|
Zakki
| |
| Wednesday, June 14, 2006 - 8:42 pm: |
| 
|
मूडी तुझे मत चुकीचे नाही. अगदी थोड्या वर्षांपूर्वीपर्यंत भारतात देखील १५ ऑगस्ट नि २६ जानेवारी खेरीज इतर दिवशी झेंडा लावायचा अधिकार फक्त सरकारी कचेर्यांना होता. नुकतेच इतर दिवशीपण झेंडा मिरविला तरी चालेल असे ठरले आहे. अमेरिकेत मात्र, अगदी पृष्ठभागावर सुद्धा झेंडा मिरवायला बंदी नाही, उलट त्यातून त्यांचा देशाभिमान व्यक्त होतो! आम्ही इथे नवीन असताना, (हो, म्हणजे तेंव्हाच, जेंव्हा तुम्ही कुणि जन्मला पण नव्हता तेंव्हा) माझ्या एका मित्राने अश्या एका अ. वि. म. च्या 'त्या' भागावर असलेल्या झेंड्यावरचे पन्नास तारे मोजून घेतले (हात न लावता!) होते. वर प्योर्टो रिको, सारखी आणखी दहा राज्ये सामिल झाली अमेरिकेत, तरी त्यासाठी तिथे जागा होईल म्हणाला होता! बेरकी कार्टा! अर्थात तुमच्या एव्हढे लहान होतो आम्ही तेंव्हा! आता भारतातले लोक तसे कपडे का घालतात? उत्तर एकच, त्यांच्या अमेरिकेतल्या मित्रांनी, नातेवाइकांनी दिलेले ते कपडे, फुक्काऽऽट मिळाल्यावर येशूख्रिस्ताचे चित्र सुद्धा लावतील टी शर्टवर, भारतीयच काय, कुणिही!
|
माझा प्रश्न तो भारतीयांनी शरीरावर मिरवावा का हा आहे >> काय फ़रक पडतो? झेंडा शरीरावर मिरवला की त्या देशाचे देशप्रेम जागृत होते का? किंवा नाही मिरवला तर भारताचे नागरीक म्हणवून घ्यायला लायक बनतील का?
|
Zakki
| |
| Wednesday, June 14, 2006 - 10:36 pm: |
| 
|
अहो रचनाताई, मी उपरोधाने म्हंटले होते की अमेरिकनांना त्यात देशाभिमान वाटतो! अमेरिकनांना कशात काय वाटेल ते आपल्याला लवकर कळणार नाही! जसे, काम झाले नाही तरी चालेल, पण आम्ही आमची डिग्निटी सोडून, हाताखालच्या अधिकार्याकडे जाणार नाही, अशी भारतीय अस्मिता मला कळली नाही, तसे. किंवा ऑफिसात सर्वांसाठी आणलेली चॉकलेटे, एकाच मुलीने ओंजळी भरभरून स्वत:च्या पिशवीत घालून घरी नेली नि वर म्हणाली, 'बाहेरच ठेवली होती!, मला आवडतात म्हणून घेतली.' नि मग बाकीच्यांनी मलाच म्हंटले, 'काय राव, आणायचे तर पुरेसे तरी आणायचे', किंवा 'अहो, ती चॉकलेटे केंव्हाच संपली, आणखी कधी आणणार? ' हे मला कधी कळलेच नाही.
|
ते दुसर्या देशाचा झेंडा स्व:तच्या शरीरावर का मिरवतात? हे मानसीक गूलामगिरीचे लक्षण आहे का?>>>>> माझा प्रश्न तो भारतीयांनी शरीरावर मिरवावा का हा आहे?>>> >>>>>>>>>>>>>>

|
अहो रचनाताई, मी उपरोधाने म्हंटले होते की अमेरिकनांना त्यात देशाभिमान वाटतो! अमेरिकनांना कशात काय वाटेल ते आपल्याला लवकर कळणार नाही! >> अहो झक्की पण मी तुम्हाला कुठे उत्तर दिल?
|
Maudee
| |
| Thursday, June 15, 2006 - 5:36 am: |
| 
|
केदार, सर्वप्रथम एक ख़ुलासा. असे t-shirts फ़क्त तरुणीच घालतात असे नाहि तर तरूण सुध्हा घालतात. बाकी मताबद्दल माझं मूडीला अनुमोदन
|
Bee
| |
| Thursday, June 15, 2006 - 8:46 am: |
| 
|
भारतात पर्यटक म्हणून फ़िरायला आलेल्या परदेशी लोकांना भारतातील पामर, भिकारी, संपूर्ण अंगाला भस्म चोपडलेले साधू महाराज, फ़ाटके मळकटलेले वस्त्र घालून फ़िरणारे गरीब हेच अधिक का आवडते? मी आजवर जीही भारतात पर्यटक म्हणून फ़िरून आलेली मंडळी बघितली त्यांनी त्यांच्या अल्बममधे असेच दीनवाणे फोटो इतरांना दाखविण्यासाठी घेऊन ठेवलेले पाहिले आहेत. चारचौघात असे चित्र बघताना आपल्याला एकदम कमीपणा वाटतो. मी फ़्रान्सला गेलो त्यावेळी तिथल्या एका फ़्रेन्च कलीगनी मोठ्या उत्साहाने भारताचे वर्णन केले. मग म्हणाला चल तुला फोटोपण दाखवितो. सोबतीला इतरही काही जण होते. पण ते फोटो बघून मला खूप कमीपणा वाटला. भले त्याचा उद्देश तसा नसेल पण आपला देश म्हन्टले की प्रत्येकाला तो सुंदर असावा असेच वाटते. परदेशी पर्यटकांना गरीबी मधे सौदर्य आढळते तरी कसे? ताजमहल फ़िरून आलेला पर्यटकही अगदी यमुनेच्या पात्रात डचमळत पडलेला केरकचरा टिपून आणेल पण ताजमहल संग्रही ठेवणार नाही.. काय म्हणावे ह्या लोकांना..
|
Maudee
| |
| Thursday, June 15, 2006 - 9:17 am: |
| 
|
हाच प्रश्न मुन्नाभाई M B B S मध्ये circuit ने त्या चिनी माणसाला विचारला होता.
|
Bee
| |
| Thursday, June 15, 2006 - 9:38 am: |
| 
|
म्याऊ.. MBBS मध्ये की MBBS मधे तू पण माझ्यासारख्याच चुका करतेस का
|
Maudee
| |
| Thursday, June 15, 2006 - 9:45 am: |
| 
|
बी, तू लिहिलेल्या या दोन्ही MBBS मध्ये कय फ़रक आहे? आणि मी नक्की काय चुकिचं लिहिल??
|
Moodi
| |
| Thursday, June 15, 2006 - 9:46 am: |
| 
|
माऊडी काही चुकीचे नाही लिहीले तू. 
|
Yes Bee. तुम्ही हे फोटो बघताना तुम्हाला असं वाटलं.. इथे येऊन ते फोटो काढतात, चित्रीकरण करतात ते पाहताना तर भयंकर चीड येते. आणि ज्यांचे फोटो काढले जातात ते लोक (मुख्यत: लहान लहान मुलं ) इतके गरीब असतात की पैसे मिळण्याच्या लाचारीने ते हे सगळे त्यांना करू देतात. आम्ही कॉलेजला असताना स्टेशनबाहेर रोज हे दृष्य दिसायचं. एकदा तर आम्ही त्या गोर्यांना तिथून पार हुसकाऊन लावले होते. पण किती दिवस हे करणार? आमचीच आम्हाला कीव वाटायची. वाटायचे की आपण चिडतो ते शहाणे म्हणून की मूर्ख म्हणून? आधी वाटायचे की एखाद्या डॉक्युमेंटरीसाठी करत असतील हे लोक पण नंतर त्यांच्या हावभावांवरून कळले की हे म्हणजे त्यांच्यासाठी Just fun! डोक्यात जातो हा प्रकार एकदम!
|
Bee
| |
| Thursday, June 15, 2006 - 9:52 am: |
| 
|
माऊ, तुला मधे आणि मध्ये मधे फ़रक नाही वाटत का? मध्ये म्हणजे between the two आणि मधे म्हणजे inside or within or in.. something चुक भुल असेल तर इतर मायबोलिकर नक्की काय ते सांगतीलच. मलाही ह्याचे नक्की उत्तर हवे आहे आणि हा बीबी मला एक वरदान ठरणार आहे
|
>>>> काय म्हणावे ह्या लोकांना.. विरोधाभासाविषयीच्या मानवी आसक्तीत डुम्बत असलेले लोक! आता ह्याचे विश्लेषण लगेच मागु नकोस! तुझा तू विचार कर, पोस्ट कर अन मगच मी सान्गिन हव तर!
|
Maudee
| |
| Thursday, June 15, 2006 - 10:05 am: |
| 
|
लिंबू, मला ते चॉकोनातलं काही दिसत नाहीये. त्यामुळे तुझी post नक्की कुणाला उद्द्येशून आहे ते मला कळत नाहीये. बी, तिथे मध्ये हाच शब्द पाहीजे. मला लक्षात नाही आलं ते. तुझ्या post वरून असं वाटतय की तू MBBS या शब्दाबद्दल बोलत आहेस
|
Bee
| |
| Thursday, June 15, 2006 - 10:12 am: |
| 
|
माऊ, वरचे ते लिंबूचे पोष्ट वाचूही नको. त्याने तुला चार पाच शिव्या हाणल्यात मी MBBS चित्रपटाबद्दल म्हणतो आहे. लिंबू, तुमचे वरील गहण वाक्य कधी कळेल जाणो.. इतर कुणाला कळले असेल ह्यात बरेच किन्तू आहेत
|
maudi , bee, jawu deth na , shabdik chukan peksha message pohochala pahije. te jast mahatwache ahe . That is what i feel.
|
limbu, mya pamarala kalel asha bhashet jara vishleshan karata ka ? tumachya wakyache?
|
माऊडी, बीच्या पोस्ट मधल शेवटच "काय म्हणावे ह्या लोकान्ना..." हे वाक्य हे ते! बीला उद्देशुन केलेली पोस्ट हे! ते उत्तर एका वाक्याच हे पण त्याचे विवेचन कित्येक पानी होऊ शकते! मानवी जीवनातील अशा काही गुणान्पैकी तो एक गुण हे की जो सद्गुण की दुर्गुण ते नेमक ठरवता येत नाही! 
|
मन्गेश, थोडक्यात प्रयत्न करतो! रस्त्यावर साधा ऍक्सिडेण्ट होवो की गम्भिर, बरीच बघ्यान्ची गर्दी जमते! त्यातले काही जण हात साफ करुन घ्यायला आलेले असतात तर काही जमलेल्या लोकान्चे खिसे साफ करायला! कोण कुणाला धडकल किति नुकसान झाल कुणाकुणाला कितीक लागल याची उत्सुकता प्रयेकालाच असते! अशात अपघातात जर कोणी मृत्युमुखी पडल असेल किन्वा गम्भिर जखमी झाल असेल तर एकीकडे नाका तोन्डाला पदर किन्वा रुमाल लावित ते दृष्य किलकिल्या डोळ्यान्नी निरखुन बघणार्या स्त्रिया देखिल माझ्या बघण्यात आहेत तर डोके झटकीत, छाती पुढे काढुन बाजुच्याला धक्का देत ते दृष्य डोळे विस्फारुन नी नाके फेन्दारुन चवीने बघणारे पुरुषही माझ्या बघण्यात आहेत! रक्ताने माखलेली, विदृप झालेली, वस्त्रे फाटलेली, विव्हळणारी किन्वा मृत शरीरे जेव्हा ज्या उत्सुकतेने बघितली जातात तेव्हा त्या मागे कसल्या सामान्यज्ञानात भर पडण्याची इच्छा नसुन त्यामागे विरोधाभासाबद्दलची प्रिती आणि आसक्ती असते! जोवर आपण सुरक्षित आहोत, सुखरुप आहोत तर ते तसे सुखरुपच कशावरुन हे समजुन घेण्याची मनातील सूप्त जिज्ञासा अशा वेळेस उफाळुन बाहेर येते आणि अशी दृष्ये बघितली जातात! स्वतःचे सुरक्षित असण्याचे समाधान अन खात्री ही अशी सुरक्षेच्या विरोधातील दृष्ये पाहुन करुन घेतली जाते... त्यालाच मी विरोधाभासाची आसक्ती म्हणतो! अपघाताचे केवळ एक ढोबळ उदाहरण, मात्र ही आसक्ती असन्ख्य घटना उदाहरणात दिसुन येते! या आसक्तीला तस वयाच किन्वा लिन्गभेदाचही फारस बन्धन नाही की नाही शिक्षणाच! मला वाटत की येवढ विश्लेषण पुरे होइल, नसल्यास एकतर नविन बीबीवर विषय घ्या किन्वा v&C मधे न्या! 
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|