|
Tulip
| |
| Friday, March 31, 2006 - 3:28 pm: |
| 
|
अरे दोघांनी विचार करायचा असच म्हंट्तलय ना मी? वाच की नीटं.
|
पण ह्या बाबतीत मुलं मुलींकडून जरा जास्तच अपेक्षा करतात. स्वयपाक यायला हवा, हुषार हवी, शिकलेली हवी, फ़र्स्टक्लास डिग्री पण हवी, तरीही घरकामात चोख हवी, वडीलधार्यांचा आदर ठेवणारी हवी, एकत्र रहायला तयार हवी, चाणाक्ष हवी, सुंदर हवी, नोकरी करणारी हवी पण तिने संसारात वेळ प्रसंग ओळखून करीयर करावे. घरच्या सार्या रुढी विनातक्रार पाळणारी हवी अरे हो आणि समंजस हवी तिला इतकी समज हवी की तिने आपण कुठे आहोत रहातोय त्याप्रमाणे वेषभुषा, रहाणीमान बदलावे. . .. हमम कुठे बरं मिळेल अशी मुलगी? ~D
|
is it me or हे हवी हवी विचित्र वाटायला लागल आहे वाक्यात?
|
Ninavi
| |
| Friday, March 31, 2006 - 5:07 pm: |
| 
|
रचना, यात नवीन काहीच नाही. तू ' कार्येषु दासी, करणेषु मंत्री, भोज्येषु माता, इ. इ.' ऐकलं नाहीयेस का?
|
रचना, अशी मुलगी म्हणजे आपल्या मित्राची बायको, अस प्रत्येक नवर्याला वाटतं आणि आपली बायको मात्र नाठाळ भांड्कुदळ, दिसायला फ़ार बरी नाही, आपल्या आई वडिलांचा आदर न करणारी, आपलच म्हणन खर करणारी, वगरे वाटते. म्हणजे थोडक्यात " घरकी मुर्गी दाल बराबर " ~D
|
Arch
| |
| Friday, March 31, 2006 - 5:16 pm: |
| 
|
रचना, अशी मुलगी म्हणजे आपल्या मित्राची बायको >> ही ही ही ही 
|
Tulip
| |
| Friday, March 31, 2006 - 5:27 pm: |
| 
|
LOL PN .. .. ....
|
Seema_
| |
| Friday, March 31, 2006 - 5:27 pm: |
| 
|
rb , pn LOL पण मुली तरी कुठ कमी असतात ? b school मध्ये गेलेला , हुशार , देखना , आइ वडिलाजवळ न रहाणारा , एकुलता एक असा बहुगुणी , आखुडशिंगी guy किंवा बैल त्याना ही हवाच असतो कि . ~d
|
Upas
| |
| Friday, March 31, 2006 - 5:36 pm: |
| 
|
पुण्या अरेच्चा म्हणजे what Man want.. हे सगळं कळतं असतच मुलींना तरीही ह्या पेडगावला जातात हेच खरं.. ~D RB, इतकं सगळं असल्यावर ती * हवी हवीशी * वाटणारच मुलाला.. 
|
रचना तुला अनुमोदन कीतीही काही झाले तरिही मुल काही modern नसतात. त्याना सर्व हवे असते सर्वगुणसम्पन्न. स्वःता काही नसताना. आणी आता माझ्या मैत्रिणीचा किस्सा तुम्ही नीट वाचले नाही की मुलिचे आईवडील जुन्या वळणाचे होते. तीची ह्या स्थळावरुन तिच्या आईशी वाद ही घालुन झाला होता मला वाटते कधी कधी आई वडिलाना काही मुद्दे पटत नाही. तिची आई(आईचे माहेर) सुद्धा तिथेच वाढली होती so she didnt find wrong I guess.anyways I am not saying anything wrong if you are from village but parents dont understand quickly I guess. she agreed with lot of apprehension to see the guy. my point was only that make sure what is good for you,both parties should know their abilities or wants टुलिप, चक्क मुर्खपणा की lab साठी गावात जाणे. लग्न आणी lab हेतु काय प्रकार आहे?
|
Mbhure
| |
| Friday, March 31, 2006 - 9:28 pm: |
| 
|
मनुस्विनी मला हेच म्हणायचे आहे. बर्याचदा आईवडिल आधी हे मुलीशी का Discuss करत नाहीत. ईथे माज आणि अक्कल गहाण वगैरे ठेवण्याचा काय संबंध? दोन घराण्यांना आपले संबंध जुळावे असे वाटते तर हे विचारण जरुरीचे नाही का की आमच्याकडिल परीस्थीती अशी आहे Can you manage? उलट गाई आणि बैलाची अदलाबदल होऊ नये म्हणुतर ती प्रश्नोत्तरे जरुरीचे आहे. तसेच जेलो ते बहिणाबाई ( and vice versa) हे स्विचींग होऊ शकते. माझी एक वहिनी डोंबिवलीत वाढलेली. परत सर्व नातेवाईक अदगी आसपास. तिला जेंव्हा माझ्या कुडाळच्या भावाच स्थळ सांगुन गेल तेंव्हा तिच्या आईवडिलांनी तिला दोन्ही बाजु समजावल्या. जसे मुलगा निर्व्यसनी आहे, शिकलेला आहे,वगैरे; पण त्याच बरोबर कुडाळ(जरी अगदी गाव नसले तरी) डोंबिवलीपेक्षा वेगळे आहे, देवाचे उत्सव, मोठे घर, इत्यादी. माझी वहिनी होकारा आधी जाऊन बघुन आली. आईवडिलांनीही ३ - ४ वेळा तिला विचारले की ती होकार देण्याआधी Comfortable आहे का? आणि मग लग्नाचे नक्की केले. माझ्यावेळी देखिल मी होकार सांगायला गेलो तेंव्हा as usual मुलीची आई खुश झाली आणि पुढे कसे करायचे वगैरे चलू झाले. मी त्यांना सांगितले की आधी माझे विचार, गरजा, आवड, इत्यादी तुम्हाला सांगतो. नंतर दोन दिवसांनी तुम्ही कळवले तरी चालेल. पण मुलीकडचे मुली आधीच तयार असतात. Forward... backward हे एव्हढ्याचसाठे सांगितले की गावच्या मुलांना Exposure नसतो वगैरे Generalized विधान आहे.
|
lol सीमा... अनुभवाचे बोल का? ~~DD दिव्यांची माळ च घे
|
Junnu
| |
| Friday, March 31, 2006 - 10:02 pm: |
| 
|
पण मुलीकडचे मुली आधीच तयार असतात.>> भुषण, तुम्ही अगदी बरोबर म्हणालात. माझ्या एका जवळच्या मैत्रीणीच्या बाबतीत हे घडलय. अजुन ही बर्याच वेळा मुलीच्या घरचे मुलाने होकार दिला म्हणजे ठरल लग्न अस समजतात, मुलीला विचारतदेखील नाहीत. राग अश्याचा येतो की मुलगी ही हे ऐकुन घेते.
|
Maanus
| |
| Friday, March 31, 2006 - 10:45 pm: |
| 
|
काही करावे पन नातेवाईकांमधे लग्न करु नये ( आत्ये भावु, वैगेरे ) ... पुढे खुप ताप होतो.
|
भुरे अहो मी देखिल हेच म्हणत होते की आई वडिल तेवढी मोकळिक का देत नाहीत मुलिला आजच्या काळात सुद्धा? आता ह्याच मुलिबाबत अगदी तिला forcE केले की काय वाईट आहे गावचे स्थळ वगैरे सांगुन. ती नाराजीने तयार झाली स्थळ बघायला. माझे म्हणने हेच आहे की दोन्ही लोकांनी सारासर विचार करावा. बाकी माज का अक्कल गहाण हे सर्व तुम्ही दुर्लक्ष करा रागवु नका पण एथे काही लोकाना उगाच मुद्दा लक्षात न घेता काहीही खरडवायची सवय आहे ते ज्यानी जसे लिहिले तसे त्याना उत्तर होते 'माज' वगैरे जे काही. त्यास प्रत्युतर म्हणुन जरासे गमितिने हो Seriously काही नाही. असो.
|
Sai1979
| |
| Thursday, April 20, 2006 - 11:13 am: |
| 
|
Lagna tharvtana …mulane kinvha muline kitti apeksha karvala havya ya var kahi standard vichar aahet ka tumche…? Kontya baabtit adjustment karayla havi anni kontya babatit mulich nahi?
|
मला इथे माझा स्वतःचा अनुभव सांगावासा वाटतो. माझ्या लग्नाला साडेचार वर्ष झाली आहेत. २००१ मधील फ़ेब्रुवारी महिन्यात मला मन्दारचं स्थळ आलं. पण आम्ही दोघेच आधी भेटलो ते सुद्धा घरच्या बाहेर. आम्ही प्रथम भेटलो ते 'रुइच्या कट्ट्यावर'. जवळ जवळ ३ तास एकत्र होतो. गप्पा मारत. आणि आम्ही या भेटीत आपापल्या अपेक्षा शेअर केल्याच नाहित, पण स्वतःबद्दल जास्त बोललो. आपापल्या कुटुंबांची माहिती, मित्र मैत्रिणींची माहिती, मतं, घरातल्या लोकांचे स्वभाव वगैरे आणि मग पत्रिका आणि फोटोंची देवाणघेवाण करून निघलो तोवर मस्तपैकी मैत्रि झाली होती. यथावकाश पत्रिका जुळल्या, घरातले लोक एकमेकांना भेटले, घरं पाहिली आणि साखरपुडा होउन लग्न झालं. तर असा हा माझा बघण्याचा कार्यक्रम...जाता जाता उल्लेख करते, मन्दारच स्थळ मला जीवनसाथी डॉट कॉम वरून आलं
|
माझ्या मते हे "दाखवणे" हा प्रकार म्हणजे शुध्ह व्यवहार आहे... दोन्ही बाजुने तुलना केली जते. समोरची पार्टी आपल्याला कितपत झेपेल हे आजमावले जाते. ओळखीतुन आलेले स्थळ असेल तर ठिक आहे. त्यामुळे मला पहिले हे वाटते कि जो "बघायला जाणे" हा जो सहकुटुंब कार्यक्रम असतो तो आधी बंद करावा!! कसले दडपण येत असेल त्या मुली आणि मुलावर... शे!! आणि जमले तर एकट्या मुली आणि मुलाने भेटावे आणि शक्यतो तेही बाहेर. आता पहिल्यांदा भेटल्यावर काही तो तिला लगेच पळवुन नेत नाही त्यामुळे काही हरकत नसावी. पण एकंदरीत हे आपल्याकडे लोकांच्या पचनी पडणे अवघड आहे..... असो बाकी आपल्याला माहिती आहेच कन्या वरयते रुपं माता वित्तं पिता चितं बांधवा कुलं इछंती मिष्टान्नं इतरेजना त्यामुळे हे तर कितीही नाही म्हटले तरी लागु पडतेच
|
Champak
| |
| Tuesday, June 20, 2006 - 5:08 pm: |
| 
|
आता पहिल्यांदा भेटल्यावर काही तो तिला लगेच पळवुन नेत नाही >>>>>> TEE ne tyaa laa paLawale tar?
|
Moodi
| |
| Tuesday, June 20, 2006 - 5:17 pm: |
| 
|
अरे बापरे!! सांभाळ रे बाबा आता. नाही तू पण लाईनीतच आहेस म्हणुन म्हटले. दिलवाली दुल्हा लेके भाग गयी असे टायटल होईल नव्या शिणेमाचे. 
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|