Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through May 05, 2006

Hitguj » Views and Comments » मायबोली-हितगुज » मायबोलीवरची सभासद नोंदणी » Archive through May 05, 2006 « Previous Next »

Dineshvs
Wednesday, May 03, 2006 - 3:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Admin आता हे प्रकार फार वाढु लागलेत. नविन सभासद घेताना, त्याने अस्तित्वात असलेल्या एखाद्या सभासदाचा रेफ़रंस देणे आपल्याला सक्तीचे करता येईल का ?
याबाबतीत ईतर मायबोलीकर काय म्हणताहेत ?


Arun
Thursday, May 04, 2006 - 4:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश : तुमच्या सुचनेला माझे पुर्ण अनुमोदन.

Admin : खरच हा बोगस नविन सभासदांचा त्रास वाढला आहे.


Limbutimbu
Thursday, May 04, 2006 - 4:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश यान्च्या सुचनेचा आदर ठेवुनही त्या सुचनेला माझा विरोध!
v&c वर बीबी उघडा म्हणजे चर्चेच गुर्‍हाळ लावता येइल


Dineshvs
Thursday, May 04, 2006 - 4:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लिंबु भाऊ, मग हा निर्णय पुर्वलक्षी पद्धतीने अमलात आणावा लागेल. सुरवात कोणापासुन करायची ?

Limbutimbu
Friday, May 05, 2006 - 3:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश, पुर्वलक्षी पद्धतीने करायच तर सुरुवार ही साईट उघडणार्‍या ऍडमिन पासुनच करावी लागेल! :-) DDD
मी विरोध करतो त्याचे एक सरळसोट कारण हे की मी हाताळत असलेले विषयानुरुप मला माझी आयडेण्टी लपवुनच ठेवायची हे! जर तुम्ही म्हणता तसा नियम वर्तमानकालीक किन्वा पुर्वलक्षी प्रभावाने, चुकुन माकुन निघालाच तर कोणत्याही परिस्थितीत मी माझा रेफरन्स कुणाहीतर्फे देणार नाही ही काळ्या दगडावरची रेघ समजा!
बाकी काय? जे जे होइल ते ते बघत रहावे, अनुभवत रहावे हेच खरे!


A_b_h_i
Friday, May 05, 2006 - 3:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझे स्वतःचे दोन आयडीज आहेत. ( जे सर्वांना माहित आहे. ) तरीसुद्धा दिनेश यांच्या सूचनेला माझे अनुमोदन.

Maitreyee
Friday, May 05, 2006 - 10:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश, हेतू चांगलाय पण प्रत्यक्षात आणणे अवघड वाटते. रेफ़रन्स आवश्यक केला तरी एखदी व्यक्ती एक निरुपद्रवी ID घेईल आणि तो रेफ़रन्स वापरुन आणखी काही उपद्रवी IDS तयार करू शकते.


Maitreyee
Friday, May 05, 2006 - 11:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी हाताळत असलेले विषयानुरुप मला माझी आयडेण्टी लपवुनच ठेवायची हे! >>>लिंब्या, काय क्रान्तिकारक वगैरे समजत आहेस का रे स्वतला
एवढे कसले विषय'हातळतोस' म्हणे!:-)



Limbutimbu
Friday, May 05, 2006 - 11:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मैत्रेयी, तुला हसु येणे स्वाभाविक हे! :-) ही बाब अनुभवजन्य सापेक्षतेतुन आलेल्या विचारातील फरकास कारणीभुत हे! त्यामुळे तू हसलीस तर मला नवल वाटत नाही!
आणि हा प्रश्ण मी स्वतःला कोण समजुन घेतो याचा नसुन लोक मला काय समजतात किन्वा कुठले कोणते लोक मला काय समजुन घेतिल याचा हे! फॉर एक्झाम्पल, काही दिवसान्पुर्वी झक्कीन्नी फिडबॅक वर केलेल्या पोस्ट्स आणि ऍडमिनचे ट्रॅफिकचे उत्तर ज्यान्ना विसरायचे त्यान्नी जरुर विसरावे, मला शक्य नाही! याहुन अधिक इस्पष्ट करुन सान्गणे जमणार नाही! आणि तरीही.....
ते क्रान्तीकारक वगैरे बाजुला र्‍हाऊदे.. हिथ साध साध पोस्टलो तरी रण पेटतया... कैक जणानी गमतीत का होइना, या, याऽऽ लिम्ब्याला खोपच्यात खेचुन बुकलुन काढायची "सदिच्छा" प्रकट करुन दाखविली हे! DDD
मग मी नको का काळजी घ्यायला?


Milindaa
Friday, May 05, 2006 - 12:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मायबोलीचा एवढा प्रसार होण्याचे एक प्रमुख कारण हे पण आहे की registration is free/open to all . ते जर शिफारस तत्वावर चालू केले तर नवीन सदस्य संख्या रोडावेलच पण खर्‍या आणि कोणालाही न ओळखणार्‍या इच्छूकांची घोर निराशा होऊ शकते.

anonymous IDs (Genuine users who wish to be anonymous) च प्रश्न अजूनच निराळा आहे


Cool
Friday, May 05, 2006 - 12:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


बरोबर मिलिंदा. रेफरन्स देणे जर compulsory केले तर नक्कीच येउ इच्छीणार्‍या काही नव्या आणि चांगल्या सदस्यांना मायबोली मुकेल. आठवा आपले दिवस, जेंव्हा आपण ईकडे आलो तेंव्हा कोण ओळखत होते आपल्याला, तरीही आपण आलो आणि इथलेच एक होउन गेलो ना., हेच जर अगोदर पासुन reference ने असते तर कसा प्रवेश मिळाला असता., त्यामुळे reference देणे हा उपाय होउ शकत नाही. अशा ID चा त्रास रोखण्यासाठी इतर काही उपाययोजना करावी लागेल..


Lalu
Friday, May 05, 2006 - 2:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कशाला उपाययोजना? असले ID येतात आणि जातात. सतत दुसर्‍याना त्रास देण्यासाठी त्रास करुन घ्यायला वेळ कोणाकडे आहे? असल्या क्षुल्लक गोष्टीवर उपाय शोधत बसायला आपल्याला पण वेळ नाही.
असा कोणी ID आला की दर काही दिवसानी ही चर्चा सुरु होते आणि संपते. :-)

मिलिन्दा म्हणतो तसा anonymous IDs चा प्रश्न वेगळाच आहे. पण तो 'प्रश्न' नाहीच आहे. ज्याना तसं रहायचं त्याना राहूदे.


Asami
Friday, May 05, 2006 - 4:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

correct lalu मुळात कोणता id नि त्याचा reference genuine आणी कुठला नाही हे कसे ठरवणार. reference कोणाचा valid कोणाचा नाही हे कसे ठरवणार eg. MT ने कोणाला refer केले तर कशावरून नवा id हा नवीन व्यक्तीचा आहे नि MT ने duplicate id तयार केला नाहिये कशावरून ? MT mod आहे म्हणून तीच्या शब्दाला वजन आहे असे धरून चालले तर DJ ने हे केले तर ते क्शावरून genuine धरायचे ? चला वादापुअरते DJ ला admin personally भेटले आहेत म्हणून तीची case valid धरू. पण HH चे काय ? ती 6-7 वर्षे आहे पण तीचे खरे नाव बहुसंख्य लोकांना माहित नाहीई. तीच्या reference ला कसे हाताळायचे ?

Robeenhood
Friday, May 05, 2006 - 5:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

यात नक्की काय त्रास आहे हे काही मला कळलेले नाही. . कुणी सांगेल का?
एक भा.प्र.


Robeenhood
Friday, May 05, 2006 - 5:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जोपर्यंत कोणी अश्लील अथवा offending लिहीत नाही तो पर्यन्त कोणी चौर्‍यांशी लक्ष योनींचा प्रवास केला तरी काय हरकत आहे?
पुन्हा एक भा.प्र.


Moodi
Friday, May 05, 2006 - 5:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो रॉबीन मुंबईतील एका बीबीवर एका मुलाने अश्लीलच चित्रे टाकली होती, मग आपल्या एका मायबोलीकराने नंतर feedback मध्ये सांगीतल्यावर नेमस्तकानी ती पोस्ट डिलीट केली. पण दुपारी त्याने तेच केले मग मी परत सांगीतले. मग परत नेमस्तकाना ती दुसरी पोस्ट उडवावी लागली, म्हणुन मी विचारले की त्या संबंधीत व्यक्तीची मेंबरशीप रद्द करा सारखे पोस्ट उडवण्यापेक्षा. कारण त्या मुलाने ते प्रकार दुसर्‍या मायबोलीकराला त्रास देण्यासाठी केले. म्हणुन नंतर त्या feedback मधील तक्रारी इकडे वळवण्यात आल्या.



Storvi
Friday, May 05, 2006 - 5:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बरीच offending posts आली आणि गेलीही. काय फ़रक पडतो?


Robeenhood
Friday, May 05, 2006 - 6:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मूडी मला हे माहीत नव्हते बरे का.... हा प्रकार गम्भीरच आहे. नेमस्तका नाही २४ तास कसे शक्य आहे 'उडवाउडवी' करणे

Zakki
Friday, May 05, 2006 - 11:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काही दिवसान्पुर्वी झक्कीन्नी फिडबॅक वर केलेल्या
अरे बापरे, एव्हढे संस्मरणीय असे काय लिहिले मी? चुकूनच असेल! उडवून टाका. लिंबूटिंबू, तुम्हाला दुखवले असेल तर माफ करा! मी जाणून बुजून तुम्हाला कसा दुखवू शकेन? आता मला आठवत नाही मी आमरस खाल्ला तो वाकड्या कडे का तुझ्याकडे पण, खाल्ल्या मिठाला जागेन मी!

Zakki
Friday, May 05, 2006 - 11:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आता मला भिती वाटू लागली की मला मायबोलीवरून हाकलून देणार की काय? मी आता लिहिणे थांबवतो वाटल्यास, म्हणजे Three strikes and you are out या न्यायाने तर मला काही वर्षांपूर्वीच हाकलून द्यायला पाहिजे होते! असो. मी संयम राखीन, नि इथे येउ दिलेत तर नुसत्या तुमच्या गमती जमती वाचीन!

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators