार होती. आता असे दिवस काढ्ल्यावर वेड लागेल नाहीतर नैराश्य येईल... बरं झालं लवकर परत जाणार होती ते..
|
Bee
| |
| Tuesday, July 04, 2006 - 7:47 am: |
| 
|
रैना, चांगली सखोल माहिती गोळा केलीस.. बरीच सोशल झालेली दिसतेस जपानमध्ये. इथे asia pacific देशात तर सोशल होणे फ़ार कठिण आहे. एक येन म्हणजे किती रैना?
|
Psg
| |
| Tuesday, July 04, 2006 - 9:59 am: |
| 
|
ओके, म्हणजे कमावलेले सगळे खर्च होतातच.. नैराश्याच हेही कारण असेल. योगाच वेड अमेरिकेसारख पोचलं नाही का अजून तिथे? त्यानी तरी मन:शांती मिळेल..
|
Sayonara
| |
| Tuesday, July 04, 2006 - 12:15 pm: |
| 
|
आहे. योगाचं वेडही भरपूर आहे तिकडे. पण नुसत्या मनशांतीवर काम थोडीच भागेल?
|
Santu
| |
| Tuesday, July 04, 2006 - 12:25 pm: |
| 
|
अरे बापरे रैना काॅफ़ी ला २२५ येन महागाई का काय म्हणायची.किति येन म्हनजे आपला रुपया मला वाटत त्यांना self respect फ़ार असावा म्हणुन ते suside करत असावेत psg मला वाटत पैशाचा व मनस्वास्थ्या चा फ़ारसा संबध नाहि.
|
एक प्रश्न: Self respect असल्यावर 'self' चीच हत्या कशी काय केली जाऊ शकते?
|
Dineshvs
| |
| Tuesday, July 04, 2006 - 4:54 pm: |
| 
|
येनला सबयुनिट नाही. आणि चलन बाजारात नेहमी १०० येनचा भाव, सांगितला जातो. रैना आणि सायोनारा, तिथे या विषयावर काय लेखन होतेय ? हा सामाजिक प्रश्ण समजला जातो का ? धर्माचा आणि आहाराचा तसा थेट संबंध नाही. आपण शेतीत प्रगति केली, म्हणुन गोमांस खाणे सोडले. खुद्द गौतम बुद्धालाच अखेरच्या वेळी डुकराचे मास खायची ईच्छा झाली होती. ज्यु धर्मात त्या पवित्र भुमीला डुकराचे पाय लागु नयेत, असे लिहिले आहे.पण रशियातुन तिथे गेलेल्या ज्युना ते हवे होते. मग त्यानी डुकराचे पिंजरे अधांतरी ठेवले. तात्पर्य काय, कि धर्म हा विषय तसा ईथे गौण आहे. मनःशांतिसाठी तसा त्याचा फारसा फायदा होत नाही.
|
Santu
| |
| Wednesday, July 05, 2006 - 4:59 am: |
| 
|
अहो सेल्फ़ रिस्पेक्ट वाला च आत्महत्या करणार. निगरगट्ट माणुस नाहि.
|
Psg
| |
| Wednesday, July 05, 2006 - 5:54 am: |
| 
|
आता मात्र मी confuse झालेय! मग आत्महत्येचं कारण नक्की काय आहे?
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|