Rahul16
| |
| Thursday, June 22, 2006 - 8:42 am: |
| 
|
BB chya title baghun baryach mitranna samajale asel mala kay mhanayache aahe....kahi jananchy pota gola pan aala asel... any way...mazhya ameriketlya mitrane mala khup aagraha karun kal 1 meeting attend karayala lawali.....to fact mhanat hota jaun meeting attend kar...tyane kashychi meeting aahe te bilkul sangitale nahi......maze 2 mitra conferance call karun mazyashi bolale.... shewati etaka aagrah kela mhanun mi meeting attend keli....khup jabari presentation zale..ekayala changale watale......aata kay karayache ha prashna aahe.....tumcha kahi bara wait anubhav aahe ka?.....Amriketlya mitranna jasti changale mahit asel.... krupaya sanaga
|
Chioo
| |
| Thursday, June 22, 2006 - 9:49 am: |
| 
|
हा AMWAY काय प्रकार आहे? त्या meeting मधे काय सांगीतले? कसलं presentation होतं? plz खुलासा करणार का?
|
Rahul16
| |
| Thursday, June 22, 2006 - 10:24 am: |
| 
|
aha... there is some one who dont know about Amway....so there is market..... Some information from internet for those who are not aware about Amway ""What is Amway? Amway is a Multi Level Marketing business with Very expensive "QUALITY" products involved. You see all you have to do is spend about Rs 4000 a month on AMway products and then get a whole bunch of other people to do the same thing. These people you find then have to go find other people to do the same thing. Eventually you get a big downline spending lots and lots of money on expensive products."" the products are cosmetics, detergents, and cleaning agents etc and the presentation was ' why i should sell Amway products.' ' how I can become rich' etc etc hope this helps... chioo come back to this bb to know more about it....i am sure you will get to know more
|
Mrdmahesh
| |
| Thursday, June 22, 2006 - 10:25 am: |
| 
|
चिऊ, माझ्या माहितीप्रमाणे, AMWAY हा प्रकार म्हणजे ही एक अमेरिकन कंपनी आहे. त्यांचे काही products आहेत. जसे कपड्याचा साबण, टूथपेस्ट वगैरे... तर हे products दुकानात मिळत नाहीत.. ते मिळतात त्यांच्या सभासदांकडून.. म्हणजे तुम्ही काही पैसे भरून त्यांचे सभासद व्हायचे. ते तुम्हाला वापरण्यासाठी आणि विकण्यासाठी काही products देतात. ते products विकायचे आणि शक्यतो समोरच्या व्यक्तीला सभासद करून घ्यायचे. असे तुम्ही जर सभासद करत गेलात तर तुम्ही केलेल्या सभासदांनी केलेल्या विक्रीमुळे तुम्हाला घरबसल्या कमिशन मिळते. शिवाय तुम्ही केलेली विक्री वेगळीच. असा तो प्रकार आहे. त्याला Multi-Level-Marketing - MLM म्हणतात. यात तुम्हाला जे पैसे मिळतात ते तुम्ही केलेल्या विक्री मुळे नाही तर तुम्ही केलेल्या सभासदांमुळे... म्हणजे जितके तुमचे सभासद जास्त तेवढा तुम्हाला पैसा जास्त.. सभासद न करता तुम्ही नुसतीच विक्री करत गेलात तर तेवढा पैसा मिळत नाही जेवढा सभासद केल्यामुळे मिळतो.. तर असे तुमचे Network वाढवत रहायचे... पुण्यात एकेकाळी हे एक मोठे प्रस्थ होते. खूप लोक यात सभासद झाले... पण जेव्हा लक्षात आले की नुसती वस्तूंची विक्री करून भागत नाही तर सभासद ही करावे लागतात..लोकांना पटवावे लागते.. तेव्हा हे प्रस्थ कमी झाले.. आता इथे ते नावापुरते सुद्धा नसावे.. सकाळ मध्ये खूप जाहिराती असायच्या... मी सुद्धा अशा २ / ३ meetings ला गेलो आहे. या लोकांचे presentation अत्यंत प्रभावी असते. परंतु ते एक मृगजळच ठरते. हे लक्षात येई पर्यंत आपण पैसे भरून बसलेलो असतो. इथे problems असे आहेत की या कंपनीची उत्पादने लोकांना फारशी माहित नाहीत. त्यात त्यांची किंमत ही तशी जास्तच आहे. गरज भासल्यास पटकन दुकानातून आणता येत नाहीत. यामुळे ही उत्पादने विकताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. सहजा सहजी ही उत्पादने विकता येत नाहीत.. (त्यापेक्षा घरोघरी जाऊन पापड लोणची विकणे सोपे असे एका सभासदाने सांगितले). एक मात्र खरे की त्यांची काही उत्पादने चांगली असतात उदा. कपड्याचा साबण. माझ्या माहितीतले जेवढे लोक सभासद झाले त्यातला एकही जण हा धंदा करत नाहीये. मला असा अनुभव आलेला आहे. इतर लोकांना चांगले अनुभवही आले असतील ते त्यांनी इथे नमूद करावेत. जेणेकरून संबंधितांना सारासार विचार करून निर्णय घेणे सोपे जाईल.
|
मित्रानो, कुठल्याही Pyramid Scheme मध्ये तुम्ही त्यावर कुठे असता यावर तुमचा फायदा अवलंबून असतो.. मग ती स्टीलची भांडी मिळणारी Scheme असो नाहीतर Amway असो... एक लक्षात घ्या, की या सगळ्या Scheme हे सुरू करणार्यांच्या फायद्यासाठी असतात... Amway Seriously घेणे, म्हणजे आपल्या हाताने आपले मित्र दूर घालवणे... तुम्ही हे नवीन ऐकलं असेल तर सांगतो, इथे US मध्ये 8/10 वर्षांपूर्वी इतके Amway Agent झाले होते की रस्त्यात किंवा Mall मध्ये एकाद्या भारतीयाने Hello म्हटलं तर, 'We are not interested in Amway' असं उत्तर दिलं जायचं.. Details साठी मी माझ्या BB वर एक Post ट... तुम्हाला गणित येत असेलच... तेव्ह 6 raised to 4 किती होतात ते मोजून ठेवा... उत्तर आलं की तुम्हाला तेवढे Member मिळवायचे आहेत हे लक्षात घ्या...
|
Shyamli
| |
| Thursday, June 22, 2006 - 1:18 pm: |
| 
|
इथे US मध्ये 8/10 वर्षांपूर्वी इतके Amway Agent झाले होते की रस्त्यात किंवा Mall मध्ये एकाद्या भारतीयाने Hello म्हटलं तर, 'We are not interested in Amway' असं उत्तर दिलं जायचं..>>>>> अगदी अगदी विनय.............. मुंबई मधे पण असच झाल होतं / आहे >>या लोकांचे presentation अत्यंत प्रभावी असते. परंतु ते एक मृगजळच ठरते. हे लक्षात येई पर्यंत आपण पैसे भरून बसलेलो असतो>>> मीपण घालवले आहेत यामधे पैसे.....
|
Yogibear
| |
| Thursday, June 22, 2006 - 1:23 pm: |
| 
|
अरे सध्या AMWAY हा शब्द न वापरता E-commerce business असा शब्द वापरुन AMWAY चेच अनंत प्रकार वास्तव्यात आहेत...
|
हो, आणि त्यामुळे अजूनही कुठे अनोळखी देसी जर जास्त गप्पा मारायला लगला तर आम्ही त्याच्याकडे संशयाने बघतो आणि शक्यतो तिथून लवकर कसं कटता येईल असा प्रयत्न करतो
|
Soultrip
| |
| Thursday, June 22, 2006 - 1:31 pm: |
| 
|
AMWAY??? .... No way!!!
|
Yogibear
| |
| Thursday, June 22, 2006 - 1:48 pm: |
| 
|
Maitreyee: अगदी बरोबर, उगाच फ़ोन मागुन घेणे वगैरे झाले की हमखास ओळखणे 
|
Seema_
| |
| Thursday, June 22, 2006 - 4:07 pm: |
| 
|
अगदी बरोबर, उगाच फ़ोन मागुन घेणे वगैरे झाले की हमखास ओळखणे >>>> योगी म्हणुण तु माझा फ़ोन नं मागुन घेतलेलास होय . आता ओळखल . ~DDDD इथे नविन असताना स्वताहुन कुणी ( भारतीय ) हसुन hello वैगरे म्हणायला लागला कि तो amway नाहीतर योगी म्हणतो तस e-commerce business चाच असतो हा नेहमीचाच अनुभव . मी तर त्याची भितीच घेतली होती . पण एकदा shopping करताना , आमच्या बोलण्याचा आवाज ऐकुन एक मुलगी आपल्या मुलाला घेवुन आली आणि आमची ओळख करुन घेतली . मला अगदी १०० खात्री कि ही कुठलीतरी agent असणार . नंतर कळल कि ती कोल्हापुरची आहे आणि मला कुठतरी पाहिल्यासारख वाटत होत म्हणुन तीन स्वताहुन ओळख करुन घेतली . आता आम्ही अगदी घनिष्ट मैत्रीणी आहोत . पण तेव्हाच्या माझ्या तुटक बोलण्यावरुन अजुनही ती मला चिडवते .
|
exactly योगी, मैत्रेयी... मला पण एकदा एका अनोळखी देशी ने असाच धरून खूप पिळला.. आणि त्याला मी म्हणालो की हे तर MLM आहे.. तर तो म्हणाला " MLM म्हणजे काय असते? This is a new business concept and very different than MLM " as Vinay said.. this is the best way to loose your friends
|
Anilbhai
| |
| Thursday, June 22, 2006 - 4:15 pm: |
| 
|
माझ्या एका मित्राने त्याचा मित्राशी माझी ओळख करुन दिली. तो गोव्याचाच होता. मि त्याला घरी यायच आमन्त्रण दिल. तर तो यायलाच तयार नव्हता. बरेच दिवस टाळाटाळ करुन मग एक दिवशी आला. नंतर कधीतरी तो म्हणाला की त्याला वाटल की मी 'AMWAY' च एजंट वगैरे आहे. माझ्या भिडस्त स्वभावामुळे मी एक दोन दा चुकुन त्यांच्या मिटिंग ला गेलो. काय शो असतो पण. जशे काही तुम्ही एक दोन महिन्यात मिलियोनेर होणार आहात. खुप मागे लागतात हे लोक. कशी बशी सुटका करुन घेतली. 
|
Asami
| |
| Thursday, June 22, 2006 - 4:18 pm: |
| 
|
amway आता quickstar नावाने वावरते. एका amway agent चे नाव नी पत्ता घेऊन दुसर्याला pass करा. तुम्हाला हव्या त्य अनोळखी व्यक्तीशी बोलण्याची संधी मिळत राहील
|
अगदी खरे आहे. मला सुद्धा या लोकान्नी काव आणला होता.
|
यारहो सावधान, अशा लोकांपासुन १० कोस दुरच राहा. मला येथे किमान ४ जन पाठीमागे लागले होते, Maijer, Indian Stores हे त्यांचे सावज पकडन्याचे ठिकान असते. सर्वांना मी पळऊन लावले. त्यांना मीच business ची offer दिली, म्हनालो की प्रत्येकी १०००० USD द्या, शेअर बाजारात पैसे कमवुन देतो. जे गेले ते परत कधी call केला नाही.
|
हल्ली मी ट्रेन मध्ये सर्व देसी लोकन्ना मी आमवे चा माणुस आहे असे सान्गतो. मला रिकामा बाक मिळतो बसायला.
|
Ajjuka
| |
| Thursday, June 22, 2006 - 6:06 pm: |
| 
|
अरे मला Santa Fe, NM च्या flee market मधे एक बया भेटली होती. तिथे बर्याच देसी वस्तू मिळतात अर्थात विकणारे हे देसी/ सेमिदेसी परदेसी कोणीही असतात. तर ही typical new mexican पण गोरी होती. माझ्या roommate ने तिच्या stall वरून एक sarong घेतला आणि मी तांब्याची तार वापरून केलेला एक छोटुकला पक्षी. नंतर तिने गप्पा मारायल सुरूवात केली. आता ही southern, new mexican etc लोकं असतात अघळपघळ बोलण्यात हा अनुभव असल्याने मलाही काही चुकीचे वाटले नाही. आदल्याच वर्षी flee market मधे ओळख होऊन एक जण आमची घट्ट मैत्रिण बनली होती त्यामुळे कसलीच शंका नाही आली. Jewelry making and other crafts etc वर गप्पा चालू झाल्या आणि ती म्हणाली why dont you guys come to our house tomm for Brunch? आम्ही नको म्हणले तर ती म्हणे मग ठीक आहे मी येते उद्या. तोवर इतक्या गप्पा झाल्या होत्या की crafts, theatre in london य बद्दल तिच्यकडे खजिना असणार माहितीचा आणि ति पुस्तकं घेऊन ती येणार अस समजून आम्ही बर म्हणालो. तसही Santa Fe, NM मधला एकच आठवडा उरला होता त्यामुळे तिला घराचा पत्ता दिल्याने काही बिघडणार नव्हते. बया दुसर्या दिवशी नवर्याला घेऊन हजर. मग तुला काय करायला आवडतं? तुझ्याकडे पैसे आले खूप तर तू सगळ्यात जास्ती कशावर खर्च करशील? travel! मग कश्या प्रकारचा? etc etc असं बरंच किर्तन लावलं. मी उत्तर देत होते आणि वाट बघत होते की ती पुस्तक कधी बाहेर पडणार म्हणून. आणि शेवटी तिने एक पुस्तक बाहेर काढलं. अत्यंत आकर्षक travel brochure असावं तस होतं पण त्यावरचं नाव पटकन दिसत नव्हतं. मी आपली मूर्खासारखी hotels चि चित्र झाल्यावर crafts ची चित्र आणि माहिती असेल या आशेने बघत होते. शेवटी तिने 'A' word चा उच्चार केलाच. वरचं सगळं हव तर ते तुला खूप easily मिळू शकतं.. अस्सं नी तस्सं... नी दगड धोंडे माती... rrommate नको म्हणाली आणि बाहेर निघून गेली. मी अडकले. तिला मी सांगतेय की बये पुढच्या ३ आठवड्यात मी हा देश सोडून जाणारे. मला या सगळ्यात काडीचाही interest नाही. तरी ती हटायला तयार नाही. तुझ्या होणार्या नवर्याला आत्ता फोन लाव मी त्याच्याशी बोलते. तो नाही म्हणणार नाही. आणि तुला नाही म्हणूच शकणार नाही. अशी बरीच काही बडबड करत होती. नाही म्हणलं तरी घरात मी एकटीच होते, Pam पळाली होती आधीच आणि Sarah यायची होती त्यामुळी मलाही जरा घाबरायला झाले होते. तरी मी निक्षून नाही सांगितले आणि तुम्ही तुमची शक्ती माझ्यावर वाया घालवू नका असेही सांगितले. बर्याच प्रयत्नाने ती बया निघाली तिथून. तरी भारतात परत गेल्यावर जर तुझ मत बदलल तर आम्हाला कळव म्हणोन तिचं card ठेवून गेली. नंतर मी बराच वेळ माझं डोकं चोळत आणि मूर्खपणाबद्दल स्वतःला शिव्या घालत बसले होते.
|
Peshawa
| |
| Thursday, June 22, 2006 - 6:31 pm: |
| 
|
keep away from this
|
Megha16
| |
| Thursday, June 22, 2006 - 9:05 pm: |
| 
|
Amway ....... No way ......... हे अगदी बरोबर. मला पण असाच अनुभव आला. आम्ही एकदा असच मॉल मध्ये गेलो होतो आणी आमच बोलण एकुन एका जोडप्याने आम्हाला आधी छान गोड smile दिल आणी मग hi आणी मग मॉल ची चोकशी करता कराता ते आमची चोकशी करायला लागले. आणी विशषे म्हणजे हे जोडप NY ला राहत होत आणी सहज फिरयच म्हणुन nj ला आल. आणी नंतर मग त्याच एक visiting card दिल. त्यावर एक साईट च नाव होत. आमचा फोन वैगेरे घेतला होता. आधी आमच्या ही लक्षात आल नाही घरी आलो साईट उघडली आणी Amway product नवरा म्हटला फोन आल्यावर ओळ्खीचा नंबर असल्या शिवाय फोन उचलु नकोस. २-३ त्याचे मेल आले होते अहोंना कारण त्या जोडप्याने बोलता बोलत e-id विचारला होता ते नंतर आठवल.
|