Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through June 30, 2006

Hitguj » Views and Comments » Current Affairs » अनुदिनी अनुतापे तापलो रामराया- जपानमधील आत्महत्येचे प्रमाण » Archive through June 30, 2006 « Previous Next »

Raina
Tuesday, June 27, 2006 - 1:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चाफा-
Oshin ? Wow ! मी पण ही सिरीयल मन लावून पाह्यचे. मला फार आवडायची ती. पण हे जपानी लोकं हसतात मला- ओशीन आवडते म्हणुन. सगळ्यांचे मत असे- की ती फार जूनी आहे. outdated.
आणि कुरोसावां च्या चित्रपटंबद्द्ल तर मलाच जपान्यापेक्षा जास्ती आस्था आहे- असे अनेक जपान्यांचे मत आहे.
कुरोसावांचे चित्रपट तर ब-याच तरुण जपान्यांनी पाहीले सुद्धा नाहीत कधी.

ललित मध्येच टाकायचा होता- पण हा लेख आहे, शेवटी थोडी आकडेवारी ही टाकयची होती. रुढार्थाने ललित च्या व्याख्येत बसत नाही म्हणुन लोकं धरुन हाणतील असे वाटले, म्हणून ह्या सदरात टाकला शेवटी.


सायोनारा,
तुम्ही पाहीला का सायुरी ( पिक्चर) ? कसा वाटला?


Sayonara
Tuesday, June 27, 2006 - 1:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रैना, मी पाहिला गं सायुरी. बघण्यापूर्वी खूप उत्सुकता होती आणि बघून अपेक्षाभंग झाला. पुस्तक जास्त छान आहे. पण मी पुस्तकं वाचून त्यावर निघालेले जेवढे पिक्चर पाहिले आहेत त्यांनी सगळ्यांनी माझा इतकाच हिरमोड केलाय.

Soha
Tuesday, June 27, 2006 - 4:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ओशिन मला पण फार आवडायची. पण ती अर्धवट सोडल्यासारखी वाटाली. मला त्याचा शेवट कळलाच नाही. कुणी मला त्याचा शेवट सांगेल का?
अजूनही त्या सिरीयलचे केव्हा ना केव्हा पुन्: प्रसारण होईल अशी मला आशा वाटते.


Raina
Tuesday, June 27, 2006 - 9:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सायोनारा,
Thanks . हे कादंब-यांवरचे चित्रपट खरंच अपेक्षाभंग करतात नेहमी.
आत्ता पर्यंत सायुरी आवडला असे सांगणारे कोणीही भेटले नाही.

सोहा,
ओशीन बहुदा आपल्या इथे अर्धवटच सोडली होती असे अंधुकसे आठवतय. मला प्रामुख्याने आठवते ती छोटी समंजस ओशीन आणि तिचा तो दुष्ट बाप, गेशा झालेली आई, आणि प्रेमळ आज्जी.
हि लिंक पाहा
http://en.wikipedia.org/wiki/Oshin इथे त्याबद्दल थोडक्यात माहीती दिली आहे.

Dineshvs
Tuesday, June 27, 2006 - 6:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो तो सिनेमा अर्धवट वाटतोच. त्या दोन नायिकाना घ्यायचे कारण म्हणजे त्याना हॉलिवुडमधले लोक, क्राऊचिंग टायगर मुळे ओळखतात, हेच असणार ?
पण त्या दोघींचा इतरवेळी अभिनय अत्यंत नैसर्गिक आणि एकदा गैशा म्हणुन वावरायला लागला कि अतिकृत्रिम असा आहे.
बाकि कादंबरी वरचा सिनेमा, कधीच परिपुर्ण होत नाही हे पटले.


Soha
Wednesday, June 28, 2006 - 4:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कादंबरीवरचा सिनेमा बहुदा अपेक्षाभंग करतो. "बनगरवाडी" बघितल्यावर मला हे जास्त जाणवले. जी मजा कादंबरीत आहे ती सिनेमात नाही. कादंबरी मधे पहिल्या दीड पानात पहाटेच्या वेळी केलेल्या बनगरवाडी पर्यंतच्या प्रवासाचे जे वर्णन माडगूळकरांनी केले आहे ते कदाचित कधिच पडद्यावर दाखवणे जमणार नाही.
असो. विषयांतराबद्दल क्षमस्व!


Badbadi
Wednesday, June 28, 2006 - 10:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रैना, छान लिहिलं आहेस. माझा एक मित्र १० महिने तोक्योत होता.. त्याच्याकडून suicidal rate बद्दल ऐकलं होतं. कार मध्ये ४ / ५ जण बसून आत्महत्या करणं हे पण खूप चालतं ना तिथे?

Raina
Thursday, June 29, 2006 - 2:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बडबडी,

हो- हे ४-५ जणांनी मिळुन कार मध्ये कोंडुन घेउन, आत काही तरी Carbonmonoxide emit करणारं काहीतरी घेउन त्या वायुनी गुदमरुन आत्महत्या करण्याच्या खूप बातम्या येत होत्या मागच्या वर्षी.


Maudee
Friday, June 30, 2006 - 7:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला एका गोष्टीकडे लक्ष वेधावेसे वाटते.
आपल्या देशात आजकाल कर्जबाजारी झाल्यामुळे कित्येक शेतकरी आत्महत्या करत आहेत:-(

आत्महत्येची चर्चा आहे म्हणुन लिहिलं


Bee
Friday, June 30, 2006 - 8:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा तर अगदी जटील प्रश्न झाला आहे माऊ. आज विदर्भात पंतप्रधानांना ह्या प्रश्नावर तोडगा काढण्याकरिता बोलाविले आहेत. ते सध्या विदर्भातच आहेत दौर्‍यावर. गेल्या पाच वर्षात १६०० शेतकर्‍यांनी आपला जीव गमावला आहे. खरच गरीबी माणसाला काय काय करावयास भाग पाडते आहे. आम्ही पूर्वी निबंधात लिहायचे भारत हा कृषीप्रधान देश आहे.. आज ह्या कृषीप्रधान देशातील शेतकरी नाहीसा होत चालला आहे.. :-( राजकारणासारखा निसर्ग दगा द्यायला निघाला आहे. उन्हाळा हिवाळा हे दोनच ऋतु आपल्या ठरलेल्या वेळेनुसार उगवात. मात्र पावसाळा लपंडाव खेळतो आहे.

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators