|
Dineshvs
| |
| Friday, May 05, 2006 - 2:47 pm: |
| 
|
सर्व वैर हे मृत्युबरोबर संपतं या आपल्या संस्कृतितल्या तत्वाशी मी पुर्ण सहमत आहे. पण जेंव्हा संस्कृति आणि सत्य, यातुन एकाची निवड करायची असेल, तर मी नि : संशय सत्याचीच बाजु घेईन. मी ईथे जे लिहिणार आहे, त्यामुळे माझ्या प्रिय मित्रमैत्रीणींचा रोष मी ओढवुन घेणार आहे याची मला पुर्ण कल्पना आहे. पण तरिही त्या सर्वांच्या सदविवेकबुद्धीवर माझा द्रुढ विश्वास आहे. कै. प्रमोद महाजन यांच्या मृत्युनंतर ईथे जे शोकप्रदर्शन झाले, त्यामुळे मी जरा अस्वस्थ झालोय. माझ्या मनात जे आले ते ईथे मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतोय. प्रवीण महाजन यानी गोळ्या झाडल्याबरोबर पोलिस स्टेशनमधे जाऊन जबाब दिला, त्यात त्यानी असे म्हंटले आहे कि दादाकडे दोन हजार कोटी रुपयांची मालमत्ता होती. दोन हजार कोटी म्हणजे दोनावर तब्बल दहा शुन्ये. जास्त वाटतोय का आकडा ? किती कमी करु ? ५० % , ७५ % कि ९९ % ? . ठिक आहे, अगदी ९९ % कमी करतो. राहिले वीस कोटी रुपये. निव्वळ राजकारण केलेल्या व्यक्तीकडे ईतकी मालमत्ता कशी येते ? या देशातील प्रामाणिक करदाता नागरिक, ईतकी मालमत्ता मिळवु शकतो ? प्रवीणचा दुसरा आक्षेप होता, कि दादाने त्याच्या संपर्कात आलेल्या, प्रत्येकाला कोट्याधीश बनवले. कसे ? तर वेगवेगळी कंत्राटे देववुन. माझ्या अल्पमतीप्रमाणे सरकारी कंत्राटे हि निवीदा मागवुन, ज्याची निविदा सर्वात कमी रकमेची असेल त्याला द्यावे असा नियम आहे. कुठलेहि कारण न देता कुठलिहि वा सर्वच निविदा नाकारण्याचा अधिकार राखुन ठेवलेला असतो. मग महाजन हि कंत्राटे कशी मिळवुन देत असत ? आणि त्याबद्दल त्याना काय मिळत असे ? ही कंत्राटे प्रचाराची पण असु शकतील. ईंडिया शायनींग वैगरे विसरला नसालच. मग या कंत्राटातली नेमकी किती रक्कम वळती झाली ? बाजारात काहिहि फुकट मिळत नाही, तसेच कुणीहि व्यापारी आपल्या खिश्यातुन खर्च करत नाही. मग हा वाढीव खर्च कंत्राटदार कसा वसुल करत असेल बरं ? बरेच मार्ग आहेत. कमी प्रतीचा माल वापरुन किंवा न केलेल्या कामाची बिले दाखवुन वा मुळातच जास्त रकमेची निविदा भरुन. आणि हा सगळा पैसा कुणाचा, तर प्रामाणिक करदाट्यांचा. प्रवीणचे म्हणणे असे होते, कि अश्या तर्हेने त्यालाहि काहि मदत करता आली असती, पण ती दादाने केली नाही. का ? कदाचित त्यातला हिस्सा मिळेल अशी खात्री नसावी म्हणुन ? मुळात हा गृहस्थ काय ऊद्योग धंदा करत होता ? काहिहि न करता दादाने त्याला कोट्याधीश बनवावे, असे त्याला वाटत होते का ? हा माणुस घरुनच पिस्तुल घेऊन गेला होता. त्याच्याकडे पिस्तुल कुठुन आले ? आपल्या देशात असे सहज पिस्तुल मिळते ? काय किम्मत असते त्याची ? राजकारणी लोकांच्या शिफारशीशिवाय ते मिळत नाही. RDB मधे पिस्तुल पुरवण्याची जबाबदारी, एक राजकिय नेता, आपणहुन घेतो. कारण असे काम तेच करु शकतात, नाही का ? पिस्तुलाला लायसंस लागते ना ? मग मुळातच अस्थिर मनोवृत्तीच्या माणसाला ते कसे दिले गेले ? त्याचे नुतनीकरण कसे झाले ? मुळात ते कायदेशीर होते का ? तुम्हाला काय वाटतं हे सत्य कधीतरी तुम्हाला कळेल ? बात सोडा राव. हर्षद मेहताचे काय झाले तुम्हाला कळले ? बोफ़ोर्स च्या दलाली चे काय झाले, तुम्हाला कळले ? गोध्रा मधे खरेच काय झाले, तुम्हाला कळले ? पब्लिक मेमरी इज शॉर्ट, डीयर !! आता यातले सत्य तुम्हाला कधी कळणार नाही कारण काय होईल सांगु ? म्हणजे तसे बरेच पर्याय आहेत. प्रवीण आत्महत्या करु शकतो. त्याचा नैसर्गिक मृत्यु होवु शकतो. त्याला वेड लागु शकते किंवा तसे कोर्टात सिद्ध होवु शकते. राजुरकर वकिल असे सिद्ध करतील, कि हा मृत्यु गोळी मारल्यामुळे झाला नसुन तो पुरेसे वैद्यकीय ऊपचार न मिळाल्याने झाला. किंवा वहिनी अगदी थेट दुष्मन सिनेमा मधल्या मीनाकुमारी सारखा पवित्रा घेऊन, खटलाच मागे घेतील. बघा, किती पर्याय आहेत, पण सत्य समोर येण्याचा एकहि पर्याय नाही. पुढे काय होणार ? तर महजनो येन गत : स पंथाय म्हणजे पुर्वासुरीने केले तेच. हर्षद मेहतानंतर आणखी काहि घोटाळे झाले. बोफ़ोर्सच्या तोफानी कारगिल मधे यशस्वी कामगिरी केली आणि त्यागमुर्ती सोनियाजीनी क्वात्रोची ला क्लीन चिट देऊन टाकली. मग आता पुढच्या निवडणुकीत, महाजनांच्या नावाने जोगवा ठरलेला. " प्रमोद तेरा बलिदान व्यर्थ न जाये " किंवा " जबतक सुरज चांद रहेगा, प्रमोद तेरा नाम रहेगा " वैगरे वैगरे. ईंदीरांजी च्या नावे असेच झाले होते ना ? राजीवजींच्या नावे पण असेच झाले होते. काय त्या सहानुभुतीच्या लाटा, सुनामी परवडल्या. चंपकने एक ऊदाहरण दिलेय, त्यांच्या चांगुलपणाबद्दल. ( मित्रा रागावु नकोस रे ) भारतात कायद्याचे राज्य आहे ना ? मग अपघात झाल्यावर काय व्हावे अशी अपेक्षा आहे. जखमींवर त्वरीत ऊपचार व्हावेत. अपघाताचा पंचनामा व्हावा. वाहतुक सुरळीत केली जावी. ज्याचे नुकसान झाले आहे, त्याला भरपाई मिळावी. व ज्याच्या चुकीमुळे अपघात झालाय, त्याला दंड व्हावा. आणि हि कायदेशीर प्रक्रिया पोलिसानी लवकरात लवकर पार पाडावी. जसे त्यानी कुणालाहि अडवुन ठेवणे चुक, तितकेच कुणा राजकीय नेत्याने या प्रक्रियेत हसतक्षेप करणे चुक. ( ईतर देशात असे होवु शकते का ? ) या देशाचे कायदे मानायला नागरिकच तयार नाहीत. म्हणुन असे घडते. मग एक करता येईल, प्रत्येक पोलिस स्टेशनमधे तिथे ज्या नेत्याच्या फोनने काम होवु शकते, त्याचा नंबरच लिहुन ठेवावा. आणि शक्य तर दर हि. सध्या तर अशी परिस्थिती आहे कि तुमची तक्रार नोंदवुन घ्यायला देखील, असा हस्तक्षेप आवश्यक ठरतो. मग हे राजकारणी तुमचे आदर्श आहेत ? असे राजकारण तुम्हाला अपेक्षित आहे ? नेत्याने स्थानिक लोकानाच मदत करावी, ईतकी संकुचित अपेक्षा आहे तुमची ? मग काय केले तुम्ही निवडुन दिलेल्या नेत्यानी, तुमच्यासाठी ? त्यापेक्षा बिहारी बरे रे. रेल्वे खाते कायम त्यांच्याकडे, आणि सगळ्या सुधारणाहि त्यांच्याकडे. तुम्ही बसा बोंबलत आणि तुमचे नेते xxx त. ईथे ज्या हळव्या प्रतिक्रिया व्यक्त झाल्या, त्याने मला चिंता वाटली. , ( मुळातच या हळवेपणाचा मला ऊबग येतो, आणि माझ्या कवयित्री मैत्रिण, निनावी, वर सगळा राग निघतो. ) मृत्यु हे अंतिम सत्य आहे, ते स्वीकारा, पण त्याने सत्याकडे दुर्लक्ष करु नका, त्याचाच आग्रह धरा. विदारक असले तरी ते सत्य असते, ते फक्त जाणुन घ्यायचे असते. सत्य स्वीकारणे हे सगळे बकवास आहे. तुम्ही एकदा जाणलेत कि त्याचा स्वीकार करा वा करु नका, ते सत्यच राहते.
|
Moodi
| |
| Friday, May 05, 2006 - 3:20 pm: |
| 
|
दिनेश प्रमोद महाजनांविषयी आम्हाला काही माहीत नव्हते असे तुम्हाला वाटतय? रागवु नका. कॉलेजमध्ये माझा दुसरा विषय हा पॉलिटिक्स होता. राजकारणाची मुळे किती खोलवर असतात याची आम्हाला जाणिव आहे. संपत्ती कोणत्या मार्गाने कमवता येते हे देखील माहीत आहे. प्रमोद महाजन यांनी जनसामान्याना तेवढी तरी मदत केलीय जरी ते एवढा पैसा कमावुन बसले होते. पण बाकी त्यांच्याही पेक्षा वरचढ अशा नट नट्यांनी काय गुण उधळलेत? काय समाजाची मदत केलीय? ज्यांचे अचकट विचकट चाळे, नंगा धुडघुस याने तरी काय समाजात राहिलेय? मोठे मोठे व्यापारी, बिझीनेस टायकुन्स हे तरी कोण आहेत? मुंबई पाण्यात बुडली तेव्हा तरी कोण आले हो धावुन? जनसामान्यच ना? प्रमोद सारख्यानी निदान लोकाना एकत्र तरी आणलय, पण या छंदी फंदीनी काय समाज कार्य केले? सुनील दत्त अन नर्गीस सोडले तर कोण एवढे पुढे आहे? मुळात मराठी माणुस तुसडाच. तो काय धंदा करणार? याला भावाने एवढे दिले तरी याची खा खा संपेना. अन पिस्तुल दिले ते महाजनांनी नाही मुंढेंनी, जेव्हा ते गृहमंत्री होते तेव्हा. हे गुणी बाळ तेव्हा धंदा करत होत बिल्डिंग बांधण्याचा अन अजुन काय काय होतच की. एकतर तुमचे मुंबईकर कायम डोळे झाकुन बसलेले. राम नाईक सारख्याना सोडुन त्या नाच्या गोविंदाला निवडुन देतात अन वर रेल्वेवर राग काढतात. काय तर म्हणे वेळेवर येत नाही अन लालु यादवने महाराष्ट्राला काही पॅकेज दिले नाही. कोणाला निवडुन द्यायचे हेच जर तुमच्या मुंबैकराना समजत नाही तर मग महाजन सारखे करोडोने कमावुन बसले त्यात नवल काय? आधी तुमच्या मुंबईकराना भक्कम बनवा स्वतच्या हक्कासाठी. शिवसेनेला कुणी वाढवले? कॉंग्रेसनेच ना? लिहीण्यासारखे खुप आहे. पण आता इथे नको.
|
Dineshvs
| |
| Friday, May 05, 2006 - 3:55 pm: |
| 
|
मूडि, रागावलात ? म्हणजे दगडापेक्षा वीट मऊ, असे म्हणायचे का ? आणि मुंबईत आता मुंबईकर कुठे ऊरलाय, तो कधीच बाहेर फेकला गेलाय.
|
Moodi
| |
| Friday, May 05, 2006 - 4:40 pm: |
| 
|
दिनेश तुमच्यावर अन मी रागवणार? शक्यच नाही. पण जे मनापासुन वाटले ते बोलले. जर कुणी काही वाईट वागत असेल तर त्याला शिक्षा करण्याचा अधिकार परमेश्वरालाच आहे, माणसाची ती लायकीच नाही. सूड हा फार वाईट असतो. अन त्यातुन दुसर्याला मारुन ती व्यक्ती आपल्या पण सग्या सोयर्याना निराधार करते. सारंगी महाजन अन मुलांचे काय? लोक त्यांना कोण म्हणुन ओळखणार?
|
दिनेश, १०० टक्के अनुमोदन. सध्या या विषयावर बोलणे देखील चोरी आहे. शिवानी भटनागरचा मृत्यू झाला तेव्हा कोणी नाही भावूक झाले..... या सगळ्या गोष्टीचा उलगडा वामनराव पैंच्या तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार या पुस्तकात चांगले सापडते... असो बोलण्यासारखे पुष्कळ आहे. लोक सध्या ऐकण्याच्या मूडमध्ये नाहीत. पन तू धैर्य करून माझ्या मनातले लिहिलेस............
|
Zoom
| |
| Friday, May 05, 2006 - 6:25 pm: |
| 
|
दिनेश, मी देखील तुमच्या मताशी सहमत आहे. मूडि, दगडापेक्षा वीट मऊ मानायला देखील मन तयार होत नाही या राजकारण्यांच्या बाबतीत.
|
Mbhure
| |
| Friday, May 05, 2006 - 9:01 pm: |
| 
|
दिनेश, तुम्हीच लिहीलत म्हणुन ठीक. इथल्या प्रतिक्रीया वाचुन (भारताला पुढे नेणार नेतृत्व...) मला आश्चर्य वाटले. महाजन - अंबानी मैत्री ही सर्वश्रुत आहे. निधनाबद्दल शोक व्यक्त करण ठीक आहे पण...
|
Bhagya
| |
| Saturday, May 06, 2006 - 1:09 am: |
| 
|
दिनेश, तुमच्या post मध्ये मित्र मैत्रिणिंना राग येण्यासारखे काय आहे? बरोबर आहे तुम्ही लिहिले ते. आणि सत्य हे पुढे येणार नाही, हे पण तितकेच सत्य आहे. जेसिका लाल चा व्यवस्थित गोळ्या झाडून खून झाला, किति वर्षे केस चालली? निष्पन्न काय झाले? लोकांनी आवाज उठवून काय होणार? ईन्दिरा गांधींच्या खुन्याला आत्ता शिक्षा झाली. कायदा 'बेकायदा' आहे आणि सुव्यवस्था 'दुर्दशा' आहे. भ्रष्टाचाराबद्दल काय लिहू? एकच स्वानुभव लिहिते. graduate झाल्यानंतर स्व:ताच्या पायावर उभे राहायचे म्हणून कर्ज काढून २ computer घेतले. कर्जाचे हप्ते देता यावे म्हणुन MSEB चे dataentry चे काम घेतले. पहिल्या महिन्याचे १५०० रुपये झाले. ते बिल मिळावे म्हणून १७ खेटे घातले. माझ्या कष्टाच्या पैशातून ५०० रुपये चहापाण्याचे कापून मला एका engineer ने पैसे घरी आणुन दिले. शेवटी आइ वडिलान्कडुन पैसे घेऊन हप्ता भरला हे सांगायला नकोच. साधा engineer असा तर प्रधानमंत्री कसा असेल? मला वाटते इथे लोकांना ज्या तर्हेने लहान भावाने मोठ्या भावाला गोळ्या घातल्या ते खटकले आहे. आणि ते खटकणे बरोबरच आहे.
|
Bhagya
| |
| Saturday, May 06, 2006 - 3:43 am: |
| 
|
आणि हो, राजकारणी लोकांच्या आयुष्याला सर्वसामान्य लोकांचे निकष लागत नाहीत. राजकारणी लोक १) हव्या तितक्या बायका करु शकतात. २)वाटेल त्याला तिकिट देऊ शकतात. ३)वाटेल त्याला वाटेतून दूर करु शकतात. ४) कर न भरता हवी तितकी सम्पत्ती गोळा करू शकतात. ५)कायदा पण वाकवू शकतात. ६)चुक्-बरोबर याच्या त्याना हव्या तशा व्याख्या बनवू शकतात. मायावती चे वाक्य: I always wanted to be a political leader. I never wanted to be a collector. Because if you are a politician, 10 collectors stand in front of you with folded hands. आणि हे असेच काहितरी निकष लावून उद्या कोणि "कर्णला नाहि का अर्जुनामुळे मरण आले?" तसेच प्रवीण ने प्रमोद ला मारले असे बोलले तरी आश्चर्य वाटुन घेऊ नका.
|
ज्या वेळेस मिडिया महाजनान्बद्दलची बातमी येवढ्या "आपुलकीने" कव्हरेज देत हाताळत होती त्याच वेळेस माझ्या मनात शन्केची पाल चुकचुकलि होती की हा "उचलुन नन्तर आपटविण्याचा" प्रकार नाही ना! मिडिया किती कशी आपटवेल ते येत्या भिविष्यात कळेलच, पण चौतालान्च्या काल परवा जाहीर झालेल्या १७०० कोती रुपयान्पेक्षा जास्त प्रत्यक्ष सम्पत्तीपुढे, महाजनान्च्या खुनी भावाने दिलेला जवाब ग्राह्य धरुन त्याप्रमाने मत बनविताना आपले काही चुकत नाही ना अशी शन्का देखिल आली नाही काहो तुमच्या मनात दिनेशजी? बर तो जवाब खरा मानायचा तरी एकीकडे पिस्तुला साठी "मनःस्वस्थ्य गमावुन बसलेल्याला" (म्हणजे काय?) पिस्तुल मिळालेल्च कसे हाही प्रश्ण तुम्हीच काढता! हा वैचारीक भाबडेपणा की गोन्धळ की प्रश्ण विचारण्यामागिल मुत्सद्दीपणा? वर कोणीतरी अम्बानी आणि महाजनान्च्या युतीबद्दल लिहिल हे! काय हो? बजाजची युती कोणाबरोबर हे जगजाहीर नाही का? आणि अशी युती असली तर त्यात गैर काय? या इन्डस्त्रीजमुळे या देशाचा काहीच विकास झाला नाही का? कम्युनिस्टान्च्या वाढत्या प्रभावामुळे हल्लीच काय पुर्वीही उधोगसन्स्थान्वर त्या फायद्याकरता चालविल्या जातात म्हणुन टीका करण्याचा प्रघात हे! मग काय सर्व उद्योग धन्दे सरकारी मालकीचे करावेत का? मग शेतीही सरकारी मालकीची का नको? आणि शेवटी उरेल ते एकच की तिरन्ग्या ऐवजी लाल बावटा फडकवु आपण दोघे मिळुन दिनेशजी! दगडापेक्षा वीट मऊ की कठीण हा नन्तरचा विषय हे! महाजन करप्ट होते की नव्हते ते पोलिस शोधुन काढतीलच! सद्य परिस्थितीत सत्तधार्यान्ना ते सापडणे आवश्यक असल्याने खाते ही झपाट्याने काम करेल यावर तरी तुमचा विश्वास खर तर बसायला हवा! पण या सर्व घटना घडायच्या आधीच, केवळ तो माथेफिरू प्रविण बोलला म्हणुन त्याच हलक्या सुतावरुन तुम्ही तर स्वर्ग गाठु पहाता की राव! माझ्यापुरते, मी जी श्रद्धान्जली लिहिली, प्रत्येक वाक्यन वाक्य तोलुन मापुन लिहिल हे! बीजेपी करीता त्यान्नी केलेल्या महत्तम कार्याची जाण असल्याने त्याबद्दल कौतुक केल हे! त्यान्च्या तुलनेने स्वच्छ हाताची जाणिव असल्याने त्या बद्दलही तसेच लिहिल हे! पण मग मी "घात" यावरही भाष्य केल हे...! त्यातली प्रत्येक वाक्यच माझ्या दृष्टीने महत्वाची हेत पण उद्देशाच एक वाक्य हे, ते अधिक महत्वाच हे! आणि हे लिहिताना मी कुठेही हळवा झालेलो नव्हतो! भावनाशील तर त्याहुनही नाही! तरीही, जे बीजेपीचे किन्वा त्यान्च्या विचारसरणीचे विरोधक हेत त्यान्ना कदाचित वरल्या श्रद्धान्जलीतील स्तुतिसुमने खुपु शकली असतील... पण तो आमचा हळवेपणा किन्वा भाबडेपणा नक्कीच नव्हता! मात्र दिनेशजी,.... प्रमोदचा त्याच्या सख्खा भाउ प्रविणने खुन केला या एका वस्तुस्थितीवर आधारीत, का केला, काय उद्देश, कशासाठी याची उत्तरे शोधताना (ज्याची जबाबदारी पोलिसान्ची हे) केवळ प्रविणचा जबाब ग्राह्य धरुन नी मनातील अनेकानेक छुप्या पुर्वग्रहान्वर आधारीत, त्याच वेळेस गोदया पासुन हर्षद पर्यन्त अनेकानेक उदाहरणान्ची भेसळयुक्त मिसळ करीत आपण जी पोस्ट लिहिली हे त्यावेळचा आपला भावनावेग हाच जास्त प्रमाणात हळवा होता असे नाही का वाटत? तसा नसता तर तुम्ही अन्य उदाहरणान्ची मदत न घेता केवळ आणि केवळ प्रमोद महाजन करप्टेड आहेत कारण प्रविणने तशी जबानी देली हे अस तरी मान्डल असतत किन्वा, हो मला माहीते की प्रमोद महाजन करप्टेड आहेत अस लिहिले असतेत.. बाकी मालमसाला वापरल्या मुळे एकतर तुम्हीच हळवे किन्वा भावनाविवश बनलाहात असे समजुन घेण्यास बरीच जागा हे किन्वा, तुम्ही बरेच मुत्सद्दी हात असे समजण्यास वाव हे! तुमचे काय मत हे?
|
Dineshvs
| |
| Saturday, May 06, 2006 - 8:19 am: |
| 
|
लिंबु माझा मुद्दा हाच होता, कि याबाबतीत सत्य कधीहि बाहेर येणार नाही हा. पोलिस हे करतील, हा भाबडा आशावाद आहे. प्रवीणने दिलेला आकडा मी कमीच करुन लिहिला. आणि त्याने लिहिलेली मोडस ऑपरेंडी कशी चालत असेल याबद्दल तर्क लढवले. महाजन भ्रष्ट होते असे थेट विधान मी केले नाही हे जितके खरे तरी ते नसे नव्हतेच असेहि विधान कुणीहि केले नाही. म. टा. मधील एक लेख मला चंपकने पाठवला होता, त्याचा सुर तर असा आहे कि ईतक्या शुद्ध चारित्र्याचा नेता आणायचा कुठुन ? काळ सोकावतोय रे. पिस्तुलासारखी वस्तु अशी कुणालाहि का देण्यात आली ? त्याबद्दल शिफारस का करण्यात आली ? असे कुणापासुन त्याला स्वत : चे सरंक्षण करायचे होते ? युती असण्यात काहिच गैर नाही, मग जाहिरपणे डायरेक्टरपद भुषवावे. ओमानचा राजा स्वताचे हॉटेल चालवतो. त्याची शेती आहे, त्याला नागरिकांवर कर बसवण्याचे काहिच कारण नाही. म्हणजे राजकारण्यांच्या पोटापाण्याची व्यवस्था नागरिकानी करायची का ? कितीहि मोठी भुक असली तरी ? आणि मी हेच मांडले आहे कि महाजनांच्या बाबतीत सत्य परिस्थिती कधीहि बाहेर येणार नाही. कारण ते सत्य ना बीजेपीला परवडणार ना आणखी कोणाला. मी राजकारण फार जवळुन बघितले आहे रे. ईथल्या सगळ्या जणांचे आतले धंदे मला माहित आहेत. आणि डोळे ऊघडे ठेवुन बघितले तर, कुणालाहि ते सहज जमु शकते. निवडणुकांच्या वेळी जाहिर करण्यात आलेली मालमत्ता किती खरी असते रे ? बाकिची ऊदाहरणे देण्यातील हेतु एवढाच कि आपल्या देशात हे असेच होत आलेय, आणि यापेक्षा वेगळे काहि घडेल, अशी शक्यताहि कमीच आहे. हळवेपणाचा आरोप मी समुहावर केला, एका व्यक्तीवर नाही. माझी बांधीलकि कुठल्याच पक्षाशी नाही, कदाचित ती स्वच्छ चारित्र्याशी असेल, पण सध्या तरी समोर तसे कोणी नाही.
|
Dineshvs
| |
| Saturday, May 06, 2006 - 8:55 am: |
| 
|
आणि मी जरुर भावनाप्रधान आहे, पण तो फक्त मायबोलिकरांसाठी. त्यामुळे तु काय कुणीच माझ्यावर रागवले तर मला चालणार नाही, हे तर मी आधीच लिहुन ठेवलेय ना.
|
दिनेश, नेमके गेल्या दोन चार दिवसात, कधि नव्हे ते आपली आमने सामने होती हे! तुमच्या पोस्ट चा उद्देश कोणताही असला तरी ती पोस्ट जेथे आम्ही महाजनान्बद्दलचे दुःख व्यक्त करतो आहोत तिथे पडल्यानेच केवळ मी त्याची दखल घेतली, V&C वर लिहिली असतीत तर या मतमतान्तराची दखलही घेतली नसती! जे निखळ असत ते सत्य असत अन सत्त्यावर तुमचा विश्वास जर असेल तर आम्हाला झालेले किन्वा होत असलेले दुःख हळव किन्वा भाबड अस ठरवल नसतत! एनीवे, तुमच्या पोस्टची जागाच चुकल्याने मला लिहाव लागल! रहाता राहीला प्रश्ण राजकारणात शिरण्याचा नी तिथल्या बजबजपुरीत टीकुन रहाण्याचा! त्या साठी साम दाम दन्ड भेद या सर्व निती वापरण्याचा... तर ज्यान्ना हे करता येत नाही तेच तर तुम्ही आम्ही सामान्य जन असतो ना? हे वेगळेपण हाही सत्याचाच अविष्कार नाही का? आणि असली वेगळे पण एकतर्फी नष्ट करण्याचा प्रयत्न करण्याची घोडचूक ज्यान्नी ज्यान्नी केली ते एक तर फसले तरी नाहीतर पस्तावले तरी.. मग तो टोकाच्या अहिन्सेचा प्रयोग असो की सर्व सम्पत्ती सर्वान्च्या मालकीची असली विचारधारा असो! दिनेशजी, ज्याला युद्ध खेळायचे असते तो एअकतर स्वतःच्या रक्ताने न्हाऊन निघतो किन्वा दुसर्याच्या रक्ताने त्याचे हात माखलेले असतात! आणि असे हात माखणे हेच काठावर बसुन गम्मत पहाणार्यान्च्या दृष्टीने एकतर हास्स्याचा किन्वा निन्देचा विषय ठरते! आम्ही त्यान्चा किन्वा त्यान्च्या पक्षाचा आदर येवढ्यासाठीच करतो की असे असुनही, पन्चेचाळीस वर्षान्च्या माजवलेल्या बजबजपुरीतून वाट काढीत पुढे चाललेले ते अन त्यान्चे पाठीराखे यान्ची अन्तिम उद्दिष्टे तुम्ही जी परिस्थिती अपेक्षित करता हात त्या दृष्टीनेच होती व आहेत! याबद्दल कदाचित दुमत असु शकेल पण म्हणुन आम्हाला महाजन गेल्याचे वाईट वाटले हा आमचा हळवे पणा होउ शकत नाही! जर हळवे होत असे वाटत असेल तर केवळ आणि केवळ हिन्दुत्ववादी पक्षिय दृष्टीकोन ठेवुन लिहिलेली माझी श्रद्धान्जली पुन्हा एकदा वाचा, खास करुन शेवटचा परिच्छेद! या विषयासाठी ही जागाच चूक असल्याने माझ्यापुरता हा विषय मी या बीबी वर थाम्बवतो हे! 
|
ता. क., दिनेशभाऊ, तुमच्यावर रागावलो अस्तो, तर तुमच्या पोस्टची दखल घेण्या ऐवजी तुम्हाला "अनुल्लेखाने" तरी मारले असते किन्वा "टोचुन टोचुन" भन्डावुन तरी नक्कीच सोडले असते! नाही का? DDD
|
Gs1
| |
| Saturday, May 06, 2006 - 9:05 am: |
| 
|
दिनेश, तुझे पोस्ट वाचून आश्चर्याचा धक्का बसला. तुझे लेखन मला कधी कमी, कधी जास्त आवडते, पटते. पण तू असे बिनबुडाचे, एकांगी आणि कुठल्यातरी अकारण विद्वेषाने पेटून लिहिल्यासारखे लिहावेस याचा धक्काच बसला. प्रमोदवर गोळ्या झाडणार्याच्या कबुलीजबाबाची ऐकीव माहिती या एका भांडवलावर एवढे गंभीर व सनसनाटी आरोप एका कर्तबगार नेत्याच्या अकाली निधनाबद्दल शोक व्यक्त होत असतांना त्याच ठिकाणी करणे हे औचित्याला सोडुन आहे असे मला वाटते. गेलेल्याबद्दल वाईट बोलू नये ही संस्कृती आणि सत्य यात सत्याची निवड करण्याची भुमिका योग्यच आहे. ( ना. ग. गोरे गेले तेंव्हा यातल्या संस्कृतीची निवड करून तरूण भारतने श्रद्धांजली वाहिली होती, पण बाळासाहेबांनी मात्र सत्याची बाजू घेऊन ढोंग्याला श्रद्धांजली नाही असा झणझणीत अग्रलेख लिहिला होता. ) तेंव्हा सत्याला विरोध नाही. पण अशा वेळी कुठलाही ठाम आधार नसलेले गॉसिप थेट सत्य म्हणून वाटेल तशी नालस्ती करण्यासाठी मांडणे हे मात्र तुझ्यासारख्या नेहेमी सारासार विवेक बाळगणार्या माणसाला अशोभनीय आहे असे वाटते. मालमत्ता : प्रमोद महाजनांकडे एवढी मालमत्ता आहे असे प्रवीणने पोलिसांना म्हटले असे कुणीतरी म्हटले म्हणून लगेच तसे झाले का ? जी काही मालमत्ता आहे ती निर्माण करण्यासाठी प्रमोद महाजन यांचे काही उद्योग नव्हते हे तुम्हाला कोणी सांगितले ? गेल्या वीस वर्षात मोठे झालेले आणि उत्तम नफा कमावणारे त्यांचे काही व्यवसाय नव्हते हे तुम्हाला कोणी सांगितले ? प्रवीणचा दुसरा आक्षेप : प्रमोद महाजनांच्या कुटुंबाविषयी मला थोडीबहुत माहिती आहे. त्यांनी नेमक्या कोणा कोणाला कोट्याधीश केले ते सांगू शकाल का ? सासर - माहेर दोन्हीकडचे नातेवाईक अत्यंत साधेपणाने रहात होते, रहात आहेत. पिस्तुल : परवाना असेल तर पिस्तुल कोणालाही विकत मिळते. दुचाकीच्या किमतीतही मिळते. पोलिसात, गृहखात्यात जुजबी ओळख असेल, आणि तुम्हाला सुरक्षेचे गरज आहे हे पटवू शकलात तर परवानाही मिळतो. प्रवीणकडे असे पिस्तुल होते यात प्रमोद महाजनवर आगपाखड करण्याचे कारण काय ? एका गरीब ग्रामीण शिक्षक कुटुंबातला मुलगा लहानपणापासून एका ध्येयवादाने भारून राजकारणात येतो, बुद्धी, अविरत परिश्रम, कर्तुत्व याच्या जोरावर भावी पंतप्रधान म्हणून ज्याच्याकडे पाहिले जाईल एवढा मोठा होतो, अशा माणसाचा अकाली मृत्यू व्हावा हे त्याचेच नाही तर त्याच्या पक्षाचे व देशाचे सुद्धा दुर्दैव आहे. अनेकांना बरोबर घेउन जाऊ शकतील असे, वैश्विक भान असलेले, सुसंस्कृत, त्यातल्या त्यात स्वच्छ आणि अत्यंत कुशल प्रशासन देउ शकतील असे सर्व पक्षात मिळून फार नेते नाहीत आपल्याकडे, त्यातलाही एक मोहरा हरपल्याचे मला अनेकांप्रमाणेच दु : ख आहेच. प्रमोद महाजन तर आता सर्व सुखदु : खाच्या पलिकडे निघुन गेले आहेत. त्यांच्या असल्या बिनबुडाच्या आणि अस्थानी चारित्र्यहननाने मला थोडे वाईट वाटले तरी वस्तुस्थिती थोडी जवळून माहित असल्याने फार फरक पडत नाही. पण तुझा आतापर्यंत आलेला अनुभव हा दु : खावर फुंकर घालण्याचा आहे मीठ चोळण्याचा नाही. त्याविपरीत वर्तन बघुन जास्त वाईट वाटले.
|
Dineshvs
| |
| Saturday, May 06, 2006 - 9:30 am: |
| 
|
GS1 कुणाला दुखावण्याचा हेतु नाहीच. पण थेट गोळी झाडण्याईतके काय घडले हे कधीहि ऊघड होणार नाही, हे खरे आहे. ते ऊघड झाले तर पुढे बोलुच, तुर्त मीही ईथे विषय संपवतोय.
|
>>>>> पण थेट गोळी झाडण्याईतके काय घडले ???? मी पोस्ट करणार नव्हतो, पण अगदीच रहावले नाही, दिनेशजी, हाच तर्क लावायचा तर एखाद्या स्त्रीवर बलात्कार झाला तर "थेट बलात्कार करण्याइतके काय घडले" नि अद्ध्यार्हुत अर्थ म्हण्जे ती स्त्रीच वाईट चालीची असली पाहीजे, हा तर्क जेवढा अन जसा ठिसुळ पायावर आधारीत हे त्या तशा पायावर आधारित तुमचे मतप्रदर्शन वाटले म्हणुन वरला लेखन प्रपन्च केला! दोन बाजुच्याच नव्हे तर सर्व पद्धतीच्या शक्याशक्यता आजमावत तपास करावा लागतो व पोलिस ते करतातच! आणि त्यान्च्या या क्षमतेबद्दल मला जराही शन्का नाही! मात्र सामान्य माणुस म्हणुन किमान मला वैचारीक गोन्धळात अडकुन पडुन निरनिराळ्या शन्काकुशन्कान्नी स्वतःचे मन दुषित करुन घेण्यापेक्षा कोणत्या तरी एका विचारधारेवर ठाम उभे रहावेसे वाटते नि त्यानुसार, महाजनान्चा भाऊ, अगदी ब्राह्मण असला तरी ज्या क्षणी त्याने गोळीबार केला, त्याक्षणी तो एक शुद्ध गुन्हेगार सिद्ध झाला हे ज्याच्यात आणि जक्कल्-सुतार यान्च्या अर्था अर्थी काहीच फरक नाही! कोर्टबाजीत काय व्हायचे ते होऊदे पण शेम्बड पोरही विश्वास ठेवणार नाही की जो माणुस गोळीबार केल्यावर पोलिस स्टेशनमध्ये जाऊन जबाब देतो त्याची मनःस्थिती ठिकाणावर नाही किन्वा त्याने केलेले क्रुत्य वेडाच्या भरात केलेले आहे! त्याशिवाय, थोरला भाऊ मोठा झाला त्याचे मोठेपण सहन न झाल्याची असुया, नाकारलेपणाची भावना किन्वा आर्थिक मदत न होणे या बाबी अस्तित्वात असल्या तरी त्यामुळे गोळीबाराचे समर्थन कोणत्याच कायद्यावर होत नाही! रहाता राहिला प्रश्ण प्रमोदच्या आर्थिक स्थितीचा... लोकसभेतील सर्वात मोठ्या पक्षाची तृतिय स्थानावरुन धुरा साम्भाळणारा माणुस आणि कुथल्यातरी सरकारी ऑफिसमधे बसुन पैसे लाटुन घरादाराचे भले करणारा माणुस यात काही फरक असु शकतो हे मान्य असायला हवे, ते अमान्य असल्याने, किन्वा भावाचे मोठे पण न पेलवल्याने प्रविणने असले कृत्य माथेफिरुपणाने केले असावे असा तर्क लढविण्यास बरीच जागा हे! याच विचारातुन माझ्या श्रद्धान्जलीत मी थोर पुरुषान्च्या एकटेपणाचा उल्लेख केला हे, याच विचारातुन श्रेष्ठत्व आणि कनिष्ठत्व यातिल फरक विषद केला हे! आणि कितिही काही असले, भले प्रमोद कडे कोट्यावधिची सम्पत्ती असली किन्वा काही बेकायदेशीर व्यवहाराकरता प्रविण साकडे घालत असावा असे जरी मानले तरी त्याने जे कृत्य केले तो निव्वळ घात होता, अपघात नव्हे, म्हणुन त्या विचारातुन "घाताची" स्वरुपे विशद केली! या सर्व प्रकारात, प्रमोद महाजनानी राजकारणी म्हणुन किती माया जमवली असेल या गोष्टीला माझ्या दृष्टीने काडीचेही महत्व नसल्याने मी त्याबाबत भाषही करण्याचा सम्बन्ध नव्हता! माऊथ पब्लिसिटी मार्फत आत्ताच पब्लिकच्या मनात अशा शन्का कुशन्का निर्माण व्हाव्यात म्हणुन प्रयत्न सुरू झाल्याचे निदर्शनास येत हे, पण ज्यान्ना हे आत्ता सुचत हे, ते ते प्रमोद जिवन्त असताना त्या विरुद्ध बोलू शकत नव्हते का? काही कृती करु शकत नव्हते का? जावु दे हा विषय गहन हे! आणि सर्वच स्पष्ट पणे बोलताही येत नाही! मी लिहिणार नव्हतो, तरीही लिहिले, क्षमस्व! कधि कळी हा विषय v&c वर घेवु! माझी भाषाशैली बोचरी हे असे वाटत असल्यास त्याबद्दलही क्षमस्व! पण त्याला माझा नाईलाज हे!
|
Milya
| |
| Saturday, May 06, 2006 - 10:36 am: |
| 
|
दिनेश तुम्ही जो विचार मांडलात तशीच काहिशी प्रतिक्रिया माझीही होती. मी फ़क्त ती इथे मांडली नाही कारण हा श्रधांजलीचा BB आहे GS1 , लिंबु : महजनांचे कर्तुत्व मोठे होते आणि एका गरीब शिक्षक कुटुंबातुन ते वर आले हे ही सर्वांना माहिती आहेत आणि त्यांचे संघटना कौशल्य वादातीत होते हे उघड सत्य आहे पण त्याचबरोबर हेही सत्यच आहे की ते काही धुतल्या तांदुळासारखे स्वच्छ नव्हते... आणि ह्यासाठी जनसामान्यांना काही पुर्यावाची गरज नाही किंवा प्रवीण काय बोलतो ह्याचा दाखला द्य्यची गरज नाही.. ते सत्य गेली कित्येक वर्षे डोळ्यापुढे दिसते आहे... फ़ारतर आपण असे म्हणु शकतो की एखाद्याच्या वाईत गोष्टींकडे बघण्यापेक्षा चांगले काय आहे बघु आणि सोडुन देउ किंवा मूडी म्हणाली तशी दगडापेक्षा वीट मऊ. भाजपाचे कित्येक मतदार केवळ ह्या न्यायाने त्यांना अजुनही मतद्दन करत आहेत... नाहितर भाजप आणि कॉग्रेस ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजु झाल्या आहेत आजकाल... आणि हे फ़क्त महाजनांनाच लागु पडते असे नाही पण देशातल्या ज्या ज्या नेत्यांना आपण चांगले म्हणतो त्या सर्वांना लागु पडते. कोणीच स्वच्छ नाही 
|
मिल्या, मला वाटते की आता हा विषय v&C वर हलवावाच जेणेकरुन त्यावर अधिक चर्चा होऊ शकेल आणि आपल्या पोस्ट्स नी अडवलेली येथिल जागा मोकळी होइल! तुम्ही मान्डलेले मुद्दे विचार करण्यासारखे आहेत, मान्य करण्यासारखे आहेतच अस नाही! का नाही, याची केवळ कारणमिमान्सा मी नक्कीच देवु शकेन! मॉड्स कृपया, योग्य शिर्षकानिशी, दिनेशच्या पोस्ट पासुन पुढील चर्चा नव्या बीबी वर हलवु शकाल का?... धन्स! 
|
लिम्बुटिंबु.... अगदी ब्राम्हण असला तरी.... हे वाक्या तु का घातल आहेस.... ???? तुला काय म्हणायचय... दिनेश, तुम्हि म्हणता तसे... खरं कारण कधीही बाहेर येणार नाहि.... तशा हालचाली सुरु झाल्यात... हे news वरुन कळतेय...
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|