Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through June 05, 2006

Hitguj » Views and Comments » Relationships » नवरा, बायको, संसार, तडजोड इ. » What about boys' behaviour? » Archive through June 05, 2006 « Previous Next »

Chandrakor
Saturday, June 03, 2006 - 12:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कित्येकदा अगदी लहान मुलींवरही अत्याचार होतात. त्या मुली कशा काय भावना उत्तेजीत करतात?

Meggi
Saturday, June 03, 2006 - 7:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शिल्पा, चोरी ही नेहमिच वाईट हेच संस्कार आपल्यावर झाले असतात, पण इतरांवर पण तेच संस्कार झाले असतिल हे गृहित धरुन वागणे अयोग्य. किंबहुना य नराधमांवर संस्कार झालेलेच नसतात. संस्कारांचि अपेक्षा गुंड मवाल्यांकडुन कशी करणार ? जिथे सरकारच corrupt आहे, तिथे जनतेची सुरक्षा कोण विचरात घेतो.. आपणच काळजी घ्यायला हवी

लहान मुलिंवर होणारे अत्यचार हि खरच दुर्दैवी गोष्ट आहे. थोडी काळजि घेतली तर या दुर्घटना टाळायला मदत होइल. मुलि चुक किंवा मुल वाईट असे दोषारोप करण्यापेक्षा, अश्या दुर्घटना टाळन्या साठि काय करत येईल या वर आपण का नाही बोलत?
- लहान मुलिना (आनि मुलांना देखिल) शेजार्‍याकडे किंवा नातेवाईकांच्य भरोस्यावर देखिल ठेउन बाहेर जाऊ नये
- शेजार्‍यांकडे काहि वस्तु मागायल, निरोप द्यायला मुलांन पाठवु नये. कारण त्यावेळि त्यांच्य घरी कोण असेल सांगत येत नाही
- मुलिने शेजारी कोणबद्दल complaint केली, तर ' काका मोठे आहेत, त्यांच्या बद्दल वाईट बोलु नकोस, त्यांचा मान ठेव ' म्हणुन दामटु नये
- घरात पोट्-भाडेकरु ठेउ नयेत
थोडक्यात लहान मुलं unattended नसावित.

मुलींचे स्वातंत्र्य म्हणजे ' तोकडे कपडे घालणं ' एवढचं का? प्रत्येक नवीन वर्ष आनि 14 feb ची एक बातमी नक्कि असते. अश्या पार्ट्यां मध्ये कुठलेहि drinks घेउच नयेत, soft drinks देखिल नाही. कुठल औषध मिसळल असेल काय सांगता येत? पण स्वातंत्र्यच्या नावाखाली दारु पिणे, रात्रभर बाहेर रहाणे आनि मग बाहेरच्या गुन्ह्याना बळी पडायचं.. यात दोष कोनाचा?

असे गुन्हे ८४ % ओळखिच्या व्यक्तिंकडुन होतात, अस statistic मुबंई पोलिसांनी सांगिलते होते ( नक्कि source आठवत नाहि ) . या ओळखिच्या व्यक्ति म्हणजे boyfriends , मित्र, प्रवासात ओळख झालेले लोक, नातेवाईक आणि शेजारी येतात.. म्हणजे मुलिने आणि आई वडिलांनि काळजी घेतलि तर या घटना नक्कि कमी होउ शकतात.

उरलेल्या १६% साठी सरकार भविष्यात तरी काही करेल हि अपेक्षा आहे




Manuswini
Saturday, June 03, 2006 - 7:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

i read all posts , and just wanted to share my thoughts ...

i completly agree that girl should take care of her and
वेळेचं,जागेचं, आणी ठिकाणाचं. सुद्धा भान ठवावं

मुलिने स्वःताने decide करावे की कशी,कुठे वेषभुषा करावी,किती वाजता कुठे जावे आणी स्वःताची काळजी घ्यावी.

पण एवढे सर्वे करुनही एखादा animal instinct तिला abuse करतो तर हा तिचा दोष नाहीच मुळी.
मी स्वःता पाहिले आहे की भर दिवसा, चांगल्या लोकवस्तीतुन एखादी मुलगी पुर्ण कपडे घातलेली असुन सुद्धा, जाणारी टारगट पोरे छेड काढत होते. i was passing by in auto and i coudl see these boys embarrassing the girl .

हा शुद्ध मुर्खपणा आहे की मुलगी जबाबदार आहे हिथे असे म्हणणे?
ज्याच्यात animal instinct आहे तो कसलेच भान ठेवत नाहे हेच खरे.
माझ्या एका मैत्रिणीच्या आईवर झालेला किस्सा आहे.

ती ५० वर्षाची बाई एकटी रहायची flat मधे.
building मधील so called सुक्षिशीतांची २०-२८ वर्षाची मुले तिला घाबरवत.
बेल मारुन पळुन जाणे.
lettering पट्टीमधुन रात्री अपरात्री बघणे,शिट्ट्या मारणे.
तिच्या चालण्याचे नक्कल करणे. शेवटी ती एतकी घाबराची की माझी मैत्रिण India ला गेली तेव्हा police complaint केली तिने, तर पोलिस म्हणतो अहो तुमच्या आईची चुकच आहे असे एकटे रहाणे?
आणि तुम्ही कशाला लग्न करुन US रहाता सोडुन तिला?

आता ही ह्या aunty ची चुक का की ती एकटी चांगल्या ठिकाणी flat घेवुन राहत होती?

नालायक मुले ही lettering पट्ते तुन काय बघत आणि शिट्ट्या मारत?

आई एवढ्या वयाच्या बाईला असे छ्डताना काही वाटले नाही.
वर चन्द्रचूर म्हटले तसे लहान मुलीवर, ४ वर्षे असो का काही बलात्कार होतात मग चुक कोणाची?


Prajaktad
Saturday, June 03, 2006 - 8:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनिश!एकाही पोष्ट मधे मुल म्हणजे बेकार , असंस्क्रुत असा एकांगी सुर नाही... निदान माझा तरि नाही.

या बीबी चा विषय आहे जे मुल अस वागतात आणी त्याचा मुलिंना समाजाला जो त्रास होतो त्याबद्दल काय?
मुलांचे असे वागणे म्हनजे फ़क़्त मुलिनी काय कपडे घातलेत्य्त त्याला प्रतिक्रिया एवधेच मयार्दित स्वरूप आहे का?नाही
अगदी साध्या सरळ पुर्ण वेशातल्या स्त्रि / मुलिंवर देखिल
अश्लाघ्य कॉमेन्ट , अतिप्रसंग , छेड्छाड असले प्रकार होतात.या behaviour मधे एका घटकाने समाजात कसे वागायचे याचे norms पुर्ण केलेले असतात.तरिहि तो घटक अन्यायाचा बळि ठरतो का?
याला जबाबदार कोण? " काटा लगा संस्क्रुति " ,चित्रपट,कि आपला मुलगा बाहेर कुठे आणी काय करतोय याबद्दल बेफ़िकिर असणारे पालक?


Lopamudraa
Saturday, June 03, 2006 - 10:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मेगि,प्रजक्ता,मनुस्विनि.,स्टोरवि..... चांगलं माडल... तुम्ही..

आजच संध्याकाळी मी इथे market मधुन परतत होते... रस्त्यावर ४..५ मुले आणि त्यांच्यात एकटी मुलगी खेळत होती(फ़ूट्बाॅल).. सगळी १५-१६ वर्शाची असतील, भारतात... मुलांमध्ये या वयात इतक्या निर्धास्त पणे कोणा मुलीला बघणे.. आज तरी अशक्या वाटते, लोक लगेच तीच्या चारित्राबद्दल काहीही बोलतील आणि... तीच्यावर सोबातच्या मुलांनी जर अती प्रसंग केला तर म्हणतील तीने का एकटीने मुलांमध्ये खेळावे...???
इथे रस्त्यात बर्‍याचदा पत्ता विचारायला गाडी थांबवली तर एकटी मुलगी जात असली तरी स्वताहुन दोन पावले पुढे येते आणि व्यवस्थीत पत्ता सांगते, कारण इथली सुरक्षीतता.!!आपल्याकडे रस्त्यावर एखाद्या मुलीला कोणी पत्ता विचारायला थांबले तरी ती इतकी घाबरते कारण गाडीतली व्यक्ती कशी असेल कोणी पाहिले तर काय म्हणेल...?.किंवा छेड काढण्यासाठी तर उगाचच गाडी थांबवली नाही ना? असे असांख्य प्रश्न तीच्या डोक्यात येतात!!!
.इथल्या मुली तर खुप कमी कपडे घालतात.. पण म्हणुन त्यांना कोणी त्रास देत नाही की बलात्कार करीत नाही.
मला हे विचित्र वाटते आपल्या भारतात्च्या संस्क्रुतीचे आपण इतके गोडवे गातो... तीथे आज रस्त्यावर मुलीने फ़िरणे... धोकादायक होतेय...???
माझाच एक अनुभव सांगते...मझी transfer . झाली तालुक्याच्या गावाला... तीथे jim वैगैरे काही नाही(खेडेच एक) म्हणुन मी पहाते उठुन फ़िरायला जायला सुरवात केली, रस्ताने मोटरसायकल वरुन जाणारी टारगट पोरांच्या... कोमेट्स ऐकायला मिळायच्या...मि तर साध्या पंजाबि ड्रेस मध्ये जात होते पण तरीही कोणी बिना कोमेट्स पास केल्याचे गेले नाही.शेवटी वैतागुन मला जे सापडले त्यांना जेलची हवा खाउ घालावी लागली... पन हा उपाय सगळ्यांना करता येनार नाही आणि नेहमीच उपयोगाचा नाही...!!!
एकाने तर blank call करायला सुरवात केली होती... मग सापळा लाउन पकडले...त्याला... आणि जो धुतले...
पण मग... वाईट वाटते हे असं का???माझ्या हातात होते म्हणुन मी हे केले... पण जेव्हा माझ्या हातात नव्हते तेव्हा मी पण घाबरतच होते..ंआ!!!


Chandrakor
Saturday, June 03, 2006 - 10:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ह्या सगळ्याला कारण मला तरी असेच वाटते की आपल्या भारत महान देशात स्त्रीला केवळ एक वस्तू समजले जाते. पुरुषांच्या मनोरंजनाची वस्तू. कन्यादानासारख्या रुढीतून तिचे कमॉडिटी स्टेटस अधोरेखित केले जाते. एक माणूस म्हणून स्त्रिला काही हक्क आहेत(ह्यात मनासारखे कपडे वापरणे सुद्धा आलेच!) ह्याची जणीवच आपल्या महान संस्क्रुतीने पुरुषांना कधी करुन दिलेली नाही. स्रीचाही आदर करायचा असतो हे बहुसंख्य पुरुषांना माहीतच नसते. ज्या देशातल्या निम्म्या लोकसंख्येला संध्याकाळी सात नंतर घराबाहेर पड्णे अवघड आहे तो देश कसला आलाय महान?

Lopamudraa
Saturday, June 03, 2006 - 11:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरय ग चंद्रकोर, पुढे तर परीस्थीती अधीक गंभिर होइल असे वाटते,
आपल्या देशात माणसाच्या... अयुश्याची किंमतच नाहि......!!!


Deepanjali
Sunday, June 04, 2006 - 2:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

.इथल्या मुली तर खुप कमी कपडे घालतात.. पण म्हणुन त्यांना कोणी त्रास देत नाही की बलात्कार करीत नाही.
<<<लोपामुद्रा ,
तू कुठल्या देशात रहातेस ?
US मधे का ?
इथे पण होतातच कि असे अत्याचार !



Manish2703
Sunday, June 04, 2006 - 4:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Meggi nicely written.....

मुलांचे असे वागणे म्हनजे फ़क़्त मुलिनी काय कपडे घातलेत्य्त त्याला प्रतिक्रिया एवधेच मयार्दित स्वरूप आहे का?>>
नाही, कधीच नाही... मला फक्त एवढेच म्हणायचे आहे की.. सगळीच मुले असे वागणार नाहित.. so pls don't generalise

मुलींनी थोडं strong बनलं, थोडी काळजी घेतलि की अशा घटना कमी होउ शकतील... समाजातील अशा प्रवृत्ती change होण्याची वाट बघत बसण्यापेक्षा हे उपाय करून बघावेत



Ajjuka
Sunday, June 04, 2006 - 6:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

.......... "आजच संध्याकाळी मी इथे market मधुन परतत होते... रस्त्यावर ४..५ मुले आणि त्यांच्यात एकटी मुलगी खेळत होती(फ़ूट्बाॅल).. सगळी १५-१६ वर्शाची असतील, भारतात... मुलांमध्ये या वयात इतक्या निर्धास्त पणे कोणा मुलीला बघणे.. आज तरी अशक्या वाटते, लोक लगेच तीच्या चारित्राबद्दल काहीही बोलतील आणि... तीच्यावर सोबातच्या मुलांनी जर अती प्रसंग केला तर म्हणतील तीने का एकटीने मुलांमध्ये खेळावे...???
इथे रस्त्यात बर्‍याचदा पत्ता विचारायला गाडी थांबवली तर एकटी मुलगी जात असली तरी स्वताहुन दोन पावले पुढे येते आणि व्यवस्थीत पत्ता सांगते, कारण इथली सुरक्षीतता.!!आपल्याकडे रस्त्यावर एखाद्या मुलीला कोणी पत्ता विचारायला थांबले तरी ती इतकी घाबरते कारण गाडीतली व्यक्ती कशी असेल कोणी पाहिले तर काय म्हणेल...?.किंवा छेड काढण्यासाठी तर उगाचच गाडी थांबवली नाही ना? असे असांख्य प्रश्न तीच्या डोक्यात येतात!!! "............
हे कुठल्या काळातल्या भारताबद्दल म्हणताय आपण लोपाबाई? आणि US मधल्या कुठल्या भागाबद्दल नक्की? एकच मुलगी आणि बाकी सगळे मुलगे असे groups मी college मधे होते तेव्हापासून होते हो. माझा पण काही वेळेला एकटीच मुलगी आणि बाकी सगळे मुलगे असा group असायचा. मला ना त्याचा कधी त्रास झाला ना कधी कसली भिती वाटली. जेव्हा असा group असतो ना तेव्हा एकतर एकमेकांच्यात प्रचंड विश्वास असतो आणि सगळे जण मैत्री या शब्दाची किंमत समजणारे असतात.
आणि US मधे सगळे safe ? काहीही काय? मि पुण्यामुंबईत रात्री अपरात्री कामाच्या निमित्ताने एकटी हिंडू शकते पण मी Athens, GA (My school campus was never safe) मधे नाही किंवा अगदी chicago सारख्या शहरातही नाही.
गाडीच्या काचा खाली करून कुणी पत्ता विचारायला थांबवले तर पत्ता सांगतात इथेही. काहीही काय? हा इथे तिथे चा मुद्दा अगदीच Irrelevent आहे.

आई शप्पथ या चौकोनांचे काय करायचे? Unicode setting करुनहि तेच..


Lopamudraa
Sunday, June 04, 2006 - 6:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अज्जुका बाई... आजही तुम्ही खेड्यात जा... आणि मी पण बरेच खेळ खेळायला जायची आणि एकटी खेळायची पण जे पुणे मुंबईत दिसते ते गावाकडे नाही दिसत तुम्ही कधी खेड्यात गेला नाही असे वाटते आणि सगळी मुले हा विषय नाहिये... कारण सगळी मुले अशि नसतातच... हे माझेघि मत आहेच...जी टारगट मुले रस्त्याने फ़िरतात त्यांच्याविशयी चाललेय असा माझा समज होता... आणि अत्याचार सगळिकडेच होत असतात पण आपल्या देशात प्रमण वाढतेय... अत्याचार होतच नाहित असे म्हणने नाही...!!! आपल्या देशाबड्द्दलच चिंता करणार ना आपण...???
अज्जुकाबई..!!!कुठल्याही विषयात १००% एकच गोष्ट खरी आणि खोटी असे नसते...प्रत्येक गोष्टीला अपवाद असतातच.... आणि मला ncc. jaayache hote paN aamachyaa college मध्ये ncc साठी ५५ मुलींची गरज होती तेव्हढ्या मुली जमल्या तर सुरु करु असे प्रिन्सिपल नी सांगितले होते... पण तेव्हढ्याही मुलींना घरुन परवानगी मिळाली नाही...आज्जुकाबई आजही त्या college मध्ये मुलींचे ncc नाह्हिये अज्जुकाबई हे ही त्याच देशात घडतेय जिथे तुम्ही रहाता अस मला वाटते...!!!


Lopamudraa
Sunday, June 04, 2006 - 6:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणि मीही खुपदा एकटी रात्रीबेरात्री कामानिमित्त... बाहेर असायची अनोळखी लोकांसोबत पण मला कधिहि त्रास्स झाला नाही... पण त्याची कारणे वेगळी..,सर्व्सामानुय मुलगी घाबरतेच...आजही माझ्या तालुक्याच्या गावि रस्त्यावर रात्रि आठनंअतर... एकही मुलगी दिसणार नाही,,महाराष्ट्रात तर खुप चांगली परिस्थीति आहे, पण इतर राज्यात?,इथे रात्री १० वाजता सुध्दा एकटी मुलगी joogg. करतांना दिसते, इथली woods मध्ये कोणत्याहीवेळी एकट्या स्रीया ट्यांच्या कुत्रांना फ़िरवायला घेउन जातात न घाबरता...!!!कायदे खुप कडक आणि सुरक्षीत आहेत.
आणि मुलींई व्यवस्थीत कपडे घालावे याबद्दल वादच नाहि!!!शह्रातल्या मुली धिट असतात आणि आइवडील त्यांना बाहेर जाउही देतात खेड्यात अस होत नाही, चारलोक लगेच नावे ठेवतात... आणि माझ्याबरोबर ला एका MSC एका batch माझ्या मैत्र्र्णिला वर्गात तीच्या विशयात ती एकटी मुलगी होति आणि सगळी मुले पण वर्गातल्या मुलांनि तीला नेहमीच मदत केलि... कधीच त्रास्स दिला नाही पण जेव्हा मधल्या वेळात ती त्यांच्यासोबातच कॅटीनला जायची तेव्हा तीला (तास्स नसतांना)बर्‍याच कोमेट्स ऐकाव्या लागायच्या...!!! माझ्याजवळही इतर मुली बोलायच्या कशी ही मुलांमध्ये राहते बाई!!!!???हे जळगाव या शहरात,मी town आणि तालुका याची तुलना केलिये!!!
आणि वर जे मनुस्विनि ने दिले तो प्रकार तर भारताच घडला ना..., आणि मला us बद्दक्ल काहिहि माहिति नाहीइ...म इ तीथे रहात नाही!!! मी मोटया शहरात राहिलेली नाहिये...त्याबद्दल मला माहितही नाही, म्हणुन इथे तीथे ही चरचा माझ्या पुरतीच होति... तेव्हा जर तुम्हाला त्यात वावगे वाटतले तर त्यावरुन मुद्दा मांड ना... आणि आज नगरला जे scandal झाले ना ते काय आहे???? ते एका चांगल्या मुलानेच उघडकिस आणले...आणि करणारेही मुलेच होती... ज्यांनी केली त्याबद्दल मांडलेय... ज्यांनी उघडकिस आणले ती चांगली मुलेही आहेतच ना पण विशय तो नव्हता चाललेला...!!!
आणि je jhaale naa te agadee vyavastheet plan करुन मुलींना फ़सवले गेले!!!त्यांनांतर ज्या मुलींना acid टाकुन त्रास दिला जातो..,जालले जाते??? त्याचे काय...!!!


Savani
Sunday, June 04, 2006 - 2:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला असं वाटते की दरवेळी उगाचच खेड्यात काय आणि शहरात काय ही चर्चा कशाला करायला पाहिजे? तसे म्हटले तर अशा प्रवृत्तीचे लोक सगळीकडेच आहेत.
लोपा, मी सुद्धा जळगाव ला ३ वर्षे शिकायला होते. आणि technical field मध्ये असल्याने वर्गात ६३ मुले आणि ३ मुली असा ratio होता.त्यामुळे मुलांमध्ये रहाण्याशिवाय पर्याय नव्हता. पण ना कधी आम्हाला त्याचा त्रास झाला ना कधी भिती वाटली, ना कधीच कोणाच्या comments ऐकायला मिळाल्या.


Chandrakor
Sunday, June 04, 2006 - 8:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथे चर्चा जरा भरकटत चालली आहे असे वाटतेय. कपड्याचा मुद्दा मीच उपस्थित केला होता. मुलींनी तोकडे कपडे घालावेत असा माझा आग्रह नाही. पण व्यक्तिस्वातंत्र्य म्हणून काही असते ना? घातले एखाद्या मुलीने असे कपडे तर स्वताला माणूस म्हणवून घेणार्यांनी लगेच रिअएक्शन दिलीच पाहीजे का? अशा रिअएक्शन्स पुरुषांसाठी अभिमानाची नाही तर लज्जेची बाब आहेत. ज्यांना स्वताच्या "अशा" भावनांवर कंट्रोल ठेवता येत नाही ती माणसं नाहीतच. जनावर आहेत हे सिव्हिलायझेशनच्या गप्पा मारणार्यांनी लक्शात घेतले पाहीजे.

Chandrakor
Sunday, June 04, 2006 - 8:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी सध्या यूएस मधेच आहे. खूप मुली इथे अतिशय कमी कपड्यात वावरतांना दिसतात. मी तरी आजपर्यंत कुणा अमेरिकन पुरुषाला अशा मुलींकडे अधाशीपणे बघतांना, कॉमेंट्स पास करतांना पहीले नाही.

Zakki
Sunday, June 04, 2006 - 9:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जेंव्हा लोक इथे, तिथे अशी तुलना करतात तेंव्हा त्यांनी असा विचार करावा की धर्मराज एकदा नरो वा कुंजरो वा म्हणाला म्हणजे तो सुद्धा खोटे बोलला तर आम्ही दोन लाख वेळा खोटे बोललो तर काय झाले असे म्हणाण्यासारखे आहे का असा विचार करावा.

शिवाय माणसे इथून तिथून सारखीच. इथे काय नि तिथे काय?

वास्तविक बॉय फ्रेंडच्या नादी लागून आपली तीन मुले नदीत बुडवणारी किंवा मारून टाकणारी आई या अमेरिकेतच सापडेल. चक्क सिरियल रेपिस्ट नि खुनी इथे अनेकदा दिसतील. चर्च मधल्या मुलांना मोलेस्ट करणारे 'धर्मगुरु' इथलेच. नि सावत्र मुलीवर अतिप्रसंग करणारेहि इथेच!

शेवटी माझ्या एका, भारतात परत गेलेल्या, मित्राने म्हंटले तेच खरे. तो म्हणाला अमेरिकेत वीस वर्षे राहिलो. तिथेहि गुन्हे, लाच लुचपत नि इतर अनेक अडचणि येतात. इथेहि येतात. मला भारतातल्या अडचणींना तोंड देणे जमते, अमेरिकेतल्या नाही. तुला इथे त्रास होतो, तिथे नाही. तर तू तिथे रहा मी इथे रहातो. अधून मधून भेटूच. नाहीतर पी.सी. वर व्हिडिओ करून भेट होईलच.




Deepanjali
Monday, June 05, 2006 - 1:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी सध्या यूएस मधेच आहे. खूप मुली इथे अतिशय कमी कपड्यात वावरतांना दिसतात. मी तरी आजपर्यंत कुणा अमेरिकन पुरुषाला अशा मुलींकडे अधाशीपणे बघतांना, कॉमेंट्स पास करतांना पहीले नाही.

<<<चद्रकोर ,
अग तोकडे कपडे घालण्यचा issue नाही करत म्हणून इथे मुलीं कडे वाईट नजरेनी पहाणारे लोक नसतात असे थोडीच आहे !
माहित नाही तू कुठल्या area/city मधे फ़िरली आहेस पण इथे अशी लोक नसतात हा अगदी मोठा गैरसमज आहे !
उदाहरणे देत नाही पण तरी US मधे अत्ता पर्यंत फ़िरलेल्या cities मधे तू म्हणतेस तसे ' सारेच सज्जन ' लोक अज्जिबात आढळले नाहित !
अज्जुका आणि झक्कींच्या post पटतात
चांगल्या आहेत .



Maanus
Monday, June 05, 2006 - 1:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी तरी आजपर्यंत कुणा अमेरिकन पुरुषाला अशा मुलींकडे अधाशीपणे बघतांना, कॉमेंट्स पास करतांना पहीले नाही. >>>>
हा गैरसमज आहे. भारतीय पुरुष लगेच सौदर्याॅही कदर करत असतील... आणि ईतर जरा late current असतील असे म्हणु शकतेस.

दोन week पुर्वी मी brooklyn bridge च्या ईथे एका मैत्रिणीबरोबर फिरत होतो... तर ३ गोरी मुलांची टाळकी हिचे कितीतरी चोरुन चोरुन फोटो काढत होते.


Radha_t
Monday, June 05, 2006 - 11:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे बाबांनो आणि बायांनो, कशाला जिवाचा एवढा अटापिटा करून घेताय . माणासांमधे दोनच जाती आहे, एक बाई आणि एक पुरुष .... आत तिसयाचा विषय इथे नको ... पण दोघांच्या मधे जे काही आहे ते नैसर्गीक आहे .. हे अस चालायचच ... उलट हे अस नसल तर अडचण होइल . कुणाला कशामुळे त्रास होत असेल तर तो त्रास आपल्याला कसा होणार नाही याची काळजी घ्यावी म्हणजे झाल.

मुलीने काळजी घेतली नाही तर तिला शिक्षा मिळेल ... आणि मुलाने काळजी घेतली नाही तर त्याला सुद्धा शिक्षा मिळू शकते ... आणि आपल्या मुला मुलींना त्रास होऊ नये म्हणून पालकांनी आधिपसूनच योग्य शिक्षण द्यावे .. चांगले संस्कार द्यावे. OK विषय संपला BB CLOSE


Chandya
Monday, June 05, 2006 - 5:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

There is nothing wrong in wearing western style clothing but one should remember that we do not yet have same level of law enforcement protection (and fear of those agencies) that one experience in western (and some gulf) countries.

Until we achieve that, the freedom of expression through fashion would have to be limited.

Given opportunity, one can find examples of hideous behaviour in all parts of world.


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators