Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through April 28, 2006

Hitguj » Views and Comments » Current Affairs » सरदार सरोवर धरण नक्की कोणा कोण्याच्या फायद्याचे? » Archive through April 28, 2006 « Previous Next »

Maudee
Tuesday, April 25, 2006 - 8:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुम्ही माझी post नीट वाचलेली दिसत नाही..ऽथवा तुम्हाला समोरचा माणूस काय म्हण आहे हे ऐकुनच घ्यायच नाहीये..
पण कोणीही प्रोजेcत करू नकात असे म्हणतच नाहीये ना.........ज्यान्च नुकसान होत आहे ते भरून द्या असच तर म्हणण आहे......
मोदीन्च त्यावर उलट म्हणणे आहे की तुम्हाला मेधा हव्यात की धरण ्अ चुकीचा प्रश्न आहे.....धरण करणे आणि पाणी आणि विजेचा प्रश्न मितवणे हे सरकरचे काम आहेच.....पण म्हणुन ज्यान्ची जमीन त्यासाठी वापरलि जात आहे....ज्यान्चे पोट त्या जमिनीवर आहे त्याना वार्‍यावर सोडणे योग्य नव्हे ना????
ते कोण देणार??त्यान्च्या पोटाचे काय???
प्रश्न हा आहे की मोदी सरकार जे राजकारण करत आहे ते चुकीचे आहे....


Ekanath
Tuesday, April 25, 2006 - 8:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा प्रश्न डान्स बार पेक्षा नक्किच महत्वाचा आहे,.. इथे कोणि काहिच का लिहित नाही?

सखोल माहिती असायला हवी या प्रश्नावर लिहायला. नैतिकतेच्या मुद्द्यावर गप्पा झोडायला काय माहिती लागते?

दुसरे असे की, वर्तमानपत्रे व वाहिन्या यांनी कशाला जास्त coverage दिले आहे? त्याचीच चर्चा जोरदार होणार ना?

वृत्तवाहिन्यांना कितीही शिव्या दिल्या तरी त्यांचा प्रभाव फार मोठा आहे, हे नाकारताच येत नाही.


Maudee
Tuesday, April 25, 2006 - 8:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुम्हाला कोणी सान्गितले की इथे कोणालाही सख़ोल महिती नाहीये...्ई माहीती तुम्हाला कुठुन मिळाली???



Dilippwr
Tuesday, April 25, 2006 - 9:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एकनाथ मि स्वता त्या प्रोजेcत वर काम केले आहे.
मला तिथल्या परिशितिचि चांगली माहिति आहे.
म्हणुनच सांगतोय.पुनर्वसन हे म.प्रदेशा तल्या लोकांचे करयचे आहे कारण कचमेंट area m.p. त आहे. तिथे गेले.२५वर्षे cong चे राज्य आहे
अपवाद वगळता. मग हा दोष मोदि चा नाही.
मला एवढ्च सांगायचय कि प्रत्येक प्रोजेcट चि हि बोम्ब आहे.मग
सरदार सरोवर का. तर खान कं ला मोदि ला target करायचे आहे


Ekanath
Tuesday, April 25, 2006 - 9:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी असा दावा केलेला नाही. ज्या विषयांची जाहिरात वृत्तवहिन्यांवरुन अधिक होते, ते विषय अधिक जिव्हाळ्याचे होतात.
वृत्तवाहिन्यांचा प्रभाव नाकारता येत नाही, ही वस्तुस्थिती आहे.

कोणाच्याही व्यासंगाचा अपमान करण्याचा हेतू नव्हता. तसे वाटत असल्यास क्षमा असावी.


Dineshvs
Wednesday, April 26, 2006 - 1:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिलिप, असा थेट अनुभव असलेली व्यक्ति आपल्यात आहे, हि आनंदाची गोष्ट आहे. म्हणुनच तुमच्याकडुन वस्तुनिष्ठ माहितीची अपेक्षा आहे. अवश्य लिहा.

Dilippwr
Thursday, April 27, 2006 - 6:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे धरण साधारण बडोद्या पासुन १००किमि आहे
धरण फ़ार मोठे नाहि म्हणजे भिंतिचि लाम्बी फ़ार नाहि
साधारण आपल्या कोयना सारखे पण cathchment area मोठा आहे
बहुतेक मध्य प्रदेश मधे आहे.याचे कालवे साधारण पणे जामनगर
पर्यंत जाणार


Lopamudraa
Thursday, April 27, 2006 - 6:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

dilip ajun thodyaa vistaaraane lihi naa.. .. .. .

Dilippwr
Thursday, April 27, 2006 - 8:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धरणाचे लोकेशन हे natural dam साठि योग्य आहे.म्हणजे त्याचे contract हे जे.पी. const. या कंपनी ला दिले आहे.
धरणापासुन जवळ गरुडेश्वर हे देवस्थान आहे. हा concrit dam आहे.
तसेच ह प्रकल्प म्हण्जे नुसता एक धरण नाहि यात बारेच धरण आहेत
जसे आपले क्रुष्णा खोरे.
राजपिपला हे ठिकाण आहे. तिथे lignait mines आहेत


Dineshvs
Thursday, April 27, 2006 - 3:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिलिप, तुम्ही बहुदा तांत्रिक काम करता, पण आपल्याकडे धरणाची कामे ईतकी का रेंगाळतात, त्यांची किम्मत वाढत का जाते, याचा विचार करता, तुम्हाला त्रास नक्कीच होत असेल, कारण या सगळ्या गोष्टी, तुमच्या हाताबाहेरच्या असणार.
तिलारी ची साईट बघितली का ?


Ekanath
Friday, April 28, 2006 - 1:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिलिप,

माझे दिनेशना अनुमोदन. तुम्ही या विषयावर सविस्तर लिहाच. विषयातले बारकावे आमच्यासारख्या लोकांना कळतील.

असेही म्हणतात की या धरणामुळे लाखो हेक्टर जंगल पाण्याखाली जाऊन पर्यावरणाची अपरिमित हानी होणार आहे. हे कितपत खरे आहे? धरणाचा आराखडा तयार करताना याचा विचार केला गेला नव्हता का? विस्थापितांच्या प्रश्नाचे एकवेळ समजू शकतो की ती जबाबदारी तंत्रज्ञांची नाही. पण पर्यावरणाच्या प्रश्नाकडे तंत्रज्ञांनी खरोखर लक्ष दिले नाहीये का? की लोकांनी विनाकारण बागुलबुवा उभा केला आहे?

तुमच्या सविस्तर लेखाची वाट पहात आहे.

धन्यवाद.


Limbutimbu
Friday, April 28, 2006 - 3:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एकनाथजी, तुमची शन्का रास्त हे! पर्यावरण वगैरे काही लोकान्नी बर्‍याच लोकान्चे लक्ष दुसरीकडे वळविण्याकरता उभे केलेले बागुलबुवाच हेत! धरणाखाली जेवढी वनसम्पत्ती व शेतजमिनी जाणार हेत त्याच्या अगणिक पटीन्नी जन्गले गेल्या पन्चवीस वर्षात केवळ मानवी स्वार्थी कारणान्नी नष्ट झाली हेत! रस्त्यान्च्या कडेला आज आपण पहात असलेले वृक्ष इन्ग्रजान्च्या सत्तेत लावले गेले! त्यानन्तर या जातीन्ची किती वृक्ष लागवड झाली? धारीयान्चे वृक्ष प्राधिकरण ही कागदी घोडाच ठरले! ज्यान्नी पन्चवीस तीस वर्षान्पुर्वी पाहिलेले किमान तुरळक झाडी असलेले डोन्गरही आज जेव्हा उजाड उघडे बोडके नागडे दिसतात तेव्हा जीव तीळ तीळ तुटतो! असे होण्यास अनेक कारणे आहेत! पण मिडिया केवळ सरकारी प्रशासनिक यन्त्रणेला जबाबदार धरुन त्यान्च्या नाकर्ते पणा विरुद्धच लिहिण्यात भुषण मानते जेव्हा सामान्या माणसाच्या अत्यावश्यक नैतिक जबाबदारीची कोणतीच चर्चा होताना दिसत नाही! याला अनेक पैलु आहेत... आज परिस्थिती अशी हे की खेडेगावातुन केरोसिन वाटपाची परिस्थिती बोम्बलली हे! केरोसिन एकतर मिळत नाही व मिळाले तर त्या पेक्षा जन्गलातुन आणलेली मोळी स्वस्त पडते तेव्हा लोक काय करतील? तुम्हाला जन्गल सम्पत्ती वाचवायचि असेल तर त्या प्रश्णाकडे अनेक पद्धतीने पाहुन त्या त्या उपाययोजना केल्या पाहीजेत! शिवाय आहे ते वाचविणे हा उद्देश न ठेवता आहे त्याच्यात वाढ कशी होइल ते पाहिले पाहिजे! उगीच मिडियाला चघळायला नर्मदा धरणाचा विषय मिळाला तर त्यात पर्यावरण घुसडवुन चालू विषयाचा बट्ट्याबोळ करणारे राजकारण खेळविण्यातच काही लोकान्चा आणि मिडियाचा इन्टरेस्ट असतो!
तुम्हाला सान्गतो, कधी पुण्याकडुन पौडला जा! चान्दणी चौकाच्या पुढे घाट उतरुन गेलात की काही अन्तरावर डोन्गर दिसू लागतात, त्यातला एकच एक डोन्गर हिरवा कन्च दिसतो, बाकी सगळे डोन्गर, टेकड्या उन्चवटे उघडे बोडके दिसतात! हा एकच डोन्गर हिरवा कसा? अशी माहिती मिळाली की तेथे झाडतोडीवर बन्दी हे व फारपुर्वी धारियान्च्या देखिल आधी, वनिकरण योजनेत तो डोन्गर हिरवा गार केला हे!
धारीयान्च नाव मी दोन दोनदा अशा साठी घेतो की, त्यान्ची सामाजिक वनिकरणाची मोहिम (?) पुर्णपणे फसलेली हे! त्या उलट कोण ते सिन्ग का कोण आयुक्त असताना पिम्परी चिन्चवड मधे भोसरी एरियात रस्त्यानकडेला केलेली झाडान्ची लागवड आज सावली मिळण्यास व पुण्यापेक्षा पिम्परी चिन्चवडास हिरवेगार दिसण्यास कारणीभुत झाली हे! दुर्गादेवी टेकडी येथिल वृक्ष लागवड त्याचेच उदाहरण हे! या कामात निरनिराळ्या उद्योगान्नी देखिल सहकार्य केले! अर्थात केवळ भरभर झपाझप वाढणार्‍या निलगिरी किन्वा सुबाभुळ या झाडान्पुरते थाम्बण्यापेक्षा नन्तर इतरही जन्गली झाडान्ची जसे की फणस, चिन्च, वड, पिम्पळ इत्यादीक लागवड होणे अपेक्षित होते व तसे कोणत्याच वनिकरणाच्या कार्यक्रमात झालेले दिसत नाही, पण तरीही काही झाले हे ही नसे थोडके!
मूळ मुद्दा होता की नर्मदा धरणाच्या पाण्याने काही लाख हेक्टर (म्हणजे नक्की किती?) जन्गले नष्ट होणार वगैरे बागुलबोवाच हेत! आमची एक पद्धत असते बोलण्याची, तु केव्हा येशिल असे विचारता तीन साडेतीन पर्यन्त येतो असे उत्तर मिलते... पण तीन आणि साडेतीन मध्ये तब्बल अर्ध्या तासाचा फरक हे त्या तीस मिनिटान्ची किम्मत आम्हाला नसते.. तीच बाब अन्य हिशेबान्ची, अगदी तस्सच हे नर्मदा धरणाखाली जाणार्‍या वनसम्पत्तीच हे!
तुम्हाला काय वाटत?


Ekanath
Friday, April 28, 2006 - 4:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लिंबूटिंबू,

माझ्याकडे निश्चित आकडेवारी उपलब्ध नाही, म्हणून मी "काही लाख" हेक्टर असा शब्दप्रयोग केला. अचूक प्रतिपादन केले पाहिजे हा तुमचा मुद्दा बरोबरच आहे, पण अनेक दिवसांपूर्वी वाचलेला तपशील विस्मरणात गेला आहे!

दुसरे असे की, सामान्यांच्या जबाबदारीची जाणीव, हाही तुमचा मुद्दा बरोबरच आहे.

मीडियाविरुद्ध वारंवार उगाळण्यात काहीच अर्थ उरलेला नाही. प्रसारमाध्यमे, जे खपते ते विकतात. त्यांच्याकडून काही घ्यावे, इतकी लायकी त्यांची राहिलेलीच नाहीये.

सरदारसरोवराच्या बाबतीत विचार करताना, फक्त मीडियामार्फत होणार्‍या प्रचाराचा विचार करुन भागणारे नाही. साधारण १९९०, ९१ पासून अनेक संघटनांनी या प्रकल्पाविषयी समर्थनात्मक आणि विरोधात्मक असा बराच प्रचार केला आहे. अनेक सभांना मी उपस्थित राहिलो होतो.

यातून किमान माझे तरी असे होत गेले की मला दोन्ही बाजू बरोबर वाटायला लागल्या!

आता विस्थापितांच्याच प्रश्नाचे घेऊ. त्यांचे नीट पुनर्वसन कसे करायचे? हाच मोठा प्रश्न आहे. त्यातले बहुतांश लोकं आदिवासी जमातीतले आहेत. त्यांची उपजीविका मुख्यतः जंगलावरच होते. त्याव्यतिरिक्त कोणतेही इतर काम त्यांना जमत नाही. त्यामुळे जंगले नष्ट होणे, हे संकट त्यांच्यासाठी जीवावरचेच आहे. त्यांनी कोठे जायचे? प्रत्येक जंगलाची स्वभाववैशिष्ठ्ये वेगवेगळी असतात. एकास एक म्हणून त्यांना दुसर्‍या जंगलात नेऊन सोडले तरी तेथिल काहीच माहिती नसल्याने, त्यांना नवीन जंगलात जगणे सह्य होईल का?

मुद्दा हा आहे की, इतके मोठे प्रकल्प बांधण्याआधी काय आराखडे मांडले होते? त्यामुळे होणारे नुकसान, कशाप्रकारे भरून काढण्याचा विचार होता / आहे? हे प्रश्न महत्त्वाचे आहेत.

आता धरणाची फायदेशीर बाजू नाकारता येतच नाहीत. गुजरातेतल्या अनेक दुष्काळी भागांना पाणी मिळणार आहे, भरपूर वीज मिळणार आहे. वगैरे वगैरे.

श्री. दिलीप यांनी या मुद्द्यांवर शक्य तेवढा प्रकाश टाकावा अशी त्यांना विनंती आहे. इतक्या मोठ्या धरणाचा आराखडा आखताना, त्याने होणार्‍या नुकसानाची कितपत आणि कुठे नोंद घेतली गेली होती? त्यावर काय उपाय योजण्याचे ठरवले होते? जंगले नष्ट झाल्याने किती दुर्मिळ वनस्पतींना आपण मुकणार आहोत, याची पहाणी केली होती का? (नकी किती मनुष्यप्राणी विस्थापीत होणार, याचीही नीटशी आकडेवारी उपलब्ध नाही, असे कळते. किमान मेधा पाटकरांकडे तरी ती आहे की नाही, ही शंकाच आहे!) तशी घेतली नसेल तर संबंधित तंत्रज्ञांवर गुन्हा दाखल का करू नये?

तुमचे म्हणणे की सामाजिक वनीकरण हा एक विनोद होऊन बसला आहे, हे खरेच आहे. त्याला जबाबदारही तुम्ही म्हणता तसे आपण लोकंच आहोत. पण बहुधा सरदार सरोवराने होणारी हानी आणि सामाजिक वनीकरण हे दोन भिन्न मुद्दे असावेत. सध्या फक्त पाटकर आणि मोदींकडे बघू. धारीयांचे मूल्यमापन नंतर करू, कसे? :-)


Limbutimbu
Friday, April 28, 2006 - 5:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>> म्हणून मी "काही लाख" हेक्टर असा
एकनाथजी, तुम्ही किन्वा माझ्याकडुन तसा शब्दप्रयोग होणे ही फार गम्भिर चूक नाही, पण प्रचाराच्या नादात मिडिया मार्फत असे आकडे तसेच विस्थापितान्चे भीषण चित्र जे उभे केले जाते ते अयोग्य हे अशा अर्थाने मी तो उल्लेख केला होता, वैयक्तीक नाही!
>>>>यातून किमान माझे तरी असे होत गेले की मला दोन्ही बाजू बरोबर वाटायला लागल्या!
सामान्य माणसाला गोन्धळात पाडु शकणारी हीच तर वैचारीक प्रचाराची खुबी असते! समोरच्याच्या मनात नुसत्या शन्काकुशन्का निर्माण होऊन तो अधिकाधिक गोन्धळात कसा पडेल हे बघितले जाते.. पण काहिजणान्च्या मनात निर्माण होणार्‍या प्रश्णान्च्या उत्तरान्ना मिडिया हाताळत नाही, नाही सरकार हाताळत!
अर्थात तुम्ही म्हणता तस मिडिया मग ती वृत्तपत्रे असोत की टीव्ही वाहीन्या, त्यान्च्या मुर्दाडपणाची चर्चा करण्यात खरच मतलब नाही!
आदिवासीन्च्या विस्थापनाचा मुद्दा तात्विकदृष्त्या बरोबर वाटला तरी त्याला दुसरी बाजू हे! आजवर विस्थापन केवळ धरणान्मुळेच होत होत असही नाही आणि हे विस्थापन केवळ पहिले देखिल नाही! आणि त्यान्ना नविन वातावरणाशी जुळवुन घेता येणार नाही, किन्वा वेगळ्या जन्गल सम्पत्तीमुळे किन्वा जन्गलेच नसल्यामुळे ते जगुच शकणार नाहीत वगैरे गोष्टी धरण्याच्या विरोधाला कारुण्याची झालर चढविण्यासाठी ओढुन ताणुन आणलेल्या वाटतात! तुम्ही कुठे असता माहीत नाही पण जरा पिम्परीचिन्चवडमधुन जाणार्‍या पुणे मुम्बै हायवेच्या रुन्दीकरणाची मोहिम बघा! वरील न्याय लावुन कुठलेच विस्थापन नाकारायचे ठरल्यास ही रस्तारुन्दी होणे ही अशक्य होऊन बसेल, कारण जरी नुकसानभरपाई मिळाली तरी रस्त्याकडेचे तमाम धन्देवाले असे म्हणु शकतात की इथली धन्द्याची चालती जागा सोडुन दुसरीकडे कुठे धन्दा होणार? नाही झाला तर कोण जबाबदार? वगैरे वगैरे! शिवाय भरपाई जागा मालकाला मिळते, भाडेकरुन्ना काही मिळते का हेही तपासले पाहीजे! आणि मग पाटकर बाई केवळ आदिवासी वगैरे शोषित अडाणी गरीबबिचारे वगैरेन्चीच बाजू घेवुन लढणार का? का? तिकडे उपद्रव शक्तीला जास्त किम्मत हे म्हणुन? की रस्तारुन्दीमुळे झालेले विस्थापित, काश्मिरातल्या जिहादीन्मुळे विस्थापित झालेले काश्मिरी पन्डित, झोपडपट्ट्या हलविण्यामुळे होत असलेले विस्थापन वगैरे विस्थापित पाटकर बाईच्या दृष्टीने कमसर हेत का?
त्याशिवाय नोकरी पोटापाण्याकरता पुर्वी कोकणातुन जसे पळीपन्चपात्र घेवुन घाटावर आलेले कोकणी भट भिक्षुक हातावर पोट चालवित कोकणातुन विस्थापित झाले तसेच बिहार युपीतुन विस्थापित होऊन महाराष्ट्राकदेच काय तर कुठेही जाणारे ते विस्थापित नव्हे तर आणिक कोण? अगदी गेला बाजार पुण्या मुम्बईत र्‍हाऊन आयटी क्षेत्रात शिक्षण घेवुन बेन्गलोर हैदराबाद अशा दुर अन्तरावर विस्थापित होणारे, केवळ पैसे कमावतात म्हणुन त्यान्च्या विस्थापनाचे काहीच महत्व नाही? विन्चवाचे बिर्‍हाड पाठीवर या न्यायाने चालणारे प्रगती करत रहातात तर एकाच ठिकाणी कायमचे रहाणारे शेणकीतले किडे शेणातच आयुष्य घालवतात हे त्रिकालाबाधित सत्य हे! नवि गाव शहर वसण व पुन्हा नष्ट होण हा इतिहासक्रम हे! हे बदल अमान्य करीत प्रगतीचे निधान असलेल्या धरणास गोरगरीब, शोषित वगैरेन्बद्दल सहानुभुतीची लाट निर्माण करुन त्या लाटेवर स्वार होत आन्धळा उपद्रवी विरोध करुन पाटकर बाई काय साध्य करु पहाताहेत हे त्या अणि देवच जाणे!
त्यान्चा विरोध नकारात्मक हे हे सुनिश्चित हे! त्यान्नी सकारात्मक विरोध करीत विस्थापितान्च्या पुनर्वसनाबद्दल काही ठोस उपाय, मार्ग सुचविले असते, त्याकरीता अनेकानेक सन्घटनान्ची मदत मागुन कार्य केले असते तर आत्ताचे चित्र वेगळे दिसले असते व निगरगट्ट सरकारी प्रशासन यन्त्रणा देखिल झडुन कामाला लागली असती! हो, अगदी मध्यप्रदेशाती कॉन्ग्रेसी राजवटीतली देखिल! पण ते न करता एकला चलोरे करीत उभे केलेले लढे मिडियामुळे लोकान्ची तत्कालिक सहानुभुती मिळवितात पण दुर्दैवाने नन्तर अशि सहानुभुती केवळ लढ्याचे नेतृत्व करणारेच गमावुन बसत नाहित तर ज्यान्च्या करिता असले लढे उभारले जातात ते ही असली नसली सगळि सहानुभुती गमावुन बसतात! (शेवटी योग्य नेता मिळणे हे त्या त्या काळच्या त्या त्या समाजसमुहाच्या भाग्यातच असावे लागते हेच खरे)
मला एकुण विस्थापितान्ची सन्ख्या, त्यान्ना देवु केलेली व देण्यात आलेली आर्थिक मदत, व ती कशाच्या बदल्यात किती किती याचे तपशील हवेत! सरदारसरोवराच्या समर्थनाचे मुद्दे काय आहेत त्याची माहिती हवी हे! कुठे दोन्ही बाजुन्ची धोरणे सान्गणारी साइईट असल्यास कृपया इथे कळवावी


Sanghamitra
Friday, April 28, 2006 - 5:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लिम्ब्या झकास लिहीलयंस. प्रत्येक वाक्य पटतंय.
एकनाथ खरंच दोन्ही बाजू बरोबर वाटणं हेच तर आपल्यासारख्या सामान्य माणसाचं वैशिष्ट्य आणि त्या तशा वाटायला लावणं हे त्यांचं.
शेवटी सामान्य माणूस आखाड्याबाहेर. जो जिंकेल त्याच्या नावानं टाळ्या वाजवायला.


Ekanath
Friday, April 28, 2006 - 6:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माफ करा. शब्दाला शब्द लावून विषय वाढवायचा नाहीये.

पण या विषयावर दोन्ही बजू खर्‍या वाटण्याचे कारण असे की दोन्ही बाजूंच्या मुद्द्यांमधे भरपूर तथ्य आहे. म्हणून मुळातच planning ची बोंब होती का? असा मुद्दा येतो.

सांगायचेच झाले तर "मंदीर व्हावे की नाही" या प्रश्नावर निखालसपणे एक बाजू घेता येते. सरदार सरोवर प्रश्नावर, जर तुम्हाला दोन्ही बाजू सखोल कळल्या, तर तशी एकाची बाजू घेता येत नाही. याची कारणे (अपुरी असली तरीही) मी वरती दिलेली आहेत.

लिंबूटिंबू, सगळ्याच विस्थापितांना तुम्ही म्हणता तसे एकाच तागडीत तोलणे शक्य आहे का, याची मला शंका वाटते. असो. यावर मतभेद असू शकतात.
सगळ्याच प्रकारच्या विस्थापितांना एकाच तागडीत न तोलण्याचे माझे कारण असे की मी माझे शहर सोडून इकडे आलो ते हाती नोकरी होती म्हणून. माझा शहरी जीवनाचा अनुभव होता आणि प्राप्त झालेल्या थोड्याशा शिक्षणामुले जगात कुठेही मला adjust होता येईल, याचा आत्मविश्वास मला होता. ज्यांना मुळातच आपल्या विश्वापलिकडेही विश्व आहे, याची जाणीव नाही, त्यांचे विस्थापन, आणि नोकरीसाठी जाणीवपूर्वक नवीन प्रदेश स्वीकारण्याचा निर्णय, एकाच तागडीत तोलणे मला अप्रस्तुत, अन्यायकारक आणि स्वार्थी वाटते. हे म्हणजे, भुकबळी जानार्‍याला म्हणायचे की, "बाबा रे का ओरडतोस? आमच्याइथेही दिवसातून आठ तास वीज जाते, उन्हाची तलखी भागवायला थंड पाणीही मिळत नाही. तेंव्हा तुझे नि माझे दुःख एकच आहे. मी ओरडत नाही, तूही ओरडू नकोस!"

मेधा पाटकरांना सरसकट नावे ठेवणे हेही, तुम्ही म्हणता तशाच प्रदुषित प्रचाराचे फळ आहे, असे वाटते. मेधाताईंच्या आंदोलनाचे जेंव्हा सुरवात झाली तेंव्हा ते अतिशय अभ्यासपूर्ण, नियोजित आणि focused होते. पुढे त्या वहावत जायचे कारण असे की त्या मांडत असलेल्या प्रश्नांवर विचार करणे तर दूरच पण साधी दखल घेतल्याची पोचहे शासनाने त्यांना दिली नाही. मेधाताईंने तिथल्या भागातल्या सामाजिक कामात अतुलनीय योगदान आहे. त्या फक्त उपोषनेच करत नाहीयेत, तर अनेक आदिवासींना शक्य तेवढी मदत करून स्वतःच्या पायावर उभे करण्याचा प्रयत्नही करत आहे.

काही बाबतीत मेधाताईंनी ताणले असले, तरी तुम्ही म्हणता तसे त्यांना मोडीत काढणे मुळीच शक्य नाही. इतकी ताकद मागे असताना, मेधाबाईंना दिल्लीत दंगल घडवून आणणे सहज शक्य होते. त्यांनी ते जाणीवपूर्वक टाळले आहे. किमान यासाठी तरी त्यांचा अपप्रचार न करण्याची नैतिक जबाबदारी आपल्यावर येऊन पडते. आपल्यावर येऊन पडते, ती अशासाठी की, समाजाला चांगले नेतृत्त्व मिळत नाही, अशी बोंब आपणच मारत असतो.

असो. आता जरा माहितगाराकडूनही काही माहिती मिळाली तर बरे होईल, नाही का?


One anti-dam website I could find.
http://www.narmada.org/index.html

Dilippwr
Friday, April 28, 2006 - 6:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एकनाथ आपल खर आहे.जेव्हा प्रकल्प होतो तेव्हा पर्यावर्णाचा विचार तंत्रन्द करत नाहित. ते विचार करणार जास्तीत जास्त पाणी साठवण्याचा.पण प्रकल्पा मुळे पर्यावर्णाचे फ़क्त नुकसान होते असे नाहि.उलट आपण कोयना कींवा वारणा chandoliproject पाहा तिथे घनदाट अभय अरण्य या प्रकल्पा मुळे झाले आहे.

आता नर्मदा प्रकल्प घ्या.एकुण ३५०००लोक(पाटकर याचा आकडा) विस्थापित होणार आहेत.पण जर हे पाणी कच्छ,सोराष्ट्र,या भागात गेली तर अक्षरशा दोन कोटि लोकां चा फ़ायदा होणार आहे.तिथे आज जवळपास वाळवंट आहे.व तेच काठियावाडि गुजराति लोक आपलया
कडे मुंबाइ वै. ला दोन शतका पासुन विस्थापित झाले आहेत

लिम्बु चे बरोबर आहे कि या पेक्षा जास्त पर्यवरण नुकसान माणसाने कीले आहे. जेव्हा बोरिवली उद्यानात घुसखोरि करणार्या व पर्यावरणाची वात लावणार्या परप्रांतिय लोकावर कारवाई केली तर हेच पर्यावरण वादी human right activist बनुन बोम्बा ठोकणार हा दुट्टप्पी पणा नव्हे काय?


Limbutimbu
Friday, April 28, 2006 - 7:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सन्घमित्रा, प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
एकनाथजी, साईट बद्दल धन्यवाद!
तुमच्या पोस्ट मधे आलेल्या मुद्द्यान्बाबत जरुर लिहिन, पण आत्ता खुप गडबडीत हे!

दिलिप किन्वा अजुन कुणी, चीन मधे यापेक्षाही मोठा प्रकल्प उभारला हे किन्वा उभारणी चालु हे, त्याची माहिती कुणाला आहे का? एखादी साईट? मी दिस्कव्हरीवर त्या धरणाची माहिती बघितली होती!
एक नशिब की पनामा कालव्याच्या पाण्याच्या गरजे करता जी धरण बान्धली गेली हेत ती बान्धताना त्या वेळेस असले अडथळे नव्हते!

प्लॅनिन्गची बोम्ब असणे शक्य नाही, मुळ धरण १३८ मिटरचे ठरवुन त्या प्रमाणेच पायाभरणी झाली हे! नव्वदच्या दशकात मलाही पाटकरान्चे खरे वाटत होते किम्बहुना धरणे वगैरे भव्य दिव्य प्रकल्पान्च्या विरोधात मते होती, कालान्तराने समाजसमुहाकडे अधिक विशाल नजरेने बघितल्यावर माझी मते बदलत गेली हे मला मान्य करायला हवे! पण प्रश्ण माझ्या मतान्चा नसुन, दिलिप म्हणतो त्याप्रमाणे प्रचन्ड मोठ्या प्रदेशातील जनसमुहाची आत्यन्तिक निकडीची गरज काय हे व ती गरज भागविण्यासाठी काय साधन सामुग्री उपलब्ध हे याचा विचार करता धरणाखाली जात असलेल्या जन्गलान्चे, वस्त्यान्चे, शेतजमिनीन्चे सर्वेक्षण करुन प्रकल्प फायदेशीर हे की नाही याची वास्तपुस्त घेतली गेलीच नसेल ही शन्का येणे म्हणजे समर्थ भारतातल्या त्याहुन समर्थ अशा अधिकारी व तन्त्रज्ञ यान्चे वर अन्यायकारक हे असे माझे मत.
आणि पन्चवीस तीस हजार लोकान्च्या पुनर्वसनाच्या प्रश्णासाठी लाखो लोकान्ची तहान अन शेतीच्या पाण्याची सोय नाकारायला जे धाडस असावे लागते त्या बाबतीत मी मेधाताईन्चे जरुर अभिनन्दन करीन! पण असल्या धाडसानेच गन्गा कावेरी प्रकल्प बासनात गुन्डाळला जाउन निषेध करणार्‍यान्ना अधिकाधिक फाट्याचे विषय मिळत जात आहेत हे विसरुन चालणार नाही!
प्रश्ण आजच्या काही हजार लोकान्चा नसुन उद्याच्या भारतातील भावी पिढीला आम्ही काय देवुन जाणार आहोत हा आहे आणि भारतीय उपखन्डात्मक भव्य प्रदेशास धरणे रस्ते कालवे जोडनद्या अशा प्रकल्पान्ची अत्यावशकता हे!
गडबडीत असल्याने वरचि पोस्ट काहीशी विस्कळित झाली हे त्याबद्दल क्षमस्व!


Ekanath
Friday, April 28, 2006 - 7:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुन्हा २ मुद्दे!

१. पर्यावरणाची नाश.

सर्वसामान्यपणे शहरात होणारी पर्यावरणाची आणि अशा कामामुळे होणारे पर्यावरनाची हानी, यात काही मुख्य फरक आहेत. दोन्ही प्रकारची हानी, ही घातकच.
जंगलात अनेक प्रकारच्या प्राणी व वनस्पती जाती अतिशय आनंदाने, सुखाने नांदत असतात. त्यांच्यात एक जैविक चक्र असते. शृंखला असते. विज्ञानाच्या अभ्यासाच्या दृष्टीकोनातून, ही शृंखला जिवंत रहाणे अत्यावश्यक असते, कारण यातूनच फार महत्त्वाचे शोध लागू शकतात. जंगलांचा नाश झाला की अशी वन्य संपत्ती धोक्यात येते, जी हानी कधीही भरुन काढता येणार नाही.

शहरात होणारी पर्यावरणाची हानीही तितकीच चिंताजनक आहे. पण त्यामुळे लोकांच्या आरोग्यावर मुख्यतः परिणाम होतो. ह्यात कोणतीही सांपत्तिक वन्य हानी होत नाही. व ही भरून काढणेही शक्य असते.

२. विकास आणि समतोल

विकास निश्चितच असावा. जास्तीत जास्त लोकांचे कल्याण नक्कीच साधले जावे. परंतू, त्यासाठी कुणाला "बळी" देण्याची इतके हौस का असते? यातला मध्यममार्ग नसतोच का? मोठी धरणे आणि त्याचे फायदे तोटे हा वेगळा विषय आहे. किंवा अगदी नर्मदा बचाव वाल्यांनीही मुळात धरणाला फारसा विरोध केलेला नाही (असे वाटते). विस्थापितांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याने त्यांना ही टोकाची भूमिका घ्यावी लागली आहे.

असो, माझ्याकडे या विषयावर आणखी काही लिहिण्यासारखे शिल्लक नाही.

माह्या पद्धतीने मी असे अनुमान काढेन की, संबंधित धरणाची उपयुक्तता कितीही मोठी असली तरी अपुरी तयारी, जंगलसंपत्ती बद्दल अनास्था, आणि विस्थापितांबद्दल निर्दयपणा, यामुळे या उपयुक्त प्रकल्पला मोठेच गालबोट लागले आहे.

धन्यवाद.


Dilippwr
Friday, April 28, 2006 - 7:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश
जेव्हा प्रकल्प रेंगाळतो तेव्हा त्याची cost अफ़ाट वाढ्ते. म्हणजे क्रुष्णा खोरे हा मुळात 10000 कोटि चा आता 75% पूर्ण होवुन सुध्दा अजुन 25000 कोटि लागल्तिल.
या उलट कोकण रैल्वये हा वेळेत झाल्याने cost वाढली नाही.
तिल्लारि पाहिलाय earthn dam आहे
काहि social worker ना पण त्यांच्या कार्याचा अंहकार आहे


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators